Wednesday, August 31, 2022

श्रमिक आणि वैदिक संस्कृती

#श्रमिक_आणि_वैदिक_संस्कृती.

आदिम काळापासून पाहता भारत हा एक कृषिप्रधान देश आहे या देशात अधिक काळापासून शेतीवर चालणारी व्यवसाय व शेतीवर काम करणारी मजूर कामगार यांची सत्ता होती कालांतराने शेती व्यवसाय हा मागे पडला गेला .श्रमिक नडला आर्थिक दुर्बल झाला.

 या शेतीप्रधान  देशांमध्ये  नंतरच्या काळात श्रमिक आणि वैदिक अशा दोन संस्कृती निर्माण झाल्या. शेतामध्ये काम करणारे मजूर आणि भूमिहीन  शेतमजूर, शेतकरी हे अतीव श्रम , श्रमिक म्हणून हा श्रमिक देश चालवतात देशातील करोडो लोकांना खाद्य पुरवतात मग महत्त्वाचे की नाही ? हो हे महत्त्वाचे नंतरच्या काळामध्ये वैदिक संस्कृतीचा उगम झाला आणि वैदिक संस्कृतीने या श्रमिक वर्गावर वर्चस्व लादून त्यांना गुलाम करून त्यांची सत्ता काबीज करून व त्यांना देशोधडीला  लावत वैदिक संस्कृती मोठ्या प्रमाणावर भारतात विकसित झाली .
मग ही विकसित झालेली संस्कृती गरीब , पीडित आणि अशिक्षित मजूर शेतकरी शेतीत काम करणारे लोक होती त्यांच्या गळ्यात घातली .

आता प्रश्न असा उठतो  की दैनिक लोक हे शेती करत नव्हते त्यांच्याकडे शेती होती पण शेतीवर राब  राबणारा वर्ग हा मजूर होता त्याला आपण श्रमिक म्हणून त्या शेतीवर कामाला लावले.हा सर्व वर्ग कालांतराने हळूहळू अर्थहीन झाला . हा वर्ग पूर्णतः खचला.

" महात्मा फुले यांनी सांगितले आहे की एवढा अनर्थ ' एका अविद्याने केला आणि अर्थाविन शुद्ध खतले."
याचे मूळ कारण हे ' अविज्जा होय.

शेतीचे कुळ कायदे निघाले शेतीपासून वेगवेगळे  आणि शेती वाटण्यात आली . या कायद्यानुसार ही शेती व कोणाला वाटण्यात आली ही शेती ज्यांच्या नावे होती त्यांच्या घरातील कुत्रा ,गाढव,मांजर  किंवा इतर नातेवाईक यांच्या नावे करण्यात आली आणि ती शेती त्यांच्याकडे वडिलोपार्जित कायम राहील.

पण तसे पाहता श्रमिक  संस्कृतीने या वैदीक संस्कृतीला मोठ्या प्रमाणात शह देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू श्रमिक मागे पडले आणि वैदिक पुढे आले .

आता हे पूर्वश्रमीचे श्रमिक काय करतात ? श्रमिक हे रोज रोजंदारीवर काम करतात शेतीवर काम करतात कारखान्यात काम करतात आणि जिथे मिळेल तिथे काम करतात . यातून मिळालेली पुंजी हे धार्मिक विधी आणि देव देवळात खर्च करतात.

वैदिक लोक काय करतात वैदिक लोक देवळात किंवा इतरत्र पूजा पाठात मिळालेला पैसा हे शेअर मार्केटमध्ये लावतात त्यांना या श्रमिकांचे काही देणे घेणे नसते आणि अशा पद्धतीने देशात आज खूप मोठ्या प्रमावर श्रमिक लुटला जात आहे.

आज त्यांचे  उदनिर्वाहाचे साधन बंद केले गेले आहे.त्यामुळे श्रमिक खचला गेला आता वैदिक संस्कृतीत काय होते वैदिक लोक मंदिर आणि इतर पूजा पाठाच्या ठिकाणी आपले ठाण मांडून बसलेले त्यामुळे त्यांचे कडे श्रमिक वर्गाचा पैका चालून येतो आहे.
 
वैदिक हे  लोक श्रमिक लोकांच्या पैशावर किंवा श्रमिकांच्या बळावर आपले संपूर्ण कार्यक्रम अवैध पणे चालू आहे.  देव आणि देवापासून भीती या वर्गात निर्माण केली ,आज तागायत श्रमिक वर्ग या वैदिक वर्गाचा बळी पडलेला दिसतो आहे.

श्रमिक काय करतात?
श्रमिक आपला शेतीचा किंवा मजुरीचा व्यवसाय करतात आणि याच व्यवसायावर यांचे घर कुटुंब चालते पण हा वर्ग आपले पैसे कमवत असताना वैदिक लोकांच्या बळी पडून देवदिकांच्या किंवा इतर तत्सम देवाने भीती घातलेल्या अंधश्रद्धेला बळी पडतो. आज आपण बघतो आहे की बरीच बहुसंख्य बहुजन किंवा देशातील इतर समाजातील  बहुसख्ये लोक या वैदिक संस्कृतीला बळी पडलेले आहेत.

 वैदिक लोक काय करतात?
वैदिक लोकांना शिक्षणाची गरज नाही बाप दादा किंवा आजोबा पंजोबा या पिढीपासून चालत आलेला पूजा पाठाचा विधीचा प्रोग्राम यांच्याकडे चालून येतो आणि पुढे हे लोक देव किंवा देवळात किंवा इतर धार्मिक विधी मध्ये अग्रेसर असतात आणि बहुजन वर्गातील सर्व या लोकांत विविध पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाचे भय भीती किंवा इतर कारणे दाखवत या लोकांना बळी करतात.

तसे पाहता या देशांमध्ये किमान ८० टक्के लोक   शेतमजूर,मजूर  भूमिहीन शेत मजूर किंवा इतर तत्सम काम करणारे देखील त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक साधने किंवा आर्थिक सुबत्ता असलेली पाहाव्यास मिळत नाही.

 वैदिक लोक हे एकदम उजव्या प्रमाणात हात पाय न मिळवता पैसा कमवतात. कमी असून किंवा त्यांचे टक्केवारी एकदमच कमी असताना ही हे लोक एकंदरीत ९० टक्के लोकांवर राज्य करत आहेत याचे उदाहरण म्हणजे आज आपल्या देशात सुरू असलेले राजकारण या राजकारणात अडकलेली जनता.

जनता कशी आहे बघा ?
 ही जनता मेलेली आहे मेलेली म्हणजे जसा मेलेला माणूस आवाज करत नाही हालचाल करत नाही तसेच हे लोक वैदिक लोकांच्या बळी पडलेले असून ते कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचार किंवा अंधश्रद्धा या गोष्टीवर आवाज उठवत नाहीत मग हे लोक मेलेले आहेत की नाही ? तर उत्तर असेल ,हो .

हे लोक मेलेले आहेत अशा लोकांपासून आपण काय अपेक्षा घ्यायची म्हणून श्रमिक लोकांनी जास्तीत जास्त या वैदिक लोकांचे डावपेच ओळखत वागण्याचा प्रयत्न करणे हीच आज काळाची गरज आहे.

प्रा बा र शिंदे,नेरूळ - ७०६.

Friday, August 19, 2022

डॉ नरेंद्र दाभोळकर

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर एक झंझावात !
.... मिनांडर*

संपूर्ण देशात या महाराष्ट्राला सत्यशोधकी चळवळीची एक मोठी परंपरा आहे . खऱ्या अर्थाने ही परंपरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली .  सत्यशोधकी समाजाची स्थापना  करून महात्मा फुले यांनी या महाराष्ट्राला एक अशी परंपरा दिली त्यातून अनेक सत्यशोधकी तयार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे  बुलंद उदाहरण होय .  या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक सत्यशोधक म्हणून जन्माला आले आणि ती परंपरा आजही कायम आहे.
त्या सत्यशोधकी चळवळीचे एक मोठं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील ते कणखर सत्यशोधकी होती अनेक ठिकाणी भाषणे द्यायचे. एक मजेदार हिस्सा एका गावात घडला तो असा,  एका गावामध्ये त्यांचे भाषण झालं त्यांच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या देवळातले  चांदीचे डोळे चोरीला गेले त्यांच्या असे लक्षात आलं नानांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून कोणीतरी ते डोळी चोरली असल्याची लोकांना खात्री होती मात्र ते देवस्थान अतिशय प्रखर आणि जागृत होते त्यामुळे देवाची डोळे  चोरलेला माणूस कोण ? याची एकत्र चर्चा झाली.  आता त्या तिकडून त्या ‘ची ची’ चर्चा सुरू झाली .आणि डोळे परत येतील  असा लोकांचा विश्वास होता एक महिना गेला दीड महिना गेला दोन महिने गेले पण डोळे काही परत आले नाहीत.  तीन -चार महिन्यांनी पुन्हा एकदा नाना पाटील यांचे भाषण गावात झालं त्याच देवळात उभे राहिले आणि म्हणाले, हा देव जागृत आहे, असं तुम्ही म्हणता त्याचे डोळे चार महिन्यापूर्वी चोरीला गेले.खरं तर ते चोरीला गेले नाहीत मीच काढून नेले होते असं म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातून डोळे काढून दाखवले ते पुढे म्हणाले जर तुमच्या देवाने माझे काही केलं नाही तर तो जागृत कसा काय असेल ? हे महाराष्ट्रामध्ये -६० -७०  वर्षांपूर्वीचे ‘कृतीशील विचार’ होते . पण शोधकथा आणि कृतिशीलता यांची आजची स्थिती काय आहे ?
तेच आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अनिस च्या मध्येमातून कृतीशील स्वरूपात कार्ये करीत होते .  सध्या चालू असलेली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे हे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य जागतिक दर्जाचे कार्य असून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या कृतीला अर्पण केलेला आहे.  बाबासाहेबांना हवे असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली व्यवस्था त्यांनी या ‘अंधश्रद्धा निर्मूलनातून’ जगापुढे मांडली आहे ‘सत्ते ते सत्य, ‘असते ते असत्य’.  ‘काळा तो काळा गोरा तो गोरा’  ही खरी कृतीशील विचारसारणी  मांडण्याचे  धाडस केले आणि शिक्षित असो किंवा अशिक्षित असो यांच्यावर कसा घाला घातला हे जगाला माहीतच आहे.  आज त्यांचा शहीद दिन  असून आपण त्यांना आठवण करत आहोत . डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे दृष्टी होते त्यांचा खून करण्यात आला हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मारेकरी  कोण?  आत्तापर्यंत ते अजून तरी अधांतरी आहे त्याचा छडा लागला पाहिजे असं मलाही वाटलं तुम्हालाही वाटतं असेल ? आणि जगाला वाटते ,पण तसा अजून सरकार कडून प्रयत्न होत नाही हे सत्य आहे. हेच सत्य आपण जगापुढे मांडलं पाहिजे सत्याची कास धरली पाहिजे सत्याच्या मार्गावर असले पाहिजे असं डॉक्टर नरेंद्र नेहमी सांगत आणि हेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना खरी अर्पण पत्रिका होय . 
आज आठवतं २० ऑगस्ट हे मारेकरी यांनी मारल्याचा दिवस ९ वर्षपूर्ती होत आहे . डॉक्टर नरेंद्र हे कसे होते ,एखादा डॉक्टर एका पेशंटची नाडी बघून त्याला बरं करतो पण नरेंद्र दाभोळकर हे हजार लोकांच्या नाड्या ओळखत आणि त्या लोकांच्या मानसिकतेप्रमाणे त्यांना ते तश्या प्रकारचे  ज्ञान देत किंवा उपदेश देत असे.  डॉक्टर नरेंद्र यांना एकदा असा प्रसंगाला सामोरे जावे लागले की ,तेव्हा त्यांची  मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची भेट झाली.  ते तेव्हा ते मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांना त्यांनी असा एक प्रश्न केला की आपण राज्यकर्ते आहात आपण लोकांची सेवा करता आपण लोकात मिसळतात तेव्हा त्यांना बोलण्याचा योग आला ते म्हणाले , ‘म्हणाले ते सगळं ठीक आहे हो कायदा वगैरे करायला पाहिजे ते आम्हाला कळते .  पण लोक बाबा यांच्याकडे लक्षवेधी लोक  जातात आम्ही शेवटी राजकारणी आहोत ज्यांच्याकडे लोक जातात त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का ?  त्यांना वाटलं त्यांनी मला निवृत्तर करण्याचा प्रश्न  विचारला आहे मी म्हणालो हो माझ्याकडे याचे उत्तर आहे.  त्यांना जरा आश्चर्य वाटले विलासराव थोडे दचकले ते म्हणाले काय उत्तर आहे तुमच्याकडे ? मी म्हणालो याचे उत्तर म्हणजे या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे कसं आहे हे तुम्हाला समजावून सांगणं तर त्यांना काही कळलं नाही ते म्हणाले आमच्याकडे काय उत्तर आहे ?  आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय मी म्हणालो, साहेब तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाहीत तुम्ही राज्यकर्ते आहात तुमच्याकडे आज घडीला २०००० माध्यमिक शाळा आहेत. ८० हजार प्राथमिक शाळा आहेत २,२०० कॉलेजेस आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या सहा लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी दहा लाख आहे कॉलेजमध्ये दहा लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ एक लाख प्राध्यापक आहेत या सगळ्यांच्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणात  तसंच भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे दिलेला आहे त्यातले तुम्ही काहीच करीत नाहीत म्हणून आम्हाला करावा लागतो.  असे डॉक्टर नरेंद्र यांनी माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांना ठणकावून  सांगितलं होतं.  असे हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर.
त्यांची मातंग समाज यावर ही खूप आस्था होती .  एकदा असं झालं प्रसंग असा होता की एका मांगवड्यात गेले होते ,मांगवाड्यामध्ये त्याचा कार्यक्रम चालू असताना ते म्हणाले मातंग समाजाकडे सेंदर्यााच्या यात्रेमध्ये तुम्ही गळ का टोचून घेता ? गळ  टोचून घेणे हे अनेक अंगाने अंधश्रद्धा आहे कदाचित यातून एड्स होऊ शकतो किंवा कुठलाही रोग होऊ शकतो असे ते म्हणले . तेंव्हा समोरून कोणीतरी  ‘तुम्हाला फक्त आम्हीच  उरलोय का शहाण करायला ? असा बालिश सवाल केला होता .  
त्या समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन होणार कसं आता मला सांगा हे समाजातील लोक कार्यकर्ते प्राध्यापक, डॉक्टर चुलकीचे संदेश सांगतात.  आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील आहोत आता हे डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत असलेल्या लोकांना अभिप्रेत आहे ? का कारण नाही कारण बाबासाहेबांनी कधी देवळात जाणे किंवा अशा अंधश्रद्धा बळकटीकरण होईल अशा प्रकारे कुठेच कार्य केलेले  दिसत नाही.यापुढे जाऊन  तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी घ्या, अण्णाभाऊ साठे यांनी एकंदरीत ८०  महामनवला  आपल्या लेखणीची  अर्पण पत्रिका वाहिली .८०  महात्म्यांचे त्यांनी आपल्या पुस्तकातून महात्मे गौरविले आहे.  पण त्यांनीही  कुठेही देवधर्म किंवा कुठेही एखाद्या धार्मिक विषयावर लिहिलेले दिसत नाही कारण अण्णाभाऊ साठेचे विचार आणि डॉक्टर नरेंद्र ,डॉक्टर  बाबासाहेबांचे विचार हे वेगळे न्हवते . 
याचीच परंपरा पुढे चालवत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या कार्याची परंपरा पुढे चालवली होती म्हणून ते लोकांना आवडत नव्हते.  लोकांना नको होते.  म्हणून त्यांचा खून करण्यात आला त्यांना दिवसाढवळ्या मारल्या गेले. आज मी  त्यांना त्यांच्या विचारला अर्पण पत्रिका सादर करत आहोत. 

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा २० अगस्त २०१३ रोजी पुण्यामध्ये मॉर्निंग वापरताना काही धर्मांध शक्तीकडून निर्गुण खून करण्यात आला या घटनेला आज नऊ वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर कुलबर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारांचेही खून केले गेले .
या चारही खूनामागे एकच संघटना आहे असे तपासा अंती पुढे येत आहे.

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे असे पर्वा बेलापूर येथे झालेल्या सभेत त्यांच्या मुलीने सांगितले. याचाही कुणाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना खटकत आहे.

 याप्रसंगी खालील मागण्याचा ते पाठपुरावा  करत आहोत . डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या गुन्हा मागच्या मुख्य सूत्रधारचा शोध घ्यावा या खूना मागच्या धर्मांध संघटनेवर कठोर शिक्षा व्हाव्यात

हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी #अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर करायचे म्हणून त्यांचा खून प्रतिगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यक्रमातून करण्यात आला हे आता स्पष्ट झाले आहे परंतु-  "माणूस मारला तरी विचार संपत नाही" हे सत्य डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण जोमाने सुरू ठेवत सिद्ध केले आहे.

आजच्या दिनी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी  आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपणाला विनंती करतो की आपणही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कार्यात सतत सामील व्हावे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पुढे नेणे हेच शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीला खरे खरे अभिवादन ठरेल.

प्रा बी आर शिंदे ,नेरूळ ७०६

(डॉ. बाबासाहेब आंबेकर विचार -प्रचार,प्रसारक,पाली भाषा आणि साहित्य लेखक,समता सैनिक दल आजीव सदस्य,अनिस सक्रिय सदस्य , कर्णबधीरांचे बाल शिक्षण आणि संशोधक).

Friday, July 22, 2022

जिंदगी के साथ भी! जिंदगी के बाद भी!!

