Saturday, June 25, 2022

दलित पँथर चे ५०वर्ष पूर्ण

*पॅन्थर सारखा नवा झंझावात परत आला पाहिजे.* 

.....तो सर्वकष क्रांतीची हाक देवून समग्र परिवर्तनवाद्यांना सोबत घेवून ती  लढाई लढला होता.
म्हणून आज सगळे आप आपल्या चुली मांडून बोके, वाघ बनू पाहत आहेत .
तो संघर्ष ,तो वनवा पुन्हा  पेटला पाहिजे .मरगळलेला  काळा कुट्ट लाल लाल डोळ्यातून आग ओकणारा पँथर.

संघर्ष कोणामुळे झाला ? संघर्ष कोणी केला आणि आज त्याची फळे कोण खात आहेत? याची विचारणा कोणी  आज पँथर या पथावर दिसत नाही?
गोस्ट पँथर ची आहे ..

"ब्लॅक  पँथर ' चळवळीबद्दल  हे अमेरिकेतून आलेल एक  वादळ . ती तरुण बंडखोर विचारवंतांची चळवळ होती. हाच धागा पुढे घेत  दलित पँथरची सुरुवात इथ झाली," 

दलित पँथर या भारतातील पहिल्या आक्रमक दलित युवा संघटनेच्या तीन संस्थापकांपैकी एक.

नुकतेच  २०२२ हे वर्ष त्याच्या स्थापनेपासून ५० वे वर्ष पूर्ण होत आहे . म्हणून कैक दिवसाने मला ही लिहण्याचा मोह टाळता आला नाही आणि मी ते पूर्ण केल . 

हे सर्व सुरू झाले ते वर्ष १९७२. सर्वच वर्षे हजारो लोकांच्या स्मरणात राहण्याचे भाग्य नाही. पण १९७२  वेगळे अंगाने स्मरणात राहणारे  होते. कारण भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाली होती आणि तरुण आणि विद्यार्थ्यांच्या चळवळी जगभर रस्त्यावर उतरल्या होत्या. मुंबईतील तरुणांनीही, विशेषत: दलित चळवळी (फक्त बौद्ध ) विषयी  जगभरातील संघर्ष आणि निषेधांबद्दल जग जागृत झाले  होते.

भारतात होत असलेले संघर्ष हे जगभरातील संघर्षापेक्षा  फारसे वेगळे नव्हते. भारत इंग्रजांपासून मुक्त झाला खरा , परंतु अत्याचारांपासून, लोकसंख्येच्या मोठ्या भागावर झालेल्या वाईट वागणुकीपासून नव्हे. दलित ,मागास आणि आदिवासींना उच्चवर्णीयांकडून सर्वात वाईट प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत होते. हाच धागा पुढे सारत दलित जागा झाला होता . 

अकोल्यातील ढाकळी येथे दोन दलित बांधवांचे डोळे गावातील उच्चवर्णीय लोकांनी फाडून टाकले होते. याच सुमारास परभणीच्या ब्राम्हणगाव गावात एका दलित महिलेची विवस्त्र परेड करण्यात आली. पुण्यातील बावडा गावाने दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकला होता. ही सर्व प्रकरणे मुंबई आणि पुण्यातील तरुण, नवसाक्षर दलित तरुणांना चिथावणी देणारी ठरली आणि चळवळ आणि बळकट झाली . 

 मग हे तरुण कोण होते? त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि प्रसिद्ध नेते  #नामदेव_ढसाळ.  या बंडखोर  कवी मनाच्या चित्याने आपली डरकाळी फोडली  आणि दलित बांधवाच्या प्रश्नाला वाचा पडली  होती . 

गोलपिठासारख्या त्यांच्या कवितांनी भारतभर लक्ष वेधून घेतले होते. त्याची शैली चुंबकीय आणि प्रक्षोभक होती. स्वतः दलित असलेल्या नामदेवने मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवली. 

#राजा_ढाले हे देखील संस्थापक त्रिकुटाचा अग्रभागी होते. ते एक तरुण लेखक, विचारवंत आणि बोलका म्हणून ओळखले जाणारे होते. साधना या मराठी साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या लेखाने राज्यातील अनेकांची सदसद्विवेकबुद्धी ढवळून काढली. 

