Friday, May 29, 2020

कविता : मैत्री

#मैत्री

अवचित एखाद्या कातर क्षणी
सहज ओळखीचे होते कोणी

नसतो कुठलाही ऋणानुबंध
तरीही बांधला जातो बंध

आवडी निवडी जुळतात कधी
मतमतांतरे ही घडतात कघी

तरीही अलगद पडतात रेशीमगाठी
गुणांदोषांसह स्वीकारावे मैत्रीसाठी 

मैत्रीत कसले आलेत राग लोभ
मैत्रीत हक्काचे असावेत लोक

न सांगता मनीचे गुज उमजते ती मैत्री
न मागता सुखाची वाट दाखवते ती मैत्री

इवल्याशा सुखात मनभर आनंद देते मैत्री
नकळत चुकीला क्षमा करते ती मैत्री

न भेटता ही दृढबंध होत जाते मैत्री
जीवनातला निखऴ आनंद होते मैत्री..!!!  . . .

#antWork

कविता : वेळ बंद

वेळ बंद

 आज वेळ बंद आहे
 माझी तुझी त्याची आणि तिचीही

 आज वेळ बंद आहे ,घरची शाळेची 
 आणि कॉलेजची ही
 
 आज वेळ बंद आहे मंदिर ,मस्जित 
  आणि चर्च गुरुद्वाराची 

 आज वेळ बंद आहे माझ्या तुझ्या 
 नी त्याच्या कार्यालयाची 
 मंत्रालय आणि सचिवालयाची 

 आज वेळ बंद आहे तमाम देवाच्या 
 येजेंटाची जयवंत साळगावकर याची ही

 आज यांची ही वेळ बंद आहे टाटा आणि
 अडाणी अंबाणीची 

 पण खरंच वेळ बंद आहे हो ..
  त्या ऊस तोड 
 कामगारांच्या मुला बाळांची 
 वीटभट्टी  वर काम करणाऱ्या     चिमुकलीची

 आणि वेळ बंद आहे त्या गोवंडी खाडीत
 कचरा गोळा करणाऱ्या चिमुकलीची
 कचरा गोळा करणाऱ्या चिमुकलीची

प्रा.बालाजी शिंदे.

9702158564

balajishinde65@gmail.com


PM Care fund (?)

भारतीय जनतेस कळवण्यात आनंद होतो आहे नुकताच PM Care fund (?)  #PMNRF असताना ,स्थापन केला आहे ,त्यांना सांगा विमानात सर्व सामान लोड होत आले आहे ,रस्त्यावरील गरजू मजूर कामगार यांना मदत लवकर पहुचेल ,जिथे आहेत तिथेच रहा ,पुलाखाली ,#झोपडीत किंवा रस्त्याने गावी जात असेल तर जागा सोडू नका .जर आपली जागा/घर (असेल तर) किंवा भाड्याने राहत असतील (अचानक एवढी भाड्याची घरे कोणाची आली) सोडू नका ...दुसरी कडे मदतीचा हात चालू आहे ,नुकतेच आपले इतर देशात राहणारे भारतीय (इंडियन) यांना विमानाने फुकट घेऊन येण्याचे काम  अजून पूर्णत्वाला आले नाही (आणि त्यांना #कोरोनाची लागण पण झाली नाही ) 

या लोकडाऊन च्या झोन वर्गवारीत ,जर आपणास घरी ,आपल्या राहत्या घृही जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता फ्री / फुकट बसेस सोडल्या आहेत ,(बस वाले फक्त  रुपये 500 ते 1000 मागतील कांही प्रश न करता देऊन टाका).

बाहेरून (forigen) आलेले आपले इंडियन भाऊ आहेत ते दुरून आले आहेत त्यांना अगोदर घरी सोडावे लागत आहे तरी कृपया जिथे आहेत तिथे उपाशी राहून आपली काळजी घ्या .

