Monday, June 8, 2020

‘एक “ति”चं आसण !

‘एक “ति”चं आसण

“ति”चं आसण ही एक मनात आणि घरात एक उत्तम सहवास निर्माण करणारी एक अविभाज्य आणि  अभेद्य निर्वात पोकळी आहे .इथे असणे आणि नसणे या दोन गोष्टी या विरुद्ध टोकाच्या आहेत .”ती” चा सोबत लग्नांनतर प्रत्येक व्यक्तीच्या साथीला आयुष्याला असतो .

इथे मी “ती” घरात असून नसल्याचा भास आणि इतरत्र कशी मनात पोकळी निर्माण होते हे आपणास माझा अनुभव इथे विशद करीत आहे .

राधा गेली ,महिनाभर बेचैन आहे ,अचानक मुतखडा असल्याचे निदान झाल्यामुळे महिनाभर ती त्रास सहन करते आहे ...दरम्यान चार डॉक्टर बधून झाले ..आणि यात एक महिना निघून गेला .

डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ऑपरेश हा एकच पर्याय राहिला म्हणून ती खूप तणावाखाली होती ..एके दिवशी तिने ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय स्वतः घेतला आणि मानाने तयार झाली. शनिवारी सांयकाळी वाशी सेक्टर १० मध्ये संपूर्ण रिपोर्ट दाखऊ असे म्हणत मला थेट शाळेत घेऊन गेली आणि त्याच दिवशी ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय हि घेतला . १२ ऑक्टोबर ला तिने खडा काढून घेतला .

  तीन दिवसाने सुखरूप घरी आली ...एकदम निस्तेज पावलाने . ती खूप व्याकूळ झाली आणि थकली .एवढी निस्तेज आणि व्याकूळ झालेली मी तिला आजच बघतो आहे .घरी आल्यावर एकदम तिच्या अंगात त्राण उरला न्हवता  .सतत तीन दिवस ओकारी करीत राहिली ,अन्न पाणी वर्ज केली म्हणून दिलेली औषधे टाळू लागली.आणि यातच ती एकदम विक झाली  ..दरम्यान रजेवर होती ,आणि पुढच्या आठवड्यात कुमुद शाळेला दिवाळी सुट्टी लागणार होती .

एरवी कंबर कसून लक्ष्मी सारख्या हातातील बांगड्या मागे सारत सकाळी सहा च्या घटके पासून किचन मध्ये मला दिसणारी ती दिसत नाही हे जाणीव मला तीव्र वेदना करीत होती .या वेळेला ती अशीच जोपून राही .मी पण तिची काळजी घेण्यासाटी सुट्टीवर होतो ...ती कांही खातच नाही हे बघून माझा जीव भांड्यात पडत असे ..

नाश्ता ,जूस आणि तिला विचारून अनेक प्रकार मी आणि माझ्या माय ने तयार करून दिले पण ती खातच न्हवती. .. आम्ही दोघे एकमेकाकडे बघून धीर धरून होतो .आज मितीला माझी माय नसती तर माझे काय हाल असते ते विचार करावसं वाटत नाही ? . शेवटी माय ते माय ,तिची सर कोणाला नाही ? माझ्या माय ने खूप तिची सेवा केली .हे कित्तेक वेळा आम्ही आजमावले आहे .

  घरात आम्ही कोणी आजारी पडले कि तिला कुठून हिम्मत येते माहित नाही वय सत्तर पार करून हि ती अजून कणखर आहे ...”न सुगर न बिपी” .अशी आई घरो घरी असावी .आम्ही चौघे भावंडे पण तिला इकडेच माझ्याकडे राहावेशे वाटते ,माझे दादा आम्हाला सोडून गेल्या पासून .

“ती” गेली दोन आठवडे फक्त विचार आणि विचार करत होती ,झोपण्याचा बहाणा पण ती डोळे बंद करून नुसती पडून राहत असे .माझा मुलगा आदित्य युके वरून तेंव्हा मायदेशी घरी आली तेंवा ती बरी होऊ लागली .हळू हळू सकाळी नाश्ता करू लागली आणि परत दिलेल्या गोळ्या घेऊ लागली ...पण तीन दिवसाने तिने मला आदेश दिला कि त्या गोळ्या नकोत ,कचर्यात टाकून द्या ! ‘म्हणून तिने परत गोळ्याकडे पाठ फिरवली ..