त्यांनी विचारले की या 'स्वातंत्र्या'चा आम्हा दलितांना काय उपयोग ?  "या तिरंग्याचं काय करायचं?" स्वातंत्र्याला २५ वर्षे उलटूनही दलितांच्या जीवनात सुधारणा होत नसल्याचा प्रश्न त्यांनी आपल्या लेखात केला आहे. या लेखामुळे बराच गदारोळ झाला आणि महाराष्ट्रात पूर्णपणे नवीन वाद सुरू झाला.

या चळवळीची धार ,खरी मेख आणि वादळ , त्यांना मिळाले हत्तीबळ कुठून मिळाले असेल तर ते होते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

डॉक्टर आंबेडकरांनी १९५६ मध्ये जगातील पवित्र बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी धर्म बदलल्यानंतर, त्यांच्यानंतर आलेली पिढी ही दलितांमधील पहिली साक्षर पिढी मानली होती. जी कोणत्याही समाजात आज तागायत दिसत नाही ,( कोणत्याही समाजा माझे वैर नहीं ,की त्याना कमी लेखने नहीं ) जी फक्त बौद्ध धम्मात मला तर दिसते आहे . याच  पिढीचे प्रतिनिधित्व #नामदेव_ढसाळ , #राजा_ढाले  आणि #दया_पवार यांनी केले. 

"सरकारी नोकऱ्यांमध्ये दलित आणि आदिवासी जागांची कमतरता आणि नवीन शिकलेल्या दलित तरुणांना विविध पदांवरून नकार दिल्याने स्पष्टपणे दिसत होते. विशेषत: मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील तरुण अस्वस्थ झाले होते आणि त्यांना या भेदभावाविरुद्ध उभे राहायचे होते. दलित पँथर बलाढ्य व्यवस्थेला सामोरे जाण्याचा त्यांचा मार्ग होता," हे सर्व जे.व्ही. पवार त्यांच्या पुस्तकात आपणास वाचण्यास मिळेल. 

दलित पँथरने स्थापनेनंतर जाहीरनामा आणला. "आम्हाला ब्राम्हण भागात जागेची गरज नाही. आम्हाला संपूर्ण भारतातून सत्ता हवी आहे. आम्ही माणसांकडे फक्त व्यक्ती म्हणून पाहत नाही. आम्ही व्यवस्था बदलण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला समता हवी आहे . आम्हाला विश्वास आहे की आमच्यावर होणारे अत्याचार बदलून थांबणार नाहीत. हे त्या त्रयी चे समतोल विचार होते . 

आम्हाला अत्याचारी वर्गाच्या  विरोधात उठावे लागेल, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. यामुळे भांडवलशाही शक्तींविरुद्धही स्पष्ट भूमिका घेतली; (इथे रशियन राज्यक्रांति अभिप्रेत नाही ). भांडवलशाही शक्तींचा पराभव केल्यावरच न्याय आणि समानता येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

दलित पँथरचा राष्ट्रीय राजकीय तसेच सामाजिक परिदृश्यावर मोठा प्रभाव आहे. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम – दलित राजकारणाला उत्तर भारतात नवीन उंचीवर नेणारे – दलित पँथरपासून प्रेरित होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. 

एकदा नामदेव ढसाळांनी दैनिक सामनामधील त्यांच्या स्तंभात लिहिले होते, "काशीराम आम्हाला पुण्यात भेटायचे. त्यावेळी ते सायकलवरून यायचे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील जातीय राजकारणातील मतभेदांवर आमची प्रदीर्घ चर्चा झाली." (त्याचा 'सर्व काही समस्थी' हा स्तंभ मराठीत उपलब्ध आहे.)

१९७७ पर्यंत दलित पँथरमधील मतभेद विविध पातळ्यांवर उदयास आले आणि प्रकट झाले. त्या वर्षी, रामदास आठवले – जे आता भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत – प्राध्यापक अरुण कांबळे, एसएम प्रधान, प्रेमकुमार शेगावकर आणि इतरांनी ‘भारतीय दलित पँथर’ सुरू केले.इथेच गोची झाली आणि मूळ विचारसरणीच्या मुद्द्यावरील मतभेदांचाही संघटनेला फटका बसला. 

ढाले सर आणि त्यांच्या समर्थकांनी विश्वास ठेवला आणि नामदेव ढसाळ हे कम्युनिस्ट समर्थक असल्याचा आरोप केला. पुढे महाराष्ट्रातील दलित राजकारण अनेक पक्ष, संघटना आणि गटांमध्ये विभागले गेले. 

