पळस आणि पांगारा
पळस : फ्लेम ऑफ फॉरेस्ट
( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो )
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे .
सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.
यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात.
पळसाला पाने तीनच पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .
शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांतील उष्ण प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी वनांमध्ये आढळतो.
पळस हा मध्यम आकाराचा वृक्ष सु. १५ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर १.५–१.८ मी. असतो. साल राखाडी, निळसर वा फिकट तपकिरी असून तिच्या लहान-मोठ्या ढलप्या सोलून निघतात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांमधून लाल रस पाझरतो. हा रस सुकल्यावर त्याचा विशिष्ट डिंक बनतो. त्याला इंग्रजीत ब्युटिया गम किंवा बेंगॉल कीनो म्हणतात. पाने संयुक्त, एकाआड एक व पिच्छाकृती असून मोठी व त्रिदली असतात. जानेवारी ते मार्च महिन्यांत या वृक्षाला केशरी-लाल रंगाची फुले येतात. फुले मोठी, द्विलिंगी व बिनवासाची असून ती फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लांब मंजरीवर येतात. ती अनेक व सु. २.५ सेंमी. लांब असतात. त्यामुळे ज्या परिसरात पळसाची झाडे असतात तो परिसर या भडक रंगाच्या फुलोऱ्यांमुळे दूरवरून पेटल्यासारखा वाटतो. म्हणून इंग्रजीत त्याला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. शिंबावंत फळे १५–२० सेंमी. लांब व सु. ४.५ सेंमी. रुंद असतात. त्यात एकच बी असते.
पळसाचे लाकूड काळपट पांढरे असते. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही, म्हणून मोटेसाठी व विहिरींच्या काठावर बांधकामासाठी त्याचा वापर होतो. पाने राठ व कडक असतात. त्यांपासून पत्रावळ्या तयार करतात. फुलांपासून केशरी रंग मिळतो. त्याचा वापर होळीचा रंग व कपडे रंगविण्यासाठी केला जातो. फुलाच्या रंगाकडे डास आकर्षित होतात आणि त्यातील मकरंदामध्ये ते अंडी घालतात. परंतु ही अंडी उबत नाहीत. त्यामुळे डासांची निर्मिती कमी होते. खोडापासून मिळणाऱ्या डिंकाचा वापर औषधात करतात. त्यातील टॅनिनाचा कातडी कमाविण्यासाठी वापर करतात.
पळस हे उत्तर प्रदेश राज्याचे राज्य फूल आहे . भारतीय डाकतार विभागातर्फे सन्मान म्हणून पाळसा च्या फुलाचे पोस्टाचे तिकिट छापले होते . कालिदासणी पळसाला ' ऋतुसंहार ' हे नाव दिले आहे . पळसला पर्यायी बेल आहे . पळस किवा बेल झाड लावले .
पळसाला संस्कृत मध्ये पलाश असे म्हणतात. पलाश अर्थ फुलाणि दावरलेले झाड . विदर्भात याला ' तुळीप असे नाव आहे .
पळसाला पाने तीन असे आपण म्हणतो . ही केवळ एक युक्ति नसून त्यात गहन अर्थ दडलेला आहे . असंग्रह आणि संयमाची सूचना देणारी युक्ति आहे ती . किती ही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणातच वापरू शकता , उपयोगी लावू शकता ,बाकी सर्व व्यर्थ आहे असा संदेश आहे यात याची पाने त्रिदलिय असल्याने याचे संस्कृत नाव ‘ त्रिपटक ‘ असे आहे .
पांगारा :
एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि अन्य आशियाई देशांतही झालेला आहे. भारतात फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात : लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो .
पांगारा हा वृक्ष सु. २७ मी. उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ, करड्या रंगाची, क्वचित पिवळी व खडबडीत असते. याला लहान आकाराच्या अनेक फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पाने संयुक्त, त्रिदली व मोठी असून पर्णिका एकाआड एक व १०–१५ सेंमी. लांब असतात. लांब फुलोऱ्यावर फुले मोठी व आकर्षक असून ती लाल, शेंदरी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. ती बिनवासाची असून त्यांत मकरंदाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक पक्षी व भुंगे फुलांमधील मकरंद मिळविण्यासाठी फुलांभोवती घिरट्या घालताना दिसतात. फळ (शेंग) १३–३० सेंमी. लांब, काळ्या रंगाचे आणि लंबगोलाकार असते. त्यांत ६-७ जांभळ्या व हलक्या बिया असतात. पांगाऱ्याची लागवड बिया किंवा कलम लावून करतात.
पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.
No comments:
Post a Comment