Friday, October 8, 2021

हरिपाड,अलपूझा केरळ

जेंव्हा मी दौऱ्यावर होतो…हरिपाड


हरिपाड


हरिपाड हे अलापूझा जिल्ह्यातील गाव ,केरळ म्हणटले की हिरवेगार ,रान आणि शिवार आणि गर्द झाडी डोळ्यासमोर आलाच म्हणून समजा.


हरिपाड हे पश्चिम समुद्र किनाऱ्यापासून नुकतेच दोन किलो मीटर अंतरावरील गाव .गर्द झाडी ,तुबकदार आणि सुबक आकाराचे रंगी कौलारू बंगले .घरादारात विविध नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे ,त्यात डोके वर काढणारे नारळाचे गगनचुंबी झाड ,नारंगी रंगाचे गोल गरगरीत लटकणारे दहा ते वीस नारळ .


पाण्यानी गच्च भरलरली गावे .निमुळती रस्ते .कुठं कुठं तर चार चाकी जाईल एवढाच रस्ता.एक गाडी आत गेली की दुसरी बाहेर निघणे कठीण .एकाला माघार नक्कीच घ्यावी लागते.


लोकल माहिती च्या आधारे बरीच माहिती उपलब्ध झाली.

इथे भाषेची खूप अडचण धड त्यांना हिंदी येत नाही की इंग्रजी .आपल्याला एखादं शिकलेले द्विभाषिक वापरावे लागतात .कामात खूप अडचण येते .तो पण आपल्या लातूरच्या भाषेत इंग्रजी बोलत असतो.त्याला देखिल हिंदी किंवा इंग्रजी धड येत नाही .


सुरुवातीला मला 'हरिपाड 'हे देव भूमी किंवा 'हरी चे पद ' असेच वाटले .खरेच इथे एकूण सत्तर च्या आसपास मंदिर आहेत .पाड म्हणजे नद्या .हा इलाखा पूर्ण नद्यांचा आहे .

अलीपुझा हे खूप जुने शहर.मंदिराचे महेर घर 

जवळच ४ किलो मीटर वर दोन मोठे  बुद्ध विहार असून ते इथं प्रसिद्ध आहे .एक 'महावेरीकेरा आणी दुसरे  कैरुनाली'. 


आज संध्याकाळी मी तो विहार पाहण्यासाठी येथील स्थानिक कोणाची मदत घेऊन जाणार आहे .कारण बुद्ध आणि त्यांचे पुरातन विहार हा एक माझा आवडीचा विषय आहे .पाली भाषेचा विध्यार्थी आणि अभ्यासक या नात्याने हे शोध कार्य हा माझा नित्याचा वयक्तिक कार्यक्रम आहे.


कालच भल्या पहाटे उठून मी आणि माझा कार्यालय मित्र डॉ पुथूलिन मार्टिन पी.जे. , (मास मेडिया ऑफिर) आम्हा दोघांनी  मिळून 'नागराज्या' या मंदिराला भेट दिली .डॉ मार्टिन हा कोट्याम केरळ चा रहिवाशी असल्या कारणाने कॅम्प साठी माझ्या ऑफिस ला अनेक विन्नती पत्र येत असतात .याच मूळे केरळ राज्यात शिरकाव करण्यास अडचण येत नाही .हरिपाड येथील 'नागमंदिर ' या वरून एक गोस्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की हे गाव कदाचित ही नागभूमी असावी .तिसऱ्या शतका नंतर  बुद्ध भिक्खु आणि विहार यांचा नाश करण्यात आला असावा .


हे या वरून कळते की  .हे एक खूप मोठे आणि प्राचीन मंदिर असून येथील लोकांची खूप श्रद्धा आहे .


सध्या मंदिराच्या आतील जिर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे.मुख्य दरवाजा तर थोडा वेळ जागेवर थांबून नक्षीकाम पाहण्यासाठी मजबूर करतो.लाकडा वरील नक्षीकाम,कोरीव काम खूप सुन्दर आहे .आतील बाजूला अनेक नाग नागीण यांची चित्र रेखाटली आहेत .हे कोरीव काम बघून माणूस थक्क होतो .


मंदिराच्या आत मध्ये प्रवेश केल्यावर केवळ 'साप' आणि 'सापच' दिसतात ,नक्षीकाम केलेले .जो माणूस सापाला घाबरत असेल त्याला तर इथे खूप भीती वाटल्यागत राहणार नाही .मला पण सारखे वाटत होते की इकडे पायाजवळ एखादा साप किंवा सापाचे पिल्लू तर पायात घुटमळत नाही असा भास झाला होता.म्हणून मी जास्त वेळ आत पाहण्याचे धारिष्ट्य केले नाही .


अलीपुझा येते चिकन कमी पण 'बदक'  खायला नक्कीच मिळतात .बदकाचे पिल्ले हा येथील खाद्य पदार्थ .चिकेन कमी बदक जास्त खाल्ले जाते .मी पण प्रथम इथे 'डक फ्राय ' खाल्ले .चवीला तसे चिकन सारखे लागत नाहीत.कधींतुम्ही आलात तर लाईव्ह डक नक्कीच खा आणि आस्वाद घ्या .


समुद्र जवळ असला तरी ,ताजे मासे  खाण्यास मिळत नाहीत .इतर भाज्या या केरलीयन असतात ,तिखट कमी ,मसाले कमी .रंग लाल असला तरी मिर्ची तिखट नसते .सांबर हेच मला आवडलेले पदार्थ.यात पाणी आणि भरपूर तरकारी समाविष्ठ असतात म्हणून खाण्यास आवडते .

पांढरा भात हे येथील स्थानिक लोकांचे मुख्य खाद्य .

मी गेली २७ वर्ष देशातील कित्येक राज्य फिरली ,पण माझ्या गावचा रस्सा अजून कुठे मला सापडला नाही ,की कुठे मुंबईचा ताजा  मासा,मावरा मिळाला नाही .


कैकदा मी केरळला कार्यालयीन कामाकरिता आलो पण कांही तरी लिहावे असे कधी वाटलेच नाही .कारण कामात डोके वर काढता येत नाही .

आज इथे आल्यावर गेली दोन दिवस टूर वर कांही  लिहावे असा मनात विचार आला म्हणून माझा हा उहापोह .


पूर्वी लिहलेल्या गोष्टी  माझ्या ब्लॉगवर टाकतो आहेच आपण माझ्या ब्लॉग वर इच्छा असेल तर वाचून मला प्रतिक्रिया द्यावे. balajirshinde.blogpost.com

आपल्या प्रतिक्रिया या माझ्या मेल आयडी वर जरूर द्या 

balajiayjnihh@gmail.com


गेली चार दिवस मी केरळ राज्यात वास्तव्यात आहे ,येत्या तीन दिवसांत मी मुंबईत असेन .माणूस जरी जग पालथे घातला तरी आपले घर आणि आपल्या घरातील माणसं त्यांची ओढ निराळीच असते .तो धागा निराळा असतो .

खाण्यापिण्याच्या वेळा ,सवाई आणि आपली माणसे त्यात असलेला सहवास हे जगभरात कुठंच मिळणारे नसते .


प्रा बालाजी शिंदे ,नेरुळ ७०६

९७०२ १५८ ५६४





#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...