“ती”चा  घरात वावर असणे किती सुखकारक असतो तो “त्या”लाच कळते ,बाकी सगळा माया बाजार आहे ,मुल –बाळ ,नातेवाईक फक्त क्षणाचे सोबती असतात. ती अबोल असण ,किंवा अन्थूरनात दिवस रात्र पडून राहणे कूप काळीज पिळून काढत हो .इथे भावना व्यक्त करण्यास भाषा कमी पडते .

एरवी दिवाळी सणांना अनेक प्रकारच्या खाऊ ने भरलेले डबे या दिवाळीत  रिकामे आहेत ,ती मनात खूप इच्छा असताना हि ,अबोल झाली आहे .मोठा मुलगा आपल्या मायदेशी परत येण्याने  तिचे मन मुरेजून गेले आहे कारण त्याच्या आवडीचे फराळ ती करू शकत नाही म्हणून. अमर्त्य आणि आदित्य आणि मला आवडणारे पाधार्त न करता आल्याचा चेहरा मी रीड केला आणि मनातल्या मनात बांधून ठेवला.मी म्हणालो अगोदर बरी हो मग खूप फराळ कर ,तुला खावासा वाटेल ते ,आम्ही सगळे आहोत न तुला मदत करायला ..तेंव्हा ती गालात हसून आम्हाला साथ दिली तिने .

गेली पंचवीस वर्ष खूप कष्ठ केले तिने  “ति”चा सुखद सहवास मला लाभला कधी थकलेली मी पहिली नाही तिला ,पण आपल्या स्वतःच्या हलक्या शारीरिक व्याधी मुळे कधी चिडचिड होते पण थकत नाही .परत नव्या उमेदीने कामाला लागते .हा तिच्या मनातील  मोठ्या मनाचा कप्पा सतत ओपेन असतो .

ती आजारी असल्या पासून माझे पण मन खूप बेचैन ,कामात किंवा इतरत्र लक्ष लागत न्हवते...“ती ” आज मितीला बऱ्या पैकी रीकवर झाली आहे. मी चेहरा रोज सकाळ-संध्याकाळी  रीड करीत असतो .आणि यामुळे माझ्यात थोडी टाकत वाढत चालली आहे.आता ती बरी होत आहे ...

प्रत्येक पुरुषाला वाटते कि आपली “ती” सुदर आणि सशक्त असवी ,साहजिकच मला पण त्या हि पलीकडे वाटते .पण वास्तवात तसे नसते ,एकमेकाला समजून घेणे यातच दोघांचे गुण्या -गोविंदाने सोबत राहणे यातच दोघांचे गुपित असते ,आणि हे प्रत्येक घरात असावे .....’एक “ती” चे असणे !  

  प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे \ राधा \ ०६ नोवेंबर २०१९




Friday, June 5, 2020

जेष्ठ पौर्णिमा : वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती.

जेष्ठ पौर्णिमा "

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे . मंगलदायी ठरली आहे.
या पौर्णिमेचे आपण महत्व जाणून घेतले पाहिजे . बौद्ध जगतात या पौर्णिमेला अनन्य 
साधारण महत्व आहे. 

