Showing posts with label गावाकडील किस्से. Show all posts
Showing posts with label गावाकडील किस्से. Show all posts

Thursday, December 2, 2021

ढलांटी

ढलांटी
( *लां* ऐवजी *ळा* वाचावे )

मी इयत्ता आठवीपर्यंत आलो असेन. आठवी पर्यन्त शाळा हा प्रकार काय असतो ते मला माहीत न्हवते.डॉ.डी.एन. शिंदे (माझे काका ) स्त्रीरोग तज्ञ ,सर जे. जे. हॉस्पिटल ,मुंबई. यांनी जर शाळेत जाण्याचं महत्व कळवलं नसतं तर,मी  आज गावी बिगारी ,मजुरदार,बाजारात दलाल , किंवा हॉटेल चा वेटर म्हणून काम करावे  लागले असते ?
हा सन १९७२ च्या दरम्यान चा किस्सा आहे ,जो माझ्यावर बेतला होता . 
असो,काल गावात एक लग्न होते. लग्नात बुंदी वर ताव मारला .तसं तर आमी चार जन मिळेल तिकडे फुकट लग्नात जेवायला  जात होतो . मी पहिल्या क्रमांकावर असेन . लग्न लावून झाल्यावर पडद्याखालून हळूच लग्न मंडपात घुसायचो .पंगत संपत आली की शेवटच्या रांगेत बसायचे. मग एखादं ओळखीचे वाढपी आले की टिंगल करून हात वर उचलून वाढायचे .बुंदी वाढायचा वाढपी आला की उंच हात उचलून वाढी .मग काय सुकी रंगी बेरंगी बुंदी बेरंगी होई ,अर्धी तर पत्रावळी च्या खाली जाई .

आज लग्नात जेवायला जायचं म्हणून सकाळ पासून उपाशी पोटी होतो.
शेवटची पंगत आहे कुणी जेवायचं राहिलं असेल तर बसून घ्या ,अशी भोंग्यातून उद्घोषणा झाली की माझी  इकडे भुकेची कळ सुरू होई .शेवट ची पंगत सुरू झाली मी ही या पंक्तीला बसलो होतो.

सरसकट पळसाच्या पानाच्या पत्रावळी ,नंतरएक एक द्रोण वाटत आले.दुसरा माणूस त्यावर वगराळ घेऊन पाणी शिंपत आला .कारण पात्र उडु नये आणि ते धुतले जावे यामुळें पाणी हमखास वाढीत होते .

चारकोनी कापलेल्या चपात्या, गरमागरम पांढरा भात ,बटाटे ,वांगी ,आणि इतर तरकारी मिक्स असलेली भाजी आली ,नंतर दोन वाढपी आले एकाच्या हातात मोठी दूरडी (जी  अक्षता वाटून झाल्यावर  हळदीने पिवळी झाली होती) त्यात बुंदीचे लाडू घेऊन आले.एक एक करत माणशी एक  लाडू पत्रावळी वर ठेऊ लागले.लाडू चा सुगंध आणि रंग आकार बघून माझ्या तोंडात पाचक रस तयार झाला .कधी एकदाचा  लाडू खावे असे वाटू लागले.
तो क्षण लगेच आला आणि मी पत्रावळी वर ठेवलेला लाडू चटकन उचलून सुरुवातीला खाल्ला .परम सुख मिळाले ,लाडू मोठा होता तरी  लगेच खाऊन फस्त केला.
नंतर,गपा गपा जेवणं सुरू केलं, तिकडे कुणी तर ..मना सजांना भक्ती पंक्तीचे जावे...उपेक्षु नको कुणी रे गुणवंता ...घ्या हो घ्या म्हणत होते .मी त्या आवाजाने घाबरलो . आता घायच काय ,इकडे माझा लाडू संपला होता . 

इकडे माझं घेणं सुरूच होतं. गडे हो खूप खाल्लं आज.तिखट काटाळ वांगी होती. लग्नातील वांग्याची मिक्स भाजी मला लै खाऊ वाटायची ,तशी मी लै खाल्ली.

जेवण झाले ,घराकडे निघालो .वरून ऊन तापलेलं होतं. घरी येई तोवर अंगात घाम आला आणि तासभर निघून गेला नाही तोवर मी घरी निघून आलो .संध्याकाळ चे चार वाजले असतील .अंगणात बाज होती त्या बाजत येऊन उताणा झालो.

रात गेली आणि सकाळ झाली .सकाळी पोटात कळ मारू लागले . टंबरेल घेऊन परसाकडे निघालो. जाता जाता पोटात लई कळा सुरू झाल्या ,आणि पोटात गुड गुड असा आवाज सुरू झाला.माझ्या गावी सर्व लोक नदीकाठी संडास ला जायचे .आणि आज ही जातात पण ते प्रमाण कमी झाले आहे ,मी रस्त्यात जाता जाता ,पोटात जोरात कळ मारली आणि पातळ संडास खाकी चड्डीतुन कधी  बाहेर आली ते कळेच नाही .

तसाच जाऊन नदी किनारी बसलो हातात चड्डी काढून घेतली  ..बाजूला पाण्याचा झरा वाहत होता त्यात चड्डी धुतली ,आणि खडकावर आडोशाला येऊन बसलो.तस माझ्याकडे कोणाचे लक्ष न्हवते . 

एक तासाने अर्धी ओली चड्डी अंगावर चढवली तोवर परत पोटात कळ सुरू झाली.परत पातळ संडास.
अश्या कळा अनेक आल्या अनेकदा पातळ संडास केल्या . 

चार तास नदीकिनारी बसून राहिलो. शेवटची कळ संपेपर्यंत.घरी जावे तर संडास बांधलेले  नाही कीपाण्याचा हौद नाही.मग घरी कसे जाणार ?

अश्या ढलांटी कैक जणांनी अनुभवल्या असतील.अश्या ढलांट्या कोणाच्या नशिबी नको. खरे की नाय .

बी आर शिंदे,नेरुळ ७०६
मिनांडर

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...