Friday, February 9, 2018

अंधश्रद्धा एक अभिशाप

अंधश्रद्धा  एक अभिशाप
२१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017

“आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची असतील न पडलेले ? समजा  पायाला लागले किंवा माझा पाय पडला तर दिवस खराब जाईल न माझा ? सांग ना अगदीच खराब दिवस जाईल न माझा ? “ माझ्या सात वर्षाच्या माझ्या मुलीने अक्षरशा तोंड वाकडे करून मला ज्ञानं पाजले .मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले सात वर्षाच्या  मुलीलाही समजतेय की शनिवारी लोकं नजर उतरवण्यासाठी किंवा नजर लागू नये म्हणून मिरची लिंबू रस्त्यावर फेकत असतात .किंवा आपल्या  वाहनाला बांधतात ,दारावर बांधतात .का ? तर वाईट नजर असेल तर जाळून जाईल ,म्हणजेच वाईट नजर लागणार नाही .हे अशिक्षित करतात असे नाही ,तर हे उच्च शिक्षित जास्त प्रमाणात करीत असतात ?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे .या आणि अश्या  उपायाने काय सर्व सुरळीत होते का ? सर्व नीट होण्यासाठी मिरची ,लिंबू एवढी सामर्थ्यशील आहे का ? खरेच प्रश्न  पडतो .आणि असे प्रकार समाजात एवढे सर्रास घडतात की लहान लहान मुलांना देखील असे करणे हे गैर आहे किंवा असे केले नाही तर विपरीत काही तरी घडेल का ? अशी भीती वाटत राहते .हे तर काहीच नाही लोक तर अघोरी कृत्य करायला मागे पुढे बघत नाहीत.अघोरी कृत्य अशी आहेत की ती बघण्याची तर सोयच नाही नुसती ऐकली तरीदेखील अंगावर काटा येईल .त्या विषयी मी विस्तृत सांगतेच पण माझ्या मुलीच्या या गैरसमजाचे मी सर्वप्रथम निरसन केले .तिला समजावले की हे प्रकार केल्याने आपल्या  कामावर शून्य परिणाम होतो .त्यामुळे काम तर बिघडत तर नाहीच शिवाय चागले ही होत नाही .म्हणजे अशा कृत्याचा आपल्या कामाच्या पद्धतीवर काहींच असर होत नाही .माझ्या मुलीची मी समजूत घातली पण अशा  किती आणि कोण -कोणाची समजूत घालायची ? माणसे अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत गेली आहेत त्यांना बाहेर कसे काढायचे ?
आज समाजात असे कितीतरी अघोरी प्रकार घडतात त्या बद्धल आपण बघू .मिरची लिंबू बांधणे हे तर छोटे छोटे प्रकार झाले .आपण विचार देखील करू शकत नाही .असे विचित्र प्रकार लोक करायला धजत नाहीत .परवाचीच गोष्ट  घ्या ना .आमच्या कार्यालयाची सहल गेली होती .ते ठिकाण होते ठाणे जिल्ह्यातील आदिवाशी पाडा.एकंदर सहल म्हणजे त्या पाड्यातील वस्तीती राहणाऱ्या अदिवशी लोकांची जीवनशैली अभ्यासून एक प्रबंध लिहायचा होता आम्हा सगळ्या लोकांना .म्हणून मी सहलीचा  खटाटोप केला आणि आदिवासी पाड्यातील जीवनपद्धती ही अर्थातच मागासलेली होती .प्रगत जीवनशैलीपेक्ष्या त्यांचे जीवनमान फारच खालच्या दर्जाचे  होते .त्यांचे  एकंदरीत वागणे व राहण्या खाण्याच्या पद्धतीत आपल्यापेक्ष्या जमीन अस्मानाची तफावत होती .यामुळे सर्वात मोठा त्यांच्यावर बडगा होता तो म्हणजे अंधश्रध्देचा ! त्यांचे जगणे हे केवळ केवळ आणि केवळ अंधश्रध्देच्या   विळख्यात सापडले होते .
आम्ही एका घरी परीक्षणासाठी गेलो होतो .आदिवाशी  लोकांचे राहणीमान आणि त्यांची  कुटुंब पध्दती यावर प्रकाश टाकावा म्हणून एका घरी भेट देणे गरजेचे होतेचं .घरची परिस्थिती  तशी बेताचीच होती.अर्थातच संसार मोडका होता अगदी मोडक्या -तुड्क्या मातीच्या भांडयासारखा.शेणाने सारवलेल्या जमिनीवर फाटकी चटई दिली आम्हाला बसायला.बसायचे का नाही असा आमच्या मनात विचार येत नाही तोवर आमच्या समोर माठातल्या थंडगार पाण्याचे दोन मळकट ग्लास समोर आले.त्यांच्या आदरतिथ्याला मान  देत कसेबसे आम्ही त्या चटईवर बसलो आणि दोन घोट कसे तरी घशात गिळले.एकंदर घरची परिस्थिती  बेताची असल्या कारणाने दारिद्र्याने घर झाकलेले होते .कुटुंबप्रमुखाच्या अंगावरचं जेमतेम कपडे होते .बाकीचे कुटुंब सदस्य तर जवळ जवळ अर्धनग्नचं  होते .कपड्याचा तुटवडा तसा विचारांचाही तुटवडा ! विचारांचा असा खालचा थर  त्यांच्यामध्ये असणे ही तर प्रगत हे तर प्रगत समाजाचे त्यांचे दूरदूरचे संबंध आहेत म्हणून असावा .घरात नवरा बायको होतेच ,सासू सासरे ,सहा मुली आणि त्यावर शेंडेफळ म्हणजे शेवटचे शेपूट एक मुलगा.या मुलासाठीचं तर सहा मुलीनंतर देखील गरोदर राहण्याचा त्या माउलीने अट्टाहास केला होता.ते देखील सातवी मुलगी ही त्यांनी देवाला बळी दिली होती आणि म्हणूनच देवी पावली आणि आठवा मुलगा जन्माला आला ही त्यांची श्रद्धा ! श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा  म्हणावी लागेल ही .देवीला मुलगी देताना त्यांचे हात थरथर कापले नसतील का ? त्यांची जीभ कचरली नसेल का ? त्यांचे रह्श्य विदरले नसेल का ?आपल्या पोटच्या गोळ्याला मरणाच्या दारात नेताना ते कसे धजावले  असतील ह्या नुसत्या कल्पनेनेच मी सुन्न झाले होते .