#जिंदगी_के_साथ_भी 
#जिंदगी_के_बाद_भी 

एक काळ होता लोकांना सरकारी नोकरी असणे म्हणजे दिव्य होते.काळ बदलत गेला हळू हळू लोकांना सरकारी , निमसरकारी,खाजगी नोकऱ्या मिळू लागल्या.

मग लोकांनी एकच नाही तर जोडधंदा म्हणून दोन नोकरी करणे,अर्धवेळ काम करणे आणि मुला बाळांसाठी ,त्यांच्या शिक्षणासाठी नोकऱ्या करू लागले .हळू हळू स्त्रिया शिक्षित झाल्या आणि त्याही चुली ओलांडून शाळा ,कंपनी, कार्यालय ,दवाखाने जिथे मिळेल तिथे नोकरी आणि नोकरी.मग कुठं काम तर कोठ  नाही.कुठं एक पगार तर कुठे दोन ते तीन पगारदार झाले,मिळकती वाढत गेल्या.

वर्गवारी चा विचार करता मध्यमवर्ग LIC या एकाच ठिकाणी महिना काठी जुजबी पैसे गुंतवू लागला.या पॉलिसी यवढ्या जोमात आल्या की एखादे छोटेखानी कर्ज हवे तर तुमची LIC पॉलिसी काढली आहे का ? हा हमखास  सवाल.मग ही पॉलिसी असेल तर नक्की १६ते १८ टक्के दराने तुमच्या पदरात कर्ज.

हळू हळू यवढ्या बाजारात विमा कंपन्यांचा  सुळसुळाट झाला की ,गल्ली बोळात शाखा आल्या,मास्तर, नोकरदार आणि तत्सम कामगार हे या विमा कंपनीचे बकरे झाले.यांनी सुरुवातीला आपल्याच घरात,मित्राला ,आणि जवळीक ठेवत असलेल्या व्यक्तींना असे गंडवले की आकडा सांगता येणार नाही यवढ्या ,ग्रामीण,शहरी आणि निमशहरी भागात अगणित  विमा उतरवल्या गेल्या...

यात मग पॉलिसी ही कांहीं दोन तीन वर्षात नाही मिळत ? तब्बल २०वर्ष म्हणजे २तप.आता या दोन तपात काय सावळा गोंधळ झाला असेल? ते पहा . 

ती आकडेवारी वेगळी?.१० टक्के बंद पडल्या १०टक्के हरवल्या,१०टक्के गहाळ झाल्या.१०टक्के लोकं मेली.१०टक्के क्लेम करू शकले नाहीत.१०टक्के २००५ च्या अतिवृष्टीमुळे  वाहून गेल्या.१० टक्के चुकीच्या पत्त्यामुळे ,घर बदली मुळे,शहर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित  झाल्याने हातच्या निघून गेल्या. या एकूण ७०टक्के गुराळा प्रमाणे नांद भरून वाहून गेल्या.

आता उरल्या त्या २०वर्ष काळासाठी वेशीवर टांगलेल्या.किंवा आपण त्यांना घोंगड्यागत भिजत पडल्या असे म्हणू या. परिपक्व झाल्यावर किती मिळणार तर २ जेमतेम दोन लाख (ते विम्यावर निर्भर करते आहे). हातात मिळतात.तेंव्हा एक तर तुम्ही सेवा निवृत्त झाले असणार .मग हे वीस वर्ष जमा केलेलं  धन काय कामाचे? कुणासाठी?

तात्पर्य ही रक्कम कुठे इतरत्र गुंतवली असती तर नक्कीच २० लाख मिळाले असते.जसे शेअर मार्केट,मुचूवल  फंड,स्टोक्स,असे आणि अनेक प्लॅटफॉर्म आहेत ते सामान्य लोकांना माहिती नाहीत.याच गोस्टिचा  फायदा घेत २०वर्ष गळफास लावून LIC ने पैसा उकळायला सुरुवात  केली आणि अजून हे सत्र  चालूच  आहे.

आज मितीला LIC कडे जो फंड क्लेम केला नाही तो २१,३३६ करोड आहे.हा कोणाचा पैसा आहे? सरकार चा की रिजर्व  बँकेचा? अहो तुमच्या  आमच्या घामाचा पैसा तो . 

आज सर्व सामान्ये गरीब ,भूमिहीन शेतमाजुर  वर्गाच्या गळ्यात डिजिटलच्या फांदात  ज्यांना खायला पैका नाही त्यांची बँक खाती काढून पैसा मग ते शून्य खाती असो की न्यूनेतम  ठेवी असो .पण पैसा एकंदरीत बँकेत तर जातो आहे.माणूस एकंदरीत खंगाळून रीता होत चालला आहे,हे सत्ये नाकारता येणार नाही . 

मी लिहलेला हा  लेख  कांहीं संशोधन अहवाल नाही फक्त मी एक सामान्य विमाधारक म्हणून जिवाच्या आकांताने लिहले  आहे." जागो ग्राहक जागो " या युक्ति प्रमाणे . 

समजा एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सेवेत विमा कंपनी कडे पैसा भरला आणि आता तो विश्रांति इछितो  ,त्याला सेवानिवृत्ती नंतर तरी, सुखाने त्याचे  जीवन जगू द्या.
त्याला आर्थिक विश्रांति हवी आहे ,आर्थिक सुब्बता नको. 

आज शरमेची बाब अशी आहे की ,तुम्ही निवृती नावाचा प्लॅन घेऊन आला आहे.म्हणजे त्याने मसणात  जाई पर्यंत विम्याचे पैसे भरायचे? का  आणि कोणासाठी ? हे थोतांड बंद झाले पाहिजे असे तुमला का वाटत नाही ?.

आज मितिला असलेला तुमचा Unclaimed Mony ' मार्गी लावा. भूकबळी,विधवा,अशिक्षित मुले, शाळाबाह्य लेकरे,पडीक शाळा इथे कामी येऊ द्या.

विमा मग कोणताही असो !दूर राहा.त्यात कोणाचे कल्याण आहे,जसा पाण्यात कासव ठेवला की घरात पैसा राहतो.पण तो पैसा काचेचा कासव विकणाऱ्या मालकाच्या घरात जातो आहे,तुम्ही आज मितिला  रीते आहेत.देशात अगणित विमा कंपन्या अब्जावधी मालमत्ता कमाई करून बसल्या आहेत.तेंव्हा दूर राहा ,आणि मानसिक तणावातून सुटा.

प्रा.बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई ७०६

Tuesday, July 12, 2022

कॉ. अण्णा भाऊ साठे

*संपूर्ण जीवन संघर्ष जगलेला माणूस – कॉ. अण्णा भाऊ साठे.*
“अखेर ज्ञानेशाची ,तुकयाची ,तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा ,तीचं भंडार लुटून ‘फकिरा ’वर उधळून त्या दोन ओंजळीची फेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे . (कैफियत ‘फकिरा ’)”
..................कॉ. अण्णा भाऊ साठे 
माणसाला जीवन जगण्याचे कळलं की तो संघर्ष करीत असतो. मानवाचे संपूर्ण जीवन समजून घेतल्या नंतर , आयुष्याची उपेखा (उपेक्षा ) कधी संपलेली दिसत नाही . जीवनाची फरफट कधी थांबलीच नाही . या सगळ्या गोष्टीला फाटा देत जीवन पटलावरून आपल्या आयुष्याच्या पथावरुन कॉ. अण्णा भाऊ साठे कायम चालत राहिले . 
उपास पोटी जीवन जगत असताना कधी पोटाला भाकरी मिळाली तर कधी अर्धपोटी पाणी पिऊन जीवन काढले . असे जिणे जगत असताना ते कधीच अशा जीवनाला बळी पडले नाहीत . उमेदीच्या काळात चिराग नगर मुंबई येथे वास्तव्यात असताना तेथील घाणीत आपली लेखनी तेवत ठेवली . अशा जीवन फुलवणार्याध लेखकाचा १ ऑगस्ट दर वर्षी प्रमाणे येणारा जन्मदिन . 
गेली कैक वर्ष आपण मोठ्या थाटामाटात  कॉ. अण्णा भाऊंची जयंती साजरी करत आलो  आहोत आणि पुढे ही करणार आहोत . सुरूवातीचे दिवस त्यांचे खूप हलाखिचे होते . कोळश्याच्या खाणीत काम करत आपले दु:ख गाठी बांधून ढस्सा ss ढस्सा ss रडले . असे असतांनाही आपल्या दु:खचा कुठे उल्लेख न करता त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनाला सुरुवात केली . 
जीवनात कितीही संकटे आली तरी जीवनापासून कधीही दूर पळायचे नाही उलट दु:खाचा स्वीकार करून जीवन कसे आनंदाने जगायचे हे सूत्र घेऊन ते जगत राहिले . संपूर्ण कृष्णकाठ पालथा घालून तिच्या कडे कपार्याातून फिरत राहिले .यातून त्यांच्या पोटाला अन्न मिळेनासे झाले म्हणून त्यांनी जीवाचे रान करून जिवाची मुंबापुरी गाठली . 
नशीब आजमावण्यासाठी खर्याप अर्थाने मुंबापुरी गाठली तरी तिथे ही त्यांची तीच गत झाली . अशात ते इथे एकटे पडले ,तेंव्हा तर आभाळच कोसळलं तेंव्हा अण्णा भाऊंच्या जीवनाला कुठेच आधार मिळेना . या महान साहित्यिक  माणसाने आपल्या जीवनाला वळण देण्यासाठी शाहीरीचा साज चढवला . स्वत:चं दु:ख विसरून समाजाचे मनोरंजन आणि विचारांचे परिवर्तन करीत ते आपले जीवन जगले . 
आपल्या वाट्याला आलेले दु:ख धारदार लेखणीच्या माध्यमातून जगापुढे मांडले . आख्या मानव जगताला लाजवेल अशी साहित्य  निर्मिती केली . ‘ना पोटाची खात्री ना जिवाची’ तरीही ते निरंतर साहित्य लिहीतच राहिले . 
कष्टकर्याज उपेक्षित दिंनदुबळ्या लोकांचे दु:ख साहीत्यातून ते मांडत राहिले. एवढे असून ही त्यांनी आपले उत्तम प्रकारे मानवी मनाला हुल देणारे ‘जग लौकिक साहित्य’ निर्मिती केली .
प्रतिभेला रंग ,रूप ,वर्ण ,वंश जातपात यांची कुंपणे नसतात . कॉ.शाहीर अण्णा भाऊ साठे हे त्यातील एक उदाहरण होय . ते जसे ‘जगले त्याला जागले’ तेच त्यांनी लिहलं . म्हणूनच साहित्यात त्यांचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अण्णांच्या  लिखाणाचे मूल्यमापन  करणारे लिखाण 
वर उल्लेख केल्या प्रमाणे वाटेगावाहून मुंबईत आल्यावर ते कसे जगले हे सर्वश्रुत आहे. तरी पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमर शेख ,गव्हाणकर यांनी जे वादळ उठवले ते वंदनीय आहे . इथे कादंबरीकार म्हणून आपले स्थान निर्माण केले .त्यांच्या कादंबरीलेखनाला  सन १९४८ सुमारास खरा प्रारंभ झाला . 
वाटेगाव परिसरातील निसर्गाची रौद्रगंभीरता ,त्या पहाडी जीवनातल्या बेगुमान अशा बलदंड पुरुषाचे व कमनीय बांध्याच्या रूपयौवन तरुणीचे जीवन संघर्ष हे त्याच्या कादंबर्याबत उतरत गेले . जसे-जसे ते लिहीत गेले तसे - तसे ते साहित्य निर्णायक झाले . त्यांच्या मृत्यू (१९६९) नंतर ते मराठी साहित्यातील दुर्दम्य वादळ ठरले . एकंदरीत ३२ उपलब्ध कादंबर्याा पैकी जनसंस्कृतीला देऊ केलेला वसा महान आहे . वारणेच्या खोर्याात ,वारणेचा वाघ ,आग्निदिव्ये,आघात ,आवडी ,रत्ना, चंदा ,राणगंगा ,फुलपाखरू , ,वैजयंता या आहेत . 
परंतु अण्णा भाऊंनी ज्या सातत्याने  आणि निकराने व निर्णायक रीतीने उपेक्षितांचे जीवनसत्य रंगविले त्याला जगात तोड नाही . 
चित्रा ,माकडीचा माळ ,संघर्ष ,फकिरा ,वैजयंता या त्यांच्या पाच कादंबर्यान आहेत . या कादंबर्या. मधून याची निश्चित साक्ष मिळते . 
माटुंगा लेबर कॅम्प च्या नाक्यावर इराण्याचे ‘लेबर रेस्टोरंट’ नावाचे हॉटेल होते. हा त्या परिसरतील सगळ्या राजकीय पक्षाचा अड्डा होता . या हॉटेल च्या बाजूला ‘एक्सत्रेला बॅटरी’ नावाची कंपनी होती . तिच्या बाजूला एक झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीत अण्णा भाऊ राहत होते . अण्णा भाऊना इथून दलित चळवळीत आणण्याचे काम कॉ.डॉक्टर नारायण पगारे यांना जाते . कारण पगारे यांचे समोर आंबेडकरी चळवळ होती . हीच जागा होती जिथून अण्णा भाऊ साठे आंबेडकरी चळवळीचा एक हिस्सा होऊन गेले होते .  
आंबेडकरी जलशाचे मातृस्थान हे सत्यशोधकी होते .लोकांपर्यंत हे कार्ये पोहचवण्याचे काम याच जलशातून झाले होते . या काळात दलित चळवळ उभी करण्यासाठी अनेक जलसे उदयास आली . जगताप भालेराव ‘जलसे’ यात प्रमुख होते . या जलशातून दलित चळवळ उभी केली गेली लोकात जागृती निर्माण करण्यात आली .कारण त्या काळात तशी दलितांची वृतपत्रे नव्हती . या उलट असे होते की प्रस्थापित वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेबांना ,त्यांच्या चळवळीना प्रसिद्धी देत नव्हते किंवा विकृत स्वरुपात देत होते .हे जिकिरीचे कार्य अण्णा भाऊंनी त्या काळी जलशातून मोठ्या उमेदीने पार पाडले .  
अण्णा भाऊंनी पोवडे ,लावणी ,गीते ,कथा ,कादंबरी ,प्रवासवर्णने, नाटक ,लोकनाट्य असे विविध प्रकार हाताळले आहेत . वैचारिक बांधिलकी हे अण्णा भाऊंच्या लिखाणाचे मूख्य सूत्र होते . 
एकूण १५ पोवाडा व लावणी ,१० लोकनाट्य ,८ प्रवासवर्णन ,२३ कथा ,३२ कादंबर्याो अशी अमाप साहित्यसंपदा लिहणार्याव कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा ,मराठी साहित्याचा इतिहास पाहील्यास अण्णा भाऊंना योग्य तो न्याय दिला गेला नाही याची उरी खंत आहे . 
----बी.आर. शिंदे ,नेरूळ ७०६

Saturday, June 25, 2022

दलित पँथर चे ५०वर्ष पूर्ण

*पॅन्थर सारखा नवा झंझावात परत आला पाहिजे.* 

.....तो सर्वकष क्रांतीची हाक देवून समग्र परिवर्तनवाद्यांना सोबत घेवून ती  लढाई लढला होता.
म्हणून आज सगळे आप आपल्या चुली मांडून बोके, वाघ बनू पाहत आहेत .
तो संघर्ष ,तो वनवा पुन्हा  पेटला पाहिजे .मरगळलेला  काळा कुट्ट लाल लाल डोळ्यातून आग ओकणारा पँथर.

संघर्ष कोणामुळे झाला ? संघर्ष कोणी केला आणि आज त्याची फळे कोण खात आहेत? याची विचारणा कोणी  आज पँथर या पथावर दिसत नाही?
गोस्ट पँथर ची आहे ..

"ब्लॅक  पँथर ' चळवळीबद्दल  हे अमेरिकेतून आलेल एक  वादळ . ती तरुण बंडखोर विचारवंतांची चळवळ होती. हाच धागा पुढे घेत  दलित पँथरची सुरुवात इथ झाली," 

दलित पँथर या भारतातील पहिल्या आक्रमक दलित युवा संघटनेच्या तीन संस्थापकांपैकी एक.

नुकतेच  २०२२ हे वर्ष त्याच्या स्थापनेपासून ५० वे वर्ष पूर्ण होत आहे . म्हणून कैक दिवसाने मला ही लिहण्याचा मोह टाळता आला नाही आणि मी ते पूर्ण केल . 

हे सर्व सुरू झाले ते वर्ष १९७२. सर्वच वर्षे हजारो लोकांच्या स्मरणात राहण्याचे भाग्य नाही. पण १९७२  वेगळे अंगाने स्मरणात राहणारे  होते. कारण भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाली होती आणि तरुण आणि विद्यार्थ्यांच्या चळवळी जगभर रस्त्यावर उतरल्या होत्या. मुंबईतील तरुणांनीही, विशेषत: दलित चळवळी (फक्त बौद्ध ) विषयी  जगभरातील संघर्ष आणि निषेधांबद्दल जग जागृत झाले  होते.

भारतात होत असलेले संघर्ष हे जगभरातील संघर्षापेक्षा  फारसे वेगळे नव्हते. भारत इंग्रजांपासून मुक्त झाला खरा , परंतु अत्याचारांपासून, लोकसंख्येच्या मोठ्या भागावर झालेल्या वाईट वागणुकीपासून नव्हे. दलित ,मागास आणि आदिवासींना उच्चवर्णीयांकडून सर्वात वाईट प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत होते. हाच धागा पुढे सारत दलित जागा झाला होता . 

अकोल्यातील ढाकळी येथे दोन दलित बांधवांचे डोळे गावातील उच्चवर्णीय लोकांनी फाडून टाकले होते. याच सुमारास परभणीच्या ब्राम्हणगाव गावात एका दलित महिलेची विवस्त्र परेड करण्यात आली. पुण्यातील बावडा गावाने दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकला होता. ही सर्व प्रकरणे मुंबई आणि पुण्यातील तरुण, नवसाक्षर दलित तरुणांना चिथावणी देणारी ठरली आणि चळवळ आणि बळकट झाली . 

