About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Sunday, July 7, 2024

मांसाहारी माणसं.



कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं.


कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं.


आपण मांसाहारी आहोत म्हणजे काहीतरी खास आहोत असं समजून, परग्रहावरून अवतरल्या सारखे कायम जमिनीपासून चार अंगुळे वर चालत नाहीत, मांसाहारी माणसं.


आपण मांसाहारी आहोत हे जगाला कळावे म्हणून गळ्यात तुळशीमाळेसारखी एखादी खूण घालून वावरत नाहीत, मांसाहारी माणसं.


उभी हयात शाकाहारी माणसांकडे पाहून नाके मुरडण्यात धन्यता मानत नाहीत, मांसाहारी माणसं.


आपण मांसाहारी आहोत हाच सज्जनतेचा पुरावा मानावा असा अट्टाहास बाळगत नाहीत, मांसाहारी माणसं.




मांसाहार हाच कसा ग्रेट आहे, हे सांगण्यासाठी वैज्ञानिक परिभाषेत अवैज्ञानिक दावे करीत नाहीत, मांसाहारी माणसं.


दाण्याने कंच भरलेली शेतातील कणसे पाहून उद्या हे धान्य कुणाचे तरी भक्ष्य होणार म्हणून शोकगीत गात आपल्या हळव्या संवेदनशीलतेचे बटबटीत प्रदर्शन करीत नाहीत, मांसाहारी माणसं.


एरवी कुणाच्या करांगुलीवर लघुशंका करण्याइतकेही औदार्य स्वतःपाशी नसताना उगाच जगाच्या कल्याणा मांसाहाराचा प्रचार करीत फिरत नाहीत, मांसाहारी माणसं.


सर्वांनी खाऊन पिऊन सुखी असावं. आपण जे खावं, प्यावं, ल्यावं त्याचंच अर्घ्य देवाला दाखवून दैवतांचेही मानुषीकरण करावं, इतकं साधं निर्व्याज जगतात, मांसाहारी माणसं.


रानातील झाडाने ऋतुकाळाप्रमाणे फुलांनी डवरावं कधी पानगळीनं शहारावं तसं अगदी ताजं, स्वच्छ निर्मळ जगतात, मांसाहारी माणसं.

धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय





१. बाह्मणांनी सर्व भर विद्येवर दिला आहे त्यांची अशी शिकवण आहे की विद्याच अथ (सुरवात) आहे आणि विद्याच इती (शेवट) आहे. यापुढे कशाचाही विचार करण्याची आवश्यकता नाही


२. याविरुद्ध बुद्ध सर्वांकरिता विद्या, सर्वांना शिक्षा याचा पक्षपाती होता. याशिवाय मनुष्य प्राप्त ज्ञानाचा, विद्येचा उपयोग कसा करतो यात बुद्धाला अधिक रुची होती. ज्ञानासाठी ज्ञान यात त्याला काही गम्य नव्हते.


३. परिणामस्वरूप त्याचा आग्रह होता की, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे शीलही असलेच पाहिजे. शीलाशिवाय ज्ञान म्हणजे अनर्थाला आमंत्रणच.


४. भिक्खू पटीसेनाला बुद्धाने जे सांगितले त्यात बुद्ध प्रज्ञेच्या तुलनेने शीलाला अधिक महत्त्व देतो हे स्पष्ट आहे.


५. प्राचीन काळी बुद्ध श्रावस्ती येथे वास करीत होते तेव्हा त्याच वेळी श्रावस्ती येथे पटीसेन नावाचा वृद्ध याचक वास्तव्याला होता. तो प्रवृत्तीने मंदमती आणि मूढमती होता. त्याला एका गाथेचे अध्ययन करणेही कठीण होते.


६. अशा स्थितीत बुद्धाने पाचशे अर्हतांनी क्रमाक्रमाने एक एक दिवस त्याला शिकवावे अशी व्यवस्था केली. तीन वर्षे उलटून गेली तरीही त्याला एकही गाथा मुखोद्गत करता आली नाही. 


७. तेव्हा त्या जनपदातील सर्व प्रकारचे लोक (चारही वर्गातील लोक) त्याचे अज्ञान जाणून त्याची निंदा करू लागले. त्याची टवाळी करू लागले. बुद्धाला त्याची दया आली. बुद्धाने त्याला आपल्या निकट बोलाविले आणि मृदु मधुर स्वरात पुढील गाथा कथन केली. "ज्याची वाणी संयत आहे. ज्याचे चित्त संयत आहे. जो कायेने कोणावरही आघात करीत नाही असे आचरण करणाऱ्या माणसाला निर्वाण प्राप्त होते."


८. पटीसेन तथागताच्या करुणेने हेलावला. त्याचे चित्त प्रमुदित झाले. त्याने गाथा पुनरुक्त केली. मुखोद्गत केली.


९. बुद्धाने त्याला पुढे असा उपदेश केला की, "हे वृद्ध भिक्खू, तुला फक्त एकच गाथा अवगत आहे. इतरांना याची माहिती आहे. ते तुझी निदा करतील. म्हणून मी तुला या गाथेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून सांगणार आहे. तू सावधान चित्ताने तो ग्रहण करावा


१०. त्यानंतर बुद्धाने कायेचे तीन अकुशल कर्म, वाणीचे चार अकुशल कर्म आणि चित्ताचे तीन अकुशल कर्म त्याला स्पष्ट करून सांगितले. त्याला हेही स्पष्ट करून सांगितले की या अकुशल कर्मापासून विरत झाल्यास माणसाला निर्वाण प्राप्त होते. बुद्धाने त्याला अशाप्रकारे देशना दिल्याने त्या भिक्खूला सत्याचे ज्ञान झाले. तो अर्हत पदास प्राप्त झाला.


११. याचसमयी पाचशे भिक्खुनी विहारात वास्तव्याला होत्या. त्यांनी बुद्धाकडे आपणा पैकी एकीला पाठविले आणि प्रार्थना केली की, त्यांना धम्मोपदेश देण्यासाठी भिक्खू पाठवावा.


१२. त्यांची प्रार्थना बुद्धाने स्वीकारली. बुद्धाने अशी मनीषा व्यक्त केली की पटीसेनाने त्यांच्याकडे जावे आणि त्यांना धम्मोपदेश द्यावा.


१३. ही व्यवस्था केली आहे हे ऐकल्यावर त्या सर्व भिक्खुनी हसू लागल्या त्यांनी सर्वांनी असे ठरविले की, भिक्खु पटीसेन उद्या आल्यावर त्या गाथेचे उलटे पठन करावे म्हणजे तो वृद्ध भिक्खु गोंधळून जाईल व लज्जित होईल


१४. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भिक्खू आला तेव्हा सर्व लहान थोर भिक्खुनींनी त्याचे स्वागत केले. त्याला वंदन केले. असे करताना त्या एक दुसरीकडे पाहून स्मित करीत होत्या


१५. त्यांनी त्या भिक्खूला आसन प्रदान केले. तो आसनस्थ झाल्यावर त्याला त्यांनी अन्नदान केले अन्न ग्रहण करून कर प्रक्षालनानंतर त्यांनी त्या भिक्खूला धम्मोपदेश द्यावा अशी प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना स्वीकारून भिक्खू पटीसेनाने धम्मासन ग्रहण केले आणि धम्मोपदेशास प्रारंभ केला


१६. "भगिनींनो, मी अल्पबुद्धी आहे. माझे ज्ञान सीमित आहे. मला फक्त एकच गाथा अवगत आहे. मी ती गाथा आपणापुढे कथन करणार आहे. मी त्या गाथेचा अर्थही आपणास स्पष्ट करून सांगणार आहे. तुम्ही हा उपदेश सावधान चित्ताने ग्रहण करावा आणि समजून घ्यावा.


१७. त्यानंतर सर्व युवा भिक्खूंनीनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु हे काय । त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही. त्या लज्जित झाल्या त्या दुःखी कष्टी झाल्या त्यांच्या माना लज्जेने खाली वाकल्या.


१८. पटीसेनाने ती गाथा गायिली. ज्याप्रमाणे बुद्धाने त्याला ती गाथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाधेचा अर्थ विशद करून सांगितला.

कोण संविधान बदलणार ?

 

कोण संविधान बदलणार ?








सर्व म्हणतात ,आम्ही संविधान बदलू, आम्हाला संविधान बदलावे लागेल, आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत, संविधान बदलल्याशिवाय पर्याय नाही. हि भाषा गेली 70 वर्षांपासून बोलली जात आहे. यात मुख्य समस्या म्हणजे यातले काही महानग IPC (Indian Penal Code) लाच संविधान समजतात. संविधान आणि IPC यातला फरकच आजून या लोकांच्या लक्षात आला नाही ते लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. खरे तर ज्या लोकांनी संविधान बदलण्याची भाषा केली त्यांचा संविधानाचा अभ्यास 0% इतका आहे. यातल्या कोणीही संविधान पूर्णपणे वाचून बघितलेले नाही. 


ज्यांनी कोणी दोन चार कलमे वाचली असतील त्यांना त्याचा अर्थही समजला नसेल. एखादी कादंबरी, एखादी कविता, एखादी कथा वाचण्याइतके संविधान वाचणे सोपे नाही. आणि कोणी जनिवपूर्वक वाचलेच तर ते समजणे सोपे नाही. मला तर असे वाटते की संविधान बदलण्याची भाषा करणारे ते लोक आहेत ज्यांना बारावीला सायन्स शाखा अवघड वाटली म्हणून पदवी ला कला शाखेत प्रवेश घेतला असेल. या लोकांना ना सायन्स समजले आहे ना कला शाखा. अशा लोकांना संविधान काय समजेल. 


    मुळात भारताची संविधान सभा हि जगातली सर्वात ज्यास्त विद्वान असलेल्या लोकांची सभा होती. कारण या संविधान सभेत 100 हुन अधिक लोक हे बॅरिस्टर होते. भलेही तत्कालीन परिस्थितीत भारताची साक्षरता कमी असली तरी संविधान सभा मात्र उच्च शिक्षित लोकांनी गच्च भरलेली होती. अशा विद्वान लोकांनी दोन वर्षे, अठरा महिने आणि सतरा दिवस चर्चा करून हे संविधान तयार केले आहे. म्हणूनच प्रसिद्ध ब्रिटिश लेखक ग्रॅनव्हिल आॅस्टिन यांनी भारतीय संविधानाला ‘राष्ट्राची कोनशीला’ असे संबोधले आहे.


 महत्वाचे म्हणजे हे संविधान तयार होण्यापूर्वीच भारतात संविधानाचे 7 मसुदे तयार होते, जे कि संविधान सभेला सदरही केले होते पण या सात पैकी संविधान सभेने कोणताही मसुदा स्वीकारला नाही. महत्वाचे म्हणजे यात भारताच्या स्वातंत्र्याची लढाई लढणारे आणि संविधान सभेत बहुमत असलेले काँग्रेस चे सर्वेसर्वा  महात्मा गांधी यांचा देखील एक मसुदा होता जो स्वतः महात्मा गांधी यांनी मागे घेतला. आपण या सातही मसुद्यावर नजर टाकली तरी असे लक्षात येते की, हे सातही मसुदे कोण्या साधारण व्यक्तींनी तयार केलेले नव्हते. यात प्रामुख्याने खालील मसुद्यांचा समावेश होता. 


