About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI
Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Sunday, July 7, 2024

हिंदू कोड बिल


डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ५ फेब्रुवारी १९५१ रोजी हिंदू कोड बिल संसदेत मांडले.


भारत देशात स्त्रियांचा आवाज नेहमीच दडपला गेला होता आणि हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) त्यांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी पहिले कायदामंत्री डॉ.आंबेडकर यांना हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ.आंबेडकरांनी स्वतःसह आपल्या अध्यक्ष म्हणून एक समिती स्थापन केली. ज्यात सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. १९४७ स्वातंत्र्य पूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यास समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्या अगोदर हिंदू जनजागृतीच्या नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरु केली.


बाबासाहेबांनी १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले. हिंदू कोड बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. 


भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य असलेले मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला जोरदार विरोध केला. 


आंबेडकरांनी स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले होते. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे :


१) जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.

२) मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार

३) पोटगी

४) विवाह

५) घटस्फोट

६) दत्तकविधान

७) अज्ञानत्व व पालकत्व


हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. भारतीय संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.


या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला. "सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करत आहात? असा सवाल डॉ.आंबेडकरांनी प्रतिगामी विरोधकांना २० सप्टेंबर १९५१ रोजी केला. 


हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच लढले. पण सत्र संपताना या बिलाची केवळ ४ कलमेच मंजूर झाली होती. कायद्याचे स्वरूप बदलून सती प्रतिबंधक कायदा व हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा असे तुटपुंजे झाले, यास्तव दु:खीकष्टी होऊन राजीनामा देण्याचे ठरवले परतू नेहरूंनी त्यांना धीर धरा असा सल्ला दिला. डॉ.आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.


पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे,


* हिंदू विवाह कायदा

* हिंदू वारसा हक्क कायदा

* हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा

* हिंदू दत्तक व पोटगी कायदा


हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, 


“समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”


संदर्भ : विकिपीडिया

                प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 

 अपील  

मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे . 

 


                          ( लेख अच्छा लगे तो प्रोत्साहन राशि भेट स्वरूप दे ..दूरध्वनी : ९७०२ १५८ ५६४)

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

जय भीम ! नमो बुद्धाय ! 

 



Saturday, June 29, 2024

मधु दंडवते : झुंजार समाजवादी नेता.


*!!..मधु दंडवतेंना दंडवत ..!!* 
काही वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आम  आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर 'साध्या राहणीमानाचे' मार्केटिंग केले होते. त्यावेळी अनेकांना अरविंद केजरीवाल यांच्या त्या साधेपणाचे कौतुक आणि अप्रूप वाटले. कारण त्यांच्यातील बहुतांश लोकांना मधु दंडवते हे अजब रसायन माहितीच नव्हते. बसस्टॉपवर रांगेत उभे असलेल्या नानांचे कित्येक प्रत्यक्षदर्शींनी दर्शन घेतलेले आहे. आपण या देशातील महत्त्वाचे नेते आहोत म्हणून बसच्या पुढच्या दरवाजाने चढण्याची सवलतदेखील या तत्त्वनिष्ठ व्यक्तीने कधी घेतली नव्हती ..!!* 

*मधु दंडवते हे देशाचे अर्थमंत्री होते. हे पद गेल्यानंतर ते एका बँकेत जेव्हा चारचाकी गाडीसाठी कर्ज काढायला गेले, तेव्हा तिथला अधिकारी आवाक झाला. देशाचे अर्थमंत्रीपद भूषविलेला नेता गाडीसाठी बँकेत कर्ज घ्यायला येतो, हे चित्र या देशात पुन्हा कधी दिसेल असे वाटत नाही ..!!*  

*कणकवली रेल्वेस्टेशनहून मुंबईला प्रवास करत असताना किंवा प्रवास करून आल्यावर, जिन्याजवळ मधु दंडवतेंचे जे तैलचित्र आहे, त्याला दोन्ही हात जोडून प्रणाम केल्याशिवाय कधीच पुढे जाता येत नाही. तो प्रणाम एवढ्यासाठीच असतो, की आज या कोकण रेल्वेने आपण जो काही प्रवास करतोय, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे ..!! एका कर्मयोग्याप्रति व्यक्त केलेली ती कृतज्ञता असते ..!!* 

