About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Saturday, September 16, 2023

आर्यसत्य ( Nobel Truths )


आर्यसत्य ( Nobel Truths  ) अजून कोणत्या संप्रदायात किंवा धर्मात असतील तर कळवा ?

१ पहिले आर्यसत्य – दुःख

२ दुसरे आर्यसत्य – दुःखाचे मूळ

३ तिसरे आर्यसत्य – दुःख निरोध

४ चौर्थ आर्यसत्य – दुःख निरोधाचा मार्ग




महामानव डॉ बाबासाहेब आंबेकर द जुरिस्ट!

महामानव_डॉ_बाबासाहेब_आंबेकर_द _जुरिस्ट!

----------- प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ नवी मुंबई 

प.पू.डॉ.बाबासाहेब हे एक असे दालन आहे जे जयभीम म्हणून ही कळत नाही मग जगातील कोणतीही शिक्षित व्यक्ती का असेना.जगातील तमाम विद्वान लोकांनी त्यांच्या बुध्दीमत्तेला जयभीम करून मार्क्स पासून बाबसाहेब कसे वेगळे आहेत.ते एक ज्यूरिस्ट कसे होते याची उखल केलेली आहे.ते घटनाकार तर होते पण ते जुरिस्ट कसे होते याचे  अनेक उदा.देता येतील.

 सन १९३५ ते १९५६ हा काळ त्यांचा ' द जूरिस्ट ' म्हणून गणला जातो.मी जरी व्यवसायाने वकील नसलो तरी बाबासाेबांबद्दलचा वकिलीचा  असलेला पेशा आणि  मिळकत सेवाभाव जाणतो.

तेंव्हाच्या बॉम्बे युनि्हसिर्टीतून ५जुलै १९२३ ला त्यांनी जी सनद घेतली ती केवळ पददलित वर्गलाच न्हवे तर ,जगातील तमाम बॅकवर्ड वर्गाला त्या सनदचा कसा फायदा होईल हेच त्यांनी केलं.

एकच उदा.संपूर्ण कहाणी सांगून जाते.एका केस मध्ये बॅरिस्टर जिन्हा यांनी त्या काळी २५१००/- फिस मागितली तर बाबासाहेबांनी ती केस केवळ २६५/- रुपयात जिंकून दिली.विचारवंताला हे एक उदा.पुरेसे आहे.

मला थोडे बाबासाहेब कळतात म्हणून मी तो कार्यक्रम संपला तेंव्हा स्टेज वर जाऊन हा फोटो छातीला लाऊन घेतला.माझा मित्र सुलील पवार (PLL,Mumbai University) याने टिपला आहे.असा मला कोणी भेट वगैरे नाही दिला आहे.

कारण असे होते मोठ्या दिग्गज लोकांना हा पूर्णाकृती पुतळा नको होता,त्यांनी हार तुर्या सहित स्टेजवर ठेवला कार्यक्रम संपला आणि निघून गेले.केवळ आणि केवळ कार्यक्रमाची शोभा म्हणून तर आणले नसावे.?

आता मुद्धा असा आहे की बाबासाहेब हे कसे जुरिस्ट होते आणि जूरिस्ट कोणाला महणावे.

वर सांगितल्या प्रमाणे त्याने १९३५ ला  धर्म बदलण्याची जी घोषणा केली ती १९५६ सली खरी करून दाखवली त्याच कारणाने ते #जुरिस्ट ठरतात.

अश्या आणि अनेक वास्तव सुपीक कल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या खऱ्या करून दाखवल्या म्हणून ते jurist म्हणून ओळखले जातात.

मग महाड चे चवदार तळे संघर्ष असो की काळाराम मंदिर प्रवेश असो.जे जे वदले ते ते त्यांनी  क्रांतीत रूपांतर केले.

या क्रांतीच्या पाऊल खुणा या जगातील अव्वल दर्जाचे jurist म्हणून ओळखायला भाग पाडतात.

त्यांच्या पश्चात कोणी अशी क्रांती केली नाही म्हणून तसा 'THE JURIST ' कोणी होत नाही.म्हणून ते प्रज्ञासुर्य, क्रांतीबा होतात.

समतेच्या,शांतीच्या , धम्माचा वाटेवर घेवून जातात म्हणून ते जगात #ज्यूरिस्ट म्हणून ओलखले जातत.इथेच क्रांतेयबुद्ध ,महामानव म्हणून ही ते ओळखले जातात .

तसे ते पुतळ्यात नाहीत असे नाही, पण ते मला त्यांच्या साहित्यात उजळून दिसतात.मग ते साहित्य त्यांचे असो किंवा त्यांचावर जगातील कोणत्याही कवी ,कथाकार ,लेखक यांनी लिहलेले असो.त्यात त्यांचे प्रतिबिंब दिसते ते खरे.


(स्थळ दीक्षांत सभग्रह ,मुंबई विद्यापीठात, फोर्ट)






Friday, September 15, 2023

३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

 


३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

-------------------- प्रा.बा.र.शिंदे 

लोक जागर,महोत्सव ,जयंती ,जयंती- उत्सव सभा,चर्चासत्र,मेळावे ,प्रचार, यात समाज प्रबोधन करीत विद्वान व्यक्ती, प्राध्यापक,डॉक्टर ,अभियंता,आणि शिक्षक - शिक्षिका यांनी ऑगस्ट चा महिना पिंजून काढणार?

