Monday, August 2, 2021

१०० स्मृतिशताब्दी: अण्णा भाऊ साठे .

||अण्णा भाऊंच्या १०० स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने ||

*(हा माझा लेख पुनः पोस्ट करीत आहे ... )*

.... प्रा बालाजी र शिंदे ,विशेष शिक्षा .

मतामतांचा गलबला ॥ कोणी पुसेना कोणाला ।।
जो जे मती सांपडला ।। तयासी तोची थोर ।।
असत्याचा अभिमान ।। तेणें पाविजे पतन ।।
म्हणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती ।।
.... महात्मा जोतिबा फुले.

मा जोतिबा फुले यांनी १८७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ओळी आहेत. इतक्या वर्षानंतर
आजही या ओळी परिस्थितीविषयी अगदी समर्पक भाष्य करताना जाणवतात.

जोतिबांच्या कार्याची आणि विचारांची स्मृती २०० वर्षानंतरसुद्धा का जागवायची हे अत्यंत महत्वाचे आहे .
याचे उत्तरच जणू काही या ओळी देत आहेत. एकंदर समाजात बहुजन असलेल्या
वर्ग, जाती ,जातीतील पोट जाती आणि स्त्रिया  यांच्या दृष्टीने हा #जागर आज आवश्यक आहे. म्हणून मी ऊहापोह केला आहे .

बहुजनाच्या #मुक्तिसंघर्षाचा धसका ज्यांच्या मनात आहे त्यांना आजही जोतिबांच्या विचारांची
भीती वाटत आहे. या भीती पोटी म्हणूनच असले लोक त्यांच्या विचारसंपदेवर हल्ला करताना दिसत आहेत. 

आज असेही काही लोक आहेत की, ज्यांना जोतिबांच्या विचारातील  क्रांतिकारकत्व लपवून ठेवून त्यांना 'देव' बनवायचे मानसुभे चालू आहेत   या चलाख लोकांना
वाटते की, जोतिबांच्या स्मृतीचे ढोल त्यांनी जास्तीत जास्त जोराने वाजविले, जयजयकाराचा जास्तीत जास्त कल्लोळ केला आणि प्रचंड गुलाल उधळला तर बहुजन शोषित, दलित, स्त्रिया इतर कसलाही विचार न करता त्यांनाच जोतिबांचा वारसदार मानतील!

पण ते आज  होताना दिसत नाही .करण त्यांचा हेतू हा समाज प्रबोधन नसून बहुजन ,अशिक्षित लोकांना लुटणे हाच होय .

प्रत्येक समाजात डावे उजवे ठरलेले असतात .डावे का निर्माण होतात ,ते नेहमी सत्य शोधण्याच्या मार्गावर असतात .आज ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मागे सारून मार्क्स ला पुढे ढकलत असताना पाहतो आहोत ? 

मी ना डाव्या ना उजव्या विचार सारणीचा असून ,मी मा. फुले #सत्यशोधक ,डॉ बाबासाहेब यांच्या #समता #चळवळ आणि आणि #बुद्ध धम्म #प्रचारक आणि #प्रसारक आहे .

मला कोणताही राजकीय आदर, मान सन्मानची  किंवा कुबड्याची गरज नसून ,स्वतंत्र उपरोक्त #त्रिसदसिय विचारांचा व्यक्ती आहे .हेच विचार कायम तारणहार असणार आहेत ,हे ही मी जाणून आहे .

जिथे आसक्ती चे बांध असतात ते समाजकरण ,राजकारण कायम तग धरीत नाही .हे बुद्ध तत्वज्ञान होय.

आज लोकांत चलती आहे , डॉ बाबासाहेब यांना टॅग करून जसे 'आंबेडकर चळवळीतील ..... अमका धमाका !'कार्यक्रम करीत असतात .

उदा : हॉटेल  व्यवसाय किंवा दुकानदार लोकांचे देता येईल ,साई दरबार ,साई कॅफे ,साई किराणा स्टोर .यांचे साई चे कांही देणे घेने नाही ,लोकांची दिशा भूल करून गिराईक आकर्षण असते .

