Friday, July 14, 2017

गुप्तकाशी ,उत्तरखंड




दिनांक १२-०७-२०१७
मंगळवार
गुप्तकाशी ,उत्तरखंड
या महिन्यात एका नाविन्यपूर्ण कार्यालयीन कामानिमित्त गुप्तकाशी  उतरखंड ला जावे लागले .तसा  मुंबई ते दिल्ली प्रवास सुकर असतो .मी मुंबई दिल्ली राजधानी ने दिल्ली ला पहुंचलो ,तेथून पुन्हा रात्री प्रवास हरिद्वार कडे ,हरिद्वार ला  पहाटे साडेपाच ला आलो ,परत कार ने गुप्तकशी ,एकूणच दोन दिवसाचा प्रवास .रोडचा प्रवास एकदम जीव घेणा आहे .दोनशे वीस किलो मीटर साठी तब्बल आठ ते नउ तास लागतात कारण पर्वतीय रस्ता म्हणून वेग वाढवता येत नाही ,उंच पर्वत आणि खोल दरी या मुळे  गाडी सारखी नागमोडी  फिरत असल्या कारणाने  चक्कर येते आणि उलटी झाल्याचा  सतत भास होतो .पण बाहेर दिसणारे मनोहरी दृश पाहून सगळे विसरायला होते .खोल दऱ्या ,त्या दरीत वाहणाऱ्या लांब लांब  नद्या पाहून मन सुन्न होते ,मंदाकिनी ,अलकनंदा ,आणि भागीरथी, या नद्या पाहून मन उल्हासित होते .

          देव प्रयाग जवळ दोन नद्यांचा संगम आहे .अलकनंदा आणि भागीरथी .या दोन  नद्यांचा  संगम मनमोहक आहे ,दोन्ही नद्यांचे पात्र खूप खोल असून दोन्हीच्या पण्याचा रंग एकदम वेगळा आहे .तो संगम पाहण्यासारखा आहे ,एकीचे अस्तित्व इथे नष्ट होते आणे पुढे ती नदी गंगा नावाने सुरु होते या क्षेत्रास देवप्रयाग असे म्हणता .
गुप्तकशी यथे माझे एका आश्रमात राहणे होते ,समोरच उखीमठ येथून हिमालयाच्या उतुंग रांगा दुर दुर  पसरलेल्या पहावयास मिळतात ,सकाळी दुपारी आणि रात्री अश्या तिन्ही प्रहरी  वेगवेगल्या  पर्वत रंगांची मनमोहक छटा पहावयास मिळते आणि आपले हात सहज मोबाईल चा कॅमेरा किंवा आपल्याकडे असलेया कॅमेरयाकडे वळतात .
इथे पर्वत पायथ्याला विविध देवांची छोटी -मोठी मंदिरे पहावयास मिळतात ,पंचकेदारनाथ ,पार्वती मंदिर या मंदिराला मी भेटी दिल्या ते जीर्ण आणि पडीक वाटली.

इथे सर्वात महत्वाची बाब दिडून आली ती म्हणजे “बुरांश “ नावाचे फुल ,या फुलापासून शरबत तयार होते ,यात कोणत्याही इतर गोष्ठी मिसळण्याची गरज नाही .एकदम उत्तम प्रकारे गोड शरबत .येथील लोकांचा उत्तम पेय.हे पेय बुरांश नावाच्या फुलापासून बनवले जाते . लाल रंगाचा हे  फुल खूप मोठ्या प्रमाणावर मिळते  ,हे फुल संपूर्ण हिमालीन रेंज  मध्ये मिळते ,यालाच उतरखंड चे राज्य फुल असे म्हणतात .आणि हे  नेपाल चे राष्ट्रीय फुल आहे .भारतात हे फुल उत्तराखंड  आणि हिमाचल प्रदेशात मुबलक मिळते .

आता बुरांश हे काय आहे ते बघूया .बुरांश हे गढवाली भाषेतील  नाव, हिंदी मध्ये रोह्तिका असे म्हणतात . ,इंग्रजीत याला  Rhododendron असे नाव असून ते ग्रीक भाषेतील मूळ नाव आहे Rhodo म्हणजे फुल आणि dendron म्हणजे झाड .हे फुल सामान्यतः चार रंगात मिळते पण गर्द लाल रंगाचे फुल खूप प्रचलित आणि मोठ्या प्रमाणात उपलभ आहे .
या फुलाचा उपयोग शरबत आणि स्क्वॅश म्हणून होतो .पर्वत पठारावर ये जा करून वाटसरू खूप थकतात ते या शरबत चा उपयोग शक्तीवर्धक म्हणून  करतात .आज या शरबताचा उपयोग जगभर होत आहे ,खेळ आणि खेळाडू साठी एक संजीवनी ठरला आहे ,हा नैसर्गिक वसा या भागातील अतुल्य देन आहे .

इथे आणखी एक उत्कंठा वर्धक बाब कळली ती म्हणजे २०१३ ला मंदाकिनी ने केलेला उद्रेक असंख्य लोक या देव भूमीत नरक यातना भोगत मर्त्यू मुखी पढले  ,एका एका  व्यक्ती कडून सत्य कथा ऐकून  मन सुन्न झाले ,अशी हे देव भूम मी येह लोकी पहिली ती गुप्तकशी.






#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...