Sunday, December 11, 2016

आपल्या मातृ भाषेवर कृतीशील प्रेम करावे !

आपल्या मातृ भाषेवर कृतीशील प्रेम करावे
Image result for book montessori method

दिनांक २७ /२ /१३ रोजी ‘मराठी राजभाषा  दिन ‘ आहे . आपली बोली आणी मायबोलीला  ,इंग्रजीत  आपण “मदरटंग” म्हणतो . जपान सारख्या प्रगत देशात हि याला महत्व आहे . पण आपल्या कडे का नाही  ? मराठी भाषेच्या भवितव्या साठी  सातत्याने चिंता करणारे धुरीण तिच्या अस्तित्वासाठी कोणती कृती करतात ? कारण प्रश्न फक्त मातृभाषेचा नाही ,किंवा तिच्या प्रेमाचा हि नाही ,प्रष्न आहे तो तिच्या २००० वर्ष्यापेक्ष्या  अधिक काळ वाहत आलेल्या ज्ञानाचा ,संस्कृतीचा आणि संचिताचा आहे .

आपण भारतीय या गोष्टीला मुकत चाललो  आहोत .थेट जन्माने मिळणारे हे संचित आपण नाकारत आहोत . इंग्रजी सारख्या परक्या भाषेत आपण आज आपल्या लाडक्या मुलांना शिक्षणाच्या नावाखाली अपरिचित संस्कृती ,आणि संचितात ढकलत आहोत . ते इतर राष्ट्रात होत नाही .मोंटेसरी  नावाच्या बाईने पुर्वाते देशात इटलि येथे आपल्या “मोटेसरी मेथोड “ या पुस्तकात मातृभाषेत  शिक्षण दिल्याने मुलावर किती संस्कार  होतात व ज्ञान मिळते याचा  उहापोह केले आहे .

आज मराठीच्या  भवितव्याची चिंता अनेकांना वाटते आहे .चिंता वाटणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले धुरीण आहेत . त्यात धुरा सांभाळणारे नेते सुद्धा  आले .

कवी, लेखक ,कथाकार ,नाटककार ,कलाकार ,निर्माते ,दिग्दर्शक इत्यादी या सर्वाना वाटते कि मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे ,तिची संस्कृती टिकली पाहिजे ,आणि तिचे  संचिते टिकले पाहिजेत .
मग हि मंडळी आपापल्या मार्गाने तिला पुढे नेत असतात .

विविध क्षेत्रातील जाणत्या आणि नेतृत्वाच्या स्थायी असलेल्या आपल्या भाषेच्या संधर्भात आपण काय करायला  हवे याची गरज आणि निकड निर्माण केलेली आहे . जरी असतील त्यांची कक्षे वेगवेगळी .

आणि हि गरज  सर्वच क्षेत्रात झाली पाहिजे असे  त्यांना वाटते ,मग ते सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय असेल . आणि त्यातल्या त्यात ती जास्त  करून “शैक्षणिक “ असायला हवी . तरच तिची पाळेमुळे आजच्या पिढीला कळतील .

मातृभाषेला २००० वर्ष्या पासुनची असलेली गढी आज आपण विसरत चाललो आहोत . यात असलेलं ज्ञान आपण विसरत चाललो आहोत ।

आज आपण हे विसरत चाललो आहोत कि आईच्या गर्भात जी भाषा शिकतो तीच मातृभाषा होय ,तीच्यापासूनच  आपण पोरके का ? मूळभाषेतच आपल्या  मुलाच्या शिक्षणाला सुरुवात होते ,तिची पाळेमुळे तेथूनच सुरु  होतात . नंतर भाषेचा विकास होत असतो ,आणि नंतरच्या काळात मुल इतर भाषा शिकते ,या भाषा  शिकत असताना प्रेत्येक ठिकाणी त्या भाषेला मुला कडून संदर्भ  लावला जातो ,जर मुळात मूळभाषेचा मुलात विकास झाला नसेल तर ,पुढील भाषा व भाषेचा आशय लावणे कठीण जाते .

म्हणून मातृभाषा अवश्य असायला हवी . खेड्यापाड्यातील मुल जेंव्हा शाळेत जाते तेव्हा त्याची भाषा  हि आईची असते ,मग ती लिखित असो कि बोली ,आणि तीच असायला हवी . तरच मातृभाषेचा विकास म्हणजेच भाषेचा विकास म्हणता येईल . जुने व नवीन याची सांगड होण्यासाठी भाषा एक मोठे साधन आहे ,आणि ती म्हणजे मातृभाषा मराठी होय .

