Friday, August 6, 2021

स्वचित्त बोध

स्वचीत्त बोध /बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

balajishinde65@gmail.com

दूरध्वनी क्र.9702 158 564

सोमवार २३ ,मार्च २०२० /२८ मार्च २०२०

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वचीत्त बोध

चित्त म्हणताच ‘मन’ हे डोळ्यासमोर येणे सहज आहे .मनाच्या शांतीसाठी गौतमी पुत्र भगवान शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपले आयुष्य खर्चून जगाला मनाचा शोध लाऊन दिला .

स्वतःला जगणे किती आवश्यक्य आहे हा संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सुखी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःला जगणे अगदी आवश्यक्य आहे .घरात ,मित्र -लोकात आणि समाजात जगणे आणि उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्वतःला जगणे आवश्यक्य आहे.उत्तम रीतीने जगण्याचा मंत्र बुद्धाने जगाला देऊन गेला आहे.

अध्यात्मिक  प्रगतीतून आपल्या मनावर कार्य करण्याचे  आपण शिकत असतो .यात मनाचा कार्यभार खूप महत्वाचा आहे.आपल्या मनावर काय कार्य करायचे आणि कसे कार्याचे हे मनामुळेच समजू शकतो .प्रश असा निर्माण होतो कि, स्वतःला जाणणे म्हणजे काय ? स्वतःला जाणणे म्हणजे शरीराचा आकार किंवा उंची किंवा रंग नसून स्वतःची वास्तविक माहिती असणे म्हणजे हि स्वतःची जाण न्हवे ? स्वचीत्त बोध म्हणजे स्वताचे ‘मन’ जाणणे हे  होय .

पण मन जाणणे ,चित्त बोध करून घेणे हे अवघड काम आहे .आपले मन आपण इतरांना दाखूऊ शकत नाही आणि मन प्रकट पण करून दाखऊ शकत नाही.कारण मन हि वस्तू नाही .ती निराकार आणि असीम अशी आहे .पण आपणास निरीक्षण करणारे ते मन आहे , मात्र त्याचे निरीक्षर करता हि येत नाही . त्यास ‘स्वचित्त बोध’ असे म्हणणे वावगे होणार नाही ,याची व्याप्ती खूप आघाड आणि असीमित आहे ते विशद हि करता येत नाही .  

‘स्वचित्त बोध’ हि एक निरंतर आणि वेगळी बाब आहे .यालाच चिन्तन असे म्हणता येईल .दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर आंतरिक,किंवा स्वतःवरील स्वताचे आंतरिक चिंतन असे म्हणू .किंवा मनातील सातत्याने बदलाचे चिंतन असे हि म्हणता येईल .मन हे अनात्मिक आहे ते सातत्य असून निश्चित प्रहावीत नाही.मनाच्या कप्यात  बदलाचे हेलकावे आणि बारकावे सतत चालत असतात (Mind is continues and changeable process in rational animal like human being ) म्हणून माणसाने सतत स्वताच्या मनाचे निरीक्षण (continues observation of own Mind) करावे .

मनाला सतत प्रश विचारात राहावे ,यात मन सुखी कि दुखी ,कुशल कि अकुशल किंवा माझी अवस्था धाम्म्कुल आहे का ?या हि पलीकडे जाऊन माणूस मनोवास्थेचा शोध करू शकतो किंवा घेऊ शकतो .मनोधर्माचा शोध म्हणजे धम्म विषयक अंगाचा शोध होय .मनोधार्माचा शोध घेत घेत त्याचे मर्म जानने हे होय.मन हे कांही भाजी पाला नसून लवकर टोपलीत येण्याची बाब नाही .म्हणजेच विकात घेण्याची बाब हि नाही .याच मानला प्रश विचारत दूरवर घेऊन गेले कि तिथे एक अशी अवस्था येते कि ,त्याचा परिपाक विपस्सनेमध्ये होतो.

सुरुवातीला आपल्या मनात काय चालले आहे ते कळत असताना आपण सुखी का दुखी हे ठरवत असतो .एक वेळ अशी येते कि हीच अस्वस्था जवळून पाहण्याची संधी प्राप्त होते.पण या अनुभवास आपण नाव देऊ शकत नाही ,जसे जसे मनाचे कोडे उलगडत जाते तसे तसे मन आणि मनातील अनुभव सखोल होत जातो .

जेंव्हा खरे स्वरूप कळण्यास सुरुवात होते तेंव्हा मनामध्ये निर्माण होणारे स्वरूप अनित्य आणि बदलाव घडउन आणणरे आहे हे आपण स्वतः अनुभवतो .आणि त्याची प्रचीती आपणास येण्यास सुरुवात होते .

