Friday, May 29, 2020

बुद्ध साहित्य का वाचावे ?

13May2020

बुद्ध साहित्य का वाचावे ?/बीआरantWork

भगवान बुद्धाने उपदेशिलेला धम्म त्यांनी नव्याने शोधून कढला नसून ती तत्वे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीस जाणून घेण्याजोगी होती असा बौद्ध परमपरेचा विकास आहे.

........... #दिघनिकाय भाग १ ( अनुवादक : वसंत धावरे )

बुद्ध साहिती हे भूमिहीन शेतमाजुरा सारख्या कनींगी प्रमाणे आहे . हे साहित्ये जो  वाचेल तो बुद्धिवंत ,विचारवंत आणि सुज्ञ होईल .

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात ( मराठवाड्यात ) ज्वारी साठवून ठेवण्यासाठी एक कारव्या पासून किंवा ओल्या तुराट्या पासून एक #कनिंग तयार करीत असत त्या गोलाकार कनिंगला शेणाने लेप देऊन उन्हात सुकून झाल्यावर त्यात कुटुंबाला वर्षभर पुरेल येवढी ज्वारी भरून ठेवत .कनिंगेला एक समांतर छोटे छिद्र ठेवलेले असायचे आणि त्यात छिद्र बंद करता येईल असे वस्त्र कोंबून ठेवत . गरजे प्रमाणे लागेल तेवढी ज्वारी काढून घेत असत.यातील धान्ये वर्षानी वर्ष खराब होत न्हवते की #वाळवी लागत न्हवती . यात एक टन ज्वारी बसेलअसे मोठ मोठ्या डेरेदार आणि गोलाकार कनिंग तयार करीत होते . उदा:दाखल सांगायचे झाले तर आपल्या घरातील पाणी पिण्याची टाकी असे गृहीत धरू या.

 मराठवाड्यात ही धान्ये किंवा ज्वारी साठवण्याची प्रथा येंशी च्या दशकापर्येंत अस्तीत्वात असावी ? कारण या भागात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यांची माथी मारलेले . म्हणून त्या वेळी अधिक महत्व असावे .

      बुद्धांचे साहित्याचे तसेच आहे .राजा अशोकाच्या काळात ई सन ३ ऱ्या शतकात पहिली संगीती पर्येंत हे टिपिटक अश्याच स्वरुपात तीन पेटाऱ्यात बंदिस्त होते ,यात #अभिद्धम्मपिटक ,#विनयपिटक आणि #सुत्त्पिटकाचा समावेश होतो .

थोडक्यात एका बाजूला जगभरातील धार्मिक ग्रंथ आणि दुसर्या्  बाजूला बौद्ध साहित्ये ठेवली तर बुद्ध साहित्याची तुलना होऊ  शकत नाही ,म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध साहित्यांचा बारकाईने आणि सखोल अभ्यास करून ,#धम्मप्रवेश केला होता, त्या साहित्याचे आणखी एक महत्व असे आहे की , हे साहित्य एकतर कोण्या  अवतारी ऋषि ची देन नाही ,तर एका महमानवाचे सूत्रबद्ध आणि मानवी कल्याण आणि समतेचे साहित्य आहे . म्हणून बौद्ध साहित्य एक एक  वाचून बुद्धाने सांगितलेल्या समतेच्या शिकवणीला शरणजावे ,#सत्ये जाजून आपला ‘#विवेक आणि  ‘#चेतना सतत जागृत ठेवाव्यात.

प्रा.बालाजी शिंदे.

9702158564

balajishinde65@gmail.com

 


Saturday, January 5, 2019

मुक्ता साळवे एक पंडिता !


