About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Friday, February 9, 2018

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना
दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि  एस एस सी परीक्षेला बसत असतात ,या प्रवर्गातील मुलांची संख्या  दर वर्षी वाढत चालली आहे . काही मुले विशेष शाळेतून तर कांही मुले सर्वसाधारण शाळेतून परीक्षेला  बसत असतात . तेंव्हा काही गोष्टी ध्यानात घेणं मह्त्वाच आहे . वेळो वेळी महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे आणि मुंबई मिळून अश्या मुलांच्या परीक्षे संधर्भात परिपत्रिकात बदल करून नवीन परीपत्रक परीक्षे अगोदर एक महिना प्रकाशित करीत असते . आणि त्या मध्ये विशेष मुलांसाठी सवलती जाहीर करीत असते .
कर्णबधिर मुलांत  भाषा विषयाचे आकलन कठीण जाते  , किंवा कमी असते म्हणजे त्यांच्या शाळेतील प्रवेशावर अवलंबून असते . शाळेत जर लवकर प्रवेश मिळाला असेल तर योग्ये यंत्राचा वापर करून ऐकण्याची सवय लावून उचित थेरपी देऊन लवकर भाषा विकास साध्य  करता येतो ,आणि उशिरा  शाळेत प्रवेश मिळाला असेल तर भाषा विकासाला खीळ येतो ,अश्या मुलांसाठी खास सवलत द्यावी लागते .आणि ती शासन दरबारी देऊ केली आहे .
यात चार भाषेचा समावेश आहे .एक भाषा अभ्यासावी  लागते ,आणि इतर विषय म्हणजे टंकलेखन ,चित्रलकला ,शिवण काम यासारखे विषय घ्यावे लागतात . शास्त्र विषया  ऐवजी शरीर विज्ञान ,आरोग्य व गृह शास्त्र या सारखे सोप्पे विषय घेऊन  एस एस सी परीक्षेला बसता येते . आणि त्यांचा एस एस सी परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा होतो .
सदरील  सूचना  राज्यातील सर्व  शासन मान्य शाळेत  परिपत्रक काढुंन पुरवण्यात येते. हि सवलत मंजूर करून देण्यासाठी फॉर्म क्र १ ते ५ सोबत देण्यात येतो . अश्या स्वरूपाचा फार्म  भरून अपंग संवर्गानुसार संबंधित जिल्हा चित्सालय अथवा शासनाने निर्देशित केलेल्या रुग्णालयात त्यांच्या वैधकीय प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतिसह त्या त्या शैक्षणिक वर्षात मंडळाकडे ३१ ऑगस्ट पूर्वी मंडळाकडे सादर करावा लागतो . आणि हे बंधनकाकार असते ,कि कोणत्याही अपंग प्रवर्गातील सवलती बाबत मंडळाची पूर्व परवानगी आवश्यक असते . आणि हे परिपत्रक तक्त्यासहित विज्ञार्थी ,पालक ,शाळेचे कर्मचारी ,( शिक्षकेतर व शिक्षक) याची नोंद ठेवण्याचे बंधनकारक आहे .
विविध प्रकरच्या फॉर्म्स मध्ये ,फार्म नंबर १ अंध ,फार्म नंबर २ कर्णबधिर -२;डम्ब  फार्म नंबर  ३ अंतर्गत , शारीरिक विकलांग ४,पस्टिक ५,  फार्म नंबर ४ अंतर्गत लर्निंग विकलांगता ,आणि फार्म नंबर ५ अंतर्गत ऑटिसम या फार्म चा अंतर्भाव आहे . हे सोपस्कार पूर्ण झाल्यावर परीक्षेला बसता येते.
मुलांना विषय निवडीचे स्वतंत्र्य देऊन परीक्षेसाठी  पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते . आणि वरील बाबींची पूर्तता करून झाल्यावर परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती पुरवली जाते . जेणे करून चांगल्या प्रकारे परीक्षेत यश संपादन करता यते . परीक्षेला जाण्यापूर्वी काही सूचना जरूर लक्षात ठेवाव्यात :  
विशेष : प्रश्न पत्रिकेवर दिलेल्या वेळेपेक्षा ३० मिनिटे अधिकच वेळ दिलेला असतो . या वेळेचा उपयोग सर्व पेपर लिहून झाल्यावर तपासणी साठी वापरण्यात यावा ,लिहलेलं बरोबर आहे का ? ,सर्व प्रश्नाचे उत्तरे लिहली आहेत का ? इत्यादी साठी वापरावा .  
घरून निघते वेळी श्रावणयंत्र नीट तपासून कानाला  लावून जावे .
परीक्षेचे  ठिकाण ,वेळ याची खात्री करून इच्छित निश्चित स्थळी जावे
आपल्या हातात मिळालेली  प्रश पत्रिका आपलीच आहे का ते तपासून पाहावे ,आणि काही शंका असेल तर उपस्तित शिक्षकांना/पर्यवेक्षकाला  विचारून शंकेचे निरसन करून घ्यावे . विषय बदल झाला असेल तर खात्री करून घ्यावी . कर्णबधिरांसाठी असलेल्या विशेष शाळेतून जे विज्ञार्थी एस एस सी परीक्षेला बसले आहेत आणखी काही महत्वाच्या सूचना देणे महत्वाचे आहे .
उत्तर पत्रिकेवर स्वछ  आणि सुवाच्च अक्षरात लिहावे ,कुठे पेपर खराब होणार नाही याची काळजी घ्यावी . स्वतःचा क्रमांक मोठ्या अक्षरात व  ठळक लिहावा . हे सर्व करण्यासाठी घरी सराव  करावा लागतो .
उत्तर पत्रिकेत खडाखोड करू नये . अक्षर मोठे व दूर दूर व सारख्या अंतरावर लिहावे .
नवीन प्रश्नाचे उत्तर लिहण्यासाठी नवीन पानावर सुरुवात करावी .
प्रश व उत्तरचे अंक नीट लिहावेत . पेपर संपूर्ण सोडवावा ,आपल्याला येत असेलली  प्रश सुरुवातीला लिहावे .
