Friday, October 22, 2021

ऊस तोडीतून कंदुरी

||ऊस तोडीतून कंदुरी  ||

१९५६ चे पर्व संपले .मांग मागे राहिले .जे धम्मात गेली ते आज नवी पिढी उछभ्रू म्हणून जीवन जगत आहे.

आंध्र ,कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मांग जात दिशाहीन असून अजून संभ्रमात जीवन जगताना दिसत आहे.

समाज आणि जातीचा पुळका मिरवणारे ,डॉ बाबासाहेब यांच्या चाळवतील मातंग म्हणून शेकी मिरवणारे ,सामाजिक बांधिलकी असलेली किंवा नसलेली हिंदू च्या खालच्या पायरीला खुंटन खाण्यात जीवन जगताना जग पाहतो आहे.याचे कारण धर्मात कायम असणे .

फक्त तिन्ही राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील ऊस तोडणी मजूर  कर्नाटक सीमेलगत चे जिल्हे हे ख्रिश्चन होऊन जीवन जगत आहेत ,पुण्यालगत चे कांही गावे तर जैन धर्मात असून त्या त्या धर्माचे जीवन जगत असताना चालीरीती या हिंदूंच्याच आहेत.
मग ते जैन असू की ख्रिश्चन .?

इकडे महाराष्ट्र्रात खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात बरीत लोक धर्मातीत आहेत.

मराठवाड्यात प पू बाबासाहेब नाही पहूनचले म्हणून इथे ,औरंगाबाद वगळून ,आज ही थोडा शहरी भाग वगळता जैसे थे ची परिस्थिती शाबूत आहे.

करण हा भूभाग निजाम दरबारी असल्या कारणाने इथे बाबासाहेब यांचेवर सभा घेण्यास बंदी होती .तरी बाबासाहेब धोकी तळवडे या उस्मानाबाद जिल्ह्यात येत होते.मोजकी लोकं या सभेला हजेरी देत.

उस्मानाबाद ,लातूर ,जालना आणि बीड या जिल्ह्याची सामाजिक ,धार्मिक ,राजकीय आणि शैक्षणिक स्तिथी अजूनच पीछेहाट झालेली पहावयास मिळते आहे .

कमकुवत शिक्षण ,अंधश्रद्धा ,यातून उदयास येणारी सामाजिक स्तिथी खूप हालकीची आहे .

बीड ,लातूर आणि उस्मानाबाद चे उदाहरण द्यायचे झाले तरी पुरे आहे .बऱ्याच अंशी लवकर लग्न झालेली मुलं-मुली कामासाठी भटकत असताना .काम आणि रोजंदारी काम करीत असतात.काम मिळत नाही म्हणून ऊस तोडणी हा एकच पर्याय त्यांचेकडे उरतो .

म्हणून शेजारील राज्य ,आणि जिल्हे यात कामे करीत असतात .उदा आंध्र आणि कर्नाटक

नाते संबंध जपत असताना आईने देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी मुलगा ,ऊस तोडणीवर जातो .

बोललेला नवस वेळेत फेडण्यासाठी उस मालकाकडून हात उसने उधार पैसे घेऊन .नवस फेडावा लागतो.

बऱ्याच खेड्यातून घरगडी म्हणून कामावर राहण्याची प्रथा अजून जिवंत असताना पहावयास मिळते.
ताई चे लग्न आणि लग्नात दिलेला हुंडा ,लग्नात झालेला रकून खर्च यासाठी वर्षभर रात्री मालकाच्या शेतीवर काढल्या जाऊन उभ्या आयुष्यची राख रांगोळी होते.

नाते जपण्यासाठी किंवा अंधश्रद्धेपोटो जीवन आणि परिवार एक खेळ होऊन बसतो .

घेतलेल्या आगाऊ रकमेचा परतावा करण्यास कैक वर्ष निघून जातात. याच काळात त्यांच्या पोटी जन्माला आलेले अपत्य ही त्याच शेतात आणि शिवारात खेळुन बाळ वयातून तरुण वयात येते आणि आई वडिलांच्या सिस्टम चा एक अविभाज्य अंग बनून जाते .

आज ही श्शृंखला  येवडी रूढ आणि मजबूत झाली आहे की ,ती परत आपल्या दारी येणे शक्य नाही .ही दरी खोलवर जात असतानाचे चित्र निर्माण झाले आहे.

