About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Sunday, June 18, 2023

झाली एकदा किलबिल सुरू


 झाली एकदा किलबिल सुरू


राज्यातील विदर्भ वगळता शाळांमध्ये आजपासून म्हणजेच 15 जून 2023 पुन्हा किलबिल  सुरू होणार आहे . शाळा गजबजलेल्या असणार आहेत ,शाळा भरलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आज शाळा - शाळातून ध्जय्यत तयारी सुरू झालेली आहे.  मात्र पहिल्याच दिवशी शाळांमधून विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले?

यामागील काय राजकारण आहे ते अद्याप कळलेले नाही?   गणवेश आणि वह्या पुस्तके यामागे या राज्यातच नसून संपूर्ण देशामध्ये मोठे राजकारण अडकलेले आहे. यामागचे मोठे घोडबंगल अजून उलगडलेली नाही? 


खऱ्या अर्थाने उन्हाळ्याच्या अति तीव्रतेमुळे २०२० -२३  हे शैक्षणिक वर्ष एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच संपवले गेले ,कारण होते अति तीव्र उन्हाळा.  एकंदरीत अंदाजे पावणेदोन महिन्याच्या सुट्टीनंतर बालक आणि पालक एकमेकांशी भेटणार आहे दीर्घ  सुट्टीनंतर आजपासून पुन्हा शाळा सुरू होत आहे..


मागील काळात जाहीर केल्याप्रमाणे विदर्भ विभागातील शाळा अजून सुरू झालेल्या नाहीत..पूर्व प्राथमिक मधून पहिलीत  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली आहे.. पालकांनी  त्यांची लगबग सुरू झालेली आहे.  शाळेविषयी आपुलकी वाटावी , आदर वाटावा शिक्षकाचा सन्मान व्हावा पालकांचा सन्मान व्हावा यासाठी शाळेतून उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 


आज शाळेत पहिलं पाऊल टाकलेल्या  चिमुकल्या बालकांचे त्यांच्या  पालकांचे, शिक्षकाचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  अनेक अनेक हार्दिक अभिनंदन!!


 प्रा बी आर शिंदे ,कर्णबधिरांचे  विशेष शिक्षणतज्ञ .

No comments:

Post a Comment

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...