Showing posts with label A FOR AMBEDKAR SERIES. Show all posts
Showing posts with label A FOR AMBEDKAR SERIES. Show all posts

Thursday, August 17, 2023

अण्णाभाऊ यांचे मारे करी .


डोकं ठिकाणावर आहे का?

                      प्रा. बी. आर. शिंदे ; (विशेष शिक्षण ) नेरूळ नवी मुंबई ७०६ .

जसे मला कळते आहे, १९७२ पासून अण्णाभाऊ साठे यांचेवर नुसते फालतू भाषण एकूण थकलो आहे.माझ्या सारखे कैक तोच प्रश्न मनात करीत आहेत.हे सत्य आहे.उठ सुठ सोम्या गोम्या आमच्या कॉम्रेड साहित्यकाराला ,कम्युनिस्ट (Not a Marxist, he was a  Comrade   )  येवढ्या पाण्यात पाहतो आहे की ,आमचा बाप दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न झाला.गरिबी हालाकी मधून दिवस काढले ? पाई चालत मुंबई गाठली.असे अपमानास्पद छातीठोक पणे बोलत असतो आणि ते आम्ही एकून गप्पा ही बसतो . ?

मा . माझी आमदार पी टी कांबळे ते मा. आमदार सुधाकर भालेराव असे अनेक आमदार होऊन गेले पण मला एकच आमदार भावले ते म्हणजे मा. भालेराव सर . 

खूप पोटतिडकीने समाजासाठी कार्य करणारे . 

यांनी कितीही संपत्ति कमवली असली तरी  कमवू द्या . तुमच्या खिशातून देत आहेत का ? शेवटी मांगाचा ढाण्या वाघ आहे . तब्बल दोन वेळा आमदार होणे हे कांही सोप्पे नाही ? 

समाजातील आमदारकिचा इतिहास पहिला तर कुणी  गाणे गावून आमदार झाले तर कुणी अण्णाभाऊ यांची छककड गावून आमदार झाले . माझ्या उदगीर राखीव मतदार संघचे  पहा . अनेक आमदार दिले आम्ही पण मा. भालेराव साहेब यांच्या कार्याला तोड नाही ? खरे आमदार . 

असो तो माझ्या विषय नाही असे म्हणणे हे तेवडेच घातक  आहे . कारण बाबासाहेबाणी सत्तेत जा हे सांगून गेले . म्हणून सत्तेत असताना आपले दु:ख मांडणारे नेते अजून भेटले नाहीत ? ही समाजाची खंत आहे . एक म्हण आहे , साहेबाच्या पुढे आणि मागे जाऊ नये ,नाहीतर तुम्ही संपला म्हणा ,या उक्ती प्रमाणे आपले काम भले आणि मी भला  असतो . 

नेते पुढारी हो ,अरे अण्णाभाऊ कांहीं गरीब नव्हते? त्यांचे कडे शेती होती .शेतकरी होते.शेतीत मशागत करीत होते.पण तिथे त्या शेतीत  त्यांचे मन रमले नाही .गाव सोडून मुंबई ला जाऊ तेथील गरीब ,गिरणी कामगार ,मिल मजूर यांच्या बाजूने आपण लढू संघर्ष करू या वैश्विक हेतूने ते राजधानी मुंबई येथे आले होते.

मला या लोकांचे अजब वाटते आहे.त्या काळात शाळा होत्या का? बहुजन वर्गाला शिक्षण संधी होत्या का? गाव कुसा बाहेरील लोकांना शिक्षण होते का? आरे तुम्ही वेशी बाहेर होते . गावा बाहेर होते . फेकलेली जमात होती ( Read : who where Shudras ? ) तरी म्हणे आम्ही या देशाचे पाइक ? 

ये आझादी झुटी है ,असे सांगणारा माणूस देश स्वातंत्र्य साठी त्या इंग्रज लोका विरुद्ध  का लढेल ? इंग्रज आले म्हणून शिक्षण तुम्हाला माहिती झाले ? नाहीतर पाटलाच्या वाड्या शिवाय दुसरी चौकट माहिती होती का ? 

येथील अश्या वाईट शिक्षणाला तिलांजली देऊन .अण्णाभाऊ 'लोक लढ्यासाठी ' मुंबईत आले.हे सांगायला जमत नाही का ? ते मुंबईत मजुरी करण्यास आले होते का ? असे हिडीस भाषणातून का सांगता . बाळ मनावर काय बिंबवायचे आहे आपणास ? तुम्ही आर एस एस च्या भागवत सारखे का अण्णाभाऊ विषयी बोलत आहेत . याचा अर्थ मी असा घेईन की आपण आर एस एस च्या 'गाय माय चे सेवक'  आणि भक्त आहेत . हे आम्ही आंबेडकरवादी बहुजन खपवून घेणार नाही ? कदापि नाही ? 