1. मोतीलाल नेहरु यांनी 1928 मध्ये ‘द नेहरु कमिटी रिपोर्ट’ च्या मध्यमातून पहिला मसुदा  तयार केला होता. 


2. मानवेंद्रनाथ राॅय यांनी 1944 मध्ये  ‘काॅन्स्टिट्याूशन फाॅर फ्री इंडिया’ या नावाने न्या. मू. श्री. वि. म. तारकुंडे, प्रा. गोवर्धन पारिख व प्रा. विनयेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या सहकार्याने 137 कलमांचा भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. 


3. हिंदू महासभेने 1944 मध्ये ‘ काॅन्स्टिट्युशन आॅफ हिंदुस्थान फ्री स्टेट’ या नावाने संविधानाचा आराखडा तयार केला. 


4. नारायण अगरवाल यांनी 1946 मध्ये ‘हिंसेचे पर्यवसान केंद्रीकरणात होते; अहिंसेचे मर्म .विकेंद्रीकरणात आहे.’ या गांधीवादी तत्त्वाच्या आधारावर ‘द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर  फ्रि इंडिया’ या शीर्षकाखाली 22 प्रकरणात विभागलेला 60 पानांचा व 290 कलमांचा भारतीय संविधानाचा आराखडा तयार केला. 


5. समाजवादी पक्षाने 1948 मध्ये  ‘ड्राफ्ट काॅन्स्टिट्युशन आॅफ द इंडियन रिपब्लिक’ या नावाने 27 प्रकरणात विभागलेला व 56 पानांचा व 318 कलमांचा संविधानाचा आराखडा तयार केला. 


6. याच दरम्यान डाॅ. बी. आर. आंबेडकरांनी 1947 मध्ये ‘स्टेट अॅन्ड मायनाॅरिटीज,  त्यांचे अधिकार आणि स्वतंत्र भारताच्या संविधानात त्यांना संरक्षण कसे द्यावे’ या अनुशंगाने एक आराखडा तयार केला होता. 


7. या व्यतिरिक्त ‘द रिव्होल्युशनरी (हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीक असोसिएशन 1925) या संघटनेने 1928 मध्ये ‘पुर्ण स्वराज डिक्लेरेशन 1930’ या शीर्षकाचे 4 पानांचे व 25 कलमांचे एक मेमारंन्डम तयार केले होते. 


आता प्रश्न असा शिल्लक राहतो कि, जर 1947-48 पूर्वीच संविधानाचे इतके मसुदे तयार होते तर यातला कोणताही एक मसुदा स्वीकारून देशाचा कारभार करता आला असता. महात्मा गांधी तर संविधान सभेत बहुमत असलेल्या काँग्रेसचे नेते होते, शिवाय मोतीलाल नेहरू यांनाही काँग्रेस आदर्श मानत होती यांच्यापैकी कोणत्याही एकाच मसुदा काँग्रेस ने सहज स्वीकारला असता. हिंदू महासभेनेही आपले धार्मिक वजन वापरून तत्कालीन परिस्थितीत सरकारवर दबाव आणून आपला मसुदा मंजूर करून घेतला असता. पण असे काहीही झाले नाही किंवा असा कोणीही प्रयत्न केला नाही. उलट आपले स्वतःचे सर्व मसुदे या नेतेमंडळींनी बाजूला ठेवले आणि संविधानाचा स्वतंत्र मसुदा तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली. 


संविधान सभेत 100 हुन अधिक लोक बॅरिस्टर असताना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच निवड का केली गेली? मुळात या शंभर पैकी कोणीही मसुदा तयार करण्यास तयार नव्हता. म्हणून संविधान सभेने ब्रिटिश संविधान तज्ञ विलियम आयव्हर जेनींग याना निमंत्रित करण्याचे ठरविले. प. नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी जेनींग यांची भेट देखील घेतली. पण जेनींग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमच्याकडे असताना माझी आवश्यकता का भासतेय? 


असा उलट प्रश्न विजयालक्ष्मी पंडित यांच्या मार्फत संविधान सभेला विचारला. यावर संविधान सभेने उत्तर न देता थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे येतील यांच्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला ते बाहेर राहावेत यासाठी प्रयत्न करणारे सर्व नेते देखील त्यांना निवडून आंण्यासाठी प्रयत्न करू लागले. शेवटी एका बॅरिस्टर चा राजीनामा घ्यावा लागला आणि त्यांच्या जागी  दुसरा बॅरिस्टर निवडून आणावा लागला. अन्यथा संविधान सभेला मसुदा समितीसाठी योग्य उमेदवार भेटलाच नसता.  बॅ. तेजबहाद्दूर सप्रु, बॅ. एम. महादेवन यांनी तर स्पष्टपणे संविधान सभेला नकार कळवला होता. 


तत्कालीन परिस्थितीत संविधान सभेत 100 हुन अधिक बॅरिस्टर असताना अशी अवस्था होती तर आजच्या संसदेची काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा. आज संसदेत जे लोक बसले आहेत त्यांच्या डिग्रीचा शोध घेता घेताच पुढचे 70 वर्ष निघून जातील. जे नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत त्यांनी आपल्या पदव्या, कायद्याचे ज्ञान जाहीर करावे व त्यांच्या अनुयायांनी आपल्या नेत्यांची औकात तपासून बघावी म्हणजे त्यांना लक्षात येईल की आपण कोणाला नेता मानतो आणि कोणाचे समर्थन करतो. 


अशा अंध भक्तीने प्रभावित कार्यकर्ते आणि नेत्यामुळे संविधानच नाही तर लोकशाही आणि इथला प्रत्येक माणूस देखील अडचणीत सापडला आहे. 1952 च्या निवडणुकीवेळी आमचे पूर्वज अशिक्षित होते पण त्यांनी विद्वान नेते निवडले आज आम्ही सुशिक्षित झालो आणि अडाणी नेत्याच्या मागे फिरू लागलो. त्याचे परिणाम आमच्या भविष्यावर पडत आहेत.


 पण आम्ही आमच्या नेत्याचं ऐकून संविधानाला दोष देत बसलो आहोत. यातून आम्हाला बाहेर यावं लागेल. जर बॅरिस्टर असलेले महात्मा गांधी, बॅरिस्टर असलेले हिंदू महासभेचे सावरकर यांनी आपले संविधानाचे  मसुदे मागे घेतले असतील तर आज तुमच्या अडाणी नेत्यांची संविधान बदलण्याची आणि दुसरे संविधान तयार करण्याची औकात काय असेल? याचा विचार त्यांच्या विद्वान अनुयायानीच करावा हीच त्यांना नम्र विनंती असेल. 

                     -----------------------------प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 


( लेख अच्छा लगे तो प्रोत्साहन राशि भेट स्वरूप दे ..दूरध्वनी : ९७०२ १५८ ५६४)

 

 


                                             लेख आवडला तर  धम्मदान करा   .......... 

अपील : मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे . 

 

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

जय भीम ! नमो बुद्धाय ! 

 




आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती

 आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता, परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या  भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, 

    तेव्हापासून रावणाचा  विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही! अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त राहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की 'काका! आपण तीर्थयात्रेला जावे'. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि  कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! 

    याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत  आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. 

    लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने  मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त, भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. 

    आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !!  सोबत काही घेऊन आलो नाही व  जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!!*

सुंदर बाराखडी

 किती सुंदर बाराखडी


अ : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.

आ: आत्मा कुणाचाही दुखवू नये.

इ : इच्छाशक्ती प्रबळ असावी.

ई : इमानदारीने काम करावे.

उ: उपकार कुणाचाही घेऊ नये.

ऊ : ऊठसूट कुणाकडे धावू नये.

ए : ऐतखाऊ बनून जगू नये.

ऐ : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.

ओ : ओझे कुणावरही होऊ नये.

औ : औकात कृतीतून सिद्ध करावी.

अं : अंदाजे तर्क - वितर्क करु नये.

अ: : अ:! वा शब्द बोलावेत.

क : कपट मनी कधी नसावे.

ख : खरं तेच आपलं म्हणावं.

ग : गर्व,अहंकार करु नये.

घ : घमेंड कशाचीही करु नये.

च : चमचेगिरी करु नये.

छ : छळ कुणाचाही करु नये.

ज : जपून जपून शब्द वापरावेत.

झ : झऱ्यासारखं निर्मळ असावं.

ट : टणक असावे पोलादासारखे.

ठ : ठकास नेहमी महाठक असावे.

ड : डर मनात बाळगू नये.

ढ : ढगांसारखंच प्रेम बरसावं.

ण : ण...ऐकणाऱ्यांस शिकवू नये.

त : तक्रार करुनी जगू नये.

थ : थंडपणा कामात असू नये.

द : दगडासारखा निर्दयी असू नये.

ध : धनांत लालच असू नये.

न : नम्रशब्दातून मन जिंकावे.

प : पटकन हो - नाही म्हणू नये.

फ : फजिती कुणाची करु नये.

ब : बडबडीपेक्षा कृती करावी.

भ : भय मनात बाळगू नये.

म : मजबुरीचा फायदा घेऊ नये.

य : यशासाठी मनी तळमळ असावी.

र : रंग सरडयासम बदलू नये.

ल : लबाड संगत करु नये.

व : वजन कृतीतून सिद्ध करावे.

श : शहाणपणाने जीवन जगावे.

ष : षडयंत्र कधी रचू नये.

स : सहनशक्ती अंगी असावी.

ह : हसून उपहास करु नये.

ळ : लबाळपणाने जगू नये.हे 

क्ष : क्षमा, मन-हृदयातून करावी.

ज्ञ : ज्ञान परिसाला अखंड स्मरावे

अंग्कोरवाट महाविहार

 



कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकांची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!

समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.


अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!

खरेतरं, अविश्वसनीय!

त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती!

हे एक बुद्ध विहार होते. नाव होते, 'अंग्कोर वाट'!

एक महाविहार ! भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक महाकाय बुद्ध विहार !

आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे वंदना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.

एवढे अवाढव्य वंदना स्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!


एका कंबोडियन बौद्ध सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! इसवीसन ११५०च्या सुमारास!

मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...

५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' विहार आहे, भगवान बुद्धांचे...!

 मुख्य प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! विहाराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे!

४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच विहाराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, विहारात नाही!

पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य विहाराजवळ येतो!


तत्कालीन कंबोडियन बौद्ध राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य विहार घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या आश्चर्यांपैकी एक मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल!

 'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!

दुसऱ्या सुर्यवर्मनने हे विहार घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!


लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या विहारासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!

४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम. 


दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य  महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ! 

त्याला त्याच्या जिवनकालातचं हे विहार पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!

सारेचं अवाढव्य!

डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य!


या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम!

आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.

एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. 

या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!

अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती  महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य विहाराची सुरुवात!


या सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर विहाराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले  चार  कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!

हे विहार पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख!


युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर!

बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, बौद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!

( हे भरभराटीला आलेले शहर, विहार पुढच्या दोन-तिनशे वर्षांत, ओसाड पडेल, असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल....)

आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या विहाराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते!

या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत!

पौराणिक कथा, सिद्धार्थाचे जीवन आणि दुसऱ्या सुर्यवर्मनची कारकिर्द दगडात कोरलीयं!

विहारात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा!

अविश्वसनीय आणि अतर्क्य!


ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं!

हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!

 हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक  छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.

मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच,

तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परत सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची!


असे अवाढव्य बुद्ध विहार बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात उतरवने हे सारेचं अफलातून!

असे म्हणतात की या विहाराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता.

धन्य ती सारीचं मंडळी!

हे असले काही भव्यदिव्य पाहिले की हात आपोआप जोडल्या जातात. भारतीयांच्या तत्कालीन स्थापत्यज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो आणि आपल्याला किती महान संस्कृतीच्या ओटीत बाबासाहेबांनी टाकलय याची जाणीव होते! पण दुर्दैव असे की या महाकाय बौद्ध विहाराच्या उल्लेख विष्णू मंदिर असा केला जातो आणि भारत देश तेथे धार्मिक सहलीचे आयोजन करीत आहे, भारतातील सर्व बौद्धांनी या जागतिक वारसाला भेट देऊन एका दैदिप्यमान स्मृतीला वंदन केले पाहिजे. आणि खोटा इतिहास सांगणारे व लिहिणारे यांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजे.

या जगाला युद्धाची गरज नाहीच. फक्त बुद्धाची गरज आहे हे इतर देशांनी हजारो वर्षापूर्वी ओळखले आणि युद्ध सोडून बुद्धाला शरण आल्याचे हे जीवंत उदाहरण आहे.

                                         

स्त्री_आणि_अंधश्रद्धा

 






गाढवाला सुरुवातीला मालक बांधून ठेवतो, पळून जाऊ नये म्हणून पण नंतर ते त्याच्या सवयीचे होते आणि मालकाने नुसती बांधायची ॲक्शन केली तरी ते पळून जात नाही. न बांधता पण गाढव जागेवर उभे रहाते

पिंजऱ्याची सवय लागली आणि पोपट उडायचे विसरला की त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढले तरी तो उडत नाही .आपल्याला उडून स्वतंत्र होता येते हेच तो विसरतो

  

लोकांना वाटते स्त्री शिकली आता तिला पूर्वी सारखे बंधनं नाहीत. ती आता मुक्त जगेल पण नाही हो या बेड्यांची सवय झालीय तिला आणि त्या बेड्या आता अलंकार समजून ती अभिमानाने मिरवतेय. त्या बेड्या आहेत आणि तुझी गुलामगिरी संपली तरी तू मानसिक गुलामीत जगतेय याची तिला जाणीव करून द्यावी लागेल

  

आत्ता नुकतीच हाथरस येथे एका सत्संगात चेंगरा चेंगरीची घटना घडली. ही काही चेंगरा चेंगरीची पाहिलीच घटना नाही. जिथे धार्मिक कार्य तिथं स्त्रियांची गर्दी जास्त, ही गर्दी प्रमाणा बाहेर गेली की चेंगरा चेंगरी आणि मृत्यू


स्त्री अंधश्रद्धेतून बाहेर काढायची असेल तर आधी ती या अंधश्रद्धेत कशी अडकली हे पहावे लागेल


1.शिक्षणाचा अभाव

पूर्वी स्त्री शिक्षण कोणत्याच धर्मात दिले जात नसायचे.धार्मिक पोथी वाचणे म्हणजे शिक्षण नव्हे. अगदी 18 व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशात पण ही बंदी होती. काही शिक्षण स्त्रीसाठी वर्ज्य होते त्यामुळे ती अज्ञानी राहिली त्यामुळे सहज अंधश्रद्धा, चुकीच्या समजुतींना बळी पडली. धर्माभिमानी झाली... कारण जीवनात संसार आणि मुलं यांच्यापलिकडे फक्त धार्मिक गोष्टीचं तिला मन रमवायला आणि पालन करायला होत्या


2.निर्णय_स्वातंत्र्य_नसणे -

आजही कित्येक घरात स्त्रियांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. पूर्वी तर नव्हतेच त्यामुळे तिला स्वतःची ईच्छा पूर्ण करण्याचे माध्यम म्हणजे देव मग नवस, उपवास, प्रार्थना या माध्यमातून स्वतःची मागणी देवापुढे मांडणे हाच तीचा मार्ग,


3.पुरूषसत्ताक_व्यवस्था

स्त्रीला कपडा आणि अन्न दिले की तिला काही समस्याच उरली नाही असे समाजाला वाटते पण तिला अनेक समस्या आणि शारीरिक व्याधी यांना सामोरे जावे लागते. घरातील लोक अपमानकारक वागणूक देत असतात, या सगळ्यांवर उपाय तिला या बाबा, बुवा(सर्व धर्म) यांच्याकडे  सापडतो.. तो बाबा जो उपाय सांगतो ते ती करायला तयार असते कारण अज्ञान आणि निर्णय क्षमतेचा अभाव. नंतर त्यात वाहवत जाते अगदी कुटुंबाचे पण ऐकत नाही


4.समाजाची_मानसिकता

स्त्री स्वतःचे,छंद आवड जपण्यासाठी फार काळ बाहेर रहात असेल तर सामाजिक कार्य किंवा पिकनिक निमित्त बाहेर जात असेल तर सामान्य मध्यमवर्गीय, गरीब लोकं आजही पचवत नाहीत त्यापेक्षा ती प्रवचन, किर्तन, भजन यासाठी अगदी रात्री एक पर्यंत बाहेर राहिली तरी चालते मग तिचा कल याचं गोष्टींकडे वाढत जातो


5. बुवांची_हातोटी

कोणताही बुवा स्त्रियांनी कशी संस्कृती जपली पाहिजे,  स्त्रीला बंधन कसे गरजेचे आहे हे सांगत असतो, अगदी मधाळ भाषेत स्त्रीची थोरवी गात असतो पण ती थोरवी कशात आहे तर या बुवांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्यात, अगदी बाबा बुवा अशा स्त्रियांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक शोषण करतात तरी यांची तक्रार नसते. हे आपल्या भल्यासाठीच चालले आहे असे त्यांना  वाटते

हिप्नोटाईज होतात स्त्रिया

घरी पण नवऱ्याने प्रेम दाखवत गोड बोलून तिला काहीही करायला लावले तर ती सगळ्या समाजाशी अगदी स्वतःच्या आईबापाशी पण पंगा घेईल एवढी हिप्नोटाईज होते, तर या गोष्टीतून स्त्री ला बाहेर काढणाऱ्या, तिच्या शोषणाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटना निर्माण होणे गरजेचे आहे. त्याला सपोर्ट करावा समाजाने, स्त्रीचे प्रबोधन होणे ही गरज आहे, नाहीतर अशा घटना घडत रहाणार



स्तूपाचे प्रकार आणि त्यांचे महत्व

 


तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर एकूण नऊ स्तुपाची निर्मिती करण्यात आली होती त्यापैकी आठ स्तूप हे बुद्धाच्या शरीर धातू वर आणि नववा स्तूप ज्या पात्राने अस्थीचे वाटप केले होते त्या पात्रावर निर्माण करण्यात आला. ते अश्या प्रकारे-

१) राजग्रह स्तूप

२) वैशाली स्तूप

३) कपिलवस्तू स्तूप

४) अलाकप्पा स्तूप

५) रामग्रामा स्तूप

६) पावा स्तूप

७) कुशीनगर स्तूप

८) वेथाडीपीपा स्तूप

९) पिप्रहवा स्तूप

म्हणजे स्तूपची संकल्पना बुद्धाच्या अस्थीचे जतन करणे व संवर्धन करणे होय. सम्राट अशोक राजाला सात स्तुपातील अस्थी मिळविण्यात यश आले, परंतु ८व्या स्तुपातील अस्थी मिळवू शकले नाही तो म्हणजे रामाग्राम स्तूप. रामा ग्रामच्या नाग लोकांनी सम्राट अशोक यांना अस्थी देण्यास नकार दिला होता इतकेच नाही तर जर जबरदस्ती करत असाल तर आम्ही युद्ध करू, परंतु सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धा नंतर परत कधीही युद्ध करणार नाही असा निश्चय केला होता, म्हणून अस्थी नाही मिळाल्या तरी चालेल पण युद्ध नको अशी सम्राट अशोक राजांनी भूमिका घेतली, व उर्वरित ७ स्तूपा मधील अस्थी वर सम्राट अशोक राजाने ८४,००० स्तुपाची निर्मिती केली.


🎯स्तुपाचे एकूण चार प्रकार :

१) शारीरिक स्तूप : बुद्धाच्या अस्थी धातू वर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला शारीरिक स्तूप म्हणतात.

२) परिभोगीका स्तूप, ऑब्जेक्ट स्तूप : बुद्धाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू व त्यावर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला परिभोगिका स्तुप किंवा object स्तुप म्हणतात.

३) कॉममोमोरॅटिव्ह स्तुप, सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशिका स्तुप : बुध्दाच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या व जिथे जिथे घडल्या. बुध्दा नि ज्या ज्या ठिकाणी प्रवचन दिले किंवा धम्म उपदेश दिले त्या ठिकाणावर जे स्तुप निर्माण केले त्याला सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशीका स्तूप असे म्हणतात.

४) वोटिव्ह स्तूप, मन्नत स्तुप : आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण वरील स्तूपात जाऊ शकत नाही त्या करिता पूजेचे स्थान निर्माण केले जाते व त्यावर स्तूप निर्माण केल्या जाते त्याला वोटिव्ह स्तूप किंवा मन्नत स्तुप असे म्हणतात. असे स्तूप बहुदा केणी मध्ये निर्माण केले जाते.

स्तुप एकूण आठ गटा मध्ये विभागले आहे :

१) जोथा : जोथा म्हणजे स्तुपाचा पाया किंवा खालचा भाग याला कधी कधी तीन रिंग असतात.

२) मेधी : हा जोथाच्या वरचा भाग व उंच असतो.

३) वेदिका : मेधीच्या वरचा भाग त्याला वेदिका असे म्हणतात.

४) वेदिका पट्टी : वेदिकेच्या वरचा भाग याला रेलिंग असतात हा भाग चक्रमण करण्या करिता उपयोगात येतो.

५) अंड : वेदिकाच्या वरचा भाग हा गोलाकार  असतो त्याला अंड असे म्हणतात.

६) हार्मिका : हा अंडच्या वरच्या भागावर हर्मिका असतात त्या कधी तीन तर कधी पाच असतात.

७) यशठी : हा हर्मिकेचा वरचा भाग की जो छत्रावलीला सपोर्ट करतो.