PM फंडाची मदत (Rescue Team) आपल्या स्थळी येत आहे .या दरम्यान  आपल्या मनोरंजनासाठी सोबत ,जावडेकर ,अक्षयकुमार पण पाठवत आहोत .

घरात राहून कसे नाचत -नाचत आपले हात (AC flats and bungalows) धुवायचे याचे video clip  तासा तासाला बघायला मिळणार आहेत (TV वर) सोबतीला दिवसातून #रामायण #महाभारत आहेच . हे 2 मे ला संपले की ,कृष्णा आणि इतर तुमचा विवेक वाढवण्यासाठी देणार आहोत .

आपणास सरकार कांहीच कमी पडू देणार नाही गहू -ज्वारी पीठ आणि इतर खाद्य पदार्थ यावर मोदी/BJP लिहले असेल तेच खाद्य घ्यावे ,हे विसरू नका आमुची निशाणी ...

गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास बाहेर जाल तर तुम्हाला कोणी काठी मारून आडवे केल्याशिवाय सोडून देईल.

जसे जमेल तसे असतील तेवढे PM Care फंदात ऑनलाइन फंड जमा करा ,आपले आणि आपल्या परिवारातील सर्व सभासदांच्या खात्यात अगोदरच मोदी सरकारने जाहीरनाम्यात सांगितलंय तसं पैसे जमा केले आहेत हे आपणास ज्ञात आहेच तर मग उशीर कश्याला  pm care fund ( खाते  ) तुम्हा सर्वांना माहीत आहेच  .आजच सर्व भारतीय लोकांनी डिजिटल मोड द्वारे फंड जमा करावा .

(माझ्या fb wall वरून)

क्रमशः पी एम केअर निधी

प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

                                              balajishinde65@gmail.com


बुद्धपौर्णिमा.

एकच गोष्ट सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतात, कारण सर्वांची बुद्धी वेगळी असते

शिष्याने गौतम बुद्धांना विचारले की आपण एकच गोष्ट तीन-तीन वेळेस समजावून का सांगता?

उद्या ०७ में वुरूवार  गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे. याच दिवशी वैशाखाचा पुर्ण चंद्र दिसतो, त्यामुळे याला 'बुद्ध पौर्णिमा' किंवा 'वैशाख पोर्णिमा' असेही म्हणतात .
 बौद्ध धम्माचे  संस्थापक गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातील असे अनेक प्रेरणादायी प्रसंग आहेत जे आपल्याला सुखी आणि यशस्वी आयुष्याचा मार्ग सांगतात. म्हणून येथे एका अशाच प्रसंगाचे वर्णन केले आहे ज्यामध्ये सांगितले आहे की, सर्व माणसांची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. सर्वांची बुद्धी वेगळी असते, त्यामुळे एकच गोष्ट लोक आपापल्या पद्धतीने समजतात.

भगवान गौतम बुद्ध प्रत्येक गोष्टीला तीन वेळेस समजून सांगत असत. एक दिवस प्रवचन सुरू असताना तथागत एकच वाक्य पुन्हा-पुन्हा बोलत होते. त्यामुळे त्यांचा शिष्य आनंदने त्यांना विचारले की गुरूजी आपण एकच गोष्ट तीन वेळेस का सांगता? यावर बुद्ध म्हणाले, आजच्या प्रवचनात संन्यासा व्यतिरिक्त एक वेश्या आणि एक चोरही आला होता. तू उद्या सकाळी या संन्यासी, वेश्या आणि चोराला विचार की, कालच्या प्रवचनात सांगितलेल्या शेवटच्या वचनातून तुम्हाला काय समजले. सकाळ झाल्यावर आनंदला पहिले संन्यासी दिसला त्याने त्याला विचारले की काल रात्री तथागत यांनी सांगितलेले शेवटचे वाक्य, आपण आपले काम करावे? त्यामधून आपण काय शिकलात. यावर संन्याशी म्हणाला, ध्यान करणे आपले दैनंदिन काम आहे, त्यामुळे आपण ध्यान केले पाहिजे. आनंदलासुद्धा याच उत्तराची अपेक्षा होती. उर्वरित लोकांची माहिती घेण्यासाठी तो गडबडीने नगराकडे गेला.

