#मारिआई _मंदिर_हाळी.
उपरोक्त फोटो हा #हाळी तालुका उदगीर येथील #मरीआई_मंदिर चा आहे . हे एक खूप जुने मंदिर आहे हे आज भग्न अवशेष झाले आहे . या मंदिराचा कोणी आज वाली उरला नाही . आजच्या काळात पैसा आणि लोकांची वाईट मानसिकता या मुळे हे मंदिर आडगळ होऊन बसले आहे . शासन निधी असताना याचा जिर्णोउद्धर कोणी करण्याची हमी घेत नाही . कधी पडेल आणि किती लोकांचा जीव घेईल याची शक्यता वर्तवता येत नाही .
पालक मंत्री, आमदार आणि तलाठी ग्रामसेवक यांनी या मंदिर जिर्णोद्धारची दाखल आणि काळजी घेतली तर लवकर पुनः हे मंदिर उभे राहू शकते . हे मंदिर कॉमरेड अण्णा भाऊ साठे चौकात असून हेच हाळी गावचे प्रवेश द्वार आहे असे म्हंटले तर वावगे होणार नाही . लोक गावात प्रवेश करताना इथे नमस्कार करून पुढे जातात . मंदिराच्या मागे लगेच एक माझे छोटे घर आहे .
मंदिर थोडे दक्षिण दिशेला वाढवले तर प्रशस्थ होऊ शकते . मुख्य रस्त्यावरून हाळी गावात जाण्यास निघाले असता मंदिरा समोरून उजव्या बाजूला बौद्ध वस्थि ओलांडून रस्ता मधोमद पार करून व गांव पार करून हा रास्ता सरळ बोरगाव वाटेकडे जातो. दूसरा रस्ता साठे नगर पार करत सरळ उजव्या बाजूला निघून गावातील #जामा_मासिद ,व गावा बाहेर असलेले भव्य #मारोती_मंदिर पायथ्या जवळून उजव्या बाजूने तेरू नदी ओलांडून #आजोनसोंड या माझ्या आतेच्या गावाकडे कडे जातो .
हाळी परिसरात एकूण १२ वाड्या असून जवळ जवळ ६ वाड्या साठी या हाळी गावातून जावे लागते . #हाळी_आणि_हांडरगुळी हे या परिसरातील एक देवणी आणि नळेगाव नंतर कह भव्य बैल बाजाराचे प्रसिद्ध गांव .
या #बैल_बाजारावर माझे आगामी पुस्तक लवकरच आपल्या वाचण्यास येणार आहे.
#मंदीरा_विषयी_थोडक्यात
फोटोमध्ये दिसणारे हे मरीआई मंदिर, हाळी तालुका उदगीर हे अत्यंत जुने आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे. सध्याच्या अवस्थेत हे भग्नावशेषासारखे दिसत असून, त्याच्या जीर्णावस्थेची स्पष्ट छटा फोटोमधून जाणवते आहे .
#मंदिराची_रचना_व_बांधकाम
मंदिर दगडी व चुन्याच्या बांधकामाचे आहे, भिंतींवर काळ्या व लाल रंगाचे पॅचेस दिसतात. समोरील ओटा (प्लॅटफॉर्म) अजूनही टिकून आहे आणि स्थानिक ग्रामस्थ येथे बसून संवाद साधत आहेत. छत व खांब जुने झाले असून त्यावरून पावसाचे पाणी गळत असण्याची शक्यता आहे.
मंदिराच्या ओट्यावर पांढऱ्या पारंपरिक पोशाखातील वयोवृद्ध आणि मध्यमवयीन ग्रामस्थ बसलेले दिसतात.हे मातंग आणि बुद्ध वयस्क आजोबा बसलेले आहेत . खूप मार्मिक चित्र आहे हे . हे ठिकाण आजही गावातील सामाजिक भेटी-गाठीचे केंद्र आहे .इथे लोक येवून गुजगोस्टी करत असतात .
#सांस्कृतिक_व_धार्मिक_महत्त्व
हे मंदिर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असून, लोक गावात प्रवेश करण्यापूर्वी येथे नमस्कार करतात. "अन्नाभाऊ साठे चौक" हे या मंदिराचे स्थानिक ओळख-चिन्ह आहे. पूर्वी हे मंदिर गावाचा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक केंद्रबिंदू होते , परंतु सध्या त्याची दुरवस्था झालेली आहे.
#समस्या_व_जतनाची_गरज
जीर्णावस्था आणि दुर्लक्षामुळे मंदिर कधीही कोसळण्याचा धोका आहे. शासनाचा निधी असूनही कोणी जिर्णोद्धाराची जबाबदारी घेताना दिसत नाही.
योग्य नियोजन व निधी वापरल्यास हे मंदिर पुन्हा भव्य स्वरूपात उभे राहू शकते.असे माझे ठाम मत आहे .
#ग्रामस्थ_लोकाना_सूचना
तुम्ही पालकमंत्री, आमदार किंवा ग्रामपंचायत यांना आपला प्रस्ताव सादर करून जिर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू करू शकता.मी या गावचा एक नागरिक या नात्याने आपणास कळवू इछितो की आपण निधी साठी फंड उभा करावा . गावा बाहेरील मुंबई ,पुणे व इतर शराहत असलेले व्यक्ति त्या खात्यात स्व हस्ते मदत /दान करू शकतील असे ,मी सूचना वजा विनंती करतो .
...................प्रा बालाजी नीला रघुनाथ शिंदे .
(बाल कर्णबधिर शिक्षण तज्ञ ,पाली भाषा आणि साहित्य अभ्यासक )
( फोटो साभार : आयू . प्रशांतभाऊ मसुरे , ( पेंटर ) , यूटुब् ब्लॉगर , हाळी यांच्या वाल वरुन )
No comments:
Post a Comment