Saturday, June 27, 2020

राजर्षी : राजा शाहू महाराज

राजर्षी : राजा शाहू महाराज

हिरे ,माणके ,सोने उधळा ,जयजयकार करा

जय राजर्षी,शाहूराजा ,तुजला हा मुजरा !


-सूर्यकांत खांडेकर  

शाहू तेरा मिशन अधुरा बी एस पी करेगी पुरा –कांशीराम

(कोल्हापूर येथे एतीहासिक आरक्षण चळवळ शताब्दी महोत्सव छ.राजर्षी शाहू महाराज जयंती समारोह .)

हिंदुस्तान च्या प्राचीन इतिहासात विश्वमित्र व जनक या दोघांना ‘राजर्षी’ महणून गौरविले गेले होते . त्यानंतर त्या मालिकेत ‘राजर्षी’ ही पदवी विभूषीत करणारे करविर (कोल्हापूर ) संस्थान चे अधिपति शाहू महराज हे होत . कागल चे अधिपति जयशिंगराव उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महराज हे पुत्र.

आखील भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद नागपुर येथे ३० व ३१ मे  आणि १ जून या प्रमाणे तीन दिवस श्रीमहाराज राजर्षी  शाहू छत्रपती ,सरकार करविर यांच्या आदधेक्षेतखाली मोठ्या थाटात पार पडली . 

एकूण १४ ठराव पास झाले त्यात ठराव  ६ वा ठराव  – प्राथमिक शिक्षण मुलांना आणि मुलींना मोफत व सक्तीचे शक्य तितक्या लवकर सुरू करावे असा होता . 

यामुळे सक्तीच्या शिक्षणाचा फायदा  तोपर्येंत  पास झाला न्हवता  तोपर्यंत हे वरिष्ठ  वर्गाचे लोक सरकारला नावे ठेवीत होते ,परंतु १९१७ साली हा कायदा मुंबई इलाख्यात पास झाला आणि सकतीचे शिक्षण सुरू झाले.
 (मुकनायक मुंबई ,शनिवार १५ जून १९२०). 

मागास जातीचा विकास करण्यासाठी तळमळ नेहमी असे . त्या समाजाला नैसर्गिक हक्काची जाणीव निर्माण करून देण्यासाठी पहिले धाडशी पाऊल उचलले आणि याचे परिणाम कोल्हापुरात न्हवे तर अखिल महाराष्ट्रात ब्राह्मण वर्गात खळबळ उडाली . याच काळात महाराजांनी बहुजनसाठी अनेक उपक्रम राबवले.
 
राखीव जागांचा जाहीरनामा
अस्पृश्यता – निवारण कार्ये आणि इतर कार्य अलौकिक आहेत.
 
महाराजांचे शैक्षणिक कार्य –

मा. फुले यांनी मागासलेल्या दिनदलित अश्या बहुजन समाजाला शिक्षणाची संजीवनी दिली आणि समाजक्रांतीचा आरंभ केला . तोच समजक्रांतीचा वारसा  सांगितलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी चालू ठेवला . बहुजन समाज शहाणा कारायचा असेल तर शिक्षणाची गंगोत्रि खेड्यापाडतील गोरगरिबांच्या झोपडपट्टीत गेली पाहिजे . समाज शिक्षित झाल्याशिवाय चांगले काय आणि वाईट काय हे उमजणार नाही शिक्षण दिल्यानेच बहुजन समजाचा सर्वकष उत्कृष्ठ होईल व त्यातून उत्तम शेतकरी ,शिक्षक दिल्यानेच बहुजन उत्तम व्यापारी ,उत्तम सैनिक निर्माण होतील परिणाम सर्व समाज संपन्न होईल. 
आपल्या राज्यातील प्रजाजनास किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळाले पाहिजे या एकाच ध्यासातून महाराजा राजर्षी यांनीआपल्या राज्यात ८ सप्टेंबर १९१७ रोजी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जारी केला . एक स्वातंत्र खाते जारी करून ते स्वतः देखरेख करू लागले यात ‘एड्युकेशन डायरेक्टर ’आणि ‘एड्युकेशन इसन्पेकटर’ या अधिकाऱ्याची  नेमणूक केली . जिथे जागा मिळेल तेथे शाळा सुरू केल्या ,समाजातील संपूर्ण वर्गाला या कार्यक्रमात सहभागी केले  . जे लोक आपली मूल शाळेत पाठवत नाहीत त्यांचेवर दंड बसवला आणि तसे कायदे केले  . तीन दिवसाच्या आत मुलांना शाळेत नाही पाठवले तर दंड वसुलीचा कडक कायदा केला . अगदी खालच्या घटकास शिक्षण मिळावे महणून महाराजांनी अविरत प्रयत्न चालवले .त्या काळी शिक्षणासाठी दरवर्षी १ लाख रुपये खर्च करीत होते . इंग्रज सरकार मात्र महाराष्ट्र ,गुजरात आणि सिंध या अफाट प्रसदेशाच्या मुंबई इलाख्यासाठी शिक्षणाचा १ लाख रुपयेही खर्च करीत नव्हते ,हे ध्यानात घेतले की तुलनात्मक दृष्ट्या महाराजचे शिक्षणावरील महत्व लक्ष्यात येते . 
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून महाराजांनी  कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.ज्या आज त्याची फळे चाखत आहेत . 
वसतिगृह हे त्यांचेच नाव जनक म्हणून पुढे येते ,प्रतेक मूल शिकावे म्हणून अनेक वस्तीगुह काढली . अनेक बोर्डिंग ची स्थापना केली ,जातीस शहाणे केले . विविध जातीची एकूण २१ वस्तीगुह स्थापन केली होती . असे वस्तीगुह काढणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर होते . म्हणून कोल्हापूर हे “Mother of Boarding House”  बनल्याचा सार्थ अभिमान महाराजांना वाटत होता . 
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले.
खास स्त्री शिक्षिका तयार करण्यासाठी ‘female Training School’ वर रखमाबाई केळकर या नेटीव्ह स्त्रीस शिक्षण अधिकारी महणून नियुक्त केले होते . शाळेत आलेल्या मुलींना बक्षिश योजना जारी केली . पहिल्या दुसऱ्या येणाऱ्या मुलीस आपली कन्या आककासाहेब महाराज व भावनगरच्या महाराणी ‘नंदकूंवर’ यांचे नावे परितोषिक ही जाहीर केले . 
स्त्री हक्कांचेही रक्षण केले 
स्त्रियांच्या शिक्षण प्रसारा प्रमाणे त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व त्यांचेवर होणार्याक अन्याय ,अत्याचार निवारणासाठी विशेष प्रएत्न केल्याचे दिसून येते . 

१९१७ सालचा विधवा –पुनर्विवाह कायदा ,१९१९ चा अंतरजातीय – विवाह कायदा . बालविवाह विरोध ,अशी अनेक कायदे केले .असा राजा आज होणे नाही . 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे
नेरूळ ,नवी मुंबई -७०६ 

संधर्भ –
समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती – सौ वसुधा ज पवार ,म.इतिहास प्रबोधिनी ,कोल्हापूर .

बहुजन नायक ,रविवार ४ ते ११ अगस्त २००३ ,संपादक कांशीराम .

प्रबुद्ध भारत ,साप्ताहिक बहुजन । हिताय बहुजन सुखाय । 

मुंबई ,शनिवार ता २८ जुलै १९५६ – अंक २३ वा .

बहिष्कृत भारत आणि मुकनायक ,मुंबई ,शनिवार १५ जून १९२० ,२००८ म शा चरित्र साधने प्रकाशन समिति .

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ ,२०१६ प्रकाशक म. रा.शि. विभाग सचिवालय ,मुंबई.