चुका कमी करण्यासाठी पत्र ,गोस्ट आणि निबंध लिहीत असताना वाक्य लहान तयार करावीत ,जेणेकरून चुका होणार नाहीत . पत्रात स्वताचे नाव घालू नये पत्रातील पत्ता सुवाच्च आणि आटोपशीर असावा . दिलेली गोष्ट लिहीत असताना २-३ वेळा वाचून काढावी .,त्याचे परिच्छेद पाडावेत ,गोष्टीला शीर्षक म्हणजे नाव द्यावे ,नामे ,विशेष नाव लिहावीत ,उदा . राजा ,गाव ,मुलगा ,मुलगी इत्यादी . निबंध लिहीत असताना जो आपल्या आवडीचा आणि माहितीचा असेल तोच लिहावा ,आणि वेळ वाया घलू नये .त्यामुळे वेळ वाचतो व आवडीचाच विषय असल्यामुळे मार्क जास्त मिळण्यास मदत होते .  
प्रश्न व उप्र प्रश्नाचे  अंक नीट लिहावेत .
भूगोल ,विज्ञान आणि भूमिती ,या मध्ये ठळक अक्षराने व टोकदार पेन्शील ने लिहाव्यात . भूगोल मधील नकाशे सूची रेखीव पद्धतीने लिहावीत . आवशक्य तेथे आकृत्या काढायला विसरू नये ,कारण याचे मार्क सहज मिळत असतात . आकृत्यांवरील सूचना वाचून तशी कृती करावी .
अश्या मुलासाठी गृहविज्ञान खूप महत्वाचे आहे . या विभागात करणे द्या याला दोन गुण  असतात . एखादे कारण विचारले असेल तर ते बाजूलाच आकृती काढून नाव द्यावे लागते . आकृती काढल्या मुळे जास्तीचे मार्क जरूर मिळतात . एखादे उदाहरण विचारले असेल आणि आकृती लढण्याचे विचारले नसेल तर जरूर आकृती काढावी ,कारण आकृती वाढल्यावर पर्यवेक्षकाला कळते कि या मुलास प्रश्नाचे पूर्ण आकलन झाले आहे .
अर्थशात्र, विज्ञान ,आणि इतिहास भूगोल यातील काही मोठे प्रश्न अधोरेखित करावे ,तसेच गाळलेले  आणि महत्वाचे शब्द अधोरेखित करावे . हे करीत असताना कोठेही लाल शाई ,पेन्शील वापरू नये .
प्रशपत्रिका वाचून झाल्यावर अथवा वाचत असताना मुले काही लिहीत असतात ,तसे करता कामा नये .
कच्ची गणिते उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूवर लिहावेत . पक्की केल्यावर त्या ठिकाणी x अशी फुल्ली मारावी .
परीक्षेला जाताना सर्व वर्ग शिक्षकाने सांगितलेल्या  गोष्टी बरोबर घ्याव्यात ,आणि त्याने दिलेल्या नियमांचे वेळो वेळी पालन करावे
या मुलांसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रात्यक्षिक होय , प्रात्यक्षिकात  गृहशात्र ,आरोग्य शास्त्र ,शरीर शास्त्र ,या विषयाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे .  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोजक्या व नेमक्या वाक्यात द्यावी .उत्तरे  पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करावा . त्यासाठी आकृत्यांचा नीट व रोज अभ्यास करावा लागतो . शेवटी आपणास मिळालेल्या अर्ध्यां तासाचा पूर्ण  वापर करावा आणि नीट व सुवाच्च अक्षरात लिहण्याचा प्रयत्न करावा ,यश तुमच्या दारी उभे आहे .
विशेष गरज असणाऱ्या (अपंग) विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या सवलती :आणि यात येणारे अपंग संवर्ग :
  1. अंध विज्ञार्थी
  2. कर्णबधिर विज्ञार्थी
  3. अस्थिव्यंग विध्यार्थी
  4. बहुविकलांग विध्यार्थी  /(सेरेब्रल पाल्सी)
5.            अध्ययन अक्षमता विध्यार्थी
6.            स्वमग्न
         ऑटिझमग्रस्त विध्यार्थी
क्र
अपंगांचा प्रकार
अपंग कोड क्र.
वेळेची सवलत
सवलती
विषय सवलत
०१
अंध
प्रति तास २०
मिनिटे
१. निवडी प्रमाणे परीक्षा केंद्र दिले जाईल .
२. मंडळाच्या नियमास अधीन राहून आवश्यक्त्यानुसार व मागणी नुसार लेखनिक देनाय्त येईल .
३.आकृती ,नकाशे, आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .
४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .  
१. प्रथम भाषा १०० गुण
२. द्वितीय भाषा १०० गुण
३. तृतीय भाषा १०० गुण
४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंकगणित व त्या सोबत कार्यशिक्षण विषयांपैकी कोणताही एक विषय .
५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीरशास्त्र,आरोग्यशाश्त्र व गृहशास्त्र विषय .
६.इतिहास -राज्यशास्त्र व भूगोल अर्थशात्र   
०२
कर्णबधिर
मूकबधिर
३० मिनिटे अधिक वेळ
१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते .
विषय
१. प्रथम भाषा १०० गुण
२. द्वितीय भाषा १०० गुण
३. तृतीय भाषा १०० गुण
किंवा एक भाषा विषय अनिवार्य व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन विषय .
४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .
५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .
६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .
टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत
०३
अस्थिव्यंग
प्रति तास २० मिनिटे
१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.
२. विज्ञार्थी हाताने अपंग आल्यास आकृती नकाशे आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .
३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .
४.शारीरीक विषयात सूट दिली जाते