*राजापूर मतदारसंघाचे खासदार असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचे अकस्मात निधन झाल्याने, अहमदनगरचे प्राध्यापक मधु दंडवते यांना पक्षाने थेट कोकणातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. निकष फक्त एकच होता, तो म्हणजे नाथ पै यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेली विद्वत्ता ..!! काहीही झाले तरी कोकणची जनता लोकसभा निवडणुकीत मतदान करताना एका विद्वान उमेदवारालाच मत देणार, हा पक्षाला असलेला विश्वास ..!!* 

*तो काळ इंदिरा गांधी यांचा होता. संपूर्ण देशात १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांची लाट आलेली असतांना, त्यांनी शेंदूर फासलेला दगडदेखील निवडून येत होता. महाराष्ट्रदेखील याला अपवाद नव्हता. इंदिरा लाटेत कॉँग्रेसचे ४८ पैकी ४७ खासदार निवडून आले .. फक्त एकच खासदार जनता दलाचा निवडून आला .. आणि तो खासदार म्हणजे आदरणीय मधु दंडवते ..!!* 

*कोकणची जनता कोणत्याही लाटेत वाहवत जात नाही, हे त्या वेळी इंदिरा गांधींना कोकणने दाखवून दिले होते.  कोणत्याही नेत्याचा उधळलेला वारू थोपवून दाखवण्याची ताकद, या कोकणच्या मातीत आहे. थोडक्यात, अहमदनगरचे मधु दंडवते कोकणात निवडून आले आणि नंतर ते कधी कोकणी झाले, ते त्यांनासुद्धा कळले नाही. त्या काळी मधु दंडवते हा कोकणी जनतेचा स्वाभिमान होता आणि आजही आहे ..!! त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्याप्रमाणे संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करून, राजापूर मतदारसंघाची ओळख ‘विद्वान लोकांचा मतदारसंघ’ अशी देशभरात सर्वदूर केली. आजही या द्वयींची भाषणे अभ्यासासाठी संसदेत जतन करून ठेवलेली आहेत ..!!* 

*कालांतराने दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री झाले. अ.ब. वालावलकर यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते, परंतु आमचे नाना ते स्वप्न अक्षरशः दिवसरात्र जगले. दरी-खोऱ्यांतून रेल्वे शक्य नाही म्हणून याअगोदर कोकण रेल्वेच्या प्रस्तावावर अनेकदा फुली मारण्यात आली होती. मात्र जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा सहकारी आणि ई.श्रीधरन यांच्यासारखा ध्येयनिष्ठ इंजिनिअर यांना सोबत घेऊन, नानांनी हे अशक्यप्राय स्वप्न साकार केले. कोकण रेल्वेची संकल्पना जेव्हा त्यांनी कोकणी जनतेसमोर मांडली, तेव्हा कोणताही विकासात्मक दृष्टिकोन नसलेल्या तत्कालीन विरोधकांनी, नानांवर अगदी टोकाची टीका केली. ‘दंडवते सदा गंडवते’ या घोषणेपासून रस्त्यावर फिरणाऱ्या रोड रोलरवर ‘आली पहा आली .. दंडवतेंची रेल्वे आली ..’ या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. मात्र क्षमाशील असलेल्या या कर्मयोग्याने, ही विखारी टीकादेखील अगदी हिमालयाप्रमाणे स्तब्ध राहून सहन केली .. लोकसभेत 'विरोधक' म्हणून इंदिरा गांधींवर शब्दांच्या धारदार अस्त्रांनी तुटून पडणारे नाना, त्यांच्या अकस्मात निधनानंतर भावुक होऊन ‘राजीव गांधींना त्यांची आई आता कधीच मिळणार नाही ..’ असे उद्‌गार काढतात, तेव्हा या व्यक्तीच्या हृदयाची आणि विचारांची विशालता लक्षात येते. 'कोकण रेल्वेचे' स्वप्न साकारल्यानंतर विरोधक काळाच्या ओघात गडप झालेत, परंतु मधु दंडवते हे कोकणच्या इतिहासात अजरामर झाले आहेत. जेव्हा केव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात एक पान हे खास नानांसाठी राखीव असेल आणि त्यांचे नाव सुवर्णाक्षरातच लिहिले जाईल, यात तिळमात्र शंका नाही ..!!* 

*कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या नानांची कपाटे वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेली असत. ज्यांची कपाटे पैशांच्या थैल्यांनी भरलेली होती, त्या नेत्यांना कधीच पराभव पाहावा लागला नाही. मात्र 'कोकण रेल्वे'चे अशक्यप्राय स्वप्न पूर्ण करणाऱ्या नानांचा १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेसचे उमेदवार कर्नल सुधीर सावंत यांनी पराभव केला. त्याच काळात नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झालेली असल्याने, शिवसेनेची संघटना बळकट झाली होती. अशा परिस्थितीत शिवसेनेने वामनराव महाडिक यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देऊन, मतांचे विभाजन केल्याने त्याचा फटका मधु दंडवतेंना बसला व सुधीर सावंत विजयी झाले. सलग पाच वेळा विजय मिळाल्यानंतर अचानकपणे झालेल्या या पराभवामुळे नानांना जबर मानसिक धक्का बसला होता ..!! नेमकी त्याच वेळी त्यांना देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी  चालून आली होती. तेव्हा ‘मागच्या दरवाजाने (राज्यसभा) जाऊन, मी पंतप्रधान होऊ इच्छित नाही ..!!’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्या वेळी लालूप्रसाद यादव व अन्य नेत्यांनी त्यांना ‘बिहारमधला कोणताही मतदारसंघ निवडा, आम्ही तुम्हाला निवडून आणून लोकसभेवर पाठवतो’ अशी खात्री दिली. तेव्हा तत्त्वांच्या या पुजाऱ्याने जे उत्तर दिले, ते ऐकून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणारा कोकणी माणूस मनातून हळहळला. नाना प्रांजळपणे म्हणाले - "माझ्या लोकांनी मला निवडणुकीत नाकारले, त्यामुळे देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याचा नैतिक अधिकारच मला प्राप्त होत नाही .." आजच्या या बाजारू राजकारणात, नानांसारखी नैतिकतेची व्याख्या सांगणारा दुसरा पुढारी, आज शोधून तरी सापडेल का ..??*

*आपली तत्त्वे आणि नैतिकता जपण्यासाठी त्यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडले, अन्यथा एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला असता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत, कोकणच्या जनतेचे लोकसभा निवडणुकीत विद्वान उमेदवाराप्रती असलेले आकर्षण पाहून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पेशाने सीए व सारस्वत बँकेचे चेअरमन असलेल्या सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली. या वेळी सुरेश प्रभूंनी सुधीर सावंत व मधु दंडवते या दोघांचाही पराभव केला. त्या वेळी निकालाच्या दिवशी सुरेश प्रभूंना विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी लगेचच शेजारी उभे असलेल्या मधु दंडवतेंची भेट घेत, त्यांच्या चरणांना वाकून स्पर्श केला. मतांच्या गोळाबेरजेत आपण विजयी झालेलो असलो, तरी मधु दंडवते या व्यक्तीचे कोकणप्रती असलेले योगदान प्रभूंना चांगलेच माहिती होते. त्या वेळी नानांनी सुरेश प्रभूंचे अभिनंदन करून त्यांना आलिंगन देत म्हटले, ‘बॅरिस्टर नाथ पै व मी आम्ही दोघांनी संसदेत जपलेला या मतदारसंघाचा लौकिक तुम्ही कायम राखाल, याची मला खात्री आहे. आज तुमच्या रूपाने या मतदारसंघाला पुन्हा एकदा विद्वान खासदार मिळाला आहे ..!!’* 

