Sunday, September 26, 2021

लग्न गावचे

||असे लग्न आणि असा वाडपी ||

पूर्वी लग्न म्हणजे फक्त लग्न जेवण हेच मुख्ये उत्सव असायचा . सत्तर चा काळ असेल . बायका पोरं आणि तमाम लेकुरे लग्नात फक्त जेवायला येत . 

ग्रामीण भागात तर मजाच निराळी गडे हो .घरातील चुलीला अवतान असायचे . चिल्ले पिल्ले लग्नाला जायची सोय होती .  इथे शहरात एकाने किंवा जास्तीत जास्त दोघाणे लग्नात जाण्याचा आघात म्हणा किंवा अलिखित पायंडा पाडला आहे . 

मुला बाळांना सोबत घेऊन जाणे हे खूप त्रासदायक म्हणा  किंवा जिकिरीचे होय . 

अति ग्रामीण भागात आणि गरीब कुटुंबात लग्न हा एक छोटासा उत्सव असतो . कांही झगमगाट नाही ,मंडप नाही ,कोंगो भोंगो नाही . फक्त बाजा सनई किंवा क्लिरीनेत ,ढोल आणि द्रम . 

मंग यांचे  लग्न कुठे असते ,तर गाव शेजारी एखादे मंदिर किंवा गावातील किंवा  गाव शेजारच्या   प्राथमिक शाळा . याच  शाळेत लग्न थाटात होते . यांना लग्नात सर्व विधी घरीच कराव्या लागतात ,जसे भुलभ्या वर नवरदेव आला की तिथे आंघोळ घालून हळद लावली जाते . भुलभा म्हणजे आंब्याच्या फांदी पासून तयार केलेला हळदीचा मांडव .थोडे जांभळी चे फाटे ,चिंचेच्या झाडाच्या फांद्या किंवा लोकल भागात जे झाड उपलब्ध असतील त्या झाडाच्या फांद्या . 

आंघोळ करून झाली की नवरा घरातील बायका ,यात भाग घेतात . यात मुख्यत्वे आत्या असतात . आणि इतर गल्लीतिल बायका मिळून हळदीचे गाणे गातात ... 

'नवरा आला मांडवा पाशी 
नवर देवा ला ग हळद लावा थोडी .... '

असे आणि अनेक गीत पेश केले जाते ,नवरदेव झोप येत असली तरी कांहीच करू शकत नाही ,डोक्यावर सफेद टोपी ,हातात चाकू च्या टोकाला लिंबू असतो तो धरून स्मित हास्ये करीत बसलेला असतो . पांढरा पेहराव असतो . अंगात सांडो बंनियन आणि खाली नाड्याची पटलोण असते . 

कधी एकदा आंघोळ घालतील आणि भुलब्यावर बसवतील असे मनात विचार करीत असतो ,बिचारा नवरा त्रस्त झालेला असतो . 

दुसर्‍या दिवशी लग्नाची तयारी होते . नवरा गाढवाची ऊंची असेल एवढ्या घोड्यावर बसवतात . वाजत गाजत 'मारती च्या पारावार ' घेऊन जातता . मंदिरात प्रवेश नसतो तरी खालच्या पायरीला नारळ फोडून डोक त्याच परिवार ठेऊन परत नवरा घोडवर स्वार होऊन लग्न मंडपात येतो . एकडे जेवायला आलेले पाहुणे मित्र कधी लग्न लागल आणि कधी जेवण करून कल्ति मारू या विचारात असतात . 

एकदाचा नवरा महदेव मंदिरात येतो न येतोच  . बाजे वाले  गलबला लई करतात . इकडे तिकडे मांड्या घालून बसलेले सोयरे मंदिर च्या दारावर  घेराव करतात ... एकदाचा झाडावर लटकावलेल्या भोंगयातून आवाज येतो .... 

'आssता एक विचार श्री कृष्टणा नवरा .... 

लोक भरा भरा हातातील पिवळी ज्वारी उदधूळ मोकळे होतात . जंगम अप्पा किंवा आपलाच भावकीतील कोणीतरी .... 

लग्न घटिका संपवन्यांच्या नादात असतो .... फुका रं फुका असा मधून कुणी तरी आवाज करतो ,एकडे किलाट मास्टर उंच वर तोंड करून गाणे फुकत असतात ... 

आज मेरे यार की शादी है ,हे गाणे गातो .. लोक तिकडे टाळ्याचा कडकडाट करतात ... 

लगेच भोंगयातून आवाज येतो . जेवण केल्याशिवाय कोणी बी जाऊ नका . लगचे दूसरा आवाज येतो की डाव्या बाजूला नवरदेवाचा आहेर चालू आहे . मग लगेच दूसरा आवाज येतो , रामराव पाटील यांचे कडून नवर देवास एकसे एक रुपये सप्रेम भेट . तिसरा आवाज येतो की रमाकांत माने याचे कडून एककवनन्न रुपये आहेर .  

इकडे प्राथमिक शाळेत पहिली पंगत बसलेली असते . बायका ,लेकरं दिवसभर अन्न आणि पाण्या वाचून भुकेणे व्याकूळ झालेले असतात .आप -आपल्या गावी पायी जाणारे सोयरे पहिल्या पंक्तीला बसलेले असतात . 

मग वाड सुरू होते . तेवढ्यात जोराचा वारा सुटतो . एक शाळकरी पोरगं पंक्तीला येऊन जोरात वरडतय ,आपले आपले पत्रवली सांभाळा जोरात वारा येत आहे . 
लोक आप आपली पात्रवली आपल्या बाजूला अर्धी मोडून जागा न सोडता तिथेच बसलेले असतात . थोड्या वेळाने वावठल निघून जाते आणि जेवण वाडपी आपले हातात टोपली आणि स्टील चे बकेट एका मागे एक घेऊन येतात . एक जन चपाती  वाढतो ,दूसरा भात आणि दिसरा वरण . ... 

कोपर्‍यतून कुणी तरी आवाज काढतो . पहुंचल का सगळ्यांना घ्या मंग सुरू करा . लगेच कुणी तरी मधेच आपला मंजुळ आवाज काढते ... 

"सदा सर्वदा योग तुझा घडावा,तुझे कारणी देह माझा झिजवा ,उपेक्षि नको कोणी रे गुणवंता.... पुंडलिक गौर देव हरी विटल ...." घ्या हो पाहून घ्या . 

मग जेवण सुरू होते ,शाळकरी चार पोरं एकडून तिकडे नुसते स्टील चे मग हातात घेऊन .... पानी पाहिजे का पानी असे म्हणत फिरत असतात . 

हा शाळकरी वाडपी खूप श्रुजनशील असतो शेवटचे काम करीत असतो ... पाणी दान . 

बालाजी रघुनाथराव शिंदे 

#मिनांडर

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...