Saturday, November 4, 2023

अमर्त्य सेन

 



"आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही."

जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षरता असेल तर अशा समाजात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निरोपयोगी आहे. आपण फक्त न्याय आणि  योजना  करण्यापेक्षा त्यांच्या परिणामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. 

#अमर्त्य_सेन 

नुकताच ३  नोव्हेंबर रोजी जगप्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  सुरुवातीला नोबेल आणि  नोबेल नंतर भारतरत्न असा जगप्रसिद्ध प्रवास करणारे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे अमर्त्य  सेन . 

देशातील आणि जगभरातील आर्थिक व्यवहाराच्या अभ्यास करीत असताना मानवता आणि स्त्रियांचे मूल्ये कशी जोपासावे यावर त्यांनी जगभरात संशोधन केले. 

१९०९  मध्ये अमर्त्य सेन यांनी पाक्षिक तत्वावर प्रसिद्ध होणाऱ्या “न्यूयॉर्क रिवीहव ऑफ बुक्स” या यामध्ये एक प्रभावी शोधनिबंध लिहिला होता.  त्यात त्यांनी आशियाई देशांमधील वाजवीपेक्षा खूप जास्त राहिलेल्या मृत्युदराचे काळजीपूर्वक परीक्षण करून ते या धकादायक निकषावर पोचले होते स्त्रिया मुळातच काटक  आणि जीवशास्त्रीय रचनेनुसार पुरुषापेक्षा स्त्रीचे आयुमान पुरुषा पेक्षा  अधिकच असते. असे असून देखील , जगात स्त्रिया कशा कमी होत चाललेले आहेत त्याचीही त्यांनी इथं  कारण मीमासा केलेली आहे .. 

स्त्रीभ्रूणहत्या ,जन्मापूर्वी मोठ्या प्रमाणात लिंग निर्धारण चाचणी, लिंग प्रणित गर्भपात यासारख्या समस्या कडेही त्यांनी लक्ष वेधले . जगत लोकसंखे मुळे चीन आणि भारत हे या स्त्रीविरोधी अंत प्रवाहाचे मुख्य योगदान करीत  आहेत आणि एकच अपत्य धोरणामुळे चीनमध्ये पुरुष मुलाला स्वभाविकच अधिकच प्राधान्य दिले गेले ,याचा परिणाम काय तर आज तेथे  पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही.? तीच गत भारतात का होणार नाही ? 

अशा अनेक विविध पैलू वर विचार करीत असताना जगात स्त्रियांची मृत्यूचे प्रमाण कसे कमी होत आहे याचे त्यांनी अनेक शोधनिबंध तयार केले आहेत . 

भारत देशामध्ये दुष्काळामुळे किंवा उपाशीपोटी अनेक लोक मरताना दिसत आहेत. इथे ते १९६०  चा चीनमध्ये झालेला दुष्काळ यावर भाष्य करतात . हे होत असताना मोठ्या प्रमाणात त्या काळा मध्ये  झालेली मृत्यू हे भारतातील याच काळातील स्थितीच्या अगदी उलट आहेत सेन यांनी असेही प्रतिपादन केले आहे की बहुतेक दुष्काळ हे नैसर्गिक कारणामुळे नव्हे तर मानवनिर्मित कारणामुळे होत असतात  . 

असे अनेक जगभरात शोधनिबंध लिहिणारे भारतातील लोकशाही वर ही भाष्य करतात. 

त्यांच्या योगदानातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘न्यायाची कल्पना आणि न्याय व नीती’ या संकल्पना मधील फरक सांगणारी  आहे.  न्याय हे परिणाम करते व अधिक भर असणारे आणि सामाजिक व्यवस्थेकडे कमी लक्ष देणारे आहे, तर नीती ही सामाजिक धोरण आणि योजनांची घडणी आहे. 

 त्यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे ‘  तर असा युक्तिवाद केला आहे की जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षरता असेल तर एक परिणाम म्हणून अशा समाजात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सामाजिक व्यवस्था किंवा तत्व निरुपयोगी आहे ‘ त्यांचे म्हणणे हेच की आपण फक्त न्याय कायदे आणि योजना करण्यापेक्षा त्यांच्या परिवाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे . चित्रपट निर्माता  मुजफ्फर अली यांनी एकदा या संबधाचे टिपण करताना म्हणले होते की,  ‘तुम्ही जर माझी जीभ छाटून टाकली तर माझ्या भाषण स्वातंत्र्याचा मला काय उपयोग ?  सेन यांचे समाजा वरील कार्य पारदर्शक आहे. 

संधी निर्माण करीत असताना त्या संधीचा भाग जनसामान्य माणूस झाला पाहिजे अशी त्यांचे  मत आहे त्यात मूलभूत शिक्षण आणि आरोग्यसेवा तसेच रस्ते व स्वच्छतेची सुविधा यासारख्या सार्वजनिक वस्तू सेवा सुविधांचा आणि त्या पुरवणे ही सरकारची किंवा राज्यकर्त्यांची जबाबदारी असेल. 

