Saturday, January 28, 2017

जयललिता जयराम

06 डिसेंबर २०१६

 वरून शांत आणि मायाळू दिसणारा चेहरा, अंतर्यामी करारी बाणा आणि वेळ आल्यास विरोधकांना लोळवण्याची वृत्ती.बुद्धी चातुर्याच्या जोरावर विरोधकाला आपली जागा दाखवणाऱ्या स्त्री ललना म्हणजेच  जयललिता जयराम , तामिळींच्या ‘अम्मां’ची ही ओळख पुरी आहे . सिनेमातून राजकारणात अशी परंपरा तामिळी-तेलुगु राजकारणात आहे. आणि हा त्यांचा खरा खुरा अखाडा आहे ,प्रथम सिनेमात प्रसिद्धी मिळाल्यावर नंतर राजकारणात प्रवेश करतात ,त्याच वाटेवर जयललिता यांचा पण  राजकारणात भक्कम  प्रवास कसा झाला आणि जयललिता त्याच परंपरेतल्या नेमका कसा आहे याचा घेतलेला आढावा

      त्यांच्या चित्रपटाचा आढावा घेतला तर , चिन्नडा गोम्बे, वेन्निरा अडाई आणि इज्जत ही आहेत अनुक्रमे कानडी, तामिळ आणि हिंदी सिनेमांची नावं.त्यांचा हा एकूण एकशे चाळीस चित्रपटाचा प्रवास , पण हे सिनेमे साधुसुधे नाहीत  किमान तामिळींसाठी तर नाहीतच कारण त्यांच्या अम्मा अर्थात जयललितांच्या या डेब्यु फिल्म आहेत.नखशीकांत भारतीय संस्कृतीचा एक अस्खलित नमुना आहे .त्यांच्या सिनेमाची रंजक काही वेगळीच आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात गेली 3 दशकं आपला दबदबा कायम राखणारी ही करारी महिला वडिलांच्या निधनानंतर सन १९८४ साली त्या प्रथम निवडून आल्या .एकंदरीत मागे इतिहाच्या खुणा पहिल्या तर , तामिळी फिल्म इंडस्ट्रीत पहिल्यांदा स्कर्ट घालून खळबळ उडवून देणार्‍या जयललितांनी त्यानंतर अनेक हिट सिनेमे देऊन १९८०  मध्ये चित्रपटसन्यास घेतला होता . राजकारणात प्रवेश केला.तो कायमचा,शेवटच्या क्षणापार्येंत त्या राजकारणात सक्रीय होत्या .

एमजीआर अर्थात एमजी रामचंद्रन यांच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममधून त्या राज्यसभेवर निवडून  गेल्या. आणि १९८८  साली त्या प्रथम  बनल्या लोकसभेच्या खासदार झाल्या .
त्याचवेळी त्यांची एमजीआर यांच्याशी जवळीक वाढली आणि लवकरच एमजीआर यांच्याशी त्यांनी दुसरी पत्नी म्हणून घरोबाही केला. अर्थातच करुणानिधींच्या द्रमुकशी जोरदार संघर्ष करण्याकरता एमजीआरनी जयललितांचा वापर केला आणि एमजीआर यांच्या निधनानंतर द्रमुक विरोध हाच अम्मांच्या राजकारणाचा कळीचा मुद्दा बनला.
1989 च्या विधानसभा निवडणुकांत जयललितांना चांगलं यश मिळालं, पण सत्ता मिळू शकली नाही. विरोधी पक्षनेत्या होणार्‍या त्या पहिल्याच महिला होत्या.विरोधी पक्ष म्हणून असताना त्याने सताधारी पक्ष्याला बरेच धारेवर धरले होते  काँग्रेसन पाठिंबा काढल्याने त्यावेळी द्रमुक सरकार कोसळले. आणि 91 च्या निवडणुकांत मग जयललितांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली.कारण त्या राजकारणात एक अस्टपैलू व्यक्तिमत्वाच्या होत्या .1991 च्या वर्ष्यात
दुसर्‍याच दिवशी राजीव गांधींची हत्या झाली. अर्थात सहानूभूतीच्या लाटेचा फायदा अम्मांना मिळाला आणि त्या निवडून आलेल्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. मात्र 5 वर्षांच्या या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि 96 ला त्यांच्या हातातून सत्ता गमवावी लागली . पण 2001 साली पुन्हा धडाक्यात त्यांनी करुणानिधींकडून सत्ता हस्तगत गेली.विरोधी पक्ष्याला कधीच थारा न देता ,दोघात सतत चा संघर्ष वाढतच राहिला .
द्रमुक आणि अण्णा द्रमुकचा संघर्ष वाढतच होता. एकमेकांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, सत्ता संघर्ष यातून पुन्हा द्रमुकचे करुणानिधी 2006 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.
सत्ता संघर्षाच्या या 15 वर्षांच्या काळात मिळकतीपेक्षाही अधिक संपत्ती, दत्तक मुलाचं शाही लग्न यामुळे अम्मांवर टीका आणि आरोप झाले. त्यातच कोर्ट निर्णयाचा फायदा घेत करुणानिधींनी जयललितांना एका महिन्यासाठी जेलमध्येही पाठवलं होतं.
गेल्या पाच वर्षात मात्र बाजी पलटू लागल्याचीच चिन्ह दिसू लागली. द्रमुक अंतर्गतच अनेक वाद, घराणेशाहीचं राजकारण आणि गाजत असलेला 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा. द्रमुकच्या सत्तेला घरघर लागण्याचीच ही नांदी होती.
त्याचाच वापर करत अम्मांनी प्रचाराची राळ उठवून दिली. आणि वैतागलेल्या तामिळी जनतेनं मग द्रमुकला खाली खेचत, जयललितांना पुन्हा सत्तेवर बसवलं.
२०१६ च्या निवडणुकीत तर मतदारांना पंखे, सायकली, टीव्ही असे मोफत बक्षीसांचं आमिष देऊन अम्मांनी प्रचाराच धुराळ उडवलं. विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये अालटूनपालटून सत्तांतर होणे हे नेहमीचे पण तामिळ जनतेनं अम्माला साथ दिली. सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याच बहुमान अम्मांनी मिळवला. एका अभिनेत्री ते मुख्यमंत्रिपदापर्यंतच अम्माचा प्रवास थक्क करणारा असाच आहे.म्हणूनच त्या अम्मा होऊ शकल्या.

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...