*आपल्या 'साधेपणाचे' कधी मार्केटिंग करावेसे मधु दंडवतेंना वाटले नाही, कारण तो त्यांच्या रक्तातीलच एक गुण होता. अशा या अत्यन्त साध्या नेत्याने कधी काळी आपल्या मतदारसंघाचे सलग पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते, हे सांगताना आपली छाती निश्चितपणे अभिमानाने भरून येते ..!!* 

*ज्या काळात लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत सिद्धांतावर घाव घालण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत .. ज्या काळात लोकशाही व राजकीय नेतेमंडळींवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय .. त्या पिढीला, आणि पुढच्या अनेक पिढ्यांना, ‘दंडवते कोण होते’ हे समजणे नितांत गरजेचे आहे ..!!* 

*राजकारणात राहूनही नि:स्पृहपणे काम करता येते, हे पुढच्या पिढ्यांच्या मनावर ठसवून देण्यासाठी त्यांना 'मधु दंडवते कोण होते' हे माहिती असणे नितांत गरजेचे आहे. जगाच्या आजवरच्या एकंदर लोकसंख्येचा विचार करता, ज्यांचे चरणस्पर्श घेऊन कृतकृत्य होता यावे, अशा फारच थोड्या व्यक्ती, या भूतलावर होऊन गेल्या. त्यात फक्त राजकीय क्षेत्राचा विचार केला असता, अशा व्यक्तींची संख्या ही नगण्यच होती. आता एकंदरीतच ज्या वेगाने राजकारणातून नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे, ते पाहता, मधु दंडवते हे थोर व्यक्तींच्या यादीतील प्रमुख नाव म्हणावे लागेल ..!!                         

*मा. कै. मधू दंडवते यांची आज पुण्यतिथी आहे ..!!  कोकण रेल्वेचे स्वप्न त्याच्यामुळेच साकार झाले आहे ..!!*

Tuesday, May 28, 2024

पळस आणि पांगारा

 पळस आणि पांगारा 



पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट





( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो ) 

 ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे . 

सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.

यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात. 

 

पळसाला पाने तीनच  पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .



शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांतील उष्ण प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी वनांमध्ये आढळतो.


पळस हा मध्यम आकाराचा वृक्ष सु. १५ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर १.५–१.८ मी. असतो. साल राखाडी, निळसर वा फिकट तपकिरी असून तिच्या लहान-मोठ्या ढलप्या सोलून निघतात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांमधून लाल रस पाझरतो. हा रस सुकल्यावर त्याचा विशिष्ट डिंक बनतो. त्याला इंग्रजीत ब्युटिया गम किंवा बेंगॉल कीनो म्हणतात. पाने संयुक्त, एकाआड एक व पिच्छाकृती असून मोठी व त्रिदली असतात. जानेवारी ते मार्च महिन्यांत या वृक्षाला केशरी-लाल रंगाची फुले येतात. फुले मोठी, द्विलिंगी व बिनवासाची असून ती फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लांब मंजरीवर येतात. ती अनेक व सु. २.५ सेंमी. लांब असतात. त्यामुळे ज्या परिसरात पळसाची झाडे असतात तो परिसर या भडक रंगाच्या फुलोऱ्यांमुळे दूरवरून पेटल्यासारखा वाटतो. म्हणून इंग्रजीत त्याला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. शिंबावंत फळे १५–२० सेंमी. लांब व सु. ४.५ सेंमी. रुंद असतात. त्यात एकच बी असते.


