Monday, May 21, 2018

बाल्या एक अद्भुत नावं


बाल्या
२१ में २०१८
माझे हाळी गाव हे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचे सिमे लागत आहे ,उदगीर तालुक्यापासून जेमतेम १७ किलो मीटर .म्हणून या दोन्ही राज्याचा या तालुक्यावर खूप प्रभाव जाणवतो .हाळी हे नांदेड बिदर रोड वरील छोटस गाव एक पाय रोडच्य कडेला टाकला की हळी आणि दुसऱ्या कडेला रस्ता ओलांडला की हांडरगुली .जसे उत्तर आणि दक्षिण कोरिया .जसे जर्मन मधील भिंत तीच एक रस्ता .नाव हळीचे जानावारांचा जंगी बाजार ,पण बाजार भरतो हांडरगुली मध्ये .
मांगवाड्यात अंधश्रध आणि अशिक्षित पण शिगेला पाहुण्चला होता .भूमिहीन शेतमजूर तरी देव धर्माची वारी नित्य नेमाने करीत असत .मलंग गड ,त्यात मग बडा पहाड  जाऊन बकरे कापण्याचा नावस करणे ,आणि शेवटचा कळस म्हंजे तिरुपतीला देव दर्शन करून केस कापून मुंडन करणे ,आणि येताना मुलाचे नाव बालाजी ठेवेन असा नवस करून डोक्याला गाठ बांधून येणे .त्याचीच प्रचीती म्हणजे घरो घरी दिसणारा बालाजी होय .सख्खा भाऊ देखील आपल्या मुलाचे नाव बालाजी ठेवीत असे .  
बाल्या म्हणजे बालाजी .आमच्या मांग वाड्यातील घरो घरी मिळणारे हे नाव .काय उपकार आहेत तिरुपती बालाजी चे ,कांही अर्थ नसताना प्रत्येक उट सूट तिरुपती बालाजी चे नाव ठेवतो .
या नावाची मजाच और आहे .आता घरो घरी नाव असल्याकारणाने ओळखायचे कसे ? एखादी गल्लीत घटना घडली की लगेच कोणता बाल्या होता रं ? अशी सगळ्या बायकात आणि माणसात इत उत्सुकता लागत असे .
‘आलो ताई ,मी बालाजी बोलत आहे ,मग आवाज ओळखीचा नसेल तर समोरून लगेच उत्तर येई ..
कुणाचा बालाजी ? तेंव्हा लगेच प्रतिउत्तर द्यावे लागत असे ...की आमुक तमुक चा बालाजी बोलतो आहे .त्यानंतर संभाषण सुरु .
आम्ही लहान असताना कसे ओळखत आसू .ती एक गमंत होती .मांग वाड्यात तील आळी होत्या ,वारला कडील बाल्या ,खालच्या आळीचा बाल्या .आणि मधल्या गालीचा बाल्या .हळू हळू गल्ली चा  विस्तार झाला नि घरे विखुरली गेली .
नंतर च्या काळात प्रत्येक बालाजी ला टोपण नावे पडली ,कांही नवे त्यांच्या विकृती आणि रंग छटा आणि एकंदरीत हालचाली वरून बालाजी नवा पुढे टोपण नावे पडली .
एक बालाजी जो नेहमी डोक्यात हात लावून ऊ मारल्या सारखा करीत होता .त्याचे नाव चेंगरया बाल्या पडले ,एक बालाजी छोटा  उंच आणि क्रकश लुन्द्री बाल्या म्हणून ओळखू लागले .एक बालाजी बाजारात इकडे तिकडे फिरत असताना रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्याचे  चणे उचल ,एखादे केळ उचल ,किंवा एखादा फळ उचलून लकबीने खिशात ताकत असे ,तेंव्हा आम्हाला आर एस एस सारखी लांब लाब खिसे असलेली खाकी  चड्डी होती .त्यात बऱ्याच वस्तू चोरून घरी आणता येत असे .म्हणून या बाल्याचे नाव उचल्या बाल्या पडले होते .कुती बाल्या पण होता ,त्याचा घरी त्याच्या बापाने एक  कुत्री पाळली होती म्हणून त्याचे नाव कुती बाल्या असे पडले .एक बालाजी होता दिसायला एकदम पहिलवान ,उंच आणि गोरा गोमटा पण आकल शून्य होता ,म्हणून त्याला सर्वजन भद्दा बाल्या म्हणून ओळखत असत ,यात बरेच बालाजी अस होते की त्यांना टोपण नाव न्हवते ,त्यात माझा पण नंबर वरचा येतो ,एकदा मी शाळा सोडून शिरूर या गावी पळून गेलो होतो ,आणि मला तेथून कसाराच्या मामू ने धरून आणून माझ्या आईच्या स्वाधीन केले होते .त्या दिवसापासून माझे नाव शिरूळया असे पडले होते .बरेच बालाजी हे आपल्या वडिलांच्या नावाने ओळखत असत. उदा रघु चा बाल्या ,भगू चा बाल्या .
असे होते बालाजी कांही बालाजी आज पडद्या आड गेले आहेत लहान आठवले की सगळे बालाजी कसे होते एकत्र विटी दांडू खेळणे ,गोट्या खेळणे नदीत विहरीत पोहायला जाने .खूप खेळ खेळणे आणि मारामारी पण .ते सर्व बाल्या परत भेटतील का ? कधीच नाही ? कारण आज ते शिकून शहाणे झाले आहेत .आपल्या रहाट गाऱ्हाण्यात दंग झाले आहेत ,शहरी कारणाने गावी कधी मिळणार नाहीत .

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...