आजच्या पेंडमीक काळात तर काय स्तिथी असेल ते विरळा.खाजगीकरण आणि बेरोजगारी यात गाव पातळीवरील मातंग समाज वरील कारणांमुळे नक्कीच बाहेर फेकला गेला आहे असे म्हणणे वावगे होणार नाही .

कालच लातूर येथील बातमी ऐकायला मिळाली की परडी आणि कवड्याच्या माळा याची होळी मातंग समाजातील कांही कार्यकर्त्यांनी केली .हे अभिनंदनीय होय .

याचा परिपाक म्हणून 'कंदुरी आणि नवस' यावर कर्डी नजर ठेवून गल्ली बोळ आणि गावात ,खेडोपाडी होणाऱ्या कंदुरी आणि नवस यावर अंकुश ठेऊन अश्या प्रथा मोडीत काढण्याचे काम गाव पातळीवर होणे गरजेचे आहे .

लेखक -प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरुळ -७०६

मिनांडर

Friday, October 15, 2021

कर्णबधिर -निकिता. Deaf Nikita


 कर्णबधिर -निकिता. 

वर्ष अंदाजे १९९६ असेल. निकिता कान तपासणी साठी माझ्या दवाखान्यात आली होती .तिला दोन्ही कानात ऐकण्याचा त्रास होता.

निकिता ,एक सुंदर मुलगी .मध्यम बांधा ,गोरी कांती आणि टपोरे डोळे.

कर्णबधिर असली तरी खूप देखणी होती.चेहरा गोल ,लांब केस .बघताच स्मिथ करून कांही हातवारे किंवा सांकेतिक खुणा करून तरी व्यक्त करण्यास उत्सुक आहे असा भास करणारी.

स्मित हास्य करताना गालावर खळी उमटून यायची .तीच तिची अभिव्यक्ती ची भाषा असावी .तळ मजल्यावर कान तपासणी करून झाल्यावर दोघी माय लेकी माझ्या कक्षात आल्या .

मी त्यांची वाट पाहत बसलो होतो ,माझ्या जागेवर. फाईल माझ्या टेबलावर ठेऊन पुन्हा दिलेल्या तारखेला येण्याचे कळून आपल्या घरी जाण्यास निघाल्या.

आज यांची माझी पहिलीच ओळख होती .आई पूर्वी पासून मला ओळखत होती .पण निकीतला मी आज प्रथम पाहिले होते .मला कधी वेळ काढून घरी येण्याची विंनंति करून त्या घरी जाण्यास निघाल्या ती मुंबई सेंट्रल च्या रेल्वे च्या क्वार्टर मध्ये राहत होती ,आई आणि बाबा सोबत.बाबा रेल्वेत उच्च अधिकारी .दोन वर्षे लोटली असतील .मी मुंबई सेंट्रल ला गेलो असताना ,निकिता च्या घरी जाण्याचा योग आला .वार शनिवार होता .तेंव्हा निकीताच्या आई ने घरी येण्याची विन्नती केल्याचे आठवले .आणि जवळच असलेल्या कॉलनीत जाऊन ,निकिता कुठे राहते हे कळल्यावर मी घरी गेलो.

ती पहिल्या माळ्यावर राहत असे .ती त्या कॉलनीत जुनी .लहानाची मोठी झाली .कर्णबधीर असल्यानेच सर्व तिला ओळखत असावीत.आई बाबांची एक एकुलती लाडकी लेक.आई खूप प्रेम करायची .निकिता आई चा जीव की प्राण .आज निकिता २० वर्षाची असेल.घरी मी बाबांना पहिल्यांदा भेटतो आहे. 

चहा घेता घेता कांही वेळा ,कर्णबधिर आणि त्याच्या अडचणी वर चर्चा झाली .आणि शेवटी निरोप घेतला ,निघता निघता निकिता ची आई माझ्याकडे विन्नती वजा पाहून ,माझ्या लेकीला कुठे वर मिळाला तर असे विचारले .आणि मी निरोप घेतला.

एक महिना लोटला नाही तोच ,निकिता ची आई माझ्या दवाखान्यात मला भेटण्यास आली .एकटी बघून मला प्रश्न पडला की या एकट्या का आल्या असतील ? काय अडचण असेल असा मला मनात संभ्रम निर्माण झाला ,आणि ते साहजिकच होते.