आनंद नंतर त्या चोराच्या घरी पोहचला जो बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी आला होता. चोरालाही शिष्याने तोच प्रश्न विचारला यावर चोर म्हणाला की गुरूजी माझे काम तर चोरी करणे आहे. त्यामुळे मी चोरीच करणार, काल रात्री एवढा मोठा हात मारला की आता मला आयुष्यभर चोरी करण्याची गरजच पडणार नाही. असे उत्तर ऐकून आनंद आश्चर्यचकित झाला आणि त्या वेश्याच्या घराकडे निघाला.

वेश्यालाही आनंदने तोच प्रश्न विचारला त्यावर ती म्हणाली माझे काम तर नाचणे आहे आणि मी काल रात्रीसुद्धा तेच केले. या दोघांच्या उत्तरामुळे आनंद चांगलाच अवाक झाला आणि तेथून निघून आला. परत येऊन त्याने बुद्धांना घडलेली सर्व गोष्ट सांगितली.

यावर तथागत म्हणाले की, ही संपुर्ण सृष्टी अशीच आहे या जगात जेवढे प्राणी आहेत, तेवढेच विचारही आहेत. त्यामुळे गोष्ट जरी एकच असली तरी प्रत्येक व्यक्ती ती गोष्ट आपल्या वैचारिक क्षमतेनुसार समजून घेतो. यावर कोणताही उपाय नाही, ही सृष्टीच अशी आहे.

प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

                                              balajishinde65@gmail.com


.....म्हणे परत येणार ? काय मरायला येणार का ? \#बीआर🐜antwork.

.....म्हणे परत येणार ? काय मरायला येणार का ? \#बीआर🐜antwork.

मजूर ,कामगार ,घरगडी आणि फार्म हाऊस ,हॉटेल ,मॉल आणि गोदी कामगार ,टाटा ,बिर्ला आणि अडाणी अंबानी याना त्यांची जागा दाखवायची असेल तर ,आप आपल्या राज्यात कामे बघून आपल्या कुटुंबालाला आधार प्रेम द्यावे . पैसे हे सर्वस्व नाही ,आणि तो आज ही तुमच्याडे नाही आणि पूर्वी ही न्हवता ,तुम्ही येथील शोषित वर्गाचे खेळणे आहेत हे विसरू नका.
 स्थानिक कामगार आणि मजूर संघटनांनी आप आपल्या स्थानिक भागात रोजगाराची कामे सुरू करण्यास सरकारवर दवाब टाकून कामे निर्माण करावीत ,मग सगळ्यांचा माज कमी होईल ,रोजगार निर्मिती आणि कामगार पुरवठा नाही झाला तर सर्व दलाल ,मुजोर मालक ,कारखानादार ,छोटे छोटे उद्योग धंदेवाईक मस्तवाल ,मुजोर ,धनिक तोंडघाशील येतील ,आणि मजूर लोकांच्या जीवावर जगणारे अडचणीत येऊन धनिक आत्महत्या करतील तेंव्हा या लोकांना मजूर आणि त्यांच्या कामाची किंमत कळेल .

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुजुर कायदा केला ,आणि त्यांचे नियम तयार केले ,12 तासावरू  8 तासांवर कामाच्या वेळा निर्धारित केल्या ,तरी 8 तासापेक्ष्या जास्त काम करून घेण्याच्या तक्रारी आहेत .

मजुरांची पिळवणूक ,जादा काम ,कामात सुविधा न देणे ,कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण निर्मिती न करणे हे कायद्यात असून तशी सुविधा ना दिल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश निर्माण होतो आणि एकंदरीत त्यांचं कुटुंबिक वातावरणावर परिणाम होतो .