१९६६ नंतर काय झाले ते सर्वश्रुत आहे. परंतु या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या आणि भारतीय सामाजिक आणि राजकीय परिदृश्यात दलित पँथरचे महत्त्व आणि योगदान कमी होताना दिसून येत नाही . जसे सोन्याचे कैक तुकडे केले तरी त्याची किमत कमी होत नाही तीच आजची सध्ये परिसतिथी आहे . 

खर्‍या मनाने "पँथर हा भेदभाव, अन्याय, अत्याचार आणि फॅसिझमच्या विरोधात होता हे नाकारता येणारे नाही .  आजची परिस्थिती काही वेगळी नाही भारतभरातील विविध दलित संघटनांमध्ये पँथरचा आत्मा दिसून येतो. 


दलित पँथरने सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रात एक स्थान निर्माण केले आणि ते कोणीही नाकारू शकत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे आणि जाणकार लोकांचे मत आहे. "दलित पँथर प्रामुख्याने एक राजकीय चळवळ होती. परंतु त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सांस्कृतिक कर्तव्यांची चांगली जाणीव होती. 

कविता आणि कादंबरी आणि नंतर नाटके, पथनाट्य आणि इतर कला प्रकारांच्या माध्यमातून दलित पँथरने तत्कालीन तथाकथित मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक चळवळीला आव्हान दिले. राजकारण केले आणि निर्विवाद समांतर चळवळ या देशात उभी केली ,निर्माण केली. जे कोणत्याही सामाजिक वर्गाला इथे जमलेले नाही . 

ही चळवळ इथेच न थांबता  या चळवळीने दलित आणि कामगारांना ही मोठ्या प्रमाणात स्थान दिले. ही दलित पँथरची सर्वात उल्लेखनीय कामगिरी आहे,  असे मला निक्षून वाटते 


आजच्या महाराष्ट्रीयन तरुणांसाठी, विशेषत: दलित तरुणांसाठी, पँथर ही एक प्रतिष्ठित चळवळ आहे. आणि पुढे ही असणार आहे . 

 "महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर  जर कोणी  दलित तरुनाना ऊर्जा  दिली असेल ते एकच नाव घेता येईल - 'दलित  पँथर'

आज ही माझ्या सारख्याला  हे नाव स्मरण झाले की मी  तरुणांना पुन्हा ऊर्जा देण्याचे कार्ये करीत असतो तो इतिहास सांगत असतो . 

आज जेव्हा फॅसिझम वाढत आहे, तेव्हा भारतभरातील तरुण दलित पँथरच्या इतिहासाची उजळणी करून संघटन कसे बनवायचे, स्वतःच्या हक्कांसाठी कसे लढायचे, हे जर कुठून शिकायचे असेल तर एकच नाव घ्यावे लागेल ते म्हणजे - #दलित_पँथर

हेच  तरुणांना एकत्र आणण्याची आणि त्यांना फॅसिझमच्या विरोधात लढण्यासाठी तयार करण्याची संधी फ्लॅट फॉर्म किंवा फोरम म्हणता येईल . 


नोट - या लेखातील माझे स्वतंत्र विचार आहेत . मी एकदाच जे व्ही पवार सर यांना भेटलो आहे . तिथून प्रेरित होऊन कांही पुस्तकं वाचून हा माझा लेख मी प्रसार माध्यमांवर लिहाला आहे . जर कोणी शेअर करीत असेल तर माझे नाव वगळू नये ही आग्रहाची विनंती .

आज ही चळवळ जरी विखुरली असली तरी मानवी मनाला कलाटणी देणारी चळवळ महणून बघतो आहे . कारण आजच्या काळात याचे बहुजन वर्गात मोलाचे स्थान असायला कोणाची हरकत नसावी . कारण आजचा दिसणारा समाज याच चळवळीचे देणे आहे . 

