Showing posts with label जातक कथा. Show all posts
Showing posts with label जातक कथा. Show all posts

Saturday, May 4, 2024

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या




जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध जीव आपले प्राण गमावून बसतात, काहीही चुक नसताना. ज्यांमधे क्षमता व ऐपत असते ते या अग्निला घाबरून पळ काढुन आपला जीव वाचवतात पण.....
काही निरपराध जीव ज्यांना पाय असुनही चालता येत नाही. पंख असुनही उडता येत नाही, असे जीव मृत्युला उघड्या डोळ्यांनी पाहुन मृत्युचा असहाय होऊन स्विकार करतात.....
जिवण व मृत्यु यांमध्ये जे काही क्षणांचे अंतर असते, जे लोक हे क्षण अनुभवुन या परिस्थती मधुन तरुन किंवा मरुन जातात त्यांची मानसिक परीस्थिती शब्दांत सांगणे कठीणच नाही तर अशक्य आहे.
खुपच मोठें संकट आल्यावर परकेच काय तर आपले जीवलग सुद्धा आपल्याला सोडून जातात. ती वेळच वाईट असते. अशीच एक घटना आहे वट्टपोतक बोधिसत्व यांची, जंगलात भिषण अग्नि प्रज्वलीत होते व वट्टपोतक यांचें आई वडील परिस्थितीची गंभीरता पाहून आपल्याच मुलास सोडून जाण्याचा दुर्दैवी निर्णय घेतात..... नाईलाजाने.
#वट्टपोतक_जातक
वट्टपोतक चर्या ही चरियापिटक ग्रंथामधील बोधिसत्व वट्टपोतक यांची सत्य पारमितावर आधारित जिवण चर्या आहे.
वट्टपोतक म्हणतात की
जेव्हा मी मगध देशात पंख न फुटलेला तरुण मांसाचा गोळा असा घरट्यामध्येच राहणारा लहान लावा पक्षाचे पिल्लू होतो, तेव्हा चोचीने दाणे आणुन माझी आई माझे पालन पोषण करीत होती. मी तिच्या स्पर्शाच्या आधाराने जगत होतो, माझ्यामध्ये शारीरिक बळ नव्हते.
दरवषी उन्हाळ्यात अरण्यामध्ये वणवा पेटत असे व तो आपल्या मार्गातील सर्वांची काळीराख करणारा अग्नी दरवर्षी आमच्या घरट्यांकडे येत असे. 'धमधम’ असा मोठा आवाज करीत नेहमीप्रमाणे शिखारूपी ज्वाला धारण करणारा तो अग्नी, वाटेतील सर्व वस्तू क्रमाक्रमाने जाळत आमच्या घरट्यांपर्यंत आला. तेव्हा अग्नी वेगाच्या भयाने घाबरलेले व त्रस्त झालेले माझे आई-वडील मला घरट्यात एकटं सोडून उडून गेले व त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. मी पाय व पंख फडफडले परंतु माझ्यात शारीरिक बळ नव्हते. त्यामुळे मी तेथे अगतिक होऊन असा विचार केला की, 
भयभीत, त्रस्त व थरकाप झालेला मी ज्यांच्याकडे आधारासाठी जावे ते माझे आई वडील मला संकटात एकट सोडून निघून गेले, मी एकटा आता काय करावे?
पण 
अजुनही जगात शीलगुण, सत्य, पावित्र्य व करुणा आहे याच सत्याच्या सामर्थ्याने मी आता उत्तम सत्यवचन क्रिया करीन.
 धम्म सामर्थ्याचा विचार करून व पुर्वकाळातील बुद्धांचे स्मरण करून सत्याच्या बळाच्या सहायाने मी सत्यवचन क्रिया केली.
"माझे पंख आहेत, पण ते उडण्यायोग्य नाहीत, माझे पाय असुनही मी चालू शकत नाही. मला आई-वडील संकटात एकटं सोडून गेले आहेत. आई वडीलही आता माझी मदत करु शकत नाही. या सत्य वचनाच्या सामर्थ्याने हे अग्नी तु परत जा."
मी सत्यवचन क्रिया केल्याबरोबर, महाप्रज्वलित झालेला अग्नी माझ्यापाशी येऊन पोहोचल्यावर सुद्धा नष्ट होणाऱ्या अग्नीप्रमाणे, सळसळ करीत भूमी मागे जाऊन नाहीसा झाला. सत्यवचना मध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. ही माझी सत्यपारमिता होती.
संदर्भ....
चरीयापिटक, खुद्दक निकाय

(राहुल खरे ,यांच्या fb वॉल वरुण साभार )

पळस आणि पांगारा

  पळस आणि पांगारा  पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट ( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो )   ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्प...