 मग हे तरुण कोण होते? त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि प्रसिद्ध नेते  #नामदेव_ढसाळ.  या बंडखोर  कवी मनाच्या चित्याने आपली डरकाळी फोडली  आणि दलित बांधवाच्या प्रश्नाला वाचा पडली  होती . 

गोलपिठासारख्या त्यांच्या कवितांनी भारतभर लक्ष वेधून घेतले होते. त्याची शैली चुंबकीय आणि प्रक्षोभक होती. स्वतः दलित असलेल्या नामदेवने मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवली. 

#राजा_ढाले हे देखील संस्थापक त्रिकुटाचा अग्रभागी होते. ते एक तरुण लेखक, विचारवंत आणि बोलका म्हणून ओळखले जाणारे होते. साधना या मराठी साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या लेखाने राज्यातील अनेकांची सदसद्विवेकबुद्धी ढवळून काढली. 

त्यांनी विचारले की या 'स्वातंत्र्या'चा आम्हा दलितांना काय उपयोग ?  "या तिरंग्याचं काय करायचं?" स्वातंत्र्याला २५ वर्षे उलटूनही दलितांच्या जीवनात सुधारणा होत नसल्याचा प्रश्न त्यांनी आपल्या लेखात केला आहे. या लेखामुळे बराच गदारोळ झाला आणि महाराष्ट्रात पूर्णपणे नवीन वाद सुरू झाला.

या चळवळीची धार ,खरी मेख आणि वादळ , त्यांना मिळाले हत्तीबळ कुठून मिळाले असेल तर ते होते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

डॉक्टर आंबेडकरांनी १९५६ मध्ये जगातील पवित्र बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी धर्म बदलल्यानंतर, त्यांच्यानंतर आलेली पिढी ही दलितांमधील पहिली साक्षर पिढी मानली होती. जी कोणत्याही समाजात आज तागायत दिसत नाही ,( कोणत्याही समाजा माझे वैर नहीं ,की त्याना कमी लेखने नहीं ) जी फक्त बौद्ध धम्मात मला तर दिसते आहे . याच  पिढीचे प्रतिनिधित्व #नामदेव_ढसाळ , #राजा_ढाले  आणि #दया_पवार यांनी केले. 

"सरकारी नोकऱ्यांमध्ये दलित आणि आदिवासी जागांची कमतरता आणि नवीन शिकलेल्या दलित तरुणांना विविध पदांवरून नकार दिल्याने स्पष्टपणे दिसत होते. विशेषत: मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील तरुण अस्वस्थ झाले होते आणि त्यांना या भेदभावाविरुद्ध उभे राहायचे होते. दलित पँथर बलाढ्य व्यवस्थेला सामोरे जाण्याचा त्यांचा मार्ग होता," हे सर्व जे.व्ही. पवार त्यांच्या पुस्तकात आपणास वाचण्यास मिळेल. 

दलित पँथरने स्थापनेनंतर जाहीरनामा आणला. "आम्हाला ब्राम्हण भागात जागेची गरज नाही. आम्हाला संपूर्ण भारतातून सत्ता हवी आहे. आम्ही माणसांकडे फक्त व्यक्ती म्हणून पाहत नाही. आम्ही व्यवस्था बदलण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला समता हवी आहे . आम्हाला विश्वास आहे की आमच्यावर होणारे अत्याचार बदलून थांबणार नाहीत. हे त्या त्रयी चे समतोल विचार होते . 

आम्हाला अत्याचारी वर्गाच्या  विरोधात उठावे लागेल, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. यामुळे भांडवलशाही शक्तींविरुद्धही स्पष्ट भूमिका घेतली; (इथे रशियन राज्यक्रांति अभिप्रेत नाही ). भांडवलशाही शक्तींचा पराभव केल्यावरच न्याय आणि समानता येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

दलित पँथरचा राष्ट्रीय राजकीय तसेच सामाजिक परिदृश्यावर मोठा प्रभाव आहे. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम – दलित राजकारणाला उत्तर भारतात नवीन उंचीवर नेणारे – दलित पँथरपासून प्रेरित होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. 

एकदा नामदेव ढसाळांनी दैनिक सामनामधील त्यांच्या स्तंभात लिहिले होते, "काशीराम आम्हाला पुण्यात भेटायचे. त्यावेळी ते सायकलवरून यायचे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील जातीय राजकारणातील मतभेदांवर आमची प्रदीर्घ चर्चा झाली." (त्याचा 'सर्व काही समस्थी' हा स्तंभ मराठीत उपलब्ध आहे.)

१९७७ पर्यंत दलित पँथरमधील मतभेद विविध पातळ्यांवर उदयास आले आणि प्रकट झाले. त्या वर्षी, रामदास आठवले – जे आता भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत – प्राध्यापक अरुण कांबळे, एसएम प्रधान, प्रेमकुमार शेगावकर आणि इतरांनी ‘भारतीय दलित पँथर’ सुरू केले.इथेच गोची झाली आणि मूळ विचारसरणीच्या मुद्द्यावरील मतभेदांचाही संघटनेला फटका बसला. 

ढाले सर आणि त्यांच्या समर्थकांनी विश्वास ठेवला आणि नामदेव ढसाळ हे कम्युनिस्ट समर्थक असल्याचा आरोप केला. पुढे महाराष्ट्रातील दलित राजकारण अनेक पक्ष, संघटना आणि गटांमध्ये विभागले गेले. 

१९६६ नंतर काय झाले ते सर्वश्रुत आहे. परंतु या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या आणि भारतीय सामाजिक आणि राजकीय परिदृश्यात दलित पँथरचे महत्त्व आणि योगदान कमी होताना दिसून येत नाही . जसे सोन्याचे कैक तुकडे केले तरी त्याची किमत कमी होत नाही तीच आजची सध्ये परिसतिथी आहे . 

खर्‍या मनाने "पँथर हा भेदभाव, अन्याय, अत्याचार आणि फॅसिझमच्या विरोधात होता हे नाकारता येणारे नाही .  आजची परिस्थिती काही वेगळी नाही भारतभरातील विविध दलित संघटनांमध्ये पँथरचा आत्मा दिसून येतो. 


दलित पँथरने सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रात एक स्थान निर्माण केले आणि ते कोणीही नाकारू शकत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे आणि जाणकार लोकांचे मत आहे. "दलित पँथर प्रामुख्याने एक राजकीय चळवळ होती. परंतु त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सांस्कृतिक कर्तव्यांची चांगली जाणीव होती. 

कविता आणि कादंबरी आणि नंतर नाटके, पथनाट्य आणि इतर कला प्रकारांच्या माध्यमातून दलित पँथरने तत्कालीन तथाकथित मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक चळवळीला आव्हान दिले. राजकारण केले आणि निर्विवाद समांतर चळवळ या देशात उभी केली ,निर्माण केली. जे कोणत्याही सामाजिक वर्गाला इथे जमलेले नाही . 

ही चळवळ इथेच न थांबता  या चळवळीने दलित आणि कामगारांना ही मोठ्या प्रमाणात स्थान दिले. ही दलित पँथरची सर्वात उल्लेखनीय कामगिरी आहे,  असे मला निक्षून वाटते 


आजच्या महाराष्ट्रीयन तरुणांसाठी, विशेषत: दलित तरुणांसाठी, पँथर ही एक प्रतिष्ठित चळवळ आहे. आणि पुढे ही असणार आहे . 

 "महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर  जर कोणी  दलित तरुनाना ऊर्जा  दिली असेल ते एकच नाव घेता येईल - 'दलित  पँथर'

आज ही माझ्या सारख्याला  हे नाव स्मरण झाले की मी  तरुणांना पुन्हा ऊर्जा देण्याचे कार्ये करीत असतो तो इतिहास सांगत असतो . 

आज जेव्हा फॅसिझम वाढत आहे, तेव्हा भारतभरातील तरुण दलित पँथरच्या इतिहासाची उजळणी करून संघटन कसे बनवायचे, स्वतःच्या हक्कांसाठी कसे लढायचे, हे जर कुठून शिकायचे असेल तर एकच नाव घ्यावे लागेल ते म्हणजे - #दलित_पँथर

हेच  तरुणांना एकत्र आणण्याची आणि त्यांना फॅसिझमच्या विरोधात लढण्यासाठी तयार करण्याची संधी फ्लॅट फॉर्म किंवा फोरम म्हणता येईल . 


नोट - या लेखातील माझे स्वतंत्र विचार आहेत . मी एकदाच जे व्ही पवार सर यांना भेटलो आहे . तिथून प्रेरित होऊन कांही पुस्तकं वाचून हा माझा लेख मी प्रसार माध्यमांवर लिहाला आहे . जर कोणी शेअर करीत असेल तर माझे नाव वगळू नये ही आग्रहाची विनंती .

आज ही चळवळ जरी विखुरली असली तरी मानवी मनाला कलाटणी देणारी चळवळ महणून बघतो आहे . कारण आजच्या काळात याचे बहुजन वर्गात मोलाचे स्थान असायला कोणाची हरकत नसावी . कारण आजचा दिसणारा समाज याच चळवळीचे देणे आहे . 

                    -----बी.आर. शिंदे ,नेरूळ (प) नवी मुंबई -७०६ 

प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडेल - ९७०२ १५८ ५६४

शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर

*समाजक्रांतिकारक राजर्षी  शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* 

“ तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ,हयाबदल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो . माझी खात्री आहे की , डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत . इतकेच नव्हे  तर एक वेळ अशी  येईल की ,ते सर्व हिंदुस्तान चे पुढारी होतील ,असे माझी मनोदेवता मला सांगते आहे.”
--------- *राजर्षी शाहू महाराज*
आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती . मागासलेल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९२० या आपल्या वाढदिवस प्रसंगी आरक्षणाचा जाहीरनामा काढून एक अप्रतिम अशी भेट करविर संस्थानच्या प्रजेस दिली . 
कागल चे अधिपति जयसींग उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महाराज हे पुत्र . त्यांच्या आई राधाबाईसाहेब यांच्या पोटी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला . चौथ्या शिवाजीच्या निधनानंतर  त्यांच्या राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले . 
‘राजा हा खरा जनतेचा सेवक असतो; आपल्याला मिळालेले राजेपद,राजेश्वर्य हे विलासात जीवन कंठण्यासाठी नसून प्रजेच्या कल्याणासाठी आहे, याची जाणीव प्रारंभापासून महाराजांना झाली होती, असे दिसते.’
राजाचे हित त्याच्या स्वार्थसाधनात नसून ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते, हा राजनीतीचा मूलभूत पाठ त्यांचे गुरू स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर व दुसरे गुरू रघुनाथराव सबनीस यांनी विद्यार्थीदशेतील महाराजांना दिला होता. राज्यारोहणापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षण म्हणून आपल्या प्रजेच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी महाराजांनी आपल्या गुरूसमवेत प्रजाभेटीचे दौरे काढले. या दौऱ्यांत खेड्यापाड्यांतील डोंगराळ भागातील गरीब रयतेची दरिद्री अवस्था त्यांनी पाहिली. दाजीपूरपासून पन्हाळ्यापर्यंतच्या दुर्गम भागात हा राजा फिरत राहिला . 
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्य आणि मागासलेल्या लोकांचा उद्धार करणे, हेच आपले जीवित कर्तव्य आहे, असे मानणाऱ्या शाहू महाराजांना महार समाजातील एक तरूण परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन आला आहे, हे समजताच ते स्वत: शोध घेत डॉ. बाबासाहेब राहात असलेल्या परळच्या चाळीत गेले; आणि तेथे त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. एक राजा आपल्याला भेटण्यास आपल्या चाळीत येतो याचे बाबासाहेबांना मोठे आश्चर्य वाटले. महाराजांनी पुढील आयुष्यात डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला साहाय्यच केलेले दिसून येते. शतकानुशतके मूक राहिलेल्या बहिष्कृत समाजाला जागृत करण्यासाठी 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र काढण्याचे जेव्हा डॉ. बाबासाहेबांनी ठरविले, तेव्हा त्यांना पहिले साहाय्य महाराजांनी केले होते.
डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर महाराजांचा विश्वास होता. त्यांच्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा त्यांनी बाळगल्या होत्या. म्हणूनच १९२० साली माणगावच्या पहिल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या बाबासाहेबांना पाहून महाराजांनी उद्गार काढले होते, "तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते आहे. " 
महाराजांनी वर्तविलेले हे भविष्य काळाने अचूक ठरविले. महाराज पुढे म्हणाले होते, “आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे ? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो. 
अश्या थोर विचारवंताची जयंती आहे ,त्यांना नतमस्तक ! थोर कल्याणकारी लोकराजाला मानाचा मुजरा !!

*प्रा.बी. आर. शिंदे ,नेरूळ प -७०६*

Tuesday, June 14, 2022

वोल्गा से गंगा -महापंडित राहुल सांकृत्यायन

वोल्गा_से_गंगा : महापंडित राहुल सांकृत्यायन
हे हिन्दी पुस्तक वाचनात आले  ...

मी पुस्तक खरेदी करून वाचून झालं की माझे काका चालवत असलेल्या वाचनालयात जाऊन भेट देऊन येतो .मोजकी घरी ठेवली आहेत .करण ते पुनःपुन्हा वाचावे लागतात .परत खरेदी नको .त्यातील हे एक पुस्तक होय.

आपण जरी मराठी भाषिक असलो तरी मराठी त लिहलेले वाचत असताना हिंदीत लिहलेले असेल तर ते हिंदीच वाचावे .कारण खरा गुळ आणि खरा पाक कळत नाही ,तेंव्हा काकवी किंवा पाक उसाचा रस लागतो ...हे झाले गुऱ्हाळ .

एक मी पर्वा #हरमन_हेस लिखित 'सिद्धार्थ ' हे पुस्तक खरेदी केलें ,अनुवाद उल्का राऊत यांनी  मराठीत केला आहे ...किती काय काय घुसडतात आणि लिहतात याची प्रचिती येते आणि कीव वाटते .

हरमन हेस जरी साहित्यातील नोबेल पुसरस्कार प्राप्त लेखक असले तरी ,बुद्धावर लिहणे नाही जमले आणि भाषांतर तर विरळच ..असो तो आपला विषय नाही.

जगविख्यात लेखक राहुल संकृत्ययान यांचं १९४२ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक ज्याची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यात संपते .ही लेखक आणि प्रकाशक यांच्या साठी खूप आनंदाची बाब होय.

मी शक्यतो मूळ पुस्तक वाचतो .हे पुस्तक हातात घेतल्यास एक नवीन शब्द मला दिसला आणि मी ती कथा प्रथम  वाचण्याचे ठरवले ...'बन्धल मल्ल' म्हणजे बुद्ध !

शंभर वर्षा पूर्वी ची ऐतिहासिक गोस्ट आहे.तेंव्हा सामाजिक अराजकता समाजात आणि एकंदर देशात मोठ्या प्रमाणावर मजली होती. व्यापारी वर्गाच्या हातात सत्ता होती आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक ,आर्थिक पिळवणूक चालू होती ...

कथा वाचावी !

"राहुल सांकृत्यायन आपल्याला ‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात.

व्होल्गेच्या काठावर राहणाऱ्या या परिवाराचे आयुष्य अतिशय खडतर आहे. शिकारीसाठी भटकणे, नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे आणि सततचे टोळीयुद्ध यांमुळे परिवाराचे आयुष्य संघर्षमय आहे.

२० कथांमध्ये चार रिकरिंग थीमस् म्हणजेच लेईटमोटिफ ठेवले आहेत – सामंतशाही आणि राजेशाही, युद्ध, दासप्रथा आणि स्रीदास्य. व्होल्गातीरावर झालेल्या भारतीय संस्कृतीच्या उगमापासून गंगातीरी झालेला विकास आणि स्थिराव यांचा इतिहास म्हणजे दमनाचा, शोषणाचा, काही लोकांच्या सुखासाठी इतरांचे शोषण करण्याचा इतिहास आहे. 

सांकृत्यायनच्या कथांमधील पुरुहुतु, बंधुलमल्ल, नागदत्त, प्रभा, अश्वघोष, सुपर्ण यौधेय, मंगल सिंह, सफदर, सकिना, शंकर, सुमेर या पात्रांप्रमाणे चांगले लोक असतात, ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, ते बदल काही काळपर्यंत प्रभावी ठरतात पण शेवटी माणसाची भोगलोलुपता जिंकते. असे वास्तववादी चित्र सांकृत्यायनांनी रंगवले आहे. सुमेर या शेवटच्या कथेत सांकृत्यायन यांनी कम्युनिझमचा खुलेपणाने पुरस्कार केला आहे.

संपूर्ण कथासंग्रहच इतिहासाचे मार्कसिस्ट इंटरप्रिटेशन आहे असे म्हणता येईल. गांधींच्या असहकार चळवळीला, कनिष्ठ जातींना ‘हरिजन’ म्हणून ‘आहे तिथेच सडत राहा’ या वृत्तीला सुमेर नकार देतो, आंबेडकरांच्या मर्यादा सांगतो आणि कम्युनिझम हेच समतेचा युटोपीयन समाज प्रत्यक्षात आणण्याचे साधन आहे असे सांगतो. पण ‘इजम’ कोणताही असला तरी मानवी स्वभावातली सत्तेची लालसा, भोगलोलुपता, दुसऱ्याच्या जिवावर ऐश करण्याची वृत्ती मात्र तशीच असते.  पर्यायाने सांकृत्यायनन  काहीच भाष्य केलेले नाही .