मुक्ता साळवे एक पंडिता !
प्रो.बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६
-----------------------------------------------------------------------------------------------------------
आज  मुक्ता साळवेताई  चा जन्म दिवस ,१५ फेब्रुवारी १८५५ ला तिने एक निबंध लिहला आणि बाजीरावाचे डोके ठिकाणावर आणले .याच दरम्यान तिने बाजीरावाची मांगमहार समाजाला मिळालेली वागणूक आणि “इंग्रज सरकार आल्यावर झालेला बदल” हे  तिने लिहलेल्या  उतारया वरून  लक्षात येते  ,म्हणून ती मांगमहार समाजातील एक विद्वान पंडिता ठरली आणि तिचा लेखनिबंध भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी संपादित केलेल्या “ज्ञानोदयाची पहिली शंभर वर्ष ” (भाग दुसरा १८६१ पर्येंत ) या पुस्तकात छापला होता . (संधर्भ :स्त्रियांचे मराठीतील निबंध लेखन ,संपादन विधुत भागवत ).
“शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे गोखले ,आपटे ,त्रीमकजी अंधळा पनसरा,काळ ,बोहार इत्यादी हे निरर्थक मांगमहारावर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते . व गरोदर बायकस  देहांत शासने करीत होती ती बंद झाली .आणि पुणे प्रांती मांगमहारांचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांचं राज्यात अशी अंधा धुंदी होती कि ,ज्याच्या मनास वाटेल त्याने मांगामहारावर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते ती बंद झाली .(किल्याच्या )पायात घालण्याची बंदी बंद झाली ....जुलमी निराग बंद केली आमचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली ,आणि बाजारात फिरण्याची मोकळीक हि मिळाली ” (पंडिता मुक्ताताई साळवे -१५-०२-१८५५ )
पुढे पंडिता मुक्ताताई साळवे लिहितात , “रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील ” म्हणून त्या पुढे म्हणतात आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही यास उदाहरण ,जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभ्या करण्याजोगे वाईट कर्म करितात मग तुम्ही तर मांगमाहारच आहात .
हा शेवट खूप विदारक आहे आमचे लोक शिकून सवरून वाईट चाली रितीत अजून गुंतून आहेत अशी त्यांची खंत आहे .
पितामह राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८४८ ला शनिवार वाड्यात मुलींची  पहिली शाळा सुरु केली,त्याच शाळेत पंडिता मुक्ताताई साळवे सावित्रीमाई फुले यांच्या हाताखाली शिकल्या आणि अवघ्या सात वर्षात वयाच्या १४ वर्षी हा निबंध लिहला आणि मांगमहार यांना बाळकडू दिले .
टीप : मूळ निबंध  ‘आम्ही हि इतिहास घडवला’( आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा सहभाग ) संपादक: उर्मिला पवार /मीनाक्षी मून ,सुगावा प्रकाशन ,पुणे ,ऑक्टोबर १९८९ ,यांनी छापला होता ).


Thursday, September 6, 2018

एम.करुणानिधी हे पेरियार आणि अण्णादुराई यांच्या मुशीत घडलेले क्रांतिकारक व्यक्तिमत्व.



एम.करुणानिधी हे पेरियार आणि अण्णादुराई यांच्या मुशीत घडलेले क्रांतिकारक व्यक्तिमत्व.

बी. आर. शिंदे ,नेरूळ -७०६

“महिला साठी कायदे आणि विकास करण्यात ते मागे नाही राहिले .महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के जागा राखीव ठेवणारे व ते मिळउन देणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य गणले गेले.”

जमीनधारणा कायद्यात बदल करून कमाल जमीनधारणे कायदा तयार केला पूर्वीची जुनी जमीन धारणा असलेली कमाल मर्यादा १५ एकर ची केली .हि मर्यादा घालणारे व हीमर्यादा मंदिरांना लागू करणारे तामिळनाडू हे भारतातील  पहिले आणि एकमेव राज्य ठरले



सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमीन भूमिहीनांना वाटप करतांना मागासजातींना प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्णय क्रांतिकारी स्वरूपाचा होता.


पेरियार आणि अण्णादुराई यांच्या मुशीत घडलेले क्रांतिकारक व्यक्तिमत्व सामजिक व आर्थिक न्यायाचा प्रखर पुरस्कर्ता म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व .बाल वयात आलेलं जाती व्यवस्थेचे बंधन आणि मनावर झालेले वाईट परिणाम या मधून ते बाहेर आले आणि त्या बाबींचा परिणाम इतर लोकांवर होऊ नये म्हणून ,ब्राह्मण विरोधी चळवळीचा धागा होऊन गेले ते कायमचे .हे त्यांच्या त्यांच्या लिखाणातून आग ओखताना पाहिलं आहे स्वतः लेखन कौशल्य असल्या कारणाने ते आपल्या मुख पत्र “मुरासोली” त लिहित असत .याच  लेखन कार्यामुळे ते सुप्रसिध् झाले होते .मित्र मंडळी साठी आपले रोजचे विचार पोहचावे म्हणून ते “उडणपिरप्पे” हा स्थंभ लिहून आपले विचार मांडीत असत .आणि ब्राह्मणी विचार हाणून पाडीत असत.याच काळात ते संपूर्ण तमिळ बहुजन जनतेचा आधार होऊन गेले होते.

