बुद्ध आणि त्यांचा धम्म हा
ग्रंथ का वाचवा .
एका
बाजूला जगभरातील धार्मिक ग्रंथ आणि दुसर्या बाजूला
बौद्ध धम्माची साहित्ये
ठेवली तर बौद्ध
साहित्याची तुलना होऊच शकत
नाही ,म्हणून बोधिसत्व पं.पू.डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी बौद्ध
साहित्यांचा बारकाईने आणि सखोल अभ्यास आणि चिंतन
करून ,बौद्धधम्मप्रवेश केला.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथराज "बुद्ध आणि त्यांचा धम्म " हा ग्रंथराज वाचनास मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, जगभरातील विविध भाषेत भाषांतरीत झाला आहे
. आता हा ग्रंथरात का वाचवा आणि कोणी -कोणी
वाचवा हा महत्वाचा मुद्दा आहे .
या ग्रंथात ‘धर्म
आणि धम्म’ याची उकल बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम सोप्या भाषेत करून ठेवली आहे . ती उकल कशी केली आहे ते पाहू या . त्यांच्या
ग्रंथराज या ग्रंथातील खंड -४ ‘धर्म
आणि धर्म' यात किती स्पष्टठा केली आहे हे वाचून पाहावयास मिळेल . ‘धर्म आणि धम्म’ हे वेगळी कशी आहेत ,जे धर्मात
नाहीत ते धम्मात नाहीत ती अंगे विषाद केली आहेत .
अगोदर ‘धर्म’ काय
ते बघू . धर्म हा असा शब्द आहे ज्याचे अनेक अर्थ
निघतात ,कारण हा शब्द अनेक अवस्था पार करून पुढे
जातो म्हणून हा अनिश्चित शब्द आहे . धर्म या
शब्दाला निश्चिती नाही . कारण मुळात हा शब्दच अनिश्चित आसल्या
कारणाने धर्माची कल्पना स्थायी किंवा स्थिर न्हवती म्हणावी लागेल . जसा
हवा तसा काळानुसार परिवर्तीत होत गेला. धर्माचे सातत्य टिकून राहिले नाही . बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे असे म्हणतळले आहे की,
मानवाच्या अकल्पना पलीकडील नैसर्गिक घटना त्या आदिम मानवात चमत्कार म्हणा किंवा जादू म्हणा या धर्माच्या
घटना होत्या . या समानार्थी संकल्पना धर्मात अभिप्रेत
होत्या . या नंतर काळ बदलत गेला आदिम मानव हा मानव
झाला आणि जादू आणि चमत्कारची संकल्पना कर्मकांडाने
घेतली .यात यज्ञ ,विधी आणि प्रार्थना ,पुजा असे परिवर्तन होऊन धर्माचे नाते जुळत गेले ,आणि
याचे धर्मात रूपांतर झाले .
आदिम मानवाला जादूची संकलपणा ज्ञात
नसल्या कारणाने कालांतराने तिचे महत्व नाहीसे झाले. आरंभी ही पाशवी शक्ति रूपात ओळखली जाऊ लागली . आणि
कालांतराने ती बदलत जाऊन तिचे रूप कल्याणकारी
‘शिव ’ असे झाले . या
शिवरूप कल्याणकारी शक्तीला संतुष्ट करण्यासाती अनेक विधी कर्मकांड सुरू झाले आणि हीच शक्ति पुढे ईश्वर म्हणून नावारूपाला आली
आणि तिला मानव निर्माता हे बिरुद लावणात
आले . येवढ्यावर न थांबता त्यास विश्वाचा निर्माता म्हणून अंतिम अवस्था महणून
तयार करण्यात आले आणि अशा रूपात धर्म पुढे आला . तसेच येवढायवर न थांबता मानव
निर्मिती सोबत विश्वनिर्मिती ही तिसरी अवस्था श्रद्धा रूपात अवतरली . याच अवस्थेत
आत्मा शाश्वत झाला आणि ही धर्माच्या ‘उत्क्रांतीची संकल्पा ’उदयास
आली . वरील सर्व कार्य करण्यास ईश्वराची आराधना करण्यास ,त्याला
प्रसन्न करण्यास यज्ञ ,प्राथणा ,धर्मविधी हे कर्मकांड सुरू झाले
यवढाच धर्माचा अर्थ अभिप्रेत आहे . यापलीकडे ‘धर्म’ दुसरे
कांही सांगू शकत नाही ?
आता ‘धम्म ’ काय ते बघू या. धम्म
उच्चारण करताच व्यक्तिपुढे प्रथम दर्शनी तथागत भगवान गौतम बूद्ध डोळ्यासमोर येतात . धम्म म्हणताच
बुद्ध डोळ्यासमोर येणे साहजिकच आहे,आणि ते सत्ये आहे . धम्म
दुसरे तिसरे कांही नसून ‘बौद्ध धम्म ’होय .