#डिप्रेशन.

एक लव्ह Matter
सहा वर्षी पूर्वीची गोस्ट आहे ..( आप बिती).

एक माझा मानलेला भाचा डॉ. आहे ,त्याची ही बिती बात आहे....
१९९८ ला मी लातूर सोडले .उच्च शिक्षणासाठी मुंबई चा रस्ता धरला.
एके दिवशी अचानक समोरून आवाज आला ,मामा मी डॉ ...बोलताय .
मी अवाक झालो ,किती वर्षाने मला तिकडून फोन आला होता.
मला आनंद झाला त्यास खुशालीचा वर्तमान विचारला ..
तो क्षणभर न थांबता लगेच मुख्य विषयांवर आला ...त्याच्या मनात खूप गोंधळ जाणवला .
मामा माझे एका मुली सोबत ऑनलाइन अफैर झाले आहे ,मी काय करू ...? तुम्ही मला मार्ग दाखवा.
घाबरला होता .मी धीर दिला आणि त्याला बोलतं केलं ..
मी नेरुळ ला आणि तो लातूर ला .पूर्वी चार स्थळ येऊन गेली आणि कांही जमले नाहो करण काय तर त्याच्या घरा शेजारी ' किन्नराची घरं' .
यनारे स्थळं मुलगी देण्यास घाबरत होती , शेवटी कुठे ही स्थळ जमले नाहीच ..कदाचित ही शेवटची संधी असावी .असे त्याला वाटत होते ..?
मुलगी नवी मुंबईत ,वडील बँकेत चतुर्थ कर्मचारी .
चार दिवसाने परत कॉल आला मामा मला त्याच मुलीसोबत लग्न करायचे आहे .जर हे लग्न नाही जमले तर मी आत्महत्या करून मरून जाईन ..प्रकरण गंभीर होत .
आणि तो पुर्णतः डिप्रेशन मध्ये गेला होता ..?
तुम्ही हे करू शकता .मग रोज कॉल आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क सुरू झाला तो सोयरीक होई पर्यंत.
त्याच्या एकंदरीत फोन कॉल वरून मी अंदाज लावला आणि वेळीच त्यास सतर्क केले .त्याच मुलीसोबत लग्न करून देण्याचे वाचन दिले ...आणि पुढील पर्याय दिला.
मी त्यास धीर दिला असे नको करू आपण मार्ग काढू .तू आई बाबा ना घेऊन ये ,मुंबई ला .
मुलीच्या घरून मला कॉल आला ,मुलाचे घर पाहण्याचा बेत ठरला मी ,मुलीची आई आणि बाबा सेकंड क्लासच्या ट्रेन ने लातूरला गेलो .स्थळ बघुन झाले .मला ते घर नवीन न्हवते ..त्यांना मुंबई ला येण्याचे आमंत्रण देऊन आलो.
तो दिवस आला ,आई बाबा आणि तो माझ्या घरी आले .औपचारिक चर्चा ,चहा घेतल्यावर नंतर आम्ही सर्व मुलीच्या घरी गेलो .ओळखी झाल्या आणि सोयरीक लातूरला ला करण्याचे ठरले .डॉक्टर च्या जीवात जीव आला ..
जुमला जमला लग्नाची तारीख ही निघाली .मी उदगीर ला लग्नाला गेलो ,लग्न छान झाले ...
मी परत घरी ,मुंबई ला आलो .नंतर कधी त्या डॉक्टर ने मला 'मामा' म्हणून कधी विचारले नाही ,की व्हाटसप केला नाही ...आज सहा वर्षे पूर्ण झाली म्हणून आठवण आली .
व्यक्ती ओळख वेळीच करता नाही आली की आपण फसतो. म्हणून व्यक्ती ओळखून मदत करावी .
आज असे वाटते की तो डिप्रेशन मध्ये मुळीच न्हवता .तो नाटक होता ,डाव जिंकण्याचा ! कायम !

Wednesday, June 17, 2020

मले भी माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

======== प्रा.बा. र. शिंदे==

मालकाचे शेत राखतो 
वर्षभर घरगडी म्हणून चोवीस तास तिकडेच असतो मी भौ 
माझी माय आणि  परडी एक अतूट नाते 
एकुलती एक बहीण मुरळी हाय  भौ 
आत्या आराधीन हाय अन मामी ने जटा ठेवल्यात भौ
मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ 
                                           मामा हलगी वाजवतो आणि मामे भौ सनई 
                                           गणू काका डफड वाजतो भ
                                           छोटा भौ पोतराज आणि बाप दोरखंड पिळतो 
                                           मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !
 एकच भावकीची मैना सांगते एका 
भीमाच्या गोस्टी ,म्हन्ती हीच काय एकता 
चल ग आपुन रानात खुरपाय जाऊ 
शाळा शिकून काय फायदाच नाही
मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

वाघ्या बी आम्ही मुरळी बी आम्ही 

  हलग्या भी आम्ही जोगणी बी आम्ही 

  मोलकरीण अन देवदासी  बी आमी 

      येवढे शिक्षण घेऊन ज्ञानी का नाही झाले आमी 

      मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

आता तरी सोडा हे ,मार्ग धरा शिक्षणाचा 
सोडून द्या नाद त्या पुरोहीताचा 
चला लागा समतेच्या धम्म मार्गी 
होईल इकास तुमच्या  जीवनाचा 
मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !

परत नाही येणार कोणी क्रांति भीमबाबा 

घडव जीवन तुझे आणि जा त्या मार्गा

अन  प्रभू तो मानवा 

मले भी  माझ्या जातीचा ले अभिमान आहे भौ !


Tuesday, June 9, 2020

आदिवासी नायक बिरसा मुंडा बाबा हा भारताचा पहिला सुपरहीरो.

A for Ambedkar series …..
==============================
आदिवासी नायक बिरसा मुंडा बाबा  हा भारताचा पहिला सुपरहीरो.
----------------------- प्रा.बा.र. शिंदे ,नेरूळ -७०६

हिंदुस्थानी लोक आणि त्यांची स्वत: ची भावना ...
आज भारताचा पहिला सुपरहीरो 'बिरसा मुंडा' ची आज पुनुतिथी आहे .  एक गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्याचा नायक म्हणून बिरसा मुंडा यांना अद्याप सन्मान मिळालेला नाही हे येथील प्रस्थापित लोकांचे षड्यंत्र होय . भारतीय इतिहासात बिरसा मुंडा यांना योग्य आदर मिळाला पाहिजे होता ते दिला गेला नाही ,हे आदिवशी चे दुख नसून तमाम मुळणीवशी यांचे दुख होय . 

बिरसा मुंडा किंवा भगवान बिरसा मुंडा ज्याला आपल्या नावाने आपल्या देशाचा व्यापक प्रमाणात  आदिवासी समाज ,आणि भारतीय समाज जाणून आहे. हिंदुस्थानच्या संदर्भात बोलायचे झाले तर येथील 'संकुचित' राजकारण, व्यापक भारतीय उच्च व मध्यमवर्गीय समाज आणि  स्वतःबद्दल इतका आत्म-जागरूक हे त्यांच्या आरामदायी जीवन होय . कितीही लोकांचे बलिदान दिले गेले तरी या लोकांना फरक पडत नाही. किती लोकांनी आपल्या प्रियजनांना सोडले आणि स्वातंत्र्यलढ्यात स्वत: ला बोलावले हे माहित नाही.पण या देशाचे अंतिम दु:ख होय . 


