Saturday, January 5, 2019

मुक्ता साळवे एक पंडिता !


मुक्ता साळवे एक पंडिता !
प्रो.बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६
-----------------------------------------------------------------------------------------------------------
आज  मुक्ता साळवेताई  चा जन्म दिवस ,१५ फेब्रुवारी १८५५ ला तिने एक निबंध लिहला आणि बाजीरावाचे डोके ठिकाणावर आणले .याच दरम्यान तिने बाजीरावाची मांगमहार समाजाला मिळालेली वागणूक आणि “इंग्रज सरकार आल्यावर झालेला बदल” हे  तिने लिहलेल्या  उतारया वरून  लक्षात येते  ,म्हणून ती मांगमहार समाजातील एक विद्वान पंडिता ठरली आणि तिचा लेखनिबंध भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी संपादित केलेल्या “ज्ञानोदयाची पहिली शंभर वर्ष ” (भाग दुसरा १८६१ पर्येंत ) या पुस्तकात छापला होता . (संधर्भ :स्त्रियांचे मराठीतील निबंध लेखन ,संपादन विधुत भागवत ).
“शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे गोखले ,आपटे ,त्रीमकजी अंधळा पनसरा,काळ ,बोहार इत्यादी हे निरर्थक मांगमहारावर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते . व गरोदर बायकस  देहांत शासने करीत होती ती बंद झाली .आणि पुणे प्रांती मांगमहारांचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांचं राज्यात अशी अंधा धुंदी होती कि ,ज्याच्या मनास वाटेल त्याने मांगामहारावर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते ती बंद झाली .(किल्याच्या )पायात घालण्याची बंदी बंद झाली ....जुलमी निराग बंद केली आमचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली ,आणि बाजारात फिरण्याची मोकळीक हि मिळाली ” (पंडिता मुक्ताताई साळवे -१५-०२-१८५५ )
पुढे पंडिता मुक्ताताई साळवे लिहितात , “रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील ” म्हणून त्या पुढे म्हणतात आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही यास उदाहरण ,जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभ्या करण्याजोगे वाईट कर्म करितात मग तुम्ही तर मांगमाहारच आहात .
हा शेवट खूप विदारक आहे आमचे लोक शिकून सवरून वाईट चाली रितीत अजून गुंतून आहेत अशी त्यांची खंत आहे .
पितामह राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८४८ ला शनिवार वाड्यात मुलींची  पहिली शाळा सुरु केली,त्याच शाळेत पंडिता मुक्ताताई साळवे सावित्रीमाई फुले यांच्या हाताखाली शिकल्या आणि अवघ्या सात वर्षात वयाच्या १४ वर्षी हा निबंध लिहला आणि मांगमहार यांना बाळकडू दिले .
टीप : मूळ निबंध  ‘आम्ही हि इतिहास घडवला’( आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा सहभाग ) संपादक: उर्मिला पवार /मीनाक्षी मून ,सुगावा प्रकाशन ,पुणे ,ऑक्टोबर १९८९ ,यांनी छापला होता ).


अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...