मी विचारले की ,अचानक कसे काय येणे केलं? त्या म्हणाल्या मी ,सहज आपणास भरण्यास आले आहे .निकीतला कुठे स्थळ मिळाले का हे विचारण्यासाठी आले आहे.

हे एक ..होते .मात्र त्यांच्या बोलण्यात अडचण वेगळीच होती हे मला त्याच्या बोलण्यावर कळत होते...तोच त्या म्हणाल्या .

सर आपणास मला कांही सांगायचे आहे .काय बोला ना काय अडचण आहे?.मी म्हणालो . 

त्यांनी घरातील एक प्रसंग सांगायचा आहे.

त्या पुढे म्हणाल्या की मला ,निकीतच्या बाबा वर माझा संशय आहे .काय म्हणता ? हो सर .कोणत्या संधार्भात. बोला ना ,काय अडचण असेल तर नक्की सांगा ..

आपण चर्चा करून सोडवू या .

निकीतच्या बेड मधून तिचे बाबा बाहेर निघतच नाहीत .नेहमी सारखे निकिता जवळ बसतात .तिला इकडून तिकडून येऊन स्पर्श करतात ..अंगा खांद्यावर हात फिरवतात .आज ती दहावी पास झाली आहे ,कळती ,शहाणी उपवर झाली आहे . 

मला यांच्या वर्तनावर संशय आहे .माझी द्विधा झाली आहे काय करावे ते कळत नाही .

आपण मला मार्ग सांगावा ..ती बोलत होती आणि मी ऐकत होतो पण मनात संशय बळ देत होता .

करण अश्या अनेक घटना वाचनात होत्या आणि ऐकण्यात होत्या.

त्यांच्या या बॉलण्यावर पुष्टी होती.या प्रसंगाने आईचा जीव भांड्यात पडला होता.

कारण एकुलती एक मुलगी ,आणि वरून कर्णबधिर.आपल्याच घरात हे पाप शिजते आहे या मुळे त्या पूर्ण खचल्या होत्या.

बाई खूप संकटात होती. बाहेर कोणाला सांगता पण येत नाही आणि मनात साठवता ही येत नाही ?

मनाने खूप खचली होती .घरच्या इभ्रतीचा प्रश्न होता .आणि आज मज जवळ मन मोकळे करून झाली .हा प्रश्न मलाच का सांगितला  हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे .

मन मोकळे करून ,जड अंतः कारणाने आपल्या घरी निघून गेल्या .

आज बाप आणि मुलीचा संबंध स्पष्ट झाला होता .अश्या कैक ना बोलता येणाऱ्या मुलीवर ,अपंग ,मतिमंद मुलीवर बलात्कार च्या घटना आपण एकतो आहोत आणि वाचतो आहोत . नातेवाईक ,मित्र  ,घरचे आणि बाहेरचे त्या व्यंगाचा सहज फायदा घेत असल्याचे शिक्का मोहर्तब झाले होते .

वाचलेले आणि ऐकलेले खरे ठरले होते ,नक्की झाले होते .घरातील नात्याला गळ लागली होती .बाप मुलीचा फायदा घेत होता.

तिच्या बोलण्यात वाटत होते की ,मी पोलीस तक्रार करावी.मी कसं काय हे करू शकतो.हे सर्रास जगात चालू आहे हे मी मान्य केलं .कांही काळ निघून गेला ,आई परत माझ्याकडे आज आली होती .पण ती अडचण सांगण्यात आले नव्हती ,तर एक खुश खबर घेऊन !आली होती .

निकीतच्या लग्नाची ती बातमी होती .तिचे लग्न ठरले होते.आज ती आनंदी दिसली .बातमी एकूण मी त्यांचं अभिनंदन केलं! त्यांना मी मागील कांही विषय न काढता .त्यांना कँटीन मध्ये घेऊन गेलो आणि चहा पाजला . नंतर  त्या घरी निघाल्या.

 निकिताचे लग्न झाले .मी लग्नाला जाऊ शकलो नाही.सहा महिने झाले लग्न होऊन .निकीताला डोंबिवली येथे दिले होते.नवरा पण कर्णबधिर .गोदरेज कंपनीत कारकून म्हणून कामाला होता.

आज निकिताची  आई परत एकदा माझ्याकडे आली होती .हो या खेपेची तिची माझी तिसरी भेट.

ही भेट धक्कादायक होती .ताईने  मला सांगितले ते सत्य भयावह होत.