बिरसा मुंडा हे १९ व्या शतकातील प्रमुख आदिवासी जननेते,जाणनायक होते. त्यांचा जन्म १  नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील उलिहातू गाव - जिल्हा रांची येथे झाला. विशेष म्हणजे त्यावेळी झारखंड आणि बिहार हे एकच राज्य होते आणि बंगालचीही विभागणी झालेली नव्हती. ‘सलगा’ गावात प्रारंभिक शिक्षणानंतर ते चाईबासा इंग्लिश मिडल स्कूलमध्ये शिकण्यास आले. येथे त्यांनी ख्रिश्चनतेकडे बारकाईने पाहिले आणि असा निष्कर्ष काढला की आदिवासी समाज मिशनर्यांेबद्दल गोंधळलेला आहे, त्यांना हिंदू धर्म नीट समजू शकला नाही.अश्या अवस्थेत भारतीय आदिवशी समाज होता . हे त्यांचे लक्षात आले . 


ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी जंगले व जमीन आदिवासींच्या आईसारखीच असत, परंतु ब्रिटिशांचे भारतात आगमन आणि त्यांच्या कारभारात त्यांचा सक्रिय व अनावश्यक हस्तक्षेप यामुळे आदिवासींना फक्त त्यांचे प्राथमिक अधिकार देण्यात आले. नाकारले होते ब्रिटिश राजवटीने आदिवासींना त्यांच्या नैसर्गिक हक्कांची लूटसुद्धा झाली. त्यांच्या अस्मितेला ठेच पहुंचली होती आणि इंग्रजांचा छळ सुरू झाला होता . याच कारणाने त्यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींनी जबरदस्तीने केलेल्या कामगारांच्या विरोधात मोर्चादेखील उघडला आणि ते यशस्वी झाले. बिरसा मुंडा यांनी आधीपासूनच सरंजामशाही आणि जमींदारी व्यवस्थेविरूद्ध लढत असलेल्या आदिवासींना आणखी एक धार दिली.यामुळे त्यांच्या मनातील अस्मिता जागी झाली 

तसे पाहता आदिवासी हे आपल्या देशातील सर्वात जुने आणि वास्तविक मूळ  रहिवासी आहेत, परंतु ते नेहमी विकासाच्या प्रकाशापासून  बाजूला होते. त्यांची स्वतःची संसाधने हिसकावून गुलाम म्हणून जगण्यास भाग पाडले गेले.  या लूटविरूद्ध लढा देण्यासाठी बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात "उल्गुलान" ची बियाणे लावली. उलगुलानचा शाब्दिक अर्थ 'भारी गोंधळ आणि उलथापालथ' आहे. उलुगुलनच्या निर्मितीसाठी, उल्गुलान्सच्या शोषणाविरूद्ध, त्यांच्या हक्कांसाठी उल्गुलानच्या हक्कांसाठी, उलुगुलन खोटे आणि फसव्याविरूद्ध, उलुगुलन ब्रिटीश आणि सरंजामी व्यवस्थेविरूद्ध. उलुगुलन लोकसत्ता स्थापन करणे. आदिवासींकडून केलेल्या संसाधनांच्या लूटप्रकरणी "युगुलन" हे त्यांचे हत्यार असेल आणि उत्तर देईल हे त्यांना ठाऊक होते.हे त्यांचे बंड त्या काळी जगभर गाजले गेले . या क्रांतीची पालीमुळे जगभर पेरली गेली ,इथून बिरसा एक आदिवासींचा क्रांतिकारी मोहरक्या महणून उदयास आला . आणि हा गाडी इंग्रज लोकास जड झाला . 

बिरसा मुंडा यांच्या संघर्ष व जीवनामुळे स्थानिक लोक त्याला धरती बाबा म्हणून संबोधत.होते  अत्यंत संसाधन असूनही, त्याने आणि त्याच्याद्वारे बनविलेल्या ‘गोरिल्ला सैन्याने’ केवळ ब्रिटिशांशीच युद्ध केले नाही तर अनेक युद्धे जिंकली. त्याची सैन्य ब्रिटीश तोफ व तोफांविरूद्ध विषारी बाणांनी लढत राहिली. याचा परिणाम असा झाला ,अखेर बिरसाला चक्रधरपूर येथे अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी तो फक्त २५  वर्षांचा होता. असे मानले जाते की ब्रिटिशांनी त्याचे व्यापक अपील आणि परिणाम पाहता तुरूंगात त्याला गोड विष दिले आणि तुरूंगात कॉलरामुळे तो मरण पावला असे सांगितले. तथापि, त्याच्या युक्तिवादाने कोणालाही मिठी मारली नाही. आणि अशा प्रकारे मदर इंडियाचा हा खरा पुरावा इतिहासात शहीद आणि अमर झाला .

बिरसा मुंडा आदिवशी च्या  वारशाचे नाव आहे. त्यांच्या पोर्ट्रेटला आमच्या देशाच्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही टांगण्यात आले आहे. आज त्यांच्या नावावर रांचीतील डिस्टिलरी ब्रिजजवळ एक थडगे देखील स्थापित केले गेले आहे. त्याची मूर्ती देखील तेथे आहे. त्यांच्या आठवणीत रांचीच्या सेंट्रल जेलचे नावही बदलले गेले आहे आणि त्याचवेळी रांची विमानतळाचे नावही बिरसा मुंडा विमानतळ असे करण्यात आले आहे. सर्व देशवासियांकडून बिरसा भगवान यांना पुनश्च अभिवादन…

संदर्भ / Sources  :  skyscrapercity , silentijourno and sandrap.wordpess

Monday, June 8, 2020

तृष्णा ही जटाय !

तृष्णा ही जटाय !

मानव मुक्ति किस तरह हो इस माया जाल से और कौन है जो इस जटा से मुक्ति पते ? जो इसपर विजय पा सके ?


जो चार अरीय सत्य ,पंचशील,अष्टांगिक मार्ग और दश पारमी को जान सके और ध्यान कर पालन कर सके वही इस जटा से मुक्ति पा सके ?

"अन्तो जटा बहि जटा, जटाय जटिता पजा।"

एक समय भगवान श्रावस्ती में विहार करते थे। उस समय रात में किसी देवपुत्र ने भगवान के पास आकर अपना संदेह मिटाने के लिए पुछा-

"अन्तो जटा बहि जटा, जटाय जटिता पजा।
तं तं गोतम!पुच्छामि, को इमं विजटये जटं?"

भीतर जटा है,बहार जटा है,जटा से प्राणी जकड़ी हुई है, इसलिए हे गौतम! आप से पुछता हूँ कि कौन इस जटा को काट सकता है?

भगवान ने उसका उत्तर देते हुए कहा-

"सीले पतिट्ठाय नरो सपञ्ञो, चित्तं पञ्ञञ्च भावयं । आतापी निपको भिक्खु,
सो इमं विजटये जटं।।"

जो नर प्रज्ञावान है,वीर्यवान है, पण्डित है, भिक्षु है,वह शील पर प्रतिष्ठित हो, समाधि और प्रज्ञा की भावना करते हुए इस जटा को काट सकता है।

जटा का तात्पर्य है तृष्णा। क्योंकि तृष्णा जाल फैलानेवाली है। बार बार उत्पन्न होने वाली तृष्णा बाँस के झाड आदि के शाखा-जाल कहलाने वाली जटा के समान होने से जटा है। तृष्णा अपनी और पराई चीजों में, अपने और दूसरे के शरीर में, भीतर और बाहरी आयतनों में उत्पन्न होने से भीतर जटा है, बहार जटा है। उसके ऐसे उत्पन्न होने से प्राणी जटा से जकड़ी हुई है। इसलिए उसने पुछा कि इस जटा को कौन काट सकता है।

भगवान ने उत्तर में कहा- जो शील, समाधि और प्रज्ञा में प्रतिष्ठित वीर्यवान पण्डित व्यक्ति है वह तृष्णा रूपी जटा को काट सकता है।

"अयं एकायनो मग्गो।"
संसार के सभी दु:खों से मुक्ति पाने के लिए यही अद्वितीय मार्ग है। शास्ता बुद्ध ने तृष्णा का समुच्छेद करने के लिए शील समाधि और प्रज्ञा का आठ अंगों वाले धम्म का उपदेश दिया है।

"ये च धम्मा अतीता च,ये च धम्मा अनागता।
पच्चुपन्ना च ये धम्मा,अहं वंदामि सब्बदा।।"

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्म बुद्धस्स !