तरी ,सर्व श्रमीक  ,बाळ आणि महिला मजूर कामगार यांनी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी या मायावी नगरीत येऊ नये ...
शेवटी आपण कष्ट कोणासाठी करता ,आपल्या कुटुंबासाठी तर मग ,घरी राहा आणि आपल्या कुटुंबाला प्रेम आणि सहारा द्या ,त्यांना तुमची आज या "कोरोनाच्या काळात खूप गरज आहे ...

बालाजी शिंदे,नेरुळ -७०६
balajishinde65@gmail.com

www.ayjnihh.nic.in

आजचे कीर्तनकर्ते.

आजचे कीर्तनकर्ते /बीआरant🐜Work.

संत तोचि आपुला ओळखावा ....आज पायलीभर भुछत्रा सारखे Youtube धारक ,समाज प्रबोधन करतांना दिसत आहेत ,तो तसा तू तसा आणि ,विवेकशून्य ,चेतना रहित ,प्रज्ञा खुंटीला ठेऊन वा रे वा ss चे नारे लावत आपण किती मतीने छोटे आहोत असे स्वतः दाखवून देतो आहोत .
अमाप पैसे मोजून उकिरडे उखरत वर्तमान विसरून रोजच भटकत भूतकाळात जगत आहोत याची आपणास कधीच लाज वाटत नाही ,मूळ ग्रंथ वाचले की असे फुशारकी मारणारे गल्लाभरु कीर्तनकार आपोआप पिकल्या पणावत गळून पडतील ? 

थोरांचे विचार न वाचता वायफळ अर्धे ज्ञान ऐकूण आपण आणखी भडखाऊ होतो .आणि प्रलोभणास बळी पडतो ..या देशात दोन गोष्टी आहेत पैसे कमवण्यासाठी एक पाकिस्तान आणि दुसरा ब्रह्मन् .

देशाचा प्रश आला की पाकिस्तान म्हणवून आवाज उठवला की तुम्ही देशभक्त ? पाकिस्तान नसता तर ,चीन होताच ,आणि दुसरा म्हणजे ब्रह्मन् ,...

बुद्ध साहित्य जरी ब्राह्मणाने लपवले तरी वृद्धी पण बरह्मणाने केली होती असा इतिहास आहे (बुधघोष) सर्वच ब्रह्मन् दुष्ट नाहीत ..हा फोफाटा किती दिवस चालणार आहे ...?

'आज वर' भाष्य कोणी करीत नाही ..आज कामगार संघटनेचे बोला ,कुठे गेले ते ? असंख्य कामगार मरत आहेत ,चीरडले जात आहेत ,त्याचे प्रश मांडा ,कायम रोजगार द्या ,शिक्षण द्या ? गरिबाला न्याय मागा न्याय मिळत नसेल तर सत्ता उलटण्याचे कारस्थान करा आणि 'समता' स्थापनेची हाक द्या ...कधीतरी समतेची शिकवण द्या ?

पण हे होताना दिसत नाही ? हे येथील बहुजनांच्या दुःखाचे मूळ कारण आहे ...

आज 'आजार हाल्याला ,आणि इंजेक्शन  पखालाला '

 अशी शिक्षित ,डॉक्टर ,वकिंल आणि नेते मंडळीनी समाजाची अवस्था करुण ठेवली आहे ..त्यास कोन जवाबदार नाही ,मी, तो ,ती आणि सर्व बहुजन जवाबदार आहेत .

"... #राष्ट्रसंत #तुकाराम #महाराज म्हणतात "

 " कीर्तनाची विक्री मातेसी गमन
  धन खाई भाड चांडाळ तो "

त्यांनी आपले कीर्तन किंवा ध्यान हे कमाई चे साधन म्हणून वापर केला नाही ? रात्री कीर्तन आणि दिवसभर काबाड कष्ट करीत.
आज कीर्तन म्हणजे कमाई अशी व्याख्या आहे पण अशी समाज बाह्य ' व्यासपीठ कर ! ( व्यास रागावणार तर नाही ?) कश्याला हवे आहेत ..? आपले 'चित्त' हरपले की दुसरा जागा घेतो तेच आज सर्वत्र आहे ! वरच्या गोष्टी बघून वाचन न करता ,एखाद्या उंच बोल्या 'खोटं बोल पण रेटून बोल'  आवाजाला वाssवाss करतो तेही पैसे मोजून ..?
पण आज अश्या भोंदू कीर्तनकाराची गरज आहे का ?
आज प्रश्न वेगळी आहेत ? आणि हा आजचा डाव वेगळा आहे .