लेखक :महापंडित राहुल सांकृत्यायन
पुस्तक वोल्गा से गंगा.(हिन्दी)
कीमत ::२५०/-
पुनर्मुद्रण: 2022
वितरक : किताब महल ,दिल्ली०२
प्रकाशक : किताब महल ,दिल्ली ०२
प्रा बी आर शिंदे ,विशेष कर्णबधिरांचे शिक्षण . नेरूळ -७०6

एक होता कार्व्हर -लेखिका विना गवाणकर

मी_वाचून_जाणलेला_कार्व्हर. 
                           ----- #मिनण्डर
जगात अश्या जादूगरची वानवा नाही . खरेच एक होता कार्व्हर पुस्तकाचे शीर्षक अनमोल रत्न डोक्टर कार्व्हर चे मोल सांगून जाते . 
बाल वयात बाबा गेले ,आई ला डोळ्या देखत  गुंड लोकांनी पळवून घेऊन गेले . काय झाली असेल अवस्था त्या कोवळ्या वयाची . 
आपल्या हाताच्या लांब बोटांनी जगात शेतीत कोरीव काम केले . दक्षिण अमेरिकेतील निग्रो अनाडी ,वर्ण भेदाने खाईत खुंटत असलेल्या वर्गाचे मर्म जाणून त्यांच्या उभ्या आयूषात सोने भरून काढणारा बालक ,पुढे अमेरिकेचा एक भला मोठा वैज्ञानिक झाला हे नवल वाटायला नको . 

मातीचे सोन करून विविध रंग तयार करणे हे अवघड काम या गाड्याने मोठ्या सीताफीने केले . आपण खाऊन टाकलेल्या भुईमूगच्या शेंगापासून विविध रंग तयार करून दाखवणारा जादूगर . येवढ्यावर न थांबता १३२ प्रकारात शेंगदाणा कसा खावा हे जगाला सांगून गेले . 

डुक्कर खाणारे भुईमूग आणि टोमॅटो ,रताळे अशी भीती आणि चुकीची समज असणार्‍या निग्रो शेतकर्‍यांना ते स्वतः खाऊन दाखवून हजारो प्रयोग करणारा मानव . आणीबाणीच्या काळात बालके दुधावचून मरु लागली ,तेंव्हा हा माणूस थोडाच गप्पा बसणार ? शेंगदाण्यापासून दूध तयार करून हजारो बालकाना जीवदान देणारे डॉक्टर कार्व्हर .... 

शेती वेडा . फूल वेडा . बारीक बारीक कणात आणि दगडात काय दडले आहे याचे कोडे उलगडणारा डॉक्टर . टाकाऊ पासून टिकाऊ कसे बनवता येईल याचे मोलाचे मार्गदर्शन करणारा शिक्षक . 

प्रयोग शाळेत अहोरात्र मरणारा . एकदा काय झाले तर डॉक्टर साहेबांनी एका मोठ्या व्यक्तिला हिरा मागितला . मग काय मॅजिक ,त्या व्यक्तीने कांही एक विचार न करता एक मौल्यवान हिर्‍याची अंगुठी भेट दिली . त्या व्यक्तिला वाटले की ते लगेच बोटात सरकवतील पण झाले ते इपरीत . त्यांनी ती अंगुठी सरळ  आपल्या प्रयोग शाळेत आणून ठेवली . असे का विचारता ते म्हणाले माझ्या मुलांना दाखवण्यास एकच वस्तु माझ्या कडे न्हवती ती म्हणजे हिरा .... असा हिरा माणूस ,शिक्षक मिळेल का जगात ?
जगभरातील असंखे प्रलोभने धुडकावून आपल्या मातीत आपल्या रंजल्या गांजल्या मनसात रममाण झालेया लीलया . 
आपल्या माणसात रमणारा ,उच्चप्रभू लोकात लाजणारा ,बुजणारा वैज्ञानिक डॉक्टर कार्व्हर ... 

डॉक्टर  वाशिंग्टनना दिलेल्या वाचनाला जागत हा भूमिपुत्र अखेरपर्यन्त जगाला आपल्या कर्मभूमीत ,टस्कीगीत त्यांनी अखेरचा प्राण  सोडला .
इकडे भारतात डॉक्टर  बाबसाहेबांनी आपल्या बहुजन लोकांसाठी आणि त्यांच्या उत्थंनासाठी  आपल्या प्रणाची आहुति दिली . तीच गत तिकडे दक्षिण अमेरिकेत आपल्या लोकांसाठी ,निग्रो करिता डॉक्टर कार्व्हर यांची झाली . 

अशी सोनेरी मनं घेऊन जगात जन्माला आलेली साधी  माणसे नसून ते महामानव होत . 

पुस्तक वाचावे . खूप सुंदर माहिती.  वीणा गवाणकर या प्रख्यात लेखिकेने कार्व्हर उभा केला आहे . त्यातील  एक तरी  अंश आपल्या गुणात सामील झाला तर पुस्तक वाचल्याचे भाग्ये मिळेल .. 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे, ,नेरूळ ७०६
(कर्णबधिरांचे विशेष शिक्षण )

Wednesday, April 13, 2022

जातिअंताच्या लढ्यापुढील दीपस्तंभ ... लोकसत्ता . लेखावर प्रतिक्रिया

 

आज दिनांक १३ एप्रिल लोकसत्ता मधील प्रसाद जाधव कुलकर्णी लिखित उपरोक लेख वाचण्यात आला. आज जात जाणिवा कश्या बळकट होत आहेत ,त्याचा बीमोड करण्यास महात्मा फुले आणि डोक्टर बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार किती प्रवर्तक आहेत ते विषाद केले आहे .

तसे पाहता आज जात ही एक बांधीस्त वर्ग होऊन बसली आहे  . जातिअंताच्या लढाईचे मूळ  हे जरी महात्मा फुले आणि डोक्टर आंबेडकर यांनी ठणकावून संगितले असले तरी आज राजकीय सत्ता आणि विविध विवाह संस्था या जाती व्यवस्थेला खतपाणी घालताना दिसून येत आहेत .

जात निर्मिती हे मानव निर्मित असून तत्कालीन प्रस्थापित , उच्चवरणीयांनी निर्माण केलेले आहे . ती आज तागायत तग धरून बसलेली आहे ? जात नाही ती जात . जाति या मनू ने निर्माण केलेल्या नाहीत हे डॉक्टर बाबासाहेब यांनी ठाम पणे नमूद केलेले  आहेच . या जात संस्थेचे अनुकरण आज ही मोठ्या प्रमाणात तळाचा वर्ण करीत असल्याचे पदोपदी अनुभव येत आहेत . मनू हा जात प्रचारक होता .

हिंदू समाजातील जातीचा पुंजका हे व्यक्ति ,समाज आणि देश विकासाला मारक ठरत चालले आहे . आजमितीला विविध माध्यमाद्वारे होणारे जातीचे मेळावे ,सम्मेलन हे जाती एक्याला बळकट करणारे आहे . हे असे विविध जातिबांधीलकीचे कार्यक्रम  सामाजिक एकजुटीला  टाडा देताना दिसत आहेत .

जातिअंतापेक्ष्या जातबळकटिकरण ,धार्मिकरण ,परधर्मद्वेष ,हे सामाजिक ,आर्थिक ,आणि देश विकास यास खिळ घालताना दिसून येत आहे.

उद्या होणार्‍या प.पू. डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित जातिअंताचा संकल्प करून जाति निर्मूलनचा विडा उचलावा ,अश्या करण्याने महामावांची खरी  जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल .

प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ ७०६


Tuesday, April 12, 2022

iphone7_औरढाईमाला.

#iphone7_औरढाईमाला.

-------------- बा. र. शिंदे 

आज कुछ निजी काम के चलते मै घर से ऑफिस के लिए देर से निकला था । हुवा यूं की जैसे मै बांद्रा रेल्वे (लोकल ) स्टेशन पहुँच गया और लोकल से उतर गया । लोकल बांद्रा थी और वापिस सी एस टी जाने वाली थी ( बांद्रा –सी एस टी ) और रोज की तरह स्टेशन से बाहर पश्चिम की ओर  निकलते हुये रिक्शा ले लिया जैसे ही रिक्शा मे बैठ गया तब पता चला की मेरे जेब मे मैंने  हल्कापन महसूस पाया । तब पता चला की मेरा मोबाइल नहीं है ? (मै दो मोबाइल इस्तेमाल करता हूँ,एक आंड्रोइड और एक इओएस  )

 एकदम से शॉक लगा ,चलो अभी मेरा मोबाइल गुम हो गया । यह मन ही मन मे ठान लिया , फिर मैंने तुरंत रिक्शा छोड़ दी । और जिस स्टाल  से ठंडा खरीदा था उस स्टाल तक जाने की सोचकर स्टेशन की ओर भाग ही रहा था तब मेरा बड़ा बेटा आदित्य का कॉल आया ,कुछ पल लगा की इस समय अदित्या कॉल किंव कर रहा है ? जैसे ही मैंने उठाया तब उस ओर से आवाज आयी की आपका कहाँ है ? मोबाइल किसी और को मिला है और कहते है की वी.टी.आकार ले जाओ । मेरे बेटे के यह शब्द सुनकर मेरी बड़ी हुयी धड़कन थम गयी । 

मै तुरंत बांद्रा प. टिकट विंडो से सी एस टी का वापसी का टिकट लिया। बांद्रा से तेज लोकल लेकर वाया दादर सी एस टी पहुँच गया । जिन्हे मेरा मोबाइल लोकल ट्रेन मे प्राप्त हुवा था वे एक पेशे से बड़े सज्जन  वकील है  उन्होने किल्ला कोर्ट सी एस टी मे मिलने को कहा ।  मै उन्हे वहाँ पहुँचते ही कॉल लिया उन्होने मुझे ‘ढाई माले’ पर आने को कहा । जैसे मै कोर्ट मे पहुँच गया तो बड़ी तादात मे पुलिस कर्मी बैठे दिखाई दिये । और ढेर सारे वकील । 

मै उन्हे वाहा से और दुबारा कॉल किया की मुझे ‘ढाई माला’ समज नहीं आरहा है । फिर से उन्होने कहा की आप पहले माले पे आओ । तब एक नीचे सेकुरिटी मे बैठी पुलिस महिला से पूछा की यह ढाई माला किधर है ? वह भी चौक गयी और कहा की मै नहीं जानती । मै तो पहली बार सुनरही हूँ । और मेरी मुसीबत बढ़ और बढ़ गयी । 

किला कोर्ट अंग्रेज़ के जमाने का कोर्ट है यह ,उनका एक माला ही हमारे चार माले की तरहा है । मै एक ही माले पर गया लिकिन येसा लगा की मै चौथी मंजिल पार किया हूँ । क्या करे गुम हुवा मोबाइल वापस मिलनेकी की खुशी मे मै इतनी तेज ऊपर गया की मै कितनी मंजिल ऊपर आया यह भूल गया । मेरे पैर का पुराना दर्द भूल भी गया ।  जैसे ही ऊपर आया तब मेरे दूसरे  मोबाइल से मेरे ही मोबाइल पर कॉल किया । तभी वे भले इंसान मेरे सामने ही खड़े थे । हात ऊपर किए हुये पास मे आने का इशारा कर रहे थे। 

भला इंसान ।मुसकुराते हुये  उन्होने मेरे हाथ मे हाथ दिये हुये मेरा सन्मान किया । मैंने आपसे बेटे से बात की थी । उन्होने मेरे फोन से एमर्जेंसी नंबर पर कॉल किया था तब एक ही बार मेरी पत्नी ,मेरे दो बेटे के पास कॉल गया था .... 

आप भी आपने मोबाइल मे घर के सभी सदस्यो के एमर्जेंशी नंबर दल सकते हो ...  

उन्होने मुझे आपने टेबल पर बिताया ,हम दोनों की पहचान हुयी और मैंने जापानी स्टाइल मे उनका शुक्रिया किए हये कोर्ट छोड़ दिया ... 

(मा. वकील साहेब हे हिन्दी भासिक आहेत ,हा संदेश त्यांच्या प्रएंत जावा हा हिन्दी लिहण्याचा मनसुबा होता ). 

मिनांडर


Thursday, December 2, 2021

ढलांटी

ढलांटी
( *लां* ऐवजी *ळा* वाचावे )

मी इयत्ता आठवीपर्यंत आलो असेन. आठवी पर्यन्त शाळा हा प्रकार काय असतो ते मला माहीत न्हवते.डॉ.डी.एन. शिंदे (माझे काका ) स्त्रीरोग तज्ञ ,सर जे. जे. हॉस्पिटल ,मुंबई. यांनी जर शाळेत जाण्याचं महत्व कळवलं नसतं तर,मी  आज गावी बिगारी ,मजुरदार,बाजारात दलाल , किंवा हॉटेल चा वेटर म्हणून काम करावे  लागले असते ?
हा सन १९७२ च्या दरम्यान चा किस्सा आहे ,जो माझ्यावर बेतला होता . 
असो,काल गावात एक लग्न होते. लग्नात बुंदी वर ताव मारला .तसं तर आमी चार जन मिळेल तिकडे फुकट लग्नात जेवायला  जात होतो . मी पहिल्या क्रमांकावर असेन . लग्न लावून झाल्यावर पडद्याखालून हळूच लग्न मंडपात घुसायचो .पंगत संपत आली की शेवटच्या रांगेत बसायचे. मग एखादं ओळखीचे वाढपी आले की टिंगल करून हात वर उचलून वाढायचे .बुंदी वाढायचा वाढपी आला की उंच हात उचलून वाढी .मग काय सुकी रंगी बेरंगी बुंदी बेरंगी होई ,अर्धी तर पत्रावळी च्या खाली जाई .

आज लग्नात जेवायला जायचं म्हणून सकाळ पासून उपाशी पोटी होतो.
शेवटची पंगत आहे कुणी जेवायचं राहिलं असेल तर बसून घ्या ,अशी भोंग्यातून उद्घोषणा झाली की माझी  इकडे भुकेची कळ सुरू होई .शेवट ची पंगत सुरू झाली मी ही या पंक्तीला बसलो होतो.

सरसकट पळसाच्या पानाच्या पत्रावळी ,नंतरएक एक द्रोण वाटत आले.दुसरा माणूस त्यावर वगराळ घेऊन पाणी शिंपत आला .कारण पात्र उडु नये आणि ते धुतले जावे यामुळें पाणी हमखास वाढीत होते .

चारकोनी कापलेल्या चपात्या, गरमागरम पांढरा भात ,बटाटे ,वांगी ,आणि इतर तरकारी मिक्स असलेली भाजी आली ,नंतर दोन वाढपी आले एकाच्या हातात मोठी दूरडी (जी  अक्षता वाटून झाल्यावर  हळदीने पिवळी झाली होती) त्यात बुंदीचे लाडू घेऊन आले.एक एक करत माणशी एक  लाडू पत्रावळी वर ठेऊ लागले.लाडू चा सुगंध आणि रंग आकार बघून माझ्या तोंडात पाचक रस तयार झाला .कधी एकदाचा  लाडू खावे असे वाटू लागले.
तो क्षण लगेच आला आणि मी पत्रावळी वर ठेवलेला लाडू चटकन उचलून सुरुवातीला खाल्ला .परम सुख मिळाले ,लाडू मोठा होता तरी  लगेच खाऊन फस्त केला.
नंतर,गपा गपा जेवणं सुरू केलं, तिकडे कुणी तर ..मना सजांना भक्ती पंक्तीचे जावे...उपेक्षु नको कुणी रे गुणवंता ...घ्या हो घ्या म्हणत होते .मी त्या आवाजाने घाबरलो . आता घायच काय ,इकडे माझा लाडू संपला होता . 

इकडे माझं घेणं सुरूच होतं. गडे हो खूप खाल्लं आज.तिखट काटाळ वांगी होती. लग्नातील वांग्याची मिक्स भाजी मला लै खाऊ वाटायची ,तशी मी लै खाल्ली.

जेवण झाले ,घराकडे निघालो .वरून ऊन तापलेलं होतं. घरी येई तोवर अंगात घाम आला आणि तासभर निघून गेला नाही तोवर मी घरी निघून आलो .संध्याकाळ चे चार वाजले असतील .अंगणात बाज होती त्या बाजत येऊन उताणा झालो.

रात गेली आणि सकाळ झाली .सकाळी पोटात कळ मारू लागले . टंबरेल घेऊन परसाकडे निघालो. जाता जाता पोटात लई कळा सुरू झाल्या ,आणि पोटात गुड गुड असा आवाज सुरू झाला.माझ्या गावी सर्व लोक नदीकाठी संडास ला जायचे .आणि आज ही जातात पण ते प्रमाण कमी झाले आहे ,मी रस्त्यात जाता जाता ,पोटात जोरात कळ मारली आणि पातळ संडास खाकी चड्डीतुन कधी  बाहेर आली ते कळेच नाही .

तसाच जाऊन नदी किनारी बसलो हातात चड्डी काढून घेतली  ..बाजूला पाण्याचा झरा वाहत होता त्यात चड्डी धुतली ,आणि खडकावर आडोशाला येऊन बसलो.तस माझ्याकडे कोणाचे लक्ष न्हवते . 

एक तासाने अर्धी ओली चड्डी अंगावर चढवली तोवर परत पोटात कळ सुरू झाली.परत पातळ संडास.
अश्या कळा अनेक आल्या अनेकदा पातळ संडास केल्या . 

चार तास नदीकिनारी बसून राहिलो. शेवटची कळ संपेपर्यंत.घरी जावे तर संडास बांधलेले  नाही कीपाण्याचा हौद नाही.मग घरी कसे जाणार ?

अश्या ढलांटी कैक जणांनी अनुभवल्या असतील.अश्या ढलांट्या कोणाच्या नशिबी नको. खरे की नाय .

बी आर शिंदे,नेरुळ ७०६
मिनांडर

Friday, October 22, 2021

ऊस तोडीतून कंदुरी

||ऊस तोडीतून कंदुरी  ||

१९५६ चे पर्व संपले .मांग मागे राहिले .जे धम्मात गेली ते आज नवी पिढी उछभ्रू म्हणून जीवन जगत आहे.

