About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Tuesday, August 27, 2024

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यात भरहुत या गावात स्थित आहे. हा स्तूप मौर्य सम्राट अशोकाच्या काळात, म्हणजे इ.स.पूर्व 3ऱ्या शतकात बांधण्यात आला होता. भरहुत स्तूपाची विशेषता म्हणजे त्याच्या स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकलेतील उत्कृष्टता.




बांधकाम आणि रचना:

भरहुत स्तूपाची रचना मौर्य स्थापत्यशास्त्राच्या प्रभावाखालील आहे. हा स्तूप मुख्यतः विटांनी बांधला गेला आहे आणि त्याच्यावर दगडांचा वापर करण्यात आला आहे. स्तूपाच्या भोवती एक परिक्रमा मार्ग आहे, ज्याच्या चारही बाजूंना सुंदर दरवाजे (तोरण) आहेत.

शिल्पकला:

भरहुत स्तूपातील शिल्पकला अत्यंत समृद्ध आहे. स्तूपाच्या रेलिंगवर आणि दरवाजांवर बौद्ध धर्माशी संबंधित अनेक कथा आणि घटक कोरलेले आहेत. या शिल्पांमध्ये जातक कथा, बोधिसत्त्वाच्या कथा, तसेच अनेक देवता आणि यक्ष यांच्या मूर्ती आहेत. हे शिल्प अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक आहेत.

ऐतिहासिक महत्त्व:


भरहुत स्तूप बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. हा स्तूप बौद्ध धर्माच्या प्रारंभिक कालखंडातील सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. भरहुत स्तूपाच्या शिल्पांमध्ये तत्कालीन समाजाची जीवनशैली, वस्त्र परिधान, आणि धार्मिक आचार-विचार यांचे चित्रण आहे.

पुरातत्त्वीय शोध:


भरहुत स्तूपाचा शोध 19व्या शतकात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी लावला. त्यांनी या स्तूपाची उत्तम प्रकारे खुदाई करून त्यातील शिल्पकला आणि वास्तुकलेचा अभ्यास केला.

आज, भरहुत स्तूपाच्या अनेक मूळ शिल्पांचा संग्रह कोलकात्याच्या भारतीय संग्रहालयात आहे. भरहुत स्तूप भारतीय इतिहास आणि कला या दोन्हीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.


भरहुतचे महत्व काय?


भरहुत स्तूपाचे महत्त्व अनेक कारणांमुळे विशेष आहे. भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला, आणि धार्मिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून या स्तूपाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:


1. बौद्ध धर्माच्या प्रसारात भूमिका:

भरहुत स्तूप मौर्य सम्राट अशोकाच्या काळात बांधला गेला होता, जेव्हा बौद्ध धर्म भारतभर प्रसारित होत होता. हा स्तूप बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र होता. इथे अनेक बौद्ध भिक्षू आणि अनुयायी येत असत, ज्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत झाली.

2. प्राचीन शिल्पकलेचे उदाहरण:

भरहुत स्तूपाची शिल्पकला अत्यंत समृद्ध आणि सूक्ष्म आहे. स्तूपाच्या रेलिंग्सवर आणि तोरणांवर (दरवाजांवर) कोरलेली शिल्पे बौद्ध धर्मातील जातक कथा, बोधिसत्त्वाच्या कथा, देवता, यक्ष, आणि अन्य धार्मिक घटकांचे वर्णन करतात. या शिल्पांमधून तत्कालीन समाजाची जीवनशैली, वस्त्र, आभूषणे, आणि धार्मिक आचार विचारांचे दर्शन होते. ही शिल्पकला मौर्य आणि शुंगकालीन भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

3. ऐतिहासिक दस्तावेज:

भरहुत स्तूपाचे शिल्प आणि लेख प्राचीन भारतीय इतिहासाचे महत्त्वाचे दस्तावेज आहेत. यामध्ये तत्कालीन समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे स्पष्ट चित्रण आहे. स्तूपाच्या शिल्पांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित विविध घटना, तसेच त्यावेळच्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक, आणि सांस्कृतिक जीवनाचे वर्णन आहे.

