Monday, August 2, 2021

१०० स्मृतिशताब्दी: अण्णा भाऊ साठे .

||अण्णा भाऊंच्या १०० स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने ||

*(हा माझा लेख पुनः पोस्ट करीत आहे ... )*

.... प्रा बालाजी र शिंदे ,विशेष शिक्षा .

मतामतांचा गलबला ॥ कोणी पुसेना कोणाला ।।
जो जे मती सांपडला ।। तयासी तोची थोर ।।
असत्याचा अभिमान ।। तेणें पाविजे पतन ।।
म्हणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती ।।
.... महात्मा जोतिबा फुले.

मा जोतिबा फुले यांनी १८७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ओळी आहेत. इतक्या वर्षानंतर
आजही या ओळी परिस्थितीविषयी अगदी समर्पक भाष्य करताना जाणवतात.

जोतिबांच्या कार्याची आणि विचारांची स्मृती २०० वर्षानंतरसुद्धा का जागवायची हे अत्यंत महत्वाचे आहे .
याचे उत्तरच जणू काही या ओळी देत आहेत. एकंदर समाजात बहुजन असलेल्या
वर्ग, जाती ,जातीतील पोट जाती आणि स्त्रिया  यांच्या दृष्टीने हा #जागर आज आवश्यक आहे. म्हणून मी ऊहापोह केला आहे .

बहुजनाच्या #मुक्तिसंघर्षाचा धसका ज्यांच्या मनात आहे त्यांना आजही जोतिबांच्या विचारांची
भीती वाटत आहे. या भीती पोटी म्हणूनच असले लोक त्यांच्या विचारसंपदेवर हल्ला करताना दिसत आहेत. 

आज असेही काही लोक आहेत की, ज्यांना जोतिबांच्या विचारातील  क्रांतिकारकत्व लपवून ठेवून त्यांना 'देव' बनवायचे मानसुभे चालू आहेत   या चलाख लोकांना
वाटते की, जोतिबांच्या स्मृतीचे ढोल त्यांनी जास्तीत जास्त जोराने वाजविले, जयजयकाराचा जास्तीत जास्त कल्लोळ केला आणि प्रचंड गुलाल उधळला तर बहुजन शोषित, दलित, स्त्रिया इतर कसलाही विचार न करता त्यांनाच जोतिबांचा वारसदार मानतील!

पण ते आज  होताना दिसत नाही .करण त्यांचा हेतू हा समाज प्रबोधन नसून बहुजन ,अशिक्षित लोकांना लुटणे हाच होय .

प्रत्येक समाजात डावे उजवे ठरलेले असतात .डावे का निर्माण होतात ,ते नेहमी सत्य शोधण्याच्या मार्गावर असतात .आज ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मागे सारून मार्क्स ला पुढे ढकलत असताना पाहतो आहोत ? 

मी ना डाव्या ना उजव्या विचार सारणीचा असून ,मी मा. फुले #सत्यशोधक ,डॉ बाबासाहेब यांच्या #समता #चळवळ आणि आणि #बुद्ध धम्म #प्रचारक आणि #प्रसारक आहे .

मला कोणताही राजकीय आदर, मान सन्मानची  किंवा कुबड्याची गरज नसून ,स्वतंत्र उपरोक्त #त्रिसदसिय विचारांचा व्यक्ती आहे .हेच विचार कायम तारणहार असणार आहेत ,हे ही मी जाणून आहे .

जिथे आसक्ती चे बांध असतात ते समाजकरण ,राजकारण कायम तग धरीत नाही .हे बुद्ध तत्वज्ञान होय.

आज लोकांत चलती आहे , डॉ बाबासाहेब यांना टॅग करून जसे 'आंबेडकर चळवळीतील ..... अमका धमाका !'कार्यक्रम करीत असतात .

उदा : हॉटेल  व्यवसाय किंवा दुकानदार लोकांचे देता येईल ,साई दरबार ,साई कॅफे ,साई किराणा स्टोर .यांचे साई चे कांही देणे घेने नाही ,लोकांची दिशा भूल करून गिराईक आकर्षण असते .

तीच गत डॉ आंबेडकर चळवळीची आहे .आंबेडकर चळवळ बाजूला असते ,त्यांची चळवळ आणि वळवळ मात्र कायम चालू असते ,यात ९९% स्व घोषित डॉ ,प्रा आणि नेते आणि समाज सुधारक असतात ,त्यांना गल्ली बाहेर कोणी ओळखत नाही . सामाजिक हित यांचा उद्देश कधीच नसतो .(यांच्या सामाजिक कार्याला  अस्तित्वाची लढाई असे ही म्हणता येईल ).

समाज परिवर्तनासाठी शिक्षण यावर समग्र वाङ्मयात मा.फुले यांनी सम्यक विचार धारा कशी मांडली  होती या खालील चार ओळीत  दिसून येईल .

मानवपदाची जरा लाज धरा ।। विद्वान ती करा । मुलीमुले ।॥३१॥
गिर्वाणी शिकता कळेल तुम्हाला ।॥ आठवाल बोला ॥ माझ्या तुम्ही ॥४०॥
ऐकू दिले नाही एकहि शब्दाला ।। वेदबखरीला ।। लपविले ॥४१॥
द्विजकूट तुम्ही आणावे मैदानी /। आली ही पर्वणी ॥ जोति सांगे ।॥४२॥

(संधर्भ समग्र वाङ्मय - पान ४९७)

मा.फुले पुढे असे सांगून गेले की ,आमचा आम्हीच विचार केला पाहिजे', असे जे म्हटले आहे तो विचार आज आकार
घेऊ लागला आहे. स्त्रियांच्या बाबतही तसा विचार आज घडू लागला आहे.स्त्रिया स्वतंत्र विचारधारा घेऊन पुढे येत आहेत . या ज्या स्त्रिया  उभ्या राहिल्या आहेत त्या जीवनानुभवातून उभ्या राहिल्या  आहेत. 

कस्ट, उपासमार यातून अनुभव घेऊन त्या घडत आहेत  हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. पण खरे पाहता त्या विशिष्ट विचारप्रणाली किंव सूत्रबद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्या उभ्या नाहीत. त्यामुळेच त्या तुकड्यातुकड्यांत उभ्या
आहेत. स्वतंत्र विचारधारेच्या झाल्या आहेत .शोषित स्त्री-पुरुषांच्या समग्र जीवनानुभवाला गवसणी घालण्यापर्यंत त्यांची झेप अजून गेलेली नाही. 

तरी ही प्रक्रिया त्यांच्या अशा उभ्या राहण्यातूनच घडणार
आहे. अशा वेळी एक मुद्दा ध्यानात ठेवण्यासारखा आहे. त्यांनी प्रस्थापितांना सांगितले,ते असे :  'एकंदर सर्व मानवी  प्राण्यांत परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने
वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे.' हे बीज शोधून काढण्याशी साहित्याच्या क्षेत्रातील नव्या संस्कृतीचा विकास जोडलेला आहे.तो मानवतावादी असणे हिताचे आहे .आज ते दिसून येत आहे का ? तर उत्तर आहे नाही .

आजचे शिक्षण कसे आहे .(इथे नवीन शिक्षण धोरणाचा कांही  संबंध नाही याची समाज बांधव आणि वाचक वर्गाने दखल घ्यावी ).