जुनी वाक्ये नेहमी नव्याला सांगड घालत असतात . उदा.   धुरा सांभाळावी ,शेजारधर्म पाळावा ,हि झाली  आजी आजोबांची भाषा  यात आपण धुरा ,(शेतीतील अर्थाने वापरतो ) तर शहरात मित्र या अर्थाने वापरतो ,या शब्दांचे अर्थ कळण्यासाठी जुने आलेच पाहिजे . तर नवीन आणि जुन्यांची  सांगड घालता येईल ,जुनीच भाषा  नसेल तर भाषा विकास कसा करता येईल ?

भाषेला रूप देऊन आपली भाषा विकसित करू शकतो आज आपणच आपल्या मुलाबाळाना परकीय भाषेत लोटत चाललो आहोत . ती भाषा आपली नसताना देखील , ना ती आपल्या आईची न आजी- आजोबांची तरी ती परकीय भाषा आपली कळत  नकळत आपली होत आहे ? हे काही मातृभाषा विकासाला पूरक नाही या बाबीचा विचार व्हवा . हे आपण क्रूर कृत्ये करत आहोत अपरिचित भाषेत आपण लोटत असताना त्या संस्कृतीचा विचार ,संचिते आणि विचार नकळत शिकवत आहोत याचा विसर पडायला नको .

दूरगामी विचार केलातर हे फार नुकसानकारक आहे . पूर्वी आम्ही सर्वांनी मराठी भाषेत राहूनच हजारो पुस्तके वाचली ,कथा कादंबऱ्या वाचल्या आणि भरपूर ज्ञान मिळाले . जे मातृभाषेत आहे ते कुठेच नाही . जर आज लोकांना  इंग्रजी  उत्तम वाचता लिहिता येत असेल तरीपण उत्तम मराठी किती जणांना येते ?

जे लोक ज्या मातृभाषेत शिकतात त्या देश्यातील लोकांनी ,धुरिणांनी सगळे ज्ञान मातुभाषेत उपलब्ध करून दिलेले आहे ,पण तसे आपल्या मायबोलीत किंवा भारतात झालेले प्रयेत्न दिसत नाहीत ,हि खेदाची बाब आहे . त्यांचे इंग्रजी वाचून काहीच अडत नाही ,ते उच्च पातळीला गेले आहेत , मग आपलेच इंग्रजी वाचून का अडते ?त्या त्या देशाने आपल्या भाषेचा विकास केला मग आपल्याकडे का व्हायला नको ?

सगळ्या गोष्टीचे ज्ञान मराठीत उपलब्ध करून देणे हा एक उपाय होऊ शकतो ,मग विज्ञान ,सगल्या ज्ञानक्षेत्रातले ज्ञान मराठीत उपलब्ध करून हि प्रक्रिया  सतत चालू ठेवायला हवी . तरच मराठी भाषा उच्च कोटीला जाईल ,मुळात ती उच्चकोटीला आहेच फक्त तिला पुढे ढकलण्याचे सततचे बल लावायला हवे  . आणि या बाबीवर सामाजिक , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील धुरिणांनी एकत्रित येउन विचार करणे अवश्यक नाही का ?

जगातील कोणतेही बालक वयाच्या ३ वर्षीपर्येंत आपली मातृभाष्याच अवगत करत असते . मग महाराष्ट्रात  पहिलीपासून इंग्रजी विषय कश्याला हवा ? विज्ञान आणि गणित तर इंग्रजी भाषेतून शिकवणे फार घातकच आहे ? हातचे ,वजाबाकि कसे शिकवणार . कारण हे सगळे मातृभाषेतून सुलभ आणि सहज असते . कोणतेही ज्ञान फक्त मातृभाषेतूनच लवकर ग्रहण होते .

मराठी हि भाषा अतिप्राचीन आहे . चक्रधरस्वामी  ,संत  तुकाराम , संत ज्ञानेश्वर ,बा शी मर्ढेकर , शिरवाडकर ,पु ल देशपांडे हे या भाषेचे खांब आहेत . यांनी जनसामन्याला कळावी अशी मराठी  भाषा निर्मिती केली . यांच्या  प्रमाणेच आपणही थोडा खारीचा वाटा  उचलून कृतीशील आणि वक्तशीर मराठीवर प्रेम करूया .


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...