विचाराने ते विवेकवादी व आचाराने राज्य समाजवादी होते.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार ,त्यांनी आपल्या एका मुलांचे नाव स्टालिन ठेवले व दुसऱ्या मुलाचे नाव अळगिरी (हे द्रविडचळवळीतील प्रखर देव-धर्म विरोधी व ब्राह्मणविरोधी नेते होते.) त्यांनी शिवाजी गणेशन या प्रसिद्ध अभिनेत्याला देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले या कारणावरून द्रमुक पक्षातून हाकलून दिले होते.कारण ते एक विचारी आणि निश्चयी होते . त्यांच्या मनावर विवेकवादी व समाजवादी विचारांचा प्रभाव होता हे यातून जाणवते. करुणानिधीनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून निर्विवाद सत्ता हातात घेतल्यानंतर राज्यात सामजिक व आर्थिकन्याय प्रस्थापित करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या . यात जमीनधारणा कायद्यात बदल करून कमाल जमीनधारणे कायदा तयार केला पूर्वीची जुनी जमीन धारणा असलेली कमाल मर्यादा १५ एकर ची केली .
अशी मर्यादा घालणारे व ही मर्यादा मंदिरांना लागू करणारे तामिळनाडू हे भारतातील  पहिले आणि एकमेव राज्य ठरले.सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमीन भूमिहीनांना वाटप करतांना मागासजातींना प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्णय क्रांतिकारी स्वरूपाचा होता.याशिवाय सर्व जातींतील लोकांना मंदिरातील पुजारी बनण्याचा कायदा केला जेणे करून जाती व्यवस्था हि समूळ नस्थ करता येईल हा त्या मागील हेतू होता ,महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदा, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण २५ टक्क्यांवरून ३१ टक्के पर्यंतवाढविण्याचा निर्णय, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय, अतिमागास जाती हा स्वतंत्रप्रवर्ग तयार यांच्या कळत करण्यात आला .स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात २० टक्के आरक्षणदेण्याची तरतूद असे अनेक क्रांतिकारी निर्णय त्या शिक्षण सम्राट ने  घेतले होते आणि समाज ,राज्य आणि देश विकासचा पाया रचला होता .या सर्व जातीधार्माला सुविधा देणारे तामिळनाडू राज्य भारतात आघाडीवर आले होते . राज्य सरकारतर्फे त्यांनी प्रत्येक जातींची गणना करून लोकसंख्येच्या प्रवर्गानुसार शिक्षण,नोकऱ्याची संधी निर्माण केली , शेती तसेच रोजगाराच्या संधीचेवाटप करण्याचा क्रांतिकारी निर्णय करुणानिधी यांनी घेतला व  आपल्याप्रदेशात लागू केला.एक कमालीचा कायदा करून एकूणच  अनुसूचित जाती/जमातीं व तथाकथित सवर्ण जातीयांच्यासाठी मोफत घरे बांधून देण्याची 'समदुवापुरम' नावाची एक नाविन्यपूर्ण योजना त्यांनी सुरु केली. या योजनेनुसार दलित,मागास आणि सवर्ण यांना एकमेकांच्या शेजारी संयुक्त भिंती ठेऊन घरे बांधून देण्यात येऊ लागली.
जाती निर्मुलनात ते मागे राहिले नाहीत .जातीभेद नष्ट करण्याचा हा एक अत्यंत व्यावहारिक आणि क्रांतिकारक  बद्दल करून घेतला यात शंकाच नाही. करुणानिधी यांनी केवळ जाती आधारित सामाजिक सुधारणाकेल्या असे नाही. सर्व जातींमधील गरीब आणि दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूरव्हावे, त्यांना उत्तम दर्जाचे  शिक्षण मिळावे ,उत्तम आणि मोफत आरोग्य इत्यादी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले .एवढ्या वर न थांबता  त्यांनी मोफत शिक्षण व मोफत आरोग्य विमा योजना सुरु केली होती .
शिदा वाटपात पण त्यांनी क्रांतिकारी बदल केले होते .यात  मोफत अन्नदान योजना, रुपये किलो दराने धान्यवाटप योजना, शेतकर्यासाठी शेतीपंपासाठी लागणारी वीज मोफत देण्याची योजना,अश्या अनेक योजना राबल्या आणि त्या येश्स्वी करू दाखवल्या .रस्त्या रस्त्यातून  हातरिक्षा ओढण्याची अमानुष प्रथा बंद केली जी आदिम काळापासून तामिळनाडू राज्यात चालू होती .या परंपरा बंद करून नाही थांबले त्यांना पर्यायी नोकरी व काम धंद्याची सोय करून दिली होती.पूर्वी शाळेत धार्मिक प्रथानेला खूप राज्श्राय होता तो मोडीत काढून  शाळेतील धार्मिकप्रार्थना बंद केल्या अनेक थरातून विरोध झाला पण ते आपल्या विचारापासून तसूभर हि मागे हटले नाहीत.”कारण धर्म कांही नवे शिकवीत नाही अशी त्यांची धारणा होती.”असे अनेक धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय त्यांनी आपल्या एकूण १९ वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतले व त्याची कठोर अमलबजावणी हि केली.
महिला साठी कायदे आणि विकास करण्यात ते मागे नाही राहिले.महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के जागा राखीव ठेवणारे व ते मिळउन देणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य गणले गेले हा संपूर्ण मान करुणानिधी यांच्या दूर दृस्ठी कार्यास जातो .
तामिळनाडू वगळता देशाच्या अन्य कोणत्याही राज्यातील कोणाही नेत्यांमध्ये किंवा मुख्यमंत्री पदी असलेल्या व्यक्ती मध्ये ते धाडस न्हवते असे क्रांतिकारी निर्णय घेण्याचे व ते लागू करण्याचे धाडस अद्यापही नाही यातच करुणानिधींचे क्रांतीकारकत्व आणि विकस पर्व व्यक्तीमत्व  दिसून येते.