८) छत्रावली : हा स्तुपाचा सर्वात उंच व शेवटचा भाग होय.


उपलब्ध असलेले भारतातील स्तूप :


१) सांची स्तूप :

सांची स्तूप हा मध्यप्रदेश मध्ये असून भोपाल पासून २५ किमी अंतरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. त्याचे उतखणन केले असता तिथे बुध्दाचे शिष्य सारीपुत्त आणि महा मोग्गलांन यांच्या अस्थी मिळाल्या आहेत. १९८९ ला या स्तूपाला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाला आहे. यांचा शोध जेव्हा मध्यप्रदेश मधून भीमा कोरेगाव च्या युद्धाला मदत करण्या करिता एक बटालियन निघाली होती परंतु यूद्धाचा शेवट दुसऱ्याच दिवशी झाल्यामुळे ते परत जात असता एका ठिकाणी थांबले व दुसरे दिवसी एका टेकडी वर शिकारीला गेले असता तिथे त्यांना काही मानव निर्मित भाग दिसून आला त्याचे उतखणन केले असता सांची स्तुपाचा शोध लागला.


२) द ग्रेट स्तूपा ऑफ अमरावती :

हा स्तूप इ.स. पूर्वी तिसऱ्या शकतात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. याचा बराच भाग नष्ट झाला आहे. त्याचे काही शिल्प आणि आर्ट मद्रास संग्रहाय्यत  मध्ये सुरक्षित ठेवले आहे. १७९७ मध्ये ब्रिटिश आर्चलोजीस्ट मेजर कोलिन मॅकेन्झी  यांनी त्याचा शोध लावला व त्याचा प्लॅन तयार केला.


३) धामेक स्तूप :

हा स्तूप सारनाथ येथे असून सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे व मेजर जनरल सर  अलेक्जेंडर कनिंघहॅम पाच पंच वर्गीय भिक्कुना प्रथम उपदेश दिला असा उल्लेख आहे . 


४) चौखंडी स्तूप ;

हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप चौरस असून त्याला आठ बाजू आहेत. याच ठिकाणी जे पाच मित्र होते ते बुध्दाला सोडून गेले होते. आठ बाजू म्हणजे आर्य अष्टणगीक  मार्ग चे प्रतीक आहे. हा स्तूप सारनाथ जवळ आहे.


५) बहरुत स्तूप :

बहरुत स्तूप हा सटना मध्यप्रदेश येथे आहे, हा स्तूप ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला. हा स्तूप सम्राट अशोक ने प्रथम निर्माण केला. हा स्तूप बराच नष्ट झाला असून त्याचे काही भाग कलकत्ता म्युझियम येथे सुरक्षित ठेवले आहे. या स्तूपाचे संवर्धन सम्राट शुंग ने इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकात केले. आता तिथे फक्त काही अवशेष शिल्लक आहे. यांचा शोध सर अलेक्जेंडर कनिंघहॅम ने १८७३ मध्ये लावला. येथे काम करण्या करिता व शिल्प कलकत्ता म्युझियमला नेआण करण्या करिता ब्रिटिश सरकारने रेल्वे लाईन टाकली होती.


६) केसारिया बुध्द स्तूप :

केसारिया स्तूप हा बिहार मध्ये आहे. याच ठिकाणी बुध्दाचे महापरीनिर्वाण झाले. हा स्तूप सम्राट अशोक राजाने ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात निर्माण केला. कर्नल मॅकेन्झीयांनी १८१४ मध्ये याचा शोध लावला परंतु सर अलेक्जेंडर कनिंघहॅम यांनी १८६१-६२ मध्ये उतखनन करून याच ठिकाणी बुध्दाचे महापरी निर्वाण झाले ते सिद्ध केले.


७) देऊर कोठार बुद्ध स्तूप किंवा सोनारी स्तूप ;

हा स्तूप मध्यप्रदेश मध्ये आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी ८४,००० बुद्ध अस्थी धातूची वाटणी केली होती.


८) महाबोधी महाविहार किंवा महाबोधी स्तूप :

महाबोधी महाविहार याच ठिकाणी बुध्दाला ध्यान प्राप्ती झाली. सम्राट अशोक राजाने प्रत्यक्ष साईट वर हजर राहून या महाविहाराची निर्मिती केली. याच ठिकाणी संयाम देशाचे तपससू आणि भल्लिक यांना बुद्धाने केस धातू दान दिले. सर अलेक्जेंडर कनिंघहॅम यांनी १८८८ ला भेट दिली व बुध्दाचे वजरासन शोधून काढले.


९) भावीकोंडा बुध्द स्तूप किंवा महास्तूपा :

हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला. या स्तुपाचे जेव्हा उतखनन करण्यात आले तेव्हा बोन्स, पॉट, मंजुषा, जेम्स व कॉइन्स मिळाले. हा स्तूप आंध्रप्रदेश मध्ये आहे 


१०) देवणी मोरी स्तूप :

हा स्तूप गुजरात मध्ये आहे. या ठिकाणी बुद्धाच्या अस्थी मिळाल्या व त्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ येथे सुरक्षित ठेवल्या आहेत.


११) पवणी स्तूप :

हा स्तूप भंडारा जिल्ह्यात आहे. विदर्भात बौद्ध धम्माचे एक महत्वाचे ठिकाण होते तसेच याला व्यापारीक महत्व होते, तसेच ते दक्षिण भारत व उत्तर भारतला जोडण्याचे मध्यवर्ती ठिकाण होते. येथे सातवाहन सम्राट सातकरणी यांचे नाणे येथे उतखनन केले असता मिळाले. येथील काही शिल्प नॅशनल म्युझियम दिल्ली व मुंबई येथे सुरक्षित ठेवले आहे. अजून बरेच शिल्प इतस्थता विखूरले आहे. स्तुपावर अतिक्रमण करून जगन्नाथ मंदिर निर्माण केले..स्तूपाची निर्मित ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात झाली. त्याचा डायमीटर ३८.१० मिटर आहे. विदर्भातील नाग राजा मुच्चलिंद याला जेव्हा बुध्दाचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी समजली तेव्हा तो कुशीणाराला बुध्दाच्या अस्थी मिळविण्या करिता निघाला. जेव्हा तिथे पोहोचला त्यावेळी बुध्दाच्या अस्थीचे विभाजन झाले होते. ज्या ठिकाणी बुध्दाला अग्नी देण्यात आला त्या  ठिकाणावर तो गेला व त्याने हाताने सर्व माती गोळा केली त्यामध्ये त्याला दंत धातू अस्थी मिळाल्या व त्या दंत धातू अस्थी वर हा पवणी स्तूप निर्माण केला.


१२) सुलेमान टेकडी स्तूप :

हा स्तुप पवणी स्तुपा पेक्षा मोठा आहे. त्याचा डायमीटर ४१.६ मिटर आहे व हा पवनी येथे आहे. यालाच चांड कापूर स्तूप असे सुद्धा म्हणतात.


१३) हरदोलाल टेकडी स्तूप :

हा स्तूप पवणी येथे आहे. यांचे उतखनन केले असता एक मोठी दगडी शिल्प मिळाले. ते नागपूर च्या म्युझियम मध्ये सुरक्षित आहे. तसेच पवनीला एक किल्ला सुद्धा आहे.


४) सोप्पारका स्तूप ;

हा स्तूप नाला सोपारा यथे आहे. एप्रिल १८८२ ला पंडित भगवाण दास ईद्राजी या स्तुपाचे उतखनन केले असता स्टोन कास्केट, गोल्ड कास्केट, शिल्प तसेच आठ बुद्धाच्या भिक्षा पात्राचे तुकडे मिळाले व काही सोन्याचे फुले मिळाले, ते एसीयाटीक सोसायटी ऑफ इंडिया मुंबई येथे सुरक्षित आहेत. तर सम्राट अशोक चा ९ वा शिलालेख म्युझियम मध्ये सुरक्षित आहे. सोपारा एक बौद्ध धम्माचे व तसेच व्यापारी केंद्र होते. येथूनच सम्राट अशोक राजाने मुलगी संघमित्रा हिला बोध गया येथील बोधी वृक्षाची फांदी सुवर्ण पात्रात स्वतःच्या हाताने देऊन सिलोनला धम्म प्रचारा करिता रवाना केले.


१५) घारापुरी बुध्द स्तूप :

दिनांक २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले जवळपास १५० लोकांनी घारापुरी मौर्या कालीन प्राचीन स्तुपाला भेट दिली व स्तुपाचे महत्व जाणून घेतले. प्रशांत माळी यांनी लेणी संवर्धन कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. मुकेश जाधव यांनी आलेल्या लोकांचे आभार व्यक्त केले, तर रवींद्र सावंत यांनी घरापुरी स्तूपा बद्दल विस्तृत माहिती दिली. राहुल जाधव यांनी सम्राट अशोक यांचे काढलेले सुंदर स्केच  ला भेट दिले, तर पुणे येथून आलेले अनिल ननावरे यांनी बुद्ध स्तुपाची प्रतिकृती प्रशांत माळी यांना भेट दिली. तसेच आम्ही भारतीयच्या संघमित्रा बारसा कडे यांनी चित्रीकरण केले. एलिफंटा केव्ह हे वर्ल्ड हेरिटेज आहे, परंतु याच ठिकाणी दोन तीन किमीच्या अंतरावर मौर्य कालीन स्तूप आहे. जेव्हा पोर्तुगिज लोक महाराष्ट्रात आले तेव्हा ते लोक लेणी वर सराव करायचे. परंतु जेव्हा ब्रिटिश लोक आले त्यांनी मात्र भारतातील प्राचीन बौद्ध धरोधर यांचा शोध लावला. या स्तुपाचे त्यांनी उतखनन केले नाही, परंतु अओलख  बुद्धिस्ट मोनूमेंट म्हणून नोंद केली. हे ठिकाण अरबी समुद्र किनाऱ्यावर आहे. येथून जे एन पी टी  बंदर जवळ आहे. यांचे उतखनन होने बाकी आहे.


१६) पुष्पगिरी बुध्द स्तूप :

हे बुद्धिस्ट मॉनस्‌ट्‌रि ( ज्या ठिकाणी ऋषी-मुनी राहतात; मठ, मठ) आहे. ओडिसा मध्ये पुरी जिल्ह्यात आहे. बौद्ध धम्माचे एक महत्वाचे केंद्र होते, त्याच प्रमाणे ललितगिरी, रत्नागिरी व उदयगिरी येथे मोठ्या प्रमाणात  होत्या ते सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते. चायनीस प्रवासी युवानच्वांग यांनी सहाव्या शतकात भेट दिली असता इथे मोठ्या प्रमाणात संघाराम होते अशी नोंद केली होती. १९९० ला उदयगिरीच्या जवळ लंगुडी हिल येथे उतखनन केले असता (पुष्प सभर गिरिया) अश्या प्रकारचा शिलालेख मिळाला होता, म्हणून याला पुष्पगिरी हे नाव दिले, हे एक प्राचीन विद्या पीठ होते.


