Sunday, June 18, 2023

Path of Purity- परिशीलन बुद्धांचे पहिले प्रवचन : दु;ख मुक्ति ची प्राप्ती,

 Path of Purity-परिशीलन

बुद्धांचे पहिले प्रवचन :  दु;ख मुक्ति ची प्राप्ती

भाग -३५

‘बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘

----------------------------------------प्रा बी आर शिंदे ,कर्णबधिर विशेष शिक्षणतज्ञ




संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय आणि आपण त्याचा साकल्याने विचार करीत आहोत . बुधांच्या मूल सूत्रात अष्टांगिक मार्गाची  जशी मांडणी आहे तशीच मांडणी बाबासाहेबांनी यात मांडणी केलेली आहे  . परंतु एकंदरीत बुद्धधर्माचा या परिशुद्धीकडे नेहण्याच्या निरणावणाकडे नेहणारा विचार आधुनिक लोकांना स्पठ व्हावा म्हणून  थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडला गेलेला आहे . उदा पंचसील हा अष्टांगिक मार्गाचा मूळ आधार मानून अभिवचन केले आहे आणि त्यास  त्यांनी नाव दिले आहे ‘Path Of Purity’ . यालाच विशुद्धीचा मार्ग असे म्हणट्ले आहे . विशुद्धीचा मार्ग स्वीकारल्या शिवाय अष्टांगिक मार्गाचाचे पालन करने  काठीन आहे हे त्यांची भूमिका आहे .

दुसर्‍या भागात या मार्गाची माहिती दिली आहे आणि त्यास  अजून दुसरे नाव दिले आहे ‘ Path of Rrightness’ .हा सदाचाराचा मार्ग, म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय . या पुढे जाऊन असेही म्हंतटले आहे की  मनाची परीसुद्धी करणायचा पाया जो बुदधणे सांगितलं आहे तो म्हणजे ‘पारमितेचा  ’ मार्ग होय . यालाच पुढे जाऊन बाबा साहेब असे म्हणतात की ‘Path of archive’ . अश्या तीन भागात त्यांनी अष्टांगिक मार्गाचा सारांश जोडला आहे .

ही मांडणी पारंपरिक पद्धती पेक्षा अत्येंत वेगळी असून अधुनिक काळात उपयुक्त आणि उचित आहे .एकूण अष्टांगिक मार्ग आठ असले तरी यात महत्वाची दोनच  अंग आहेत ‘स्मेक  सती  आणि संयेक समाधी .’

सती म्हणजे स्मरण . नुसते स्मरण नशून मूल अर्थ असा लावता येईल की ‘Awareness’ . म्हणजे सतत ची जागरूकता . कायम जागे राहणे किंवा Continues Alertness . थोडक्यात सावधान राहणे हा सतीचा मूळ अर्थ आहे . आणि मानणा सवयच लाऊन घेतली पाहिजे की जे करतोय ,जे वागतोय आणि रोज अनुभवतोय ते आणि त्या कडे जगरूकतेने पाहणायची आणि त्याची दखल घेण्याची आणि मनाला सवय लावणे आवश्यक्ये आहे . महणून संयेक सती हे अतिशय महत्वाची बाब आहे . 

संयेक सती बळकट होण्यासाठी मनाचा व्यायाम महत्वाचा आहे . हा व्यायाम कसं असावा जे कुशल असेल तो व्यायाम ,ज्या मुळे मन स्मृद्ध होते . अकुशल असेल तर मनाची शक्ति मारली जाते . रोजच्या जीवनात हे दोन भाग फार म्हतवाचे आहेत.

 

आपण रोजच्या जीवनात याच दोन मार्गाने जीवन जगत असतो . थोडक्यात चांगले आणि वाईट . माणसाचे मन अधिक चंचल होत जाते . मनाची साधना त्याला करावीच लागते कारण ही चंचल वृती रोजच्या व्यवहारात आपला सतत पिछा करीत असते . आपल्या वागण्या बोलण्यात सगळीकडे चंचलता येते ,कारण यात  राग ही आहे आणि द्वेष ही आहे . चांगेल-वाईट ,कुशल अकुशल आहे . या दूरीच्या द्वंद्वत जीवन जगत असताना ‘To be or not to be ‘  चे जीवन होते . म्हणून संयक्ये व्यायामची गरज आहे . यातून हे द्वंद्व संपवण्याची शक्ति निर्माण होते . यातील व्यायमचा पहिला प्रकार म्हणजे जे चांगले आहे ते टिकवायचे . आणि तेचं मनात कायम टिकवायच . मन कमजोर कधीच होऊ द्याचे नाही .मनाला सतत बळकटी देत राहावे . 