Posted on 06/09/2018

Tuesday, September 4, 2018

आज शिक्षकदिन : ९ सप्टेम्बर


आज शिक्षकदिन : ९ सप्टेम्बर
बालाजी  शिंदे ,नेरुल -७०६

पहला टीचर डे  (जिसे आज शिक्षक दिवस कहते है ) ५ सप्तेबर १९६२ को मनाया गया था । आज उसे पुरे ४६ साल हुए है। सही मायने में जब पुरे भारत में मुस्लिम और  बहुजन को पढाई और लिखाई में मना था ,और कमर के ऊपर नर नारी को वस्त्र पह्नेको मज्जाव था। तब जाके इन अछुत और  पिछले जाती वर्ग के लिए  एक मसीहा सामने आया और उन्होंने आपना घर ,परिवार इन लोगोंके शिक्षा और पढाई के  लिए नौछावर कर दिया था ,वे महानाव थे “ महात्मा ज्योतिराव जी फुले”।
इन्होने ,फातिमा ,मुक्ता सालवे  जैसे प्रथम महिला  विद्यार्थी को पढाया और भारत के नारी के लिए शिक्षा के द्वार खुले किये ,इनके साथ उनकी अर्धांगिनी माता सावित्री माई जी का बहुत ही मूल्यवान योगदान है रहा। नारी उत्थान के लिए ।
हम आज जिनका  टीचर डे ना कहकर शिक्षक दिन मनाने  जारहे है  वे है “महात्मा ज्योतिबा फुले” के शिक्षक दिन के उपलक्ष पे सभी भारत के बहुजन को सदर नमन।
अब हम उनका ही शिक्षक दिन किंव मनाये उनकी कुछ बाते याद रक्खे :
उनका नज्म ११ जुलाई १८२७ को हुवा था। जब वे छोटे थे उसवक्त ही उनके माँ का देहांत  हुवा ,उनका पारिवारिक फुल बेचनेका  का धंदा था इसलिए उनका नाम फुले हुवा करता था।
उम्र के २१ साल में कक्षा ७ वि अंग्रेजी पास किये थे । किंव की पहले वे स्कूल नहीं जाते थे ।
ज्‍योतिबा फुले को एहसास हो गया था कि ईश्‍वर के सामने स्‍त्री-पुरुष दोनों का अस्तित्‍व बराबर है।
ऐसे में स्त्रियों की दशा सुधारने और समाज में उन्‍हें पहचान दिलाने के लिए उन्‍होंने आपने ही घर में सन १८५४ में एक स्‍कूल खोला दिया था . एक नहीं दो नहीं तिन स्कूल खुलवाये थे और उनका कारोबार सावित्री बाई फुले को सौंपा थे।
ज्‍यातिबा फुले दलित उत्‍थान के हिमायती थे । उन्‍होंने न सिर्फ विचारों से दलितों को सम्‍मान दिलाने की बात कही बल्‍कि अपने कर्मों से भी ऐसा करके दिखाया। उन्‍होंने दलितों के बच्‍चों को अपने घर में पाला और उनके लिए पानी की टंकी भी खोल दी। नतीजतन उन्‍हें जाति से बहिष्‍कृत कर दिया गया। लेकिन पाखंडी जातिवाद को कभी वह डरे नहीं ,आपना करवा आगे ले चले गए ।
समाज के निम्‍न तबकों, पिछड़ों और दलितों को न्‍याय दिलाने के लिए ज्‍योतिबा फुले ने 'सत्‍यशोधक समाज' की स्‍थापना की। उनकी समाज सेवा से प्रभावित होकर १८८८ में मुंबई की एक सभा में उन्‍हें 'महात्‍मा' की उपाधि से नवाजा गया था ।