                                                                            प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

                                                                              Mobile : 9702158564

                                                                            balajishinde65@gmail.com

 


स्पर्श 2

एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है।

पहला स्पर्श माँ से होता है ,जन्म के तुरंत माँ अपने औलाद को स्पर्श करती है तो उसे लगता है कि उसका जीवन सफल हुवा ,और वह माँ का रूप धारण करती है।
बच्चा अपने माँ के स्पर्श से ही माँ की पहचान बना लेता है ,देखकर ,सुनकर,और आवाज से उसे सुख तो मिल ही जाता है।लेकिन जब माँ स्पर्श करती है।तो बहुत खुश और सचेत रहता है।माँ के गोदी में सोना ,सोते सोते दूध पीना और अछिशी नींद पा लेना ,स्पर्श से ही माँ के पूरे बदन पर खुद खेल ते रहता है। माँ के स्पर्श का अन्य चार गुनोसे सौ गुना लेता है।उसके ग़लोंको हात लगाना ,बलोंको खीचना। आदि .
लेकिन माँ भी उसके स्पर्श को उतानी ही उतावली रहती है। माथे पे चुम लेना ,गाल नोचना ,और नहाते -सोते समय पूरे बदन की मालिश करना ,दोनों को एक स्पर्श का आनंद मिलता है।

जैसे जैसे बालक की उम्र बढ़ जाती है उसकी स्पर्श की परिभाषा बदल जाती है।
पिताजी ,चाचा ,चाची नाना नानी इन्ही के अंग पे खेल खुद कर स्पर्श की दृढ़ता हो जाती है।

इस स्तिथि के बाद जो बालक कदम लेता है वह एक नाजुक मोड़ है ,इस मोड़ में वह आपने पियर ग्रुप में शामिल हो जाता है।
आपने माय अंग या गुप्तांग को जानने की कोशिश करता है। और उतावलापन आजाता है .
लड़का -लड़की अपने अंग को स्पर्श करके अपने अंग को देखकर बार बार जानने की कोशिश करते है,और स्पर्श की भावना जागृत होती है। यहाँ धोके की घंटा दोनों के मन मे आजाती है।
जब स्पर्श न हो तो उस मन से छूनेकी लालसा बढ़ जाती है।

स्पर्श के साथ ,बातें ,और देखने का नजरिया एक मकाम के ओर ले जाता है।
जब शादी की उम्र आ जाती है तो स्पर्श का अर्थ और एहसास बदल जाता है।
पति पत्नी में ही स्पर्श एक रोज का एहसास प्रेम या वीर रस को बढ़ावा देने का मुख्य काम करता है।

शादी के बाद अगर स्पर्श का एहसास न हो तो वह प्रेम और शादी एक नरक बन जाती है।दोनों पति पत्नी एक साथ सो तो जाते है एक ही शय्या पर पूरी रात स्पर्श नही करते है तब ,एक दूसरे के जीवन मे तान तनाव आजाता है ।

जैसे ढेर सारी बातें हो ,शरीर की हलचल हो ,घर किचन में बातों के साथ स्पर्श की बातें हो तो वह अंतिम सुख को काम आजाती है।अगर औरत इन बातोंको इनकार करती है,या इन बातोंको पाप या गलत समज लेती है तो एक तो वह आपसे चाहती नहीं है,या आपके साथ एक अलग से रिश्ता रखना चाहती है।समाज को दिखाने को एक पति की जरूरत पूरी कर लेती है।
और आपके सुख में बाधा पैदा करती है। यह संबंध वाद विवाद और घर में सुख शांति पैदा करता है .
अगर यह स्तिथि कायम हो तो ,इंसान बाहर के स्पर्श को ढूंढता रहता है । किंव की वह स्पर्श का सुख आपने ही घर मे नही पता।ठीक उशी तरह औरत भी अपना रास्ता ढूंढ लेती है। इसलिए पति –पत्नी में रोज और कायम स्पर्श होना बहुत अहमियत रखता है।

घर परिवार में पत्नी और पति में ढेर सारी बातें हो,बातोंसे परिणाम निकल आते है।बातों बातों में एक दुसरोंको सही आत्मीयता से देखने की गरिमा बढ़ जाती है।और पति पत्नी में विश्वास बढ़ जाता है और प्यार की दृढ़ता भी बनकर एक दूसरे से सच्चा प्यार पाते है।
बातोंसे ,देखने से फिर आखरी स्पर्श की बारी आजाती है ।इन दोनों के स्पर्श से अंतिम प्यार और सच्चे प्यार में बदलाव आजाता है। सच्चे प्यार और पानेके लिए स्पर्श ही काफ़ी है।

आपकी नोकरी धन दौलत तो एक बाहरी देखावा है ।इन सब को सचेत रखने के लिए पति पति में 'स्पर्श कायम' होना बहुत ही अहमियत रखता है।

जिस घर मे स्पर्श की परिभाषा का विकास नही हुवा हो,वह घर उध्वस्त है। एक दूसरे में चिड़चिडापण ,रोज का झगड़ा ,और इन सभी का आपने घर परिवार पे बुरा असर होता है। कभी कही एक दूसरे पे शक करना,यह बच्चा मेरा नही है।यहाँतक की झगड़े की नौबत आजाती है।और कभी कभी अलग होनेकी सम्भवना दृढ़ हो जाती है।

अगर येही स्पर्श बाहर कही हो जाता है तो कयामत छा जाती है। किंव कि वह एक पराया स्पर्श होता है।वह फिर दूसरोंकी बीवी हो या पति हो।लेकिन यह स्पर्श कायम वास्तव में नही रहता,कभी कभी धोका देता है,या फिर टूट जाता है।इस स्पर्श को समाज मान्यता नही है।इसलिए यह स्पर्श चोरी छुपे हो जाता है। इस मोड़ पर न आये इसलिए पति पत्नी में कायम और मुलायम स्पर्श होना जरूरी है।

दोनों बाजू का पर्याय स्पर्श समाज मान्यता न होनेपर भी कभी कभी कायम और अंतिम सांस तक चल भी जाता है। आपने घर परिवार में आपने ही बीवी या पति से स्पर्श का सुख न मिले तो बाहर के स्पर्श का रुख बदल जाता है ,और बार बार उसे पानेकी लालसा बन जाती है। स्पर्श जितना सख्त,मुलायम और देर तक रहेगा तो वह दिलो दिमाग मे कायम घर कर लेता है ।आपने पराये बन जाते है,और पराया स्पर्श अपना बन जाता है।
सिर्फ घर मे रह जाते है दो बदन कोई गॉसिप कोई मन की बात नही हो जाती।फिर काम काज की बाते रह जाती है।अपना पन खत्म हो जाता है।रहते है सिर्फ नाम के मिया और बीवी।

पराया स्पर्श घर परिवार में आनेसे घर की खुशियां चली जाती है।परिवार ,बच्चे इनपर भी असर हो जाता है।एक दूसरोंसे बहुत ही दूर चले जाते है।कभी न वापस आने के लिए।

