Sunday, October 2, 2022

Book - पुस्तक

Book : The Happiest Man on Earth arth.

Eddie Jaku.

हिटलर सन १९३३ मध्ये सत्तेवर आला.  त्याने जर्मनी आपल्या ताब्यात घेतली . जर्मनीत इथूनच विध्वंसक लाट आली .संपूर्ण समाजासाठी आणि जर्मनीसाठी पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम करणारा हिटलर   पुढे जाऊन त्यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली तिथूनच पुढे खऱ्या विध्वंसला सुरुवात झाली.

#ज्यू लोकांना शाळेतून हाकलून दिले जाऊ लागले ज्यू मुलं हद्दपार आणि  शाळाबाह्य झाली.
तु ज्यू आहेस म्हणून तुला आम्ही शाळेत घेऊ शकत नाही .तू शाळेत यायचे नाही अशा समोरासमोर धमक्या दिल्या जाऊ लागल्या. मुलं आणि पालक भयभीत झाली.

याच काळात हिटलर ने आपली एक  एस एस SS (schutzstaffel) नावाचे सैनिक बल तयार केले आणि ते हिटलरच्या नेतृत्वाखाली  ज्यू लोकांचा  छळ करू लागले.

दरवाजा ठोठावून घरात घुसायचे आणि हकनाक लोकांना मारायचे काम सुरू झाले. कधी कधी तर SS चे सैनिक कर्मणूक म्हणून लोकांना बेदम मार द्यायचे आणि त्या बेदम माराचा आनंद घ्यायचे.
त्या सैनिकांचा एकच हेतू होता मानवी प्राण्यांना शारीरिक छळ करण्यातला असूरी आनंद उपभोगायचा .छावणीत असे काही कैदी होती की जे इतर कैद्यांच्या विरोधात जाऊन माझींना सामील व्हायचे त्यांना #कोपा असं नाव होतं .

पण दडपशाही करणारी माणसं सुद्धा दडपल्या जाणाऱ्या माणसा इतकी #भयभीत  असतात यालाच #फाशीझम  म्हणतात. एक अशी समाज रचना की जिथं प्रत्येक माणसाची शिकार होत असे. नाझीचा क्रूरपणा कधी उफाळून येईल हे सांगता येत नव्हते.

त्यांची कैद्यांना कॉफी पाजण्याची एक पद्धत होती. त्यांच्या कॉफीमध्ये ते एक रसायन घालत त्या रसायनाचे नाव होते #ब्रोमाईड . रसायन महाभयंकर मानवांच्या शरीरात काम करते हे रसायन घेतल्याने माणसाची लैंगिक वासना कमी होते व त्याचं पुनरुत्पादन इंद्रिये निरुपयोगी होतं थोडक्यात निकामी होते. थोडक्यात ते ज्यू लोकांना नपुंसक करत होते.

हे पुस्तक वाचल्यानंतर सामान्य माणसाला वाटेल आजच्या वर्तमान काळात आपल्या राज्यात ,देशात याच प्रकारे माणसाची कत्तल हत्या किंवा माणसावर जबरदस्ती , माणसावर या पक्षातून त्या पक्षात नेत असताना दिसत आहे. हे कशाचे द्योतक आहे ?

सुज्ञ वाचकांनी,नागरिकांनी  हे पुस्तक जरूर वाचायला हवे. हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध असून त्याची किंमत ३६० रुपये आहे.

ज्यांचा आनंद हरवला आहे .जे निराशावादी आहेत अशा व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.छोट्या छोट्या संकटाला न घाबरता यावर कशी मात करावी हे यातून शिकायला मिळते.  लेखकाने आपले अनुभव या पुस्तकात मांडलेले आहेत.

जगात सर्वात आनंदी माणूस कोण आहे ? हे माहिती देणारे पुस्तक आहे. म्हणून आनंद मिळवण्यासाठी , आनंदी राहण्यासाठी हे पुस्तक वाचणे खूप अत्यंत गरजेचे .

लेखक : बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई.

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...