मुळात नोकरी हे आजच्या शिक्षणाचे उद्दिष्ट आहे . शिक्षण हे आजच्या शिक्षणाचे प्रमुख लक्षण घटक  झाले
आहे.समाज अहित आणि व्यक्ती हीत  झाले आहे .ही परिस्थिती आजची नसून  जोतिबांच्या काळातसुद्धा जवळ जवळ अशीच परिस्थिती होती. हे सर्व जाणकार जाणून आहेत .डॉक्टर किंवा इंजिनिअर होणारे लोक फारच कमी असतात ? पण  धंदा करण्यासाठी चे  शिक्षण घेऊ  लागली आहेत . अशी आजच्या समाजातील तरुण वर्गाची  शिक्षणाची परिस्थिती आहे. 

उदा:कृषी विद्यापीठात शेतीशास्त्राचे शिक्षण घेणारी शेतकऱ्यांची पोरेसुद्धा प्रामुख्याने नोकरीच
करताना दिसतात.पण आपल्या शेतीत जाऊन संशोधन मुळीच करीत नाहीत .त्यांना स्वतःच्या शेतीत राबने हे मजुरीचे आणि कमी पणाचे वाटते .पूर्वी  इंग्रज राज्य चालविण्यासाठी नोकर तयार करणे हाच
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचा आशय दिसून येतो . खरे पाहिले तर आजच्या शिक्षणाचा आशय
यापेक्षा फार बदललेला नाही.नाही असे मला वाटते .
फुल्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, 'समाज परिवर्तनासाठी शिक्षण' हा होता .

आज तो मूळ मुद्दा बाजूला गेला आहे ,कारण मा.फुले ऐवजी  अनेक शिक्षण तज्ञ समाजात निर्मिली गेली आहेत. ज्ञानाविषयींची त्यांची कल्पना समाज परिवर्तनाचे मुख्य #साधन अशी होती.ही साधना आज पोट भरू आणि गल्ले भरू झाली आहे  'शेतक-्याचा आसूड' या आपल्या पुस्तकात त्यांनी याविषयी  स्पष्ट मांडणी केली आहे, 

ज्ञानाशिवाय मनुष्य प्राण्यात (Rational Animal)
व एकंदर सर्व प्राणीमात्रांमधे इतर स्वभावजन्य गुण सर्वसमान असतात , असा सर्वांचा  अनुभवास आहे . जसे पशुस आहार, निद्रा, मैथून, आपल्या बच्चांची जपणूक
करण, शत्रूपासून आपला बचाव करणे व पोट भरल्यावर डरकाळ्या  फोडून धडका घेण्याशिवाय दुसरे काही कळत नाही ? 

यास्तव त्यांच्याने सदरच्या व्यवहारांत कोणत्याही प्रकारची तिळमात्र सुधारणा करवत नसल्यामुळे त्यांच्या मूळच्या
स्थितीत कोणत्याच तऱ्हेची  उलटापालट होत नाही." (समग्र वाङ्मय, पान २५६)

तसे मानवात नाही ,माणसात रोज बदल होताना आपण पाहतो आहे ,पण तो बदल  कुशल आणि सत्य अपेक्षित आहे का ? हा चिंतनाचा गाभा आहे !

जोतिबांचे एकंदर लिखाण आणि व्यवहार यांच्याकडे पाहिले तर त्यांनी #ज्ञानाला किंवा #विद्येला सर्वात महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते हे खरेच. पण त्याचबरोबर
सामाजिक परिवर्तन, उत्पादन व्यवहारात समृद्धी आणणारे परिवर्तन अशा एकंदर परिवर्तनाशी ज्ञानाचे व विद्येचे अतूट नाते त्यांनी सतत जोडले आहे. 

भारतीय परिस्थितीत प्रत्यक्ष उत्पादन करण्यात भाग घेणाऱ्या शूद्रादी अतिशूद्र स्त्री-पुरुषांना ज्ञान देण्याच्या खास क्षेत्रात प्रवेश करायला बंदी होती .

शेतक-्याचा आसूड'मध्ये या आधारावर जोतिबांनी घेतलेली भूमिका लक्षणीय आहे, ती कशी ते पहा  "यास्तव शूद्र शेतकऱयांचे मुलांस विद्वान करण्याकरिता त्यांच्या जातीतील स्वत: पाभारी, कोळपी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करून, त्यांच्या शाळेत शेतकऱ्यांनी आपली मुले पाठविण्याविषयी कायदा करून, प्रथम काही वर्षे त्यांच्या परीक्षा घेण्याकरिता हलक्या इयत्ता करून, त्यांस व्राह्मणांच्या मुलांसारख्या पदव्या देण्याची लालूच किंवा अमिश  दाखवून त्यांच्या मुलीमुलांच्या लग्नात लग्नविधी करण्याविषयी परजातीने जुलूम करू नये, म्हणून बंदोंबस्त  केल्याशिवाय शृद्र शेतकऱ्यांत विद्या शिकण्याची गोडी उत्पन्न होणे नाही असं परखड मत असावं  हा पेचाचा मुद्दा होय .

भारतातील सर्व खेड्यापाड्यांतील धूर्त भटकुळण्यास अज्ञानी शेतकऱ्यांस आपापसात कज्जे करिता येणार नाहीत व तेणे करून शेतकऱ्यांस आमचे सरकारचे
मोठमोठाले अनिवार फायदे होऊन थोड्याच काळात हल्लीपेक्षा शेतकऱ्यास जास्ती शेतसारा देण्याची ताकद येऊन येथील निरर्थक पोलीस व न्यायखाती फुगली आहेत, त्यांचे मान सहज कमी करता येईल. "
(शेतकऱ्याचा आसूड  ).

अशी शिक्षण आणि नोकरीची तफावत याची प्रखर विचार मीमांसा करून गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या विद्वान मुलांनी एकंदर सर्व आपली शेते उत्तम प्रकारची वजवून  त्यांनी थोड्याथोड्या लोहारी,सुतारी कामात परीक्षा दिल्यास त्यास सरकारी खर्चने विलायतेतील शेतकीच्या शाळा पाहण्याकरिता
पाठवीत गेल्याने इकडील शेतकरी ताबडतोब आपल्या शेतकीची उत्तमप्रकाची वजवून सुधारणा करून सुखी होतील...(समग्र वाङ्मय, पाने - २६०,) पण तसे आज होत नाही ,हे खेदाची बाब आहे .

ही अशी एकूण शिक्षण प्रणाली मा.फुले यांना  अभिप्रेत होती .ती आज सर्वथा पोटभरू आणि बोकाळलेली दिसत आहे.यास पालक आणि सामाजिक धुरीण जवाबदार आहेत.

अश्या सत्य शोधक महामानव मा.फुले यांना मागे ओढून समाजात नवीन सत्य शोधक तयार होताना दिसत आहेत ,ज्यांना शिक्षण आणि समाज यांचे नाते कधी ही नव्हते .

आज हा लेख लिहीत असताना २ आगस्ट उजाडला आहे ,अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक होते ,हे सर्व जग आज तरी ओळखत आहे .

पण गेली महिनाभर प्रसार माध्यमांवर जे अण्णा भाऊंना बिरुदे लावण्याचा धडाका लावला आहे ,तो कितपत योग्ये आहे जाणकार मंडळीने आत्मचिंतन करावे .???

ती बिरुदे ... अशी आहेत ....

क्रांतिकारी ,डॉक्टरेट ,सत्यशोधक ,महामानव ! एवढी मला आज तागायत कळली आहेत ?

फक्त एक बिरुद लावणे बाकी आहे ,आणि ते म्हणजे #तथागत !

हे बिरुदे लावत असताना ,आणि #भारतरत्न दया हे मागणी चालू असताना ,कमीत कमी महाराष्ट्र शासनावर दबाव गट तयार  करून ,महाराष्ट्र भूषण तरी ओढून आणायला हवा होता ,ते काम झाले नाही .? 