०४
बहुविकलांग
(सेरेब्रल पाल्सी)
बहू विकलांग १ तास २० मिनिटे.
सेरेब्रल पाल्सी
प्रति तास २० मिनिटे
१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.
२. उत्तरपत्रिका टाईप करून व किंवा लिहून  देण्याची परवानगी दिली जाते.
३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .
४.शारीरीक विषयात सूट दिली जाते
१. प्रथम भाषा १०० गुण
२. द्वितीय भाषा १०० गुण
३. तृतीय भाषा १०० गुण
किंवा एक भाषा विषय सूट कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .
४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .
५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .
६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .
टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत
०५
अध्ययन अक्षमता
२५ टक्के जादा वेळ
प्रति तास १५ मिनिटे
१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.
२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .
गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .
मंडळाच्या नियमात अधीन राहून आवशक्यतेनुसार व मागणी नुसार लेखनिक देण्यात येईल  
१. प्रथम भाषा १०० गुण
२. द्वितीय भाषा १०० गुण
३. तृतीय भाषा १०० गुण
किंवा एक भाषा विषय ऐवजी कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .
४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .
५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .
६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .
टीप :फक्त डिसकालकुलीया विधायर्त्यांचया ७ वीचे  अंक गणित हा  विषय घेता येईल .
कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत
०६
स्वमग्न
ऑटिझमग्रस्त
प्रति तास २० मिनिटे
१. ऑटिझमग्रस्त उमेदवार ज्या शाळेत विज्ञार्थी असेल त्या शाळेत त्याच शाळेत परीक्षेची व्यवस्था करण्यात येते किंवा मागणी नुसार जवळच्या शाळेत केंद्र म्हणून दिले जाते .  
२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .
३. गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .
४.४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .
५. कारक कौशल्याचा विकास न झालेली औतिस्तिक विधायर्त्याना कॉम्पुटर वापरण्याची परवानगी देनयेत येईल . मात्र त्या कॉम्पुटर वर पूर्वीची कोणतीही माहिती असता काम नये .
१. प्रथम भाषा १०० गुण
२. द्वितीय भाषा १०० गुण
३. तृतीय भाषा १०० गुण
किंवा एक भाषा विषय अनिवार्य  व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन  विषय .
४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .
५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व आरोग्य शस्त्र व गृह शास्त्र  विषय .
६.इतिहास राज्यशास्त्र  व भूगोल -अर्थशास्त्र  .
टीप : कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत



