*बुद्ध गाथांचे महत्त्व आणि
विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म"!*
गाथांचे महत्त्व लक्षात घेऊन विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी "बुद्ध
आणि त्यांचा धम्म" हा
ग्रंथराज लिहिताना यातील नऊ गाथांचा उपयोग करून घेतला आहे.
सुखवर्ग हे धमपदातील १५ वे प्रकरण आहे. ह्या प्रकरणामध्ये
ज्या सुखांचा स्वानुभूतीने आस्वाद घेता तो अशा सुखाचे वर्णन बुद्ध करतात.
बुद्ध म्हणतात,
जीवनातील सारे झगडे
"प्रथमचे" आणि "नंतरचे" असे आहेत. मात्र
झगडे/भांडण सुरू झाले की मुख्य गोष्ट बाजूला पडते, मुख्य कारण बाजूला पडते आणि व्यर्थच्या गोष्टी मध्ये येतात.
कधी कधी तर आपण मूळ कारणाला विसरून जातो आणि व्यर्थच्या गोष्टीवर वादविवाद, झगडे/भांडणं चालू
होतात. त्याला कारण फक्त प्रथम कोण?
आणि नंतर कोण? आणि हा
प्रश्न केवळ आणि केवळ अहंकारानेच निर्माण होतो असे सुद्धा सांगतात.
*बुद्ध म्हणतात, मी
महासुखी आहे!*
अहंकारानेच मनुष्य दु:ख ओढवून घेतो. मनुष्याच्या जीवनात
दुःख, चिंता
आणि अंधकार असल्याचे कारण काय तर केवळ आणि केवळ अहंकार हेच कारण आहे. बुद्ध मात्र
स्वतःचे उदाहरण देऊन सांगतात की,
मी महासुखी आहे! कारण मी वैरविहीन जगतो. माझे कोणाशी शत्रुत्व नाही, झगडा नाही, वैमनस्य नाही.
आणि म्हणूनच मी महासुखी आहे. मी सारास सार आणि असारास असार म्हणून पाहतो म्हणून
मला काही पीडा नाही, चिंता
नाही, झगडा
नाही, कोणाशी
वैर नाही आणि म्हणून मी महासुखी आहे.
*बुध्द पुढे म्हणतात, तुम्ही
किती धन गोळा करणार?*
वैरी लोकांत अवैरी राहून, आसक्त लोकांत अनासक्त राहून, रोगी लोकात स्वस्थ राहून माणसाला सुखाने जगता येते. जे लोक
जय आणि पराजयाची चर्चा करतात ते लोक कधी सुखी राहू शकत नाहीत. कारण जयाने वैर
निर्माण होते तर पराजित मनुष्य परभावाने दुखी होतो. म्हणून जय पराजय काही असले तरी
त्याची चिंता करू नये, तरच
सुखाने जगता येईल. ज्यांचेजवळ काहीच नाही,
जे अकिंचन आहेत ते पण सुखाने जीवन व्यतीत करू शकतात कारण त्यांच्याजवळ सीमित
धन आहे. परंतु जो धनाची अपेक्षा करतो तो सुखी राहू शकत नाही. कारण तो धन जमा
करण्याची सीमा बाळगत नाही. बुद्ध म्हणतात,
तुम्ही किती धन गोळा करणार?
आणि पुष्कळसे धन असे आहे की जे तुम्ही गोळा करू शकणार नाही. उद्या जरी तुम्ही
साऱ्या पृथ्वीचे मालक झालात तरी शेवटी चंद्र,
सूर्य, ग्रह, तारे हे तुमच्या
ताब्यात असणार नाहीत. आणि त्यांची मालकी तुमच्याकडे नसल्यामुळे दुःख होणार. बुद्ध
म्हणतात, ज्या
आम्हा लोकांकडे काहीच नाही ते आम्ही सुखपुर्वक जगतो.
*बुद्ध असेही म्हणतात,
चांगले आरोग्य हा श्रेष्ठ लाभ आहे;
समाधान हे श्रेष्ठ धन आहे!*
रागाग्निसारखा दुसरा कुठलाच अग्नी नाही; द्वेषासारखा
कुठलाच मळ नाही; पंचस्कंधासमान
दुसरे दुःख नाही आणि शांतीसारखे दुसरे सुख नाही. चांगले आरोग्य हा श्रेष्ठ लाभ आहे; समाधान हे
श्रेष्ठ धन आहे; विश्वास
हा मोठा बंधू आहे आणि निर्वाण हे सर्वात मोठे सुख आहे. आणि म्हणून प्रत्येक
माणसाने निर्वाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.
*बुद्ध म्हणतात,
भूख हा सगळ्यात मोठा रोग आहे!*
एकंदरीत सुख वर्गामध्ये कोणकोणत्या सुखकारक गोष्टी आहेत
याचे निवेदन या १२ गाथांच्यामधून केलेले आहे. बुद्ध म्हणतात, भूख हा सगळ्यात
मोठा रोग आहे, संस्कार
परम दुःख आहे, हे जो
जाणतो तोच निब्बाण परम सुख आहे हे जाणून शकतो. हे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त
करण्यासाठी भौतिक साधनांच्याऐवजी धम्म मार्गावर चालूनच ते प्राप्त केले जाऊ शकते
आणि धम्ममार्ग हा सर्व मानवांसाठी खुला आहे,
तो सुखदायी आहे सत्यवादी आहे. या गाथांचे महत्त्व लक्षात घेऊन विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी *"बुद्ध आणि
त्यांचा धम्म"* हा ग्रंथराज
लिहिताना यातील नऊ गाथांचा उपयोग करून घेतला आहे.
जीवनात खुषी-आनंद,
दुःख-विषाद, हार-जीत, रोग-भोग इ.
सर्वांगीण पक्ष उजागर करणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख करणाऱ्या व आपल्या जीवनात
अंतर्दृष्टी प्राप्त करून देऊन सुख देणाऱ्या व प्रसंगी उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या
ह्या गाथा आणि त्या मागील कथा अत्यंत वाचनीय आणि बोधप्रद आहेत.
कथा या मानवी मनाच्या पटलावर कायम अधिराज्य करून असतात,त्या
बोध आणि ज्ञान देत असतात . तद्वत बुद्ध गाथा या मनुष जातीला कायम जीवंत ठेवण्याचे कार्य
करीत असतात .
*संकलन*
*प्रा.बी.आर.शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ७०६*
लेख आवडला तर धम्मदान करा ..........
No comments:
Post a Comment