दूसरा प्रकार म्हणजे जे चांगेल झाले नाही ते मनात निर्माण करणायची जिद्ध तयार करायची. कांही बाबतील कुशल चित्त निर्माण होत नाही ते निर्माण करायचे . हे दोन प्रकार कुशलांचा पाठपुरावा करणारे व्यायाम आहेत .

दुसरे दोन जे आहेत ते मनाची हानी करतात . अकुशल हे कुशलला मारन्या चे काम करतात आणि हानी करतात तपासून वाचले पाहिजे  काम दूर राहिले पाहिजे . जे अकुशल मनात आलेले आहे त्याचे उच्चाटन करा . त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करा जे मनात अकसुशल येऊ पाहत आहे त्याला रोकून ठेवा त्यासाठी बांध घाला . त्याला जवळच येऊ देऊ नये अश्या तर्‍हेने मनाला कमजोर करणार्‍या या दोन नकारात्मक पद्धती आहेत ,यांच्या पासून सावध राहणेचा प्रयत्न करावा . मनाला जी शिकवण दिली तसे वागावे लागते ,आणि सतत जागृती बाळगावी लागते . म्हणून ‘स्म्येक सती’चा अभ्यास त्याचा सुरू होतो. हे करणायसाठी सतत सावध राहिलेच पाहिजे कोणत्या क्षणी मनात काय येईल ,तो मनाचा कांही भरवसा नाही ?

कोणत्या क्षणी आपल्या मनाची काय आवस्था असेल ते आपणास कळत नाही . कांही  होऊन गेल्यावर कळतात ,अरे ते आपले चुकले. रागत आपलायला काय कार्याचे ते करतो ,ते नंतर कळते की आपण चुकीचे केले आहे . अरे आपले चुकले असे समजतो आणि नंतर पश्चाताप होतो . मग त्या चुकीला कांही नंतर अर्थ उरत नाही . राग येताच त्याची दखल घेणे हे ही तेवढेच म्हत्वाचे असते  .मन सतत  दक्ष आणि सावध पाहिजे  राग आलेला आहे आणि हा राग अकुशल आहे या प्रमाणे माला वागायचे नाही हे ठरवायला हवे . हे माला माझ्यात टिकू द्यावयाचे नाही ते हद्दपार कराचे आहे . आणि मग हद्दपार करणायचा मार्ग सोप्पा आहे . यावर एकच उपाय आहे ,तीन वेळा दीर्घ स्वश घाय आणि तीन वेळा बाहेर टाका ,रागाचा पारा  आपोआप उतरतो .

यामुळे रागाच्या भरात जे करतो ते कधी होणारे नाही . राग उतरल्यावर राग विरहित जर आपण एखादे कार्ये केले तर मनाला शक्ति येते . यातून आत्मविश्वसा बळकट होतो हे फार महत्वाचे आहे .

आज माणसाला व्यावहारिक जीवनात जगणायसाठी आत्मविश्वासाची खूप गरज आहे . हा आत्मविश्वास फक्त सकरत्म्क माध्यमातून वाढतो दुसरे एकही मध्यम आज तरी नाही . त्याला जर बळ कोठून मिळत असेल तर ते व्यावहारिक ज्ञानातून त्यालाच आपण  Information किंवा knowledge असे म्हणतो . जेवढे ज्या विषयाचे आपणास ज्ञान असेल तेवढे त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो . मूल आत्मविस् ज्याला आपण समजतो तो त्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतो . आणि तो असतो मनाच्या सकारात्मक आवस्थे मध्ये . ज्ञान तास अधिक पोशाक आणि पूरक महणून काम करते .

यालाच आत्मविश्वास असे म्हणतात हा प्रतेक व्यक्तीत असतोच असे नाही . जेवढा माणूस रागीट तितका त्याचा आत्मविश्व्स्स कमी ,जेवढा द्वेषी त्याचा आत्मविश्वास नसल्या  समान आहे. यालाच बुद्धधम्मात  त्याला ‘बळ’ असे म्हणतात . हे बळ कोनात ही  नसते कमी लोकात असते . हे बळ अधिक वाढवण्यासाठी व्यायमची गरज आहे . याच बळाने स्मृति जागृत राहते . आशयणे माणसाचा पुढील विकासाचा टप्पा जो आहे साधे होतो . यालाच नाव संयेक समाधी असे म्हणतात .


 बाबासाहेबांनी विपसणेची विभागणी हो दोन भागात केली आहे . एक समाधी आणि दुसरी संयक  समाधी .