                    -----बी.आर. शिंदे ,नेरूळ (प) नवी मुंबई -७०६ 

प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडेल - ९७०२ १५८ ५६४

शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर

*समाजक्रांतिकारक राजर्षी  शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* 

“ तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ,हयाबदल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो . माझी खात्री आहे की , डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत . इतकेच नव्हे  तर एक वेळ अशी  येईल की ,ते सर्व हिंदुस्तान चे पुढारी होतील ,असे माझी मनोदेवता मला सांगते आहे.”
--------- *राजर्षी शाहू महाराज*
आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती . मागासलेल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९२० या आपल्या वाढदिवस प्रसंगी आरक्षणाचा जाहीरनामा काढून एक अप्रतिम अशी भेट करविर संस्थानच्या प्रजेस दिली . 
कागल चे अधिपति जयसींग उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महाराज हे पुत्र . त्यांच्या आई राधाबाईसाहेब यांच्या पोटी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला . चौथ्या शिवाजीच्या निधनानंतर  त्यांच्या राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले . 
‘राजा हा खरा जनतेचा सेवक असतो; आपल्याला मिळालेले राजेपद,राजेश्वर्य हे विलासात जीवन कंठण्यासाठी नसून प्रजेच्या कल्याणासाठी आहे, याची जाणीव प्रारंभापासून महाराजांना झाली होती, असे दिसते.’
राजाचे हित त्याच्या स्वार्थसाधनात नसून ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते, हा राजनीतीचा मूलभूत पाठ त्यांचे गुरू स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर व दुसरे गुरू रघुनाथराव सबनीस यांनी विद्यार्थीदशेतील महाराजांना दिला होता. राज्यारोहणापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षण म्हणून आपल्या प्रजेच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी महाराजांनी आपल्या गुरूसमवेत प्रजाभेटीचे दौरे काढले. या दौऱ्यांत खेड्यापाड्यांतील डोंगराळ भागातील गरीब रयतेची दरिद्री अवस्था त्यांनी पाहिली. दाजीपूरपासून पन्हाळ्यापर्यंतच्या दुर्गम भागात हा राजा फिरत राहिला . 
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्य आणि मागासलेल्या लोकांचा उद्धार करणे, हेच आपले जीवित कर्तव्य आहे, असे मानणाऱ्या शाहू महाराजांना महार समाजातील एक तरूण परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन आला आहे, हे समजताच ते स्वत: शोध घेत डॉ. बाबासाहेब राहात असलेल्या परळच्या चाळीत गेले; आणि तेथे त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. एक राजा आपल्याला भेटण्यास आपल्या चाळीत येतो याचे बाबासाहेबांना मोठे आश्चर्य वाटले. महाराजांनी पुढील आयुष्यात डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला साहाय्यच केलेले दिसून येते. शतकानुशतके मूक राहिलेल्या बहिष्कृत समाजाला जागृत करण्यासाठी 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र काढण्याचे जेव्हा डॉ. बाबासाहेबांनी ठरविले, तेव्हा त्यांना पहिले साहाय्य महाराजांनी केले होते.
डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर महाराजांचा विश्वास होता. त्यांच्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा त्यांनी बाळगल्या होत्या. म्हणूनच १९२० साली माणगावच्या पहिल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या बाबासाहेबांना पाहून महाराजांनी उद्गार काढले होते, "तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते आहे. " 
महाराजांनी वर्तविलेले हे भविष्य काळाने अचूक ठरविले. महाराज पुढे म्हणाले होते, “आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे ? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो. 
अश्या थोर विचारवंताची जयंती आहे ,त्यांना नतमस्तक ! थोर कल्याणकारी लोकराजाला मानाचा मुजरा !!

*प्रा.बी. आर. शिंदे ,नेरूळ प -७०६*

Tuesday, June 14, 2022

वोल्गा से गंगा -महापंडित राहुल सांकृत्यायन

वोल्गा_से_गंगा : महापंडित राहुल सांकृत्यायन
हे हिन्दी पुस्तक वाचनात आले  ...

मी पुस्तक खरेदी करून वाचून झालं की माझे काका चालवत असलेल्या वाचनालयात जाऊन भेट देऊन येतो .मोजकी घरी ठेवली आहेत .करण ते पुनःपुन्हा वाचावे लागतात .परत खरेदी नको .त्यातील हे एक पुस्तक होय.

आपण जरी मराठी भाषिक असलो तरी मराठी त लिहलेले वाचत असताना हिंदीत लिहलेले असेल तर ते हिंदीच वाचावे .कारण खरा गुळ आणि खरा पाक कळत नाही ,तेंव्हा काकवी किंवा पाक उसाचा रस लागतो ...हे झाले गुऱ्हाळ .

एक मी पर्वा #हरमन_हेस लिखित 'सिद्धार्थ ' हे पुस्तक खरेदी केलें ,अनुवाद उल्का राऊत यांनी  मराठीत केला आहे ...किती काय काय घुसडतात आणि लिहतात याची प्रचिती येते आणि कीव वाटते .