ताई म्हणाली की ,सर निकिता चे बाबा दर शनिवारी डोंबिवली ला जातात. तिथे एक रात्र राहतात .

तर कधी कधी निकीतला आपल्या घरी घेऊन येतात ?आहे की नाही ,लज्जास्पद आणि भयावह!

या जगात आज अश्या कितीतरीं निकिता सारख्या कर्णबधिर ,मतिमंद आणि अपंग मुलीवर अत्याचार होत असतील आपल्याच घरात .

कसे हनन ,दमण होत असेल यांचे अंदाज बांधता येत नाहीत.? अश्या घरात घडणाऱ्या घटना ,कितीतरी घरात निकीताच्या सम  घरे उध्वस्त झाली असतील ,मने उद्धवस्थ झाली असतील.

आपल्याच बाबा कडून आपल्याच मुली सोबत असे वागणे किती मानसिक आघात करणारे आहे .अमानुष आहे हे अमान्य आहे . आज समाजात खूप मानसिकता विकृत झाली आहे .याची मानसिक करणे कांही असू देत.हे भयावह आणि धोकादायक तर आहेच. पण  समाज दिव्यांग बाबतीत विघातक आणि अनैतिक तर नक्कीच आहे .

( या घटनेत कांही मिळते जुळते असेल तो एक योगायोग समजावा )

बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ -०६

मिनांडर

Friday, October 8, 2021

हरिपाड,अलपूझा केरळ

जेंव्हा मी दौऱ्यावर होतो…हरिपाड


हरिपाड


हरिपाड हे अलापूझा जिल्ह्यातील गाव ,केरळ म्हणटले की हिरवेगार ,रान आणि शिवार आणि गर्द झाडी डोळ्यासमोर आलाच म्हणून समजा.


हरिपाड हे पश्चिम समुद्र किनाऱ्यापासून नुकतेच दोन किलो मीटर अंतरावरील गाव .गर्द झाडी ,तुबकदार आणि सुबक आकाराचे रंगी कौलारू बंगले .घरादारात विविध नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे ,त्यात डोके वर काढणारे नारळाचे गगनचुंबी झाड ,नारंगी रंगाचे गोल गरगरीत लटकणारे दहा ते वीस नारळ .


पाण्यानी गच्च भरलरली गावे .निमुळती रस्ते .कुठं कुठं तर चार चाकी जाईल एवढाच रस्ता.एक गाडी आत गेली की दुसरी बाहेर निघणे कठीण .एकाला माघार नक्कीच घ्यावी लागते.


लोकल माहिती च्या आधारे बरीच माहिती उपलब्ध झाली.

इथे भाषेची खूप अडचण धड त्यांना हिंदी येत नाही की इंग्रजी .आपल्याला एखादं शिकलेले द्विभाषिक वापरावे लागतात .कामात खूप अडचण येते .तो पण आपल्या लातूरच्या भाषेत इंग्रजी बोलत असतो.त्याला देखिल हिंदी किंवा इंग्रजी धड येत नाही .


सुरुवातीला मला 'हरिपाड 'हे देव भूमी किंवा 'हरी चे पद ' असेच वाटले .खरेच इथे एकूण सत्तर च्या आसपास मंदिर आहेत .पाड म्हणजे नद्या .हा इलाखा पूर्ण नद्यांचा आहे .

अलीपुझा हे खूप जुने शहर.मंदिराचे महेर घर 

जवळच ४ किलो मीटर वर दोन मोठे  बुद्ध विहार असून ते इथं प्रसिद्ध आहे .एक 'महावेरीकेरा आणी दुसरे  कैरुनाली'. 


आज संध्याकाळी मी तो विहार पाहण्यासाठी येथील स्थानिक कोणाची मदत घेऊन जाणार आहे .कारण बुद्ध आणि त्यांचे पुरातन विहार हा एक माझा आवडीचा विषय आहे .पाली भाषेचा विध्यार्थी आणि अभ्यासक या नात्याने हे शोध कार्य हा माझा नित्याचा वयक्तिक कार्यक्रम आहे.


