Showing posts with label मुस्लिम धर्मातील अंधश्रध्दा.. Show all posts
Showing posts with label मुस्लिम धर्मातील अंधश्रध्दा.. Show all posts

Monday, October 24, 2022

पुस्तक: तीमिरभेद

डॉक्टर शमशोद्दिन तांबोळी लिखित धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धेचा.
पुस्तक : #तिमिरभेद. हे पुस्तक वाचनात आले.

..... प्रा बी आर शिंदे,नेरूळ ७०६

लोकेश शेवडे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून मुस्लिम समाज कसा  मागास आहे त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धा रुढी परंपराच  अत्याधिक कश्या  आहेत. असा एक समज गेली अनेक वर्ष जगभरात सर्व धर्मीयांमध्ये रुजला आहे.

भारतात तर हा समज मागील अनेक दशकात इतका पक्का झाला आहे की समज काही विशेष गट हेतूपुरस्र पसरवत असावेत अशी शंका येते .कोणत्या धर्माच्या नेमक्या किती टक्के लोकांमध्ये नेमकी किती प्रकारच्या अंधश्रद्धा, रुढीपरंपरा नेमका किती खोलवर प्रभाव आहे याची विश्वासाने आकडेवारी आज पावेतो कुठे पाहायला देखील मिळत नाही.

पसरवलेल्या बातम्या या पूर्वग्रहावर जास्त आधारित असाव्यात असे सिद्ध होतं.

इतरांच्या रूढीप्रथा म्हणजे आपले हसू लपवण्याचा प्रयत्न असे आहे . सव्वाशे वर्षापूर्वी आगरकर दिलेल्या ' नकट्यांनी नकट्यास' हसण्यात काय अर्थ आहे. खरे झाले आहे. सार्थक झाले आहे.

या पुस्तकात वास्तविक श्रद्धा म्हणजे ' चिकित्साहीन ' विश्वास म्हणजेच चिकित्सा न करता विश्वास ठेवल्या त्याला श्रद्धा म्हणतात याचाच अर्थ श्रद्धा हीच अंधश्रद्धा असते.अशी  उत्तम चिकित्सा ' श्रद्धा आणि अंधश्रद्धा' यावर केलेले दिसते.

#धर्म : धर्म ही बाब मनुष्यमात्रात इतक्या खोलवर रुजली आहे की धर्म नाकारल्यास बहुसंख्य लोकांना स्वत्व नाकारल्यासारखं वाटतं धर्मावरचे प्रहार  त्यांना स्वतःवरचे प्रहार वाटतात आणि ते संवादच बंद करून टाकतात. हे विदारक या पुस्तकात मांडलेले आपल्याला पहावयास मिळते.

यात ' कडकलक्ष्मी किंवा पोतराज' यांचे उत्तम उदाहरण दिलेले आहे. स्वधर्मावर टीका करणाऱ्या बंडखोर विचारवंतांची अवस्था ही पोतराज सारखी होत असते. नरेंद्रभकर अमित दलवाई यांची अवस्था वेगळीच झाली नव्हती.

असो, आपण आता मुस्लिम श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी बोलूया. पुस्तकातील एकूण बारा प्रकरणातील अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांतील श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकलेला दिसतो आहे.

आज मुस्लिम समाजातील बुरखा ,मशिदी वरील अजान भोंगा ,तलाक बहुपत्नित्व , हिजाब,बुरखा यासारखे विषयी आज वाद विवादाच्या केंद्रस्थानी आहेत. एकेकाळी  अजान चा आवाज पवित्र वाटायचा त्या आवाजात  मुस्लिम गोडवा होता. आज हा आवाज इतरांना कर्कश वाटत असेल किंवा ध्वनी प्रदूषणात कारणीभूत असेल तर बदललेल्या परिस्थितीत याची योग्य अयोग्यता तपासली पाहिजे. ' नमाज ' ची आठवण करून देणारी ' अजान ' प्रथा निर्माण झाली तेव्हा ती सामाजिक वैज्ञानिक स्थिती ही आजच्या काळातील तंत्रज्ञानाने निर्माण केली स्थिती यातील फरक समजून घेणे आणि त्याला त्रास होणार नाही शांतता भंग होणार नाही याचा संबंध सुविचार समाजातील सभ्यता व्यक्त करते.