हरमन हेस जरी साहित्यातील नोबेल पुसरस्कार प्राप्त लेखक असले तरी ,बुद्धावर लिहणे नाही जमले आणि भाषांतर तर विरळच ..असो तो आपला विषय नाही.

जगविख्यात लेखक राहुल संकृत्ययान यांचं १९४२ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक ज्याची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यात संपते .ही लेखक आणि प्रकाशक यांच्या साठी खूप आनंदाची बाब होय.

मी शक्यतो मूळ पुस्तक वाचतो .हे पुस्तक हातात घेतल्यास एक नवीन शब्द मला दिसला आणि मी ती कथा प्रथम  वाचण्याचे ठरवले ...'बन्धल मल्ल' म्हणजे बुद्ध !

शंभर वर्षा पूर्वी ची ऐतिहासिक गोस्ट आहे.तेंव्हा सामाजिक अराजकता समाजात आणि एकंदर देशात मोठ्या प्रमाणावर मजली होती. व्यापारी वर्गाच्या हातात सत्ता होती आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक ,आर्थिक पिळवणूक चालू होती ...

कथा वाचावी !

"राहुल सांकृत्यायन आपल्याला ‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात.

व्होल्गेच्या काठावर राहणाऱ्या या परिवाराचे आयुष्य अतिशय खडतर आहे. शिकारीसाठी भटकणे, नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे आणि सततचे टोळीयुद्ध यांमुळे परिवाराचे आयुष्य संघर्षमय आहे.

२० कथांमध्ये चार रिकरिंग थीमस् म्हणजेच लेईटमोटिफ ठेवले आहेत – सामंतशाही आणि राजेशाही, युद्ध, दासप्रथा आणि स्रीदास्य. व्होल्गातीरावर झालेल्या भारतीय संस्कृतीच्या उगमापासून गंगातीरी झालेला विकास आणि स्थिराव यांचा इतिहास म्हणजे दमनाचा, शोषणाचा, काही लोकांच्या सुखासाठी इतरांचे शोषण करण्याचा इतिहास आहे. 

सांकृत्यायनच्या कथांमधील पुरुहुतु, बंधुलमल्ल, नागदत्त, प्रभा, अश्वघोष, सुपर्ण यौधेय, मंगल सिंह, सफदर, सकिना, शंकर, सुमेर या पात्रांप्रमाणे चांगले लोक असतात, ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, ते बदल काही काळपर्यंत प्रभावी ठरतात पण शेवटी माणसाची भोगलोलुपता जिंकते. असे वास्तववादी चित्र सांकृत्यायनांनी रंगवले आहे. सुमेर या शेवटच्या कथेत सांकृत्यायन यांनी कम्युनिझमचा खुलेपणाने पुरस्कार केला आहे.

संपूर्ण कथासंग्रहच इतिहासाचे मार्कसिस्ट इंटरप्रिटेशन आहे असे म्हणता येईल. गांधींच्या असहकार चळवळीला, कनिष्ठ जातींना ‘हरिजन’ म्हणून ‘आहे तिथेच सडत राहा’ या वृत्तीला सुमेर नकार देतो, आंबेडकरांच्या मर्यादा सांगतो आणि कम्युनिझम हेच समतेचा युटोपीयन समाज प्रत्यक्षात आणण्याचे साधन आहे असे सांगतो. पण ‘इजम’ कोणताही असला तरी मानवी स्वभावातली सत्तेची लालसा, भोगलोलुपता, दुसऱ्याच्या जिवावर ऐश करण्याची वृत्ती मात्र तशीच असते.  पर्यायाने सांकृत्यायनन  काहीच भाष्य केलेले नाही .

लेखक :महापंडित राहुल सांकृत्यायन
पुस्तक वोल्गा से गंगा.(हिन्दी)
कीमत ::२५०/-
पुनर्मुद्रण: 2022
वितरक : किताब महल ,दिल्ली०२
प्रकाशक : किताब महल ,दिल्ली ०२
प्रा बी आर शिंदे ,विशेष कर्णबधिरांचे शिक्षण . नेरूळ -७०6