सिद्धार्थ गौतमाला इ.स.पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती 
सम्यकसंबोधि प्राप्त होऊन तथागत सम्यक समबुद्ध होतात. आपल्याला मिळालेल्या 
ज्ञानाची पुन्हा पुन्हा उजळणी करावी यासाठी चवथ्या आठवड्यात जेष्ठ पौर्णिमेच्या 
दिवशी रत्नघर या स्थळी राजायतन या झाडाखाली बसले असता ब्रम्ह देशाचे दोन (२)
व्यापारी तपस्सू व भल्लिक हे तिथे आले आणि तथागत भगवान ज्या झाडाखाली 
बसले होते त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली सावलीत भोजन करण्यासाठी बसले 
असता त्यांच्या मनात तथागत बुद्धांना भोजनदान देण्याची प्रेरणा झाली. आणि 
भगवान बुद्धां जवळ येऊन त्यांनी तथागतांना याचना केली . भन्ते , आम्ही आपणास भोजन म्हणून आणलेल्या गोड पदार्थाचा आपण स्वीकार करावा . आम्हांला
समाधान वाटेल .
भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र पुढे केले आणि त्यांच्या गोड पदार्थाचा स्वीकार केला .
भोजन झाल्यावर तथागताने या व्यापाऱ्यांना आपला पहिला धम्म उपदेश केला. 
दोन सरणं देऊन त्यांना उपासक केले . दोन सरणं म्हणजे बुद्धं सरणं गच्छामि | धम्मं 
सरणं गच्छामि || कारण तोपर्यंत संघाची स्थापना झालेली नव्हती . तथागतांचे हे
प्रथम उपासक झाले . त्या दिवशी जेष्ठ पौर्णिमा होती . त्या दोन व्यापाऱ्यांच्या 
विनंतीवरून भगवान बुद्धांनी त्यांना केश धातू भेट दिले .त्या व्यापाऱ्यांनी ब्रम्हदेशात 
जाऊन भगवान बुद्धांच्या केश धातूवर १५० फुट उंच स्तूप बांधलेला आहे . तेथील लोक 
प्रत्येक जेष्ठ पौर्णिमेला फार श्रद्धेने जमतात आणि पूजापाठ ,वंदना , प्रवचन यांचे 
ओयोजन केले जाते . हा स्तूप आजही ब्रम्हदेशात आहे .

जेष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व असे आहे की, तथागत भगवान बुद्धांनी सेनानी कन्या 
सुजाताला सेनानी गावात जाऊन धम्माचा उपदेश केला .

जेष्ठ पौर्णिमेचे तिसरे महत्व असे की, चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची सुकन्या 
संघमित्रा भिक्षुणीने बुद्धगयेच्या बोधीवृक्षाची शाखा ( फांदी ) अनुराधापूर , श्रीलंका 
येथे नेऊन लावली . आणि बौद्ध धम्म प्रचार कार्याला प्रारंभ केला .त्यादिवशी जेष्ठ 
पौर्णिमा होती. संघमित्रा यांच्या प्रेरणेने अनेक स्त्रिया व पुरुष भिक्षु व भिक्षुणी झाले 
होते. आज श्रीलंकेत ८० % लोक बौद्ध आहेत . या जेष्ठ पौर्णिमेला येथे लोक 
जमतात . बुद्धापुजापाठ ,वंदना ,सूत्रपठण करतात. प्रवचनाचे आयोजन केले जाते .

या महत्वपूर्ण घटना जेष्ठ पौर्णिमेला घडल्या आहेत . भगवान तथागतांनी 
कापिलवस्तूच्या जनतेला महासमय सुत्त्ताचा उपदेश याच पौर्णिमेला केला 
आहे .

" सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा "

! जय भिम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!! 

Tuesday, June 2, 2020

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

 

दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि  एस एस सी परीक्षेला बसत असतात ,या प्रवर्गातील मुलांची संख्या  दर वर्षी वाढत चालली आहे . काही मुले विशेष शाळेतून तर कांही मुले सर्वसाधारण शाळेतून परीक्षेला  बसत असतात . तेंव्हा काही गोष्टी ध्यानात घेणं मह्त्वाच आहे . वेळो वेळी महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे आणि मुंबई मिळून अश्या मुलांच्या परीक्षे संधर्भात परिपत्रिकात बदल करून नवीन परीपत्रक परीक्षे अगोदर एक महिना प्रकाशित करीत असते . आणि त्या मध्ये विशेष मुलांसाठी सवलती जाहीर करीत असते .

 

कर्णबधिर मुलांत  भाषा विषयाचे आकलन कठीण जाते  , किंवा कमी असते म्हणजे त्यांच्या शाळेतील प्रवेशावर अवलंबून असते . शाळेत जर लवकर प्रवेश मिळाला असेल तर योग्ये यंत्राचा वापर करून ऐकण्याची सवय लावून उचित थेरपी देऊन लवकर भाषा विकास साध्य  करता येतो ,आणि उशिरा  शाळेत प्रवेश मिळाला असेल तर भाषा विकासाला खीळ येतो ,अश्या मुलांसाठी खास सवलत द्यावी लागते .आणि ती शासन दरबारी देऊ केली आहे .