आता आपली स्तिथी अशी येत कि मनातील एकण -एक बाब शून्य आहे असे जाणवते .हि स्तिथी प्रतीत्यसमुत्पादानुसार निर्माण होत आहे हे लक्षात येते ,मग मन हे एक वास्तविक आहे हे जाणतो तेंव्हा आपण धर्म्विविचय किंवा विपास्सनामय होतो .खर्या अर्थाने इथे तीपिटकातील अभिधम्म (तसे पाहता थेरवादातील  सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत, या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात.(अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे. ) मन अस्तित्वात येत असल्याचा भास निर्माण होतो ,कारण अभिधाम्मात मनाचे संशोधन करता यावे म्हणून त्यात चैत्यधम्माच्या याद्या करून दिलेल्या आहेत.

चैत्धर्म ..म्हणजे यात प्रत्येक चीत्तक्ष्णामध्ये विविध घटकांचा समावेश झालेला असतो ,आपले मन बाह्य जगाशी कसे जोडलेले आहे हे चैत्य्धर्म दर्शवतात ,एवढेच  नसून बाह्य मन आणि अंतर मन याचा कुठे संयोग होतो का ते शोध चालू असतो.आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्याची मानत होणारी जाणीव हे चैत्यधर्म होय.जाणीवेच्या नजरेतून पहिले तर बाह्य मन आणि अंतर मन हे वेगळे आहेत याची जाणीव सतत होत असते.म्हणून चैत्यधर्म समजण्यासाठी ती जाणीव होणे हे गरजेचे असते.

चैत्यधर्म पहा एका निर्देशकासारखा असतो , उंटावर किंवा  एखाद्या वाहनावर आरूढ होऊन आपल्या साथीदारांना आदेश देत असतो ,पण स्वतः त्याचा त्यात हिस्सा नसतो. आदेश देणारा हा चित्त तर एक एक सातीदार हा चैत्य्धर्म होय.जरी त्याचा त्यात सहभाग नसला तरी त्याचे तिकडे लक्ष मात्र सतत असते.

चैत्ययादी  मधील पाच धर्मातील एक म्हणजे ‘स्पर्श’होय .मनात घडत असलेल विषय हे संपर्कात  सामावलेले आहेत. विषयाला संपर्कात महत्वाचे स्थान आहे ,मन आणि विषय यांचा संपर्क नसेल तर चित्त हि उपस्थित नसते .इद्रीयाशी आलेला संपर्क आणि चित्त हा चित्तातील मुख्य विषय आहे .जिवंत इंद्रियात विषय निर्माण होत असतात .म्हणून ते इंद्रिय सतत जिवंत असायला पाहिजे .उदा.आपण झोपलेले आहोत आणि कोठून तरी आवाज कानी येतो ,पण तो कश्याचा आवाज आहे किंवा कोठून येतो ते कळत नाही ,झोपेत असताना तो आवाज आणि त्याची जाणीव होणे,पण तिथे आपले चित्त उपस्तीत नसते .तेंव्हा ते अनुभवावे लागते .यालाच लक्ष असे हि म्हणावे लागेल .इथे ऐकणे आणि लक्ष द्या असतला भाग होतो .

आपण एकाद्या कुत्र्याचे उदा घेऊ रात्री च्या वेळी कुत्रा जमिनीवर लोळत पडलेला असतो ,तो झोपेत नसतो पण कानी कांही आवाज आला कि एक कान वर उचलून मागमूस घेत असतो आणि परत दोन्ही कान सरळ करून झोपी जातो तो त्या आवजाची किंवा वस्तूची खात्री करून मगच झोपी जातो किंवा लोळत असतो .

अश्या प्रकारे आपले एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित होत नाही तोवर दुसरी तिसरी वस्तू आपल्या लक्ष्यात येते ,आणि मनात सुखद ,असुखद  वेदनांचा अनुभव सुरु होत असतो हाही चित्ताचा मुख्य घटक आहे .मानवी  वेदना या मानसिक अनुभव आहेत ,त्या शरीराने अनुभवता येत नाहीत ,त्या मानाने अनुभवाव्या लागतात .मनाच्या द्वारे मानसिक  वेदना अनुभवता येतात तर पंचइंद्रिया  द्वारे शरीराच्या वेदना अनुभवता येतात .सुखद आणि दुखद अश्या  दोन्ही वेदना आपण अनुभवत असतो .मानवात  वेदना निर्माण करणारा सर्वात महत्वास चैत्यधर्म आहे .

वेदनेतून मानवात जागृत भाव निर्माण होतो ,म्हणून वेदना हि सर्वात महतवाची चेतना म्हणावी लागते .

भौतिकचक्रा नुसार पहिले तर आपल्याला हे लक्षात येईल कि जेंव्हा आपण एखाद्या वेदनेला प्रतिकार देतो तीच आपली ‘तृष्णा ’ होय म्हणून बर्याच वेदना ह्या प्रतेक्ष्यात शरीरीरात सुप्त अवस्तेथ असतात .म्हणून आपल्यात असलेली वेदना आपण स्पस्ट पहिली पाहिजे .