प्रा.बालाजी शिंदे ,नेरुळ नवी मुंबई .

Last updates on 27/11/2017

नात्यात लग्न एक अभिशाप

नात्यात लग्न एक अभिशाप

दिनांक : १७-०४-२०१७
नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक अभिशाप म्हणावे लागेल .नात्यात लग्न करण्याची आदिम काळापासून एक परंपरा आहे ,त्याचे बीजे खूप दूरवर कोरली गेली आहेत.आधुनिक काळात नवीन नवीन संशोधन यामुळे नाते संबंधामुळे त्याचे दूष परिणाम आज जगभर भोगावे लागत आहेत ते म्हणजे आज जगभरात दिसून येत असलेली अपंग बालके ,नाते संबंथ हे अतिशय घातक संबंध सूचित झाले आहेत ,त्याचा परिणाम म्हणजे जन्माला येणारे  अपंग बाळ.
आत्याच्या मुलीसोबत किंवा मामाच्या मुली सोबत लग्न केल्यावर नात्यातील रक्त गट एक होईन त्यात एक सुत्रता येते आणि रक्ताचा गट एक झाल्यामुळे येणारे मुल अपंग प्रवर्गात जम्माला येते .हा रक्त गट एका कुटुंबाकडून दुसरया कुटुंबाकडे प्रवाहित होत असल्यामुळे लगेच जरी मुल अपंग जन्माला आले नसले तरी ,दुसऱ्या पिढीत ते बाबा किवा आई ला ज्या ठिकाणी लग्न करून दिले असेल त्या ठिकाणी हमखास अपंग मुल जन्माला येते मग ते कोणत्याही परवार्गाचे असते .
या विषयी आपल्या भारताचा विचार करायचा असेल ते नाते संबंध हे  दृढ होत चालेली बाब आहे ,यामुळे जन्माला येणारे बाळ कोणत्याही अपंगाच्या प्रकारात जन्माला येणाऱ्या बाळात मोडते आज मितीला आपण सरास आवती भोवती पाहत आहोत कली बर्याच प्रकारची अपंग बालके जन्माला येत आहेत ,कर्णबधीर ,अस्थीव्यांग,अंध ,मातीन्मंद आणि बहुविकलांग ज्यात एकापेक्षा जास्थ विकलांगता पहावयास मिळते .त्याचे विविध कारणापैकी एक कारण म्हणजे नात्यात लग्न होय .
नात्यात लग्न जे होतात त्यात हिंदू धर्मात ,मामाच्या मुलीशी ,आत्याच्या मुलीशी , आणि बहिणीच्या मुलीशी आणि जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप दिवसपासून चालत आलेली आहे ,त्याचा परिणाम अपंग मुल जन्माला येते ते वरील कोणत्याही प्रकारचे असू शकते असे संशोधना अंती शिद्ध झालेले आहे ,मुस्लीम धर्मात ,बहिणीच्या मुलीशी आणि आत्या ,आणि मामा या नाते संबंधात लग्न करण्यची प्रथा आहे .
अनपेक्षित घडून अल्लेला प्रसंग यात भाऊ बहिण ,बाबा -मुलगी , दीर भावजय आणि बालवयात केलेला किवा झालेला अति प्रसंग यातून जर गर्भ धारणा झाली तर अपंग मुल जन्माला येण्याची शक्यता जास्त बळावते .जर मुलीचे किंवा प्रतिस्पर्ध्याचे वय कमी असेल तर नक्की होणारे मुल अपंग असू  येते .
वडिलोपार्जित संपत्ती आपल्या घरात असावी म्हणून ते सख्या बह्वासोबत लग्न करतात . कारण पूर्ण जगभरात फारशी लोकांची संख्या खूप रोडावली आहे .तो धागा पक्सून ही जमत घरात लग्न करीत असल्याचा अहवाल आहे .
अपंग मुल जन्माला येण्याची तशी बरीच करणे आहेत .तयची वर्गवारी जर केली तर तीन भाग पडता येतील एक जन्माच्या पूर्वी दुसरा जन्मः आणि तिसरा म्हणजे जन्मानंर .यात वेग वेगळी करणे आसू शकतात .
