देशाला_आत्मनिर्भर_बनविताना_दिव्यांगांना_स्वयंपूर्ण_बनविणे_आवश्यक_आहे !
सध्या आपल्या देशात आत्मनिर्भरतेचे वारे जोरात वाहत आहे ,पण त्या वाऱ्याची दिशा किंवा मार्गदर्शन तत्व खूप खालच्या थराला गेले आहे . यात जातीचे खोटे दाखले ,आणि सध्या दिव्याग क्षत्रात ही घुसपेट झालेली पाहावयास मिळते आहे .
डोळस ,धांकट आणि सामान्य व सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करीत असताना बघायला मिळत आहे . आज मितीला पूजा खेडकर या आयएएस अधिकारी पदावर निवड झालेलें प्रकरण चर्चेत आहे .
याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या व्यक्तवायत आपले मत व्यक्त केले आह .(२६ .७ .२०२४ ) या संदर्भात बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
मी गेली ३५ वर्ष दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत असताना असे अनेक अनुभव पाहावयास मिळाले आहत .
त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की या खेटरत कार्य करणाऱ्या सर्व शासकीय आणि निम शशकिय संस्थानी आप आपली जबाबदारी पारदर्शक पार पाडावी .
भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के लोक दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे. त्यामुळे देशातील दिव्यांगांची निश्चित संख्या समजेल व त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईल.
तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा यामुळे आगामी काळात दिव्यांगांचे जीवन अधिक सुकर होईल व दिव्यांगता ही अडचण ठरणार दूर होणार आहे .
दिव्यांग व्यक्ति कायदा - पीडब्ल्यूडी १९ ९५ - २००० (सुधारित ) या तत्व प्रणालित राहून सामान्य व्यक्तिनि दिव्यांग व्यक्तीस त्यांना आपल्या बरोबरीचे स्थान देवून सहकार्य एवढीच अपेक्षा !
प्रा. बा. र. शिंदे ,[विशेष कर्णबधिर शिक्षा ]
लेख आवडला तर धम्मदान करा ..........