शेवटी ,अश्या करण्याने समाजाचे प्रश सुटणार आहेत का ?

एका दुक्का सोडले तर समाज अजून ,शैक्षणिक ,सामाजिक आणि आर्थिक बाजूने एका  जागेवरून सरकलेला नाही याची नोंद घ्यावी ,आणि कारणे शोधून सामाजिक कार्य करीत असताना ,समाजाचे उत्थान करावे .

आता  कांही लिहण्यासारखे नाही .
प्रत्येनं समाज सुधारक आपल्या जागेवर योग्ये आहे ,कोणाचे बिरुदे लावून कोणी महामानव होत नाही ,लोक जागर आणि त्यांच्या कार्याची महती यावर तो महामानव होतो  याची दखल घ्यावी .

#नोंद : या लेखाशी आणि माझ्या कार्यालयीन कामाशी काडी मात्र संबंध नसून ,हे माझे स्वतंत्र विचार आहेत ,याची नोंद घ्यावी .

प्रा. बा.र. शिंदे ,नेरुळ |९७०२ १५८ ५६४

Tuesday, July 20, 2021

सत्य का पक्षकार :बाबासाहेब अम्बेडकर

आज कल लोग दलित शब्द का सरेआम इस्तेमाल करते हुए दिखाई देते है,जब कि कानून में दलित शब्द को निष्कासित किया है ..

आज एक  कवि की इस तरह बधाई की गयी है ...
दलित शब्द हटाकर लिखते तो उनका सही सन्मान होता।
दलित prefixed लगानेका मतलब ही होता है ,अपमान ।

कई सालोंसे इन लोगोने 'दलितांचे कैवरी बाबासाहेब' लिखकर उन्हें पुनः दलित बनाया ? ये कोनसा षड्यंत्र है ।

बचपन मे ४थी मराठी भाषा  की एक किताब थी उसमें एक पाठ था ,जिसका नाम था 'दलितांचे कैवारी बाबासाहेब अम्बेडकर'?

क्या बे सिर्फ दलित ,बहुजन के ही पक्ष में थे ,नही ? वे सम्पूर्ण विश्व के कैवारी थे ,महिला ,पीड़ित वर्ग,मजदूर कामगार और जहाँ अन्याय होता था वहाँ  भी वे कैवारी के रूप में हिमालय की तरह खड़े होते थे ,इतिहास गवाह है ।

यह किसी महामानव को छोटा करनेकी साजिश है .इस तरह के षड्यंत्र को पहचाने और सतर्क रहें .

(नोटः कैवरी (मराठी) का मतलब होता है ,सचाई और न्याय के पक्ष में रहना )

बा. र.शिंदे ,नेरुल ७०६
(#मिनांडर)

बुद्ध पंडुरंग :गौतम बुद्ध

....आज दिवसभर आषाढी वरील पोस्ट वाजून १९५५ ला क्रांतेयबुद्ध बाबासाहेब यांनी 'Who is the Vitthal? ' हा लेख आठवला . अनेक संदर्भ घेऊन त्यात लिहले लिहले आहे की विठ्ठल ,बालाजी आणि पुरीचा जगन्नाथ हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान बुद्ध हेच आहेत हे सिद्ध केले होते .

ही नुकतीच अर्ध्या शतकाची घटना गृहीत धरता येईल.वर वर पाहता वेदांची जी प्रस्थापित वर्गाने घुसडन केली त्याचा ही पर्दाफाश करून त्यांतून 'Who where Shudra 'हा ग्रंथ बाहेर आला,हे आपण सर्व जाणून ,वाचून अभ्यासून आहोत,हा ग्रंथ ज्यांनी नाही वाचला आहे त्यांनी एकदा वाचून वेद जाणून घ्यावे हा या मागचा हेतू.

वेदात डॉ बाबासाहेब असे सांगून गेले की ,शुद्र हे पूर्वी अस्तित्वात नव्हते .क्षत्रिय हेच शुद्र होत हा त्यांचा रास्त विचार सांगून गेले.

अंदाजे ७०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विठ्ठल रुपात अवतरलेल्या बुद्धाला परत बुद्ध म्हणून येण्यास तेवढाच काळ नाही का लागणार .तेंव्हा आपण नसणार आहे ,अंदाजे पुढील २०० वर्षात भारत देश हा नक्कीच बुद्धमय होईल यात शंका नाही ,असे मला ही ठाम पणे सांगावे असे वाटते .

उदा: समुद्रातील वाळू संपूर्ण १२ तास उष्ण होते ,परत तिला मूळ सवरूपात येण्यास तेवढाच वेळ लागतो .तद्वत तब्बल ७०० वर्षे लागतील पुनः बुद्ध मूळ रुपात येण्यास .

मी एकूण ३ वेळा तिरुपती बालाजी आणि एकदा नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली आहे .या दोन्ही मूर्ती बुद्ध  रुपात मिळतात .गाभाऱ्यात छताला लागून दोन्ही ठिकाणी असंख्य बुद्ध मुर्त्या पहावयास मिळतात.ते त्यांना नष्ठ करता आले नाही .

पशुपतीनाथ मंदिरात सर्व सापस्थ दिसते ,मंदिर आतून उघडे आहे ,आत फक्त एक नंदी बैल बसवला आहे .

माझ्या सारख्या  कैक लोकांनी हे दोन्ही मंदिरे पहिली असतील तर सत्य जानवे आणि जनास सांगावे  की त्या मुर्त्या  बुद्धच आहेत.

शतक ३ उजाडले आणि राजा अशोका  नंतर चा प्रताप,आणि भारत  इतिहासात दिसून येतो .शतकानुशतके अश्या बाबीला राज्यश्रय प्राप्त झाला आणि बुद्ध झाकून ठेवण्यात आला ,त्यास देव रूपं दिली गेली .जोडीला कैक लोकांची व्यापारी खलबते उदयास आली ,बहुजन त्यावर आपला  वेळ आणि आपला घाम घालून कमावलेले पैसे लावून लयास गेली ..

यामुळे मानवी मनाच्या आत्ताची गती संथ झाली ,ती आजवर चाली रीती आणि रुढीतून पुढे ढकलत असताना दिसून येत आहे .

वेळ घर बांधून बसत नाही ,बहुजन आज शिकून शहाणा झाला आहे ,सत्य शोधू लागला आहे ,ते सत्य कायम बुद्ध असल्याचे भाकीत ठरणार आहे ,१९५६ ला दिलेल्या हाकेचे स्वप्न पूर्ण होणार आहे !

भारत बुद्धमय ,आणि बुद्धीमय नक्कीच होणार आहे.

लेखक :बा.र.शिंदे ,नेरुळ -७०६
#कवी_मिनांडर

बुद्ध पंडुरंगा

*बुद्धा पंडुरंगा*

बुद्धा तुझ्याच नावाचा गजर
होतो आहे इथं आणि जगभर ।

माझ्या बहुजनांत परका तूच
कोणी तुला विठ्ठल म्हणाले ।।

मासी आषाढ कैक आल्या नी गेल्या
परी इथल्या कैक दुःखाच्या पिळ नाही गेला।।

मार्ग मुक्तीचा दिला तू बहुजनांना 
समता आणि मार्ग दुःखाचा ।।

जसे वारकरी तुझे तेच की 
पंचशील सदा पालन करती ।।

तू दिलेले प्रज्ञा शील करुणा जपतो
अन तू दिलेले सुत्त आठवितो ।।

*कवी मिनांडर*

Sunday, July 18, 2021

कोम्रेड अण्णा भाऊ साठे

 साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृति दिन !