चित्ताचा गुणधर्म ओळखण्याची  संज्ञा हि जाणून घेणे महत्वाचे आहे .एखादी गोष्ट जाणून घेण्यास आपण उत्सुकत असतो ,त्याचा अनुभव घेतो आणि त्याकडे आपण लक्ष देतो ,त्यामुळे आपल्यात विशिष्ट अश्या प्राथमिक वेदना निर्माण होतात ,पण त्या वेदना कश्याच्या आहेत ते आपणास पूर्णतः माहित नाहीत ,थोडक्यात इथे क्रमाने कार्य होत नाही .कारण कि वेदने पूर्वी ‘संज्ञा’ पण उत्पन्न होऊ शकते ,किंवा उपस्थित असू शकते.त्या वेदनेचा गुणधर्म समजला कि एखाद्या गोष्टीचा संबंध पुर्वानुबावाशी करीत असतो. नंतर ती वस्तू किंवा विषय आहे असे ठरवतो .एखाद्या दूरवर ठिकाणी आपणास विशिष्ठ वस्तू असल्याचा भास होतो  ,त्यास पूर्ण पाहिल्यावर आपण ठरवतो कि तो कावळा आहे त्याचा रंग  काळा आहे ,त्यास चोच आहे आणि दोन पाय आहेत ,तो कावळा म्हणून जेंव्हा ओळखतो  तो त्याचा गुणधर्म म्हणून ओळखतो .कधी कधी एखादी वस्तू ओळखून खुश होतो ,पण तो अनोळखी निघाली कि आपण जीभ तरी दाताखाली चावतो ,किंवा डोके खाजवतो आणि आपली चूक काबुल करतो .यालाच आपण ‘संज्ञा’ असे म्हणतो. सभोवतालचे जग आपण नेहमी ओळखतो आणि त्याचे वर्गीकरण करतो ,त्यास  संज्ञा असे म्हणतो. जशी आहे तशी ओळखणे हे  होय ,आणि ती आनित्य आणि दु:खमय आहे .   

जेंव्हा आपली विषयानुरूप हालचाल असते तीच ‘चेतना’ होय .चित्त हे नेहमी नवीन- नवीन हालचालीकडे धावत असते .ते कधी हि स्थिर नसते .नेहमी हालचाल करणारे चित्त हे निश्चित दिशेने पुढे सरकत असते .’पाच चैत्य’ हे चित्ता चा पाया आहे .

एक स्पर्श ,दुसरा मनसकार,तिसरी संज्ञा ,चौथी वेदना आणि पाचवा आणि अति महत्वाचा घटक चेतना या पाच बाबी कधी हि वेगळ्या करू शकत नाही ,त्या एकमेकात एकरूप असून प्रतेकासोबत असतात.याच पाच गोष्ठी खऱ्या  ध्यानाचा  पाया आहेत.

‘छंद’ उराशी बाळगून दृढ निश्चय  केला किंवा  निर्धार केला कि त्या विषयात आपण सातत्याने लक्ष केंद्रित केले कि आपला संकल्प पूर्ण होतो . बरीच लोक या पाच गोष्टीचा मेळ घालत नाहीत म्हणून ते पूर्णत्वाला जात नाहीत .त्या साठी छंद असणे हे मुळचे कारण होय .स्मृतीला एकत्र आणणे हे फक्त छंदा मार्फत करता येते. ध्यान करीत असताना आपण कुठेतरी असतो ,म्हणजे छंद आहे पण कुठे तरी भटकत असतो याचा अर्थ असा कि स्मृती नसते .स्मृती चा अर्थच असा आहे कि विखुरलेले घटक एकत्रित करणे होय .

आपल्या कडे छंद असेल  ,आणि स्मृती पण असेल ,तेंव्हाच आपण समाधी कडे जाऊ शकतो .आपल्याला पाहिजे तेथे मन एकाग्र ठेवणे म्हणजे ‘समाधी’ होय .स्वसनाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणे  ,मग समाधीतून आपण ‘प्रज्ञा’ कडे जातो .तसे पाहता समाधीच प्रज्ञा कडे घेऊन जाते .मन एकाग्र होते आपण जाणतो आणि ओळखत असतो .थोडक्यात आपणास खर्या स्वरुपाची माहिती होते .आपण ‘सत्य’ जाणतो ,कसलीच शंका उरत नाही त्यालाच विपस्सना असे म्हणतात.

हि ‘साधना’ केवळ आणि केवळ बुद्धाना प्राप्त झाली होती...

सिद्धार्थ वयाच्या सात वर्षापासून मनाच्या शोधात होता आणि त्यानेच एकट्याने मनाचा शोध लाऊन बोध हि  करून घेतला होता हे जगश्रुत आहे .

शनिवार २८,मार्च २०२० 

 

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...