Friday, October 15, 2021

कर्णबधिर -निकिता. Deaf Nikita


 कर्णबधिर -निकिता. 

वर्ष अंदाजे १९९६ असेल. निकिता कान तपासणी साठी माझ्या दवाखान्यात आली होती .तिला दोन्ही कानात ऐकण्याचा त्रास होता.

निकिता ,एक सुंदर मुलगी .मध्यम बांधा ,गोरी कांती आणि टपोरे डोळे.

कर्णबधिर असली तरी खूप देखणी होती.चेहरा गोल ,लांब केस .बघताच स्मिथ करून कांही हातवारे किंवा सांकेतिक खुणा करून तरी व्यक्त करण्यास उत्सुक आहे असा भास करणारी.

स्मित हास्य करताना गालावर खळी उमटून यायची .तीच तिची अभिव्यक्ती ची भाषा असावी .तळ मजल्यावर कान तपासणी करून झाल्यावर दोघी माय लेकी माझ्या कक्षात आल्या .

मी त्यांची वाट पाहत बसलो होतो ,माझ्या जागेवर. फाईल माझ्या टेबलावर ठेऊन पुन्हा दिलेल्या तारखेला येण्याचे कळून आपल्या घरी जाण्यास निघाल्या.

आज यांची माझी पहिलीच ओळख होती .आई पूर्वी पासून मला ओळखत होती .पण निकीतला मी आज प्रथम पाहिले होते .मला कधी वेळ काढून घरी येण्याची विंनंति करून त्या घरी जाण्यास निघाल्या ती मुंबई सेंट्रल च्या रेल्वे च्या क्वार्टर मध्ये राहत होती ,आई आणि बाबा सोबत.बाबा रेल्वेत उच्च अधिकारी .दोन वर्षे लोटली असतील .मी मुंबई सेंट्रल ला गेलो असताना ,निकिता च्या घरी जाण्याचा योग आला .वार शनिवार होता .तेंव्हा निकीताच्या आई ने घरी येण्याची विन्नती केल्याचे आठवले .आणि जवळच असलेल्या कॉलनीत जाऊन ,निकिता कुठे राहते हे कळल्यावर मी घरी गेलो.

ती पहिल्या माळ्यावर राहत असे .ती त्या कॉलनीत जुनी .लहानाची मोठी झाली .कर्णबधीर असल्यानेच सर्व तिला ओळखत असावीत.आई बाबांची एक एकुलती लाडकी लेक.आई खूप प्रेम करायची .निकिता आई चा जीव की प्राण .आज निकिता २० वर्षाची असेल.घरी मी बाबांना पहिल्यांदा भेटतो आहे. 

चहा घेता घेता कांही वेळा ,कर्णबधिर आणि त्याच्या अडचणी वर चर्चा झाली .आणि शेवटी निरोप घेतला ,निघता निघता निकिता ची आई माझ्याकडे विन्नती वजा पाहून ,माझ्या लेकीला कुठे वर मिळाला तर असे विचारले .आणि मी निरोप घेतला.

एक महिना लोटला नाही तोच ,निकिता ची आई माझ्या दवाखान्यात मला भेटण्यास आली .एकटी बघून मला प्रश्न पडला की या एकट्या का आल्या असतील ? काय अडचण असेल असा मला मनात संभ्रम निर्माण झाला ,आणि ते साहजिकच होते.

मी विचारले की ,अचानक कसे काय येणे केलं? त्या म्हणाल्या मी ,सहज आपणास भरण्यास आले आहे .निकीतला कुठे स्थळ मिळाले का हे विचारण्यासाठी आले आहे.

हे एक ..होते .मात्र त्यांच्या बोलण्यात अडचण वेगळीच होती हे मला त्याच्या बोलण्यावर कळत होते...तोच त्या म्हणाल्या .

सर आपणास मला कांही सांगायचे आहे .काय बोला ना काय अडचण आहे?.मी म्हणालो . 

त्यांनी घरातील एक प्रसंग सांगायचा आहे.

त्या पुढे म्हणाल्या की मला ,निकीतच्या बाबा वर माझा संशय आहे .काय म्हणता ? हो सर .कोणत्या संधार्भात. बोला ना ,काय अडचण असेल तर नक्की सांगा ..

आपण चर्चा करून सोडवू या .

निकीतच्या बेड मधून तिचे बाबा बाहेर निघतच नाहीत .नेहमी सारखे निकिता जवळ बसतात .तिला इकडून तिकडून येऊन स्पर्श करतात ..अंगा खांद्यावर हात फिरवतात .आज ती दहावी पास झाली आहे ,कळती ,शहाणी उपवर झाली आहे . 