तुकाराम भाऊराव उर्फअण्णाभाऊ साठे –त्यांचा १८ जुलै हा स्मरणदिन (मृत्यू १८ जुलै ,१९६९ ) त्यांना सलाम !


आज अण्णा आम्हाला सोडून गेले तो दिवस म्हणजे स्मृती दिवस .

संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम असो अण्णा सदैव स्मृतीत दिसतात . यांच्या यशात यांच्या आवेशपूर्ण पोवाड्यांची सन्मानपूर्वक वैश्विक  नोंद झालेली आहे.


लौकिकार्थाने एक अशिक्षित माणूस ३२ कादंबऱ्या ,२२ कथा संग्रह,१० लोकनाट्य असंख्य पोवाडे लिहितो हे कश्याचे द्योतक आहे . आज मितील त्याचे साहित्य मराठीचा उंबरा ओलांडून सात समुद्र पार गेले आहे .एकूण  २१ भाषेत जाते. 

त्यात झेक ,पोलिश ,जर्मन ,फ्रेंच या भाषा असतात याचा ताळमेळ कसा लावायचा ? असंख्य साहित्य जंत्री कमावलेले व्यक्ती लेखक .'फकिरा' चा प्रसंग बाका देता येईल ... जेंव्हा सरकारी स्टोर्स वर दरोडा घालायाल येतो. तेंव्हा तेथील व्यवस्थापक तेथील कर्मचारी महिलांना एका खोलीत बंद करून ठेवतो . त्यांची अब्रू लुटली जाऊ नये यासाठीचा हा आटापिटा असतो.फकिरा त्या व्यवस्थापकाला ती खोली उघडायला लावतो.आणि आतील महिलांन उद्देशून म्हणतो” मी इथं धान्य आणी पैसा लुटण्यासाठी आलोय. तुमची आब्रू लुटण्यासाठी नाही.भुकेली माणसं बाया बापड्यांचा आत्मसन्मान पणाला लावून त्यांच्या पोटाची खळगी भरत नाहीत" .


इथे लेखकाने स्त्रियांच्या चारित्र्याला तर जपलंच पण डाकू दरोडेखोरांच्या माणुसकीचा,त्यांच्या मनात असलेला माता भगिनी बद्दलच्या आदरालाही सलाम केला आहे हे याचं वेगळेपण दिसून येत.


तमाशा उलट्या खिशा सारखा माहित असलेला हा शाहीर.आता तमाशा हेच साधन आपल्या बंडखोरीसाठी वापरु लागला.जुन्या कथा बदलून नव्या युगाच्या गोष्टी याच्या वगात दिसू लागल्या.अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी ते आधुनिक सवाल जबाब चपखल वापरत. गण तर इतका आक्रमक केला की सुरवातच तळपणारया वीररसाने होत असे.प्रतिभेला एकदा बहर यायल लागला की सगळीकडे वसंत आणि वसंतच फुलतो; तसे त्यांचे झाले.


'ग्रामीण जीवन टिकावू काया आहे आणि समाजक्रांतीचा दलित जीवनातच पाया आहे'. हे त्यांचे जीवनसूत्र त्यांच्या साहित्यातून खळाळत समोर येते .


 त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्या कथानकात ग्रामीण महाराष्ट्राला गुंतवून ठेवण्याची ताकद होती, उत्कंठा वाढवणारी कलाटणी होती. म्हणूनच त्यासाठी आयुष्य वाहून घेण्याच्या त्यांच्या लेखणीला लोकमान्यता मिळाली त्यामुळेच ते लोक साहित्यिक म्हणून नावारूपाला आले .

त्यांचं कम्युनिस्ट असणं हे पोथीनिष्ट नव्हतं. तर ते त्यांच्या अर्धपोटी जगण्यातून ,श्रमिकांचा टाहो अंतःकरणा पासून ऐकून सारे आयुष्य त्यासाठी वाहून घेण्याच्या प्रवृत्तीतून जन्माला आलं होतं. या साऱ्या चा परिपाक . त्यांना आलेले इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीचे आमंत्रण

 हे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवं . त्यांच्या रशिया भेटी आधी त्यांची चित्रा ही कादंबरी रशियन मंडळींनी आपल्या भाषेत वाचलीही होती.

नंतर माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे आलेले पुस्तक.


जगभरातील इतर भाष्या व्यतिरिक्त हिंदी भाषेचे जपानी लोकांना अति वेड ,मग राज कपूरचे 'आवारा हूं' हे गाणं रशियन जपानी तरुणांनी डोक्यावर घेतलं होतं हे नवल वाटायला नको .


 त्याहूनही अधिक वेड त्यांना अण्णा भाऊ साठे  त्यांच्या ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ ने रशियाच्या क्रांतिकारी  वेदना जगजाहीर केल्या होत्या.त्यांना सलाम !


बा.र.शिंदे

( मिनांडर )

कोम्रेड अण्णा भाऊ साठे

 कॉ.अण्णा भाऊ चा स्टॅलिनग्राड चा पोवाडा आणि चौक सात !

ज्यांच्या आयुष्याकडे आणि साहित्याकडे पाहिल्यावर या व्याख्येची यथार्थता पटावी असे उदाहरण म्हणजे शाहीर अण्णा भाऊ साठे!

प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवन्ताला लाभेल हे सांगता येणे कठीण. नाहीतर, वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला अण्णा भाऊ साठे नावाचा मुलगा, ज्याला वयाच्या १५-१६व्या वर्षापर्यंत धड अक्षरओळखही झालेली नव्हती, तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवितो, 'फकिरा' या त्याच्या बावनकशी कादंबरीच्या अनेक भाषात आवृत्ती निघतात , मराठीव्यतिरिक्त भाषा माहीत नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो आणि त्याच्या साहित्यकृतींची भाषांतरे केवळ भारतीय नव्हेत तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात, या अघटिताचा अर्थ कसा लावायचा?

राशियात  गेल्यावर चौका चौकात अण्णा भाऊ साठे यानी तेथील चौका- चौकात पोवड़े गायले आणि आपल्या विचारांची उधळण केली . 

मनोरंजनातून समाजप्रबोधन कसे करता येते याचा वस्तुपाठच खरे तर अण्णा भाऊंनी समाजापुढे ठेवला. याबाबतची मतभिन्नता गृहीत धरूनही एवढे मात्र निश्चितच म्हणता येईल की लोककलेला कालानुरूप करण्याचे ऐतिहासिक मोलाचे कार्य करून अण्णा भाऊ साठे हेच  'लोकनाट्याचे जनक' ठरतात .

अपार करुणा आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताची मनीषा तिथे सामावलेली असते. भगवान बुद्ध, ज्ञानोबा माऊली तुकोबा राया यांच्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या करुणेचा आणि मनात दाटलेल्या मानवहिताच्या मनीषेचा अंश ज्यांना लाभतो त्यांच्या कृतीत, उक्तीत, साहित्यात सृजनाची बीजे आढळतात, संहाराची नव्हेत. अण्णा भाऊंच्या साहित्यात हेच दिसून येते.