पति पत्नी में स्पर्श बढ़ाना हो तो किंव न हम उसे आपने घर से शुरुवात करे।घर मे हो तो कभी कभी एक दूसरोंको छुए,गाल नोचे ,बालोंमें उंगलिया घुमाए,बैठे बैठे हाथ पकड़ ले, सुबह साथ नहाए,ताकि एक दुसरेकी चाहत बढ़े और अस्पर्श की भावना खत्म हो। एक दूसरोंके बालो में तेल लगाएं ,और कंगी घुमाए। हो सके तो दोनों किचेन में खाना बनाने को जाए ,नजदीकियां बढ़ जाये तो स्पर्श भी बढ़ने लगता है।इन्ही सभी बातोंका स्पर्श आपके प्यार को चार चांद लगा लेता है।
घर परिवार में कभी अकेला पन मिल जाये तो एक दूसरे की गले मे बहे डालकर तोड़ा रूमानी होंजाये,थोड़ा डांस भी करे। संडे के दिन और छुट्टि के दिन सुबह पूरे बदन पर तेल लगाकर मोलिश करे,इन्ही स्पर्श में गॉसिप करते है ,और स्पर्श की लालसा बढ़ेगी और आपका प्यार और मजबूत हो जाएगा ।
छुटी के दिन बाहर सेहर पर चले जाएं,पब्लिक वाहन का भी थोडा उपयोग किया जाय ,जैसे रिक्शा और कार की सफर जदि हो ताकि स्पर्श जादा हो। समंदर पे घूमने जावो ,हात में हात लेकर देर रात तक घूम कर। इससे अंग की गरिमा मिले तब स्पर्श की भावना दृढ़ हो जाये। और आखरी स्पर्श का सुख ले .
यह सभ तजर्बे अपनाने के लिए एक दूसरेका साथ होना बहुत जरूरी है,वरना कोई आपने घर परिवार में दूसरा रुदयस्पर्शी बनके न आये और आपने कानो कान खबर न हो जाये। इसिलए 'आपने पत्नी,या पति से स्पृश सतत और हमेशा बनाये रखे।

काम तनाव से बहुत सी पत्नी और पति एक दूसरोंको इस स्पर्श का एहसास नही दे पाते वही एक दूसरे को सुख नही दे पाते। यह एक आज के घडी का भयावह चित्र है .
इन्ही समश्या को दूर करनेके लिए उपरोक्त सभी प्रकार के कारण आजमाना चाइये। और एक दुसरोंको जादा से जादा समय दे .

साथ में रहना स्पर्श करना यह शरीर के सुख का अंग नही है।फिर भी एक ही पलंग पे सोते है तो बाते करते करते स्पर्श करके सो जाईये सुख मिलेगा ,यहाँ सम्भोग की भावना का सवाल ही नही आता।
कभी कभी आदमी की शरीर भावना तो स्पर्श से शुरुवात होती जरूर है,लेकिन ऐसा नही की आपकी बिवि आपको संभोग करने दे।संभोग एक दिमाग की भावना है।स्पर्श एक एहसास है।यह एहसास हमेशा नही होना चाहिए और वासना भी नही होनी चाइये,वह आपकी बीवी किंव न हो। लेकिन स्पर्श का एहसास जरूर हो।रोज सदाके लिए और कायम। किंव की दोनोके स्वस्थ के लिए शास्त्रीय दृष्टिकोण से उचित है। जैसे स्पर्श होने से शरीर का रक्त स्रव कायम रहता है,उसका नतीजा यह होता है ।आपको शुगर,की बीमारी नही होगी और हार्ट अटैक कभी नही होगा। आप अगर रोज या सप्ताह में तीन बार शरीर सुख पाते हो या देते हो तो आपका बदन का व्यायाम और आयाम ठीक रहेगा ,और आपको बीमारी कभी छुने का नाम नही लेगी।

पूर्वी स्पर्श
पूर्वी स्पर्श जो इंसान के भूले भिचड़े पल में हो जाता है।कभी भूल कर तो कभो अनजाने में कभी जानबूझकर या कभी जबरदस्ती हो या ,किसीसे अनजाने में प्यार होने से।
बहुत से लोगोंको बचमन में कभी स्पर्श हो जाता है और स्पर्श का दायरा बढ़ जाता है।
वह स्पर्श पहला होने से उम्रभर तकलीफ देता है। अगर प्यार टुटा हो तो?

जबरदस्ती से किया हुवा स्पर्श एक मजबूर कर देता है ,कोई जानबूझकर स्पर्श करता है।और जबरदस्ती से स्पर्श का अभ्यास मन मे पैदा कर देता है। वह स्पर्श भूलकर भी भुला नही जाता ।उसे लाख कोशिश के भी दिलो दिमाग से बाहर नही निकल जाता । इसलिए कि वह एक डरावना स्पर्श होता है।
बचपन मे कोई धुश लगाकर पास आकर स्पर्श करनेकी कोशिश करता है।और वह हमारे इछाओंके शिवाय होता है इसलिए वह पल डरावना और घटिया लगता है।
कभी अपना कभी रिस्तेमे ,या कभी पराया स्पर्श करने की कोशिश करता है,और वह कामयाब भी हो जाता है ।ऐशी स्पर्श की भावना दिल और मन को ख़राब कर देती है
फिर किसके स्पर्श की भावना मन मे नही आती।किसीको छुने की भावना और इच्छा मर जाती है।वह स्पर्श की भावना पुनःह जन्म नही लेती।म इसे भी पहला स्पर्श कहाँ जाय. फिर भी पूर्वी स्पर्श भूल जाना ही बेहतरीन होता है।
लेकिन पहला स्पर्श भूल जाना बहुत ही कठिन है। फिर भी इंसान भूल जानेकी कोशिश जरूर करता है।लेकिन कभी कभी फिर से अच्छी स्पर्श की बात बन जाती है तो वह भूल जाता है।भूल जानेकी कई मजबूरी भी बन जाती है।



प्रा बालाजी रघुनाथराव शिंदे

विस्तार सेवा सहाय्यक ( विशेष शिक्षा )

विस्तार सेवा विभाग ,अ.या.ज.रा.वा.श्र.वि.संस्था ,बांद्रा (प) मुंबई ५०

balajiayjnihh@gmail.com

balajirshinde.blogspot.com

www.ayjnihh.nic.in

‘एक “ति”चं आसण !

‘एक “ति”चं आसण

“ति”चं आसण ही एक मनात आणि घरात एक उत्तम सहवास निर्माण करणारी एक अविभाज्य आणि  अभेद्य निर्वात पोकळी आहे .इथे असणे आणि नसणे या दोन गोष्टी या विरुद्ध टोकाच्या आहेत .”ती” चा सोबत लग्नांनतर प्रत्येक व्यक्तीच्या साथीला आयुष्याला असतो .

इथे मी “ती” घरात असून नसल्याचा भास आणि इतरत्र कशी मनात पोकळी निर्माण होते हे आपणास माझा अनुभव इथे विशद करीत आहे .

राधा गेली ,महिनाभर बेचैन आहे ,अचानक मुतखडा असल्याचे निदान झाल्यामुळे महिनाभर ती त्रास सहन करते आहे ...दरम्यान चार डॉक्टर बधून झाले ..आणि यात एक महिना निघून गेला .

डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ऑपरेश हा एकच पर्याय राहिला म्हणून ती खूप तणावाखाली होती ..एके दिवशी तिने ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय स्वतः घेतला आणि मानाने तयार झाली. शनिवारी सांयकाळी वाशी सेक्टर १० मध्ये संपूर्ण रिपोर्ट दाखऊ असे म्हणत मला थेट शाळेत घेऊन गेली आणि त्याच दिवशी ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय हि घेतला . १२ ऑक्टोबर ला तिने खडा काढून घेतला .