4. पुरातत्त्वीय महत्त्व:

भरहुत स्तूपाचा शोध 19व्या शतकात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी लावला. त्यांनी या स्तूपाची खुदाई करून त्यातील शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा अभ्यास केला. यामुळे भरहुत स्तूप भारतीय पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

5. धार्मिक समन्वयाचे प्रतीक:

भरहुत स्तूपाच्या शिल्पांमध्ये बौद्ध धर्मासह अन्य धार्मिक प्रतीकांचेही दर्शन होते. यामुळे भरहुत स्तूप धार्मिक समन्वयाचे एक प्रतीक मानले जाते, जे भारताच्या बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक परंपरेचे प्रतीक आहे.

या सर्व कारणांमुळे भरहुत स्तूप भारतीय इतिहास, धर्म, आणि कलावैभवाच्या अभ्यासासाठी एक अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे.


---------------

अपील : मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

जय भीम ! नमो बुद्धाय ! 

प्रा. बा र शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ७०६



Tuesday, August 13, 2024

पावसाळ्यात कानाची काळजी!

पावसाळ्यात कानाची काळजी!




कान हा पाच इंड्रिया पैकी एक महत्वाचा संवेदनशील भाग आहे.कान हे ऐकूण तर्क लावणे आणि विचार करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य करते.

कानात खाज येणे, कान दुखणे किंवा मळ काढण्यासाठी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात एखादे औषध टाकतात.रस्त्यावर बसलेल्या कानमळ (Ear Wax ) साफ करणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडून कानमळ काढून घेतात.?

त्यातून त्या व्यक्तीला थोडाफार आराम मिळतो. परंतु मान्सून ,नंतरच्या काळात हीच कृती कानाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे माझे मत आहे.गेली ३०  वर्ष या क्षेत्रात कार्य करत असताना असे अनेक अनुभव आले आहेत, सामण्ये तः लोक या कडे दुर्लक्ष करून आपला कान कायमचा निकामा करून घेतात.

सध्या पावसाचे दिवस आहेत . पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता कानांवर परिणाम करू शकते. बरीच लोकं तज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेता कानात अनेक प्रकारचे द्रव ,तेल,औषधे टाकतात.त्यामुळे औषधाचे थेंब टाकल्यास कानाचे आजार होण्याचा धोका संभवतो.आणि हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

पावसाळ्यातील उच्च आर्द्रता जिवाणू आणि बुरशीसाठी पोषक असते. त्यामुळे औषध टाकल्यास कानाच्या संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अशी लक्षणे असतात,जसे यामुळे कानात खाज सुटणे, लालसरपणा येणे, सूज आणि स्रावही होऊ शकतो. सतत पाण्यात पोहणे  अशा काळात विशेष काळजी घ्यावी लागते . 

कानाच्या वाह्य नलिकेतही विषाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग झाल्यास तीव्र वेदना, लालसरपणा, सूज आणि अगदी हिरवट-पिवळा पू स्राव होऊ शकतो.आणि कानाचा पडता (Eardrum ) फाटू शकतो.यातून काननलिका बंद होऊ शकते तसेच श्रवणशक्तीवरही (Hearing Loss) परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे कोणतीही औषधे टाकण्याऐवजी कानाची नियमित स्वच्छता करा. कानातील अतिरिक्त मळ काढून टाकण्यासाठी मऊ, कॉटन च्या ओलसर कपड्याचा वापर करावा. कापसाच्या झुबक्यांचा ( Earbud ) वापर टाळावा, श्रवणयंत्रे (Hearing Aids ) वापरत असाल तर आर्द्रतेपासून होणारे नुकसान टाळावे. मुसळधार पावसात पोहणे किंवा इतर पाण्यातील कामे टाळा, जेणेकरून कानात दूषित पाणी जाण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.असे काम करत असताना .कानात ear protective device  वापरावे.