आंध्र ,कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मांग जात दिशाहीन असून अजून संभ्रमात जीवन जगताना दिसत आहे.

समाज आणि जातीचा पुळका मिरवणारे ,डॉ बाबासाहेब यांच्या चाळवतील मातंग म्हणून शेकी मिरवणारे ,सामाजिक बांधिलकी असलेली किंवा नसलेली हिंदू च्या खालच्या पायरीला खुंटन खाण्यात जीवन जगताना जग पाहतो आहे.याचे कारण धर्मात कायम असणे .

फक्त तिन्ही राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील ऊस तोडणी मजूर  कर्नाटक सीमेलगत चे जिल्हे हे ख्रिश्चन होऊन जीवन जगत आहेत ,पुण्यालगत चे कांही गावे तर जैन धर्मात असून त्या त्या धर्माचे जीवन जगत असताना चालीरीती या हिंदूंच्याच आहेत.
मग ते जैन असू की ख्रिश्चन .?

इकडे महाराष्ट्र्रात खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात बरीत लोक धर्मातीत आहेत.

मराठवाड्यात प पू बाबासाहेब नाही पहूनचले म्हणून इथे ,औरंगाबाद वगळून ,आज ही थोडा शहरी भाग वगळता जैसे थे ची परिस्थिती शाबूत आहे.

करण हा भूभाग निजाम दरबारी असल्या कारणाने इथे बाबासाहेब यांचेवर सभा घेण्यास बंदी होती .तरी बाबासाहेब धोकी तळवडे या उस्मानाबाद जिल्ह्यात येत होते.मोजकी लोकं या सभेला हजेरी देत.

उस्मानाबाद ,लातूर ,जालना आणि बीड या जिल्ह्याची सामाजिक ,धार्मिक ,राजकीय आणि शैक्षणिक स्तिथी अजूनच पीछेहाट झालेली पहावयास मिळते आहे .

कमकुवत शिक्षण ,अंधश्रद्धा ,यातून उदयास येणारी सामाजिक स्तिथी खूप हालकीची आहे .

बीड ,लातूर आणि उस्मानाबाद चे उदाहरण द्यायचे झाले तरी पुरे आहे .बऱ्याच अंशी लवकर लग्न झालेली मुलं-मुली कामासाठी भटकत असताना .काम आणि रोजंदारी काम करीत असतात.काम मिळत नाही म्हणून ऊस तोडणी हा एकच पर्याय त्यांचेकडे उरतो .

म्हणून शेजारील राज्य ,आणि जिल्हे यात कामे करीत असतात .उदा आंध्र आणि कर्नाटक

नाते संबंध जपत असताना आईने देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी मुलगा ,ऊस तोडणीवर जातो .

बोललेला नवस वेळेत फेडण्यासाठी उस मालकाकडून हात उसने उधार पैसे घेऊन .नवस फेडावा लागतो.

बऱ्याच खेड्यातून घरगडी म्हणून कामावर राहण्याची प्रथा अजून जिवंत असताना पहावयास मिळते.
ताई चे लग्न आणि लग्नात दिलेला हुंडा ,लग्नात झालेला रकून खर्च यासाठी वर्षभर रात्री मालकाच्या शेतीवर काढल्या जाऊन उभ्या आयुष्यची राख रांगोळी होते.

नाते जपण्यासाठी किंवा अंधश्रद्धेपोटो जीवन आणि परिवार एक खेळ होऊन बसतो .

घेतलेल्या आगाऊ रकमेचा परतावा करण्यास कैक वर्ष निघून जातात. याच काळात त्यांच्या पोटी जन्माला आलेले अपत्य ही त्याच शेतात आणि शिवारात खेळुन बाळ वयातून तरुण वयात येते आणि आई वडिलांच्या सिस्टम चा एक अविभाज्य अंग बनून जाते .

आज ही श्शृंखला  येवडी रूढ आणि मजबूत झाली आहे की ,ती परत आपल्या दारी येणे शक्य नाही .ही दरी खोलवर जात असतानाचे चित्र निर्माण झाले आहे.

आजच्या पेंडमीक काळात तर काय स्तिथी असेल ते विरळा.खाजगीकरण आणि बेरोजगारी यात गाव पातळीवरील मातंग समाज वरील कारणांमुळे नक्कीच बाहेर फेकला गेला आहे असे म्हणणे वावगे होणार नाही .

कालच लातूर येथील बातमी ऐकायला मिळाली की परडी आणि कवड्याच्या माळा याची होळी मातंग समाजातील कांही कार्यकर्त्यांनी केली .हे अभिनंदनीय होय .

याचा परिपाक म्हणून 'कंदुरी आणि नवस' यावर कर्डी नजर ठेवून गल्ली बोळ आणि गावात ,खेडोपाडी होणाऱ्या कंदुरी आणि नवस यावर अंकुश ठेऊन अश्या प्रथा मोडीत काढण्याचे काम गाव पातळीवर होणे गरजेचे आहे .

लेखक -प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरुळ -७०६

मिनांडर

Friday, October 15, 2021

कर्णबधिर -निकिता. Deaf Nikita


 कर्णबधिर -निकिता. 

वर्ष अंदाजे १९९६ असेल. निकिता कान तपासणी साठी माझ्या दवाखान्यात आली होती .तिला दोन्ही कानात ऐकण्याचा त्रास होता.

निकिता ,एक सुंदर मुलगी .मध्यम बांधा ,गोरी कांती आणि टपोरे डोळे.

कर्णबधिर असली तरी खूप देखणी होती.चेहरा गोल ,लांब केस .बघताच स्मिथ करून कांही हातवारे किंवा सांकेतिक खुणा करून तरी व्यक्त करण्यास उत्सुक आहे असा भास करणारी.

स्मित हास्य करताना गालावर खळी उमटून यायची .तीच तिची अभिव्यक्ती ची भाषा असावी .तळ मजल्यावर कान तपासणी करून झाल्यावर दोघी माय लेकी माझ्या कक्षात आल्या .

मी त्यांची वाट पाहत बसलो होतो ,माझ्या जागेवर. फाईल माझ्या टेबलावर ठेऊन पुन्हा दिलेल्या तारखेला येण्याचे कळून आपल्या घरी जाण्यास निघाल्या.

आज यांची माझी पहिलीच ओळख होती .आई पूर्वी पासून मला ओळखत होती .पण निकीतला मी आज प्रथम पाहिले होते .मला कधी वेळ काढून घरी येण्याची विंनंति करून त्या घरी जाण्यास निघाल्या ती मुंबई सेंट्रल च्या रेल्वे च्या क्वार्टर मध्ये राहत होती ,आई आणि बाबा सोबत.बाबा रेल्वेत उच्च अधिकारी .दोन वर्षे लोटली असतील .मी मुंबई सेंट्रल ला गेलो असताना ,निकिता च्या घरी जाण्याचा योग आला .वार शनिवार होता .तेंव्हा निकीताच्या आई ने घरी येण्याची विन्नती केल्याचे आठवले .आणि जवळच असलेल्या कॉलनीत जाऊन ,निकिता कुठे राहते हे कळल्यावर मी घरी गेलो.

ती पहिल्या माळ्यावर राहत असे .ती त्या कॉलनीत जुनी .लहानाची मोठी झाली .कर्णबधीर असल्यानेच सर्व तिला ओळखत असावीत.आई बाबांची एक एकुलती लाडकी लेक.आई खूप प्रेम करायची .निकिता आई चा जीव की प्राण .आज निकिता २० वर्षाची असेल.घरी मी बाबांना पहिल्यांदा भेटतो आहे. 

चहा घेता घेता कांही वेळा ,कर्णबधिर आणि त्याच्या अडचणी वर चर्चा झाली .आणि शेवटी निरोप घेतला ,निघता निघता निकिता ची आई माझ्याकडे विन्नती वजा पाहून ,माझ्या लेकीला कुठे वर मिळाला तर असे विचारले .आणि मी निरोप घेतला.

एक महिना लोटला नाही तोच ,निकिता ची आई माझ्या दवाखान्यात मला भेटण्यास आली .एकटी बघून मला प्रश्न पडला की या एकट्या का आल्या असतील ? काय अडचण असेल असा मला मनात संभ्रम निर्माण झाला ,आणि ते साहजिकच होते.

मी विचारले की ,अचानक कसे काय येणे केलं? त्या म्हणाल्या मी ,सहज आपणास भरण्यास आले आहे .निकीतला कुठे स्थळ मिळाले का हे विचारण्यासाठी आले आहे.

हे एक ..होते .मात्र त्यांच्या बोलण्यात अडचण वेगळीच होती हे मला त्याच्या बोलण्यावर कळत होते...तोच त्या म्हणाल्या .

सर आपणास मला कांही सांगायचे आहे .काय बोला ना काय अडचण आहे?.मी म्हणालो . 

त्यांनी घरातील एक प्रसंग सांगायचा आहे.

त्या पुढे म्हणाल्या की मला ,निकीतच्या बाबा वर माझा संशय आहे .काय म्हणता ? हो सर .कोणत्या संधार्भात. बोला ना ,काय अडचण असेल तर नक्की सांगा ..

आपण चर्चा करून सोडवू या .

निकीतच्या बेड मधून तिचे बाबा बाहेर निघतच नाहीत .नेहमी सारखे निकिता जवळ बसतात .तिला इकडून तिकडून येऊन स्पर्श करतात ..अंगा खांद्यावर हात फिरवतात .आज ती दहावी पास झाली आहे ,कळती ,शहाणी उपवर झाली आहे . 

मला यांच्या वर्तनावर संशय आहे .माझी द्विधा झाली आहे काय करावे ते कळत नाही .

आपण मला मार्ग सांगावा ..ती बोलत होती आणि मी ऐकत होतो पण मनात संशय बळ देत होता .

करण अश्या अनेक घटना वाचनात होत्या आणि ऐकण्यात होत्या.

त्यांच्या या बॉलण्यावर पुष्टी होती.या प्रसंगाने आईचा जीव भांड्यात पडला होता.

कारण एकुलती एक मुलगी ,आणि वरून कर्णबधिर.आपल्याच घरात हे पाप शिजते आहे या मुळे त्या पूर्ण खचल्या होत्या.

बाई खूप संकटात होती. बाहेर कोणाला सांगता पण येत नाही आणि मनात साठवता ही येत नाही ?

मनाने खूप खचली होती .घरच्या इभ्रतीचा प्रश्न होता .आणि आज मज जवळ मन मोकळे करून झाली .हा प्रश्न मलाच का सांगितला  हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे .

मन मोकळे करून ,जड अंतः कारणाने आपल्या घरी निघून गेल्या .

आज बाप आणि मुलीचा संबंध स्पष्ट झाला होता .अश्या कैक ना बोलता येणाऱ्या मुलीवर ,अपंग ,मतिमंद मुलीवर बलात्कार च्या घटना आपण एकतो आहोत आणि वाचतो आहोत . नातेवाईक ,मित्र  ,घरचे आणि बाहेरचे त्या व्यंगाचा सहज फायदा घेत असल्याचे शिक्का मोहर्तब झाले होते .

वाचलेले आणि ऐकलेले खरे ठरले होते ,नक्की झाले होते .घरातील नात्याला गळ लागली होती .बाप मुलीचा फायदा घेत होता.

तिच्या बोलण्यात वाटत होते की ,मी पोलीस तक्रार करावी.मी कसं काय हे करू शकतो.हे सर्रास जगात चालू आहे हे मी मान्य केलं .कांही काळ निघून गेला ,आई परत माझ्याकडे आज आली होती .पण ती अडचण सांगण्यात आले नव्हती ,तर एक खुश खबर घेऊन !आली होती .

निकीतच्या लग्नाची ती बातमी होती .तिचे लग्न ठरले होते.आज ती आनंदी दिसली .बातमी एकूण मी त्यांचं अभिनंदन केलं! त्यांना मी मागील कांही विषय न काढता .त्यांना कँटीन मध्ये घेऊन गेलो आणि चहा पाजला . नंतर  त्या घरी निघाल्या.

 निकिताचे लग्न झाले .मी लग्नाला जाऊ शकलो नाही.सहा महिने झाले लग्न होऊन .निकीताला डोंबिवली येथे दिले होते.नवरा पण कर्णबधिर .गोदरेज कंपनीत कारकून म्हणून कामाला होता.

आज निकिताची  आई परत एकदा माझ्याकडे आली होती .हो या खेपेची तिची माझी तिसरी भेट.

ही भेट धक्कादायक होती .ताईने  मला सांगितले ते सत्य भयावह होत.

ताई म्हणाली की ,सर निकिता चे बाबा दर शनिवारी डोंबिवली ला जातात. तिथे एक रात्र राहतात .

तर कधी कधी निकीतला आपल्या घरी घेऊन येतात ?आहे की नाही ,लज्जास्पद आणि भयावह!

या जगात आज अश्या कितीतरीं निकिता सारख्या कर्णबधिर ,मतिमंद आणि अपंग मुलीवर अत्याचार होत असतील आपल्याच घरात .

कसे हनन ,दमण होत असेल यांचे अंदाज बांधता येत नाहीत.? अश्या घरात घडणाऱ्या घटना ,कितीतरी घरात निकीताच्या सम  घरे उध्वस्त झाली असतील ,मने उद्धवस्थ झाली असतील.

आपल्याच बाबा कडून आपल्याच मुली सोबत असे वागणे किती मानसिक आघात करणारे आहे .अमानुष आहे हे अमान्य आहे . आज समाजात खूप मानसिकता विकृत झाली आहे .याची मानसिक करणे कांही असू देत.हे भयावह आणि धोकादायक तर आहेच. पण  समाज दिव्यांग बाबतीत विघातक आणि अनैतिक तर नक्कीच आहे .

( या घटनेत कांही मिळते जुळते असेल तो एक योगायोग समजावा )

बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ -०६

मिनांडर

Friday, October 8, 2021

हरिपाड,अलपूझा केरळ

जेंव्हा मी दौऱ्यावर होतो…हरिपाड


हरिपाड


हरिपाड हे अलापूझा जिल्ह्यातील गाव ,केरळ म्हणटले की हिरवेगार ,रान आणि शिवार आणि गर्द झाडी डोळ्यासमोर आलाच म्हणून समजा.


हरिपाड हे पश्चिम समुद्र किनाऱ्यापासून नुकतेच दोन किलो मीटर अंतरावरील गाव .गर्द झाडी ,तुबकदार आणि सुबक आकाराचे रंगी कौलारू बंगले .घरादारात विविध नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे ,त्यात डोके वर काढणारे नारळाचे गगनचुंबी झाड ,नारंगी रंगाचे गोल गरगरीत लटकणारे दहा ते वीस नारळ .


पाण्यानी गच्च भरलरली गावे .निमुळती रस्ते .कुठं कुठं तर चार चाकी जाईल एवढाच रस्ता.एक गाडी आत गेली की दुसरी बाहेर निघणे कठीण .एकाला माघार नक्कीच घ्यावी लागते.


लोकल माहिती च्या आधारे बरीच माहिती उपलब्ध झाली.

इथे भाषेची खूप अडचण धड त्यांना हिंदी येत नाही की इंग्रजी .आपल्याला एखादं शिकलेले द्विभाषिक वापरावे लागतात .कामात खूप अडचण येते .तो पण आपल्या लातूरच्या भाषेत इंग्रजी बोलत असतो.त्याला देखिल हिंदी किंवा इंग्रजी धड येत नाही .


सुरुवातीला मला 'हरिपाड 'हे देव भूमी किंवा 'हरी चे पद ' असेच वाटले .खरेच इथे एकूण सत्तर च्या आसपास मंदिर आहेत .पाड म्हणजे नद्या .हा इलाखा पूर्ण नद्यांचा आहे .

अलीपुझा हे खूप जुने शहर.मंदिराचे महेर घर 

जवळच ४ किलो मीटर वर दोन मोठे  बुद्ध विहार असून ते इथं प्रसिद्ध आहे .एक 'महावेरीकेरा आणी दुसरे  कैरुनाली'. 


आज संध्याकाळी मी तो विहार पाहण्यासाठी येथील स्थानिक कोणाची मदत घेऊन जाणार आहे .कारण बुद्ध आणि त्यांचे पुरातन विहार हा एक माझा आवडीचा विषय आहे .पाली भाषेचा विध्यार्थी आणि अभ्यासक या नात्याने हे शोध कार्य हा माझा नित्याचा वयक्तिक कार्यक्रम आहे.


कालच भल्या पहाटे उठून मी आणि माझा कार्यालय मित्र डॉ पुथूलिन मार्टिन पी.जे. , (मास मेडिया ऑफिर) आम्हा दोघांनी  मिळून 'नागराज्या' या मंदिराला भेट दिली .डॉ मार्टिन हा कोट्याम केरळ चा रहिवाशी असल्या कारणाने कॅम्प साठी माझ्या ऑफिस ला अनेक विन्नती पत्र येत असतात .याच मूळे केरळ राज्यात शिरकाव करण्यास अडचण येत नाही .हरिपाड येथील 'नागमंदिर ' या वरून एक गोस्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की हे गाव कदाचित ही नागभूमी असावी .तिसऱ्या शतका नंतर  बुद्ध भिक्खु आणि विहार यांचा नाश करण्यात आला असावा .


हे या वरून कळते की  .हे एक खूप मोठे आणि प्राचीन मंदिर असून येथील लोकांची खूप श्रद्धा आहे .


सध्या मंदिराच्या आतील जिर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे.मुख्य दरवाजा तर थोडा वेळ जागेवर थांबून नक्षीकाम पाहण्यासाठी मजबूर करतो.लाकडा वरील नक्षीकाम,कोरीव काम खूप सुन्दर आहे .आतील बाजूला अनेक नाग नागीण यांची चित्र रेखाटली आहेत .हे कोरीव काम बघून माणूस थक्क होतो .