पळसाचे लाकूड काळपट पांढरे असते. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही, म्हणून मोटेसाठी व विहिरींच्या काठावर बांधकामासाठी त्याचा वापर होतो. पाने राठ व कडक असतात. त्यांपासून पत्रावळ्या तयार करतात. फुलांपासून केशरी रंग मिळतो. त्याचा वापर होळीचा रंग व कपडे रंगविण्यासाठी केला जातो. फुलाच्या रंगाकडे डास आकर्षित होतात आणि त्यातील मकरंदामध्ये ते अंडी घालतात. परंतु ही अंडी उबत नाहीत. त्यामुळे डासांची निर्मिती कमी होते. खोडापासून मिळणाऱ्या डिंकाचा वापर औषधात करतात. त्यातील टॅनिनाचा कातडी कमाविण्यासाठी वापर करतात.


पळस हे उत्तर प्रदेश राज्याचे राज्य फूल आहे . भारतीय डाकतार विभागातर्फे सन्मान म्हणून पाळसा च्या फुलाचे पोस्टाचे तिकिट छापले होते . कालिदासणी पळसाला ' ऋतुसंहार ' हे नाव दिले आहे . पळसला पर्यायी बेल आहे . पळस किवा बेल झाड लावले .

पळसाला संस्कृत मध्ये पलाश असे म्हणतात. पलाश अर्थ फुलाणि दावरलेले झाड . विदर्भात याला ' तुळीप असे नाव आहे .


पळसाला पाने तीन असे आपण म्हणतो . ही केवळ एक युक्ति नसून त्यात गहन अर्थ दडलेला  आहे . असंग्रह आणि संयमाची सूचना देणारी युक्ति आहे ती . किती ही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणातच वापरू शकता , उपयोगी लावू शकता ,बाकी सर्व व्यर्थ आहे असा संदेश आहे यात याची पाने त्रिदलिय असल्याने याचे संस्कृत नाव ‘ त्रिपटक ‘ असे आहे .


पांगारा : 



एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा  या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि अन्य आशियाई देशांतही झालेला आहे. भारतात फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात : लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो .




पांगारा हा वृक्ष सु. २७ मी. उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ, करड्या रंगाची, क्वचित पिवळी व खडबडीत असते. याला लहान आकाराच्या अनेक फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पाने संयुक्त, त्रिदली व मोठी असून पर्णिका एकाआड एक व १०–१५ सेंमी. लांब असतात. लांब फुलोऱ्यावर फुले मोठी व आकर्षक असून ती लाल, शेंदरी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. ती बिनवासाची असून त्यांत मकरंदाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक पक्षी व भुंगे फुलांमधील मकरंद मिळविण्यासाठी फुलांभोवती घिरट्या घालताना दिसतात. फळ (शेंग) १३–३० सेंमी. लांब, काळ्या रंगाचे आणि लंबगोलाकार असते. त्यांत ६­-७ जांभळ्या व हलक्या बिया असतात. पांगाऱ्याची लागवड बिया किंवा कलम लावून करतात.


पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.



                                                                                       पळस 



पांगारा 

लेख आवडला तर जमेल तसे प्रोत्साहन राशी दान Gpay करा . 




प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 

गुगल आणि मराठी विश्वकोश यांच्या माध्यमाने संकलन . 






Sunday, May 12, 2024

पळस : फ्लेम ऑफ फॉरेस्ट

 

पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट



( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो ) 

 ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे . 

सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.

यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात. 

 

पळसाला पाने तीनच  पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .


 


 



पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी आणि ईशान्येतील अरुणाचल ते पश्चिमेकडील गुजरातच्या कच्छपर्यंतचा प्रदेश पाहता भारताला हवामानाची शीतोष्ण उतरंड लाभलेली आहे. जैवविविधतेने व्याप्त आणि नटलेला हा सारा परिसर! पर्यावरण अभ्यासकांच्या मते १० लाखांवर विविधरंगी, औषधी गुणयुक्त वनस्पतींची संपदा भारतभूमीत आहे. पैकी जेमतेम साडेतीन लाखांवरच वृक्ष-फूल-फळांची ओळख सुस्पष्ट झाली आहे. उर्वरित वनस्पतींच्या नावांचा उलगडा बाकीच आहे. यातील अनेक वनस्पती कालौघात नामशेष झाल्या.