एक होता कार्व्हर -लेखिका विना गवाणकर

मी_वाचून_जाणलेला_कार्व्हर. 
                           ----- #मिनण्डर
जगात अश्या जादूगरची वानवा नाही . खरेच एक होता कार्व्हर पुस्तकाचे शीर्षक अनमोल रत्न डोक्टर कार्व्हर चे मोल सांगून जाते . 
बाल वयात बाबा गेले ,आई ला डोळ्या देखत  गुंड लोकांनी पळवून घेऊन गेले . काय झाली असेल अवस्था त्या कोवळ्या वयाची . 
आपल्या हाताच्या लांब बोटांनी जगात शेतीत कोरीव काम केले . दक्षिण अमेरिकेतील निग्रो अनाडी ,वर्ण भेदाने खाईत खुंटत असलेल्या वर्गाचे मर्म जाणून त्यांच्या उभ्या आयूषात सोने भरून काढणारा बालक ,पुढे अमेरिकेचा एक भला मोठा वैज्ञानिक झाला हे नवल वाटायला नको . 

मातीचे सोन करून विविध रंग तयार करणे हे अवघड काम या गाड्याने मोठ्या सीताफीने केले . आपण खाऊन टाकलेल्या भुईमूगच्या शेंगापासून विविध रंग तयार करून दाखवणारा जादूगर . येवढ्यावर न थांबता १३२ प्रकारात शेंगदाणा कसा खावा हे जगाला सांगून गेले . 

डुक्कर खाणारे भुईमूग आणि टोमॅटो ,रताळे अशी भीती आणि चुकीची समज असणार्‍या निग्रो शेतकर्‍यांना ते स्वतः खाऊन दाखवून हजारो प्रयोग करणारा मानव . आणीबाणीच्या काळात बालके दुधावचून मरु लागली ,तेंव्हा हा माणूस थोडाच गप्पा बसणार ? शेंगदाण्यापासून दूध तयार करून हजारो बालकाना जीवदान देणारे डॉक्टर कार्व्हर .... 

शेती वेडा . फूल वेडा . बारीक बारीक कणात आणि दगडात काय दडले आहे याचे कोडे उलगडणारा डॉक्टर . टाकाऊ पासून टिकाऊ कसे बनवता येईल याचे मोलाचे मार्गदर्शन करणारा शिक्षक . 

प्रयोग शाळेत अहोरात्र मरणारा . एकदा काय झाले तर डॉक्टर साहेबांनी एका मोठ्या व्यक्तिला हिरा मागितला . मग काय मॅजिक ,त्या व्यक्तीने कांही एक विचार न करता एक मौल्यवान हिर्‍याची अंगुठी भेट दिली . त्या व्यक्तिला वाटले की ते लगेच बोटात सरकवतील पण झाले ते इपरीत . त्यांनी ती अंगुठी सरळ  आपल्या प्रयोग शाळेत आणून ठेवली . असे का विचारता ते म्हणाले माझ्या मुलांना दाखवण्यास एकच वस्तु माझ्या कडे न्हवती ती म्हणजे हिरा .... असा हिरा माणूस ,शिक्षक मिळेल का जगात ?
जगभरातील असंखे प्रलोभने धुडकावून आपल्या मातीत आपल्या रंजल्या गांजल्या मनसात रममाण झालेया लीलया . 
आपल्या माणसात रमणारा ,उच्चप्रभू लोकात लाजणारा ,बुजणारा वैज्ञानिक डॉक्टर कार्व्हर ... 

डॉक्टर  वाशिंग्टनना दिलेल्या वाचनाला जागत हा भूमिपुत्र अखेरपर्यन्त जगाला आपल्या कर्मभूमीत ,टस्कीगीत त्यांनी अखेरचा प्राण  सोडला .
इकडे भारतात डॉक्टर  बाबसाहेबांनी आपल्या बहुजन लोकांसाठी आणि त्यांच्या उत्थंनासाठी  आपल्या प्रणाची आहुति दिली . तीच गत तिकडे दक्षिण अमेरिकेत आपल्या लोकांसाठी ,निग्रो करिता डॉक्टर कार्व्हर यांची झाली . 

अशी सोनेरी मनं घेऊन जगात जन्माला आलेली साधी  माणसे नसून ते महामानव होत . 

पुस्तक वाचावे . खूप सुंदर माहिती.  वीणा गवाणकर या प्रख्यात लेखिकेने कार्व्हर उभा केला आहे . त्यातील  एक तरी  अंश आपल्या गुणात सामील झाला तर पुस्तक वाचल्याचे भाग्ये मिळेल .. 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे, ,नेरूळ ७०६
(कर्णबधिरांचे विशेष शिक्षण )

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...