Friday, November 25, 2016

नुकत्याच होऊ घातलेल्या लोसाभेच्या निवडणुका आणि तृतीयपंथ .

नुकत्याच होऊ घातलेल्या लोसाभेच्या निवडणुका आणि तृतीयपंथ .


सन्माननीय सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना नुकतीच  न्यायमान्यता दिली आहे .थोडक्यात मानवीय अधिकार देउकेले आहेत , यात विशेष हक्क ,शिक्षण ,नोकऱ्यात राखीव जागा इत्यादि . पण हा निकाल केवळ तृतीयपंथीयासाठीच आहे ,तो समलिंगीना  ( गे ,लेस्बिलन आणि बय्सेक्युअल्स ) लागू नसल्याचे कोर्टाने स्पष्ठ केलेलं आहे .

हि सावग्तार्ह बाब असून समाज आणि सरकारी व्यवस्थेकडून वर्षानुवर्षे अवहेलना आणि अपमान सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या आयुष्याला एक नवीन ओळख करून देणारा निर्णय कोर्टाने करून दिला आहे . याद्वारे यांना एक “तिसरी “ स्वतंत्र ओळख मिळणार आहे ,जरी आपण यांना किन्नर ,किंवा इतर नावाने ओळखत असलोतरी त्यांना एक आता नवीन ओळख मिळणार आहे . आणि सरकारी दफ्तरी असलेल्या वेगवेगळ्या सवलती ,सेवा सुविधा पण दिल्या जाणार आहेत .

समजाच्या मुख्ये प्रव्हात आणण्यासाठी इतराप्रमाणे संपूर्ण अधिकार मिळणार आहेत .

भारतीय लोकशाहीत लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात ,आणि या निवडणुका घेत असताना सुसूत्र पद्धतीने हि पार पदव्या लागतात ,यासाठी निवडणूक आयोग अमाप खर्च करून निवडणुका सुरळीत पार पाडीत असते . पूर्वीच्या काळात स्त्री पुरुष या प्रवर्गाची वर्गवारी होती ,आणि नंतरच्या काळात यात अपंग हा दुर्लक्षित घटक समाविष्ठ करण्यात आला ,जरी यात मुखे चार ( अंध ,अस्थिव्यंग ,मतीमंद ,आणि कर्णबधीर ) अपंग प्रवर्ग असतील तरी .

निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणूक चालू असताना दर दोन तासाने ठराविक ठिकाणचे ठराविक वेळेत म्हणजे प्रत्येकी दोन तासाने किती मतदान झाले याचा अहवाल मतदान केंद्र अधिकार्याला मतदान केंद्राप्रमुखाकडे पाठवायचा असतो ,तेंव्हा त्यात ,एकूण मतदान किती नोंद झाले आणि एकूण स्त्री मतदार किती आणि पुरुष मतदार किती असे अहवाल पाठवावे लागतात .


पण एकंदरीत मतदान प्रक्रियेत कुठेही असा “तृतीयपंथीयांचा “ उल्लेख आढळत नाही कि या प्रवर्गाला ’ स्त्री ‘म्हणावे का ‘पुरुष ‘? का तृतीयपंथीय म्हणावे कि समलिंगी म्हणावे . तरी पुढील येणाऱ्या निवडणुकीत या घटकाचा स्पष्ट असा उल्लेख करावा ,जेणे करून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि योगेरीतीने अहवाल पाठवणे आणि लिहिणे सोप्पे होईल .

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...