 

काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्या त्यांच्यातील बहुमोल उपयोगी गुणांचा लाभ उठवता-उठवता संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच! यातलीच एक प्रमुख आणि दुर्मिळातील दुर्मीळ झालेली वनस्पती आहे पिवळा, पांढरा व काळा पळस!

 

पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे मूळ शोधत गेलो तर त्याचे संदर्भ रामायणातील संजीवनीसारखे वेदादी पौराणिक ग्रंथांमधून आढळतात. पिवळ्या पळसाचे फूल हे महादेवाला अत्यंत प्रिय, अशी श्रद्धावंतांची धारणा आहे.

शिशिर ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच पळसाची झाडे बहरू लागतात. याच दरम्यान, महाशिवरात्रही असल्याने बहरलेल्या पिवळ्या पळसाची फुले महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जात. त्यासंदर्भातील उल्लेख पौराणिक वेद आदी ग्रंथांमध्ये आढळतो. पळसावर काव्यही लिहिले गेले आहे. वेदांच्या काही ऋचाही पळसाचा संदर्भ देणाऱ्या आहेत.

पळसाच्या पाना-फुलांच्या वर्णनातून एखादी उपमाही दिली गेली आहे. ‘किंशुक’ या नावानेही काव्यातून पळसाचे रूपक मांडले आहे. ‘काय त्या झाडावर पोपट (शुक) बसला आहे?’ अशी पृच्छाच ‘किंशुक’ या शब्दातून केली आहे. शिशिरागमनाला उन्हाचा रखरखाट जाणवू लागताच रानोमाळी बहरू लागलेल्या पळसाकडे दुरून बघितले तर केशरी, पिवळी, पांढरी फुले त्यांच्या पाकळय़ांतील टोकदार वैशिष्ट्यांमुळे जणू पोपट बसल्यासारखी भासतात, असे ते रूपक किंशुकमधून मांडल्याचे दिसते.

परभणीतील चारठाणा येथील निवृत्त मुख्याध्यापक आणि वेद, संस्कृतचे अभ्यासक शिवाप्पा खके हे पिवळ्या पळसावरील सुभाषित अत्यंत लयीत म्हणून दाखवतात. त्यातले रूपक उलगडून दाखवतात.

 

ब्रह्मवृक्ष पलाशस्तवं श्रद्धां मेधां च देहि मे ।
वृक्षाधिपो नमस्तेस्तु त्वं चात्र सन्निधो भव ।।


या सुभाषितामध्ये पळसाचे माहात्म्य सांगताना त्याला ब्रह्मवृक्ष म्हणूनही संबोधले आहे. सुभाषितामध्ये पळसाचे नाव ‘पलाश’ म्हणून आले आहे. अर्थात हे संस्कृत नाम. पळसाला वृक्षातील राजाही म्हटले गेले आहे. त्याला श्रद्धा व मेधा- म्हणजे बुद्धी प्रदान करण्याचे आर्जव वरील सुभाषितामधून केले आहे. वेद, पुराणात पिवळ्या पळसाला त्रिपर्ण, पलाश, पलंकषा, पलंकषी, अशी नामाभिधाने आढळतात.

 

इ.स. १८०० मध्ये भारतावर जेव्हा इंग्रजांचा अमल होता तेव्हा त्यांनी येथील जशी थंड हवेची ठिकाणे शोधली तशी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचाही अभ्यास केला. ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ नावाचा एक वनस्पती-फुलांचा कोषच लिहिला. या ग्रंथांत अनेक दुर्मीळ वनस्पतींचा उल्लेख आढळतो. पिवळ्या पळसाला इंग्रजीत साजेसे ‘ब्युटिया मोनसपर्मा’ नाव आहे. हिंदीत पलश म्हटले आहे. धुळवडीला पारंपरिक रंग खेळण्याची परंपरा जपणाऱ्या बंजारा समाजात पळसाला केसुला म्हटले जाते.

