Sunday, June 18, 2023

येवलाआणिधम्मातर_घोषणा !

 येवलाआणि धम्मातर_घोषणा !

येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील  तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.

कार्यालयीन कामा निमित्त अनेकदा इथे जाण्याचा योग आला . आमचे मित्र कोकाटे सर या गावचे.  यांनी मला अनेकदा इथे बोलावले होते .ते एक शासन मान्य कर्णबधिर शाळा चालवतात .  एकदा येथील इतिहास कळल्या पासून  परत परत जाण्याची इच्छा होत असे कारण असे की ही भूमी डॉक्टर बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन तर झाली होती पण इथूनच हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा झाली होती . 

मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. 

आणि ती  घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  अशोक विजयादशमीला १४  ऑक्टोबर १९५६  रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे  आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो . 

जय भीम !नमो बुद्धाय !!

प्रा.  बी.  आर.  शिंदे ,कर्णबधिरांचे  विशेष शिक्षण तज्ञ .

(संदर्भ फोटो : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला)



No comments:

Post a Comment

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...