७) कोल्हापूर स्तूप :

इथे प्राचीन मौय कालीन प्राचीन स्तुप होता. ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात बौद्ध धम्माचे एक महत्व पूर्ण ठिकाण होते. इथे १३५ वर्षा पूर्वी उतखनन केले असता बुध्दाच्या अस्थी मिळाल्या होत्या. त्या कुठे आहे याचा शोध लागत नाही. तसेच मिरज हे सुद्धा बौद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते.


१८) भोन स्तूप ;

हा मौर्या कालीन स्तूप असून बुलढाणा जिल्यात शेगाव जवळ आहे. ई.स. पूर्वी तिसऱ्या शतकात हे ठिकाण बौद्ध धम्माचे एक महत्वपूर्ण ठिकाण होते. येथे उतखनन केले असता सातवाहन कालीन ५ नाणे मिळाले. सध्या इथे स्तूपा वर शेती करतात तर काही भागावर भोन गावची वस्ती आहे 


१९) अंगुलीमाल स्तूप :

हा स्तूप श्रावस्थी मध्यप्रदेश मध्ये आहे. या स्तूपाचे उतखनन १८६३ मध्ये करण्यात आले. याच ठिकाणी अंगुलीमाल आणि बुध्द यांची भेट झाली व अंगुलीमाल यांना भिक्कू संघात समाविष्ट करण्यात आले.


२०) अनाथ पिंडक स्तुप श्रावस्थी :

हा स्तूप अनाथ पिंडक यांनी निर्माण केला. हा कॉममोमोरेटिव्ह स्तुप आहे. अनाथ पिंडकने बुध्दाला व भिक्कू संघाला जेवणाचे निमंत्रण दिले होते ते याच ठिकाणी.


२१) महास्तूप नेला कोंडा पल्ली :

हा स्तूप खम्मान जिल्हा तेलंगणा येथे आहे. हे एक प्राचीन बुद्धिझमचे महत्वाचे ठिकाण होते, तसेच हे एक मंडलचे मुख्यालय होते. येथे प्राचीन मानवनिर्मित लेक आहे, तसेच इथे उतखनन केले असता १०० प्राचीन नाणे मिळाले, तसेच १९७६ ते १९८५ मध्ये उतखनन केले असता हा स्तूप ५४ फीट उंच आहे, ८४ फीट आतील डायमिटर  व बाहेर  १३८ फीट आहे. इथे सुद्धा नाणे,जमिनीत  मिळाले व ते विजयवाडा म्युझियम येथे सुरक्षित आहे. सम्राट सातवाहन यांनी या स्तुपाला अति भव्य बनविले.


२२) सिलिगुरी बुद्ध स्तूप :

वेस्ट बंगाल ही एक पूर्वी चे मठ  आहे. दलाई लामाने निर्माण केली आहे. यांची उंची १०० फीट आहे.


२३) अनेगुट्टी बुद्ध स्तूप :

हा स्तूप संनती स्तूपच्या उत्तरेला २ किमी अंतरावर आहे, इथे मोठ्या प्रमाणात हत्तीचे शिल्प दान दिल्याची नोंद आहे व सन्नती स्तूपाच्या प्रोटेक्शन करिता निर्माण केला आहे. हा स्तूप सम्राट सातवाहन यांनी निर्माण केला आहे.


२४) सन्नती महास्तूप, कनगनाहल्ली स्तूप :

सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप गुलबर्गा कर्नाटक येथे आहे. सम्राट अशोक यांनी पदभार स्विकारल्या नंतर १४ वर्षी भेट दिली व दुसरी भेट राज्याभिषेक झाल्या नंतर २० व्या वर्षी दिली व भव्य स्तूप बांधण्याच्या विषयी सूचना केली. व त्या नंतर सम्राट सातवाहन यांनी तिथे शिल्प कला विकसित केली.


२५) अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप, अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप :

हा आंध्रप्रदेश येथे आहे. वानेतीया नदीच्या किनाऱ्यावर असून सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा श्रीलकेला जात असते वेळी याच ठिकाणी थांबली होती. येथे १९५३ ला उतखनन केले असता धम्मचक्र मिळाले, त्याचा डाय मिटर १७ फीटचा होता.


२६) अमरावती स्तूप :

महाचैत्य स्तूप हा आंध्रप्रदेश मधील सर्वात मोठा स्तूप आहे, डाय मिटर ५० मीटर व उंची २७ मीटर आहे. यातील काही भाग मद्रास म्युझियम आणि ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवले आहेत. याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी भिक्कू महादेवा यांची नियुक्ती मनीषा मनडला म्हणून केली व त्याच्या वर हिमालयात धम्म प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.


२७) कुरुषेत्र बुद्ध स्तुप :

कुरुक्षेत्र किंवा हरियाणा हे बुद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते. सम्राट हर्षवर्धन यांच्या शासन काल मध्ये चिनी प्रवाशी हुएन सांग यांनी आपल्या प्रवास वर्णन मध्ये या ठिकाणी बुद्ध स्तुप असल्याचे वर्णन केले आहे. हे स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते. हा स्तूप कुरुक्षेत्र विद्यापीठच्या परिसरात आहे. हा स्तूप लुप्त झाला होता, परंतु स्थानिक बुद्ध अनुयायांनी यांचा पाठपुरावा केल्यामुळे ASI ने संवर्धनचे काम सुरु केले, तसेच दुसरा बुद्ध स्तूप यमुना नगर येथे आहे.


२८) गिरीयाक बुद्ध स्तूप :

हा स्तूप नालंदा प्राचीन विद्यापीठ पासून २२ ते २५ किमी अंत्तरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. हा स्तूप सिलेंड्रीकल असून त्याची उंची ३० फिट आहे, व चैत्यगिरी पर्वतावर आहे. इथे सुद्धा प्राचीन बुद्ध विद्यापीठ होते.


२९) सुजाता बुद्ध स्तूप :

हा स्तूप बोध गया च्या जवळ आहे. फाल्गु नदीच्या तिरावर हा स्तूप आहे. याच ठिकाणी सुजाताने सिद्धार्थ गौतम यांना खीर दान दिली होती. हा स्तूप ई.स. पूर्वी दुसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. ASI ने १९७३-७४ ला उतखनन केले असता देवापाल राज घराण्याचा शिलालेख मिळाला (देवापाला राजस्य सुजाता ग्रीह) हा स्तूप कॉममोमोरेटिव्ह स्तूप आहे. सातव्या शतकात जेव्हा चिनीस प्रवासी हुएन त्संग निरंजना नदी क्रॉस केल्या नंतर त्याने स्तूप, स्टोन कॉलम बघितल्याची नोंद आहे. तसेच या ठिकाणाला गंध हस्ती असे म्हटले जात असे. बुद्धाने खीर प्राशन केल्या नंतर त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली व बुद्धाने निष्कर्ष काढला की, जिवंत राहण्या करिता मानवाला अन्नाची आवश्यकता आहे.


३०) कनिष्क स्तुप :

हा स्तूप सम्राट कनिष्क यांनी निर्माण केला, यालाच शाहजी की ढेरी असे म्हटले जाते, तसेच याला हाऊस ऑफ बुध्दा रिलीक्स असे म्हटले जाते. हे एक प्राचिन स्तुप असून जगातील सर्वात उंच स्तूप आहे. हा स्तूप ई.स. पूर्वी पहिले शतक ते ई.स. नंतर पहिले शतक मध्ये निर्माण करण्यात आला. सुरुवातीला हा स्तूप लाकडी बनविण्यात आला व त्यावर precious स्टोन लावण्यात आले, एकूण १३ लेयर मध्ये निर्माण करण्यात आले. सर्वात उंचीवर कॉपरचे छत्र बसविण्यात आले. इथे १९०८-१९०९ ला ब्रिटिश ए एस आय  ने डेव्हिड ब्रेनार्ड ने उतखनन केले असता बुध्दाच्या अस्थी धातू मिळाल्या व त्या बर्मा येथे सुरक्षित आहेत, तर सम्राट कुशान च्या अस्थी पेशावर च्या म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. कुशान पिरेड हा गांधार शैली म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी चौथी धम्म सांगिती ७८ एडि  ला कनिष्क च्या अध्यक्षते खाली झाली होती. व तेव्हा पासून ई.वि. सणाची सुरुवात झाली. पूर्वीचे कनिष्कपूर व आताचे काश्मीर.


३१) शिंगारदार स्तूप :

तिसऱ्या शतकात निर्माण केले आहे. स्वात घाटी मध्ये ब्रिटिश ए एस आय  कर्नल डेने  आणि एस ए स्टेन  यांनी १८८६-१९३० मध्ये शोधून काढला. राजा उत्तरसेन जेव्हा बुध्दाच्या अस्थी घेऊन जात असतानी त्याचा हत्ती इथे थांबला होता, हा स्तूप स्वात राजाने निर्माण केला.


३२) एकसे आठ स्तुपा ऑफ चायना :

ही १०८ बुध्द स्तूपची गॅलरी हिल साईड ऑन दि वेस्ट बँक ऑफ येलो रिव्हर निनगा झिया  चीन येथे १०३८ ते १२२७ मध्ये वेस्टर्न जिया  राजवन्स ने निर्माण केले आहे. पश्चिमात्य देशामध्ये १०८ या नंबरला खूप महत्व आहे. १०८ स्तूपाच्या समोर दोन स्तूप होते ते १९५८ नष्ट झाले. १९८७ ला नुतनीकरण केले असता बुद्धिस्ट सूत्र धम्म लिपी मध्ये लिहिलेले आढळून आले, तसेच मातीचे स्तूप व त्यावरील झाकणे व त्यावर बुध्दाचे शिल्प व काव्य  आढळून आले. हे स्तूप एक सारखे नसून लहान मोठे आहे तसेच त्याची प्रतिकृती रथा सारखी आहे.


३३) बोरोबर स्तूप :

हा स्तुप जावा बेटावर इंडोनेशिया येथे आहे. हा स्तूप ७ व्या शतकात निर्माण केला. हा जगातील सर्वात मोठा बुद्धिस्ट स्तूप आहे. या स्तुपाला एकूण २६७२ पॅनल असून ५०४ बुध्द मूर्ती आहे. स्तुपाची रचना शष्ठकोनी असून वरचा भाग त्रिकोणी आहे..मुख्य गोलाकार घुमट मध्ये एकूण ७२ बुद्धाच्या मूर्ती आहेत. १८१४ मध्ये सर थॉमस स्टानफोर्ड राफेल  ने शोध लावला. १९७५ ते १९८२ या काळा मध्ये इंडोनेशीयन सरकारने मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले व त्याला वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केले.


३४) रुंमिन देवी स्तूप :

हा स्तूप नेपाळ येथे आहे. याच ठिकाणी बुध्दाचा जन्म झाला. सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. राज्याभीषेक झाल्या नंतर आठ वर्षानी या ठिकाणाला भेट दिली, व त्या गावाचा कर माफ केला. फक्त आठवा भाग देण्यात यावा अश्या प्रकारचा शिलालेख लिहिण्यात आला.


