Friday, June 5, 2020

जेष्ठ पौर्णिमा : वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती.

जेष्ठ पौर्णिमा "

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे . मंगलदायी ठरली आहे.
या पौर्णिमेचे आपण महत्व जाणून घेतले पाहिजे . बौद्ध जगतात या पौर्णिमेला अनन्य 
साधारण महत्व आहे. 

सिद्धार्थ गौतमाला इ.स.पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती 
सम्यकसंबोधि प्राप्त होऊन तथागत सम्यक समबुद्ध होतात. आपल्याला मिळालेल्या 
ज्ञानाची पुन्हा पुन्हा उजळणी करावी यासाठी चवथ्या आठवड्यात जेष्ठ पौर्णिमेच्या 
दिवशी रत्नघर या स्थळी राजायतन या झाडाखाली बसले असता ब्रम्ह देशाचे दोन (२)
व्यापारी तपस्सू व भल्लिक हे तिथे आले आणि तथागत भगवान ज्या झाडाखाली 
बसले होते त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली सावलीत भोजन करण्यासाठी बसले 
असता त्यांच्या मनात तथागत बुद्धांना भोजनदान देण्याची प्रेरणा झाली. आणि 
भगवान बुद्धां जवळ येऊन त्यांनी तथागतांना याचना केली . भन्ते , आम्ही आपणास भोजन म्हणून आणलेल्या गोड पदार्थाचा आपण स्वीकार करावा . आम्हांला
समाधान वाटेल .
भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र पुढे केले आणि त्यांच्या गोड पदार्थाचा स्वीकार केला .
भोजन झाल्यावर तथागताने या व्यापाऱ्यांना आपला पहिला धम्म उपदेश केला. 
दोन सरणं देऊन त्यांना उपासक केले . दोन सरणं म्हणजे बुद्धं सरणं गच्छामि | धम्मं 
सरणं गच्छामि || कारण तोपर्यंत संघाची स्थापना झालेली नव्हती . तथागतांचे हे
प्रथम उपासक झाले . त्या दिवशी जेष्ठ पौर्णिमा होती . त्या दोन व्यापाऱ्यांच्या 
विनंतीवरून भगवान बुद्धांनी त्यांना केश धातू भेट दिले .त्या व्यापाऱ्यांनी ब्रम्हदेशात 
जाऊन भगवान बुद्धांच्या केश धातूवर १५० फुट उंच स्तूप बांधलेला आहे . तेथील लोक 
प्रत्येक जेष्ठ पौर्णिमेला फार श्रद्धेने जमतात आणि पूजापाठ ,वंदना , प्रवचन यांचे 
ओयोजन केले जाते . हा स्तूप आजही ब्रम्हदेशात आहे .

जेष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व असे आहे की, तथागत भगवान बुद्धांनी सेनानी कन्या 
सुजाताला सेनानी गावात जाऊन धम्माचा उपदेश केला .

जेष्ठ पौर्णिमेचे तिसरे महत्व असे की, चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची सुकन्या 
संघमित्रा भिक्षुणीने बुद्धगयेच्या बोधीवृक्षाची शाखा ( फांदी ) अनुराधापूर , श्रीलंका 
येथे नेऊन लावली . आणि बौद्ध धम्म प्रचार कार्याला प्रारंभ केला .त्यादिवशी जेष्ठ 
पौर्णिमा होती. संघमित्रा यांच्या प्रेरणेने अनेक स्त्रिया व पुरुष भिक्षु व भिक्षुणी झाले 
होते. आज श्रीलंकेत ८० % लोक बौद्ध आहेत . या जेष्ठ पौर्णिमेला येथे लोक 
जमतात . बुद्धापुजापाठ ,वंदना ,सूत्रपठण करतात. प्रवचनाचे आयोजन केले जाते .

या महत्वपूर्ण घटना जेष्ठ पौर्णिमेला घडल्या आहेत . भगवान तथागतांनी 
कापिलवस्तूच्या जनतेला महासमय सुत्त्ताचा उपदेश याच पौर्णिमेला केला 
आहे .

" सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा "

! जय भिम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!! 

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...