तीच गत डॉ आंबेडकर चळवळीची आहे .आंबेडकर चळवळ बाजूला असते ,त्यांची चळवळ आणि वळवळ मात्र कायम चालू असते ,यात ९९% स्व घोषित डॉ ,प्रा आणि नेते आणि समाज सुधारक असतात ,त्यांना गल्ली बाहेर कोणी ओळखत नाही . सामाजिक हित यांचा उद्देश कधीच नसतो .(यांच्या सामाजिक कार्याला  अस्तित्वाची लढाई असे ही म्हणता येईल ).

समाज परिवर्तनासाठी शिक्षण यावर समग्र वाङ्मयात मा.फुले यांनी सम्यक विचार धारा कशी मांडली  होती या खालील चार ओळीत  दिसून येईल .

मानवपदाची जरा लाज धरा ।। विद्वान ती करा । मुलीमुले ।॥३१॥
गिर्वाणी शिकता कळेल तुम्हाला ।॥ आठवाल बोला ॥ माझ्या तुम्ही ॥४०॥
ऐकू दिले नाही एकहि शब्दाला ।। वेदबखरीला ।। लपविले ॥४१॥
द्विजकूट तुम्ही आणावे मैदानी /। आली ही पर्वणी ॥ जोति सांगे ।॥४२॥

(संधर्भ समग्र वाङ्मय - पान ४९७)

मा.फुले पुढे असे सांगून गेले की ,आमचा आम्हीच विचार केला पाहिजे', असे जे म्हटले आहे तो विचार आज आकार
घेऊ लागला आहे. स्त्रियांच्या बाबतही तसा विचार आज घडू लागला आहे.स्त्रिया स्वतंत्र विचारधारा घेऊन पुढे येत आहेत . या ज्या स्त्रिया  उभ्या राहिल्या आहेत त्या जीवनानुभवातून उभ्या राहिल्या  आहेत. 

कस्ट, उपासमार यातून अनुभव घेऊन त्या घडत आहेत  हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. पण खरे पाहता त्या विशिष्ट विचारप्रणाली किंव सूत्रबद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्या उभ्या नाहीत. त्यामुळेच त्या तुकड्यातुकड्यांत उभ्या
आहेत. स्वतंत्र विचारधारेच्या झाल्या आहेत .शोषित स्त्री-पुरुषांच्या समग्र जीवनानुभवाला गवसणी घालण्यापर्यंत त्यांची झेप अजून गेलेली नाही. 

तरी ही प्रक्रिया त्यांच्या अशा उभ्या राहण्यातूनच घडणार
आहे. अशा वेळी एक मुद्दा ध्यानात ठेवण्यासारखा आहे. त्यांनी प्रस्थापितांना सांगितले,ते असे :  'एकंदर सर्व मानवी  प्राण्यांत परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने
वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे.' हे बीज शोधून काढण्याशी साहित्याच्या क्षेत्रातील नव्या संस्कृतीचा विकास जोडलेला आहे.तो मानवतावादी असणे हिताचे आहे .आज ते दिसून येत आहे का ? तर उत्तर आहे नाही .

आजचे शिक्षण कसे आहे .(इथे नवीन शिक्षण धोरणाचा कांही  संबंध नाही याची समाज बांधव आणि वाचक वर्गाने दखल घ्यावी ).

मुळात नोकरी हे आजच्या शिक्षणाचे उद्दिष्ट आहे . शिक्षण हे आजच्या शिक्षणाचे प्रमुख लक्षण घटक  झाले
आहे.समाज अहित आणि व्यक्ती हीत  झाले आहे .ही परिस्थिती आजची नसून  जोतिबांच्या काळातसुद्धा जवळ जवळ अशीच परिस्थिती होती. हे सर्व जाणकार जाणून आहेत .डॉक्टर किंवा इंजिनिअर होणारे लोक फारच कमी असतात ? पण  धंदा करण्यासाठी चे  शिक्षण घेऊ  लागली आहेत . अशी आजच्या समाजातील तरुण वर्गाची  शिक्षणाची परिस्थिती आहे. 