बालाजी शिंदे ,नेरुल ७०६
9702158564
balajishinde65@gmail.com

चीनी भासेचा भाषांतरकार भिक्खु कस्यप मातंग .

चीनी भासेचा भाषांतरकार भिक्खु कस्यप मातंग

 

चीनमध्ये बुद्धाधम्मचा शिरकाव केंव्हा आणि कसा  झाला हे निश्चितपणे  सांगता येणार नाही ,पण असे म्हणतात की एका राजाच्या फौन नावाच्या मंत्र्याने कन्फुसीएसला विचारले की ,’जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे ?’ कन्फुसीएस ने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले की ,पाछिमेच्या देशात राहत असलेला एका स्वर्गीय तत्वज्ञानी माणसाबद्दल मी एकले आहे .या कथेचा संधर्भ देऊन बहुतेक सर्व चीनी बौद्ध असे अनुमान काढतात की ,कन्फुसीएसला बुद्धबदधल माहिती होती. हे त्रिकाल सत्ये आहे .

 

कस्यप मातंग आणि चू-फालीन ई स ६७ मध्ये प्रथम चीनला धम्म प्रसार आणि प्रचारासाथी गेले .

कस्यप हा मातंग बौद्धिस्ट भिक्खु होता . हे बुद्ध साहित्यात अंकित आहे . मातंग ऋषि ,मातंगी ,तिची चांडाळ पुत्रि कृतिका हे सर्व संधर्भ बौद्ध काळात अभिधम्म पिटकात -कथावत्थुत घडलेल्या कथात आढळतात . कस्यप मातंग आणि चू फालीन (धर्मरक्षक )हे दोघे प्रथम यू ची येथे मध्ये आशियातील खाता जवळ भेटले .

कस्यप मातंग हा महान बौद्धधम्म प्रसारक होता आणि चू फालीन हा महान बौद्धधम्म रक्षक होता . या दोघांनी आपसात सल्ला मसलत करून धम्म आणि धम्मा चे पुरुजीवन करण्याचे ठरवले . पांढऱ्या घोड्यावर बसून साठ लाखाहून जास्त शब्द भंडार असलेल्या संस्कृत भासेतील बौद्धधम्म ग्रंथ आणि बौद्ध मूर्ति घेऊन धम्म प्रसारासाठी चीन ला निघून गेले .

कस्यप मातंग आणि चूफालीन या दोन भारतीय बौद्ध धम्म भिकुणी चीनचा  सम्राट मिंग टी  याला भेट दिली ,धम्म प्रसार आणि प्रचार साठी आल्याचे कळवले . सोबत घेऊन गेलेल्या वस्तु म्हणजे ,धम्मग्रंथ आणि गौतम बुद्धाची मूर्ति भेट स्वरूप दिली .

या चीन च्या सम्राटाने कस्यप मातंग आणि चूफालीन यांचा औचित्य पूर्व आणि आदर पूर्वक भव्ये सत्कार केला . सत्कारा नंतर होलू येथील विहारात त्यांची राहण्याची सोय करन्यात आली . येथे वास्तव्यात राहून यांनी धम्मप्रसार आणि प्रचार करणायस सुरुवात केली .