  तीन दिवसाने सुखरूप घरी आली ...एकदम निस्तेज पावलाने . ती खूप व्याकूळ झाली आणि थकली .एवढी निस्तेज आणि व्याकूळ झालेली मी तिला आजच बघतो आहे .घरी आल्यावर एकदम तिच्या अंगात त्राण उरला न्हवता  .सतत तीन दिवस ओकारी करीत राहिली ,अन्न पाणी वर्ज केली म्हणून दिलेली औषधे टाळू लागली.आणि यातच ती एकदम विक झाली  ..दरम्यान रजेवर होती ,आणि पुढच्या आठवड्यात कुमुद शाळेला दिवाळी सुट्टी लागणार होती .

एरवी कंबर कसून लक्ष्मी सारख्या हातातील बांगड्या मागे सारत सकाळी सहा च्या घटके पासून किचन मध्ये मला दिसणारी ती दिसत नाही हे जाणीव मला तीव्र वेदना करीत होती .या वेळेला ती अशीच जोपून राही .मी पण तिची काळजी घेण्यासाटी सुट्टीवर होतो ...ती कांही खातच नाही हे बघून माझा जीव भांड्यात पडत असे ..

नाश्ता ,जूस आणि तिला विचारून अनेक प्रकार मी आणि माझ्या माय ने तयार करून दिले पण ती खातच न्हवती. .. आम्ही दोघे एकमेकाकडे बघून धीर धरून होतो .आज मितीला माझी माय नसती तर माझे काय हाल असते ते विचार करावसं वाटत नाही ? . शेवटी माय ते माय ,तिची सर कोणाला नाही ? माझ्या माय ने खूप तिची सेवा केली .हे कित्तेक वेळा आम्ही आजमावले आहे .

  घरात आम्ही कोणी आजारी पडले कि तिला कुठून हिम्मत येते माहित नाही वय सत्तर पार करून हि ती अजून कणखर आहे ...”न सुगर न बिपी” .अशी आई घरो घरी असावी .आम्ही चौघे भावंडे पण तिला इकडेच माझ्याकडे राहावेशे वाटते ,माझे दादा आम्हाला सोडून गेल्या पासून .

“ती” गेली दोन आठवडे फक्त विचार आणि विचार करत होती ,झोपण्याचा बहाणा पण ती डोळे बंद करून नुसती पडून राहत असे .माझा मुलगा आदित्य युके वरून तेंव्हा मायदेशी घरी आली तेंवा ती बरी होऊ लागली .हळू हळू सकाळी नाश्ता करू लागली आणि परत दिलेल्या गोळ्या घेऊ लागली ...पण तीन दिवसाने तिने मला आदेश दिला कि त्या गोळ्या नकोत ,कचर्यात टाकून द्या ! ‘म्हणून तिने परत गोळ्याकडे पाठ फिरवली ..

“ती”चा  घरात वावर असणे किती सुखकारक असतो तो “त्या”लाच कळते ,बाकी सगळा माया बाजार आहे ,मुल –बाळ ,नातेवाईक फक्त क्षणाचे सोबती असतात. ती अबोल असण ,किंवा अन्थूरनात दिवस रात्र पडून राहणे कूप काळीज पिळून काढत हो .इथे भावना व्यक्त करण्यास भाषा कमी पडते .

एरवी दिवाळी सणांना अनेक प्रकारच्या खाऊ ने भरलेले डबे या दिवाळीत  रिकामे आहेत ,ती मनात खूप इच्छा असताना हि ,अबोल झाली आहे .मोठा मुलगा आपल्या मायदेशी परत येण्याने  तिचे मन मुरेजून गेले आहे कारण त्याच्या आवडीचे फराळ ती करू शकत नाही म्हणून. अमर्त्य आणि आदित्य आणि मला आवडणारे पाधार्त न करता आल्याचा चेहरा मी रीड केला आणि मनातल्या मनात बांधून ठेवला.मी म्हणालो अगोदर बरी हो मग खूप फराळ कर ,तुला खावासा वाटेल ते ,आम्ही सगळे आहोत न तुला मदत करायला ..तेंव्हा ती गालात हसून आम्हाला साथ दिली तिने .

गेली पंचवीस वर्ष खूप कष्ठ केले तिने  “ति”चा सुखद सहवास मला लाभला कधी थकलेली मी पहिली नाही तिला ,पण आपल्या स्वतःच्या हलक्या शारीरिक व्याधी मुळे कधी चिडचिड होते पण थकत नाही .परत नव्या उमेदीने कामाला लागते .हा तिच्या मनातील  मोठ्या मनाचा कप्पा सतत ओपेन असतो .

ती आजारी असल्या पासून माझे पण मन खूप बेचैन ,कामात किंवा इतरत्र लक्ष लागत न्हवते...“ती ” आज मितीला बऱ्या पैकी रीकवर झाली आहे. मी चेहरा रोज सकाळ-संध्याकाळी  रीड करीत असतो .आणि यामुळे माझ्यात थोडी टाकत वाढत चालली आहे.आता ती बरी होत आहे ...

प्रत्येक पुरुषाला वाटते कि आपली “ती” सुदर आणि सशक्त असवी ,साहजिकच मला पण त्या हि पलीकडे वाटते .पण वास्तवात तसे नसते ,एकमेकाला समजून घेणे यातच दोघांचे गुण्या -गोविंदाने सोबत राहणे यातच दोघांचे गुपित असते ,आणि हे प्रत्येक घरात असावे .....’एक “ती” चे असणे !  

  प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे \ राधा \ ०६ नोवेंबर २०१९




Friday, June 5, 2020

जेष्ठ पौर्णिमा : वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती.

जेष्ठ पौर्णिमा "

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे . मंगलदायी ठरली आहे.
या पौर्णिमेचे आपण महत्व जाणून घेतले पाहिजे . बौद्ध जगतात या पौर्णिमेला अनन्य 
साधारण महत्व आहे. 

सिद्धार्थ गौतमाला इ.स.पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती 
सम्यकसंबोधि प्राप्त होऊन तथागत सम्यक समबुद्ध होतात. आपल्याला मिळालेल्या 
ज्ञानाची पुन्हा पुन्हा उजळणी करावी यासाठी चवथ्या आठवड्यात जेष्ठ पौर्णिमेच्या 
दिवशी रत्नघर या स्थळी राजायतन या झाडाखाली बसले असता ब्रम्ह देशाचे दोन (२)
व्यापारी तपस्सू व भल्लिक हे तिथे आले आणि तथागत भगवान ज्या झाडाखाली 
बसले होते त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली सावलीत भोजन करण्यासाठी बसले 
असता त्यांच्या मनात तथागत बुद्धांना भोजनदान देण्याची प्रेरणा झाली. आणि 
भगवान बुद्धां जवळ येऊन त्यांनी तथागतांना याचना केली . भन्ते , आम्ही आपणास भोजन म्हणून आणलेल्या गोड पदार्थाचा आपण स्वीकार करावा . आम्हांला
समाधान वाटेल .
भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र पुढे केले आणि त्यांच्या गोड पदार्थाचा स्वीकार केला .
भोजन झाल्यावर तथागताने या व्यापाऱ्यांना आपला पहिला धम्म उपदेश केला. 
दोन सरणं देऊन त्यांना उपासक केले . दोन सरणं म्हणजे बुद्धं सरणं गच्छामि | धम्मं 
सरणं गच्छामि || कारण तोपर्यंत संघाची स्थापना झालेली नव्हती . तथागतांचे हे
प्रथम उपासक झाले . त्या दिवशी जेष्ठ पौर्णिमा होती . त्या दोन व्यापाऱ्यांच्या 
विनंतीवरून भगवान बुद्धांनी त्यांना केश धातू भेट दिले .त्या व्यापाऱ्यांनी ब्रम्हदेशात 
जाऊन भगवान बुद्धांच्या केश धातूवर १५० फुट उंच स्तूप बांधलेला आहे . तेथील लोक 
प्रत्येक जेष्ठ पौर्णिमेला फार श्रद्धेने जमतात आणि पूजापाठ ,वंदना , प्रवचन यांचे 
ओयोजन केले जाते . हा स्तूप आजही ब्रम्हदेशात आहे .