मंदिराच्या आत मध्ये प्रवेश केल्यावर केवळ 'साप' आणि 'सापच' दिसतात ,नक्षीकाम केलेले .जो माणूस सापाला घाबरत असेल त्याला तर इथे खूप भीती वाटल्यागत राहणार नाही .मला पण सारखे वाटत होते की इकडे पायाजवळ एखादा साप किंवा सापाचे पिल्लू तर पायात घुटमळत नाही असा भास झाला होता.म्हणून मी जास्त वेळ आत पाहण्याचे धारिष्ट्य केले नाही .


अलीपुझा येते चिकन कमी पण 'बदक'  खायला नक्कीच मिळतात .बदकाचे पिल्ले हा येथील खाद्य पदार्थ .चिकेन कमी बदक जास्त खाल्ले जाते .मी पण प्रथम इथे 'डक फ्राय ' खाल्ले .चवीला तसे चिकन सारखे लागत नाहीत.कधींतुम्ही आलात तर लाईव्ह डक नक्कीच खा आणि आस्वाद घ्या .


समुद्र जवळ असला तरी ,ताजे मासे  खाण्यास मिळत नाहीत .इतर भाज्या या केरलीयन असतात ,तिखट कमी ,मसाले कमी .रंग लाल असला तरी मिर्ची तिखट नसते .सांबर हेच मला आवडलेले पदार्थ.यात पाणी आणि भरपूर तरकारी समाविष्ठ असतात म्हणून खाण्यास आवडते .

पांढरा भात हे येथील स्थानिक लोकांचे मुख्य खाद्य .

मी गेली २७ वर्ष देशातील कित्येक राज्य फिरली ,पण माझ्या गावचा रस्सा अजून कुठे मला सापडला नाही ,की कुठे मुंबईचा ताजा  मासा,मावरा मिळाला नाही .


कैकदा मी केरळला कार्यालयीन कामाकरिता आलो पण कांही तरी लिहावे असे कधी वाटलेच नाही .कारण कामात डोके वर काढता येत नाही .

आज इथे आल्यावर गेली दोन दिवस टूर वर कांही  लिहावे असा मनात विचार आला म्हणून माझा हा उहापोह .


पूर्वी लिहलेल्या गोष्टी  माझ्या ब्लॉगवर टाकतो आहेच आपण माझ्या ब्लॉग वर इच्छा असेल तर वाचून मला प्रतिक्रिया द्यावे. balajirshinde.blogpost.com

आपल्या प्रतिक्रिया या माझ्या मेल आयडी वर जरूर द्या 

balajiayjnihh@gmail.com


गेली चार दिवस मी केरळ राज्यात वास्तव्यात आहे ,येत्या तीन दिवसांत मी मुंबईत असेन .माणूस जरी जग पालथे घातला तरी आपले घर आणि आपल्या घरातील माणसं त्यांची ओढ निराळीच असते .तो धागा निराळा असतो .

खाण्यापिण्याच्या वेळा ,सवाई आणि आपली माणसे त्यात असलेला सहवास हे जगभरात कुठंच मिळणारे नसते .


प्रा बालाजी शिंदे ,नेरुळ ७०६

९७०२ १५८ ५६४





Sunday, September 26, 2021

लग्न गावचे

||असे लग्न आणि असा वाडपी ||

पूर्वी लग्न म्हणजे फक्त लग्न जेवण हेच मुख्ये उत्सव असायचा . सत्तर चा काळ असेल . बायका पोरं आणि तमाम लेकुरे लग्नात फक्त जेवायला येत . 

ग्रामीण भागात तर मजाच निराळी गडे हो .घरातील चुलीला अवतान असायचे . चिल्ले पिल्ले लग्नाला जायची सोय होती .  इथे शहरात एकाने किंवा जास्तीत जास्त दोघाणे लग्नात जाण्याचा आघात म्हणा किंवा अलिखित पायंडा पाडला आहे . 

मुला बाळांना सोबत घेऊन जाणे हे खूप त्रासदायक म्हणा  किंवा जिकिरीचे होय . 

अति ग्रामीण भागात आणि गरीब कुटुंबात लग्न हा एक छोटासा उत्सव असतो . कांही झगमगाट नाही ,मंडप नाही ,कोंगो भोंगो नाही . फक्त बाजा सनई किंवा क्लिरीनेत ,ढोल आणि द्रम . 

मंग यांचे  लग्न कुठे असते ,तर गाव शेजारी एखादे मंदिर किंवा गावातील किंवा  गाव शेजारच्या   प्राथमिक शाळा . याच  शाळेत लग्न थाटात होते . यांना लग्नात सर्व विधी घरीच कराव्या लागतात ,जसे भुलभ्या वर नवरदेव आला की तिथे आंघोळ घालून हळद लावली जाते . भुलभा म्हणजे आंब्याच्या फांदी पासून तयार केलेला हळदीचा मांडव .थोडे जांभळी चे फाटे ,चिंचेच्या झाडाच्या फांद्या किंवा लोकल भागात जे झाड उपलब्ध असतील त्या झाडाच्या फांद्या . 

आंघोळ करून झाली की नवरा घरातील बायका ,यात भाग घेतात . यात मुख्यत्वे आत्या असतात . आणि इतर गल्लीतिल बायका मिळून हळदीचे गाणे गातात ... 

'नवरा आला मांडवा पाशी 
नवर देवा ला ग हळद लावा थोडी .... '

असे आणि अनेक गीत पेश केले जाते ,नवरदेव झोप येत असली तरी कांहीच करू शकत नाही ,डोक्यावर सफेद टोपी ,हातात चाकू च्या टोकाला लिंबू असतो तो धरून स्मित हास्ये करीत बसलेला असतो . पांढरा पेहराव असतो . अंगात सांडो बंनियन आणि खाली नाड्याची पटलोण असते . 

कधी एकदा आंघोळ घालतील आणि भुलब्यावर बसवतील असे मनात विचार करीत असतो ,बिचारा नवरा त्रस्त झालेला असतो . 

दुसर्‍या दिवशी लग्नाची तयारी होते . नवरा गाढवाची ऊंची असेल एवढ्या घोड्यावर बसवतात . वाजत गाजत 'मारती च्या पारावार ' घेऊन जातता . मंदिरात प्रवेश नसतो तरी खालच्या पायरीला नारळ फोडून डोक त्याच परिवार ठेऊन परत नवरा घोडवर स्वार होऊन लग्न मंडपात येतो . एकडे जेवायला आलेले पाहुणे मित्र कधी लग्न लागल आणि कधी जेवण करून कल्ति मारू या विचारात असतात . 

एकदाचा नवरा महदेव मंदिरात येतो न येतोच  . बाजे वाले  गलबला लई करतात . इकडे तिकडे मांड्या घालून बसलेले सोयरे मंदिर च्या दारावर  घेराव करतात ... एकदाचा झाडावर लटकावलेल्या भोंगयातून आवाज येतो .... 

'आssता एक विचार श्री कृष्टणा नवरा .... 

लोक भरा भरा हातातील पिवळी ज्वारी उदधूळ मोकळे होतात . जंगम अप्पा किंवा आपलाच भावकीतील कोणीतरी .... 

लग्न घटिका संपवन्यांच्या नादात असतो .... फुका रं फुका असा मधून कुणी तरी आवाज करतो ,एकडे किलाट मास्टर उंच वर तोंड करून गाणे फुकत असतात ... 

आज मेरे यार की शादी है ,हे गाणे गातो .. लोक तिकडे टाळ्याचा कडकडाट करतात ... 

लगेच भोंगयातून आवाज येतो . जेवण केल्याशिवाय कोणी बी जाऊ नका . लगचे दूसरा आवाज येतो की डाव्या बाजूला नवरदेवाचा आहेर चालू आहे . मग लगेच दूसरा आवाज येतो , रामराव पाटील यांचे कडून नवर देवास एकसे एक रुपये सप्रेम भेट . तिसरा आवाज येतो की रमाकांत माने याचे कडून एककवनन्न रुपये आहेर .  

इकडे प्राथमिक शाळेत पहिली पंगत बसलेली असते . बायका ,लेकरं दिवसभर अन्न आणि पाण्या वाचून भुकेणे व्याकूळ झालेले असतात .आप -आपल्या गावी पायी जाणारे सोयरे पहिल्या पंक्तीला बसलेले असतात . 

मग वाड सुरू होते . तेवढ्यात जोराचा वारा सुटतो . एक शाळकरी पोरगं पंक्तीला येऊन जोरात वरडतय ,आपले आपले पत्रवली सांभाळा जोरात वारा येत आहे . 
लोक आप आपली पात्रवली आपल्या बाजूला अर्धी मोडून जागा न सोडता तिथेच बसलेले असतात . थोड्या वेळाने वावठल निघून जाते आणि जेवण वाडपी आपले हातात टोपली आणि स्टील चे बकेट एका मागे एक घेऊन येतात . एक जन चपाती  वाढतो ,दूसरा भात आणि दिसरा वरण . ... 

कोपर्‍यतून कुणी तरी आवाज काढतो . पहुंचल का सगळ्यांना घ्या मंग सुरू करा . लगेच कुणी तरी मधेच आपला मंजुळ आवाज काढते ... 

"सदा सर्वदा योग तुझा घडावा,तुझे कारणी देह माझा झिजवा ,उपेक्षि नको कोणी रे गुणवंता.... पुंडलिक गौर देव हरी विटल ...." घ्या हो पाहून घ्या . 

मग जेवण सुरू होते ,शाळकरी चार पोरं एकडून तिकडे नुसते स्टील चे मग हातात घेऊन .... पानी पाहिजे का पानी असे म्हणत फिरत असतात . 

हा शाळकरी वाडपी खूप श्रुजनशील असतो शेवटचे काम करीत असतो ... पाणी दान . 

बालाजी रघुनाथराव शिंदे 

#मिनांडर

Friday, August 27, 2021

 मूरख साधू !



किसी गाँव में दो साधू रहते थे. वे दिन भर भीख मांगते और मंदिर में पूजा करते थे। एक दिन गाँव में आंधी आ गयी और बहुत जोरों की बारिश होने लगी; दोनों साधू गाँव की सीमा से लगी एक झोपडी में निवास करते थे, शाम को जब दोनों वापस पहुंचे तो देखा कि आंधी-तूफ़ान के कारण उनकी आधी झोपडी टूट गई है। यह देखकर पहला साधू क्रोधित हो उठता है और बुदबुदाने लगता है ,” भगवान तू मेरे साथ हमेशा ही गलत करता है… 


में दिन भर तेरा नाम लेता हूँ , मंदिर में तेरी पूजा करता हूँ फिर भी तूने मेरी झोपडी तोड़ दी… गाँव में चोर – लुटेरे झूठे लोगो के तो मकानों को कुछ नहीं हुआ , बिचारे हम साधुओं की झोपडी ही तूने तोड़ दी ये तेरा ही काम है …हम तेरा नाम जपते हैं पर तू हमसे प्रेम नहीं करता….”


तभी दूसरा साधू आता है और झोपडी को देखकर खुश हो जाता है नाचने लगता है और कहता है भगवान् आज विश्वास हो गया तू हमसे कितना प्रेम करता है ये हमारी आधी झोपडी तूने ही बचाई होगी वर्ना इतनी तेज आंधी – तूफ़ान में तो पूरी झोपडी ही उड़ जाती ये तेरी ही कृपा है कि अभी भी हमारे पास सर ढंकने को जगह है…. निश्चित ही ये मेरी पूजा का फल है , कल से मैं तेरी और पूजा करूँगा , मेरा तुझपर विश्वास अब और भी बढ़ गया है… तेरी जय हो !


मित्रों एक ही घटना को एक ही जैसे दो लोगों ने कितने अलग-अलग ढंग से देखा … हमारी सोच हमारा भविष्य तय करती है , हमारी दुनिया तभी बदलेगी जब हमारी सोच बदलेगी। यदि हमारी सोच पहले वाले साधू की तरह होगी तो हमें हर चीज में कमी ही नजर आएगी और अगर दूसरे साधू की तरह होगी तो हमे हर चीज में अच्छाई दिखेगी ….अतः हमें दूसरे साधू की तरह विकट से विकट परिस्थिति में भी अपनी सोच सकारात्मक बनाये रखनी चाहिए।


अंधभक्त को कोई निसर्ग की जानकारी नहीं होती है । वे हर बात को भगवान -भगवान करते है । अब इनको भिक मांगकर खाने की आदत जो लगी है वे उसी चंगुल मे मस्त है । और भगवान जो दिखाई नहीं देता है उसे ही सब मानकर उसे के ऊपर निर्भर रहते है । जब आँधी हवा तेज चली तो उसे कौन दानव मानव पता नहीं होता है वे तो सभी को दबोच लेता है । 


उसपर भक्ति करो या न करो न तुम्हें वह देखता है ना तुम्हें जनता है । तुम्हें मेहनत करकर धन कमकर आपने घर को कुशीहाल करना है । जैसे आज के साधू कम ढोंगी जादा होते है । 


आपने इस कथा मे दो ठग देखे है वे कहते है की ,  गाँव में चोर – लुटेरे झूठे लोगो के तो मकानों को कुछ नहीं हुआ , बिचारे हम साधुओं की झोपडी ही तूने तोड़ दी ये तेरा ही काम है …हम तेरा नाम जपते हैं पर तू हमसे प्रेम नहीं करता….”


अभी विज्ञान से देखे इनकी झोपड़ी कूड़ेदान से बनी है ,दूसरे चोर झुटे लोगोंकी झोपड़ी नहीं है उनके पक्के ईटा और सीमेंट के घर है ,वे भला कैसे टूट जायेंगे ?


इस तरह के कथाओंसे हमे सच्चाई के रास्ते न मिलते है न ढूंढ पाते है । तो येशी कथा से दूर रहे सच की रह पर रहे ।  

मिनांडर

Wednesday, August 18, 2021

Malala and Swat Valley , Afghanistan

मलाला आणि स्वात बुद्ध व्हॅली 

१९१४ साली संपूर्ण जगाला धक्का देणारी घटना म्हणजर मलाला युसुफझई ला मुलींच्या शिक्षण क्षेत्रात कार्य करल्याबद्धल मिळाळलेली पावती.

बुद्ध आणि त्यांची अस्तित्व बद्धल मलाला स्वात व्हॅली वर काय म्हणतेय ते पहा ....संपूर्ण अफगाणिस्तान आणि आमचे शासक हे , पण प्राचीन काळी स्वात (Swat Valley ) हे बौद्ध राज्य होते. दुसऱ्या शतकात येथे बुद्ध  धर्मीय आले होते आणि त्यांचे राजे इथे राज्य करत होते
अनेक वर्षांपेक्षा बौद्ध भिकखू जास्त काळ दरी खोर्‍यात राहून चिनी संशोधकांनी स्वात खोर्‍या विषयी  लिहिले संधर्भ इथे पाहावयास मिळतात . 
एके काळी स्वात च्या नदी काठावर १,४०० बौद्ध मठ कसे होते याची माहिती आपणास मिळते आहे . 
स्वात नदीचा संपूर्ण किनारा आणि विहरातील  घंट्यांचा जादुई आवाज
दरी ओलांडून रिंग रिंग असा मृदु आवाज करत असताना दिसत असे. ५००० वर्षा पूर्वीचे खूप बुद्ध मंदिरे तयार केली गेली आहेत, परंतु जवळजवळ तुम्ही स्वातमध्ये कुठेही जाता, सर्व प्राइमरोस आणि इतर जंगला दरम्यान तुम्हाला त्यांचे बुद्ध अवशेष सापडतात. ती पुढे लिहाते आहे आम्ही बऱ्याचदा खडकांळ भागात दर्या खोर्‍यात  सहल करायचो कमळावर आडवा पाय ठेवून बसलेल्या हसत असलेल्या लठ्ठ बुद्धांची कोरीवकाम ,फूलावर बसलेले बुद्ध पाहावयास मिळतात .  
 भगवान बुद्ध स्वतः येथे आल्याच्या अनेक कथा आहेत कारण ते अशा शांततेचे ठिकाण आहे, आणि त्याच्या काही राखे बद्दल (अस्थि ) सांगितले जाते. स्वात दरीमध्ये एका विशाल स्तूपात बुद्धांच्या अस्ति पुरलेले पाहावयास मिळतात. '
मलाला पुढे म्हणते आमचे ‘बुटकारा अवशेष’ हे लपवाछपवी खेळण्याचे जादुई ठिकाणच  होते.
एकदा काही परदेशी पुरातत्वशास्त्रज्ञ तेथे काही काम करण्यासाठी आले असताना  आम्हाला सांगितले की हे स्थळ दुसरते तिसरे कांही नसून पुरातन  काळात एक महान ‘बुद्ध  तीर्थक्षेत्र होते’,इथे अनेक 
बौद्ध राजे होऊन गेली .इथे  सोन्याने विहार  असलेले सुंदर मंदिरे  आहेत. इथे अनेक बुद्ध भिकखू यांचे पुरलेले अवशेष आहेत ... 
मलाला पुढे लिहाते आहे की माझ्या वडिलांनी एक कविता लिहिली आहे , 
"बुटकराचे अवशेष, (The Relics of Butkara) जे मंदीर आणि मशिद कशी सोबत असू शकतात हे उत्तम प्रकारे मांडले आहे....
'जेव्हा मिनारमधून सत्याचा आवाज उठतो,
बुद्ध हसू लागतो....  
आणि इतिहासाची तुटलेली साखळी पुन्हा जोडते’
आम्ही हिंदू कुश पर्वतांच्या सावलीत राहत होतो, जिथे पुरुष आयबेक्स आणि गोल्डन कॉकरेल शूट करण्यासाठी गेले. आमचे घर एक होते मजली आणि योग्य काँक्रीट. डावीकडे सपाट छतापर्यंत पायऱ्या होत्या. आमच्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसे मोठे मैदान होते . ते आमचे खेळाचे मैदान होते.
संध्याकाळी माझे वडील आणि त्यांचे मित्र एकत्र बसून चहा पित पिण्यासाठी एकत्र जमले
कधीकधी मी छतावर बसले की दूरवर  धूर उठताना बघुण खूप हर्ष वाटे. 
स्वयंपाकाच्या आगीपासून आजूबाजूला आणि रात्रीचे  धुराचे लोळ आणि त्यात  रॅकेट चा आवाज ऐकत होती. तो आनंदच वेगळा होता .  
ती स्वात दरी विषयी बोलते आमची दरी फळांच्या झाडांनी भरलेली आहे ज्यावर गोड अंजीर वाढतात
आणि डाळिंब आणि पीच ही ,माझ्या घरा जवळच्या  बागेत आमच्याकडे द्रक्ष्यांच्या अनेक बागा होत्या ,
पेरू चे आणि पर्सिमन्स ची वने होती . आमच्या समोरच्या अंगणात एक मनुक्याचा  सुंदर  वृक्ष होता
जे सर्वात मधुर फळ देई .आम्ही सगळ्या सख्या मैत्रिणी मिळून पक्ष्यांची थवे अनंत काळ पाहत असू असे भासे त्यांच्याकडेच आम्ही  जाऊ. पक्ष्यांना  झाडे खूप आवडतात महणून अनेक पक्षी इथे येत . 
तिला असे महणायचे असेल की अश्या शांत रम्ये ठिकाणी बुद्ध आवर्जून आले असतील . म्हणून तिला आज ही  स्वात दरी ही बुद्धाची पवित्र दरी वाटते . 