कानात अति त्रास होत असेल तर कान,नाक,घासा तज्ञ (ENT) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ,जर  श्रवणयंत्र वापरण्याचा सल्ला दिला असेल तर , श्रवणतज्ञ यांच्या सल्ल्यानेच  श्रवणयंत्र वापरावे.अन्यथा एक इंद्रिय निकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही . 

अधिक माहिती साठी या संकेत स्थळावर भेट द्या . अथवा मला संपर्क करा . 

........................................प्रा. बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ७०६ 

९७०२१५८५६४ 

www.ayjnihh.nic.in



अपील : मी प्रा. बी.  आर.  शिंदे ,(विशेष शिक्षा कर्णबधिर विभाग ,भारत सरकार ) सध्या सामाजिक कार्यासाठी लेखन स्वरूपात  स्वताला समर्पित केले आहे . पूर्वी कर्णबधिर  सरकारी क्षेत्रात  कार्यरत होतो . तिथे पण मी ३१ वर्ष सेवा केली आहे . शेवटी आपले घर आपला  समाज ,हयाचे ऋण देणे असते , ते मी करीत आहे .आपले हे हेच कर्तव्य असायला हवे .  समाज कार्य करण्यास नक्कीच अर्थसहाय्य करावे .  हयाच  मूळ कारणाने समाज आज तळा गाळात आहे .राष्ट्रपिता  महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे ' अर्था विना शूद्र खचले ' माझ्या  सारख्या अनेक धुरीण व्यक्तीने मोठया कसोसिने समाजात विविध पदावर राहून ,वेगवेगळ्या क्षत्रात कार्य केले आहे . 

 

    तेच कार्य मी आज एक खारीचा वाटा  उचलून कार्य करण्याचा  करीत आहे ,आपण ही एक खारीचा वाटा होऊन समाज कार्य करावे ही अपील आहे. आणि उपरोक्त गुगल लोगोवर आपल्या इच्छे प्रमाणे मदत करावे हे माझे अपील आहे . 

 

लेख आवडला तर  धम्मदान करा   .......... 


Sunday, August 11, 2024

बुद्ध विहार




क्रांतेयबुद्ध बाबासाहेब डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे बुद्ध विहार बांधण्यामागे  खलील  मुख्य उद्दिष्टे होते . 




क्रांतेयबुद्ध बाबासाहेब डॉ.बी आर.आंबेडकर यांनी , १८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथे बुद्ध विहारच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लोकांना समजावून सांगितले की बुद्ध विहार बांधण्यामागे माझी तीन मुख्य उद्दिष्टे आहेत:-

एक आपल्या समाजातील बहुसंख्य लोक आज  खेड्यात राहतात, परंतु त्यांना नोकरी, उच्च शिक्षण आणि मुलाखत इत्यादींसाठी शहरात सतत यावे लागते. मग ते कोणतेही शहर असो येथे त्यांना राहण्यासाठी जागा मिळत नाही,किंवा तसे राहण्या जोगे एकद्या नातेवाईक किंवा पाहुण्याचे तसे घर असत नाही .मग ते काय करतात ?  ते पदपथ, रेल्वे स्टेशन ,बस स्थानक , उद्याने, मोकळी मैदाने. त्यांना इत्यादि ठिकाण च्या  शहरात राहण्यास भाग पाडले जाते . 

जेव्हा इतर समाजातील लोक शहरात येतात, तेव्हा त्यांना धर्मशाळा, हॉटेल, गेस्ट हाऊस इत्यादी सहज आणि मोफत मिळतात किंवा कमीत कमी त्यांच्या स्वतःच्या जातीसाठी राखीव असतात . महणून शहरांमध्ये यावे, तुम्ही इथे सन्मानाने राहू शकाल आणि ही बौद्ध मंदिरे त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करतील असे बाबासाहेबांना वाटले होते. 

दुसरे कारण या बुद्ध विहारांमध्ये इंग्रजी माध्यमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा उघडण्यात यावे , जेणेकरून आपल्या समाजातील भावी पिढीच्या मुलांनाही इतर समाजातील मुलांच्या बरोबरीचे उत्तम प्रकार चे शिक्षण घेता येईल.

तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांना आर्थिक सक्षम करणे होय .  या बुद्ध विहारांच्या आसपास दुकाने बनवून, तेथील लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाईल.हा एक अति महत्वाचा आर्थिक विकासाचा निकष त्यांनी लावला होता . थोडक्यात आर्थिक बाजूने आपला समाज सक्षम व्हावा असा असावा . 

सरतेशेवटी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना समजावून सांगितले की लोकांना रोजगार आणि आदर देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा बुद्ध विहार बांधला जावा यासाठी प्रतेक बुद्धिस्ट व्यक्तीने प्रयत्न  करायला हेवे . 


पण आज तसे होताना दिसत नाही किंवा तसे केले जात नाही हे खेदाची बाब आहे . जे आज बुद्ध मंदिर किंवा विहार दिसतात ते इतर समाजाच्या मंदीरा प्रमाणे कुलूप बंद दिसत आहेत . कोणत्याही प्रकार चे नियोजनबद्ध कार्यक्रम होताना दिसत नाहीत . छोटी मोठी विहार बंधीस्त अवस्थेत आहेत . तेंव्हा बाबसाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाला आल्याचे निदर्शनात येत नाही . ही आजची मोठी खंत आहे . 

तरी कोणत्याही कामाची वेळ गेलेली नसते . उपरोक्त प्रकारचे प. पू.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू स्वयंप्रकाशित आहे, म्हणून आपण सर्वांनी महामानवाचा हा महान विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आज उद्या आणि रोज सतत केला पाहिजे.


नमामि भंते।

जयभीम ! नमो बुद्धाय

                प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 

लेख पसंत आया तो  धम्मदान करो  .......... 





बुद्ध गाथा

 

*बुद्ध गाथांचे महत्त्व आणि विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म"!*

 


गाथांचे महत्त्व लक्षात घेऊन विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा ग्रंथराज लिहिताना यातील नऊ गाथांचा उपयोग करून घेतला आहे.

सुखवर्ग हे धमपदातील १५ वे प्रकरण आहे. ह्या प्रकरणामध्ये ज्या सुखांचा स्वानुभूतीने आस्वाद घेता तो अशा सुखाचे वर्णन बुद्ध करतात.

 

बुद्ध म्हणतात, जीवनातील सारे झगडे "प्रथमचे" आणि "नंतरचे" असे आहेत. मात्र झगडे/भांडण सुरू झाले की मुख्य गोष्ट बाजूला पडते, मुख्य कारण बाजूला पडते आणि व्यर्थच्या गोष्टी मध्ये येतात. कधी कधी तर आपण मूळ कारणाला विसरून जातो आणि व्यर्थच्या गोष्टीवर वादविवाद, झगडे/भांडणं चालू होतात. त्याला कारण फक्त प्रथम कोण? आणि नंतर कोण? आणि हा प्रश्न केवळ आणि केवळ अहंकारानेच निर्माण होतो असे सुद्धा सांगतात.

 

*बुद्ध म्हणतात, मी महासुखी आहे!*

 

अहंकारानेच मनुष्य दु:ख ओढवून घेतो. मनुष्याच्या जीवनात दुःख, चिंता आणि अंधकार असल्याचे कारण काय तर केवळ आणि केवळ अहंकार हेच कारण आहे. बुद्ध मात्र स्वतःचे उदाहरण देऊन सांगतात की, मी महासुखी आहे! कारण मी वैरविहीन जगतो. माझे कोणाशी शत्रुत्व नाही, झगडा नाही, वैमनस्य नाही. आणि म्हणूनच मी महासुखी आहे. मी सारास सार आणि असारास असार म्हणून पाहतो म्हणून मला काही पीडा नाही, चिंता नाही, झगडा नाही, कोणाशी वैर नाही आणि म्हणून मी महासुखी आहे.