कालच भल्या पहाटे उठून मी आणि माझा कार्यालय मित्र डॉ पुथूलिन मार्टिन पी.जे. , (मास मेडिया ऑफिर) आम्हा दोघांनी  मिळून 'नागराज्या' या मंदिराला भेट दिली .डॉ मार्टिन हा कोट्याम केरळ चा रहिवाशी असल्या कारणाने कॅम्प साठी माझ्या ऑफिस ला अनेक विन्नती पत्र येत असतात .याच मूळे केरळ राज्यात शिरकाव करण्यास अडचण येत नाही .हरिपाड येथील 'नागमंदिर ' या वरून एक गोस्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की हे गाव कदाचित ही नागभूमी असावी .तिसऱ्या शतका नंतर  बुद्ध भिक्खु आणि विहार यांचा नाश करण्यात आला असावा .


हे या वरून कळते की  .हे एक खूप मोठे आणि प्राचीन मंदिर असून येथील लोकांची खूप श्रद्धा आहे .


सध्या मंदिराच्या आतील जिर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे.मुख्य दरवाजा तर थोडा वेळ जागेवर थांबून नक्षीकाम पाहण्यासाठी मजबूर करतो.लाकडा वरील नक्षीकाम,कोरीव काम खूप सुन्दर आहे .आतील बाजूला अनेक नाग नागीण यांची चित्र रेखाटली आहेत .हे कोरीव काम बघून माणूस थक्क होतो .


मंदिराच्या आत मध्ये प्रवेश केल्यावर केवळ 'साप' आणि 'सापच' दिसतात ,नक्षीकाम केलेले .जो माणूस सापाला घाबरत असेल त्याला तर इथे खूप भीती वाटल्यागत राहणार नाही .मला पण सारखे वाटत होते की इकडे पायाजवळ एखादा साप किंवा सापाचे पिल्लू तर पायात घुटमळत नाही असा भास झाला होता.म्हणून मी जास्त वेळ आत पाहण्याचे धारिष्ट्य केले नाही .


अलीपुझा येते चिकन कमी पण 'बदक'  खायला नक्कीच मिळतात .बदकाचे पिल्ले हा येथील खाद्य पदार्थ .चिकेन कमी बदक जास्त खाल्ले जाते .मी पण प्रथम इथे 'डक फ्राय ' खाल्ले .चवीला तसे चिकन सारखे लागत नाहीत.कधींतुम्ही आलात तर लाईव्ह डक नक्कीच खा आणि आस्वाद घ्या .


समुद्र जवळ असला तरी ,ताजे मासे  खाण्यास मिळत नाहीत .इतर भाज्या या केरलीयन असतात ,तिखट कमी ,मसाले कमी .रंग लाल असला तरी मिर्ची तिखट नसते .सांबर हेच मला आवडलेले पदार्थ.यात पाणी आणि भरपूर तरकारी समाविष्ठ असतात म्हणून खाण्यास आवडते .

पांढरा भात हे येथील स्थानिक लोकांचे मुख्य खाद्य .

मी गेली २७ वर्ष देशातील कित्येक राज्य फिरली ,पण माझ्या गावचा रस्सा अजून कुठे मला सापडला नाही ,की कुठे मुंबईचा ताजा  मासा,मावरा मिळाला नाही .


कैकदा मी केरळला कार्यालयीन कामाकरिता आलो पण कांही तरी लिहावे असे कधी वाटलेच नाही .कारण कामात डोके वर काढता येत नाही .

आज इथे आल्यावर गेली दोन दिवस टूर वर कांही  लिहावे असा मनात विचार आला म्हणून माझा हा उहापोह .


पूर्वी लिहलेल्या गोष्टी  माझ्या ब्लॉगवर टाकतो आहेच आपण माझ्या ब्लॉग वर इच्छा असेल तर वाचून मला प्रतिक्रिया द्यावे. balajirshinde.blogpost.com

आपल्या प्रतिक्रिया या माझ्या मेल आयडी वर जरूर द्या 

balajiayjnihh@gmail.com


गेली चार दिवस मी केरळ राज्यात वास्तव्यात आहे ,येत्या तीन दिवसांत मी मुंबईत असेन .माणूस जरी जग पालथे घातला तरी आपले घर आणि आपल्या घरातील माणसं त्यांची ओढ निराळीच असते .तो धागा निराळा असतो .

खाण्यापिण्याच्या वेळा ,सवाई आणि आपली माणसे त्यात असलेला सहवास हे जगभरात कुठंच मिळणारे नसते .


प्रा बालाजी शिंदे ,नेरुळ ७०६

९७०२ १५८ ५६४





#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...