३५) शांती स्तूप लेह जम्मू अँड काश्मीर :

हा स्तूप १९८३ ते १९९१ या दरम्यान जपानी बौद्ध भिक्षु बुद्धाच्या २५०० व्या जयंती निमित्ताने व जगाला शांतीचा संदेश देण्या करिता डोंगर दऱ्या मध्ये निर्माण केला.


३६) द्रो डूल chorten स्तूप सिक्कीम :

हा स्तूप ट्रुलशिक  रिणपोचे आणि निंजमा  चे प्रमुख तिबेटन बुद्धिझम यांनी १९४५ मध्ये निर्माण केला. इथे एक साथ ७०० भिक्कू किंवा उपासक बसू शकतात.

ट्रुलशिक रिनपोचे

३७) क्लेमेंट टाउन स्तुप डेहराडून :

यांची उंची १८५ फीट आणि रुंदी १०० फीट आहे. इथे १०३ फीट उंची बुध्द स्टेटस  आहे. बुद्धिस्ट आर्ट, मुरेल्स आणि श्राइन  रूम तिबेटीयन पद्धतीचे आहे.


३८) गोसाराम  चोरटन  स्तूप :

हा स्तूप अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. हे इम्पॉर्टन्ट बुद्धिस्ट सेंटर आहे. तवंग  पासून ९० किमी अंतरावर आहे. हा स्तूप १२ व्या शतकात मोनपा मोङ्क  यांनी निर्माण केला. 


३९) कल्याण स्तुप :

कल्याण पूर्वेला बिग बाजार च्या समोर जी टेकडी आहे तिथे पूर्वी प्राचीन बुद्ध स्तूप होता, आजही त्याचे अवशेष बघायला मिळतात. परंतु आज त्यावर मज्जीद आहे. कल्याण हे बुद्ध धम्माचे तसेच व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र होते. सम्राट सातवाहन यांच्या राजवटीत ते अत्यंत प्रगती पथावर होते. व्यापार जलद व्हावा म्हणून २५०० फिट चा डोंगर फोडून नाणे घाट निर्माण केला. कान्हेरी लेणी मध्ये एकूण ७५ च्या वर शिलालेख आहेत, त्यापैकी १२ शिलालेख मध्ये कल्याण येथील राहिवासी यांनी धम्म दान दिल्याची नोंद आहे.


४०) सम्राट अशोक स्तंभ :

हा स्तंभ मलबार हिल येथे आहे, तसेच इथे  प्राचीन महाथेरो चा स्तूप होता, आज त्याला म्हातारीचा बूट असे म्हणतात. ब्रिटिश सरकारचे पूर्वी हेड क्वार्टर परेल येथे होते परंतु मुंबई ला महापूर आल्यामुळे त्यांनी हेड क्वार्टर मलाबार हिल ला शिफ्ट केले, तेव्हा पासून इथे सरकारी व खाजगी बांध काम निर्माण झाले.


अश्या उपरोक्त प्रकारचा परिपूर्ण स्तूप आपणाला संपूर्ण जगत  लेणी वर बघायला मिळतो. 



आयुष्याच्या या तीन उतारावर दुःखी होऊ नका

 आयुष्याच्या या तीन उतारावर  दुःखी होऊ नका:-




(१)   ५८+  वयानंतर

कामाची जागा तुम्हाला दूर ठेवते. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कितीही यशस्वी किंवा पराक्रमी असलात तरी तुम्हाला एक सामान्य माणूस म्हटले जाईल. म्हणून, आपल्या पूर्वीच्या नोकरीच्या मानसिकतेला आणि श्रेष्ठतेच्या भावनेला चिकटून राहू नका. मी अमुक होतो, तमुक होतो ते डोक्यातून काढून टाका. हलका व्यायाम,चालायला जाणे,योगा करत रहा.

(२) दुसरा :- ६५+ वयानंतर,

या वयात समाज तुम्हाला हळूहळू दूर करेल . तुम्ही ज्या मित्रांना आणि सहकाऱ्यांशी भेटता आणि त्यांच्याशी मैत्री करता ते कमी होतील आणि तुमच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी, गावातील   तरुण पिढी लहान मुले, गावात राहण्यास आलेले नवे   पाहुणे तुम्हाला कोणीही ओळखू शकनार नाही.

"मी असा होतो..." किंवा "मी एकदा या पदावर होतो..." असे म्हणू नका कारण तरुण पिढी तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटू नये !!

(३) उतारवयातील तिसरा टप्पा :-७२+

 कुटुंब  व समाज तुम्हाला हळूहळू दूर करेल. जरी तुमची बरीच मुले आणि नातवंडे असतील. तरीही बहुतेक वेळा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा स्वतःहून एकटे राहत असाल.

जेव्हा तुमची मुलं अधूनमधून भेट देतात, तेव्हा ती आपुलकीची अभिव्यक्ती करतील. त्यामुळे कमी वेळा तुमच्या सोबत बोलतील. तरी त्यांना दोष देऊ नका. कारण ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात!

    तुमचे मत कोणी विचारत बसणार नाही आणि सांगितले तरी कोणी विचारत घेणार नाही.

77+ नंतर, पृथ्वी तुम्हाला नष्ट करू इच्छित आहे. आकाशातील देव तुम्हाला बोलवत असतील. यावेळी, दुःखी होऊ नका किंवा रडत बसू नका .आयुष्यात झालेल्या चुकांवर पश्चाताप करत बसू नका, कारण हा जीवनाचा अंतिम टप्पा आहे. प्रत्येकजण शेवटी या मार्गाचा अवलंब करेल !!

 म्हणून आत्ताच चांगले शरीरं असताना, पूर्ण आनंदाने जीवन जगा! तुम्हाला आवडेल ते खा.तुम्हाला पाहिजे ते प्या,  आवडते खेळ खेळा . आवडीच्या गोष्टी करा. आवडीच्या  ठिकाणी सहलीला जा.जीवनातील खरा  आनंद घ्या. चांगले छंद जोपासा. कारण आता तुमच्या पैश्यांचा  तुम्हाला उपयोग होण्याचे बंद होणार आहे. मित्रांशी फोन वर बोलत रहा. आपल्या आठवणी त्यांना  शेअर करत रहा.

आनंदी रहा, आनंदाने जगा

58 + मित्रांचा ग्रुप बनवा. ठरलेल्या ठिकाणी भेटत रहा दूरध्वनी वर त्यांच्याशी बोलत रहा . आयुष्य तर एक ना एक दिवस संपणार आहे..

तथागत गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी

 तथागत गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी





लुंबिनी येथील सिद्धार्थाच्या जन्मस्थळावर बांधलेला आधुनिक संरक्षक मंडप आणि शेजारी उभा अशोक स्तंभ...


आपला भारत देश हा साऱ्या जगात 'बुद्धाचा देश' किंवा 'बुद्धभूमी' म्हणून ओळखला जातो. तथागत भगवान बुद्धांनाही भारताचे महान सुपुत्र म्हणून ओळखले जाते. आज हजारो वर्षानंतरही साऱ्या जगावर बुद्ध विचारांचा प्रभाव आहे. भगवान बुद्धांचा जन्म इसवी सनापूर्वी ५६३ या वर्षी 'लुंबिनी वन' येथे झाला. लुंबिनी हे स्थान भारताच्या उत्तरेस असलेल्या 'नेपाळ' या छोट्याशा देशात आहे. आजच्या भारतातील कपिलवस्तु (पिप्रहवा) येथील राजा शुद्धोदन आणि त्याची राणी महामाया अथवा मायादेवी यांच्या पोटी भगवान बुद्ध ह्यांचा जन्म झाला. माता महामाया ही प्रसूतीसाठी आपल्या माहेरी देवदह नगरीस जात असताना वाटेत 'लुंबिनी वन' येथे एका शालवृक्षाखाली ती प्रसूत झाली. 'लुंबिनी' प्रमाणेच 'देवदह नगरी' हे भगवान बुद्धांचे आजोळही नेपाळमध्येच आहे.


'लुंबिनी' हे भगवान बुद्धाचे जन्मस्थान. तेथील 'लुंबिनी वन' हे अत्यंत रमणीय स्थान होते. ते कदाचित शुद्धोदनाच्या मालकीचे असावे. मात्र ते शाक्यांच्या गणराज्यात होते हे नक्की. शुद्धोदनाचा तेथे एक राजवाडाही असावा. कपिलवस्तुहून देवदह नगरीस जाणारा रस्ता हा लुंबिनी वनातून जात असे. हे वन स्वर्गीय अशा-चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत असे. तेथील वृक्ष बुंध्यापासून शेंड्यापर्यंत फुला-फळांनी बहरलेले होते. निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरात गात असत; अशा त-हेचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' ह्या ग्रंथात आढळते. सिद्धार्थमाता महामाया ही प्रसूतीसाठी माहेरी निघाली होती. परंतु लुंबिनीवनाचे निसर्गसुंदर आणि शांत वातावरण यामुळे तेथे काही काळ विहार करावा असे महामायाला वाटले. त्याच वेळेस तिला तेथे ध्यान धारणा ही करावयाची होती. त्यासाठी तिने शुद्धोदनाजवळ परवानगी मागितली. या प्रसंगाचे वर्णन महाकवी अश्वघोष आपल्या 'बुद्धचरित' या ग्रंथात करतात 'सा लुम्बिनींनाम् वनान्तभूमि चित्रद्रुमां चैत्ररसाभिरामां। ध्यानानुकूलां, विजनामिधेण तस्मां निवासाय नृपं बभाषे ।।


(अर्थः ध्यानाकरिता योग्य अशा एकान्त वनाच्या इच्छेने नानविध वृक्षांनी युक्त अशा चैत्ररथ उपवनाप्रमाणे सुंदर अशा लुंबिनी वनामध्ये जाण्यासाठी राजाला तिने विनंती केली.)


'लुंबिनी वनामध्ये ध्यान-धारणा आणि विहार करावयाची महामायाची तीव्र इच्छा असल्याचे समजताच राजा शुद्धोदनाने कसे ऐश्वर्य उभारावयास सांगितले त्याचे वर्णन 'ललितविस्तर' या ग्रंथात वाचावयास मिळते. ते कदाचित अतिरंजित असेलही पण बहारदार आहे.


मणिकन कनिषिक्तां लुम्बिनी कारयध्वं


विविधवसने रत्नैः सर्ववृक्षां प्रवेया।


विविध कुसुमचित्रं नन्दनं वा सुराणां


वदत च मम शीघ्रं सर्वमेतं विधाय ।।२००।।


(मराठी स्वैरानुवादः संपूर्ण लुंबिनी वन हिऱ्यांचे आणि सुवर्णांचे मणी यांनी विभूषित करा. विविध प्रकारची फुले, उंची प्रकारची वस्त्रे आणि रत्ने आणि माणके यांनी आच्छादून टाकावी. कारण जगातील सर्वात श्रेष्ठ पुरुष लुम्बिनी येथे जन्म घेणार

आहे.)


