Friday, July 22, 2022

जिंदगी के साथ भी! जिंदगी के बाद भी!!

#जिंदगी_के_साथ_भी 
#जिंदगी_के_बाद_भी 

एक काळ होता लोकांना सरकारी नोकरी असणे म्हणजे दिव्य होते.काळ बदलत गेला हळू हळू लोकांना सरकारी , निमसरकारी,खाजगी नोकऱ्या मिळू लागल्या.

मग लोकांनी एकच नाही तर जोडधंदा म्हणून दोन नोकरी करणे,अर्धवेळ काम करणे आणि मुला बाळांसाठी ,त्यांच्या शिक्षणासाठी नोकऱ्या करू लागले .हळू हळू स्त्रिया शिक्षित झाल्या आणि त्याही चुली ओलांडून शाळा ,कंपनी, कार्यालय ,दवाखाने जिथे मिळेल तिथे नोकरी आणि नोकरी.मग कुठं काम तर कोठ  नाही.कुठं एक पगार तर कुठे दोन ते तीन पगारदार झाले,मिळकती वाढत गेल्या.

वर्गवारी चा विचार करता मध्यमवर्ग LIC या एकाच ठिकाणी महिना काठी जुजबी पैसे गुंतवू लागला.या पॉलिसी यवढ्या जोमात आल्या की एखादे छोटेखानी कर्ज हवे तर तुमची LIC पॉलिसी काढली आहे का ? हा हमखास  सवाल.मग ही पॉलिसी असेल तर नक्की १६ते १८ टक्के दराने तुमच्या पदरात कर्ज.

हळू हळू यवढ्या बाजारात विमा कंपन्यांचा  सुळसुळाट झाला की ,गल्ली बोळात शाखा आल्या,मास्तर, नोकरदार आणि तत्सम कामगार हे या विमा कंपनीचे बकरे झाले.यांनी सुरुवातीला आपल्याच घरात,मित्राला ,आणि जवळीक ठेवत असलेल्या व्यक्तींना असे गंडवले की आकडा सांगता येणार नाही यवढ्या ,ग्रामीण,शहरी आणि निमशहरी भागात अगणित  विमा उतरवल्या गेल्या...

यात मग पॉलिसी ही कांहीं दोन तीन वर्षात नाही मिळत ? तब्बल २०वर्ष म्हणजे २तप.आता या दोन तपात काय सावळा गोंधळ झाला असेल? ते पहा . 

ती आकडेवारी वेगळी?.१० टक्के बंद पडल्या १०टक्के हरवल्या,१०टक्के गहाळ झाल्या.१०टक्के लोकं मेली.१०टक्के क्लेम करू शकले नाहीत.१०टक्के २००५ च्या अतिवृष्टीमुळे  वाहून गेल्या.१० टक्के चुकीच्या पत्त्यामुळे ,घर बदली मुळे,शहर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित  झाल्याने हातच्या निघून गेल्या. या एकूण ७०टक्के गुराळा प्रमाणे नांद भरून वाहून गेल्या.

आता उरल्या त्या २०वर्ष काळासाठी वेशीवर टांगलेल्या.किंवा आपण त्यांना घोंगड्यागत भिजत पडल्या असे म्हणू या. परिपक्व झाल्यावर किती मिळणार तर २ जेमतेम दोन लाख (ते विम्यावर निर्भर करते आहे). हातात मिळतात.तेंव्हा एक तर तुम्ही सेवा निवृत्त झाले असणार .मग हे वीस वर्ष जमा केलेलं  धन काय कामाचे? कुणासाठी?

तात्पर्य ही रक्कम कुठे इतरत्र गुंतवली असती तर नक्कीच २० लाख मिळाले असते.जसे शेअर मार्केट,मुचूवल  फंड,स्टोक्स,असे आणि अनेक प्लॅटफॉर्म आहेत ते सामान्य लोकांना माहिती नाहीत.याच गोस्टिचा  फायदा घेत २०वर्ष गळफास लावून LIC ने पैसा उकळायला सुरुवात  केली आणि अजून हे सत्र  चालूच  आहे.