अण्णा भाऊ साठे यांचे  १९४८ मध्ये सोविएत रशियाला जायचे तसे ठरले होते, पण काही कारणाने ते नाही गेले. पुढे १९६१ मध्ये इंडो-सोविएत कल्चरल सोसायटीतर्फे ते तिकडे गेले. भारत भरातून निवडलेल्या लोकांचे एक शिष्टमंडळ तेथे गेले, त्यात ते होते. तेथे ते महिनाभर होते. साम्यवादी रशियाला भेट देण्याची संधी अण्णा भाऊंना बरीच उशिरा (१९६१ साली) मिळाली असली तरी साम्यवादाशी त्यांची ओळख १९४० च्या आसपास झालीच होती. 

शोषितांना शोषणमुक्त करण्याचे, एक स्वतंत्र माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे आश्वासन देणारे साम्यवादी तत्त्वज्ञान त्यांच्या मनात खोलवर ठसले आणि हा ठसा त्यांच्या साहित्यावर आणि सर्वाधिक स्वरूपात त्यांच्या लोकनाट्यांवर उमटलेला आढळतो. 

त्यांच्या लिखाणात १५ पोवडे व लावण्या ,२ नाटक ,१० लोकनाट्य ,८ प्रवास वर्णन ,२३ कथा ,३२ कादंबर्या  .

चौक पहिला –

दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण । जगजंगी ज्यानं ज्याने लढविले रोस्तोव आणि खार्कोव । 

रक्षिले लेनिनग्राड मास्को नाझीचा काळ तिमोशेको ।।


चौक दूसरा –


नाझीनी बेत मग केला । हेस परि गेला । करू या म्हणे हल्ला । रशियाचा लाल कोट

पाडून । सोविएट लोकशाही मोडून । आशिया सारा घेऊ जिंकून ।

सन एकोणीसशे एकेचाळ । मोठे जंजाळ । युद्धाचा काळ । जून बावीस तारखेला।

नाझी सैन्याने हल्ला केला । मध्यरात्रीच्या सुमाराला ।।

चौक तिसरा-


जिंकित शहरांपाठी शहर । नाझी निशाचर । करीत अत्याचार । आले लेनिनग्राद शहर

भूमीत । अगणित गोळ्या घेऊन पाठीत । पळती माघारी धूम ठोकीत ।।

परतला पुन्हा जर्मन । आला धावून । कोट पाडून । उपनगरात हल्ला केला। लाल सैनिक

पुढे भिडला | पुन्हा लढाईला रंग चढला ।।

वेशीत तोफ धडधडे । पडति भिताडे । अग्नि भडभडे । नाझीकडे यशकाटा झुकला

लाल सैनिक खिन झाला । निराशा झडपी हृदयाला ॥३॥

या चौकत अण्णानी नाझी यश संपनदासाठी कसा झुकला आणि लाल सैनिक कसा खिन्न या वर भाष्य केले आहे.  

चौक चौथा-


रशियाची पोकळ भिंत । नाझी शोधीत । शिरकावया हात । नाही पर कोठे वाव मिळाला।

लाल फौजेचा जोर कळला । त्यांनी मग आपुला मोहरा वळला ।।

या चौकात नझिला लाल फौजेचा जोर कळला आणि नाझी ने आपली कशी माघार घेतली ते संगितले आहे. नाझीने पळ कसा काढला याचे वर्णन पाहावयास मिळते . 


चौक पाचवा –


पराजित गुलाम फौजेला । आणी आघाडीला । युद्ध करण्याला । घ्यावया स्तालिनग्राड शहर । 

जावया इराक इराणवर । पुन्हा मग हिंद पेशावर ।। जो जो हल्ला शत्रूनं केला ।

तो तो परतविला । नाझी संतापला । कराया ठार रशियाला । कपटयुद्धाचा कट रचला ।

तोंड नाही इतिहासी ज्याला ।।

जगभरातील १९४२ च्या उद्धाचे पुरावे देत देश परत्वे चालू असलेले युद्ध आणि नाझी चे कपट कारस्थान नाझी कसा संपवला हे या पोवड्यातून संगितले आहे . 

चौक सहावा-


पसरला बर्फ मोहिको गारिगार । त्याने आछादिले संगर झाले शुभ्र । आकाशी रत्तरंगी निशाण लहरे । त्याखाली जमले धुरंधर । रशियाचे प्यार । कराया विचार ।।

खवळावा सिंधू किंवा उठावे तुफान । उपटावे वृक्ष अजस्त्र त्यानं मुळातून । तसा प्रचंड

हल्ला चवन । रशियाच्या भूमिवरून । द्याया हाकलून । नाझी सैतान ।।

देई वीर तोफेला बत्ती । डोळे कडकती । जाउनी पडती । फोडुनी नाझीचा रणगाडा ।

गर्जती दुसरी आधाडी उघडा  । जगातील नाझी नाव काढा । जी जी ।।

नाझी चा नायनाट करा ,जगातून नाझीचे नामो निशाण मिटवा हा मोलाचा क्रांति संदेश दिला आहे . 

 चौक सातवा-

उत्तराची वेळ संपली नौबत झडली । नाझींच्या अंतांची घंटा वाजू लागली । रशियाची

संगीन सारी वर उचलली। नाझींचा कराया अंत । निघाली जोरात । शत्रू-हृदयात धडकी

ती भरली।

नाझीला लाल सेने ची धडकी भरली . रशियाचा नाझीचा पराभव झाला . लाल सेनेचा विजय झाला . 

(अण्णा भाऊ च्या ‘पोवाडा या नावाची व्याप्ती’ खूप मोठी आहे ,यात मी एकूण सात चौकातील फक्त सुरुवातीच्या कांही ओळी घेतल्या आहेत ,पोवाड्याच्या  सविस्तर माहिती साठी संपूर्ण पोवाडा वाचावा याची वाचकांनी नोंद घ्यावी )

त्यांचे ते स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळच राहील.एक तारा साहित्ये रूपी गगनात आपले स्थान घेऊन याच दिवशी आपल्यातून १८ जुलै १९६९ ला निघून गेला . 

बा.र .शिंदे ,नेरूळ – ७०६

(लेखक  मिनण्डर )

Wednesday, July 14, 2021

संत अनेक ,क्रांतेयबुद्ध एक !