अशा ह्या सुंदर रमणीय लुंबिनी वनात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. बौद्ध धम्माचे ज्येष्ठ अभ्यासक आदरणीय धर्मानंद कोसंबी 'भगवान बुद्ध' या ग्रंथात...

Saturday, June 29, 2024

मधु दंडवते : झुंजार समाजवादी नेता.


*!!..मधु दंडवतेंना दंडवत ..!!* 
काही वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आम  आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर 'साध्या राहणीमानाचे' मार्केटिंग केले होते. त्यावेळी अनेकांना अरविंद केजरीवाल यांच्या त्या साधेपणाचे कौतुक आणि अप्रूप वाटले. कारण त्यांच्यातील बहुतांश लोकांना मधु दंडवते हे अजब रसायन माहितीच नव्हते. बसस्टॉपवर रांगेत उभे असलेल्या नानांचे कित्येक प्रत्यक्षदर्शींनी दर्शन घेतलेले आहे. आपण या देशातील महत्त्वाचे नेते आहोत म्हणून बसच्या पुढच्या दरवाजाने चढण्याची सवलतदेखील या तत्त्वनिष्ठ व्यक्तीने कधी घेतली नव्हती ..!!* 

*मधु दंडवते हे देशाचे अर्थमंत्री होते. हे पद गेल्यानंतर ते एका बँकेत जेव्हा चारचाकी गाडीसाठी कर्ज काढायला गेले, तेव्हा तिथला अधिकारी आवाक झाला. देशाचे अर्थमंत्रीपद भूषविलेला नेता गाडीसाठी बँकेत कर्ज घ्यायला येतो, हे चित्र या देशात पुन्हा कधी दिसेल असे वाटत नाही ..!!*  

*कणकवली रेल्वेस्टेशनहून मुंबईला प्रवास करत असताना किंवा प्रवास करून आल्यावर, जिन्याजवळ मधु दंडवतेंचे जे तैलचित्र आहे, त्याला दोन्ही हात जोडून प्रणाम केल्याशिवाय कधीच पुढे जाता येत नाही. तो प्रणाम एवढ्यासाठीच असतो, की आज या कोकण रेल्वेने आपण जो काही प्रवास करतोय, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे ..!! एका कर्मयोग्याप्रति व्यक्त केलेली ती कृतज्ञता असते ..!!* 

*राजापूर मतदारसंघाचे खासदार असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचे अकस्मात निधन झाल्याने, अहमदनगरचे प्राध्यापक मधु दंडवते यांना पक्षाने थेट कोकणातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. निकष फक्त एकच होता, तो म्हणजे नाथ पै यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेली विद्वत्ता ..!! काहीही झाले तरी कोकणची जनता लोकसभा निवडणुकीत मतदान करताना एका विद्वान उमेदवारालाच मत देणार, हा पक्षाला असलेला विश्वास ..!!* 

*तो काळ इंदिरा गांधी यांचा होता. संपूर्ण देशात १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांची लाट आलेली असतांना, त्यांनी शेंदूर फासलेला दगडदेखील निवडून येत होता. महाराष्ट्रदेखील याला अपवाद नव्हता. इंदिरा लाटेत कॉँग्रेसचे ४८ पैकी ४७ खासदार निवडून आले .. फक्त एकच खासदार जनता दलाचा निवडून आला .. आणि तो खासदार म्हणजे आदरणीय मधु दंडवते ..!!* 

*कोकणची जनता कोणत्याही लाटेत वाहवत जात नाही, हे त्या वेळी इंदिरा गांधींना कोकणने दाखवून दिले होते.  कोणत्याही नेत्याचा उधळलेला वारू थोपवून दाखवण्याची ताकद, या कोकणच्या मातीत आहे. थोडक्यात, अहमदनगरचे मधु दंडवते कोकणात निवडून आले आणि नंतर ते कधी कोकणी झाले, ते त्यांनासुद्धा कळले नाही. त्या काळी मधु दंडवते हा कोकणी जनतेचा स्वाभिमान होता आणि आजही आहे ..!! त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्याप्रमाणे संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करून, राजापूर मतदारसंघाची ओळख ‘विद्वान लोकांचा मतदारसंघ’ अशी देशभरात सर्वदूर केली. आजही या द्वयींची भाषणे अभ्यासासाठी संसदेत जतन करून ठेवलेली आहेत ..!!* 

*कालांतराने दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री झाले. अ.ब. वालावलकर यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते, परंतु आमचे नाना ते स्वप्न अक्षरशः दिवसरात्र जगले. दरी-खोऱ्यांतून रेल्वे शक्य नाही म्हणून याअगोदर कोकण रेल्वेच्या प्रस्तावावर अनेकदा फुली मारण्यात आली होती. मात्र जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा सहकारी आणि ई.श्रीधरन यांच्यासारखा ध्येयनिष्ठ इंजिनिअर यांना सोबत घेऊन, नानांनी हे अशक्यप्राय स्वप्न साकार केले. कोकण रेल्वेची संकल्पना जेव्हा त्यांनी कोकणी जनतेसमोर मांडली, तेव्हा कोणताही विकासात्मक दृष्टिकोन नसलेल्या तत्कालीन विरोधकांनी, नानांवर अगदी टोकाची टीका केली. ‘दंडवते सदा गंडवते’ या घोषणेपासून रस्त्यावर फिरणाऱ्या रोड रोलरवर ‘आली पहा आली .. दंडवतेंची रेल्वे आली ..’ या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. मात्र क्षमाशील असलेल्या या कर्मयोग्याने, ही विखारी टीकादेखील अगदी हिमालयाप्रमाणे स्तब्ध राहून सहन केली .. लोकसभेत 'विरोधक' म्हणून इंदिरा गांधींवर शब्दांच्या धारदार अस्त्रांनी तुटून पडणारे नाना, त्यांच्या अकस्मात निधनानंतर भावुक होऊन ‘राजीव गांधींना त्यांची आई आता कधीच मिळणार नाही ..’ असे उद्‌गार काढतात, तेव्हा या व्यक्तीच्या हृदयाची आणि विचारांची विशालता लक्षात येते. 'कोकण रेल्वेचे' स्वप्न साकारल्यानंतर विरोधक काळाच्या ओघात गडप झालेत, परंतु मधु दंडवते हे कोकणच्या इतिहासात अजरामर झाले आहेत. जेव्हा केव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात एक पान हे खास नानांसाठी राखीव असेल आणि त्यांचे नाव सुवर्णाक्षरातच लिहिले जाईल, यात तिळमात्र शंका नाही ..!!* 

*कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या नानांची कपाटे वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेली असत. ज्यांची कपाटे पैशांच्या थैल्यांनी भरलेली होती, त्या नेत्यांना कधीच पराभव पाहावा लागला नाही. मात्र 'कोकण रेल्वे'चे अशक्यप्राय स्वप्न पूर्ण करणाऱ्या नानांचा १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेसचे उमेदवार कर्नल सुधीर सावंत यांनी पराभव केला. त्याच काळात नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झालेली असल्याने, शिवसेनेची संघटना बळकट झाली होती. अशा परिस्थितीत शिवसेनेने वामनराव महाडिक यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देऊन, मतांचे विभाजन केल्याने त्याचा फटका मधु दंडवतेंना बसला व सुधीर सावंत विजयी झाले. सलग पाच वेळा विजय मिळाल्यानंतर अचानकपणे झालेल्या या पराभवामुळे नानांना जबर मानसिक धक्का बसला होता ..!! नेमकी त्याच वेळी त्यांना देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी  चालून आली होती. तेव्हा ‘मागच्या दरवाजाने (राज्यसभा) जाऊन, मी पंतप्रधान होऊ इच्छित नाही ..!!’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्या वेळी लालूप्रसाद यादव व अन्य नेत्यांनी त्यांना ‘बिहारमधला कोणताही मतदारसंघ निवडा, आम्ही तुम्हाला निवडून आणून लोकसभेवर पाठवतो’ अशी खात्री दिली. तेव्हा तत्त्वांच्या या पुजाऱ्याने जे उत्तर दिले, ते ऐकून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणारा कोकणी माणूस मनातून हळहळला. नाना प्रांजळपणे म्हणाले - "माझ्या लोकांनी मला निवडणुकीत नाकारले, त्यामुळे देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याचा नैतिक अधिकारच मला प्राप्त होत नाही .." आजच्या या बाजारू राजकारणात, नानांसारखी नैतिकतेची व्याख्या सांगणारा दुसरा पुढारी, आज शोधून तरी सापडेल का ..??*

*आपली तत्त्वे आणि नैतिकता जपण्यासाठी त्यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडले, अन्यथा एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला असता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत, कोकणच्या जनतेचे लोकसभा निवडणुकीत विद्वान उमेदवाराप्रती असलेले आकर्षण पाहून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पेशाने सीए व सारस्वत बँकेचे चेअरमन असलेल्या सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली. या वेळी सुरेश प्रभूंनी सुधीर सावंत व मधु दंडवते या दोघांचाही पराभव केला. त्या वेळी निकालाच्या दिवशी सुरेश प्रभूंना विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी लगेचच शेजारी उभे असलेल्या मधु दंडवतेंची भेट घेत, त्यांच्या चरणांना वाकून स्पर्श केला. मतांच्या गोळाबेरजेत आपण विजयी झालेलो असलो, तरी मधु दंडवते या व्यक्तीचे कोकणप्रती असलेले योगदान प्रभूंना चांगलेच माहिती होते. त्या वेळी नानांनी सुरेश प्रभूंचे अभिनंदन करून त्यांना आलिंगन देत म्हटले, ‘बॅरिस्टर नाथ पै व मी आम्ही दोघांनी संसदेत जपलेला या मतदारसंघाचा लौकिक तुम्ही कायम राखाल, याची मला खात्री आहे. आज तुमच्या रूपाने या मतदारसंघाला पुन्हा एकदा विद्वान खासदार मिळाला आहे ..!!’* 

*आपल्या 'साधेपणाचे' कधी मार्केटिंग करावेसे मधु दंडवतेंना वाटले नाही, कारण तो त्यांच्या रक्तातीलच एक गुण होता. अशा या अत्यन्त साध्या नेत्याने कधी काळी आपल्या मतदारसंघाचे सलग पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते, हे सांगताना आपली छाती निश्चितपणे अभिमानाने भरून येते ..!!* 

*ज्या काळात लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत सिद्धांतावर घाव घालण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत .. ज्या काळात लोकशाही व राजकीय नेतेमंडळींवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय .. त्या पिढीला, आणि पुढच्या अनेक पिढ्यांना, ‘दंडवते कोण होते’ हे समजणे नितांत गरजेचे आहे ..!!* 

*राजकारणात राहूनही नि:स्पृहपणे काम करता येते, हे पुढच्या पिढ्यांच्या मनावर ठसवून देण्यासाठी त्यांना 'मधु दंडवते कोण होते' हे माहिती असणे नितांत गरजेचे आहे. जगाच्या आजवरच्या एकंदर लोकसंख्येचा विचार करता, ज्यांचे चरणस्पर्श घेऊन कृतकृत्य होता यावे, अशा फारच थोड्या व्यक्ती, या भूतलावर होऊन गेल्या. त्यात फक्त राजकीय क्षेत्राचा विचार केला असता, अशा व्यक्तींची संख्या ही नगण्यच होती. आता एकंदरीतच ज्या वेगाने राजकारणातून नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे, ते पाहता, मधु दंडवते हे थोर व्यक्तींच्या यादीतील प्रमुख नाव म्हणावे लागेल ..!!                         

