About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Saturday, July 18, 2020

पुण्य स्मरण :अण्णा भाऊ साठे !

*'तू गुलाम नाहीस तू तर या वास्तव जगाचा निखारा आहेस !’*

‘हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे’.  

‘ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है’
....  *कॉ. अण्णा भाऊ साठे* 

माणसाचा जन्म आणि मरण आतील जो काळ असतो तो  तमाम  मानव जातीला इशारा देणारा असतो  . तीच गत या महान लेखकाची झाली होती . अफाट बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व क्रांतीकारी विचाराने प्रेरित जीवन जगले,कॉ. तुकाराम भाऊराव साठे (अण्णा ). 
---- *प्रा. बालाजी र. शिंदे.* 

वंचिताचे जीवन जगात असताना समाजाला आज उत्तुंग शिखरावर येण्यास जे श्रध्ये अण्णा भाऊ साठे जाते ते त्यांचे उत्तम कार्य होय .अण्णा हे एक मिश्रण ज्यांनी  स्वतंत्र विचारधारा समाजात रुजवली अशी सम्यक विचार प्रणाली  पेरलेले महान कलाकार . प्रतेक्षात सगळ्या “शोषित  समाजाला एकदिशा” देणारे साहित्य त्यांच्या लेखणीतून क्रांतीच्या ठिणग्या घेऊन उतरले होते . 


जन्म जरी अधोरेखित नसला तरी मरण नक्कीच अधोरेखित आहे ,कारण त्यांनी पेरलेली विचार धारा आणि ,पेटवलेली ज्वलंत मने ,ज्याने घाव घालण्याचे आणि जीवन जगत असताना जगात बदल घडवण्याचे धाडस केले . 
आज त्यांचा स्मृति दिवस ! अधोरेखित होतो आहे !!

गोरेगावच्या घरात अण्णा भाऊंचा १८ जुलै १९६९ रोजी मृत्यू झाला होता. जेंव्हा अण्णा भाऊ मरण पावेल त्या समयी कॉ. सत्येंद्र मोरे यांनी वर्तमानपत्रे, ऑल इंडिया रेडिओ, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांना, शाहीर अमर शेख आणि अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भट यांना कळविली. अभिनव प्रकाशनाच्या दुकानावरच प्रगत साहित्य सभेची बैठक असल्याने, तेथे बातमी कळताच भट, बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, दया पवार, प्र. श्री. नेरुरकर, अर्जुन डांगळे, राजा ढाले, प्रल्हाद चेंदवणकर, राजा राजवाडे, शिवराम देवलकर, वामन होवाळ, डॉ. सदा कऱ्हाडे, कॉ. जी. एल. रेड्डी, ए. के. हंगल.. आदी अनेक मान्यवर आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अंत्ययात्रेला उपस्थित होते.(लोकसत्ता टिम जुलै २७ ,२०१९ ). 
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणार्याव वरील  विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेने राहणार्या  लोकशाहीर, साहित्यिक कॉ. अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृति दिवस म्हणून पाळला जातो . 
 अण्णा भाऊ यांचा जन्म मातंग समाजात झाला हे अजून किती वर्ष सांगणार ते बहुजन समाजात बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी जन्म घेतले मानव  . जात नको नको म्हणणारे जातीचे पोवाडे आणि वाभाडे गाण्या सारखे आहे का ? येवढ्या महान कलाकाराला एका  जातीती गुंतून ठेवणे हे माझ्या सारख्या विचारवंत ,समीक्षक माणसाला परवडणारे  नाही ? महाराष्ट्रातील उपेक्षित समाजात आणि त्यात फाशीपारधी नंतर गुन्हेगार म्हणून सरकारने शिक्का मारलेला समिश्र समाजात ,उपेक्षित वर्गात यांचा जन्म.
अशी ज्या समाजाची अवस्था तिथे  त्या समाजातील गुणवंत शांतिप्रिय  अण्णा नावाचा जन्म घेतो आणि तो माणूस  जगविख्यात साहित्यिक होऊन जातो हे अभिमनाची बाब आहे . जगातला एकमेव माणूस ज्याने साहित्यात आपली सीमापार करून रशियात जाऊन आपले विचार मांडले  .ते धाडस त्या शूर वीराचे .  अण्णा भाऊ यांनी आपले भविष्य स्वतः लिहिले आणि ते खरे करून दाखवले.स्वतः खडतर जीवन जगत शेवटी बुद्ध मार्गी गेले .

कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय असताना अण्णा भाऊंची आर्थिक स्थिती जरूर हलाखीची होती; परंतु संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर अण्णा भाऊ हे नामवंत शाहीर-कलावंत म्हणून पुढे आले होते. हे सर्व श्रुत आहे . या प्रस्थापित ,अफाट जगाच्या खुल्या आणि जीवंत विश्वात  शिकत असताना काही सिद्धांत त्यांनी स्व:ताच तयार करून  समजून घेतले होते .स्व:तचे सिधांत त्यांनी  अंगिकारले होते आणि . त्या सिद्धांत जगले. महामानव बोधिसत्व डॉ. बाबसाहेब आंबेडकर  यांच्या लेखणीस प्रेरित होऊन स्वतःला विसरून मानवतेसाठी जगणे हे  खरे जगणे  आहे जीवन आहे याची त्यांना उकल झाली होती  . मानवतेसाठी जगायचे मानवतेसाठी मारायचे हे त्यांच्या तेंव्हा ध्यानात आले होते. म्हणून या  माध्यमातून मानवतेची सेवा करायची. हाच कित्ता त्यांनी पुढे रेटून धरला आणि तसे जगले . कारण मानवता ही कोणत्यही जातीची किंवा धर्माच्या  मालकीची नाही.  हे अण्णा जाणून होते . हा जगण्याचा वैचारिक वारसा मनात ठेऊन जगले . 

आणा पुढे श्रमिकांच्या लढ्यात सहभागी झाले.  श्रमिकांचे नेतृत्व करू लागले. या लढ्यात त्यांचे मन पुढे रमत गेले आणि ते श्रमिक ,कामगार कष्टकरी ,मजदूर  यांचे कैवारी झाले . मुंबई सारख्या  रस्त्यावरची लढाई  त्यांनी लढली , येवढेच नसून  रंगमंचावर ही लढाई जिंकून राहिले . यात लढाईत  तमाशा या कलेचा वापर त्यांनी लोकहित ,जंनजागृती आणि लोकजागृतीसाठी भरपूर प्रमाणात केला.

अण्णा त्या कलेत पारंगत होते आणि लढवये होते महणून त्यांची मैना (मुंबई ) गावावर (महाराष्ट्रात ) राहिली . त्यांची ही  छ्क्कड जगभर गाजली . संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णा ने गायलेली छक्कड संयुक्त लढ्यात सार्थक झाली . आणा अमर झाले . अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य आणि अनेक सामाजिक विषयात  त्यांनी लीलया पाहावयास मिळते ,यात त्यांनी  शोषित आणि  गरीबांचे जीवन चितारले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात लढणा-या वीरांच्या वीरकथा लिहिल्या. येवढायवर न थांबता भटके- विमुक्त यांचेही जीवन दर्शविले चितरले होते . तुरुंगातील अपराध्यांचे  जग सांगितले यात लावणी, पोवाडा, गीते , नाटक, तमाशा , वगनाट्य  किती -किती विविध प्रकार. सर्व सहज हाताळले.कधी न्हवे येवढे साहित्ये एका अशिक्षित चतुर्थ वर्गातील भल्या माणसाने जगापुढे आपल्या उमद्या लेखणीतून विशद करून गेले आहे . 

अण्णा भाऊंनी कथांसोबत ३०  पेक्षा अधिक कादंबर्याथही लिहिल्या. त्यातील ‘फकिरा’, ‘वारणेच्या खोर्याभत’, ‘वैजयंता’, ‘माकडीचा माळ’, ‘चित्रा’, ‘चिखलातील कमळ’, ‘गुलाम’, ‘वारणेचा वाघ’, ‘आवडी’, ‘वैर’, ‘फुलपांखरू’, ‘अलगूज’, ‘रानबोका’, ‘मूर्ती’, ‘संघर्ष’, ‘चंदन’ आदी कादंबर्याा खूप गाजल्या. त्यापैकी सात कादंबर्यांअवर चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ सारख्या कादंबरीला १९६१ साली राज्यशासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला.

तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही या कादंबरीची प्रसतावना लिहिली व कादंबरीचे कौतुक केले होते . अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे.आणि पुढे अण्णा  वद्ले “जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज भीमराव ”.... 

फकिरा  कादंबरीत भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना व दलितांना वाटप करणार्याे मांग समाजातील ‘फकिरा’ या लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वारणेच्या खोर्याूत’ या कादंबरीत १९४२  च्या चले जावच्या स्वातंत्र्यलढ्याचे व स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणार्यांंचे चित्रण आहे. तर ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीत सावकार-जमीनदार व ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या शोषणाविरुद्ध लढा पुकारणार्या२ ‘सत्तू भोसलेचे’ प्रत्यकारी चित्रण  अण्णा ने खूप प्रभावशाली केलेलं आहे. 

अण्णाभाऊंनी महात्मा जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व प पू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या तमाशा-लोकनाट्यातून पुढे नेली.या दोन महान नेत्यांचा संगम आपल्या साहित्यातून प्रखरपणे मांडला  आहे .अण्णा भाऊ हे  मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशीय कक्षा रुंदावन्यात येशस्वी झाले .जगात याचा परिणाम असा झाला की  अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी व हिंदी, रशियन, फ्रेंच, आणि झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादीत झाले.आणि जगात त्यांच्या साहित्याला झळाळी मिळाली . 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णाभाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि अण्णाभाऊंचा ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.

या अफाट लिहलेल्या साहित्याच्या जोरावर त्यांचेवर  अण्णा भाऊ साठे कोण ? आणि  यांच्या साहित्यावर मातबर साहितीक मंडळी ग्रंथ लिहू लागले. हा  निरक्षर माणूस साहित्याचा आधारवाड आज १८ जुलै ला आजरामर झाला . 

*त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!*

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्य...