उदा:कृषी विद्यापीठात शेतीशास्त्राचे शिक्षण घेणारी शेतकऱ्यांची पोरेसुद्धा प्रामुख्याने नोकरीच
करताना दिसतात.पण आपल्या शेतीत जाऊन संशोधन मुळीच करीत नाहीत .त्यांना स्वतःच्या शेतीत राबने हे मजुरीचे आणि कमी पणाचे वाटते .पूर्वी  इंग्रज राज्य चालविण्यासाठी नोकर तयार करणे हाच
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचा आशय दिसून येतो . खरे पाहिले तर आजच्या शिक्षणाचा आशय
यापेक्षा फार बदललेला नाही.नाही असे मला वाटते .
फुल्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, 'समाज परिवर्तनासाठी शिक्षण' हा होता .

आज तो मूळ मुद्दा बाजूला गेला आहे ,कारण मा.फुले ऐवजी  अनेक शिक्षण तज्ञ समाजात निर्मिली गेली आहेत. ज्ञानाविषयींची त्यांची कल्पना समाज परिवर्तनाचे मुख्य #साधन अशी होती.ही साधना आज पोट भरू आणि गल्ले भरू झाली आहे  'शेतक-्याचा आसूड' या आपल्या पुस्तकात त्यांनी याविषयी  स्पष्ट मांडणी केली आहे, 

ज्ञानाशिवाय मनुष्य प्राण्यात (Rational Animal)
व एकंदर सर्व प्राणीमात्रांमधे इतर स्वभावजन्य गुण सर्वसमान असतात , असा सर्वांचा  अनुभवास आहे . जसे पशुस आहार, निद्रा, मैथून, आपल्या बच्चांची जपणूक
करण, शत्रूपासून आपला बचाव करणे व पोट भरल्यावर डरकाळ्या  फोडून धडका घेण्याशिवाय दुसरे काही कळत नाही ? 

यास्तव त्यांच्याने सदरच्या व्यवहारांत कोणत्याही प्रकारची तिळमात्र सुधारणा करवत नसल्यामुळे त्यांच्या मूळच्या
स्थितीत कोणत्याच तऱ्हेची  उलटापालट होत नाही." (समग्र वाङ्मय, पान २५६)

तसे मानवात नाही ,माणसात रोज बदल होताना आपण पाहतो आहे ,पण तो बदल  कुशल आणि सत्य अपेक्षित आहे का ? हा चिंतनाचा गाभा आहे !

जोतिबांचे एकंदर लिखाण आणि व्यवहार यांच्याकडे पाहिले तर त्यांनी #ज्ञानाला किंवा #विद्येला सर्वात महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते हे खरेच. पण त्याचबरोबर
सामाजिक परिवर्तन, उत्पादन व्यवहारात समृद्धी आणणारे परिवर्तन अशा एकंदर परिवर्तनाशी ज्ञानाचे व विद्येचे अतूट नाते त्यांनी सतत जोडले आहे. 

भारतीय परिस्थितीत प्रत्यक्ष उत्पादन करण्यात भाग घेणाऱ्या शूद्रादी अतिशूद्र स्त्री-पुरुषांना ज्ञान देण्याच्या खास क्षेत्रात प्रवेश करायला बंदी होती .

शेतक-्याचा आसूड'मध्ये या आधारावर जोतिबांनी घेतलेली भूमिका लक्षणीय आहे, ती कशी ते पहा  "यास्तव शूद्र शेतकऱयांचे मुलांस विद्वान करण्याकरिता त्यांच्या जातीतील स्वत: पाभारी, कोळपी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करून, त्यांच्या शाळेत शेतकऱ्यांनी आपली मुले पाठविण्याविषयी कायदा करून, प्रथम काही वर्षे त्यांच्या परीक्षा घेण्याकरिता हलक्या इयत्ता करून, त्यांस व्राह्मणांच्या मुलांसारख्या पदव्या देण्याची लालूच किंवा अमिश  दाखवून त्यांच्या मुलीमुलांच्या लग्नात लग्नविधी करण्याविषयी परजातीने जुलूम करू नये, म्हणून बंदोंबस्त  केल्याशिवाय शृद्र शेतकऱ्यांत विद्या शिकण्याची गोडी उत्पन्न होणे नाही असं परखड मत असावं  हा पेचाचा मुद्दा होय .