 

*बुध्द पुढे म्हणतात, तुम्ही किती धन गोळा करणार?*

 

वैरी लोकांत अवैरी राहून, आसक्त लोकांत अनासक्त राहून, रोगी लोकात स्वस्थ राहून माणसाला सुखाने जगता येते. जे लोक जय आणि पराजयाची चर्चा करतात ते लोक कधी सुखी राहू शकत नाहीत. कारण जयाने वैर निर्माण होते तर पराजित मनुष्य परभावाने दुखी होतो. म्हणून जय पराजय काही असले तरी त्याची चिंता करू नये, तरच सुखाने जगता येईल. ज्यांचेजवळ काहीच नाही, जे अकिंचन आहेत ते पण सुखाने जीवन व्यतीत करू शकतात कारण त्यांच्याजवळ सीमित धन आहे. परंतु जो धनाची अपेक्षा करतो तो सुखी राहू शकत नाही. कारण तो धन जमा करण्याची सीमा बाळगत नाही. बुद्ध म्हणतात, तुम्ही किती धन गोळा करणार? आणि पुष्कळसे धन असे आहे की जे तुम्ही गोळा करू शकणार नाही. उद्या जरी तुम्ही साऱ्या पृथ्वीचे मालक झालात तरी शेवटी चंद्र, सूर्य, ग्रह, तारे हे तुमच्या ताब्यात असणार नाहीत. आणि त्यांची मालकी तुमच्याकडे नसल्यामुळे दुःख होणार. बुद्ध म्हणतात, ज्या आम्हा लोकांकडे काहीच नाही ते आम्ही सुखपुर्वक जगतो.

 

*बुद्ध असेही म्हणतात, चांगले आरोग्य हा श्रेष्ठ लाभ आहे; समाधान हे श्रेष्ठ धन आहे!*

 

 

रागाग्निसारखा दुसरा कुठलाच अग्नी नाही; द्वेषासारखा कुठलाच मळ नाही; पंचस्कंधासमान दुसरे दुःख नाही आणि शांतीसारखे दुसरे सुख नाही. चांगले आरोग्य हा श्रेष्ठ लाभ आहे; समाधान हे श्रेष्ठ धन आहे; विश्वास हा मोठा बंधू आहे आणि निर्वाण हे सर्वात मोठे सुख आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने निर्वाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.

 

*बुद्ध म्हणतात, भूख हा सगळ्यात मोठा रोग आहे!*

 

एकंदरीत सुख वर्गामध्ये कोणकोणत्या सुखकारक गोष्टी आहेत याचे निवेदन या १२ गाथांच्यामधून केलेले आहे. बुद्ध म्हणतात, भूख हा सगळ्यात मोठा रोग आहे, संस्कार परम दुःख आहे, हे जो जाणतो तोच निब्बाण परम सुख आहे हे जाणून शकतो. हे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्यासाठी भौतिक साधनांच्याऐवजी धम्म मार्गावर चालूनच ते प्राप्त केले जाऊ शकते आणि धम्ममार्ग हा सर्व मानवांसाठी खुला आहे, तो सुखदायी आहे सत्यवादी आहे. या गाथांचे महत्त्व लक्षात घेऊन विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी *"बुद्ध आणि त्यांचा धम्म"* हा ग्रंथराज लिहिताना यातील नऊ गाथांचा उपयोग करून घेतला आहे.

 

जीवनात खुषी-आनंद, दुःख-विषाद, हार-जीत, रोग-भोग इ. सर्वांगीण पक्ष उजागर करणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख करणाऱ्या व आपल्या जीवनात अंतर्दृष्टी प्राप्त करून देऊन सुख देणाऱ्या व प्रसंगी उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या ह्या गाथा आणि त्या मागील कथा अत्यंत वाचनीय आणि बोधप्रद आहेत.

कथा या मानवी मनाच्या पटलावर कायम अधिराज्य करून असतात,त्या बोध आणि ज्ञान देत असतात . तद्वत बुद्ध गाथा या मनुष जातीला कायम जीवंत ठेवण्याचे कार्य करीत असतात .

 

*संकलन*

*प्रा.बी.आर.शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ७०६*


लेख आवडला तर धम्मदान करा .......... 



मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...