 

कोणत्याही गोस्टिची प्रसिद्धी किंवा प्रचार रीतसर आणि योजना बद्ध आणि अविरत न रोकता करायचा असेल तर तेथील राजदरबारी त्या साहित्याची दखल असायला हवी ,थोडक्यात राजाश्रय हवा आणि तो चीनच्या सम्राटने बहाल केला होता म्हणून इथून बौद्ध धम्माच प्रचार आणि प्रसार करता आला . तीच गत श्रीलंका ,ब्राह्मदेश ,लाओस ,कंबोडिया आणि जपान मध्ये झाली आणि धम्म भरभराटीला आला .

 

राजा अशोकाच्या काळात भारतात तेच झाले ,सम्राट राजा अशोकाने बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्य शोधून काढून त्याचे पुर्नुथान केले .येवढ्यावर न थांबता ई. स. ३ ऱ्या  शतकात पहिली धम्मसंगीती घेऊन जगभरात धम्माचा प्रसार आणि प्रचार केला . आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र याला श्रीलंकेत प्रचारासाठी पाठवले ,इतीहासात हा सर्वात मोठा धम्मप्रचार आणि प्रसारा साठीचा  दुवा मानला जातो . पण दुर्दैवाने राजा असोकाच्या बृहदत्त या नातू ने त्याचा ब्राह्मण सेनापति पुस्येमित्र शुंग याचेकडून धोक्याने वढ केला आणि स्वतःस राजा महणून अभिषेक करऊन घेतला.

प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की यानेच वैदिक धर्माचे पुनरुज्जीवण केले यज्ञसंस्था परत सुरू केली . नव्याने पुराणे,स्मृति  आणि कांही ब्राह्मण ग्रंथ लिहऊन घेतले. याचा अर्थ परत ब्राह्मणी युग सुरू झाले या युगाची सुरुवात देशात इंग्रज येई पर्येंत सुरूच राहिली . 

सम्राट राजा अशोकाने बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्य शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवण केल तो जसा राजाश्रय होता ,तीच बाब कस्यप मातंग आणि चू फा लीन यांचे बाबतीत चीन मध्ये घडली होती ,यांना भक्कम राजाश्रय दिला गेला होता .

 

आता प्रचार आणि प्रसारासाथी ठिकाण निश्चिती लागते ते त्यांना चीनी सम्राटाने  देण्याचे मान्ये केले . त्यांची हो लूयेथील विहारात  राहण्याची सोय ही करण्यात आली लो फू पुढील एक वर्ष काळानंतर ते लो वाइंगशहराच्या पश्चिम दिशेला दरवाजा बाहेर स्वेत अश्वनावाचा भव्ये विहार बांधण्याची राजआज्ञा ही दिली होती . आज हे विहार भारतीय आणि चीनी बौद्ध धम्माचे संगमस्थान म्हणून मानले जाते. या विहारचे आधुनिक नाव व्हाईट होर्स हाऊसअसे संबोधले जाते , लगबघ ३,४५० क्षेत्रफक असलेला विहार आज दिमाखात धम्म देसणाचे स्थान होऊन बसला आहे .त्या काळात इथूनच आशिया आणि दक्षिण पूर्व-आशिया खंडात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रवास सुरू झाला होता .

व्हाईट होर्स हाऊस  येथून महान दार्शनिक बुद्ध भिकु कश्यप मातंगाने बेचाळीस सूत्ताचेचीनी भाषेत भाषांतर केले होते. महणून भिक्खु संघात महान दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मातंगाला आणन्ये साधारण महत्व आहे . याच भाषांतर कार्याने महान दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मातंग ,चीनी भासेचा भाषांतरकार म्हणून बुद्ध साहित्यात प्रसिद्ध आहे.

दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मतांग याने मिंग टी  सम्राटाच्या अनुमतीने चीन मध्ये बुद्ध धम्माच्या प्रसाराचे काम सुरू केले . आणि तो काळ ई स ६७ चा होता .

वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही धर्माची उन्नती ,विकास आणि वृद्धी हवे असेल तर राजाश्रय खूप महत्वाचा भाग होय आणि नेमके तेच ई स ६७ मध्ये घडले आणि बुद्ध धममच्या प्रसारास चालना मिळाली .