 

पूर्वीच्या काळी धुळवडीला जे नैसर्गिक रंग खेळले जायचे त्यात केशरी, पिवळ्या, पांढऱ्या व काळ्या पळसाच्या फुलांचीच भुकटी असे. या फुलांच्या रंगांमध्ये उष्णता शामक घटक असल्याचे सांगितले जाते. या फुलांच्या भुकटीचे औषध म्हणून सेवनही केले जात असे.

अत्यंत औषधी गुणयुक्त, पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे वर्णन जमिनीवरचे सोने म्हणून केले गेले आहे. अर्थात त्याला त्या वृक्षाचे बहुगुणी वैशिष्ट्यच कारणीभूत आहे. मात्र, पिवळ्या पळसाच्या मुळाशी सोने असल्याचा समज करून घेत त्यावर नाहक कुऱ्हाड चालवली गेली असावी आणि ही प्रजात लुप्त झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते. वस्तुत: पिवळ्या पळसात अनेक आजार दूर करणारे गुण आहेत. त्यामुळे त्याला सोने म्हणून संबोधले जात असे

अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक स्तरावरच चिंतेचा विषय झाला आहे. हवा, पाणी प्रदूषित होत आहे. दुर्मीळ आणि औषधीगुणयुक्त वनस्पती नामशेष होणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यात हातभार लावणारी जैवविविधतेची साखळी तुटत जाणे हेदेखील त्यामागील एक कारण आहे.

 

हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची जाणीव करून देणारे कोणीतरी मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन दुर्मीळ वनस्पतींचे जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त आहे. याच उद्देशाने उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांचा एक वनस्पती उद्यान विकसित करण्यासाचा प्रयत्न करणे आहे.

 

 महाविद्यालयातील दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा जतन करणे, त्यात आणखी भर घालून नामशेष होऊ पाहणाऱ्या वनस्पतींचे बीज संकलित करण्यासह रोप निर्मितीचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.

 

प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पिवळ्या पळसातील औषधी गुण हेरून त्याचे बीज मिळवून त्यापासून रोपे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे. कामशक्तिवर्धक, तारुण्य वाढवणारे गुण त्यात आहेत. अतिसार, अंगदुखीसह कित्येक आजार आणि दुखण्यांमध्ये पळसाचे सर्व घटक उपयोगी ठरतात. पिवळ्या पळसाचा डिंकही अत्यंत गुणकारी मानला गेला आहे. त्याचे लाडू पूर्वी बाळंतपणानंतर महिलांचे स्नायू बळकट करण्यासाठी दिले जात. अशा जैवविविधतेतील बहुगुणी, नामशेष किंवा लुप्त होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प डॉ. पटवारी यांनी उदयगिरीत राबवला आहे.



केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एबीजी म्हणजे ‘असिस्टंट टू बोटॉनिकल गार्डन’ योजनेंतर्गत दुर्मीळ वनस्पती, बीजांचे जतन करण्याला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली तर महाराष्ट्रात बोटॉनिकल सर्व्हे ऑफ इंडियाअंतर्गत असे प्रकल्प राबवण्यासाठी काही निधीही दिला जातो. वनस्पती उद्यान विकसित करणाऱ्या या योजनेसाठी महाराष्ट्रातून दोनच महाविद्यालयांची निवड झाली आहे. मराठवाड्यातून उदगीरचे महाराष्ट्र उदयगिरी हे एकमेव आहे. उदयगिरीत अनेक दुर्मीळ वनस्पतींचे जतन केले जात असल्याचे केंद्रस्तरावरून आलेल्या पथकाने पाहिले तेव्हा त्यात त्यांना कमतरता जाणवली ती पिवळय़ा पळसाची. दुर्मीळ झालेला का असेना पण पिवळा पळस मराठवाडय़ातच सापडेल, असे त्या पथकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा नव्याने शोध सुरू झाला. महाशिवरात्रीनिमित्ताने महादेवाला प्रिय अशा पिवळय़ा पळसाच्या फुलांची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आणि पिवळा पळस उदगीरनजीकच्या जायभायचीवाडीत असल्याची वार्ता कानी आली. डॉ. पटवारी यांनी पिवळा पळस तग धरून असलेल्या शिवाराला भेट दिली आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून वृक्षाचे जतन करण्याचे आवाहन केले. त्याच्या बियांचे आता संकलन सुरू झाले आहे.