‘ चित्तस्स एक्स्स गत्ताचित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी होय . आणापाणा  मधून चित्ताची एकाग्रता सध्ये होते . या एकाग्र चित्तानं जेंव्हा आपण जीवनाच्या मनाचे चिंतन मनन करतो , सखोल गंभीर ,वरवर चे नाही त्या एकाग्र  मनाच्या समर्थपणे होते त्यातून आपल्या चित्तत जो बदल होतो तसे  आपल्या समाधी जागृत होतात त्या आवस्थेला संयेक समाधी असे म्हणतात . यात तुमचे मन बदलून जाते यात जे कांही जडण घडण वेगळी होते ,अशुद्ध आहे ते गळून पडते . याच मानसिकतेत तुम्ही जगायला लागता . म्हणूनच परिशुद्ध आवस्था जी आहे चित्ताची त्यालाच समक्ये समाधी असे बाबासाहेब म्हणतात. ही बाबासाहेबांची समाधी ची भाषा आहे .

थोडक्यात समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रत होय . जसे पालीत लिहले आहे जसेच्या तसे बाबा साहेबांनी यात लिहले आहे .  

‘चित्तस्स एक्स्सगता समाधीही समाधी प्राप्त करून घेण्यासाठी मानसाच्या मनामध्ये पाच प्रकारचे अडथळे असतात असे बुद्धाणी  सांगून गेले आहेत.

या मनाच्या प्रवृती मुळे तो आपला एकाग्रता साध्य करू  शकत नाही . मन आपले चंचल आहे . चंचल कशामुळे आहे . हे विनाकारण आहे का चंचल ? विनाकारण  नाही याला कारण नक्कीच लागते , हा विश्वाचा नियम आहे . श्रुष्टीचा नियम आहे त्याला नक्कीच कारण लागते . मग विचार करा मन चंचल का आहे ? याची करणे आहेत ते पाच कारने   बुद्धधम्मत सांगितली आहेत . यालाच ‘पंच निवरण ’ असे संबोधले जाते .इंग्रजी भाषेत five fitters असे म्हणतात .हेच मानवी जीवन उज्वल करण्यात येणारे  आडथळे आहेत .   

पहिला अडथळा लोभ – जो प्रयेंत मनसाच्या मनात लोभ घर करून आहे तो प्रयेंत  चंचलता राहनारच . लोभाचा स्वभाव कसा, जिकडे लक्ष जाईल ते आपल्याला  हवे असते . ते पाहिजे असते ,जे मनात येईल ते आपल्याला हवे असते . म्हणून एका क्षणात हे तर एका क्षणात ते असे चंचल होते . मन जिकडे जाईल तिकडे घेऊन जाते . जे मनात ते आपल्याला पाहिजे तिकडे घेऊन जाते ,मन क्षणात बदलत असते हे पाहिजे का ते ? अशी अवस्था करून टाकते. लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे . वाटेल ते प्रतेक गोष्ठ हवी ती भावना कमी केली पाहिजे . परत तिथे जागृतीचा प्रभाव येतो ,अरे यात माझे कांही अडलेले नाही . मला हे नको ते नको  असे मन तयार झाले पाहिजे . ही भावना निर्माण झाली की लोभाची मात्रा कमी होते .

 

मार्केट मध्ये छान कपडे बघून नुसते चालतो का पुढे ,मन आपले काम कारला सुरुवात करते . ते दिसतात कसे सुंदर ते  घायला पाहिजे . हे चांगले दिसते घायला पाहिजे असे किती तरी मनामध्ये लिस्ट होऊन जाते . त्या क्षणी त्याची गरज असते का पण मन त्या कामात गुंतले जाते .गरज नसताना अश्या तर्‍हेने मनाची एकग्रता कमी होते . अश्या आवडीच्या खूप गोस्ठि  असतात आपल्या आवती भोवती  ,या मध्ये कांही लोकांना नादच  लागतो . आणि मार्केटिंग ची सवय लागते. नुसतेच फिरत राहण्याची सवय लागते ,यालाच यूरोपियन देशात त्याला ‘Window Shopping’ असे म्हणता . घ्यायचे कांही नाही पण खिडकीत काय देखावा तो पाहत फिरायचे आणि मनात लिस्ट करायची, नुसतेच मन चंचल म्हणून बाजारात गेल्यावर जे लागेल ते घेणे आणि सरल घरी निघून येणे . हा त्याला आळा घालणायचा प्रकार आहे ,म्हणून लोभाळा आळा घातला पाहिजे . यामुळे एकाग्रता होत विचलित होत नाही .

दुसरी भावना ,आडचनीची  सांगितली आहे ते म्हणजे द्वेष मत्सर -

यामुळे माणसाला राग येतो ईर्षा येते ,नावड येते तिरष्कार येतो हे सारे द्वेसाचे भाऊबंध आहेत. गोतावळा ,परिवार या पैकी जी भावना निर्माण होईल तेंव्हा आपली एकाग्रता गेली . केंव्हा राग येईल याचा  पत्ता आहे का ? द्वेष केंव्हा ही येऊ शकतो त्याचा कांही पत्ता नाही  .ईर्षा मत्सर द्वेष राग हे कायमच चालू असते .   