मला यांच्या वर्तनावर संशय आहे .माझी द्विधा झाली आहे काय करावे ते कळत नाही .

आपण मला मार्ग सांगावा ..ती बोलत होती आणि मी ऐकत होतो पण मनात संशय बळ देत होता .

करण अश्या अनेक घटना वाचनात होत्या आणि ऐकण्यात होत्या.

त्यांच्या या बॉलण्यावर पुष्टी होती.या प्रसंगाने आईचा जीव भांड्यात पडला होता.

कारण एकुलती एक मुलगी ,आणि वरून कर्णबधिर.आपल्याच घरात हे पाप शिजते आहे या मुळे त्या पूर्ण खचल्या होत्या.

बाई खूप संकटात होती. बाहेर कोणाला सांगता पण येत नाही आणि मनात साठवता ही येत नाही ?

मनाने खूप खचली होती .घरच्या इभ्रतीचा प्रश्न होता .आणि आज मज जवळ मन मोकळे करून झाली .हा प्रश्न मलाच का सांगितला  हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे .

मन मोकळे करून ,जड अंतः कारणाने आपल्या घरी निघून गेल्या .

आज बाप आणि मुलीचा संबंध स्पष्ट झाला होता .अश्या कैक ना बोलता येणाऱ्या मुलीवर ,अपंग ,मतिमंद मुलीवर बलात्कार च्या घटना आपण एकतो आहोत आणि वाचतो आहोत . नातेवाईक ,मित्र  ,घरचे आणि बाहेरचे त्या व्यंगाचा सहज फायदा घेत असल्याचे शिक्का मोहर्तब झाले होते .

वाचलेले आणि ऐकलेले खरे ठरले होते ,नक्की झाले होते .घरातील नात्याला गळ लागली होती .बाप मुलीचा फायदा घेत होता.

तिच्या बोलण्यात वाटत होते की ,मी पोलीस तक्रार करावी.मी कसं काय हे करू शकतो.हे सर्रास जगात चालू आहे हे मी मान्य केलं .कांही काळ निघून गेला ,आई परत माझ्याकडे आज आली होती .पण ती अडचण सांगण्यात आले नव्हती ,तर एक खुश खबर घेऊन !आली होती .

निकीतच्या लग्नाची ती बातमी होती .तिचे लग्न ठरले होते.आज ती आनंदी दिसली .बातमी एकूण मी त्यांचं अभिनंदन केलं! त्यांना मी मागील कांही विषय न काढता .त्यांना कँटीन मध्ये घेऊन गेलो आणि चहा पाजला . नंतर  त्या घरी निघाल्या.

 निकिताचे लग्न झाले .मी लग्नाला जाऊ शकलो नाही.सहा महिने झाले लग्न होऊन .निकीताला डोंबिवली येथे दिले होते.नवरा पण कर्णबधिर .गोदरेज कंपनीत कारकून म्हणून कामाला होता.

आज निकिताची  आई परत एकदा माझ्याकडे आली होती .हो या खेपेची तिची माझी तिसरी भेट.

ही भेट धक्कादायक होती .ताईने  मला सांगितले ते सत्य भयावह होत.

ताई म्हणाली की ,सर निकिता चे बाबा दर शनिवारी डोंबिवली ला जातात. तिथे एक रात्र राहतात .

तर कधी कधी निकीतला आपल्या घरी घेऊन येतात ?आहे की नाही ,लज्जास्पद आणि भयावह!

या जगात आज अश्या कितीतरीं निकिता सारख्या कर्णबधिर ,मतिमंद आणि अपंग मुलीवर अत्याचार होत असतील आपल्याच घरात .

कसे हनन ,दमण होत असेल यांचे अंदाज बांधता येत नाहीत.? अश्या घरात घडणाऱ्या घटना ,कितीतरी घरात निकीताच्या सम  घरे उध्वस्त झाली असतील ,मने उद्धवस्थ झाली असतील.

आपल्याच बाबा कडून आपल्याच मुली सोबत असे वागणे किती मानसिक आघात करणारे आहे .अमानुष आहे हे अमान्य आहे . आज समाजात खूप मानसिकता विकृत झाली आहे .याची मानसिक करणे कांही असू देत.हे भयावह आणि धोकादायक तर आहेच. पण  समाज दिव्यांग बाबतीत विघातक आणि अनैतिक तर नक्कीच आहे .

( या घटनेत कांही मिळते जुळते असेल तो एक योगायोग समजावा )

बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ -०६

मिनांडर

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...