Friday, September 15, 2023

३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

 


३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

-------------------- प्रा.बा.र.शिंदे 

लोक जागर,महोत्सव ,जयंती ,जयंती- उत्सव सभा,चर्चासत्र,मेळावे ,प्रचार, यात समाज प्रबोधन करीत विद्वान व्यक्ती, प्राध्यापक,डॉक्टर ,अभियंता,आणि शिक्षक - शिक्षिका यांनी ऑगस्ट चा महिना पिंजून काढणार?

कार्यकर्ते गल्ली बोळात जाऊन ' जय लहूजी ' चा नारा देत, लोकशाहीर,डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे,बघता काय सामील व्हा.असे आणि कैक नारे देत चंदा काढून जयंती साजरी करणार? कारण ते आपलेच महामानव आहेत.आपणास पट्टी देणे भाग आहे.हे त्यांचे रास्त मत असते? आणि तसे असणे साहजिक आहे.

झोपडपट्टीतील घराला दार नसले तरी,तेथून ते तमाम चाळी -चाळी तून अमाप पैसा जमा होणार.याच दिमतीवर जयंती साजरी होते.

एकदाची कार्यकर्ते नेते मिळून जयंती साजरी करणार? पदरात काय? पुढील ऑगस्ट ची वाट पाहावी लागते.

आता जसा ३१ ऑगस्ट निघून जाईल तसा दुसऱ्या कार्यक्रमाचे वेध लागते,ते म्हणजे ,गणराया येणार?

तुम्ही कांहीं म्हणा गणराया आमच्या घरी येणार, म्हणजे येणार?

आपणास विचार करायला हवा की ,आपली बुद्धी शुद्ध नसते.आपले डोके इतरांच्या इशाऱ्या वर चालते.म्हणून असे उद्योग सुचत असतात.

राजा शिवराय ,राष्ट्रपिता  महात्मा फुले ,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात ,साहित्यात कुठे गणपती या शब्दाचा उल्लेख मिळतो का?

मग आपण या महामनवाचे वारसदार कसे ? तर नाही! आपण या महामानवाला खऱ्या अर्थाने तिलांजली देत आहेत.

No comments:

Post a Comment

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...