मराठवाड्यात पिवळ्यापांढऱ्यासोबतच काळा पळसही पूर्वी आढळायचा. जो आता 

दुर्मिळात दुर्मीळ झाला आहे. काळ्या पळसाला तिवस किंवा भुत्या पळसही म्हणतात. मराठवाड्यात बीडजवळील तागडगाव व उदगीरनजीकच्या जायभायाचीवाडी येथे पिवळ्या पळसाचे एखाद-दुसरे झाड आजही आढळते. केशरी-तांबडापिवळापांढरा अशा पळसाच्या विविध प्रजातींबाबत किंवा रंगांबाबत अभ्यासकांमध्ये मात्र काही मतमतांतरेही आढळतात. औरंगाबाद येथील वनस्पती अभ्यासक प्रा. मिलिंद गिरीधारी यांनी अभ्यासकांमधील मतमतांतरे मांडली. अनेक अभ्यासकांच्या मते माणसाच्या त्वचेचा रंग जसा अल्बिनो या पेशीतील दोषांमुळे बदलतो तसा काहीसा प्रकार केशरीपिवळा व पांढऱ्या पळसातील रंगांबाबत आहे.

 

उपयोग : 

आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहेत्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला ‘फॉरेस्ट फायर म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो. 

 

पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरीअँटी-बॅक्टेरिअलवेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतोशिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत. 

 

डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार :

मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यांमध्ये घाला. असं केल्याने डोळ्याच्या इतर समस्यांपासूनही मुक्तता मिळेल. 

 

किडनी स्टोन दूर करतं :

साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवा. हे सूप दोनदा पिण्यामुळे मूत्रातील जळजळ दूर होईल आणि मूत्रपिंडातील स्टोनसुद्धा वितळतील. साखर न घालताही तुम्ही हे सूप बनवू शकताज्यामुळे यकृतासंबंधी समस्याही दूर होतील. 

 

सूज नाहीशी होते : 

पळस मुरगळजळजळ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारी सूज दूर करते. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर जाळी ठेवून या जाळीवर पळसाची फुलं ठेवा. ही फुलं तुम्हाला जिथं सूज आली आहेत्या भागावर लावा. दिवसातून दोनदा ही क्रिया करा. 

 

त्वचेसाठी फायदेशीर :

त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील पळस प्रभावी आहे. यासाठी पळसाची साल कोरडी किसून घ्या. एक चमचा पळसाच्या सालीची पावडर घेऊन त्यात तूप आणि मध मिसळून दिवसातून दोनदा प्या. अँटी-एजिंग म्हणून हा एक चांगला उपाय आहे. 

 

पोट फुगण्याच्या समस्या दूर होते :

 पळसाची फुलं पचन संबंधित समस्यांसाठी उपयुक्त आहे. तुमचं पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर पळसाची सालं घ्या आणि कोरड्या आल्यासकट पाण्यात उकळवा. हा काढा गाळून प्या. 

 

रक्तस्राव बंद होतो :

नाकातून  रक्त येणं हे नाकाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होण्यामुळे होतं. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरडं नाक किंवा नाकात दुखापत. पळसाची फुलं नाकाच्या रक्तस्त्रावात देखील उपयुक्त आहे. 5-7 पळसाची फुलं घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी गाळून त्यात साखर मिसळून प्या. याने नाकाचा रक्तस्त्राव थांबतो. 

 

शरीरातील विषारी घटक दूर होतात :

पळसाच्या फुलांची पावडर तयार करा आणि दररोज 1-2 ग्रॅम पावडर पाण्यासह घ्या. चवीला कडू लागलं तरी यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होईल. 

(माहिती गुगल वरुण साभार )




लेख आवडला तर Gpay करून मदत करा .  

 


प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई 

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...