*संत अनेक ,क्रांतेयबुद्ध एक !*

बा भीमा ,क्रांतेयबुद्धा
सोडून सरगाठी इथली ।

केली क्रांती या मातीची 
कुणास सुटले नाही कोडे ।।

अनेक संत आणि महंतांनी
का केल्या नाहीत इथ क्रांती ।

बा क्रांतेयबुद्धा माया भीमा
तू सोडल्या इथल्या सरगाठी ।।

असो राव, साव की रंक
तू दाविला इथल्या जगाला ।

एकच सम्यक बुद्ध
एकच सम्यक बुद्ध ।।

*कवी मिनांडर*

Thursday, June 17, 2021

आगरकर ,गोपाळ गणेश

*‘देव आकाशतून आले ते परत कधी गेलेच नाहीत?’*
                                                --थोर  समाज सुधारक : गोपाल गणेश आगरकर . 
बुद्धिवादी दृष्टीकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांना फाटा देऊन रूढीवादयावर त्या काळात अंधश्रद्धा गाठीशी धरून कार्य हाती घेणारे कर्ते या यादीत यांचे वरचे स्थान म्हणायला हरकत नाही . धर्म वेड्या लोकांवर  कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या आणि विज्ञान या  निकषांखेरीज अन्य कोणताही निकष त्यांना मान्ये न्हव्ते . 
याच मूळ कारणाने  थोर समाज सुधाकर होत . आज यांचे पुन्ये स्मरण . त्यांचे देवा विषयी ठळक मत होते . नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती.
नितीमत्ता हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता . परोपकार, सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद,आणि त्याचे मूळ हे  व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्त:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे.
महान व्यक्ति चे स्मरण का करावे त्याचे मूळ कारण त्यांनी समाज विकास व  समाजाची केलेली प्रगति आणि त्यांनी केलेलं ‘समतेच’ कार्य याचा धागा धरून स्त्रिया साठी केलेलं समतेचे विचार हा मूळ गाभा होय तेच थोर पुरुष या नामरूपाला शोभून येतात . 
यांना पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर तीळमात्र  विश्वास नव्हता. येवढेच नसून वेदांनी निर्माण क्लेले चार वर्ण ही मान्ये न्हवते ,या  चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. 
मुला-मुलींस समान आणि सक्तीचे करण्यावर त्यांचा भर होता .  शिक्षण हे कौशल्याधारित असावे . शिक्षण हे अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख असावे त्याने पुढील काळात त्यांना त्या त्या ठिकाणी कामात तिथे मदत होऊ शकते यावर ते अडून होते . शिक्षनात आचारांचे निर्मूलन करावे. सदाचाराचा प्रसार करावा,बाल वयात मुलात  ज्ञानवृद्धी करावी, मुलांना सत्य शोधकी करण्यावर  भर होता . 
 शिक्षनात नीति मूल्ये जपून  संयमी जीवनामुळे लाभणारे मानसिक  समाधान या होईल असे करावे . 

मानवी जीवनात व्यक्तिस्वातंत्र्यामुळे किती फायदा आणि लाभ होतो ते ठाम पणे सांगत . स्वार्थ आणि स्वैराचार हे समाज हितास कसे बाधक आहेत ते नेहमी म्हणून दाखवत . समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच व्हावी , असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. 
समाजातील परंपरेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. कारण ‘जुने गेले मरणा लगुणी’ असे त्यांचे मतं होती . जुन्या रूढी ,परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या सरकार च्या  मदतीने कायदेशीर रीत्या नाहीशा कराव्या, यावर ते ठाम होते.
 ---“ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले अशा अनेक देशांतील धर्मांचा, रितीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही”, हे त्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. (मराठी विश्वकोश – वीरकर )
या देशात केवळ धर्मच नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सारासार विचार करून आंधळेपणाने गतानुगतिक वर्तन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा देव न मानणारे व्यक्ति न्हवते .
खरा मुदा इथे येतो ते असा की बाळ गंगाधर टिळक ( २३ जुलाई १८५६ - १ अगस्त १९२०)यांचे सोबत चे दिवस आणि त्यांच्या पासून वैचारिक मतभेत झाल्यावर निरखून पारखून निघलेले आगरकर (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५) हे कितीतरी पटीने पूर्वी पेक्षा ‘समाज सुधारक’  मतवादि आणि खरे सुधाकर ,म्हणजेच ‘कर्ते सुधाकर’ दिसून येतात ते जीवनाखेर प्रवसा असेतोवर  .  
यांचे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. हेच यांच्या विचारांचे दुक्ख होय.  
कारण यांना देशा अगोदर समाज आणि समजतील एक एक व्यक्तीचा विकासा अगोदर हवा होता . त्यांचे  लक्ष  जनहित होते . ‘सुधारक (१८८८)’ हे त्यांचे चळवळीचे अस्त्र . त्यांनी चळवळी चे अनेक लेख लिहले या लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. यवढेच नसून खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे आदी प्रकार झाले. अश्या धमक्यांना ते डगमगले नाहीत . ते नेहमी ठणकाउन सांगत की ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, हीच करणे घेऊन किंवा या  भूमिकेतून ते नवे गोपाळ गणेश आगरकर म्हणून उदयास आले . त्यांची याच वेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या  सोबतची मैत्री ही संपली . 

सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आपल्या हयात असे प्रयंत  चालू ठेवला. ‘सुधारका’ तील अनेक  लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या अनेक  अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते होते . 

स्त्री पुरुष राहणीमन समान असावे आणि त्यांचे पोशाख त्यांच्या आवडीचे असावे असे यावर त्यांचा भर असे . यांनी बर्‍याच  लेखांतून येथील सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या रूढी परंपरा ,शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार केले होते याला इतिहास साक्षी आहे .
समजाच्या उन्नतीसाठी प्रथम व्यक्ति स्वतत्र्य त्यांना अभिप्रेत होत . त्यांना देशाबादधल ही खूप आदर होता हे ही अधोरेखित करण्यासारखे आहे .  
आगरकर ,फुले आंबेडकर ही थोर माणसे ज्या प्रकारे द्वंद्वात्मक परिस्तिठीत सापडली होती , ती ओलांडून आज पुढे आलो आहोत . अशावेळी त्या नेत्यांनी जे योगदान केले त्या विषयी कृतज्ञ असण्याएवजी ‘ अमक्याने तमुक का केले नाही ?’ तमक्या वेळी आमका कुठे होता ?’ असले प्रश्न उपस्थित करून त्यावर निर्थक वाद घालत बसणे ही आत्मवंचना तर होईलच ,परंतु ते आपल्या जाणिवा प्रगल्भ पुरे नसल्याची खूण ठरेल .( सदानंद मोरे ,लोकसत्ता ,एकमेव लोकमान्ये –पा -४३ )
मानवी मनाला सत्सत विवेक बुद्धीला ओळखून मानव सेवा ,समता,स्वातंत्र्य  आणि बंधुता या विचाराने प्रेरित होऊन अखेर प्रयंत त्यांनी  कार्य केले . 
आज त्यांचे स्मृतीस अभिवादन !

