Friday, May 25, 2018

लाह्या चा चिवडा : आणि दारूचा अड्डा


लाह्या चा चिवडा : आणि दारूचा अड्डा
शुक्रवार २५, में २०८
हळीचे नाव काढताच बाजाराचे गाव असा संपूर्ण नकाशा डोळ्यासमोर दिसतो .विविध प्रकारचे व्यवसाय  या बाजारात चालतात त्यात दारू का असू नये  हा एक प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही .बाजारात एकंदरीत चार ते पाच ठिकाणी दारू चे दुकान चालत होते .दारूच्या हातभट्ट्या वाम मार्गाने तेरु नदी किनारी बिनदिक्कत चालू होत्या.याच धंद्यावर मालक करोडोत लोळत होते ,हाळी आणि आसपास च्या बारा वाड्यातील गरीब ,मजूरदार आणि भूमिहीन शेतमजूर संकटात होरपळत होती.तरी हा गावठी दारू चा धंदा फार्मात होता .दारू चे अड्डे जरूर हाळीत चालत असतील पण पिणारे बहुसंख्य हांडरगुळी आणि आसपास खेडो पाड्यातील आणि वाड्यातील होते .हे एक अजब रसायन म्हणावे लागेल .
आजही बाजार तीन दिवसाचा असतो  शनिवार ,रविवार आणि सोमवार मिळून .मग बाजारात हौसे गवसे आणि नवसे सगळे येत असत .आणि बाजारात प्रवेश झाल्यावर आणि ओसरत्या संध्याकळी दोन दोन घोट घश्यात टाकून घरचा रस्ता धरीत असत.तर कोणी कोणी सकाळी बाजरात प्रवेश केल्यापासून बोटाला मीठ लावत आणि मटक्या मारीत दुकानाच्या बाहेर पडत .तेंव्हा चेहर्यावर एक गमत दिसायला मिळे ,एकदम विदुषक सारखा इकडून तिकडे चेहरा फिरवत बाजारात प्रवेश करीत .

मी इयत्ता आठवीत होतो. दर रविवारी माझी पण इकडे घरी  एक तयारी होत असे मोठे पातेले घेऊन , त्यात मस्त कांदे परतून  ,हिरवी मिरची ,जिरे, हळद , मीठ आणि  लाह्या एकत्र करून खमंग गर्डेल तयार करून सरळ दारूचा अड्डा गठीत असे .

माझा अड्डा फिक्स होता .आज मितीला दुकानाचे नाव आठवत नाही .तो अड्डा एकदम भर गर्दीच्या ठिकाणी होता,ही आड्यावर गर्दी असायची .हातात खरेदी केलेला भाजी पाला ,आणि मटन घेऊन बाजारू लोक सरळ अड्डा शोधात येत असत .एका हातात बाजाराची पिशवी ,दुसऱ्या हातात दारूचा प्याला .एक दोन घोट पोटात सरकला की मज्जा रंगत असे .यात मजूर आणि  बहुजनांचा भरणा खूप भर होता .ज्यांचे कडे पैसे न्हवते ते बोटाने मीठ चाटून ,मटक्या मारत गावचा रस्ता धरीत असत .

माझ्या पण गर्डेल वर लोकांची ही गर्दी होत असे .फक्त एक रुपयाला मी माझी गर्डेल पुडी विकत असे .
लोकांना मी उदार कधी देलेले आठवत नाही .काय भरोसा आहे ,बेवडया लोकांचा उद्या मलाच मारतील आणि बदनाम करतील ? एक बाका प्रसंग आज आठवतो मला ..
एक वडगाव चा काळा किसन्या नेहमी मला त्रास देत असे ,ए बाल्या दे  की र चिवडा नाहीतर फेकून देईन मी सगळा गटारात .मी घाबरून एक दोन वेळा  दिला पण होता .पण  एका रविवारी मला खूप राग आला आणि  मी त्याला नकार दिला .मी देत नाही हे कळताच त्याने टोपलीत  हात घालून एक मुठभर चिवडा घेतला आणि दिमाखात खाऊ लागला .मी हे बघितलं आणि टोपली कपड्याने झाकून मालकाच्या गल्ल्यावर ठेऊन मी आलो असे म्हणून , कांही न बोलता घराकडे पळत गेलो ,आणि झाला प्रकार माझा चुलता रामू काका यांना सांगितला .लगेच ते आले आणि वडगावच्या काळ्या किसन्याच्या बाजारात शोधून दोन  कानाखाली दिली आणि तो पळत सुटला आणि वडगाव चा रस्ता धरला .तो परत तो कधी त्या अड्ड्यावर आला नाही ,की तो परत मला दिसला नाही .अशी रामू काकाने त्याला अद्दल घडवली होती .
पण अड्ड्यावर कांही लोक खूप चांगल्या स्वभावाची दिसली  ,अक्काबाई  पोटात शिरली ,की इंग्रजी भाषा सुरु करायचे ...
कधी दोस्त ,कधी दुश्मन ,कधी मैत्रीण तर कधी घरातील लोकांची विषय चघळत बसायचे  ,तेंव्हा  हे सगळ बघून आणि ऐकून मजा येई ...

कधी म्हणायचे की ,रंगी मस्त होती यार ,आता दिसत नाही लग्न तर नाही झालं र तीच .तिला एकदा मी उसात घेऊन गेलो होतो.हे सगलं ऐकायला मला मज्जा वाटत होती .अश्या आणि अनेक गोष्टी मी एकल्या होत्या.

संध्याकाळी दोन ते तीन तासाच्या वेळेत मी  जवळ जवळ दिडसे रुपय जमा करीत होतो .आणि कुटुंबाच्या खर्चात हातभार लावत होतो .माझी माय हे बघून हादरून जात होती की हे सगळ मी कसा करतो ?   

@@@

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...