अमर्त्य सेन यांना १९९८  मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हापर्यंत नोबेल  मिळणाऱ्या जवळपास ९०० व्यक्तींमध्ये हा पुरस्कार मिळवणारे हे  केवळ सहावे  भारतीय होत. १९१३  मध्ये पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होती.  त्यांनी शांती निकेतन मध्ये जन्मलेल्या या  अर्थशास्त्रज्ञांची अमर्ते असे नामकरण त्यावेळी केले होते. 

 पंतप्रधान बाजपाई  यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने अमर्त्य सेन  यांना नोबेल नंतर लगेच भारतरत्न बहाल  केले यात आश्चर्य वाटण्या सारखे कांही नाही ? 

 सेन यांनी आपली सर्व कमाई प्राथमिक शिक्षणात काम करणाऱ्या एका ट्रस्ट ला  दान केली आहे 

हे वर्ष सेन यांची नोबेल पारितोषिक मिळविण्याचे तसेच त्यांनी वयाची नव्वदी  ऊलटल्याचे आहे सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरीही विशेषता शिक्षण वेत्यासाठी  निश्चितच प्प्रेरणादायी आहे.  त्यांचे शिक्षण शांतिनिकेतन प्रेसिजन्सी कॉलेजमध्ये झाले प्रत्येक टप्पा त्यांनी सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण केला आणि केंद्रित विद्यापीठातील ते बीए मध्ये पहिले आले नंतर तिथेच त्यांनी बी एच डी केली ते माधवपूर विद्यापीठात त्यांचे विभागात  सर्वोच्च तरुण अध्यापक  होते आपल्या कारकिर्दीत त्यांनी दिल्ली स्कूल ऑक्सफर्ड ,केंब्रिज , हवर्ड  आणि इतर अनेक ठिकाणी अध्यापन केले आहे. 

एकदा तीन हजार विद्यार्थ्यांसमोर एका मोठ्या सभेत त्यांना उत्सुकतेने एक प्रश्न विचारण्यात आला सर भारत महासत्ता कधी होणार ? यावर त्यांनी असे उत्तर दिले की त्यांना या शोधात मला  अजिबात रस नाही भारताने सर्व मुलांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य सेवा दिल्यावर भर दिला तरी पुरेशी आहे . असे त्यांनी सुचविले होते. 

 मोदींच्या नेतृत्व शैलीवर त्यांनी विरोधी कडवट टीका केली आहे त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांचे विचार मंथन  करीत म्हटले होते की लोकशाहीचे चर्चेद्वारे घडणारे सरकार असते आणि जर तुम्ही चर्चेचे प्रांगण भयभीत  करून टाकले तर तुम्हाला खरी लोकशाही मिळणारच नाही ? 

 नालंदा विद्यापीठाची कुलूपती म्हणून सेन यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता आणि मोदी सरकारने २०१५  मध्ये त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ दिली नाही .एका  प्रेक्षक सदस्यांनी त्यांना भर सभेत विचारले की तुम्ही कधी चीनमधील जीवन जगला आणि मी अनुभवला आहेत का ? जरूर काय तो त्यांना विनोद होता अशा टिकेकडे सेन यांनी पारसे  लक्ष दिले नाही . त्यांच्या वैयक्तिक जीवनावर एक टीकाकाराने  टोमणे मारले होते . 

त्यांचे वैयक्तिक जीवन हेवा  वाटावे अशी मनोहर आहे . त्यांनी तीनदा लग्न केले होते . त्यापैकी एक चित्रपट अभिनेते देखील आहे. ते  कसा आराम करतात असे विचारल्यावर त्यांना उत्तर असते की आवडीच्या विषयावर खूप वाद आल्याचा मिळणे हाच आराम त्यांनी . ते स्वतः नास्तिक आहेत आणि नास्तिकतेवरील संस्कृत अभिजात साहित्यातील विपुद्देकडे निर्देश करून ते त्यांना भूमिकेचे समर्थन करतात ते त्यांची राजकीय विचार व्यक्त करण्यास पचली नाही 

सेन डाव्या  विचारसरणीचे आहेत परंतु अति  डाव्या विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहावे असा ते  सल्ला देतात . कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ सामाजिक निवड सिद्धांत विकास अर्थशास्त्र तत्त्वज्ञान आणि नैतिकता अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी मूलभूत योगदान दिले हे सर्वश्रेष्ठ आहे .  अमर्त्य सेने असे समाज धर्मी विचारवंत आहेत जी प्रजाती आज दुर्मिळ बनला चालली आहे युक्तिवाद आणि तर्कशास्त्राच्या पद्धतीची जी वचनबद्ध रहा त्यांनी कायम विवेकाची कास धरली आणि तरी सत्ता शक्तीपुढे गरज पडल्यास खरे  बोलण्यास ते घाबरले नाहीत . 

अश्या बुद्धिजीवी महान अर्थतज्ञ , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणालीच्या  महान व्यक्तीस उत्तम आरोग्य मिळो  ,हीच  त्यांना हार्दिक   शुभेच्छा !!!


प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ४०० ७०६ 

No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...