 

यात चार भाषेचा समावेश आहे .एक भाषा अभ्यासावी  लागते ,आणि इतर विषय म्हणजे टंकलेखन ,चित्रलकला ,शिवण काम यासारखे विषय घ्यावे लागतात . शास्त्र विषया  ऐवजी शरीर विज्ञान ,आरोग्य व गृह शास्त्र या सारखे सोप्पे विषय घेऊन  एस एस सी परीक्षेला बसता येते . आणि त्यांचा एस एस सी परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा होतो .

 

सदरील  सूचना  राज्यातील सर्व  शासन मान्य शाळेत  परिपत्रक काढुंन पुरवण्यात येते. हि सवलत मंजूर करून देण्यासाठी फॉर्म क्र १ ते ५ सोबत देण्यात येतो . अश्या स्वरूपाचा फार्म  भरून अपंग संवर्गानुसार संबंधित जिल्हा चित्सालय अथवा शासनाने निर्देशित केलेल्या रुग्णालयात त्यांच्या वैधकीय प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतिसह त्या त्या शैक्षणिक वर्षात मंडळाकडे ३१ ऑगस्ट पूर्वी मंडळाकडे सादर करावा लागतो . आणि हे बंधनकाकार असते ,कि कोणत्याही अपंग प्रवर्गातील सवलती बाबत मंडळाची पूर्व परवानगी आवश्यक असते . आणि हे परिपत्रक तक्त्यासहित विज्ञार्थी ,पालक ,शाळेचे कर्मचारी ,( शिक्षकेतर व शिक्षक) याची नोंद ठेवण्याचे बंधनकारक आहे .

 

विविध प्रकरच्या फॉर्म्स मध्ये ,फार्म नंबर १ अंध ,फार्म नंबर २ कर्णबधिर -२;डम्ब  फार्म नंबर  ३ अंतर्गत , शारीरिक विकलांग ४,पस्टिक ५फार्म नंबर ४ अंतर्गत लर्निंग विकलांगता ,आणि फार्म नंबर ५ अंतर्गत ऑटिसम या फार्म चा अंतर्भाव आहे . हे सोपस्कार पूर्ण झाल्यावर परीक्षेला बसता येते.

 

मुलांना विषय निवडीचे स्वतंत्र्य देऊन परीक्षेसाठी  पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते . आणि वरील बाबींची पूर्तता करून झाल्यावर परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती पुरवली जाते . जेणे करून चांगल्या प्रकारे परीक्षेत यश संपादन करता यते . परीक्षेला जाण्यापूर्वी काही सूचना जरूर लक्षात ठेवाव्यात :  

 

विशेष : प्रश्न पत्रिकेवर दिलेल्या वेळेपेक्षा ३० मिनिटे अधिकच वेळ दिलेला असतो . या वेळेचा उपयोग सर्व पेपर लिहून झाल्यावर तपासणी साठी वापरण्यात यावा ,लिहलेलं बरोबर आहे का ? ,सर्व प्रश्नाचे उत्तरे लिहली आहेत का ? इत्यादी साठी वापरावा .  

 

घरून निघते वेळी श्रावणयंत्र नीट तपासून कानाला  लावून जावे .

 

परीक्षेचे  ठिकाण ,वेळ याची खात्री करून इच्छित निश्चित स्थळी जावे

 

आपल्या हातात मिळालेली  प्रश पत्रिका आपलीच आहे का ते तपासून पाहावे ,आणि काही शंका असेल तर उपस्तित शिक्षकांना/पर्यवेक्षकाला  विचारून शंकेचे निरसन करून घ्यावे . विषय बदल झाला असेल तर खात्री करून घ्यावी . कर्णबधिरांसाठी असलेल्या विशेष शाळेतून जे विज्ञार्थी एस एस सी परीक्षेला बसले आहेत आणखी काही महत्वाच्या सूचना देणे महत्वाचे आहे .

