Monday, June 8, 2020

‘एक “ति”चं आसण !

‘एक “ति”चं आसण

“ति”चं आसण ही एक मनात आणि घरात एक उत्तम सहवास निर्माण करणारी एक अविभाज्य आणि  अभेद्य निर्वात पोकळी आहे .इथे असणे आणि नसणे या दोन गोष्टी या विरुद्ध टोकाच्या आहेत .”ती” चा सोबत लग्नांनतर प्रत्येक व्यक्तीच्या साथीला आयुष्याला असतो .

इथे मी “ती” घरात असून नसल्याचा भास आणि इतरत्र कशी मनात पोकळी निर्माण होते हे आपणास माझा अनुभव इथे विशद करीत आहे .

राधा गेली ,महिनाभर बेचैन आहे ,अचानक मुतखडा असल्याचे निदान झाल्यामुळे महिनाभर ती त्रास सहन करते आहे ...दरम्यान चार डॉक्टर बधून झाले ..आणि यात एक महिना निघून गेला .

डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ऑपरेश हा एकच पर्याय राहिला म्हणून ती खूप तणावाखाली होती ..एके दिवशी तिने ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय स्वतः घेतला आणि मानाने तयार झाली. शनिवारी सांयकाळी वाशी सेक्टर १० मध्ये संपूर्ण रिपोर्ट दाखऊ असे म्हणत मला थेट शाळेत घेऊन गेली आणि त्याच दिवशी ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय हि घेतला . १२ ऑक्टोबर ला तिने खडा काढून घेतला .

  तीन दिवसाने सुखरूप घरी आली ...एकदम निस्तेज पावलाने . ती खूप व्याकूळ झाली आणि थकली .एवढी निस्तेज आणि व्याकूळ झालेली मी तिला आजच बघतो आहे .घरी आल्यावर एकदम तिच्या अंगात त्राण उरला न्हवता  .सतत तीन दिवस ओकारी करीत राहिली ,अन्न पाणी वर्ज केली म्हणून दिलेली औषधे टाळू लागली.आणि यातच ती एकदम विक झाली  ..दरम्यान रजेवर होती ,आणि पुढच्या आठवड्यात कुमुद शाळेला दिवाळी सुट्टी लागणार होती .

एरवी कंबर कसून लक्ष्मी सारख्या हातातील बांगड्या मागे सारत सकाळी सहा च्या घटके पासून किचन मध्ये मला दिसणारी ती दिसत नाही हे जाणीव मला तीव्र वेदना करीत होती .या वेळेला ती अशीच जोपून राही .मी पण तिची काळजी घेण्यासाटी सुट्टीवर होतो ...ती कांही खातच नाही हे बघून माझा जीव भांड्यात पडत असे ..

नाश्ता ,जूस आणि तिला विचारून अनेक प्रकार मी आणि माझ्या माय ने तयार करून दिले पण ती खातच न्हवती. .. आम्ही दोघे एकमेकाकडे बघून धीर धरून होतो .आज मितीला माझी माय नसती तर माझे काय हाल असते ते विचार करावसं वाटत नाही ? . शेवटी माय ते माय ,तिची सर कोणाला नाही ? माझ्या माय ने खूप तिची सेवा केली .हे कित्तेक वेळा आम्ही आजमावले आहे .

  घरात आम्ही कोणी आजारी पडले कि तिला कुठून हिम्मत येते माहित नाही वय सत्तर पार करून हि ती अजून कणखर आहे ...”न सुगर न बिपी” .अशी आई घरो घरी असावी .आम्ही चौघे भावंडे पण तिला इकडेच माझ्याकडे राहावेशे वाटते ,माझे दादा आम्हाला सोडून गेल्या पासून .

“ती” गेली दोन आठवडे फक्त विचार आणि विचार करत होती ,झोपण्याचा बहाणा पण ती डोळे बंद करून नुसती पडून राहत असे .माझा मुलगा आदित्य युके वरून तेंव्हा मायदेशी घरी आली तेंवा ती बरी होऊ लागली .हळू हळू सकाळी नाश्ता करू लागली आणि परत दिलेल्या गोळ्या घेऊ लागली ...पण तीन दिवसाने तिने मला आदेश दिला कि त्या गोळ्या नकोत ,कचर्यात टाकून द्या ! ‘म्हणून तिने परत गोळ्याकडे पाठ फिरवली ..

“ती”चा  घरात वावर असणे किती सुखकारक असतो तो “त्या”लाच कळते ,बाकी सगळा माया बाजार आहे ,मुल –बाळ ,नातेवाईक फक्त क्षणाचे सोबती असतात. ती अबोल असण ,किंवा अन्थूरनात दिवस रात्र पडून राहणे कूप काळीज पिळून काढत हो .इथे भावना व्यक्त करण्यास भाषा कमी पडते .

एरवी दिवाळी सणांना अनेक प्रकारच्या खाऊ ने भरलेले डबे या दिवाळीत  रिकामे आहेत ,ती मनात खूप इच्छा असताना हि ,अबोल झाली आहे .मोठा मुलगा आपल्या मायदेशी परत येण्याने  तिचे मन मुरेजून गेले आहे कारण त्याच्या आवडीचे फराळ ती करू शकत नाही म्हणून. अमर्त्य आणि आदित्य आणि मला आवडणारे पाधार्त न करता आल्याचा चेहरा मी रीड केला आणि मनातल्या मनात बांधून ठेवला.मी म्हणालो अगोदर बरी हो मग खूप फराळ कर ,तुला खावासा वाटेल ते ,आम्ही सगळे आहोत न तुला मदत करायला ..तेंव्हा ती गालात हसून आम्हाला साथ दिली तिने .

गेली पंचवीस वर्ष खूप कष्ठ केले तिने  “ति”चा सुखद सहवास मला लाभला कधी थकलेली मी पहिली नाही तिला ,पण आपल्या स्वतःच्या हलक्या शारीरिक व्याधी मुळे कधी चिडचिड होते पण थकत नाही .परत नव्या उमेदीने कामाला लागते .हा तिच्या मनातील  मोठ्या मनाचा कप्पा सतत ओपेन असतो .

ती आजारी असल्या पासून माझे पण मन खूप बेचैन ,कामात किंवा इतरत्र लक्ष लागत न्हवते...“ती ” आज मितीला बऱ्या पैकी रीकवर झाली आहे. मी चेहरा रोज सकाळ-संध्याकाळी  रीड करीत असतो .आणि यामुळे माझ्यात थोडी टाकत वाढत चालली आहे.आता ती बरी होत आहे ...

प्रत्येक पुरुषाला वाटते कि आपली “ती” सुदर आणि सशक्त असवी ,साहजिकच मला पण त्या हि पलीकडे वाटते .पण वास्तवात तसे नसते ,एकमेकाला समजून घेणे यातच दोघांचे गुण्या -गोविंदाने सोबत राहणे यातच दोघांचे गुपित असते ,आणि हे प्रत्येक घरात असावे .....’एक “ती” चे असणे !  

  प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे \ राधा \ ०६ नोवेंबर २०१९




No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...