*प्रा. बालाजी रघुनाथराव  शिंदे.*

Monday, June 7, 2021

लसाकम चे प्रबोधन

मा बालाजी शिंदे साहेब ,काल दिनांक 6 जून ला तुम्ही विषयाची सुंदर अशी मांडणी केली ,त्याबद्दल तुमचे अभिनंदन 
समाज मंदिर,आणि विहार यामधून शिक्षण कसे देता येईल ,यांचे सुंदर नियोजन तुम्ही मांडले ,
प्राथमिक शिक्षण जेवढे सक्षम रीतीने होईल ,तेवढीच पुढची पिढी सक्षम आणि परीपक्व निघण्यास मदत होईल ,
आज ग्रामीण भागात मातंग समाजाचा विचार केला ,शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे ,
10 वि पर्यंत येता येता सर्व मुले ड्रॉप होतात ,
लोकसंख्येचा विचार जर केला तर ,एक टक्का सुद्धा विद्यार्थी 10 वीच्या पुढे शिक्षण घेत नाही ,
ही अवस्था खूपच वाईट आणि समाज उन्नतीच्या दृष्टीने दयनीय आहे 
डॉक्टर बाबासाहेब यांनी आपणास ,शिका ,संघटित व्हा ,आणि संघर्ष करा ,ही त्रिसूत्री आपणास दिली ,
पण या सूत्राचा विचार आपल्या समाजाने केला नाही ,या सूत्रा पासून आपण दूर राहिल्यामुळे आपला समाज खूप मागे राहिला 
ज्यांनी या सूत्राचा अवलंब केला तो समाज वेगाने पुढे गेला ,
महार समाजाने बाबासाहेब यांनी दिलेल्या सर्व सूत्राचा स्वीकार करून आज उच्च कोटींची पात्रता त्यांनी स्वतः मध्ये निर्माण केली आहे 
कोणे एके काळी महार समाजाची आणि मातंग समाजाची अवस्था एकच होती ,
पण आज काय चित्र दिसते ,महार समाज हा मातंग चे तुलनेत खूप पुढे गेला आहे ,ही जादू केवळ बाबासाहेब यांनी सांगितलेली त्रिसूत्री त्यांनी अंगिकरल्यामुळे झाली ,
आपला समाज केवळ शिक्षणा मुळे मागे राहिला 
आता आपण महार समाजाची बरोबरी कधीही करू शकत नाही ,
आपला समाज शिक्षण न घेता ,आणि बाबासाहेब यांनी दिलेल्या अनेक सवलतीचा लाभ न घेता ,केवळ द्वेष भावनेने महारांचा विरोध करीत आले आहेत ,आणि आजही तेच करतात ,
मांग लोकांना बाबासाहेब आणि बुद्धावर सांगितले तर ते ऐकून घेण्याचे मनस्थितीत नसतात ,ते म्हणतात तेवढे सोडून बाकीचे बोला ,असे म्हणतात ,काय म्हणावे त्यांच्या या आद्यनाला ,
1980 ते 1990 या काळात  
मातंग समाज अण्णा भाऊ मुळे आंबेडकरी विचारा कडे वळत होता ,परंतु येथील मनू वादी लोकांनी ,काही मांग पुढारी याना हाताशी धरून ,आणि त्यांना लालूच देऊन ,मांतग समाजात दुफळी निर्माण केली ,आणी 
समाज फोडला ,त्याची परिणीती ,जे लोक आंबेडकरी विचारा कडे वळत होते ,आणि तशी सुरुवात झाली होती ,त्याला मनू वाद्यांनी खिंडार पाडली ,
त्यामुळे केवळ काही घर भेदी ,पुढारी यांच्यामुळे समाज दिशाहीन झाला आणि समाजाचे मोठे नुकसान झाले ,
शिक्षण हे फार महत्वाचे आहे ,शिक्षणाने च समाजाचा विकास होणार आहे ,
शिंदे साहेब धर्म ही बाब खूपच किचकट आहे ,तिची चिकिसा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे या गोष्टी मांग लोकांना सध्या तरी कळणे अशक्य वाटते ,म्हणून आपण आता फक्त आणि फक्त केवळ शिक्षण या विषयावरचं मंथन करने उचित वाटते ,
कारण एकदा शिक्षण झाले तर समाज आपोआपच धर्म चिकिसा करेल ,आणि आपले शत्रू आणि मित्र कोण त्यांना कळे ल ,
आपण केलेल्या सूचनांची आता अंमलबजावणी कशी करता येईल त्या दृष्टीने आपण महासंघामार्फत सर्वांनी प्रयन्त करू या 
आपले अध्यक्ष सुजाण आणि या बाबती मध्ये सक्रिय आहेत ,
त्यामुळे आपण मांडलेल्या विषया नुसार ,समाज मंदिर ,आणि विहार ,यामधून 
मुलांना चांगले शिक्षण ,आणि चांगले संस्कार कसे देता येईल या दृष्टीने आपण सर्व जण मिळून प्रयन्त करू या 
पुन्हा एकदा आपले हार्दिक अभिनंदन ,
असेच महासंघाला मार्ग दर्शन करणे ,चालू ठेवा ,आणि योगदान पण असू द्या ,
धन्यवाद 
आपला 
दिगंबर मण्यार 
औरंगाबाद 


मा. मानियर सर ,आपण रविवार दिनांक ०६ ,जून २०२१ रोजी लसाकम महाराष्ट्र  द्वारे आयोजित  घेण्यात आलेल्या *माता रमाई स्मृति दीनांनीम्मित्त  - प्रबोधन शिबीर मालिकेत माझे “समाज मंदिर व विहरातून शिक्षणाचा प्रसार "*  हा विषय घेऊन माझ्या अल्पश्या बुद्धिला झेपेल अशी झेप घेत मातंग समाजातील शिक्षण आणि ते लयास गेलेली मरगळ ,पुन्हा कशी उभी करता येईल याची कारण मीमांसा आणि त्यावर करण्यात येणारी उपाय योजना व व्यवस्था यावर माझा विचार  विशद केला होता .
सध्य स्टीतिथ असलेले विहार आणि समजमंदिर याचा संदर्भ देत विहरातून “बाल शिक्षण याची सुरुवात काशी करता येईल हे संगत असताना ,विहारातून भिकखू संघाने ज्ञान प्राप्ती ,ज्ञांनार्जन  करून एकएक भिकखू ने संघ कसा  मजबूत केला हे जुळते मिळते उदाहरण देत तेच काम लसाकम पुढे कारेल  असे मी अश्या व्यक्त केली .तथागताने दिलेली “शुद्ध आचारणाची शिकवण “ हा मूळ बुद्ध धम्माचा (शिकवणीचा) रस लहान वयात किंवा बालमनावर वयाच्या ५ वर्षाच्या आत जर संस्कारित शिक्षण दिले तर पुढील शालेय शिक्षण घेत असताना त्या बालकास उपयोगी होतील असे माझे मत होते . जगातील कोणतेही बाळ मातृभाषेच्या आधारवरा ( Mother tongue is very important for  Development ot Speech and Language in a critical age. The Critical  age  is most supported tool in entire life of the child “Village Naughty boy  BR Shinde p.21 ) पुढील शिक्षणाची ऊंची गाठते. 
मग घराबाहेर फिरती मुले ,शाळा बाहये आणि शाळेत न जाणारी किंवा मधेच शाळा सोडलेली मुले यांना संगत करून समाज ‘मंदिर व विहरतून’ शिक्षणाचे धडे का देण्यात येऊ नये असे आज मला वाटते . 
या *विहार आणि मंदिर* माध्यमांचा उपयोग करून मुलांत शिक्षण गोडी निर्मित केंद्र का बनू नये असे मला सदैव वाटते . आजच्या अन्र्तराष्ट्रीय शिक्षण प्रणालीत आपली मुले का तग धरत नाहीत ? . पूर्वी शिक्षण घेऊ देत न्हवते ,आज मोफत शिक्षणाची दवंडी पेटत किती महाग केले आहे यावर विचार करण्यात यावा. त्यांच्या शिक्षण प्रक्रियेला कुठे *उट्टी* लागली आहे हे आजच्या धुरीनाणी विचार करून ती *उट्टी* काढणायचे कष्ठ उपसावे अशी माजी विनंती आहे . सांगणायचे तत्पर्ये सामाजशिक्षित लोकांनी संघट्ंना  ,मोर्चे ,जयंती या कार्याला न गुंतवता त्यांना शिक्षणाची ओढ कशी लागेल असे अंनुंबंध अनुबंध करावे . 
बोलत असताना माता ,रमाई ने डॉक्टर बाबासाहेबांना काशी साथ दिली आणि महामानव कसे उदयास आले याचे उदाहरण देऊन ,शिक्षण न घेतलेली व्यक्ति ही *धोंडा* असे सावित्री मायी यांच्या शिक्षणाची व्याख्या मला सांगता आली . 
आपण आणि आपला समाज आज कोणत्या गर्तेत उभा आहे हे विषाद करावे लागले . आज आपण ज्या धर्मात आहोत तिथे आपला विकास कसा खुंटला आहे ,अजून आपण त्या पद्धतीचा का भाग महणून जगतो आहे असे मला वाटते . सोबतचा सकखा भाऊ अंतराष्ट्रीय स्थावर कार्यरत असताना आपण अजून गाव आणि जात समाज सोडलेला नाही अशी माझी खंत आहे . कोणी जैन तर कोणी येशू छायेत जगतो आहे . एक उदाहरण द्यावेसे वाटले ते असे ,एक मांगाची बाई एका रस्त्याने जात असताना तिला भिंतीवर एक बुद्धाची पेंटिग दिसली तेंव्हा पदर पुढे करत ठुमका मारत पुढे गेले आणि कांहीच अंतर पार केली तर तिला एका झाडाखाली एक शेंदूर लावलेला दगड दिसला तिथे पदर बाजूला सारून तिथे खाली वाकून नमस्कार करती झाली . हे कशाचे ध्योतक आहे या वर विचार करावा . 
एके ठिकाणी आगरकर म्हणाले की ‘देवाची कल्पना माणसाचीच’ . “आकाशातून देव येथे कधी आले नाहीत, येथून परत कधी गेले नाहीत .हे आपल्याला माहिती असताना हे बिनदीककीत सोपस्कार करतो आहोत आणि मातंग समाजाने आपले कुळ दैवत अजून शाबूत ठेवले आहे या सारखे समाजाचे दुक्ख काय वेगळे असू शकते ?
लसाकम च्या संपूर्ण पदाअधिकारी वर्गांना अशी विनंती केली की आप -आपल्या विभागातील विहार आणि समाजमंदिरातून *बालशिक्षण वर्ग* कसे सुरू करता येतील याची सूची तयार करून आराखडे तयार करून ते कसे राबवणायचे मनसुबे तयार करावे . पण आज मला अशी खंत वाटते की आपल्या कडे विहार असताना सांजमंदिरा ची गरज का भासली ? हा प्रश्न अनुतारीत राहील. 
अश्या आणि अनेक बाबीवर विषय मांडून शिक्षण हे कसे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध बाल वयात देत असताना तथागत बुद्धांचा सदाचार ,आचरण,धम्माचे धडे कमी वयात पाजवून *बालमन सशक्त* करावे यावर अनेक मान्यवर सदस्याने चर्चा केली. 
प्रा बालाजी शिंदे 
राज्य सचिव लसाकम ,महाराष्ट्र प्रदेश .(नेरूळ ,ठाणे मुंबई -४०० ७०६ )