आज मितीला LIC कडे जो फंड क्लेम केला नाही तो २१,३३६ करोड आहे.हा कोणाचा पैसा आहे? सरकार चा की रिजर्व  बँकेचा? अहो तुमच्या  आमच्या घामाचा पैसा तो . 

आज सर्व सामान्ये गरीब ,भूमिहीन शेतमाजुर  वर्गाच्या गळ्यात डिजिटलच्या फांदात  ज्यांना खायला पैका नाही त्यांची बँक खाती काढून पैसा मग ते शून्य खाती असो की न्यूनेतम  ठेवी असो .पण पैसा एकंदरीत बँकेत तर जातो आहे.माणूस एकंदरीत खंगाळून रीता होत चालला आहे,हे सत्ये नाकारता येणार नाही . 

मी लिहलेला हा  लेख  कांहीं संशोधन अहवाल नाही फक्त मी एक सामान्य विमाधारक म्हणून जिवाच्या आकांताने लिहले  आहे." जागो ग्राहक जागो " या युक्ति प्रमाणे . 

समजा एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सेवेत विमा कंपनी कडे पैसा भरला आणि आता तो विश्रांति इछितो  ,त्याला सेवानिवृत्ती नंतर तरी, सुखाने त्याचे  जीवन जगू द्या.
त्याला आर्थिक विश्रांति हवी आहे ,आर्थिक सुब्बता नको. 

आज शरमेची बाब अशी आहे की ,तुम्ही निवृती नावाचा प्लॅन घेऊन आला आहे.म्हणजे त्याने मसणात  जाई पर्यंत विम्याचे पैसे भरायचे? का  आणि कोणासाठी ? हे थोतांड बंद झाले पाहिजे असे तुमला का वाटत नाही ?.

आज मितिला असलेला तुमचा Unclaimed Mony ' मार्गी लावा. भूकबळी,विधवा,अशिक्षित मुले, शाळाबाह्य लेकरे,पडीक शाळा इथे कामी येऊ द्या.

विमा मग कोणताही असो !दूर राहा.त्यात कोणाचे कल्याण आहे,जसा पाण्यात कासव ठेवला की घरात पैसा राहतो.पण तो पैसा काचेचा कासव विकणाऱ्या मालकाच्या घरात जातो आहे,तुम्ही आज मितिला  रीते आहेत.देशात अगणित विमा कंपन्या अब्जावधी मालमत्ता कमाई करून बसल्या आहेत.तेंव्हा दूर राहा ,आणि मानसिक तणावातून सुटा.