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथराज या भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची उत्तमा अशी माहिती दिली असून त्या धम्माचे धर्मापासून कसे वेगळे रुपं आहेत याची
माहिती दिली आहे . आणि धर्मपासून धम्म कसा वेगळा आहे याचीही
माहिती दिली आहे . कारण बरीच लोक धम्म समजून न घेता धर्म आणि
धम्म एकच आहेत असा कांगावा करतात .
धर्माच्या संकल्पनेपेक्षा बुद्धांचा
धम्म मौलिकद्रस्त्या भिन्न आहे . यूरोपियन लोकांनी वापरलेला RELIGION या संकल्पनेशी एक
संकल्पना जरी असली तरी या दोन संकल्पनात अजिबात साम्ये दिसून येत नाही . यातील व्यापकता भिन्न असुन भेद व्यापक आहेत आणि खूप
महत्वपूर्ण बदल आहेत. म्हणून यूरोपियन लोक याला धर्म religion म्हणून स्वीकारित नाहीत हे सत्य होय . ते स्वीकारत नाहीत हा त्यांचा नुकसणीचा भाग आहे ,यामुळे
बुधांच्या धम्माची हानी मात्र होत नाही . महणून यात रीलीजन ला अजिबात महत्व नाही .
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे असे म्हंटले आहे की धर्म ही
प्रत्येकाची वैयक्तिक बाब असून प्रतेकांनी आपला धर्म आपल्या पुरता मर्यादित ठेवावा
,याला सार्वजनिक जीवनात हस्तक्षेपणाची
अनुमति देऊ नये ,पण धम्म हे सामाजिक संकल्पना असून एक
अनिवार्ये बाब आहे . थोडक्यात एकट्या माणसाला मग धम्माची काय
गरज आहे ? मग जिथे एकपेक्षा दोन व्यक्ति एकत्र
येतात तेंव्हा तिथे धम्माची गरज असते आणि तिथे धम्म विद्यमान असतो .ईछा
असो अथवा नसो यातून कोणाचीही सुटका नाही . थोडक्यात समाजाला धम्माशिवाय राहुच
शकत नाही . आणि त्या व्यक्तीची सुटका अजिबात नाही .त्यास
धम्म स्वीकारवा लागतोच लागतो त्याशिवाय तरणोपाय नाही .धम्म
नाही तर शासन नाही ,शासन नाही याचा अर्थ नियम नाही की नियमाचे
बंधन नाही . म्हणून धम्म हे शासनाचे साधन असायला हवे . जर असे
असेल तर समजणे की त्या समाजात अराजकतेचा मार्ग चालू आहे .
जिथे अराजकता आणि हुकुमशाहीचा
स्वीकार म्हणजे स्वंत्र्याचा अधिकार काढून घेणे हे होय. तसे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथराज यात स्वंत्र्याचे तीन पर्याय दिले
आहेत .त्यातील समाज आणि न्याय व्यवस्था ही
असलेला धम्म आणि न्याय दानाचा अधिकार असलेला धम्म होय . जिथे
स्वातंत्र्य आहे तिथे धम्म आहे .
मग बुद्धाने त्यांच्या मान्येतेनुसार
धम्माची दोन प्रधान तत्वे आपल्या समोर दिली आहेत . एक प्रज्ञा आणि दूसरा करुणा . बुद्धाच्या
करुणाचा अर्थ इथे निर्मळ बुद्धी असा होतो . कारण
धम्मात किंवा समाजात अंधश्रद्धा आणि मिथ्याविश्वास याला स्थान असू नये असे त्यांना
वाटत होते . आणि दुसरे प्रधानतत्व म्हणजे करूणा होय.करुणा
हा बुद्ध धम्मचा मूळ गाभा आहे . करुणा म्हणजे प्रेम होय ,करुणे
शिवाय समाज हा जीवंत राहुच शकत नाही. याच करणाने बुद्धाणे करुणेला धम्माची
दुसरी आधारशीला मानली आहे .
बुद्धाणी केलेली ही व्याख्या आधुनिक
मौलिक आणि किती सत्य आहे हे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले आहे . म्हणून प्रज्ञा आणि करुणा हा दोहोंचा
संयोग म्हणजे बुद्धांचा ‘धम्म ’होय . धर्म
आणि धम्म यातील मौलिक फरक अश्या प्रकारे तथागत महामानव गौतम बुद्धाणे विशद केला
तोच धम्म किती वेगळा आणि महान आहे हे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उपरोक्त ग्रंथात सांगून गेले आहेत .
हा ग्रंथ मग कोणी वाचवा ,देशातील
तमाम जनतेणी आणि ,बहुजनानी वाचवा ,जे लोक
ऑनलाइन आणि ऑफलाइन डोक्टर बाबसाहेब यांचा
द्वेष करतात ,ज्यांना
त्यांची ओळख नाही ,यांना मानीत नाहीत ,त्यांचे
फोटो फाडण्याचे आणि पुतळे पडणायचे आणि पुतळे तोडण्याची कामे करतता त्यांनी हे
हिंसक कृत्य करण्यापूर्वी एकदा हा ग्रंथ जरूरू वाचवा .