या सर्व करणीचे त्या कुटुंबाला काहींच दु:ख नव्हते ,त्यांचे जीवनमान जैसे होते तसे अगदी सुरळीत चालले होते ,त्यांना यत्किंचितही फरक पडलेला नव्हता .ह्याचे मला फार आश्चर्य वाटले .आम्ही सर्वांनी मिळून त्यांना स्त्री-पुरुष संबंध ,गुणसूत्र ,शारीरिक विज्ञान  याची जितक्या सध्या सोप्या भाषेत समजवता येईल तेवढे पर्यंत केले.त्यांना ही केवळ अंधश्रध्दा बाकी दुसरे काही नाही हे जीव तोडून सांगावे लागले .त्यांना ते कितपत कळले ते माहित नाही .पण आमच्या समोर तरी थोडेफार तरी कळले याची कबुली देताना माना डोलावल्या ,निदान दोन उपदेशात्मक  गोष्टी  कानावर पडल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पडल्याचे झळकत होते .त्यांची ही पिढी तर ते दुष्कृत्य करून बसली होती .आता त्या मुलीला तरी आम्ही परत या जगात आणू शकत नव्हतो पण त्यांच्या पुढच्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालण्याचे थोडे का होईना आमच्या परीने आम्ही प्रयत्न केले होते .त्या दोघा उभयतांची मुले तरी आपल्या आई बाबांनी जे भीषण कृत्य केले होते त्याची पुनरावृत्ती करणार नाहीत .मुलगाचं हवा हा अट्टाहास जरी केला तरी एका मुलग्याची अशा  परीने लावलेली वात त्यांच्या लक्षात आली होती .पण आता काही करता येणार नव्हते ?
आम्ही समाधानाने  घरी परतलो होतो .त्या आदिवाशी  वाड्यातील सर्वच घरातील अशी विदारक कहाणी होती .ह्या न त्या प्रकारामुळे कोणीतरी बळी पडले होते अंधश्रद्धेच्या खोल दलदलीत बरबटलेले त्यांना बाहेर काढण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले होते .ही गोष्ट झाली एका आदिवाशी  पाड्याची.अशी एक ना अनेक भारत भूमीच्या  पवित्र देहावर सर्वत्र आनंदी आनंद असे चित्र म्हणा किंवा वरवरचे देखावे म्हणा पण गुण्या गोविंदाने नांदत आहेत .गुण्या गोविंदाने  मी म्हणतेय कारण त्यांने  त्यांच्यात यत्किंचित ही  फरक पडत नाही .त्यांचे जसे दिनचक्र आहे तसेच चालू ठेवतात ते.त्यांना वर यायचे नाही किंवा वर येण्याची इच्छा सुद्धा नाही .विकास हा त्यांच्या ध्यानी मनी देखील  नाही .
नरबळी देणे हा अंधश्रद्धेचा झाला एक प्रकार .आणखी कहर म्हणजे पशुबळी देखील की करतात ही मंडळी .मुक्या जनावरांना ,निष्पाप जीवांना का म्हणून बळी दयायचे असे करून का आपली प्रगती होणार आहे का ? नाही न ? आपले काम यशस्वी होणार आहे का ?की आपण यशाच्या शिखरावर पोहोचणार आहोत का ?आपल्या यशाचा पाया हा एखाद्या जीवाची हत्या का असावी ?जीव घेतल्याने का आपल्याया यश मिळणार आहे ? यश अपयश हे आपल्या कर्तृत्वाच्या   बळावर मिळवायची गोष्ट आहे .त्याला दुसरा कोणी जबाबदार असूचं शकत नाही ?समाजात याचं लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेऊन ढोंगी बाबा जन्माला आले आलेत .लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन या ढोंगी बाबांनी आपले दुकान जोमात सुरु केले आहे .मुल होत नाही तर या बाबांकडे जाणारे लोक मूर्खपणाचा कळसच गाठतात .मुल न होणं  आणि  ढोंगी बाबाकडे जाणं याचा तिळमात्र तरी संबंध आहे का ? बाबा मंत्र ,तंत्र,अंगारे -धुपारे करून ,का अंगारा देऊन मुल जन्माला घालणार आहे .? एवढी खालच्या थराची बौद्धिक पात्रता लोक करवून  घेतात ते कळतंच नाही .चांगल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरकडे जाऊन ,चांगले मार्गदर्शन घेऊन समस्येचे निरसन करण्यापेक्षा ढोंगी बाबाकडे आपली अक्कल गहाण ठेवतात ? हेच मला कळत नाही .बर ढोंगी बाबाकडे जाऊन जर अशी मुल व्हायला लागली तर जगातील स्त्रीरोग तज्ञ मंडळीचे काय काम ? किंवा मोठी मोठी दवाखाने कशायला बांधली असती सरकारने एवढे साधे लोकांना कळत नाही. याचेच मला आश्चर्य वाटते .
आपण एखाद्या कामासाठी बाहेर पडत असलो आणि वाटेत जर मांजर आडवे गेले तर अशुभ घडेल म्हणून परत माघारी फिरतो ,पुढे जातच नाही .ही मानसिकता का ? ती बिचारी मांजर आपले असे काय बिघडवणार् आहे ,.ती तिच्या वाटेने जाते ,तिला काय माहित असते की आपण कोणत्या कामाला जात आहे ? तिच्या आडव्या जाण्याने असा काय फरक पडणार आहे ! मला तर हसू येते की मांजरीचा आणि आपल्या कामाचा काय संबंध आहे ? ती मांजर देखील म्हणत नसेल का ,की ही किती बावळट व्यक्ती आहे ,मला बघून मागे जाते ? तिला पण वाटायला नको का की माझे पण काम बिघडणार .खरोखर मांजर पण परत फिरली पाहिजे माणसे आडवी गेली तर .? खरोखर मांजराने असे केले तर ? म्हणून आपण या सर्व अंधश्रद्धानां बाजूला फेकून आपले कार्य केल पाहिजे ? नाही का .

ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या प्रकाराला थारा मिळतो कारण लोक शिक्षण आणि शिक्षणानेच प्रगत होत  असतात .प्रगत शहरापासून दूरचे अंतर.ही झाली ग्रामीण भागाची गोष्ट .पण आपल्या सारख्या शहरातील लोकांनी का अंधश्रद्धेला थारा द्यावा .चार दिवसापूर्वी शाळेतील माझी मैत्रिण भेटली .फार वर्षांनी भेट झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा ,जुन्या आठवणी निघाल्या बोलण्याच्या ओघात मी विचारले की कुठे  चालली आहेस ? तर ती म्हणाली की ज्योतिषाकडे खाद्याची अंगूठी बनवायला आणि तिच्या नवऱ्याच्या व्यापारात वाढ व्हावी म्हणून कोणता मुहूर्त चांगला आहे ? नवीन दुकान उघडण्यासाठी ? मी तर दोन मिनिटे तिच्याकडे आ वासूनच पहिले .तिला म्हणाले, आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांना या सर्वांची का गरज पडावी ? का बर आपण अंगठीचा आसरा घ्यावा ? मुहूर्त शोधून नवीन दुकान का बरे सुरु करावे ,” उत्तर होते आजच्या ,जमाण्याची क्रेज आहे ही “.फेशन असो व क्रेज हे चुकीचे नाही का ? ‘अंध्श्रेधेला क्रेझ  हे गोंडस नाव ‘दिलय या सुशीक्षितानी .मखमली कपड्यात गुंडाळून तिला गोंजारून ठेवले आहे .फेशन म्हणून नामकरण करून अंधश्रद्धेला चांगले सांभाळले आहे .आपण ग्रामीण भागातील लोकांना नावे ठेवतो की ते गावंढळ,अशिक्षित मग आपण सुशिक्षित असून तसे का बरे वागावे ? हीच का आपली सुशिक्षितपाणाची  ओळख .मी तिला समजविण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोक्यावर  अंधश्रद्धेचा पडदा पडला होता .त्यामुळे तिला समजावणे कठीणच ! एक वेळ झोपलेल्याला उठवता येईल पण झोपेचे नाटक करणाऱ्या ला कसे उठवणार ? असो ,मी माझे कर्तव्य केल त्याची त्याची इच्छा .माझी इच्छा तर फार होती की तिने ज्योतिष्याकडे न जाता स्व्कृत्त्वावर  विश्वास ठेवावा .