ज्‍योतिबा फुले ने ब्राह्मण के बिना ही विवाह आरंभ कराया. कुछ समय बाद बॉम्‍बे हाईकोर्ट ने इसे मान्‍यता भी दी। यही नहीं उन्‍होंने विधवा विवाह का समर्थन और बाल विवाह का जमकर विरोध किया।
साल १८७३  में ज्‍योतिबा फुले की किताब 'गुलामगिरी' प्रकाश‍ित हुई । इसमें बताए गए विचारों के आधार पर दक्ष‍िण भारत में कई सारे आंदोलन चले। चलाये गए और गुलाम को गुलामी का एहसास करा दिया।
महात्मा ज्‍योतिबा फुले ने 'गुलामगिरी' के अलावा 'तृतीय रत्‍न', 'छत्रपति श‍िवाजी', 'राजा भोसले का पखड़ा', 'किसान का कोड़ा' और 'अछूतों की कैफियत' जैसी कई किताबें लिखीं और लोगोंको अँधेरे से बहार निकला ..
महात्मा ज्‍योतिबा फुले ने  “सत्‍यशोधक समाज” की स्थापना की थी और उन्ही के संघर्ष की बदौलत सरकार ने “एग्रीकल्‍चर एक्‍ट” पास किया। था इसीलिए उन्हें भारत के पितामः कहते है। उन्हीके उपलक्ष में शिक्षक दिन मनाया जाय ।