आपला समाज अद्याप धर्म चिकित्से साठी तयार नाही धर्माची स्थापना ईश्वराने केली आहे धर्म आणि ईश्वर या विषयावर बुधीप्रामाण्यवाद्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. याचे कारण असे की एखाद्याची 'श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा' होऊ शकते.

या समाजावर अनेक इस्लामिक राष्ट्राचा प्रभाव दिसून येतो. अरबस्थानात इस्लाम अस्तित्वात आला त्या काळात सर्व स्थानात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा त्याचे हे मूळ कारण होय. मुलगी जन्मताच पुरून  टाकण्याची पद्धत होती. पुरुषांनी किती महिलांशी विवाह करायचा यावर मर्यादा नव्हत्या गृहीत वर्गाकडून आर्थिक शोषण होत होते. सावकार शाही होती मुस्लिमांना पळवून नेले जात होते .जुगार आणि व्यसनाधीनता होती .लुटमार करणार्या गोळ्या होत्या. अशा परिस्थितीत मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली .धर्माची नाही . उतम विचारांच्या आदान - प्रदानाची.त्याचे फलस्वरुप ' कुराण ' अस्तित्वात आले.नंतरच्या काळात  पैगंबर याला केंद्रस्थानी मानून त्याचा ईश्वरी आधार घेण्यात आला. आणि हे पुढे आज तागायात  चालत आहे.

ज्यांचे ' इमान' नाही तो मुस्लिम नाही.अशी एक धारणा  तयार झाली. पुढे चालून धार्मिक तत्त्वज्ञान दोन गटात विभागण्यात आले. पहिला ' परलोक '  विषयाच्या आणि दुसरा ' इहलोक ' मुस्लिम समाजाबद्दल बोलायचे झाल्यास याला ' इबादत ' आणि ' आदत' असे होते ' इबादत ' मध्ये व्यक्तीचा परमेश्वराशी संबंध असतो तर ' आदत' मध्ये व्यक्तीचा इतर व्यक्तीशी माणसाची ,समाजाची किंवा देशाशी संबंध असतो या अर्थाने अभिवादन ही व्यक्ती स्वातंत्र्याची किंवा धर्म स्वातंत्र्याची बाब आहे. ' इबादत ' केल्याने त्यांचे इतरांना वाईट परिणाम होत नाहीत ' आदत ' ही दैनंदिन जीवनाशी निश्चित असल्याने ती परिवर्तनी असली पाहिजे जी परिवर्तने आहेत त्याला दैवी म्हटल्यामुळे त्याचे अनाथात आणि अंधश्रद्धेत रूपांतर झाले.

खरे तर हा विषय खूप मोठा आहे आणि गंभीर पण आहे .पण समाजातील मुल्ला मौलवी  यांनी यापूर्वीच  ' स्वतःचा इस्लाम' समाजाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. जे कुराणात आहे तो इस्लामला अनुसरून आहे .आणि जो कुराणात  नाही तो इस्लाम विरोधी आहे असा संदेश देऊन अनेक समस्या निर्माण केली आहेत.

परिणाम असा झाला की समाजाचा विकास होण्याऐवजी समाज काल बाह्य झाला.

जगातील कोणत्याही धर्माचा उदय असो तो पुरुषप्रधान आहे .जेव्हा इस्लाम अस्तित्वात आला त्या काळात पुरुष प्रधान होता महिलांना दुय्यम स्थान होते.

शेवटी या समाजातील "मुल्ला आणि मौलवी " यांनी  मोहम्मद पैगंबर,कुराण याला मूठमाती  देऊन मुस्लिम समाजातील स्त्रियांवर खूप मोठा अत्याचार आणि अन्याय केला आहे.

श्रद्धा आणि त्या श्रधेतून उदयास आलेल्या अंधश्रद्धेतून  येणारी वाईट चालीरीतीचे  पाळीमुळे रचली आहेत.

पुस्तक  वाचताना असे नजरेत येते  की, स्त्रियांचा सुंता होतो. हे मी प्रथम वाचले हे मला माहिती न्हवते.

पुढे जाऊन या पुस्तकात अशी माहिती आहे की एखाद्या घरात स्त्री मृत्यू झाली तर त्या स्त्रीला तिच्या पतीने मृत वेळेच्या वेळेपासून चार तासाच्या आत संभोग केला तर तिला शांती मिळते ,ती अल्लाच्या  दरबारी जाते. त्यापेक्षा काय वेगळी अंधश्रद्धा असू शकते आता इथे मी थांबतो.

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...