पण अनुस्वन्शिकता हा सर्वात महत्वाचा गह्तक आहे . आदिम काळात विवाह संस्था अस्तित्वात न्हवती तेंवा नात्यात लग्न करण्याची पद्धत असावी हळू हळू विकास होत गेला ,वसाहती निर्न्मान झाल्या आणि एक काळ असा आला की विवाह हा नात्यात सुरु झाला .त्याचे कारण असे की एखाद्या अनोळखी व्यक्ती किवा समाजात कसे लग्न करावे ? तर नात्यात लग्न करण्याची प्रथा सुरु झाली असावी ,हळू हळू मानव विकास पावत गेला नि समाजाची  रचना बदलत गेली .ती आजतागायत सामुहिक विवाह पर्येंत पोहचली आहे. पण नात्यात लग्न करण्याची प्रथा कायम ठाण मांडून बसलेली आहे असे पहावयास मिळते .
हे असे का होते करणे जरी वेगळी असली तरी विवाह एक असा खेळ आहे जो आज पर्येंत कोणालाही सुटलेला नाही कारण ही एक सामाजिक संस्था आहे ,एक संस्कृती आहे .आणि पारंपारिक पद्धत आहे .जनन उत्पतीच आणि राष्ट्र विक्साचा मूळ पाया ही .जगात जन्म घेणारे बाळ सुधृद हव्हे म्हणून प्रत्येक समाज ,देश झटत असते .एवढ्या उप्द्य्वातून अपंग मुल जन्माला  आल्या शिवाय राहत नाही .हा नात्यात लग्न करण्याचा अभिशाप आहे .
म्हणून याला एकाच उपाय आहे आणि तो म्हंजे असे लग्न टाळणे होय ,लोकात जनजागृती झाली पाहिजे या साठी वैक्तिक पातळीवर .सामाजिक संथा आणि शासन संस्थेचा हस्थ्क्सेप खूप महत्वाचा आहे .पूर्वी जेण्व्हा गोवर कांजण्या ची साथ येत से तेंव्हा जनजागृती खूप केली जात असे “देवीचा रोगी कालवा ,आणि हजार रुपय मिळवा “. त्याच पद्धतीने जर अपंग मुल जन्माला येण्यापासून थांबवायचे असेल तर अश्या पद्धतीने लोकात जनजागृती केली पाहिजे ,”नात्यात लग्न टाळा आणि पाच हजार रुपय मिळावा “.
आजच्या बदलत्या जगात आणि धावपळीच्या काळात समाजातील गटांनी या बाबी कडे गांभीर्याने पहावयास हवे ,जाती बाहेर जाऊन ,शहराबाहेर जाऊन ,जिथे आपणास योगे स्थळ वाटेल तिथे विवाह केला पाहिजे .ज्या मुले येणारे मुल सुधृद आणि निरोगी जम्माला येईल .आणि त्याचा परिणाम देश विकासासाठी हातभार लावण्यास मदत होईल ,अपंग बालक जन्माला येण्याची संख्या कमी होईल .
इकादारीत सामुर्ण भारताचा विचार केला तर उत्तर राज्यातील तुलनेत दक्षिण राज्यातील लोक जवळच्या नात्यात लग्न करण्यास पसंती देतात .मग अश्या विवाहास का पसंती देण्यात येते ? कारण एकाच आहे नाते संबंध ,रुंनुबंध कायम असावे ,आपुलकी हा एवढाच समंध आहे ,मग एखादे मुल अपंग झाल्यावर घरात एक कोठडी का करून ठेवता आले तरी चालेल ? सामजिक भीती पोटी उच्च कुलीन आणि मध्यम वर्गी देखील घरात जन्माला आलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला लपवण्याचा प्रयन करतात .पण आज थे चित्र थोडे बदलून गेले आहे ,जागरूकता आही सामजिक जान आणि आज अपंग व्यक्तींना मिळत असलेल्या सेवा सुविधा यामुळे मुल समाजाचा भाग बनत चालले आहे .
सामाज्याचाय प्रवाहात येण्यासाठी पालक ,शिक्षक आणि सेवा संस्था यांच्या पुढाकाराने ,नात्यात लग्न करण्याचे प्रमाण कमी झाले असून ,अश्या संबंध्तून जन्माला येणारे मुल दिसत नाही .जरी अपंग मुल जन्माला येत सतील तरी त्यांची करणे वेगळी आहेत हे लाक्षय्त घेण्याची बाब आहे .अश्या संबंध्तून जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश उद्बह्वतो ,आणि वेळ खाऊ आणि खर्चिक  असतो .या सर्व जाचापासून दूर राहण्यासाठी नात्यात विवाह न करणे हे सामाजिक, मानसिक, शारीरिक ,आणि देश हिताच्या दृष्टीने अत्येंत असरदार आहे .
शेवटचे अद्यावत 17-04-207

