This blog is for Socially poor ,for uplifting their human values in day today Pure life. Like Buddhism originates in the teachings of Shakyamuni (Gautama Siddhartha), who was born in what is now Nepal some 2,500 years ago. He became increasingly possessed by a longing to abandon the secular world and go out in search of a solution to the inherent sufferings of life. And he gave Triratna ,Four Nobel truth ,Pancasila ,Ashtangik way and ten Parmi .for peace of Globe.
About Me
Saturday, June 29, 2024
मधु दंडवते : झुंजार समाजवादी नेता.
Saturday, June 22, 2024
माझे आजोबा : ग्यानोबा व्यंकोजी #शिंदे ..
माझे #आजोबा : #ग्यानोबा #व्यंकोजी #शिंदे ..
(Main pole into the Tent)
..............प्रा बालाजी र शिंदे,नेरुळ -७०६
मानवी मूल्य आणि माणूस म्हणून पिढी घडविण्यास ,आजी -आजोबा वडील ,आई ,काका, मामा -मामी हे तंबूतील खांबासारखे असतात .तेंव्हाच तंबू उभा राहतो.
त्यात महान अगाध ,माणुसकी ,आपलेपण ,आणि बुद्धिमत्ता असलेले व्यक्ती म्हणजे माझे आजोबा .
(Main pole in to the tent)...
ज्यांचे बालपण आजोबांच्या अंगा खांद्यावर गेले ,आजी आजोबा ,काका ,आणि माय -आजी कडील मामा -मामी म्हणजेच 'आजोळ ज्याने जगला' आणि अनुभवला त्यास कधीच कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडत ..हा माझा अनुभव आहे .
आणि तेच खरे बालपण आणि तोच खरा आशीर्वाद होय...
माझे आजोबा आज ह्यात नाहीत पण त्यांच्या आठवणीने मी सदैव जिवंत आहे कायम .
माझ्या घरात मी पाहिलं वाहिलं #केंद्रीय #कर्मचारी...
ही बातमी आजोबाला कळली आणि आख्या गल्लीत आजोबाने टिरी उघड्या करून नाच केला होता .( जहाँ पणा तुस्सी ग्रेट हो ची स्टाईल )...काय तो आनंद आणि काय तो शुद्ध मनाचा माणूस. आणि निस्वार्थ मन.
मी #काश्मीर कार्यालयीन कामाला गेलो असताना आजोबांना १९९७ ला एक उलन चे जॅकेट घेऊन आलो आणि त्यांच्या पुढ्यात ठेवले ,दिवस भर त्या उलांच्या जॅकेट वर कृतार्थ हात फिरत होता ,आणि तो हात मला आशिर्वाद देत होता ..आज तो क्षण आठवून माझ्या पाठीवर हात फिरल्याचा भास होतो आहे आठवणींच्या कोपऱ्यात.
असे अनेक प्रसंग सांगता येतील.त्यांच्या सोबत व्यतीत केलेली.
मी इयत्ता सातवीत असेन ? दिवस पावसाचे होते .आम्हला आत्याच्या (माजी मोठी आत्या संता कांबळे ) गावी #अजनसोंड ला जायचे होते ...वेळ दुपार नंतर ची होती ...गावच्या हाकेवर तिरु नदी ,ती ओलांडून जावी लागे . अजोनसोंड ते #हाळी अंदाजे १० की मी चे अंतर असेल ,तेंव्हा पायी जावे लागे ,कोणतेही सार्वजनिक वाहन उपलब्ध नव्हते .आमच्या कुटुंबात तर कोणाकडे वाहन न्हवतेच.
मी आजोबा सोबत चालत निघलो होतो ,कालच दक्षिण दिशेला पाऊस पडल्याने नदीचा पुराचा डोह अजून उतरला न्हवता .
तिरु नदी जवळ आल्यावर मी पाणी बघून घाबरू लागलो आणि आजोबांना तसे कळवले की मी नाही येणार तुम्ही जा .माझा मागे ओढता पाय बघून आजोबांच्या अंगातील मातंग जागी झाला ,आणि हत्तीचे बाळ कुठून आले हे मला कळण्यास विलंब लागन्यापूर्वी मला पटकण उचलून आपल्या खांद्यावर घेतले .मी घाबरलो त्यांचा पटका आणि मुंडके घट्ट पकडले ,माकडा सारखा टकमक बघत बसलो यांच्या खांद्यावर ,आणि आजोबाच्या ताक्तीचा मला अंदाज आला नाही ,त्यांनी कमरेला असलेल्या पाण्याच्या धावत्या प्रवाहातून मला त्या किनारी फर फर घेऊन गेले ....
भल्या मर्द आणि धीट मनाचा माझा आजोबा ..
#अशिक्षित पण ,पदवीधर व्यक्तींना लाजवेल असे ज्ञान होते ..
हर हुन्नरी .#गोवंडी कलेत त्याच्या काळी कोणी हात नाही धरला त्यांचा .त्यांनी अनेक चिररेबंदी वाडे बांधून दिली ,मंदिराचे कळस ही बांधले ..
#Trumpet वाजवण्यात ही हातखंडा.
'मै क्या करू राम मुझे बूढा मिलगया.….'
'परदे मे रहणे दो परदा न उठाओ ..' हे त्यांचे आवडते गीत.
असे 'आजोबा' सर्वांचे असतील ही ,पण या सम हाच.
बोलेल तसा चालणार ...
त्यांचे एकच स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही ...
'तू शेत घे बाबा ! तू शेत घे!!हा त्यांचा तगादा ..'
पाचवीला पुजलेली गरिबी ....अजून मला जमले नाही ...ते गेले ! परत न येण्यास ,आठवणीचा वरदहस्त माझ्या पाठीवर ठेऊन ...
आज मितीला माझा मोठा लेक आदित्य ,लंडन येथून दोन वर्षे कोर्स करून परत आला ,हे कोड कौतुक बघण्यास माझे ,दादा (वडील) आणि बाबा (आजोबा) नाहीत ,हो....😢😢😢 माझ्या fb वाल वरुण
भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:
भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्य...
-
नात्यात लग्न एक अभिशाप दिनांक : १७-०४-२०१७ नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक ...
-
दलाली दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८ दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो ...
-
. हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी बाज़ार : २०/११/ 2017 तालुका उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध ...
-
भारतीय शिक्षण प्रणाली बर्याचदा आपनास एखादे आव्हान भेडसावत असते आणि एखादा गहन प्रश्न पडतो उदा : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ)...
-
अंधश्रद्धा एक अभिशाप २१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017 “आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची...
-
दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि एस एस सी...
-
शेंगा उकरायला येता का ? भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज ...
-
भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्ह...
-
स्पर्श एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है। पहला स्पर्श माँ से होता है , जन्म के तुरंत माँ अ...