संधर्भ – I AM MALALA ( नोबेल प्राप्त 2014)
         Malala Yousafzai with Christina Lamb

बालाजी र शिंदे ,नेरूळ -७०६ 
#मिनांडर

( वाचत असलेलं पुस्तक)

Thursday, August 12, 2021

बुद्ध विहार

क्रांतेयबुद्ध बाबासाहेब डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे बुद्ध विहार बांधण्यामागे  खलील  मुख्य उद्दिष्टे होते . 

क्रांतेयबुद्ध बाबासाहेब डॉ.बी आर.आंबेडकर यांनी , १८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथे बुद्ध विहारच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लोकांना समजावून सांगितले की बुद्ध विहार बांधण्यामागे माझी तीन मुख्य उद्दिष्टे आहेत:-
एक आपल्या समाजातील बहुसंख्य लोक आज  खेड्यात राहतात, परंतु त्यांना नोकरी, उच्च शिक्षण आणि मुलाखत इत्यादींसाठी शहरात सतत यावे लागते. मग ते कोणतेही शहर असो येथे त्यांना राहण्यासाठी जागा मिळत नाही,किंवा तसे राहण्या जोगे एकद्या नातेवाईक किंवा पाहुण्याचे तसे घर असत नाही .मग ते काय करतात ?  ते पदपथ, रेल्वे स्टेशन ,बस स्थानक , उद्याने, मोकळी मैदाने. त्यांना इत्यादि ठिकाण च्या  शहरात राहण्यास भाग पाडले जाते . 
जेव्हा इतर समाजातील लोक शहरात येतात, तेव्हा त्यांना धर्मशाळा, हॉटेल, गेस्ट हाऊस इत्यादी सहज आणि मोफत मिळतात किंवा कमीत कमी त्यांच्या स्वतःच्या जातीसाठी राखीव असतात . महणून शहरांमध्ये यावे, तुम्ही इथे सन्मानाने राहू शकाल आणि ही बौद्ध मंदिरे त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करतील असे बाबासाहेबांना वाटले होते. 
दुसरे कारण या बुद्ध विहारांमध्ये इंग्रजी माध्यमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा उघडण्यात यावे , जेणेकरून आपल्या समाजातील भावी पिढीच्या मुलांनाही इतर समाजातील मुलांच्या बरोबरीचे उत्तम प्रकार चे शिक्षण घेता येईल.
तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांना आर्थिक सक्षम करणे होय .  या बुद्ध विहारांच्या आसपास दुकाने बनवून, तेथील लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाईल.हा एक अति महत्वाचा आर्थिक विकासाचा निकष त्यांनी लावला होता . थोडक्यात आर्थिक बाजूने आपला समाज सक्षम व्हावा असा असावा . 
सरतेशेवटी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना समजावून सांगितले की लोकांना रोजगार आणि आदर देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा बुद्ध विहार बांधला जावा यासाठी प्रतेक बुद्धिस्ट व्यक्तीने प्रयत्न  करायला हेवे . पण आज तसे होताना दिसत नाही किंवा तसे केले जात नाही हे खेदाची बाब आहे . जे आज बुद्ध मंदिर किंवा विहार दिसतात ते इतर समाजाच्या मंदीरा प्रमाणे कुलूप बंद दिसत आहेत . कोणत्याही प्रकार चे नियोजनबद्ध कार्यक्रम होताना दिसत नाहीत . छोटी मोठी विहार बंधीस्त अवस्थेत आहेत . तेंव्हा बाबसाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाला आल्याचे निदर्शनात येत नाही . ही आजची मोठी खंत आहे . 
तरी कोणत्याही कामाची वेळ गेलेली नसते . उपरोक्त प्रकारचे प. पू.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू स्वयंप्रकाशित आहे, म्हणून आपण सर्वांनी महामानवाचा हा महान विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आज उद्या आणि रोज सतत केला पाहिजे.

बालाजी र.शिंदे ,नेरूळ -७०६ 
#मिनांडर

Friday, August 6, 2021

स्वचित्त बोध

स्वचीत्त बोध /बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

balajishinde65@gmail.com

दूरध्वनी क्र.9702 158 564

सोमवार २३ ,मार्च २०२० /२८ मार्च २०२०

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वचीत्त बोध

चित्त म्हणताच ‘मन’ हे डोळ्यासमोर येणे सहज आहे .मनाच्या शांतीसाठी गौतमी पुत्र भगवान शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपले आयुष्य खर्चून जगाला मनाचा शोध लाऊन दिला .

स्वतःला जगणे किती आवश्यक्य आहे हा संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सुखी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःला जगणे अगदी आवश्यक्य आहे .घरात ,मित्र -लोकात आणि समाजात जगणे आणि उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्वतःला जगणे आवश्यक्य आहे.उत्तम रीतीने जगण्याचा मंत्र बुद्धाने जगाला देऊन गेला आहे.

अध्यात्मिक  प्रगतीतून आपल्या मनावर कार्य करण्याचे  आपण शिकत असतो .यात मनाचा कार्यभार खूप महत्वाचा आहे.आपल्या मनावर काय कार्य करायचे आणि कसे कार्याचे हे मनामुळेच समजू शकतो .प्रश असा निर्माण होतो कि, स्वतःला जाणणे म्हणजे काय ? स्वतःला जाणणे म्हणजे शरीराचा आकार किंवा उंची किंवा रंग नसून स्वतःची वास्तविक माहिती असणे म्हणजे हि स्वतःची जाण न्हवे ? स्वचीत्त बोध म्हणजे स्वताचे ‘मन’ जाणणे हे  होय .

पण मन जाणणे ,चित्त बोध करून घेणे हे अवघड काम आहे .आपले मन आपण इतरांना दाखूऊ शकत नाही आणि मन प्रकट पण करून दाखऊ शकत नाही.कारण मन हि वस्तू नाही .ती निराकार आणि असीम अशी आहे .पण आपणास निरीक्षण करणारे ते मन आहे , मात्र त्याचे निरीक्षर करता हि येत नाही . त्यास ‘स्वचित्त बोध’ असे म्हणणे वावगे होणार नाही ,याची व्याप्ती खूप आघाड आणि असीमित आहे ते विशद हि करता येत नाही .  

‘स्वचित्त बोध’ हि एक निरंतर आणि वेगळी बाब आहे .यालाच चिन्तन असे म्हणता येईल .दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर आंतरिक,किंवा स्वतःवरील स्वताचे आंतरिक चिंतन असे म्हणू .किंवा मनातील सातत्याने बदलाचे चिंतन असे हि म्हणता येईल .मन हे अनात्मिक आहे ते सातत्य असून निश्चित प्रहावीत नाही.मनाच्या कप्यात  बदलाचे हेलकावे आणि बारकावे सतत चालत असतात (Mind is continues and changeable process in rational animal like human being ) म्हणून माणसाने सतत स्वताच्या मनाचे निरीक्षण (continues observation of own Mind) करावे .

मनाला सतत प्रश विचारात राहावे ,यात मन सुखी कि दुखी ,कुशल कि अकुशल किंवा माझी अवस्था धाम्म्कुल आहे का ?या हि पलीकडे जाऊन माणूस मनोवास्थेचा शोध करू शकतो किंवा घेऊ शकतो .मनोधर्माचा शोध म्हणजे धम्म विषयक अंगाचा शोध होय .मनोधार्माचा शोध घेत घेत त्याचे मर्म जानने हे होय.मन हे कांही भाजी पाला नसून लवकर टोपलीत येण्याची बाब नाही .म्हणजेच विकात घेण्याची बाब हि नाही .याच मानला प्रश विचारत दूरवर घेऊन गेले कि तिथे एक अशी अवस्था येते कि ,त्याचा परिपाक विपस्सनेमध्ये होतो.

सुरुवातीला आपल्या मनात काय चालले आहे ते कळत असताना आपण सुखी का दुखी हे ठरवत असतो .एक वेळ अशी येते कि हीच अस्वस्था जवळून पाहण्याची संधी प्राप्त होते.पण या अनुभवास आपण नाव देऊ शकत नाही ,जसे जसे मनाचे कोडे उलगडत जाते तसे तसे मन आणि मनातील अनुभव सखोल होत जातो .

जेंव्हा खरे स्वरूप कळण्यास सुरुवात होते तेंव्हा मनामध्ये निर्माण होणारे स्वरूप अनित्य आणि बदलाव घडउन आणणरे आहे हे आपण स्वतः अनुभवतो .आणि त्याची प्रचीती आपणास येण्यास सुरुवात होते .

आता आपली स्तिथी अशी येत कि मनातील एकण -एक बाब शून्य आहे असे जाणवते .हि स्तिथी प्रतीत्यसमुत्पादानुसार निर्माण होत आहे हे लक्षात येते ,मग मन हे एक वास्तविक आहे हे जाणतो तेंव्हा आपण धर्म्विविचय किंवा विपास्सनामय होतो .खर्या अर्थाने इथे तीपिटकातील अभिधम्म (तसे पाहता थेरवादातील  सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत, या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात.(अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे. ) मन अस्तित्वात येत असल्याचा भास निर्माण होतो ,कारण अभिधाम्मात मनाचे संशोधन करता यावे म्हणून त्यात चैत्यधम्माच्या याद्या करून दिलेल्या आहेत.

चैत्धर्म ..म्हणजे यात प्रत्येक चीत्तक्ष्णामध्ये विविध घटकांचा समावेश झालेला असतो ,आपले मन बाह्य जगाशी कसे जोडलेले आहे हे चैत्य्धर्म दर्शवतात ,एवढेच  नसून बाह्य मन आणि अंतर मन याचा कुठे संयोग होतो का ते शोध चालू असतो.आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्याची मानत होणारी जाणीव हे चैत्यधर्म होय.जाणीवेच्या नजरेतून पहिले तर बाह्य मन आणि अंतर मन हे वेगळे आहेत याची जाणीव सतत होत असते.म्हणून चैत्यधर्म समजण्यासाठी ती जाणीव होणे हे गरजेचे असते.

चैत्यधर्म पहा एका निर्देशकासारखा असतो , उंटावर किंवा  एखाद्या वाहनावर आरूढ होऊन आपल्या साथीदारांना आदेश देत असतो ,पण स्वतः त्याचा त्यात हिस्सा नसतो. आदेश देणारा हा चित्त तर एक एक सातीदार हा चैत्य्धर्म होय.जरी त्याचा त्यात सहभाग नसला तरी त्याचे तिकडे लक्ष मात्र सतत असते.

चैत्ययादी  मधील पाच धर्मातील एक म्हणजे ‘स्पर्श’होय .मनात घडत असलेल विषय हे संपर्कात  सामावलेले आहेत. विषयाला संपर्कात महत्वाचे स्थान आहे ,मन आणि विषय यांचा संपर्क नसेल तर चित्त हि उपस्थित नसते .इद्रीयाशी आलेला संपर्क आणि चित्त हा चित्तातील मुख्य विषय आहे .जिवंत इंद्रियात विषय निर्माण होत असतात .म्हणून ते इंद्रिय सतत जिवंत असायला पाहिजे .उदा.आपण झोपलेले आहोत आणि कोठून तरी आवाज कानी येतो ,पण तो कश्याचा आवाज आहे किंवा कोठून येतो ते कळत नाही ,झोपेत असताना तो आवाज आणि त्याची जाणीव होणे,पण तिथे आपले चित्त उपस्तीत नसते .तेंव्हा ते अनुभवावे लागते .यालाच लक्ष असे हि म्हणावे लागेल .इथे ऐकणे आणि लक्ष द्या असतला भाग होतो .

आपण एकाद्या कुत्र्याचे उदा घेऊ रात्री च्या वेळी कुत्रा जमिनीवर लोळत पडलेला असतो ,तो झोपेत नसतो पण कानी कांही आवाज आला कि एक कान वर उचलून मागमूस घेत असतो आणि परत दोन्ही कान सरळ करून झोपी जातो तो त्या आवजाची किंवा वस्तूची खात्री करून मगच झोपी जातो किंवा लोळत असतो .

अश्या प्रकारे आपले एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित होत नाही तोवर दुसरी तिसरी वस्तू आपल्या लक्ष्यात येते ,आणि मनात सुखद ,असुखद  वेदनांचा अनुभव सुरु होत असतो हाही चित्ताचा मुख्य घटक आहे .मानवी  वेदना या मानसिक अनुभव आहेत ,त्या शरीराने अनुभवता येत नाहीत ,त्या मानाने अनुभवाव्या लागतात .मनाच्या द्वारे मानसिक  वेदना अनुभवता येतात तर पंचइंद्रिया  द्वारे शरीराच्या वेदना अनुभवता येतात .सुखद आणि दुखद अश्या  दोन्ही वेदना आपण अनुभवत असतो .मानवात  वेदना निर्माण करणारा सर्वात महत्वास चैत्यधर्म आहे .

वेदनेतून मानवात जागृत भाव निर्माण होतो ,म्हणून वेदना हि सर्वात महतवाची चेतना म्हणावी लागते .

भौतिकचक्रा नुसार पहिले तर आपल्याला हे लक्षात येईल कि जेंव्हा आपण एखाद्या वेदनेला प्रतिकार देतो तीच आपली ‘तृष्णा ’ होय म्हणून बर्याच वेदना ह्या प्रतेक्ष्यात शरीरीरात सुप्त अवस्तेथ असतात .म्हणून आपल्यात असलेली वेदना आपण स्पस्ट पहिली पाहिजे .

चित्ताचा गुणधर्म ओळखण्याची  संज्ञा हि जाणून घेणे महत्वाचे आहे .एखादी गोष्ट जाणून घेण्यास आपण उत्सुकत असतो ,त्याचा अनुभव घेतो आणि त्याकडे आपण लक्ष देतो ,त्यामुळे आपल्यात विशिष्ट अश्या प्राथमिक वेदना निर्माण होतात ,पण त्या वेदना कश्याच्या आहेत ते आपणास पूर्णतः माहित नाहीत ,थोडक्यात इथे क्रमाने कार्य होत नाही .कारण कि वेदने पूर्वी ‘संज्ञा’ पण उत्पन्न होऊ शकते ,किंवा उपस्थित असू शकते.त्या वेदनेचा गुणधर्म समजला कि एखाद्या गोष्टीचा संबंध पुर्वानुबावाशी करीत असतो. नंतर ती वस्तू किंवा विषय आहे असे ठरवतो .एखाद्या दूरवर ठिकाणी आपणास विशिष्ठ वस्तू असल्याचा भास होतो  ,त्यास पूर्ण पाहिल्यावर आपण ठरवतो कि तो कावळा आहे त्याचा रंग  काळा आहे ,त्यास चोच आहे आणि दोन पाय आहेत ,तो कावळा म्हणून जेंव्हा ओळखतो  तो त्याचा गुणधर्म म्हणून ओळखतो .कधी कधी एखादी वस्तू ओळखून खुश होतो ,पण तो अनोळखी निघाली कि आपण जीभ तरी दाताखाली चावतो ,किंवा डोके खाजवतो आणि आपली चूक काबुल करतो .यालाच आपण ‘संज्ञा’ असे म्हणतो. सभोवतालचे जग आपण नेहमी ओळखतो आणि त्याचे वर्गीकरण करतो ,त्यास  संज्ञा असे म्हणतो. जशी आहे तशी ओळखणे हे  होय ,आणि ती आनित्य आणि दु:खमय आहे .   

जेंव्हा आपली विषयानुरूप हालचाल असते तीच ‘चेतना’ होय .चित्त हे नेहमी नवीन- नवीन हालचालीकडे धावत असते .ते कधी हि स्थिर नसते .नेहमी हालचाल करणारे चित्त हे निश्चित दिशेने पुढे सरकत असते .’पाच चैत्य’ हे चित्ता चा पाया आहे .

एक स्पर्श ,दुसरा मनसकार,तिसरी संज्ञा ,चौथी वेदना आणि पाचवा आणि अति महत्वाचा घटक चेतना या पाच बाबी कधी हि वेगळ्या करू शकत नाही ,त्या एकमेकात एकरूप असून प्रतेकासोबत असतात.याच पाच गोष्ठी खऱ्या  ध्यानाचा  पाया आहेत.