Tuesday, June 19, 2018

दलाल आणि दलाली


दलाली
दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८

दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो  की एखाद दुसरी दुय्यम  खरेदी असो .खरेदी विक्री आली की तिथे दलाली आलीच .माझ्या गावी बैल बाजार असल्यामुळे दलाली तेजीत चालते .हल्लीच्या युगात दलाली ला उत आला आहे.आज -काल स्मार्ट फोन मुळे तर खूप मोठ्या प्रमाणावर एप बाजारात दिसत आहेत ते एक प्रकारची दलाली किंवा कमिशन घेऊन धंदा करीत आहेत .
फार पूर्वीच्या काळापासून जसे वस्तू देवाण आणि घेवाण पासून जो कोणी मधेस्थ आला त्याने  मार्जीन मनी ची मिळकत केली तेच दलाली रुपात पुढे उदयास आली .आज आपण त्यास कमिशन असे म्हणतो .कमिशन शिवाय खरेदी विक्री होत नाही .
हाळी या गावी पूर्वी प्रमाणे आजही तेजीत चालणारा एक आठवड्यातील  तीन दिवशीय बाजारातील  व्यवसाय म्हणजे दलाली .बैल विक्री आणि खरेदी मध्ये दोन्ही बाजूने कमिशन घेणारा आणि देणारा पैसे  देतो आणि दलाल ते खुशीने घेतो .
हाळी या गावी जनावराचा जंगी  बाजार तसा तीन दिवस भरतो ,शनिवारी भरत असताना पासून ते सोमवारी ओसरत असताना पर्येंत .शनिवारी पहाटे  सकाळ पासून दूर दूर गावावरून बैल विक्रीसाठी येत असतात ते सोमवारी आपल्या गावी  परत जाई पर्येंत .एकंदरीत हाळी आणि हांडरगुळी या गावातील  सगळे मिळू वीस एक च्या आसपास दलाल असतील .ते बाजारात फिरून बैल खरेदी आणि विक्री करून देतात .आणि कमिशन घेतात .
दलाल म्हण्टेल की त्याचा पोषक ठरलेला असे डोक्यावर गांधी  टोपी हातात एक काठी अंगावर सफेद रंगाचा सदरा आणि धोतर ,पायात काही वाहन असेल नसेल तरी चालेल .
हे लोक पूर्ण बाजारात दिवसभर बैलाच्या दाव्ण्यातून फिरत असतात ,आणि  बैल मालकाला विचार पूस करीत असतात की तुमचे बैल विकायचा हाय का ? आणि किमती विचारून ठेवतात .कधी -कधी  एक तर विकत घेणारा सोबत असतो त्यास वेगळी वेगळी बैल जोडी दाखवावी लागते किंवा ज्या माणसाचे बैल विकायचे असतात त्या दावणीला जाऊन तेथील बैल जोडी किंवा एक बैल दाखवला जातो .या दरम्यान जी वार्ता होते किंवा देवाण घेवाण ची भाषा होते त्या बोलीला किंवा तिघातील संभाषणा ला जगात तोड नाही .कांही नमुने दाखल मी इथे पेश करीत आहे ..
दलाल : मालक हा धावळ्या बघा किती उठावदार आहे .
विकत घेणार : आर ,मला धावळ्या नको ? एकाच रंगाचा पाहिजे बैल .
दलाल : चला मग पुढे .तुम्हाला एकाच रंगाचा बैल  दाखवतो .
ते एका दुसऱ्या  दावणी कडे वळतात तिथे रुद्र्ववाडीचे  चे बैल दावणीला असतात तिथे ते दोघे जातात .
विकत घेणार : हा हा ..हा मस्त हाय की र .याची काय किंमत सांगता हो .
मालक : आठ हजार हाय बघा .
दलाल : अहो ,काय पाटील हा तर पाच हजार चा बैल आणि आठ हजार सांगता ?
विकत घेणार : हो खरे आहे ,दया न पाच हजार ला .
मालक  : नाही हो आणखी एक हजार कमी करतो बघा ,जर घेत असला ,नगदि  रोख रक्कम देत असाल तर ?
दलाल : जाऊ दया हो मालक  ,एकच बोलू का सहा हजार मिळतील बघा .नाहीतर आम्ही चाललो पुढच्या दावणीला .
विकत घेणार : अहो तुमचे आणि माझे जाऊद्या मी तुमाला सहा हजार पाचशे देतो .
( दलाल आणि विकत घेणार थोडे बाजूला जातात आणि आपसात चर्चा करता की हाच बैल घ्यायचा ,कारण काय तर त्या बैलाची एक जोडी हुबेहूब विकत घेणाऱ्या पाटलाच्या घरी आहे .हे कळताच दलाल खुश होतो की आज मला कमिशन मिळणार आणि मी हा बैल विकणारच .हे पक्क होतो .)
मग दलाल आपले अस्त्र बाहेर काढतो आणि त्या बैला कडे स्वारी वळते .चला मालक आज तुम्हाला हा बैल सहा हजार पाचशे रुपया ला घेऊनच देतो .त्याच्या खांद्यावर एक उपरणे असते त्यात पायातील चप्पल गुंडाळून खाद्यावर टाकलेली असते .आणि त्या उपरण्याला हात लावत दलाल शपत घेतो .आणि काय  म्हणतो ते बघा  ...
दलाल : मालक माझे एकता का ,मी खोटे कधी बोलत नाही .ह्या रोटीची शपथ हाय ,तुमच्या बैलाला अख्या बाजारात घेऊन फिरलो तर सहा हजार पाचशे मिळणार नाहीत .आणि देऊन टाका आता .
विकणारा : थोडा वेळ संभ्रमांत पडतो .हा बोलतो ते खरे आहे .बिचारा रोटीची शपथ खातो आहे ,दुपार झाली आहे आजून जेवला पण नाही खांद्यावर  रोटी घेऊन फिरतो आहे .याचे मन परिवर्तन होते आणि सहा हजार पाचशे ला बैलाचा सौदा होतो .
विकत घेणाऱ्याला आणि विकणाऱ्या पाटलाला माहित नाही की त्याच्या खांद्यावर  रोटी नसून त्याच्या पायातील चप्पल आहे .आणि अनवाणी फिरत आहे ...एक दलाल म्हणून......
@@@@