जेष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व असे आहे की, तथागत भगवान बुद्धांनी सेनानी कन्या 
सुजाताला सेनानी गावात जाऊन धम्माचा उपदेश केला .

जेष्ठ पौर्णिमेचे तिसरे महत्व असे की, चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची सुकन्या 
संघमित्रा भिक्षुणीने बुद्धगयेच्या बोधीवृक्षाची शाखा ( फांदी ) अनुराधापूर , श्रीलंका 
येथे नेऊन लावली . आणि बौद्ध धम्म प्रचार कार्याला प्रारंभ केला .त्यादिवशी जेष्ठ 
पौर्णिमा होती. संघमित्रा यांच्या प्रेरणेने अनेक स्त्रिया व पुरुष भिक्षु व भिक्षुणी झाले 
होते. आज श्रीलंकेत ८० % लोक बौद्ध आहेत . या जेष्ठ पौर्णिमेला येथे लोक 
जमतात . बुद्धापुजापाठ ,वंदना ,सूत्रपठण करतात. प्रवचनाचे आयोजन केले जाते .

या महत्वपूर्ण घटना जेष्ठ पौर्णिमेला घडल्या आहेत . भगवान तथागतांनी 
कापिलवस्तूच्या जनतेला महासमय सुत्त्ताचा उपदेश याच पौर्णिमेला केला 
आहे .

" सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा "

! जय भिम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!! 

Tuesday, June 2, 2020

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

 

दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि  एस एस सी परीक्षेला बसत असतात ,या प्रवर्गातील मुलांची संख्या  दर वर्षी वाढत चालली आहे . काही मुले विशेष शाळेतून तर कांही मुले सर्वसाधारण शाळेतून परीक्षेला  बसत असतात . तेंव्हा काही गोष्टी ध्यानात घेणं मह्त्वाच आहे . वेळो वेळी महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे आणि मुंबई मिळून अश्या मुलांच्या परीक्षे संधर्भात परिपत्रिकात बदल करून नवीन परीपत्रक परीक्षे अगोदर एक महिना प्रकाशित करीत असते . आणि त्या मध्ये विशेष मुलांसाठी सवलती जाहीर करीत असते .

 

कर्णबधिर मुलांत  भाषा विषयाचे आकलन कठीण जाते  , किंवा कमी असते म्हणजे त्यांच्या शाळेतील प्रवेशावर अवलंबून असते . शाळेत जर लवकर प्रवेश मिळाला असेल तर योग्ये यंत्राचा वापर करून ऐकण्याची सवय लावून उचित थेरपी देऊन लवकर भाषा विकास साध्य  करता येतो ,आणि उशिरा  शाळेत प्रवेश मिळाला असेल तर भाषा विकासाला खीळ येतो ,अश्या मुलांसाठी खास सवलत द्यावी लागते .आणि ती शासन दरबारी देऊ केली आहे .

 

यात चार भाषेचा समावेश आहे .एक भाषा अभ्यासावी  लागते ,आणि इतर विषय म्हणजे टंकलेखन ,चित्रलकला ,शिवण काम यासारखे विषय घ्यावे लागतात . शास्त्र विषया  ऐवजी शरीर विज्ञान ,आरोग्य व गृह शास्त्र या सारखे सोप्पे विषय घेऊन  एस एस सी परीक्षेला बसता येते . आणि त्यांचा एस एस सी परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा होतो .

 

सदरील  सूचना  राज्यातील सर्व  शासन मान्य शाळेत  परिपत्रक काढुंन पुरवण्यात येते. हि सवलत मंजूर करून देण्यासाठी फॉर्म क्र १ ते ५ सोबत देण्यात येतो . अश्या स्वरूपाचा फार्म  भरून अपंग संवर्गानुसार संबंधित जिल्हा चित्सालय अथवा शासनाने निर्देशित केलेल्या रुग्णालयात त्यांच्या वैधकीय प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतिसह त्या त्या शैक्षणिक वर्षात मंडळाकडे ३१ ऑगस्ट पूर्वी मंडळाकडे सादर करावा लागतो . आणि हे बंधनकाकार असते ,कि कोणत्याही अपंग प्रवर्गातील सवलती बाबत मंडळाची पूर्व परवानगी आवश्यक असते . आणि हे परिपत्रक तक्त्यासहित विज्ञार्थी ,पालक ,शाळेचे कर्मचारी ,( शिक्षकेतर व शिक्षक) याची नोंद ठेवण्याचे बंधनकारक आहे .

 

विविध प्रकरच्या फॉर्म्स मध्ये ,फार्म नंबर १ अंध ,फार्म नंबर २ कर्णबधिर -२;डम्ब  फार्म नंबर  ३ अंतर्गत , शारीरिक विकलांग ४,पस्टिक ५फार्म नंबर ४ अंतर्गत लर्निंग विकलांगता ,आणि फार्म नंबर ५ अंतर्गत ऑटिसम या फार्म चा अंतर्भाव आहे . हे सोपस्कार पूर्ण झाल्यावर परीक्षेला बसता येते.

 

मुलांना विषय निवडीचे स्वतंत्र्य देऊन परीक्षेसाठी  पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते . आणि वरील बाबींची पूर्तता करून झाल्यावर परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती पुरवली जाते . जेणे करून चांगल्या प्रकारे परीक्षेत यश संपादन करता यते . परीक्षेला जाण्यापूर्वी काही सूचना जरूर लक्षात ठेवाव्यात :  

 

विशेष : प्रश्न पत्रिकेवर दिलेल्या वेळेपेक्षा ३० मिनिटे अधिकच वेळ दिलेला असतो . या वेळेचा उपयोग सर्व पेपर लिहून झाल्यावर तपासणी साठी वापरण्यात यावा ,लिहलेलं बरोबर आहे का ? ,सर्व प्रश्नाचे उत्तरे लिहली आहेत का ? इत्यादी साठी वापरावा .  

 

घरून निघते वेळी श्रावणयंत्र नीट तपासून कानाला  लावून जावे .

 

परीक्षेचे  ठिकाण ,वेळ याची खात्री करून इच्छित निश्चित स्थळी जावे

 

आपल्या हातात मिळालेली  प्रश पत्रिका आपलीच आहे का ते तपासून पाहावे ,आणि काही शंका असेल तर उपस्तित शिक्षकांना/पर्यवेक्षकाला  विचारून शंकेचे निरसन करून घ्यावे . विषय बदल झाला असेल तर खात्री करून घ्यावी . कर्णबधिरांसाठी असलेल्या विशेष शाळेतून जे विज्ञार्थी एस एस सी परीक्षेला बसले आहेत आणखी काही महत्वाच्या सूचना देणे महत्वाचे आहे .

 

उत्तर पत्रिकेवर स्वछ  आणि सुवाच्च अक्षरात लिहावे ,कुठे पेपर खराब होणार नाही याची काळजी घ्यावी . स्वतःचा क्रमांक मोठ्या अक्षरात व  ठळक लिहावा . हे सर्व करण्यासाठी घरी सराव  करावा लागतो .

 

उत्तर पत्रिकेत खडाखोड करू नये . अक्षर मोठे व दूर दूर व सारख्या अंतरावर लिहावे .