कार्यकर्ते गल्ली बोळात जाऊन ' जय लहूजी ' चा नारा देत, लोकशाहीर,डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे,बघता काय सामील व्हा.असे आणि कैक नारे देत चंदा काढून जयंती साजरी करणार? कारण ते आपलेच महामानव आहेत.आपणास पट्टी देणे भाग आहे.हे त्यांचे रास्त मत असते? आणि तसे असणे साहजिक आहे.

झोपडपट्टीतील घराला दार नसले तरी,तेथून ते तमाम चाळी -चाळी तून अमाप पैसा जमा होणार.याच दिमतीवर जयंती साजरी होते.

एकदाची कार्यकर्ते नेते मिळून जयंती साजरी करणार? पदरात काय? पुढील ऑगस्ट ची वाट पाहावी लागते.

आता जसा ३१ ऑगस्ट निघून जाईल तसा दुसऱ्या कार्यक्रमाचे वेध लागते,ते म्हणजे ,गणराया येणार?

तुम्ही कांहीं म्हणा गणराया आमच्या घरी येणार, म्हणजे येणार?

आपणास विचार करायला हवा की ,आपली बुद्धी शुद्ध नसते.आपले डोके इतरांच्या इशाऱ्या वर चालते.म्हणून असे उद्योग सुचत असतात.

राजा शिवराय ,राष्ट्रपिता  महात्मा फुले ,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात ,साहित्यात कुठे गणपती या शब्दाचा उल्लेख मिळतो का?

मग आपण या महामनवाचे वारसदार कसे ? तर नाही! आपण या महामानवाला खऱ्या अर्थाने तिलांजली देत आहेत.

संकट में। हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में।

संकट में।..

हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में!

........................प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ

तमिलनाडु चे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन  यांनी सनातनवर मोठे संकट निर्माण केलं आहे.
सनातन हाधर्म नसून ही एक भ्याड प्रवृत्ती आहे.सनातन ची  तुलना ते डेंगू, मलेरिया असे करता. सनातन हा हिंदू धर्माचा भाग आहे हे भक्तांना वेगळे वाटत नाही.?
तसे पाहता सनातन या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून चालेल आलेला चिरंतन ,अविनाशी असा आहे.(Orthodox)
आत्मा , पुनर्जन्म या संकल्पना मानत असलेल्या हिंदू धर्माला सनातन धर्म असे म्हटले जाते.
तसे पाहता वेदामध्ये कुठेही सनातन धर्म असा उल्लेख आढळ नाही .हिंदू धर्मात सनातन ही संकल्पना पूर्वापार माहिती असली तरी तिची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती एकोणिसाव्या शतकात.
भारतात इंग्रजांनी आधुनिक जगाची ओळख सुरू केली मग या आधुनिक जगाच्या ओळखीचा विरोध करण्यासाठी 'सनातन' यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला.
ब्रिटिश राजवटीत आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले आता नीट जगाला परिचय होऊ लागला कालबाह्य रूढी परंपरांना प्रश्न विचारले  जाऊ लागले आणि आधुनिक जगाचा  पुरस्कार झाला .यांच्यात वाढ झाली आणि तेव्हापासून सनातली हे कट्टर झाले.
सनातनी कट्टर झाले म्हणजे नेमके काय झाले?
कारण त्यांनी स्त्री शिक्षणाला आणि विधवा विवाह यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांचा प्रखर विरोध केला.
सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाला त्याच्या विरोध झाला. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल. या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले दगड मारले.
तो झाला इतिहास विसरता कामानये.इतिहास खूप मोठा आहे.संत तुकोबा,संत ज्ञानदेव आणि राजे शिवराय यांचा विरोध हे सनातनी डोक्याची करामत होती.
आता सनातन होण्याची नियम आणि विचारधारा काय आहे ते  पाहूया.
हे लक्षात ठेवावे की सनानात हा धर्म नसून ती एक भ्याड वृत्ती आहे.सनातन आणि हिदू धर्माचे नाते काय? तर नाही हे उत्तर होय.
१.जातीय व्यवस्था मानतो.
२ माणसात भेदभाव निर्माण करतो.
३.आरक्षणाला विरोध करतो.
४.स्त्री शिक्षणाच्या विरोध करतो.
५.स्त्री स्वांत्र्याला विरोध करतो.
६.स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यावा,चूल आणि मूल हे आपले कार्यक्षेत्र ठेवावे.
७.पती निधनानंतर केश वपण करावे,सती जावे.
८.सनातन ची चिकित्सा होऊ नये.
९.सनातन चा विरोध करू नये.
नियम पहा...
१.सप्तसिधुबंधी : तरी सनातनी स्वतः जगभर फिरत असतात.
२.जात व्यवहार: सनातन सोडून सर्व मजुरीची कामे इतर जातीतील करता.ते त्यांना चालते.
३.स्त्रीशिक्षण नको: तरी आज सर्व सनातनी स्त्र्या शिक्षण घेतात.
थोडक्यात स्वतः सनातनी हे सगळे नियम धाब्यावर बांधून ,आग दोंबत आहेत की ,सनातन खत्रे मे है.सनातन( धर्म ?) बुडतो आहे?
नक्की कोण बुडतो आहे ? हे भक्ताने समजावे.


मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...