प्रा.बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई ७०६

Tuesday, July 12, 2022

कॉ. अण्णा भाऊ साठे

*संपूर्ण जीवन संघर्ष जगलेला माणूस – कॉ. अण्णा भाऊ साठे.*
“अखेर ज्ञानेशाची ,तुकयाची ,तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा ,तीचं भंडार लुटून ‘फकिरा ’वर उधळून त्या दोन ओंजळीची फेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे . (कैफियत ‘फकिरा ’)”
..................कॉ. अण्णा भाऊ साठे 
माणसाला जीवन जगण्याचे कळलं की तो संघर्ष करीत असतो. मानवाचे संपूर्ण जीवन समजून घेतल्या नंतर , आयुष्याची उपेखा (उपेक्षा ) कधी संपलेली दिसत नाही . जीवनाची फरफट कधी थांबलीच नाही . या सगळ्या गोष्टीला फाटा देत जीवन पटलावरून आपल्या आयुष्याच्या पथावरुन कॉ. अण्णा भाऊ साठे कायम चालत राहिले . 
उपास पोटी जीवन जगत असताना कधी पोटाला भाकरी मिळाली तर कधी अर्धपोटी पाणी पिऊन जीवन काढले . असे जिणे जगत असताना ते कधीच अशा जीवनाला बळी पडले नाहीत . उमेदीच्या काळात चिराग नगर मुंबई येथे वास्तव्यात असताना तेथील घाणीत आपली लेखनी तेवत ठेवली . अशा जीवन फुलवणार्याध लेखकाचा १ ऑगस्ट दर वर्षी प्रमाणे येणारा जन्मदिन . 
गेली कैक वर्ष आपण मोठ्या थाटामाटात  कॉ. अण्णा भाऊंची जयंती साजरी करत आलो  आहोत आणि पुढे ही करणार आहोत . सुरूवातीचे दिवस त्यांचे खूप हलाखिचे होते . कोळश्याच्या खाणीत काम करत आपले दु:ख गाठी बांधून ढस्सा ss ढस्सा ss रडले . असे असतांनाही आपल्या दु:खचा कुठे उल्लेख न करता त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनाला सुरुवात केली . 
जीवनात कितीही संकटे आली तरी जीवनापासून कधीही दूर पळायचे नाही उलट दु:खाचा स्वीकार करून जीवन कसे आनंदाने जगायचे हे सूत्र घेऊन ते जगत राहिले . संपूर्ण कृष्णकाठ पालथा घालून तिच्या कडे कपार्याातून फिरत राहिले .यातून त्यांच्या पोटाला अन्न मिळेनासे झाले म्हणून त्यांनी जीवाचे रान करून जिवाची मुंबापुरी गाठली . 
नशीब आजमावण्यासाठी खर्याप अर्थाने मुंबापुरी गाठली तरी तिथे ही त्यांची तीच गत झाली . अशात ते इथे एकटे पडले ,तेंव्हा तर आभाळच कोसळलं तेंव्हा अण्णा भाऊंच्या जीवनाला कुठेच आधार मिळेना . या महान साहित्यिक  माणसाने आपल्या जीवनाला वळण देण्यासाठी शाहीरीचा साज चढवला . स्वत:चं दु:ख विसरून समाजाचे मनोरंजन आणि विचारांचे परिवर्तन करीत ते आपले जीवन जगले . 
आपल्या वाट्याला आलेले दु:ख धारदार लेखणीच्या माध्यमातून जगापुढे मांडले . आख्या मानव जगताला लाजवेल अशी साहित्य  निर्मिती केली . ‘ना पोटाची खात्री ना जिवाची’ तरीही ते निरंतर साहित्य लिहीतच राहिले . 
कष्टकर्याज उपेक्षित दिंनदुबळ्या लोकांचे दु:ख साहीत्यातून ते मांडत राहिले. एवढे असून ही त्यांनी आपले उत्तम प्रकारे मानवी मनाला हुल देणारे ‘जग लौकिक साहित्य’ निर्मिती केली .
प्रतिभेला रंग ,रूप ,वर्ण ,वंश जातपात यांची कुंपणे नसतात . कॉ.शाहीर अण्णा भाऊ साठे हे त्यातील एक उदाहरण होय . ते जसे ‘जगले त्याला जागले’ तेच त्यांनी लिहलं . म्हणूनच साहित्यात त्यांचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अण्णांच्या  लिखाणाचे मूल्यमापन  करणारे लिखाण 