कॉ . अण्णाभाऊ समजून घेत असताना कुणी त्यांना वेगळ्या  पदव्या मागत आहेत.ते तर भारतरत्न आहेत.फक्त नाव कोरले गेले नाही.

सूर्याला आरसा कश्याला? अन्याय आणि न्याय यातील फरक समजावण्यासाठी त्यांनी आपल्या समोर ' फकिरा ' सादर केली.तिच कादंबरी महामानव बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांना अर्पण केली.किती मांग लोकांच्या घरात ही कादंबरी आहे?

पर्वा मागच्या महिन्यात मी पुण्यात एक कार्यक्रमात गेली असता एक व्याख्याते यांनी  विचारले की फकिरा कोणी कोणी वाचली आहे? 

फक्त दोन लोकांनी हात वर केला होता? किती शरमेची बाब आहे.एकीकडे अण्णाभाऊ चे गुणगान गाता आणि दुसरी कडे त्यांच्यावर घनाघात करीत आहेत. त्या सभेत लाज वाटली ?

१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट नाच गण्यात तल्लीन झालेली  पिढी ,गुटके बहादुर यातील ,अण्णाभाऊ कोणाला कळले का ? उत्तर हे नाहीच मिळणार आहे ? 

अहो ते डॉक्टर होवू द्या की नाही होवू द्या .आपण त्या डॉक्टर व्यक्तीचे किती साहित्य वाचले आहे? हा बिनीचा प्रश्न आहे . 

अण्णाभाऊ काय? पुतळ्यात  आहेत का? कधीच नाही?

ते त्यांनी मांडलेल्या आपल्या वैश्विक साहित्यात आहेत.कथा कादंबऱ्या आणि ग्रंथात आहेत . त्यांचे साहित्य वाचा . वाचा अण्णा वाचा.तुम्ही वाचा आणि आपल्या येणाऱ्या मुला बाळाणा पण वाचायला सांगा . अण्णा कांही पुतळ्यात मिळणार नाहीत ? 

जसा ३१ अगस्त चा आकडा संपेल तसे मांग समाजाच्या घरा दारात मातीचा ,थर्माकोल चा गणपती विराजमान होईल? काय घनघोर अपमान आहे त्या महानवाचा महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब ,शाहू महाराज आणि आण्णाभाऊ साठे यांनी कुठे आपणास त्यांच्या साहित्यात घरात गणपती बसवण्यास सांगितले आहे का? किती छळ कपट करीत आहेत त्या मानवांचे.

यांचे पाइक म्हणून मिरवत असताना आपल्याला लाज वाटली पाहिजे . ज्या मंडपात महानवाच्या जयंत्या उभ्या केल्या त्याच मांडवात गणपती आणून बसवता ? लाज कशी वाटत नाही आपणास बहुजन  समाजाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून समाजात मिरवत असताना . समाजाची किती दिशाभूल करीत आहेत . समाज आपणास माफ करणार नाही ? याद राखा !

अण्णाभाऊ यांनी गण आणि गणपती गवळण मोडीत काढीत आपले ' आदी जनाला ' हा झांजवत आपल्या लाल बावटा पथका मार्फत जनमनात पेरला.हे आपणसा कसे कळत नाही ? त्यांना गणपती ची आराधना केलेल कधी कुठे पुरावे असतील तर द्या आणि खुशाल घरात ,घरावर ,अंगणात जिथे जागा असेल त्या जागेवर गणपती बसवा . किंवा डोक्यावर घेऊन खुशाल फिरा ? 

हे सांगण्यास आपणास लाज वाटते.म्हणे अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत? 

हो अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत ? नाही जाउद्या , पण परत परत किती वर्ष गुरळ ओकणार आहेत . ? याद राखा खूप मोठी गफलत करीत आहेत. उद्या येणारी पिढी आपल्या तोंडात  शेण फेक्तील?

आपले अण्णाभाऊ तर शाळेत गेले नाहीत? मग मी शाळेत जाऊन काय करू? असे जर आपले मुले विचारतील तर ,तेंव्हा उत्तर तयार ठेवा.? 

काळ बदलत गेला.डॉक्टर बाबासाेबांबद्दल माहिती आहे का?

परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन आले? राज्य घटना लिहली  असे एवढेच सांगितले जाते. पण तसे नाही ? 

त्यांनी संघर्ष केला आणि त्यातून दलित उठावाच्या ठिणग्या पडल्या , सारा आसमंत पेटून उठला.गुलामी चे साखळ दंड तुटले माणसे ,दलित स्वतंत्र  झाला ,हवा मोकळी झाली.

याचा धागा पुढे रेटीत अण्णाभाऊणी जग बदलाची धार आणि कवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कडे झुकती केली .अर्पण केली . ते आंबेडकरवादी होते ? ते तसे नसते तर त्यांनी 'जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज कार्ल मार्क्स राव ' असे कवण नाही का गायीले असते ? 

प. पू. डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊ यांना तेंव्हा कळले त्या काळात कळले ,पण आज आपणास का कळत नाहीत ? या मागचे गौडबंगाल कळायला हवे . 

जगभरात ख्याती असलेले अण्णाभाऊ जगाला काळले ,कारण त्यांनी त्यांचे साहित्य वाचले . आपण त्यांचे साहित्य वाचलेच  नाही ?  तर कळतील कसे ?










 

Saturday, June 27, 2020

राजर्षी : राजा शाहू महाराज

राजर्षी : राजा शाहू महाराज

हिरे ,माणके ,सोने उधळा ,जयजयकार करा

जय राजर्षी,शाहूराजा ,तुजला हा मुजरा !


-सूर्यकांत खांडेकर  

शाहू तेरा मिशन अधुरा बी एस पी करेगी पुरा –कांशीराम

(कोल्हापूर येथे एतीहासिक आरक्षण चळवळ शताब्दी महोत्सव छ.राजर्षी शाहू महाराज जयंती समारोह .)

हिंदुस्तान च्या प्राचीन इतिहासात विश्वमित्र व जनक या दोघांना ‘राजर्षी’ महणून गौरविले गेले होते . त्यानंतर त्या मालिकेत ‘राजर्षी’ ही पदवी विभूषीत करणारे करविर (कोल्हापूर ) संस्थान चे अधिपति शाहू महराज हे होत . कागल चे अधिपति जयशिंगराव उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महराज हे पुत्र.

आखील भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद नागपुर येथे ३० व ३१ मे  आणि १ जून या प्रमाणे तीन दिवस श्रीमहाराज राजर्षी  शाहू छत्रपती ,सरकार करविर यांच्या आदधेक्षेतखाली मोठ्या थाटात पार पडली . 

एकूण १४ ठराव पास झाले त्यात ठराव  ६ वा ठराव  – प्राथमिक शिक्षण मुलांना आणि मुलींना मोफत व सक्तीचे शक्य तितक्या लवकर सुरू करावे असा होता . 

यामुळे सक्तीच्या शिक्षणाचा फायदा  तोपर्येंत  पास झाला न्हवता  तोपर्यंत हे वरिष्ठ  वर्गाचे लोक सरकारला नावे ठेवीत होते ,परंतु १९१७ साली हा कायदा मुंबई इलाख्यात पास झाला आणि सकतीचे शिक्षण सुरू झाले.
 (मुकनायक मुंबई ,शनिवार १५ जून १९२०). 

मागास जातीचा विकास करण्यासाठी तळमळ नेहमी असे . त्या समाजाला नैसर्गिक हक्काची जाणीव निर्माण करून देण्यासाठी पहिले धाडशी पाऊल उचलले आणि याचे परिणाम कोल्हापुरात न्हवे तर अखिल महाराष्ट्रात ब्राह्मण वर्गात खळबळ उडाली . याच काळात महाराजांनी बहुजनसाठी अनेक उपक्रम राबवले.
 
राखीव जागांचा जाहीरनामा
अस्पृश्यता – निवारण कार्ये आणि इतर कार्य अलौकिक आहेत.
 