नवीन प्रश्नाचे उत्तर लिहण्यासाठी नवीन पानावर सुरुवात करावी .

 

प्रश व उत्तरचे अंक नीट लिहावेत . पेपर संपूर्ण सोडवावा ,आपल्याला येत असेलली  प्रश सुरुवातीला लिहावे .

 

चुका कमी करण्यासाठी पत्र ,गोस्ट आणि निबंध लिहीत असताना वाक्य लहान तयार करावीत ,जेणेकरून चुका होणार नाहीत . पत्रात स्वताचे नाव घालू नये पत्रातील पत्ता सुवाच्च आणि आटोपशीर असावा . दिलेली गोष्ट लिहीत असताना २-३ वेळा वाचून काढावी .,त्याचे परिच्छेद पाडावेत ,गोष्टीला शीर्षक म्हणजे नाव द्यावे ,नामे ,विशेष नाव लिहावीत ,उदा . राजा ,गाव ,मुलगा ,मुलगी इत्यादी . निबंध लिहीत असताना जो आपल्या आवडीचा आणि माहितीचा असेल तोच लिहावा ,आणि वेळ वाया घलू नये .त्यामुळे वेळ वाचतो व आवडीचाच विषय असल्यामुळे मार्क जास्त मिळण्यास मदत होते .  

 

प्रश्न व उप्र प्रश्नाचे  अंक नीट लिहावेत .

 

भूगोल ,विज्ञान आणि भूमिती ,या मध्ये ठळक अक्षराने व टोकदार पेन्शील ने लिहाव्यात . भूगोल मधील नकाशे सूची रेखीव पद्धतीने लिहावीत . आवशक्य तेथे आकृत्या काढायला विसरू नये ,कारण याचे मार्क सहज मिळत असतात . आकृत्यांवरील सूचना वाचून तशी कृती करावी .

 

अश्या मुलासाठी गृहविज्ञान खूप महत्वाचे आहे . या विभागात करणे द्या याला दोन गुण  असतात . एखादे कारण विचारले असेल तर ते बाजूलाच आकृती काढून नाव द्यावे लागते . आकृती काढल्या मुळे जास्तीचे मार्क जरूर मिळतात . एखादे उदाहरण विचारले असेल आणि आकृती लढण्याचे विचारले नसेल तर जरूर आकृती काढावी ,कारण आकृती वाढल्यावर पर्यवेक्षकाला कळते कि या मुलास प्रश्नाचे पूर्ण आकलन झाले आहे .

 

अर्थशात्र, विज्ञान ,आणि इतिहास भूगोल यातील काही मोठे प्रश्न अधोरेखित करावे ,तसेच गाळलेले  आणि महत्वाचे शब्द अधोरेखित करावे . हे करीत असताना कोठेही लाल शाई ,पेन्शील वापरू नये .

 

प्रशपत्रिका वाचून झाल्यावर अथवा वाचत असताना मुले काही लिहीत असतात ,तसे करता कामा नये .

 

कच्ची गणिते उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूवर लिहावेत . पक्की केल्यावर त्या ठिकाणी x अशी फुल्ली मारावी .

 

परीक्षेला जाताना सर्व वर्ग शिक्षकाने सांगितलेल्या  गोष्टी बरोबर घ्याव्यात ,आणि त्याने दिलेल्या नियमांचे वेळो वेळी पालन करावे

 

या मुलांसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रात्यक्षिक होय , प्रात्यक्षिकात  गृहशात्र ,आरोग्य शास्त्र ,शरीर शास्त्र ,या विषयाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे .  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोजक्या व नेमक्या वाक्यात द्यावी .उत्तरे  पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करावा . त्यासाठी आकृत्यांचा नीट व रोज अभ्यास करावा लागतो . शेवटी आपणास मिळालेल्या अर्ध्यां तासाचा पूर्ण  वापर करावा आणि नीट व सुवाच्च अक्षरात लिहण्याचा प्रयत्न करावा ,यश तुमच्या दारी उभे आहे .

 

विशेष गरज असणाऱ्या (अपंग) विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या सवलती :आणि यात येणारे अपंग संवर्ग :

 

  1. अंध विज्ञार्थी

  2. कर्णबधिर विज्ञार्थी

  3. अस्थिव्यंग विध्यार्थी

  4. बहुविकलांग विध्यार्थी  /(सेरेब्रल पाल्सी)

 

5.            अध्ययन अक्षमता विध्यार्थी

 

6.            स्वमग्न

          ऑटिझमग्रस्त विध्यार्थी

 

क्र

अपंगांचा प्रकार

अपंग कोड क्र.

वेळेची सवलत

सवलती

विषय सवलत

०१

अंध

प्रति तास २०

मिनिटे

१. निवडी प्रमाणे परीक्षा केंद्र दिले जाईल .

२. मंडळाच्या नियमास अधीन राहून आवश्यक्त्यानुसार व मागणी नुसार लेखनिक देनाय्त येईल .

३.आकृती ,नकाशे, आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .

४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .  

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंकगणित व त्या सोबत कार्यशिक्षण विषयांपैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीरशास्त्र,आरोग्यशाश्त्र व गृहशास्त्र विषय .

६.इतिहास -राज्यशास्त्र व भूगोल अर्थशात्र   

०२

कर्णबधिर

मूकबधिर

३० मिनिटे अधिक वेळ

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते .

विषय

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय अनिवार्य व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०३

अस्थिव्यंग

प्रति तास २० मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. विज्ञार्थी हाताने अपंग आल्यास आकृती नकाशे आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .

३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .

४.शारीरीक विषयात सूट दिली जाते


०४

बहुविकलांग

(सेरेब्रल पाल्सी)

बहू विकलांग १ तास २० मिनिटे.

 

सेरेब्रल पाल्सी

प्रति तास २० मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. उत्तरपत्रिका टाईप करून व किंवा लिहून  देण्याची परवानगी दिली जाते.

३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .

४.शारीरीक विषयात सूट दिली जाते

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय सूट कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०५

अध्ययन अक्षमता

२५ टक्के जादा वेळ

प्रति तास १५ मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .

गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .

मंडळाच्या नियमात अधीन राहून आवशक्यतेनुसार व मागणी नुसार लेखनिक देण्यात येईल  

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय ऐवजी कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप :फक्त डिसकालकुलीया विधायर्त्यांचया ७ वीचे  अंक गणित हा  विषय घेता येईल .

 

कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०६

स्वमग्न

ऑटिझमग्रस्त

प्रति तास २० मिनिटे

१. ऑटिझमग्रस्त उमेदवार ज्या शाळेत विज्ञार्थी असेल त्या शाळेत त्याच शाळेत परीक्षेची व्यवस्था करण्यात येते किंवा मागणी नुसार जवळच्या शाळेत केंद्र म्हणून दिले जाते .  

 

२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .

 

३. गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .

४.४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .

५. कारक कौशल्याचा विकास न झालेली औतिस्तिक विधायर्त्याना कॉम्पुटर वापरण्याची परवानगी देनयेत येईल . मात्र त्या कॉम्पुटर वर पूर्वीची कोणतीही माहिती असता काम नये .

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय अनिवार्य  व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व आरोग्य शस्त्र व गृह शास्त्र  विषय .

६.इतिहास राज्यशास्त्र  व भूगोल -अर्थशास्त्र  .

 

टीप : कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत




प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे

9702158564

balajishinde65@gmail.com 

विस्तार सेवा सहायक (विषेष शिक्षा )

विस्तार सेवा विभाग ,

अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांगजन  संस्था ,बांद्रा रिक्लेमेशन ,बांद्रा (प ),मुंबई -४०० ०५०


(सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार )


अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...