About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Friday, May 29, 2020

बुद्ध साहित्य का वाचावे ?

13May2020

बुद्ध साहित्य का वाचावे ?/बीआरantWork

भगवान बुद्धाने उपदेशिलेला धम्म त्यांनी नव्याने शोधून कढला नसून ती तत्वे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीस जाणून घेण्याजोगी होती असा बौद्ध परमपरेचा विकास आहे.

........... #दिघनिकाय भाग १ ( अनुवादक : वसंत धावरे )

बुद्ध साहिती हे भूमिहीन शेतमाजुरा सारख्या कनींगी प्रमाणे आहे . हे साहित्ये जो  वाचेल तो बुद्धिवंत ,विचारवंत आणि सुज्ञ होईल .

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात ( मराठवाड्यात ) ज्वारी साठवून ठेवण्यासाठी एक कारव्या पासून किंवा ओल्या तुराट्या पासून एक #कनिंग तयार करीत असत त्या गोलाकार कनिंगला शेणाने लेप देऊन उन्हात सुकून झाल्यावर त्यात कुटुंबाला वर्षभर पुरेल येवढी ज्वारी भरून ठेवत .कनिंगेला एक समांतर छोटे छिद्र ठेवलेले असायचे आणि त्यात छिद्र बंद करता येईल असे वस्त्र कोंबून ठेवत . गरजे प्रमाणे लागेल तेवढी ज्वारी काढून घेत असत.यातील धान्ये वर्षानी वर्ष खराब होत न्हवते की #वाळवी लागत न्हवती . यात एक टन ज्वारी बसेलअसे मोठ मोठ्या डेरेदार आणि गोलाकार कनिंग तयार करीत होते . उदा:दाखल सांगायचे झाले तर आपल्या घरातील पाणी पिण्याची टाकी असे गृहीत धरू या.

 मराठवाड्यात ही धान्ये किंवा ज्वारी साठवण्याची प्रथा येंशी च्या दशकापर्येंत अस्तीत्वात असावी ? कारण या भागात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यांची माथी मारलेले . म्हणून त्या वेळी अधिक महत्व असावे .

      बुद्धांचे साहित्याचे तसेच आहे .राजा अशोकाच्या काळात ई सन ३ ऱ्या शतकात पहिली संगीती पर्येंत हे टिपिटक अश्याच स्वरुपात तीन पेटाऱ्यात बंदिस्त होते ,यात #अभिद्धम्मपिटक ,#विनयपिटक आणि #सुत्त्पिटकाचा समावेश होतो .

थोडक्यात एका बाजूला जगभरातील धार्मिक ग्रंथ आणि दुसर्या्  बाजूला बौद्ध साहित्ये ठेवली तर बुद्ध साहित्याची तुलना होऊ  शकत नाही ,म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध साहित्यांचा बारकाईने आणि सखोल अभ्यास करून ,#धम्मप्रवेश केला होता, त्या साहित्याचे आणखी एक महत्व असे आहे की , हे साहित्य एकतर कोण्या  अवतारी ऋषि ची देन नाही ,तर एका महमानवाचे सूत्रबद्ध आणि मानवी कल्याण आणि समतेचे साहित्य आहे . म्हणून बौद्ध साहित्य एक एक  वाचून बुद्धाने सांगितलेल्या समतेच्या शिकवणीला शरणजावे ,#सत्ये जाजून आपला ‘#विवेक आणि  ‘#चेतना सतत जागृत ठेवाव्यात.

प्रा.बालाजी शिंदे.

9702158564

balajishinde65@gmail.com

 


No comments:

Post a Comment

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...