महाराजांचे शैक्षणिक कार्य –

मा. फुले यांनी मागासलेल्या दिनदलित अश्या बहुजन समाजाला शिक्षणाची संजीवनी दिली आणि समाजक्रांतीचा आरंभ केला . तोच समजक्रांतीचा वारसा  सांगितलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी चालू ठेवला . बहुजन समाज शहाणा कारायचा असेल तर शिक्षणाची गंगोत्रि खेड्यापाडतील गोरगरिबांच्या झोपडपट्टीत गेली पाहिजे . समाज शिक्षित झाल्याशिवाय चांगले काय आणि वाईट काय हे उमजणार नाही शिक्षण दिल्यानेच बहुजन समजाचा सर्वकष उत्कृष्ठ होईल व त्यातून उत्तम शेतकरी ,शिक्षक दिल्यानेच बहुजन उत्तम व्यापारी ,उत्तम सैनिक निर्माण होतील परिणाम सर्व समाज संपन्न होईल. 
आपल्या राज्यातील प्रजाजनास किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळाले पाहिजे या एकाच ध्यासातून महाराजा राजर्षी यांनीआपल्या राज्यात ८ सप्टेंबर १९१७ रोजी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जारी केला . एक स्वातंत्र खाते जारी करून ते स्वतः देखरेख करू लागले यात ‘एड्युकेशन डायरेक्टर ’आणि ‘एड्युकेशन इसन्पेकटर’ या अधिकाऱ्याची  नेमणूक केली . जिथे जागा मिळेल तेथे शाळा सुरू केल्या ,समाजातील संपूर्ण वर्गाला या कार्यक्रमात सहभागी केले  . जे लोक आपली मूल शाळेत पाठवत नाहीत त्यांचेवर दंड बसवला आणि तसे कायदे केले  . तीन दिवसाच्या आत मुलांना शाळेत नाही पाठवले तर दंड वसुलीचा कडक कायदा केला . अगदी खालच्या घटकास शिक्षण मिळावे महणून महाराजांनी अविरत प्रयत्न चालवले .त्या काळी शिक्षणासाठी दरवर्षी १ लाख रुपये खर्च करीत होते . इंग्रज सरकार मात्र महाराष्ट्र ,गुजरात आणि सिंध या अफाट प्रसदेशाच्या मुंबई इलाख्यासाठी शिक्षणाचा १ लाख रुपयेही खर्च करीत नव्हते ,हे ध्यानात घेतले की तुलनात्मक दृष्ट्या महाराजचे शिक्षणावरील महत्व लक्ष्यात येते . 
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून महाराजांनी  कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.ज्या आज त्याची फळे चाखत आहेत . 
वसतिगृह हे त्यांचेच नाव जनक म्हणून पुढे येते ,प्रतेक मूल शिकावे म्हणून अनेक वस्तीगुह काढली . अनेक बोर्डिंग ची स्थापना केली ,जातीस शहाणे केले . विविध जातीची एकूण २१ वस्तीगुह स्थापन केली होती . असे वस्तीगुह काढणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर होते . म्हणून कोल्हापूर हे “Mother of Boarding House”  बनल्याचा सार्थ अभिमान महाराजांना वाटत होता . 
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले.
खास स्त्री शिक्षिका तयार करण्यासाठी ‘female Training School’ वर रखमाबाई केळकर या नेटीव्ह स्त्रीस शिक्षण अधिकारी महणून नियुक्त केले होते . शाळेत आलेल्या मुलींना बक्षिश योजना जारी केली . पहिल्या दुसऱ्या येणाऱ्या मुलीस आपली कन्या आककासाहेब महाराज व भावनगरच्या महाराणी ‘नंदकूंवर’ यांचे नावे परितोषिक ही जाहीर केले . 
स्त्री हक्कांचेही रक्षण केले 
स्त्रियांच्या शिक्षण प्रसारा प्रमाणे त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व त्यांचेवर होणार्याक अन्याय ,अत्याचार निवारणासाठी विशेष प्रएत्न केल्याचे दिसून येते . 

१९१७ सालचा विधवा –पुनर्विवाह कायदा ,१९१९ चा अंतरजातीय – विवाह कायदा . बालविवाह विरोध ,अशी अनेक कायदे केले .असा राजा आज होणे नाही . 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे
नेरूळ ,नवी मुंबई -७०६ 

संधर्भ –
समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती – सौ वसुधा ज पवार ,म.इतिहास प्रबोधिनी ,कोल्हापूर .

बहुजन नायक ,रविवार ४ ते ११ अगस्त २००३ ,संपादक कांशीराम .

प्रबुद्ध भारत ,साप्ताहिक बहुजन । हिताय बहुजन सुखाय । 

मुंबई ,शनिवार ता २८ जुलै १९५६ – अंक २३ वा .

बहिष्कृत भारत आणि मुकनायक ,मुंबई ,शनिवार १५ जून १९२० ,२००८ म शा चरित्र साधने प्रकाशन समिति .

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ ,२०१६ प्रकाशक म. रा.शि. विभाग सचिवालय ,मुंबई.


अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...