मराठा आणि इतिहासाच्या पाउलखुणा : तुम्ही कंचा मराठा ?

मराठा आणि इतिहासाच्या पाउलखुणा :

तुम्ही कंचा मराठा ?

दिनांक ०९/०८/२०१७ ,१०/०८ २०१७



महामोठा मराठा मोर्चा  मुंबई परिसरात निघाला होता ,त्या निमित्ताने काही लिहावे हे मोर्च्या बघितल्या  पासून जाणवत होत .इतिहात जर डोकाउन पहिले तर हा मराठा मोर्च्या काढण्याचे कारण कांही असो या मराठा  संघाने बहुजानावर खूप अन्याय अत्याचार केलेले पुरावे मिळतील ,आज माणुसकी लयाला जात आहे,हजारो शेतकरी विविध कारणानं आत्महत्या करीत आहेत ,त्याचे करणे वेगळी आहेत . म्हणून अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी ही जमात रस्त्यावर धुडगूस घालू पाहत आहे ,याच्या  मागचे राजकारण जरी वेगळे असले तरी आज या विखुरलेल्या समाजाची एकी होण्याचे आजची करणे  वेगळी आहेत त्याचा  उहापोह इथे नको ? इतिहास पहिला तर हे मराठे तीन प्रवर्गात विभागले गेले होते .एक गढीवरील मराठा ,चिरेबंदी वाड्यातील मराठा आणि वाडीवरील मराठा ...



तीन मराठे आज रस्त्यावर का उतरत आहेत ते कळने जरी कठीण असले तरी उमगणे सोप्पे आहे यांना सत्तर वर्षानंतर आरक्षणाची गरज वाटत आहे . या तिघा मराठ्यात  कधी रोटी बेटी  व्यवहार झाला नाही तरी पण एक झेंड्याखाली आले आहेत ? हे मोठी राजकीय खेळी आहे .



मराठा हा महाराष्ट्र पुरता पाहावयाचा असेल तर उल्लेख केल्या प्रमाणे  तीन भागात  विखुरलेले पहावयास मिळतील .आज जरी काही कारणाने रस्त्यावर  एकत्र आले असले  तरी पुढील काळात ही एकत्र येतील का हा एक अनुउत्तरीत स्वप्न राहील . आणि पुढे जाऊन  रोटी बेटी व्यवहार होतील असे ही नाही .मग हे तीन मराठा कोण ?





 या गोष्टीला इतिहास साक्षी आहे ,एक मराठा जो गढीवर राहतो ,त्यास गढीवरील मराठा म्हणतात हा एकदम गावाच्या माध्येभागी सुरक्षित वास्तव्यात राहण्याचे ठिकाण म्हणजे  बुरुज.या बुरुजावर या मराठ्याचे वास्तव्य पूर्वी प्रत्येक गावात एक तरी उंच बुरुज असे.गावाला एक गोलाकार बारा ते वीस फुट भिंत असे  आणि या आवारात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असत ते एका ठराविक वेळेला उघडत आणि बंद होत असत , हे पाटील आशय अलिशान महालात  राहत असे , उंच बुरूजावर ऐक पैस आवार आणि त्या आवारात चिरे बंदी वाडा बांधून राहत असे , भागात या पाटलास मालीपाटील  असे ही म्हणत असत . मात्र बहुजन या आवाराच्या बाहेर ,त्यात मांग ,महार ,आणि त्यांचे सर्व वंश्यावळ भरभक्कम शेतीचे.त्यांना सर्व गाव मालक म्हणायचे देव की हो गावचा.खूप दरारा जे पाटील म्हणतील तेच होणार .