जयभीम !नमो बुद्धाय !!

Monday, August 3, 2020

Doodle On Dr.B R Ambedkar .

Google गुरु ची Doodle देऊन महामानव ,बोधिसत्व डोक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी !


 

INDIAN SOCIAL REFORMER AND POLITICIAN HONOURED WITH A GOOGLE DOODLE

 

The jurist, who campaigned for the rights of India's 'untouchable' caste and converted to Buddhism, was born 124 years ago

 

https://lh4.googleusercontent.com/muIVHqzcvNKXOhUxohqtDdiTtkorJiQo10ZRGQZEs7a1Eci32q_Y7Rrb9HfgexWpUJqNL2eHM4N3H4xDH_v_CmPWWqPxBZsaJXdfSbkx1MyFd9aORCYLAyjV9o-ii0MKvyOjtOL1

 

सॅन फ्रान्सिस्को येथे तयार केलेल्या  विपणन दृष्टिकोनातून गूगल, अत्यंत फायदेशीर इंटरनेट सर्च इंजिन, हे  एक शोध इंजिन आहे, बातमी किंवा मनोरंजन साइट नाही. मुख्यपृष्ठ कधीही बदलत नाही, त्या डूडल वगळता कलात्मक, कधी मजेदार, कधीकधी आत लपलेल्या लोगोसह चकित करणारे – व्यक्ति चे विशेष त्यांचे समाजासाठी चे योगदान ,त्याग ,जगात केलेला आमुलाग्र बादल या आधारे त्यांचे डूडल प्रसिद्ध करतात . त्यात महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे Doodle हे महत्वाचे अंग होते .

 

Google हे मानवी मूल्ये जोपासण्यासाठी चे इंजिन ,मानव जीवन  पुनरुत्थान करण्यासाठी वापरलेले मशीन. मानव  आनंदित करण्यासाठी आणि Google चे मानवीकरण करण्यासाठी आज गूगल ने संपूर्ण जगावर कब्जा केला आहे . 

 

एके काळी नाराजगी दर्शवणारे जग आज गुगल हा उत्तम पर्याय म्हणून  स्वीकारित असताना दिसत आहेत . शाळा ,महाविध्यलय  आणि एकंदरीत एकदारीत कोर्पोरेटर क्षेत्र गूगल वर विसंबून आहे .

 

Google च्या व्यवसायाची बाजू जी डेटा आणि उपयोगाचे सतत विश्लेषण करते, डुडल्स त्यांचे व्यक्तिनिष्ठ निकषांवर मूल्यांकन करतात. जुरी बोर्ड ठरवत असते ,की कोणाचे Doodle तयार कराचे .

 

गूगल हे सामाजिक नेटवर्क आहे . गूगल  टीम दरवर्षी अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये  doodle केले आहेत आजवर ३०० हून अधिक डूडल तयार केले आहेत . परंतु राजकीय किंवा वादग्रस्त विषयांपासून सतत दूर असलेले पाहावयास मिळत आहे . 

 

मुळात गमतिची बाब अशी आहे की ,गूगल नाविन्यपूर्ण, कलात्मक आणि मूर्खपणाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करतो, जे Google साठी योग्य आहे. 

 

यात  डूडल कल्पना फक्त कोठूनही येऊ शकतात. गूगलची नाविन्यपूर्ण संस्कृती, आरामशीर वातावरण, काम आणि खेळाचे मिश्रण सर्जनशील प्रक्रियेस मदत करते.

 

डूडल चा इंजिनियर ख्रिस होम, ने आजवर ३०० पेक्षा जास्त जगभ्रतील प्रसिद्ध व्यक्ति सहित डूडल  बनवले आहेत . 

 

गूगल डूडलर म्हणतात की  आम्ही गूगल च्या जगभरातील वापरावर डूडल बनवत असतो आणि त्या   कलाकृतीचा अतुलनीय मान सन्मान  देतो त्यात त्या व्यक्ति विशेष  तीचे  अभिनव संस्कृतीचे प्रतिबिंबित करतो आणि Google वर Doodle तयार करतो . 

 

गूगल हे संपूर्ण जगात ऑनलाइन भेट देण्यात आलेले स्थान , यात मानवी मूल्ये  प्रतिबिंबित करते.

अशीच गूगल ने १२५ वर्षा पूर्वी  चतुर्थ प्रवर्गात जन्म घेतलेल्या  महामानव ,बोधिसत्व डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर यांचे डूडल/Doodle तयार केले होते . 

याची दखल जगभरातील बुद्धिजीवी वर्गाने घेतली . आणि या महामानव बोधिसत्व यांच्या डूडल लोगो मुळे त्रिलियायन व्यू आले होते . 

 

आजवर  डूडल ने ३०० च्या वर प्रसिद्ध केलेल्या Doodle मधील रांगेत प्रथम  १० मध्ये  स्थान आले होते याची नोंद घ्यावी .

 

अशी महती आज ही १२६ वर्षांनंतर महामानव ,बोधिसत्व डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर  कायम  टिकून आहे ,आणि मानव जमात या जमिनीवर जो पर्येंत जीवंत असेल तो पर्येंत महामानव ,बोधिसत्व डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मोठेपण ,त्याग ,मानव उत्थान साठी केलेले समर्पण जगाच्या कृती पटलावर असणार आहे . 

 


१०० स्मृतिशताब्दी: अण्णा भाऊ साठे .

||अण्णा भाऊंच्या १०० स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने || *(हा माझा लेख पुनः पोस्ट करीत आहे ... )* .... प्रा बालाजी र शिंदे ,विशेष शिक्षा . मतामत...