Sunday, December 11, 2016

कडेवरील तान्हे बाळ

कडेवरील तान्हे बाळ

Image result for mother feeding baby images

बाळ म्हणताच सर्वांच्या नजरेसमोर एक छानशी छबी येते. ते गोंडस गोजिरवाणे बाळ .बाळ हाच   देशाचा एक  महान नागरीक  .कुटुंबातील प्रत्येकाला बाळ हवे असते,आणि ते असायलाच हवे ,जर बाळाचे योगे रीतीने संगोपन,पालन पोषण  केले तर ,बाळ घराची ,समाजाची आणि देशाची मान जगात उंचावेल ,मग ती मुलगी असो व मुलगा .
सद्याचा काळात बाळाची खूप हेळसांड होताना आपण पाहतो .
मी निवणूक अधिकारी असतानाची घटना ,एका लेखात लिहिले होते कि ,"कडेवरील बाळास मतदान केंद्रात परवानगी देण्यात यावी ".....तसे आणखी सरकारी दफ्तरी आदेश आहेत असे मला वाटत नहि.
कडेवर घेतलेले हल्लीच्या काळात एक देखील बाळ  बघायला मिळणार नाही .(दुरचित्रवाणीच्या कार्यक्रमातील  राखी सावंत सोडली तर  ,चांगल्या अर्थाने आदर्श अदिवशी व ग्रामीण माता भगिनी वगळता ) ..
कडेवरील बाळ हि संकल्पना अत्येंत चांगली व बाळाच्या वाढीस व पोषणास उपायकारक आहे बाल कडेवर घेतल्याने बालकाच्या  संगोपनास त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो .बाळ  कडेवर घेतल्याने खालील गोष्टीचा फायदा होतो .

मुल कडेवर घेण्याची फायदे खालील प्रमाणे आहेत
१.भाषा वाढीस मदत :
मुल कडेवर असल्याने मुलांची भाष्या वाढ लवकर होते .जेव्हा आई बडबड करते एखादे गाणे गुणगुणते तेंव्हा  मुलाला खूप आनंद होतो ,तेच तेच एकूण मुल पुन्हा गुंगुण्याचा प्रयेत्न करते .मुल दोन वर्ष्या खालील असेल तर सतत बडबड करीत असते आईला हैराण करून सोडते ,आणि बोलण्याचा प्रयेत्न करते .आणि सतत प्रश्न विचारीत असते .आई हे काय आहे ?ते काय आहे ?मला ते दे ?ममी मला हे दे ते ? मला भूक लागली आहे दुदु दे खाऊ  दे ? इत्यादी .मुल जेंव्हा अर्धे वाक्य बोलते तेंव्हा आई ते पूर्ण करते ,आणी हसत खेळत मुळात भाष्या विकास घडून येतो .उदा.बाबा आले ..बाबा आले ..मग आई बोलते ..बाळा बाबा ऑफिस मधून आले ,असे म्हणावे ..!
जगातील कोणत्याही मुलात  भाषा विकासाचा काळ म्हंजे वयाची ३ वर्ष होय ,आणि या काळात मुल हे ज्यास्तीत जास्त  आई कडेच असते .याच  काळात मुल आईची भाषा शिकते ,आणि ती आईकडूनच शिकते .आणि हि भाषा मुल आईकडून ऐकून ऐकून शिकते .आणि नंतरच्या काळात या भाषेला अमूर्त स्वरूप  प्राप्त होते .तेंव्हा मुल कडेवर घेतल्याने हा सर्वात मोठा फायदा बघावयास मिळतो .  

२.सुरक्षितता :
मुल कडेवर असेल तर ते स्वताला सुरक्षित समजते .त्याला कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही .बिनदिक्कत आईच्या कडेवर बागडत असते .म्हणून आईच्या कडेवर मुल असायला हवे .



३.आईचा स्पर्श :
बाळाच्या एकंदरीत वाढीस व संगोपनात आईच्या स्पर्श्यची खूप गरज असते .सतत बाळ कडेवर असल्यावर आईच्या स्पर्शाने बाळ सतत उबदार राहते .जसे कांगारूच्या पिशवीत तिचे छोटे बाळ असते .जेव्हा बाळाला आईच्या उबदार स्पर्शाची उब मिळते तेंव्हा बाळाला कसलीच भीती वाटत नाही ,याचाच अर्थ बाळ कडेवर असताना धस्थपुस्थ होते .बिनदिक्कत आईच्या कडेवर बागडत असते .म्हणून आईच्या कडेवरील मुल खूप सुरक्षित वाढते .
४.संसर्ग रोगापासून  बचाव  
हल्लीच्या काळात शहरी भागात आणि वातावरणात आणि कार्यालइन  कामकाजात आईला मुलाना कडेवर घेण्यास वेळच कोठे असतो .तेंव्हा बरीच मुले घराबाहेर ठेवली जातात .काही मुले पाळणा घरात ,क्रेडल मध्ये ,घरात काम करणाऱ्या घरवालीकडे किंवा घरकाम करणाऱ्या बायकांकडे ठेवले जाते .
फारतर मुले पाळणाघरात ठेवली जातात ,किंवा अंगणवाडीत जातात ,( ग्रामीण भागात )अश्या एकंदरीत मुले  ठेवल्यामुळे एकमेकांचे आजार व आजारपासून  होणारे संसर्ग होण्याची संभावना असते .आणि संसर्गरोग होण्याचा ज्यास्त प्रदूभाव असतो .
म्हणून अश्या प्रकारच्या रोगापासून बचाव करण्यासाठी मुल कडेवर वावरणे महत्वाचे असते .
हल्लीच्या काळात  बर्याच मात्ता भगिनी या कामावर जाणार्या  असतात तेंव्हा त्यांच्याकडे वेळ नसतो .तरी पण आपण जेंव्हा जेंव्हा घरी असता तेंव्हा तेंव्हा घरामध्ये वरांड्यात ,गच्चीवर फिरता फिरता बाळ कडेवर घेऊन फिरावे .म्हणजेच कडेवर घेऊन फिरावे .तेंव्हा बाळ खूप आनंदित पहावयास मिळेल .आणि कालांतराने गुटगुटीत दिसेल ,गुटगुटीत बाळ म्हणजे निरोगी बाळाचे लक्षन होय.
तसे पाहीलेतर तर आजकालच्या चंदेरी दुनियेत आणि फ्याशन च्या जमान्यात आई मुल कडेवर घेताना दिसत नाही .कारण सुडौल बंद्याचा प्रश्न उद्भवतो मध्येम वर्गापासून ते उच्च शिक्षित वर्गापार्येंत आईपेक्ष्या घरात काम करणाऱ्या बायका मुलांचे संगोपन करतात .ह्यामुळे आई व बालकात प्रेम वाढत नाही .जिव्हाळा वषात नाही .त्यामुळे दुरावाच ज्यास्त निर्माण होतो .तेंव्हा मुल मुल असुरक्षित होण्याची भीती ज्यास्त निर्माण होते .       


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...