 

उत्तर पत्रिकेवर स्वछ  आणि सुवाच्च अक्षरात लिहावे ,कुठे पेपर खराब होणार नाही याची काळजी घ्यावी . स्वतःचा क्रमांक मोठ्या अक्षरात व  ठळक लिहावा . हे सर्व करण्यासाठी घरी सराव  करावा लागतो .

 

उत्तर पत्रिकेत खडाखोड करू नये . अक्षर मोठे व दूर दूर व सारख्या अंतरावर लिहावे .

नवीन प्रश्नाचे उत्तर लिहण्यासाठी नवीन पानावर सुरुवात करावी .

 

प्रश व उत्तरचे अंक नीट लिहावेत . पेपर संपूर्ण सोडवावा ,आपल्याला येत असेलली  प्रश सुरुवातीला लिहावे .

 

चुका कमी करण्यासाठी पत्र ,गोस्ट आणि निबंध लिहीत असताना वाक्य लहान तयार करावीत ,जेणेकरून चुका होणार नाहीत . पत्रात स्वताचे नाव घालू नये पत्रातील पत्ता सुवाच्च आणि आटोपशीर असावा . दिलेली गोष्ट लिहीत असताना २-३ वेळा वाचून काढावी .,त्याचे परिच्छेद पाडावेत ,गोष्टीला शीर्षक म्हणजे नाव द्यावे ,नामे ,विशेष नाव लिहावीत ,उदा . राजा ,गाव ,मुलगा ,मुलगी इत्यादी . निबंध लिहीत असताना जो आपल्या आवडीचा आणि माहितीचा असेल तोच लिहावा ,आणि वेळ वाया घलू नये .त्यामुळे वेळ वाचतो व आवडीचाच विषय असल्यामुळे मार्क जास्त मिळण्यास मदत होते .  

 

प्रश्न व उप्र प्रश्नाचे  अंक नीट लिहावेत .

 

भूगोल ,विज्ञान आणि भूमिती ,या मध्ये ठळक अक्षराने व टोकदार पेन्शील ने लिहाव्यात . भूगोल मधील नकाशे सूची रेखीव पद्धतीने लिहावीत . आवशक्य तेथे आकृत्या काढायला विसरू नये ,कारण याचे मार्क सहज मिळत असतात . आकृत्यांवरील सूचना वाचून तशी कृती करावी .

 

अश्या मुलासाठी गृहविज्ञान खूप महत्वाचे आहे . या विभागात करणे द्या याला दोन गुण  असतात . एखादे कारण विचारले असेल तर ते बाजूलाच आकृती काढून नाव द्यावे लागते . आकृती काढल्या मुळे जास्तीचे मार्क जरूर मिळतात . एखादे उदाहरण विचारले असेल आणि आकृती लढण्याचे विचारले नसेल तर जरूर आकृती काढावी ,कारण आकृती वाढल्यावर पर्यवेक्षकाला कळते कि या मुलास प्रश्नाचे पूर्ण आकलन झाले आहे .

 

अर्थशात्र, विज्ञान ,आणि इतिहास भूगोल यातील काही मोठे प्रश्न अधोरेखित करावे ,तसेच गाळलेले  आणि महत्वाचे शब्द अधोरेखित करावे . हे करीत असताना कोठेही लाल शाई ,पेन्शील वापरू नये .

 

प्रशपत्रिका वाचून झाल्यावर अथवा वाचत असताना मुले काही लिहीत असतात ,तसे करता कामा नये .

 

कच्ची गणिते उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूवर लिहावेत . पक्की केल्यावर त्या ठिकाणी x अशी फुल्ली मारावी .

 

परीक्षेला जाताना सर्व वर्ग शिक्षकाने सांगितलेल्या  गोष्टी बरोबर घ्याव्यात ,आणि त्याने दिलेल्या नियमांचे वेळो वेळी पालन करावे

 

या मुलांसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रात्यक्षिक होय , प्रात्यक्षिकात  गृहशात्र ,आरोग्य शास्त्र ,शरीर शास्त्र ,या विषयाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे .  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोजक्या व नेमक्या वाक्यात द्यावी .उत्तरे  पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करावा . त्यासाठी आकृत्यांचा नीट व रोज अभ्यास करावा लागतो . शेवटी आपणास मिळालेल्या अर्ध्यां तासाचा पूर्ण  वापर करावा आणि नीट व सुवाच्च अक्षरात लिहण्याचा प्रयत्न करावा ,यश तुमच्या दारी उभे आहे .