*मा. कै. मधू दंडवते यांची आज पुण्यतिथी आहे ..!!  कोकण रेल्वेचे स्वप्न त्याच्यामुळेच साकार झाले आहे ..!!*

Saturday, June 22, 2024

माझे आजोबा : ग्यानोबा व्यंकोजी #शिंदे ..


माझे #आजोबा : #ग्यानोबा #व्यंकोजी #शिंदे ..

(Main pole into the Tent)

..............प्रा बालाजी र शिंदे,नेरुळ -७०६

मानवी मूल्य आणि माणूस म्हणून पिढी घडविण्यास ,आजी -आजोबा वडील ,आई ,काका, मामा -मामी हे तंबूतील खांबासारखे असतात .तेंव्हाच तंबू उभा राहतो.

त्यात महान अगाध ,माणुसकी ,आपलेपण ,आणि बुद्धिमत्ता असलेले व्यक्ती म्हणजे माझे आजोबा .

(Main pole in to the tent)...

ज्यांचे बालपण आजोबांच्या अंगा खांद्यावर गेले ,आजी आजोबा ,काका ,आणि माय -आजी कडील मामा -मामी म्हणजेच 'आजोळ ज्याने जगला' आणि अनुभवला त्यास कधीच कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडत ..हा माझा अनुभव आहे .

आणि तेच खरे बालपण आणि तोच खरा आशीर्वाद होय...

माझे आजोबा आज ह्यात नाहीत पण त्यांच्या आठवणीने मी सदैव जिवंत आहे कायम .

माझ्या घरात मी पाहिलं वाहिलं #केंद्रीय #कर्मचारी...

ही बातमी आजोबाला कळली आणि आख्या गल्लीत आजोबाने टिरी उघड्या करून नाच केला होता .( जहाँ पणा तुस्सी ग्रेट हो ची स्टाईल )...काय तो आनंद आणि काय तो शुद्ध मनाचा माणूस. आणि निस्वार्थ मन.

मी #काश्मीर कार्यालयीन कामाला  गेलो असताना आजोबांना १९९७ ला एक उलन चे जॅकेट घेऊन आलो  आणि त्यांच्या पुढ्यात ठेवले ,दिवस भर त्या उलांच्या जॅकेट वर कृतार्थ हात फिरत होता ,आणि तो हात मला आशिर्वाद देत होता ..आज तो क्षण आठवून माझ्या पाठीवर हात फिरल्याचा भास होतो आहे आठवणींच्या कोपऱ्यात.

असे अनेक प्रसंग सांगता येतील.त्यांच्या सोबत व्यतीत केलेली.

मी इयत्ता सातवीत असेन ? दिवस पावसाचे होते .आम्हला आत्याच्या (माजी मोठी आत्या संता कांबळे ) गावी #अजनसोंड ला जायचे होते ...वेळ दुपार नंतर ची होती ...गावच्या हाकेवर तिरु नदी ,ती  ओलांडून जावी लागे . अजोनसोंड ते #हाळी अंदाजे १० की मी चे अंतर असेल ,तेंव्हा पायी जावे लागे ,कोणतेही सार्वजनिक वाहन उपलब्ध नव्हते .आमच्या कुटुंबात तर कोणाकडे वाहन न्हवतेच.

मी आजोबा सोबत चालत निघलो होतो ,कालच दक्षिण दिशेला पाऊस पडल्याने नदीचा पुराचा डोह अजून  उतरला न्हवता .

तिरु नदी जवळ आल्यावर मी पाणी बघून घाबरू लागलो आणि आजोबांना तसे कळवले की मी नाही येणार तुम्ही जा .माझा मागे ओढता पाय बघून आजोबांच्या अंगातील मातंग जागी झाला ,आणि हत्तीचे बाळ कुठून आले हे मला कळण्यास विलंब  लागन्यापूर्वी मला पटकण उचलून आपल्या खांद्यावर घेतले .मी घाबरलो त्यांचा पटका आणि मुंडके घट्ट  पकडले  ,माकडा सारखा टकमक बघत  बसलो यांच्या खांद्यावर ,आणि आजोबाच्या ताक्तीचा मला अंदाज आला नाही ,त्यांनी कमरेला असलेल्या पाण्याच्या  धावत्या प्रवाहातून मला त्या किनारी फर फर  घेऊन गेले ....

भल्या मर्द आणि धीट मनाचा माझा आजोबा ..

#अशिक्षित पण ,पदवीधर व्यक्तींना लाजवेल असे ज्ञान होते ..

हर हुन्नरी .#गोवंडी कलेत त्याच्या काळी कोणी हात नाही धरला त्यांचा  .त्यांनी अनेक चिररेबंदी वाडे बांधून दिली ,मंदिराचे कळस ही  बांधले ..

#Trumpet वाजवण्यात ही हातखंडा.

'मै क्या करू राम मुझे बूढा मिलगया.….'

'परदे मे रहणे दो  परदा न उठाओ ..' हे त्यांचे आवडते गीत.

असे 'आजोबा' सर्वांचे असतील ही ,पण या सम हाच.

बोलेल तसा चालणार ...

त्यांचे एकच स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही ...

'तू शेत घे बाबा ! तू शेत घे!!हा त्यांचा तगादा ..'

पाचवीला पुजलेली गरिबी ....अजून मला जमले नाही ...ते गेले ! परत न येण्यास ,आठवणीचा वरदहस्त माझ्या पाठीवर ठेऊन ...

आज मितीला माझा मोठा लेक आदित्य ,लंडन येथून  दोन वर्षे कोर्स करून परत  आला ,हे कोड कौतुक बघण्यास माझे ,दादा (वडील) आणि बाबा (आजोबा)  नाहीत ,हो....😢😢😢            माझ्या fb वाल वरुण

Tuesday, May 28, 2024

पळस आणि पांगारा

 पळस आणि पांगारा 



पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट





( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो ) 

 ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे . 

सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.

यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात. 

 

पळसाला पाने तीनच  पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .



शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांतील उष्ण प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी वनांमध्ये आढळतो.


पळस हा मध्यम आकाराचा वृक्ष सु. १५ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर १.५–१.८ मी. असतो. साल राखाडी, निळसर वा फिकट तपकिरी असून तिच्या लहान-मोठ्या ढलप्या सोलून निघतात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांमधून लाल रस पाझरतो. हा रस सुकल्यावर त्याचा विशिष्ट डिंक बनतो. त्याला इंग्रजीत ब्युटिया गम किंवा बेंगॉल कीनो म्हणतात. पाने संयुक्त, एकाआड एक व पिच्छाकृती असून मोठी व त्रिदली असतात. जानेवारी ते मार्च महिन्यांत या वृक्षाला केशरी-लाल रंगाची फुले येतात. फुले मोठी, द्विलिंगी व बिनवासाची असून ती फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लांब मंजरीवर येतात. ती अनेक व सु. २.५ सेंमी. लांब असतात. त्यामुळे ज्या परिसरात पळसाची झाडे असतात तो परिसर या भडक रंगाच्या फुलोऱ्यांमुळे दूरवरून पेटल्यासारखा वाटतो. म्हणून इंग्रजीत त्याला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. शिंबावंत फळे १५–२० सेंमी. लांब व सु. ४.५ सेंमी. रुंद असतात. त्यात एकच बी असते.


पळसाचे लाकूड काळपट पांढरे असते. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही, म्हणून मोटेसाठी व विहिरींच्या काठावर बांधकामासाठी त्याचा वापर होतो. पाने राठ व कडक असतात. त्यांपासून पत्रावळ्या तयार करतात. फुलांपासून केशरी रंग मिळतो. त्याचा वापर होळीचा रंग व कपडे रंगविण्यासाठी केला जातो. फुलाच्या रंगाकडे डास आकर्षित होतात आणि त्यातील मकरंदामध्ये ते अंडी घालतात. परंतु ही अंडी उबत नाहीत. त्यामुळे डासांची निर्मिती कमी होते. खोडापासून मिळणाऱ्या डिंकाचा वापर औषधात करतात. त्यातील टॅनिनाचा कातडी कमाविण्यासाठी वापर करतात.


पळस हे उत्तर प्रदेश राज्याचे राज्य फूल आहे . भारतीय डाकतार विभागातर्फे सन्मान म्हणून पाळसा च्या फुलाचे पोस्टाचे तिकिट छापले होते . कालिदासणी पळसाला ' ऋतुसंहार ' हे नाव दिले आहे . पळसला पर्यायी बेल आहे . पळस किवा बेल झाड लावले .

पळसाला संस्कृत मध्ये पलाश असे म्हणतात. पलाश अर्थ फुलाणि दावरलेले झाड . विदर्भात याला ' तुळीप असे नाव आहे .


पळसाला पाने तीन असे आपण म्हणतो . ही केवळ एक युक्ति नसून त्यात गहन अर्थ दडलेला  आहे . असंग्रह आणि संयमाची सूचना देणारी युक्ति आहे ती . किती ही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणातच वापरू शकता , उपयोगी लावू शकता ,बाकी सर्व व्यर्थ आहे असा संदेश आहे यात याची पाने त्रिदलिय असल्याने याचे संस्कृत नाव ‘ त्रिपटक ‘ असे आहे .


पांगारा : 



एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा  या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि अन्य आशियाई देशांतही झालेला आहे. भारतात फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात : लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो .




पांगारा हा वृक्ष सु. २७ मी. उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ, करड्या रंगाची, क्वचित पिवळी व खडबडीत असते. याला लहान आकाराच्या अनेक फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पाने संयुक्त, त्रिदली व मोठी असून पर्णिका एकाआड एक व १०–१५ सेंमी. लांब असतात. लांब फुलोऱ्यावर फुले मोठी व आकर्षक असून ती लाल, शेंदरी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. ती बिनवासाची असून त्यांत मकरंदाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक पक्षी व भुंगे फुलांमधील मकरंद मिळविण्यासाठी फुलांभोवती घिरट्या घालताना दिसतात. फळ (शेंग) १३–३० सेंमी. लांब, काळ्या रंगाचे आणि लंबगोलाकार असते. त्यांत ६­-७ जांभळ्या व हलक्या बिया असतात. पांगाऱ्याची लागवड बिया किंवा कलम लावून करतात.


पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.



                                                                                       पळस 



पांगारा 

लेख आवडला तर जमेल तसे प्रोत्साहन राशी दान Gpay करा . 




प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 

गुगल आणि मराठी विश्वकोश यांच्या माध्यमाने संकलन . 






भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्य...