त्या दिवशी  आम्ही आदिवासी  पाड्यातील लोकांना समजवण्यासाठी प्रयत्न केले .ते आदिवसी लोक समजले ही असतील पण शहरातील या सुशिक्षितांना कोण समजवणार ? आपण असे एक न  अनेक प्रकार करत असतो .अशीच कांही उदाहरणे देते .बाहेर निघताना दही खाणे .दही खाऊन लांबचा प्रवास का चांगला होतो ? आपल्या पूर्वजांनी काहीतरी कारण असेल म्हणून या प्रथा सुरु केल्या असतील मी नाही म्हणत नाही .पण त्या वेळची अशी काही तरी परिस्थिती  असेल दही खाणे त्या त्या वेळेनुसार .स्थितीनुसार आरोग्यासाठी चांगले असेल.त्या मागचे श्स्त्रीय कारण आपण समजून घेतले पहिजे.हा खरोखरच अभ्यासण्याचा विषय आहे .म्हणजे केवळ पूर्वजांनी तसे केले म्हणून आपणास करावे लागले का ? त्यांना तर  आपल्या जीवाची आहुतीच द्यावी लागली .अशी एक न अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपले आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनासाठी  वेचले .

निसर्गाने आपणास  एक सुंदर असा ठेवा दिला आहे , “हे आयुष्य सुंदर आहे ,अधिक सुंदर बनूया “आणि आपल्या भारताला  अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त करूया .   



राधा शिंदे
कुमुद विद्या मंदिर .नेरूळ ,नवी मुंबई -७०६


   
 

No comments:

Post a Comment

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...