 

विशेष गरज असणाऱ्या (अपंग) विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या सवलती :आणि यात येणारे अपंग संवर्ग :

 

  1. अंध विज्ञार्थी

  2. कर्णबधिर विज्ञार्थी

  3. अस्थिव्यंग विध्यार्थी

  4. बहुविकलांग विध्यार्थी  /(सेरेब्रल पाल्सी)

 

5.            अध्ययन अक्षमता विध्यार्थी

 

6.            स्वमग्न

          ऑटिझमग्रस्त विध्यार्थी

 

क्र

अपंगांचा प्रकार

अपंग कोड क्र.

वेळेची सवलत

सवलती

विषय सवलत

०१

अंध

प्रति तास २०

मिनिटे

१. निवडी प्रमाणे परीक्षा केंद्र दिले जाईल .

२. मंडळाच्या नियमास अधीन राहून आवश्यक्त्यानुसार व मागणी नुसार लेखनिक देनाय्त येईल .

३.आकृती ,नकाशे, आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .

४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .  

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंकगणित व त्या सोबत कार्यशिक्षण विषयांपैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीरशास्त्र,आरोग्यशाश्त्र व गृहशास्त्र विषय .

६.इतिहास -राज्यशास्त्र व भूगोल अर्थशात्र   

०२

कर्णबधिर

मूकबधिर

३० मिनिटे अधिक वेळ

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते .

विषय

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय अनिवार्य व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०३

अस्थिव्यंग

प्रति तास २० मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. विज्ञार्थी हाताने अपंग आल्यास आकृती नकाशे आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .

३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .

४.शारीरीक विषयात सूट दिली जाते


०४

बहुविकलांग

(सेरेब्रल पाल्सी)

बहू विकलांग १ तास २० मिनिटे.

 

सेरेब्रल पाल्सी

प्रति तास २० मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. उत्तरपत्रिका टाईप करून व किंवा लिहून  देण्याची परवानगी दिली जाते.

३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .

४.शारीरीक विषयात सूट दिली जाते

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय सूट कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०५

अध्ययन अक्षमता

२५ टक्के जादा वेळ

प्रति तास १५ मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .

गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .

मंडळाच्या नियमात अधीन राहून आवशक्यतेनुसार व मागणी नुसार लेखनिक देण्यात येईल  

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय ऐवजी कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप :फक्त डिसकालकुलीया विधायर्त्यांचया ७ वीचे  अंक गणित हा  विषय घेता येईल .

 

कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०६

स्वमग्न

ऑटिझमग्रस्त

प्रति तास २० मिनिटे

१. ऑटिझमग्रस्त उमेदवार ज्या शाळेत विज्ञार्थी असेल त्या शाळेत त्याच शाळेत परीक्षेची व्यवस्था करण्यात येते किंवा मागणी नुसार जवळच्या शाळेत केंद्र म्हणून दिले जाते .  

 

२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .

 

३. गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .

४.४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .

५. कारक कौशल्याचा विकास न झालेली औतिस्तिक विधायर्त्याना कॉम्पुटर वापरण्याची परवानगी देनयेत येईल . मात्र त्या कॉम्पुटर वर पूर्वीची कोणतीही माहिती असता काम नये .

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय अनिवार्य  व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व आरोग्य शस्त्र व गृह शास्त्र  विषय .

६.इतिहास राज्यशास्त्र  व भूगोल -अर्थशास्त्र  .

 

टीप : कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत




प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे

9702158564

balajishinde65@gmail.com 

विस्तार सेवा सहायक (विषेष शिक्षा )

विस्तार सेवा विभाग ,

अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांगजन  संस्था ,बांद्रा रिक्लेमेशन ,बांद्रा (प ),मुंबई -४०० ०५०


(सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार )


#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...