‘छंद’ उराशी बाळगून दृढ निश्चय  केला किंवा  निर्धार केला कि त्या विषयात आपण सातत्याने लक्ष केंद्रित केले कि आपला संकल्प पूर्ण होतो . बरीच लोक या पाच गोष्टीचा मेळ घालत नाहीत म्हणून ते पूर्णत्वाला जात नाहीत .त्या साठी छंद असणे हे मुळचे कारण होय .स्मृतीला एकत्र आणणे हे फक्त छंदा मार्फत करता येते. ध्यान करीत असताना आपण कुठेतरी असतो ,म्हणजे छंद आहे पण कुठे तरी भटकत असतो याचा अर्थ असा कि स्मृती नसते .स्मृती चा अर्थच असा आहे कि विखुरलेले घटक एकत्रित करणे होय .

आपल्या कडे छंद असेल  ,आणि स्मृती पण असेल ,तेंव्हाच आपण समाधी कडे जाऊ शकतो .आपल्याला पाहिजे तेथे मन एकाग्र ठेवणे म्हणजे ‘समाधी’ होय .स्वसनाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणे  ,मग समाधीतून आपण ‘प्रज्ञा’ कडे जातो .तसे पाहता समाधीच प्रज्ञा कडे घेऊन जाते .मन एकाग्र होते आपण जाणतो आणि ओळखत असतो .थोडक्यात आपणास खर्या स्वरुपाची माहिती होते .आपण ‘सत्य’ जाणतो ,कसलीच शंका उरत नाही त्यालाच विपस्सना असे म्हणतात.

हि ‘साधना’ केवळ आणि केवळ बुद्धाना प्राप्त झाली होती...

सिद्धार्थ वयाच्या सात वर्षापासून मनाच्या शोधात होता आणि त्यानेच एकट्याने मनाचा शोध लाऊन बोध हि  करून घेतला होता हे जगश्रुत आहे .

शनिवार २८,मार्च २०२० 

 

Monday, August 2, 2021

१०० स्मृतिशताब्दी: अण्णा भाऊ साठे .

||अण्णा भाऊंच्या १०० स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने ||

*(हा माझा लेख पुनः पोस्ट करीत आहे ... )*

.... प्रा बालाजी र शिंदे ,विशेष शिक्षा .

मतामतांचा गलबला ॥ कोणी पुसेना कोणाला ।।
जो जे मती सांपडला ।। तयासी तोची थोर ।।
असत्याचा अभिमान ।। तेणें पाविजे पतन ।।
म्हणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती ।।
.... महात्मा जोतिबा फुले.

मा जोतिबा फुले यांनी १८७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ओळी आहेत. इतक्या वर्षानंतर
आजही या ओळी परिस्थितीविषयी अगदी समर्पक भाष्य करताना जाणवतात.

जोतिबांच्या कार्याची आणि विचारांची स्मृती २०० वर्षानंतरसुद्धा का जागवायची हे अत्यंत महत्वाचे आहे .
याचे उत्तरच जणू काही या ओळी देत आहेत. एकंदर समाजात बहुजन असलेल्या
वर्ग, जाती ,जातीतील पोट जाती आणि स्त्रिया  यांच्या दृष्टीने हा #जागर आज आवश्यक आहे. म्हणून मी ऊहापोह केला आहे .

बहुजनाच्या #मुक्तिसंघर्षाचा धसका ज्यांच्या मनात आहे त्यांना आजही जोतिबांच्या विचारांची
भीती वाटत आहे. या भीती पोटी म्हणूनच असले लोक त्यांच्या विचारसंपदेवर हल्ला करताना दिसत आहेत. 

आज असेही काही लोक आहेत की, ज्यांना जोतिबांच्या विचारातील  क्रांतिकारकत्व लपवून ठेवून त्यांना 'देव' बनवायचे मानसुभे चालू आहेत   या चलाख लोकांना
वाटते की, जोतिबांच्या स्मृतीचे ढोल त्यांनी जास्तीत जास्त जोराने वाजविले, जयजयकाराचा जास्तीत जास्त कल्लोळ केला आणि प्रचंड गुलाल उधळला तर बहुजन शोषित, दलित, स्त्रिया इतर कसलाही विचार न करता त्यांनाच जोतिबांचा वारसदार मानतील!

पण ते आज  होताना दिसत नाही .करण त्यांचा हेतू हा समाज प्रबोधन नसून बहुजन ,अशिक्षित लोकांना लुटणे हाच होय .

प्रत्येक समाजात डावे उजवे ठरलेले असतात .डावे का निर्माण होतात ,ते नेहमी सत्य शोधण्याच्या मार्गावर असतात .आज ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मागे सारून मार्क्स ला पुढे ढकलत असताना पाहतो आहोत ? 

मी ना डाव्या ना उजव्या विचार सारणीचा असून ,मी मा. फुले #सत्यशोधक ,डॉ बाबासाहेब यांच्या #समता #चळवळ आणि आणि #बुद्ध धम्म #प्रचारक आणि #प्रसारक आहे .

मला कोणताही राजकीय आदर, मान सन्मानची  किंवा कुबड्याची गरज नसून ,स्वतंत्र उपरोक्त #त्रिसदसिय विचारांचा व्यक्ती आहे .हेच विचार कायम तारणहार असणार आहेत ,हे ही मी जाणून आहे .

जिथे आसक्ती चे बांध असतात ते समाजकरण ,राजकारण कायम तग धरीत नाही .हे बुद्ध तत्वज्ञान होय.

आज लोकांत चलती आहे , डॉ बाबासाहेब यांना टॅग करून जसे 'आंबेडकर चळवळीतील ..... अमका धमाका !'कार्यक्रम करीत असतात .

उदा : हॉटेल  व्यवसाय किंवा दुकानदार लोकांचे देता येईल ,साई दरबार ,साई कॅफे ,साई किराणा स्टोर .यांचे साई चे कांही देणे घेने नाही ,लोकांची दिशा भूल करून गिराईक आकर्षण असते .

तीच गत डॉ आंबेडकर चळवळीची आहे .आंबेडकर चळवळ बाजूला असते ,त्यांची चळवळ आणि वळवळ मात्र कायम चालू असते ,यात ९९% स्व घोषित डॉ ,प्रा आणि नेते आणि समाज सुधारक असतात ,त्यांना गल्ली बाहेर कोणी ओळखत नाही . सामाजिक हित यांचा उद्देश कधीच नसतो .(यांच्या सामाजिक कार्याला  अस्तित्वाची लढाई असे ही म्हणता येईल ).

समाज परिवर्तनासाठी शिक्षण यावर समग्र वाङ्मयात मा.फुले यांनी सम्यक विचार धारा कशी मांडली  होती या खालील चार ओळीत  दिसून येईल .

मानवपदाची जरा लाज धरा ।। विद्वान ती करा । मुलीमुले ।॥३१॥
गिर्वाणी शिकता कळेल तुम्हाला ।॥ आठवाल बोला ॥ माझ्या तुम्ही ॥४०॥
ऐकू दिले नाही एकहि शब्दाला ।। वेदबखरीला ।। लपविले ॥४१॥
द्विजकूट तुम्ही आणावे मैदानी /। आली ही पर्वणी ॥ जोति सांगे ।॥४२॥

(संधर्भ समग्र वाङ्मय - पान ४९७)

मा.फुले पुढे असे सांगून गेले की ,आमचा आम्हीच विचार केला पाहिजे', असे जे म्हटले आहे तो विचार आज आकार
घेऊ लागला आहे. स्त्रियांच्या बाबतही तसा विचार आज घडू लागला आहे.स्त्रिया स्वतंत्र विचारधारा घेऊन पुढे येत आहेत . या ज्या स्त्रिया  उभ्या राहिल्या आहेत त्या जीवनानुभवातून उभ्या राहिल्या  आहेत. 

कस्ट, उपासमार यातून अनुभव घेऊन त्या घडत आहेत  हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. पण खरे पाहता त्या विशिष्ट विचारप्रणाली किंव सूत्रबद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्या उभ्या नाहीत. त्यामुळेच त्या तुकड्यातुकड्यांत उभ्या
आहेत. स्वतंत्र विचारधारेच्या झाल्या आहेत .शोषित स्त्री-पुरुषांच्या समग्र जीवनानुभवाला गवसणी घालण्यापर्यंत त्यांची झेप अजून गेलेली नाही. 

तरी ही प्रक्रिया त्यांच्या अशा उभ्या राहण्यातूनच घडणार
आहे. अशा वेळी एक मुद्दा ध्यानात ठेवण्यासारखा आहे. त्यांनी प्रस्थापितांना सांगितले,ते असे :  'एकंदर सर्व मानवी  प्राण्यांत परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने
वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे.' हे बीज शोधून काढण्याशी साहित्याच्या क्षेत्रातील नव्या संस्कृतीचा विकास जोडलेला आहे.तो मानवतावादी असणे हिताचे आहे .आज ते दिसून येत आहे का ? तर उत्तर आहे नाही .

आजचे शिक्षण कसे आहे .(इथे नवीन शिक्षण धोरणाचा कांही  संबंध नाही याची समाज बांधव आणि वाचक वर्गाने दखल घ्यावी ).

मुळात नोकरी हे आजच्या शिक्षणाचे उद्दिष्ट आहे . शिक्षण हे आजच्या शिक्षणाचे प्रमुख लक्षण घटक  झाले
आहे.समाज अहित आणि व्यक्ती हीत  झाले आहे .ही परिस्थिती आजची नसून  जोतिबांच्या काळातसुद्धा जवळ जवळ अशीच परिस्थिती होती. हे सर्व जाणकार जाणून आहेत .डॉक्टर किंवा इंजिनिअर होणारे लोक फारच कमी असतात ? पण  धंदा करण्यासाठी चे  शिक्षण घेऊ  लागली आहेत . अशी आजच्या समाजातील तरुण वर्गाची  शिक्षणाची परिस्थिती आहे. 

उदा:कृषी विद्यापीठात शेतीशास्त्राचे शिक्षण घेणारी शेतकऱ्यांची पोरेसुद्धा प्रामुख्याने नोकरीच
करताना दिसतात.पण आपल्या शेतीत जाऊन संशोधन मुळीच करीत नाहीत .त्यांना स्वतःच्या शेतीत राबने हे मजुरीचे आणि कमी पणाचे वाटते .पूर्वी  इंग्रज राज्य चालविण्यासाठी नोकर तयार करणे हाच
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचा आशय दिसून येतो . खरे पाहिले तर आजच्या शिक्षणाचा आशय
यापेक्षा फार बदललेला नाही.नाही असे मला वाटते .
फुल्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, 'समाज परिवर्तनासाठी शिक्षण' हा होता .

आज तो मूळ मुद्दा बाजूला गेला आहे ,कारण मा.फुले ऐवजी  अनेक शिक्षण तज्ञ समाजात निर्मिली गेली आहेत. ज्ञानाविषयींची त्यांची कल्पना समाज परिवर्तनाचे मुख्य #साधन अशी होती.ही साधना आज पोट भरू आणि गल्ले भरू झाली आहे  'शेतक-्याचा आसूड' या आपल्या पुस्तकात त्यांनी याविषयी  स्पष्ट मांडणी केली आहे, 

ज्ञानाशिवाय मनुष्य प्राण्यात (Rational Animal)
व एकंदर सर्व प्राणीमात्रांमधे इतर स्वभावजन्य गुण सर्वसमान असतात , असा सर्वांचा  अनुभवास आहे . जसे पशुस आहार, निद्रा, मैथून, आपल्या बच्चांची जपणूक
करण, शत्रूपासून आपला बचाव करणे व पोट भरल्यावर डरकाळ्या  फोडून धडका घेण्याशिवाय दुसरे काही कळत नाही ? 

यास्तव त्यांच्याने सदरच्या व्यवहारांत कोणत्याही प्रकारची तिळमात्र सुधारणा करवत नसल्यामुळे त्यांच्या मूळच्या
स्थितीत कोणत्याच तऱ्हेची  उलटापालट होत नाही." (समग्र वाङ्मय, पान २५६)

तसे मानवात नाही ,माणसात रोज बदल होताना आपण पाहतो आहे ,पण तो बदल  कुशल आणि सत्य अपेक्षित आहे का ? हा चिंतनाचा गाभा आहे !

जोतिबांचे एकंदर लिखाण आणि व्यवहार यांच्याकडे पाहिले तर त्यांनी #ज्ञानाला किंवा #विद्येला सर्वात महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते हे खरेच. पण त्याचबरोबर
सामाजिक परिवर्तन, उत्पादन व्यवहारात समृद्धी आणणारे परिवर्तन अशा एकंदर परिवर्तनाशी ज्ञानाचे व विद्येचे अतूट नाते त्यांनी सतत जोडले आहे. 

भारतीय परिस्थितीत प्रत्यक्ष उत्पादन करण्यात भाग घेणाऱ्या शूद्रादी अतिशूद्र स्त्री-पुरुषांना ज्ञान देण्याच्या खास क्षेत्रात प्रवेश करायला बंदी होती .

शेतक-्याचा आसूड'मध्ये या आधारावर जोतिबांनी घेतलेली भूमिका लक्षणीय आहे, ती कशी ते पहा  "यास्तव शूद्र शेतकऱयांचे मुलांस विद्वान करण्याकरिता त्यांच्या जातीतील स्वत: पाभारी, कोळपी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करून, त्यांच्या शाळेत शेतकऱ्यांनी आपली मुले पाठविण्याविषयी कायदा करून, प्रथम काही वर्षे त्यांच्या परीक्षा घेण्याकरिता हलक्या इयत्ता करून, त्यांस व्राह्मणांच्या मुलांसारख्या पदव्या देण्याची लालूच किंवा अमिश  दाखवून त्यांच्या मुलीमुलांच्या लग्नात लग्नविधी करण्याविषयी परजातीने जुलूम करू नये, म्हणून बंदोंबस्त  केल्याशिवाय शृद्र शेतकऱ्यांत विद्या शिकण्याची गोडी उत्पन्न होणे नाही असं परखड मत असावं  हा पेचाचा मुद्दा होय .

भारतातील सर्व खेड्यापाड्यांतील धूर्त भटकुळण्यास अज्ञानी शेतकऱ्यांस आपापसात कज्जे करिता येणार नाहीत व तेणे करून शेतकऱ्यांस आमचे सरकारचे
मोठमोठाले अनिवार फायदे होऊन थोड्याच काळात हल्लीपेक्षा शेतकऱ्यास जास्ती शेतसारा देण्याची ताकद येऊन येथील निरर्थक पोलीस व न्यायखाती फुगली आहेत, त्यांचे मान सहज कमी करता येईल. "
(शेतकऱ्याचा आसूड  ).

अशी शिक्षण आणि नोकरीची तफावत याची प्रखर विचार मीमांसा करून गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या विद्वान मुलांनी एकंदर सर्व आपली शेते उत्तम प्रकारची वजवून  त्यांनी थोड्याथोड्या लोहारी,सुतारी कामात परीक्षा दिल्यास त्यास सरकारी खर्चने विलायतेतील शेतकीच्या शाळा पाहण्याकरिता
पाठवीत गेल्याने इकडील शेतकरी ताबडतोब आपल्या शेतकीची उत्तमप्रकाची वजवून सुधारणा करून सुखी होतील...(समग्र वाङ्मय, पाने - २६०,) पण तसे आज होत नाही ,हे खेदाची बाब आहे .

ही अशी एकूण शिक्षण प्रणाली मा.फुले यांना  अभिप्रेत होती .ती आज सर्वथा पोटभरू आणि बोकाळलेली दिसत आहे.यास पालक आणि सामाजिक धुरीण जवाबदार आहेत.

अश्या सत्य शोधक महामानव मा.फुले यांना मागे ओढून समाजात नवीन सत्य शोधक तयार होताना दिसत आहेत ,ज्यांना शिक्षण आणि समाज यांचे नाते कधी ही नव्हते .

आज हा लेख लिहीत असताना २ आगस्ट उजाडला आहे ,अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक होते ,हे सर्व जग आज तरी ओळखत आहे .

पण गेली महिनाभर प्रसार माध्यमांवर जे अण्णा भाऊंना बिरुदे लावण्याचा धडाका लावला आहे ,तो कितपत योग्ये आहे जाणकार मंडळीने आत्मचिंतन करावे .???

ती बिरुदे ... अशी आहेत ....

क्रांतिकारी ,डॉक्टरेट ,सत्यशोधक ,महामानव ! एवढी मला आज तागायत कळली आहेत ?

फक्त एक बिरुद लावणे बाकी आहे ,आणि ते म्हणजे #तथागत !

हे बिरुदे लावत असताना ,आणि #भारतरत्न दया हे मागणी चालू असताना ,कमीत कमी महाराष्ट्र शासनावर दबाव गट तयार  करून ,महाराष्ट्र भूषण तरी ओढून आणायला हवा होता ,ते काम झाले नाही .? 

शेवटी ,अश्या करण्याने समाजाचे प्रश सुटणार आहेत का ?

एका दुक्का सोडले तर समाज अजून ,शैक्षणिक ,सामाजिक आणि आर्थिक बाजूने एका  जागेवरून सरकलेला नाही याची नोंद घ्यावी ,आणि कारणे शोधून सामाजिक कार्य करीत असताना ,समाजाचे उत्थान करावे .

आता  कांही लिहण्यासारखे नाही .
प्रत्येनं समाज सुधारक आपल्या जागेवर योग्ये आहे ,कोणाचे बिरुदे लावून कोणी महामानव होत नाही ,लोक जागर आणि त्यांच्या कार्याची महती यावर तो महामानव होतो  याची दखल घ्यावी .

#नोंद : या लेखाशी आणि माझ्या कार्यालयीन कामाशी काडी मात्र संबंध नसून ,हे माझे स्वतंत्र विचार आहेत ,याची नोंद घ्यावी .

प्रा. बा.र. शिंदे ,नेरुळ |९७०२ १५८ ५६४

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...