यांचे कडे खूप किंवा मधयम स्वरुपाची शेती असायची ,एवढी असायची की त्यांना ही माहित नसे  ,मग हे शेती कोण करीत असे तर खालच्या वर्गातील बहुजन आणि बहुजनाची कुटुंबे च्या कुटुंबे यांच्या शेतीचे रखवालदार ,शेतीतील सर्व कामे बहुजन करीत असे ,शेत नागरणी पासून ते धान्याची रास करेपार्येंत  ते राब राब राबत ,बहुजनांची मुले संपूर्ण वर्षासाठी घरगडी म्हणून काम करीत असत ,इथेच काम करणे आणि इथेच झोपणे ,जरी त्याचे लग्न झाले तरी सुट्टी नाही ,आई वडील आणि मुल मुली हे  संपूर्ण भूमिहीन शेतमजूर म्हणून काम करीत असत .याचे मोबदल्यात काय मिळत असे तर धान्य चौथाली हिस्सा किंवा कुठे कुठे पाचवा हिस्सा ,आणि उरले सुरले खळ्यातील रास.जास्तच झाले तर खाल्यातील पडलेले धान्ये सावडून घेऊन जाने ,आणि अखेरचा कळस असा की त्यांच्या गाई म्हसी बैल इत्यादी जनावराने खाऊन टाकलेल्या शेणातून मिळालेले धन्य यावर या समाजाची उपजीविका होत असे.अश्या क्रूर पणे धाकाने बहुजनांची सर्रास पिळवणूक करीत होते .



यांचे कडे घरगडी तर कामाला होतेच पण बहुजांची मुलगी उपवर झाली की यांचीच असायची ,यांचे कडून जन्माला आलेले मुल म्हणजे हरिजन ? याच हरिजन शब्दाचा डॉ बाबासाहेबांनी  पुढील आधुनिक काळात विरोध केला आणि महात्मा गांधीजीने त्याचा उहापोह केला .



अश्या आणि अनेक प्रकारे बहुजनाची आदिम काळापासून सामाजिक आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केली होती ,हे सर्व श्रुत आहे .आणि निरंतर बहुजानावर अंकुश ठेवण्याचा पायंडा पाडून ठेवला होता ,हा मराठा ,मी म्हणील ते दिशा दाखवणारा मराठा ? आज बुरुज आणि त्या बुरुजाची माती ढासळून गेली आहे उरले आहे ते अवशेष पाटीलकीचे .



दिनांक : १४-०८-२०१७

१५.०० HRS -१६ :००

दुसऱ्या प्रकारातील मराठा हा चिरेबंदी वाड्यातील होय ,हे मराठे गावात थोडे जास्तच असतात शेती खूप असून ही सारखे कर्ज बाजरी असतात .यांचे वास्तव्ये गढीच्या पाटील यांच्या आसपास असते ,कादाचीच मंदिराजवळ चिरेबंदी वाडे असतात ,मध्यम आकाराची वाडे या वाड्यात संपूर्ण कुटुंब असते ,मुल मुली सुना बाळ एकत्र राहतात ,वाड्याती गुरे ढोरे बांधतात अथवा आसपास गुरा धोरणच गोठा असतो .यांचे मुले शेतीची देखभाल करतात यांना मदतीसाठी बहुजनांची पोरे कामावर लागतात ,पाटील असल्याचा मनात सुकाळ खूप असतो पण गढीवरील पाटील गावचा मुख्य असल्या कारणाने यांचा क्रमामंक मालीपातील असा लागतो ,बहुजावरील कामगारच्या मेहनतीवर यांची मदार असते ,यांना घर गडी लागतो वर्षभर करार पद्धतीने बहुजनांची मुले कमावर ठेवत असत ,भरगच्च  शेत आणि शेत मळे यांचे कडे असल्यामुळे उत्त्पन्न ही तश्याच पद्धतीने असते ,वर उल्लेख केल्यामुळे हे ही बहुजानाचे शोसित आहेत सर्व गह्रातील कामे करून घेत पण घरात प्रवेश नसे ,बहुजनासाठी यांनी एक वेगळी खोली आंदन म्हणून ठेवलेली असते ,तिथेच बसने आणि तिथेच खाणे ,करण प्रश्न सिवाशिव आणि बाटा बाटीचा असतो न ,समजा तुम्हाला चाहा हवा असेल तर ,एक राखून ठेवलेली कप बशी असते ,त्यातच चहा प्यायचा आणि स्वतः धुऊन ठेवायची आणि परत तलफ झाली की ती तुम्ही वापरायची ,आणि कायम ती तुमचीच असे .