कोणत्या क्षणी काया निर्माण होईल याचा भरवसा नसतो . आपले मन एकाग्र होणायचे थांबते आणि त्या भावनाच्या मध्ये रममाण होते . मन वाटल जात आणि त्याची विभागणी होते क्षती होते . हा आडथळा आहे महणून द्वेष रोखला पाहिजे .याचा परित्याग केला पाहिजे . 

म्हणून  मानत सतत मैत्री भावना करुणेचे लक्षण ठेवा असे बुद्धाणे संगितले आहे . जे कांही करेन ते मैत्री भावनेच्या रूपातून करेन ,जे कांही बोलेन मैत्री करुणेच्या बोलेन जो कांही विचार कारेन मैत्री करुणेच्या भावनेतून करेन  हा विचार मानत ठेवावा असे वागन्याचा  सतत प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम आहे . सम्यक स्मृति आहे . म्हणजे माणसाला meditation करताना ध्यान करायचे आणि एरवी कसे ही वागायचे असा प्रकार आहे का ? नाही  . हे दोन जीवनाचे इतके म्हत्वाचे आंग आहे . हा व्यायाम कायम करायचा . आणि आपला रोजचा जीवन मार्ग सुखकर करावा  

 


झाली एकदा किलबिल सुरू


 झाली एकदा किलबिल सुरू


राज्यातील विदर्भ वगळता शाळांमध्ये आजपासून म्हणजेच 15 जून 2023 पुन्हा किलबिल  सुरू होणार आहे . शाळा गजबजलेल्या असणार आहेत ,शाळा भरलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आज शाळा - शाळातून ध्जय्यत तयारी सुरू झालेली आहे.  मात्र पहिल्याच दिवशी शाळांमधून विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले?

यामागील काय राजकारण आहे ते अद्याप कळलेले नाही?   गणवेश आणि वह्या पुस्तके यामागे या राज्यातच नसून संपूर्ण देशामध्ये मोठे राजकारण अडकलेले आहे. यामागचे मोठे घोडबंगल अजून उलगडलेली नाही? 


खऱ्या अर्थाने उन्हाळ्याच्या अति तीव्रतेमुळे २०२० -२३  हे शैक्षणिक वर्ष एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच संपवले गेले ,कारण होते अति तीव्र उन्हाळा.  एकंदरीत अंदाजे पावणेदोन महिन्याच्या सुट्टीनंतर बालक आणि पालक एकमेकांशी भेटणार आहे दीर्घ  सुट्टीनंतर आजपासून पुन्हा शाळा सुरू होत आहे..


मागील काळात जाहीर केल्याप्रमाणे विदर्भ विभागातील शाळा अजून सुरू झालेल्या नाहीत..पूर्व प्राथमिक मधून पहिलीत  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली आहे.. पालकांनी  त्यांची लगबग सुरू झालेली आहे.  शाळेविषयी आपुलकी वाटावी , आदर वाटावा शिक्षकाचा सन्मान व्हावा पालकांचा सन्मान व्हावा यासाठी शाळेतून उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 


आज शाळेत पहिलं पाऊल टाकलेल्या  चिमुकल्या बालकांचे त्यांच्या  पालकांचे, शिक्षकाचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  अनेक अनेक हार्दिक अभिनंदन!!


 प्रा बी आर शिंदे ,कर्णबधिरांचे  विशेष शिक्षणतज्ञ .

येवलाआणिधम्मातर_घोषणा !

 येवलाआणि धम्मातर_घोषणा !

येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील  तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.

कार्यालयीन कामा निमित्त अनेकदा इथे जाण्याचा योग आला . आमचे मित्र कोकाटे सर या गावचे.  यांनी मला अनेकदा इथे बोलावले होते .ते एक शासन मान्य कर्णबधिर शाळा चालवतात .  एकदा येथील इतिहास कळल्या पासून  परत परत जाण्याची इच्छा होत असे कारण असे की ही भूमी डॉक्टर बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन तर झाली होती पण इथूनच हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा झाली होती . 

मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. 

आणि ती  घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  अशोक विजयादशमीला १४  ऑक्टोबर १९५६  रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे  आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो . 

जय भीम !नमो बुद्धाय !!

प्रा.  बी.  आर.  शिंदे ,कर्णबधिरांचे  विशेष शिक्षण तज्ञ .

(संदर्भ फोटो : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला)



#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...