वर उल्लेख केल्या प्रमाणे वाटेगावाहून मुंबईत आल्यावर ते कसे जगले हे सर्वश्रुत आहे. तरी पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमर शेख ,गव्हाणकर यांनी जे वादळ उठवले ते वंदनीय आहे . इथे कादंबरीकार म्हणून आपले स्थान निर्माण केले .त्यांच्या कादंबरीलेखनाला  सन १९४८ सुमारास खरा प्रारंभ झाला . 
वाटेगाव परिसरातील निसर्गाची रौद्रगंभीरता ,त्या पहाडी जीवनातल्या बेगुमान अशा बलदंड पुरुषाचे व कमनीय बांध्याच्या रूपयौवन तरुणीचे जीवन संघर्ष हे त्याच्या कादंबर्याबत उतरत गेले . जसे-जसे ते लिहीत गेले तसे - तसे ते साहित्य निर्णायक झाले . त्यांच्या मृत्यू (१९६९) नंतर ते मराठी साहित्यातील दुर्दम्य वादळ ठरले . एकंदरीत ३२ उपलब्ध कादंबर्याा पैकी जनसंस्कृतीला देऊ केलेला वसा महान आहे . वारणेच्या खोर्याात ,वारणेचा वाघ ,आग्निदिव्ये,आघात ,आवडी ,रत्ना, चंदा ,राणगंगा ,फुलपाखरू , ,वैजयंता या आहेत . 
परंतु अण्णा भाऊंनी ज्या सातत्याने  आणि निकराने व निर्णायक रीतीने उपेक्षितांचे जीवनसत्य रंगविले त्याला जगात तोड नाही . 
चित्रा ,माकडीचा माळ ,संघर्ष ,फकिरा ,वैजयंता या त्यांच्या पाच कादंबर्यान आहेत . या कादंबर्या. मधून याची निश्चित साक्ष मिळते . 
माटुंगा लेबर कॅम्प च्या नाक्यावर इराण्याचे ‘लेबर रेस्टोरंट’ नावाचे हॉटेल होते. हा त्या परिसरतील सगळ्या राजकीय पक्षाचा अड्डा होता . या हॉटेल च्या बाजूला ‘एक्सत्रेला बॅटरी’ नावाची कंपनी होती . तिच्या बाजूला एक झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीत अण्णा भाऊ राहत होते . अण्णा भाऊना इथून दलित चळवळीत आणण्याचे काम कॉ.डॉक्टर नारायण पगारे यांना जाते . कारण पगारे यांचे समोर आंबेडकरी चळवळ होती . हीच जागा होती जिथून अण्णा भाऊ साठे आंबेडकरी चळवळीचा एक हिस्सा होऊन गेले होते .  
आंबेडकरी जलशाचे मातृस्थान हे सत्यशोधकी होते .लोकांपर्यंत हे कार्ये पोहचवण्याचे काम याच जलशातून झाले होते . या काळात दलित चळवळ उभी करण्यासाठी अनेक जलसे उदयास आली . जगताप भालेराव ‘जलसे’ यात प्रमुख होते . या जलशातून दलित चळवळ उभी केली गेली लोकात जागृती निर्माण करण्यात आली .कारण त्या काळात तशी दलितांची वृतपत्रे नव्हती . या उलट असे होते की प्रस्थापित वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेबांना ,त्यांच्या चळवळीना प्रसिद्धी देत नव्हते किंवा विकृत स्वरुपात देत होते .हे जिकिरीचे कार्य अण्णा भाऊंनी त्या काळी जलशातून मोठ्या उमेदीने पार पाडले .  
अण्णा भाऊंनी पोवडे ,लावणी ,गीते ,कथा ,कादंबरी ,प्रवासवर्णने, नाटक ,लोकनाट्य असे विविध प्रकार हाताळले आहेत . वैचारिक बांधिलकी हे अण्णा भाऊंच्या लिखाणाचे मूख्य सूत्र होते . 
एकूण १५ पोवाडा व लावणी ,१० लोकनाट्य ,८ प्रवासवर्णन ,२३ कथा ,३२ कादंबर्याो अशी अमाप साहित्यसंपदा लिहणार्याव कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा ,मराठी साहित्याचा इतिहास पाहील्यास अण्णा भाऊंना योग्य तो न्याय दिला गेला नाही याची उरी खंत आहे . 
----बी.आर. शिंदे ,नेरूळ ७०६

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...