नंतर च्या काळात धम्म प्रसारा आणि आभ्यास करण्यासाठी अनेक भारतीय भिक्खु भारतातून चीन मध्ये गेले आणि चीन मधून भारतात आले . इथून खर्याल अर्थाने आशिया आणि दक्षिण पूर्व-आशिया खंडात बुद्ध धम्माचा प्रचार सुरू झाला . याचे श्रेय भिक्खु कश्यप मातंग याच्या वाट्याला जाते .

तेंव्हा पासून ते आज तागायत बुद्ध धम्म प्राप्ती साठी बुद्धांच्या पवित्र स्थळाचे ,धम्माचे दर्शन घेण्यासाठी अनेक चीनी बुद्ध भिक्खु भारतात येतात .

 

चीनी लोक जंबुद्वीप देशात आज  केळव बुद्धसाधनेसाठी येताना दिसत आहेत .

इतिहासाची पाने पाहत असताना ,सुरवातीच्या काळात चीन देशात बुद्ध त्यांचा धम्म हा सरळ मार्गी गेला न्हवता तो मध्ये- आशियातून चीन देशात गेला होता . तसे पाहता चीनी आणि भारतीय भिक्खुनी विविध माध्यमाद्वारे हजारो भारतीय बौद्ध ग्रंथ प्रती भारतातून चीन मध्ये घेऊन गेल्याचे पुरावे सापडतात .हेच बुद्ध धम्माचा महानतेचे प्रतीक होय .

 

बुद्धानंतर च्या काळात एखाद  दूसरा ग्रंथ जसे मंजुश्रीमूलकल्पसोडला तर एक ही ग्रंथ अस्तीत्वात न्हवता . म्हणून प्राचीन काळी प्रचार आणि प्रसारचे कार्य चीनी भाषेतुन जास्त झाल्याची आणि झाले असल्याची असंख्य पुरावे मिळतात .

संदर्भ :

बुद्धधम्मचे संदेशवाहक भाग :१ तीन चीनी प्रवाशी : मा. शं.मोरे २७ एप्रिल १९८२ 

दीघनिकाय भाग १ - अनुवादक : वसंत धावरे. सुगावा प्रकाशन ,पुणे.१४ एप्रिल १९८८

बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुवादक : प्रा. देवीदास घोडेस्वार. १३ ऑक्टोबर २०१३बुधवार २७,मे २०२०

 

                                                                            प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

balajishinde65@gmail.com


धम्म दान.

IIधम्म दान /बीआरantWork.II

बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागताने जानलेला, दिव्य दृष्टिने पाहिलेला धम्म जगातील मानव प्राण्यांच्या कल्याणार्थ प्रर्वतीत करण्याचा संकल्प केला. बुध्दापासून निघून गेलेल्या त्याच पंचवर्गीय भिक्खुना बुध्दाने प्रथम धम्म प्रतिपादन करून धम्माचे चक्र प्रवर्तीत केले.

बुध्दाने बौध्द उपासकांसाठी जे दहा गुण सांगितले त्यालाच पारमिता असे म्हणतात. पारमिता म्हणजे श्रेष्ट गुण आणि जो हे गुण पार करतो तोच बुद्ध होय’.

या गुणांना म्हणजेच आचरणाला पारमी असे म्हणता . या दहा पारमी होत.

1.   शील पारमिता

2.  दान पारमिता

3.  उपेक्षा पारमिता (नेक्खम्मात्याग )

4.  नैष्कम्य पारमिता (पण्ण)

5.  विर्यपारमिता

6.  शांती पारमिता (खान्ति )

7.  सत्य पारमिता

8.  अधिष्ठान पारमिता

9.  करूणा पारमिता

10.मैत्री पारमिता (मेत्ता भाव )

 

आता दान पारमी काय ते बघू या . दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात शील  नंतर दुसर्‍या क्रमांकाचे  महत्व आहे. दान करणे हा श्रेष्ठ गुण होय.ज्या कडे हा गुण आहे तो खरा धम्म जाणतो असे म्हणतात दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. माणूस घेण्याएवजी  देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते. जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे.