Monday, May 28, 2018

कथा : एक गधे की

( दिनांक: गुरुवार २४, में २०१८ रेडीओ FM गोल्ड हिंदी चानेल वर ऐकलेली कथा ,अजून वाचनात नाही )

दिनांक – सोमवार २८,में २०१८ .



एक भूमिहीन मजदूर आपण दिनभर काम करेके आपने बनाये हुये मिटी के बर्तन आपने सर पर रखकर गाव- गाव जाकर बेच लेता और आपणा घर परिवार चला लेता .येह समान लाने धोने के लिये उसके पास न कोई नोकर था न कोई वाहन या कोई चार पायी वाला प्राणी था .

युंही ही एकदिन वह आपणा समान बेचकर आपने घर जा रहा था .उसे एक नदी किनारे एक छाव भरा पेड दिखा तब उसने सोचा की चलो यहा थोडा आराम कर लु .

पास में जो रोटी थी उसने पेड के नीचे बैठकर आराम से खा ली और नदी का मिठा पाणी पीकर वह पेड के नीचे लेट ही रहा था ,ठीक उशी दरम्यान एक ऋषी महामुनी वहां से गुजर रहे थे .वह भी वहां आराम के लिये ठहेर गये .और बातों बातों में उस ऋषी महाराज ने ,उन्हे पूछा की ,क्या आपके पास कोई वाहन का साधन नाही है ? उसने कहा जी नाही है .फिर ऋषी महाराज ने कहा मेरे घर में एक गधा ही उसे आप ले आना और आपणा काम चला लेना .



फिर एक दिन वह महाशय ने उस गढे को घर ले आये और आपणा धंदा उसिसे करणे लगे .उस गढे का उन्हे खूब फायदा हुवा ,महिने गुजर गये .एकदिन वह गधा बिमार पडा और मर गया .गढे के मरने का दुःख बहुत हुवा . उस महाशय ने सोचा की इसकी कबर किंव न बनाई जाय जिसने मुझे बहुत धन कामाकर दिया ,और मैने उसे आपने परिवार का हिस्सा समजकर देखभाल किया था .

ठीक उसने वही किया ,गधे की कबर खोदकर उसे दाफ्ना दिया .उसे बहुत ही .उसका दुखः सहेन न हुवा और पास में बैठकर फुट फुट कर रोने लगा .कूच समय बाद एक मुसाफिर वहां से गुजर रहा था उसने येह दृश देखा ,और कूच न कहते हुये ,उसे नमन किये आगे निकाल गया .मन ही मन में सोचता रहा कोई बडा पंडित या महान व्यक्ती मरा होगा उसके दुख में वह बेचारा रोता होगा ? फिर जो भी वहां से गुजर था वही प्रणाम करके चुप चाप चले जाते .पूरा दिन गया वही होता रहा .

शाम ढल गयी ,कूच पल निकल गए तब जिसने उन्हें गधा दिया था वह ऋषी महाराज भी वहा पधारे ,उन्होंने पुछा की क्या हुवा किसकी कबर पे रो रहे हो ? तो उसने बीती बताई .तब ऋषी महाराज को बताई . ऋषी महाराज बोले वहा मेरे आश्रम के बगल में बड़ा सा मंदिर जो है मैंने उसे बनवाया था ,और वह मंदिर इस गधे के माँ का है ?

तात्पर्य : ठीक इसी तरह यहाँ भारत में सभी मंदिर बने हुये है और बन रहे है और जोरोंसे पूजा पाठ चल रहा है

पळस आणि पांगारा

  पळस आणि पांगारा  पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट ( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो )   ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्प...