भारतातील सर्व खेड्यापाड्यांतील धूर्त भटकुळण्यास अज्ञानी शेतकऱ्यांस आपापसात कज्जे करिता येणार नाहीत व तेणे करून शेतकऱ्यांस आमचे सरकारचे
मोठमोठाले अनिवार फायदे होऊन थोड्याच काळात हल्लीपेक्षा शेतकऱ्यास जास्ती शेतसारा देण्याची ताकद येऊन येथील निरर्थक पोलीस व न्यायखाती फुगली आहेत, त्यांचे मान सहज कमी करता येईल. "
(शेतकऱ्याचा आसूड  ).

अशी शिक्षण आणि नोकरीची तफावत याची प्रखर विचार मीमांसा करून गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या विद्वान मुलांनी एकंदर सर्व आपली शेते उत्तम प्रकारची वजवून  त्यांनी थोड्याथोड्या लोहारी,सुतारी कामात परीक्षा दिल्यास त्यास सरकारी खर्चने विलायतेतील शेतकीच्या शाळा पाहण्याकरिता
पाठवीत गेल्याने इकडील शेतकरी ताबडतोब आपल्या शेतकीची उत्तमप्रकाची वजवून सुधारणा करून सुखी होतील...(समग्र वाङ्मय, पाने - २६०,) पण तसे आज होत नाही ,हे खेदाची बाब आहे .

ही अशी एकूण शिक्षण प्रणाली मा.फुले यांना  अभिप्रेत होती .ती आज सर्वथा पोटभरू आणि बोकाळलेली दिसत आहे.यास पालक आणि सामाजिक धुरीण जवाबदार आहेत.

अश्या सत्य शोधक महामानव मा.फुले यांना मागे ओढून समाजात नवीन सत्य शोधक तयार होताना दिसत आहेत ,ज्यांना शिक्षण आणि समाज यांचे नाते कधी ही नव्हते .

आज हा लेख लिहीत असताना २ आगस्ट उजाडला आहे ,अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक होते ,हे सर्व जग आज तरी ओळखत आहे .

पण गेली महिनाभर प्रसार माध्यमांवर जे अण्णा भाऊंना बिरुदे लावण्याचा धडाका लावला आहे ,तो कितपत योग्ये आहे जाणकार मंडळीने आत्मचिंतन करावे .???

ती बिरुदे ... अशी आहेत ....

क्रांतिकारी ,डॉक्टरेट ,सत्यशोधक ,महामानव ! एवढी मला आज तागायत कळली आहेत ?

फक्त एक बिरुद लावणे बाकी आहे ,आणि ते म्हणजे #तथागत !

हे बिरुदे लावत असताना ,आणि #भारतरत्न दया हे मागणी चालू असताना ,कमीत कमी महाराष्ट्र शासनावर दबाव गट तयार  करून ,महाराष्ट्र भूषण तरी ओढून आणायला हवा होता ,ते काम झाले नाही .? 

शेवटी ,अश्या करण्याने समाजाचे प्रश सुटणार आहेत का ?

एका दुक्का सोडले तर समाज अजून ,शैक्षणिक ,सामाजिक आणि आर्थिक बाजूने एका  जागेवरून सरकलेला नाही याची नोंद घ्यावी ,आणि कारणे शोधून सामाजिक कार्य करीत असताना ,समाजाचे उत्थान करावे .

आता  कांही लिहण्यासारखे नाही .
प्रत्येनं समाज सुधारक आपल्या जागेवर योग्ये आहे ,कोणाचे बिरुदे लावून कोणी महामानव होत नाही ,लोक जागर आणि त्यांच्या कार्याची महती यावर तो महामानव होतो  याची दखल घ्यावी .

#नोंद : या लेखाशी आणि माझ्या कार्यालयीन कामाशी काडी मात्र संबंध नसून ,हे माझे स्वतंत्र विचार आहेत ,याची नोंद घ्यावी .

प्रा. बा.र. शिंदे ,नेरुळ |९७०२ १५८ ५६४

No comments:

Post a Comment

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...