शेतावरील कामात भयंकर पिळवणूक केली जात होती ,घर गड्याने पहाटे तीन वाजता मळ्यात  जाऊन विहरीवर पाणी सोडायचे ,उसाला पाणी द्यायचे आणि उस पूर्ण पाणी पिऊन झाल्यावर परत घरी यायचे आणि सर्व गुर ढोरांना पाणी पाजून झाल्यावर त्यांना नंदीवर घेऊन जाऊन धुऊन आणायचे हे सकाळ चे घरगद्याचे काम असे ,नंतर उरलेली शिळी पाकी भाकर पदरात घेऊन घरी जायचे .घरी जाऊन अंघोळ करून परत मालकाच्या शेतावर जुंपायचे ,हे वर्षभर अहो रात्र चालत असे ,आणि घरगाड्याच्या पदरी काय तर एक ठराविक ठरलेली रक्कम ,एक दिवस सुट्टी नाही,ज्या दिवशी कामावर गैरहजर त्या दिवसाची पगार वजा केली जाई .काय जीवन होते जीवनात काही तथ्य होते का आयुषभर राब राब राबता ? घरगडी वर्षभर बांधला असल्याकारणाने तो त्यांचा गुलाम असे म्हणेल ती कामे बैला सारखी करावी  लागत असे,एखाद चुकीचे काम झाले तर वेळ प्रसंगी मार खाण्यास सामोरे जावे लागत असे. शेत आणि घरातील सर्व कामे करायचे पण घरातील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही ,हीच अवस्था शेतात काम करणाऱ्यांना भोगावी लागत असे ,शेतावर काम करणारी बायका ,आणि वयस्क पुरुष मंडळी यांचे गुलाम असत ,बारा बार तास काम करून जुजबी मोबदला पदरी पडे .या पिळवणूकी बरोबर गुलामासारखी वागणूक असे .पातला समोर मन वर करून बोलायचे नाही म्हणेल ते काम गुमाने आणि इमाने इतबारे करायचे .असे जाच खूप आणि अनंत काळ भूमिहीन शेतमजूर आणि बहुजनावर केले होते .

आता शेवटच्या मराठे बुवा कडे वळू या हे महाशय यांचा उस्रलेला सार ,यांचे कडे म्हणावे तेवढी शेती नाह्वती हे वर उल्लेख केलेल्या पाटला कडे काम करीत असे ,गाव गाड्यावर आणि गावाबाहेर वसलेल्या वस्तीती राहणारा पाटील ,गावात खूप आपुलकी आणि सर्व समाजाचा एकदुवा असलेला पाटील मराठा .जगभर मराठा असलेले बिरूद गावभर फिरनारा मराठा ,पाटील आणि मालीपातील यांच्या इश्र्यावर नाचणारा मराठा ,बहुजनांचा कट्टर आणि जाती वाचक आणी प्रचंड प्रमाणात शिवाशिव पाळणारा मराठा ,बहुजनांना गुलाम करून वेळे काळी बळजबरीने आरोप ठेऊन बहुजनांच्या सतत पथ्यावर असणारा मराठा .काम कमी पण कामाचे भाव खाऊन वाव आणणारा मराठा .बहुजांना सोबत मिळेल ते काम करणारा पण त्याच बहुजनाना कमी लेखणारा ,आणि देव देऊळ यावर आपले गुजरा करणारा व बहुजनाना देवळात मनाई करणारा मराठा .

 आज यांची पाळे मुले नस्ठ झाली आहेत .गढी ढासळून गेली आहे ,बुरुजाची माती विकुन खाण्याची वेळ आली आहे ,चिरेबंदी वाडे भुई सपाट झाली आहेत ,आणि राहिल्या आहेत त्या आठवणी ,गाव संपला आहे गावाचा नगारा फुटला आहे,गावाची तटबंदी वाहून गेली आहे ,आणि गावाची येस आणि तिचे दरवाजे ही नस्ट झाली आहेत ,उरला आहे फक्त मराठा ,एक मराठा लाख मराठा .

Last updates :१४ - ०८-२०१७

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...