पण आज दांनाची परिभाषा पूर्ण निघून गेली आहे . दान देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्या कडून काहीही अपेक्षा करू नये असे असताना त्या मोबदल्यात स्वताला सतत प्रासर मध्यावर झळकत ठेवण्यासाठी दान केले जात आहे . दोन पार्ले बिसकुट चे पाकेट वाटून दहा फोटो काढल्या जात आहेत .

फोटो घेणे ही अपेक्षा नाही का होत ,हीच तर खरी धर्म आणि धमामतील घपलत आहे . कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे. सुखप्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, धनप्राप्ती. पाप मुक्त व्हायचे म्हणून, दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे.हा धर्माचा भाग आहे ,असे दान हे धम्म दान होऊ शकत नाही याचा  देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. बौध्द उपासक आणि उपासकिने  धन, द्रव्य, वस्त्र, रक्त व प्रसंगी शरीरिक श्रम दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय. समाजाला दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा प्रतेक्ष - अप्रत्यक्ष का होईना पण सहभाग असतोच . दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्यात , तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल होईल, म्हणून बौध्द उपासकाने शक्य तेवढे दान देत राहावे यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ शकतो . यामुळे  तृष्णेचा क्षय होतो , समर्पनाची प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय, धम्माच्या प्रसार, प्रचारासाठी दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. पण सोंग ढोंग करून भिक मागण्याऱ्यांना, कर्मकांड, देव -दैवतांचे नावावर दान देऊ नये. निरर्थक उत्सवांना दान देऊ नये.

मला इथे एक गोस्ट सांगावी वाटते . धरण किंवा तलावात छोट्या मोठ्या नद्या आणि नाल्यातून पाणी येऊन तलाव किंवा धरण काठोकाठ भरते ,ते फुटू नये महणून अधुन -मधून त्या तलावाचे दरवाजे उघडून पाणी सोडून त्याचे अस्तित्व कायम टिकवले जाते . तीच गत आपण श्रमाने कामावलेल्या  संपती ची आहे ,जर दान रूपी तलावाचे दरवाजे अधुन -मधून उघडले नाही तर एक वेळ अशी येते की तलाव वाहून जाते . महणून बुद्धाणे संपत्ति संचय नाकारला होता. गरजे पूर्ती साठवण करणायस सांगितली होती .जो खरा धम्म जाणकार आहे आणि तो धम्मा त आहे  तो कधीच संपती संचय करीत नाही

तर मग चला दिन दुबळ्याना दान करून कसलीच ( फोटो विडियो ) अपेक्षा न करता आपला धम्म दांनाचा नियम पाळा . आणि सदैव दान करा.

@@@

सर ,

नमस्कार .

मी प्रा.बालाजी शिंदे ,गेली २५ वर्ष दिव्यांगजन ( Disabilities )  क्षेत्रात कार्यरत असून कर्णबधिर हे माझे  कार्येक्षेत्र आहे . आपला अपंग क्षेत्रातील लेख वाचून कोणते आपंग हे कळत नाही ? कर्णबधिर (HI),अंध (VI) ,अस्थिवयंग (OH) ,की मतिमंद (MR) . लेखाचा आशय ठीक आहे , शुभेचा ,पण विकलांग किंवा अपंग म्हणून विसंगती वाटते . यात कोणती दिव्यांगता विशद होत नाही ?

अधिक माहिती साठी ...

Ministry of Social Justice and Empowerment ,Govt of India येथे भेट द्या .

कांही अधिक माहिती हवी असेल तर ,मिराज च्या कर्णबधिर  शाळेत माझा सदर्भ देऊन श्री. गढवीर सर ( विशेष शिक्षक कर्णबधिर यांचेशी संपर्क साधा )

 

प्रा.बालाजी शिंदे.

balajishinde65@gmail.com

9702158564

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...