Tuesday, June 19, 2018

दलाल आणि दलाली


दलाली
दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८

दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो  की एखाद दुसरी दुय्यम  खरेदी असो .खरेदी विक्री आली की तिथे दलाली आलीच .माझ्या गावी बैल बाजार असल्यामुळे दलाली तेजीत चालते .हल्लीच्या युगात दलाली ला उत आला आहे.आज -काल स्मार्ट फोन मुळे तर खूप मोठ्या प्रमाणावर एप बाजारात दिसत आहेत ते एक प्रकारची दलाली किंवा कमिशन घेऊन धंदा करीत आहेत .
फार पूर्वीच्या काळापासून जसे वस्तू देवाण आणि घेवाण पासून जो कोणी मधेस्थ आला त्याने  मार्जीन मनी ची मिळकत केली तेच दलाली रुपात पुढे उदयास आली .आज आपण त्यास कमिशन असे म्हणतो .कमिशन शिवाय खरेदी विक्री होत नाही .
हाळी या गावी पूर्वी प्रमाणे आजही तेजीत चालणारा एक आठवड्यातील  तीन दिवशीय बाजारातील  व्यवसाय म्हणजे दलाली .बैल विक्री आणि खरेदी मध्ये दोन्ही बाजूने कमिशन घेणारा आणि देणारा पैसे  देतो आणि दलाल ते खुशीने घेतो .
हाळी या गावी जनावराचा जंगी  बाजार तसा तीन दिवस भरतो ,शनिवारी भरत असताना पासून ते सोमवारी ओसरत असताना पर्येंत .शनिवारी पहाटे  सकाळ पासून दूर दूर गावावरून बैल विक्रीसाठी येत असतात ते सोमवारी आपल्या गावी  परत जाई पर्येंत .एकंदरीत हाळी आणि हांडरगुळी या गावातील  सगळे मिळू वीस एक च्या आसपास दलाल असतील .ते बाजारात फिरून बैल खरेदी आणि विक्री करून देतात .आणि कमिशन घेतात .
दलाल म्हण्टेल की त्याचा पोषक ठरलेला असे डोक्यावर गांधी  टोपी हातात एक काठी अंगावर सफेद रंगाचा सदरा आणि धोतर ,पायात काही वाहन असेल नसेल तरी चालेल .
हे लोक पूर्ण बाजारात दिवसभर बैलाच्या दाव्ण्यातून फिरत असतात ,आणि  बैल मालकाला विचार पूस करीत असतात की तुमचे बैल विकायचा हाय का ? आणि किमती विचारून ठेवतात .कधी -कधी  एक तर विकत घेणारा सोबत असतो त्यास वेगळी वेगळी बैल जोडी दाखवावी लागते किंवा ज्या माणसाचे बैल विकायचे असतात त्या दावणीला जाऊन तेथील बैल जोडी किंवा एक बैल दाखवला जातो .या दरम्यान जी वार्ता होते किंवा देवाण घेवाण ची भाषा होते त्या बोलीला किंवा तिघातील संभाषणा ला जगात तोड नाही .कांही नमुने दाखल मी इथे पेश करीत आहे ..
दलाल : मालक हा धावळ्या बघा किती उठावदार आहे .
विकत घेणार : आर ,मला धावळ्या नको ? एकाच रंगाचा पाहिजे बैल .
दलाल : चला मग पुढे .तुम्हाला एकाच रंगाचा बैल  दाखवतो .
ते एका दुसऱ्या  दावणी कडे वळतात तिथे रुद्र्ववाडीचे  चे बैल दावणीला असतात तिथे ते दोघे जातात .
विकत घेणार : हा हा ..हा मस्त हाय की र .याची काय किंमत सांगता हो .
मालक : आठ हजार हाय बघा .
दलाल : अहो ,काय पाटील हा तर पाच हजार चा बैल आणि आठ हजार सांगता ?
विकत घेणार : हो खरे आहे ,दया न पाच हजार ला .
मालक  : नाही हो आणखी एक हजार कमी करतो बघा ,जर घेत असला ,नगदि  रोख रक्कम देत असाल तर ?
दलाल : जाऊ दया हो मालक  ,एकच बोलू का सहा हजार मिळतील बघा .नाहीतर आम्ही चाललो पुढच्या दावणीला .
विकत घेणार : अहो तुमचे आणि माझे जाऊद्या मी तुमाला सहा हजार पाचशे देतो .
( दलाल आणि विकत घेणार थोडे बाजूला जातात आणि आपसात चर्चा करता की हाच बैल घ्यायचा ,कारण काय तर त्या बैलाची एक जोडी हुबेहूब विकत घेणाऱ्या पाटलाच्या घरी आहे .हे कळताच दलाल खुश होतो की आज मला कमिशन मिळणार आणि मी हा बैल विकणारच .हे पक्क होतो .)
मग दलाल आपले अस्त्र बाहेर काढतो आणि त्या बैला कडे स्वारी वळते .चला मालक आज तुम्हाला हा बैल सहा हजार पाचशे रुपया ला घेऊनच देतो .त्याच्या खांद्यावर एक उपरणे असते त्यात पायातील चप्पल गुंडाळून खाद्यावर टाकलेली असते .आणि त्या उपरण्याला हात लावत दलाल शपत घेतो .आणि काय  म्हणतो ते बघा  ...
दलाल : मालक माझे एकता का ,मी खोटे कधी बोलत नाही .ह्या रोटीची शपथ हाय ,तुमच्या बैलाला अख्या बाजारात घेऊन फिरलो तर सहा हजार पाचशे मिळणार नाहीत .आणि देऊन टाका आता .
विकणारा : थोडा वेळ संभ्रमांत पडतो .हा बोलतो ते खरे आहे .बिचारा रोटीची शपथ खातो आहे ,दुपार झाली आहे आजून जेवला पण नाही खांद्यावर  रोटी घेऊन फिरतो आहे .याचे मन परिवर्तन होते आणि सहा हजार पाचशे ला बैलाचा सौदा होतो .
विकत घेणाऱ्याला आणि विकणाऱ्या पाटलाला माहित नाही की त्याच्या खांद्यावर  रोटी नसून त्याच्या पायातील चप्पल आहे .आणि अनवाणी फिरत आहे ...एक दलाल म्हणून......
@@@@

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...