क्रांतेयबुद्ध बाबासाहेब डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे बुद्ध विहार बांधण्यामागे खलील मुख्य उद्दिष्टे होते .
क्रांतेयबुद्ध बाबासाहेब डॉ.बी आर.आंबेडकर यांनी , १८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथे बुद्ध विहारच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लोकांना समजावून सांगितले की बुद्ध विहार बांधण्यामागे माझी तीन मुख्य उद्दिष्टे आहेत:-
एक आपल्या समाजातील बहुसंख्य लोक आज खेड्यात राहतात, परंतु त्यांना नोकरी, उच्च शिक्षण आणि मुलाखत इत्यादींसाठी शहरात सतत यावे लागते. मग ते कोणतेही शहर असो येथे त्यांना राहण्यासाठी जागा मिळत नाही,किंवा तसे राहण्या जोगे एकद्या नातेवाईक किंवा पाहुण्याचे तसे घर असत नाही .मग ते काय करतात ? ते पदपथ, रेल्वे स्टेशन ,बस स्थानक , उद्याने, मोकळी मैदाने. त्यांना इत्यादि ठिकाण च्या शहरात राहण्यास भाग पाडले जाते .
जेव्हा इतर समाजातील लोक शहरात येतात, तेव्हा त्यांना धर्मशाळा, हॉटेल, गेस्ट हाऊस इत्यादी सहज आणि मोफत मिळतात किंवा कमीत कमी त्यांच्या स्वतःच्या जातीसाठी राखीव असतात . महणून शहरांमध्ये यावे, तुम्ही इथे सन्मानाने राहू शकाल आणि ही बौद्ध मंदिरे त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करतील असे बाबासाहेबांना वाटले होते.
दुसरे कारण या बुद्ध विहारांमध्ये इंग्रजी माध्यमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा उघडण्यात यावे , जेणेकरून आपल्या समाजातील भावी पिढीच्या मुलांनाही इतर समाजातील मुलांच्या बरोबरीचे उत्तम प्रकार चे शिक्षण घेता येईल.
तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांना आर्थिक सक्षम करणे होय . या बुद्ध विहारांच्या आसपास दुकाने बनवून, तेथील लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाईल.हा एक अति महत्वाचा आर्थिक विकासाचा निकष त्यांनी लावला होता . थोडक्यात आर्थिक बाजूने आपला समाज सक्षम व्हावा असा असावा .
सरतेशेवटी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना समजावून सांगितले की लोकांना रोजगार आणि आदर देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा बुद्ध विहार बांधला जावा यासाठी प्रतेक बुद्धिस्ट व्यक्तीने प्रयत्न करायला हेवे .
पण आज तसे होताना दिसत नाही किंवा तसे केले जात नाही हे खेदाची बाब आहे . जे आज बुद्ध मंदिर किंवा विहार दिसतात ते इतर समाजाच्या मंदीरा प्रमाणे कुलूप बंद दिसत आहेत . कोणत्याही प्रकार चे नियोजनबद्ध कार्यक्रम होताना दिसत नाहीत . छोटी मोठी विहार बंधीस्त अवस्थेत आहेत . तेंव्हा बाबसाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाला आल्याचे निदर्शनात येत नाही . ही आजची मोठी खंत आहे .
तरी कोणत्याही कामाची वेळ गेलेली नसते . उपरोक्त प्रकारचे प. पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू स्वयंप्रकाशित आहे, म्हणून आपण सर्वांनी महामानवाचा हा महान विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आज उद्या आणि रोज सतत केला पाहिजे.
नमामि भंते।
जयभीम ! नमो बुद्धाय
प्रा बी आर शिंदे
,नेरूळ नवी मुंबई
- ७०६
लेख पसंत आया तो धम्मदान करो ..........